रीचमंड दौरा

uअमेरीकेत – रीचमंड, व्हर्जिनीया /u
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आम्हा दोघांना निरोप देण्यालाठी घरातील सगळेजण आले होते . मुंबई – अटलांटा – रिचमंड हा विमानप्रवास २२ तासांचा तर डोंबीवली ते विमानतळ व रिचमंड ते आनंदचे घर ३+२ तासांचा कारमधून प्रवास ,असा एकूण २७ तासांचा प्रवास होता .सर्वांचा निरोप घेऊन प्रथम काऊंटरवर तिकिट तपासून विमानात बसण्याची जागा निश्चित करून घेतली. दोन मोठ्या बँगा Check in करून घेतल्या . आता त्या आम्हाला अटलांटा विमानतळावर मिळणार होत्या . आमच्याजवळ आता फक्त केबिन बँगाच राहिल्या होत्या .Security Check साठी रांगेतऊभे राहीलो . रत्री -पुरूषांची रांग वेग – वेगळी होती . तपासणीसाठी दिलेल्या ट्रे मध्ये बुट ,बेल्ट, पैशाचे पाकीट ,मोबाईलसह ईतर ईलेक्ट्रॉनिक वस्तु ठेवलिया आक्षेपार्ह वस्तु जसे लायटर ,दाढीचे रेझर, नेलकटर, चाकूसह कोणतेही शस्त्र, द्रवपदार्थ पाणी/ औषधी …ई . केबिनबँगमध्ये नेण्यास मनाई असल्याने त्या वस्तु जप्त केल्या जाताात . परंतु अशा वस्तु चेक -इन बँग मध्ये नेता येतात . सेक्युरेटीचेक झाल्यावर विमानात प्रवेश करण्यासाठी तिकिटावर दर्शविलेल्या गेटजवळ रांगेत बसलो .विमान सुटण्याच्या वेळेच्या अगोदर १० -१५ मिनिटे अगोदर प्थम बिझिनेस क्लासचे प्रवासी ,कडेवर लहान मुल असलेल्या स्त्रिया , अपंग प्रवासी , नंतर ईतर प्रवाशी अशागटागटाने विमानाला जोडलेल्या मार्मिकेतून विमानात प्रवेश करणयास सज्ज झालो . विमानाच्या प्रवेश द्वारातच हवाईसुंदरी तसेच विमानाचा कर्मचारी प्रवाशांचे स्वागत करित होते . आमही दोघेही आमच्या जागेवर स्थानापन्न झालो .
आमच्या बसण्याच्या जागेसमोर असलेल्या लहान टी .व्ही . च्या पडद्यावर आमच्या विमानाची संपूर्ण माहिती मुंबई-अटलांटा प्रवासाचे अंतर , लागणारा वेळ , विमानाची सद्यस्थिती उंची ,वेग , जगाच्या कोणत्या भूभागावरून आकाशातून ढगाच्या वरून जात आहे , बाहेरचे /आतले तपमान किती आहे , मुंबई तसेच अटलांटा येथे हवामान कसे आहे ….ई . बाबींची माहिती दिसत होती. तसेच करमणुकीचे कोणकोणते चित्रपट हिंदी/ईंग्रजी भाषेतून उपलब्ध आहेत हेहू दाखवत होता . विमान सुरू झाले नी हवाई सुंदरींनी सगळ्या प्रवाशांना आपापले सीट -बेल्ट बांधायला सांगीतले . विमान धांवपट्टीवरून उड्डाणासाठी वेगाने जाऊ लागले . एक झटका लागला , पोटात गोळा आला नी विमानाने आकाशात झेप घेतली . मुंबईतील उंचच उंच ईमारती लाईट्स दिसेनासे झाले . विमान पाहता पाहता ढगाच्याही वर गेले . विमानाचा वेग ठरविल्याप्रमाणे स्थिर झाल्यावर बांधलेले बेल्ट सोडले व विमानात फिरता येऊ लागले .
विमानातील कर्मचारी तसेच हवाई सुंदरी प्रवाशांना पाणी , फळांचे डबाबंद रस , चहा , कॉफी , व्हेज /नॉन व्हेज नाश्ता , जेवण , आवडीप्रमाणे ड्रिंकस् हसतमुखाने पुरविण्याची सेवा करीत होत्या .आमच्या बसण्याच्या जागेसमोरच्या छोट्या टि. व्ही.पडद्यावर आम्ही आवडणारा हिंदी चित्रपट पहायला सुरवात केली . हळू हळू निद्रादेवीच्या अधीन होऊ लागताच टि .व्ही . बंद केला .विमानात घरच्यासारखी झोप आली नाही . विमानात मध्यभागी तसेच मागील भागात लँव्हाटरीची सोय असते . आम्ही दोघांनी क्रमा क्रमाने त्याचा उपयोग केला . सकाळी पुन: चहा, नाश्ता देण्यात आला . विमानातील टि. व्ही. विमानाचा मार्ग नकाशा मधूनमधून दाखवित होता . विमानाने मुंबईपासून किती अंतरावर आलेले आहे ? त्याचप्रमाणे अटलांटा किती अंतरावर आहे ? किती वेळात अटलांटा विमानतळ येणार आहे ? आमचे विमानाला अटलांटा विमान तळावर दिड तास उशीरा पोहोचले . आमच्या चेक- ईन च्या बँगा लगेज बेल्टवरून यायला अर्धा तास लागला . नंतर बँगांचे नियमाप्रमाणे काटेकोरपणे कस्टम चेकींग अगडबंब अफ्रिकन कर्मतारी वर्गाने रांगेत उभेराहून क्रमाक्रमाने झाले .त्यात पुन: द्रव पदार्थ / शस्त्र /थोडक्यात आक्षेपार्ह वस्तू , फळफळावळे ….ईत्यादि ची कसून तपासणी करीत होता .आमच्या अगेादरच्या प्रवाशाच्या बँगा तपासायला जवळजवळ एक तास लागला होता . आमचा नंबरआला ,आमच्या बँगातून सगळे सामान बाहेर काढले . त्यात आक्षेपार्ह असे फक्त एकच सफरचंद सापडले .तेही देवाचा प्रसाद म्हणून आनंदसाठी आणला होता . त्यांनी आम्हाला पुढे जाण्यास सांगीतले . परंतु आता चौकशी केल्यावर रिचमंडचे विमान विमान केव्हाच निघून गेले होते .पुढचे विमान अर्ध्या तासाने होते .रिचमंडला जाणारे विमान २२ सीटर होते. २ तासांच्या प्रवासांत नाश्ता ,पाणी ,चहा वा कॉफी सगळ्या गोष्टी विकत मिळत होत्या . रिचमंडला पोहोचल्यावर आमच्या बँगा
बेल्टवरून घेऊन विमानतळाबाहेर आलो. आनंद आम्हा दोघांची बाहेर दोन तासांपासून वाट पहात होता . त्याने त्याच्या फोनवर आमचे रिचमंडचे विमान चुकल्याचेपाहिले होते . कार पार्किंगमध्येजाऊन आम्ही बँगा कारच्या डिकीत ठेवल्या .रिचमंडला अतिशय थंडी होती . पण कारमध्ये थंडी वाजतन नव्हती ,पण हायरे दुर्दैवा ! आनंदची कार रूसुन बसली होती .ईंजिन सुरूच होत नव्हते.आनंदने ईन्शुरन्स कंपनीलासर्व कळविले . सरते शेवटी टँक्सी भाड्याने घेऊन घरी जायला निघालो .
अमेरिका प्रशासनाच्या नियमाप्रमाणे कुटुंबतील प्रत्येक जोडीला घरात वेगळी झोपण्यासाठी वेगवेगळी रूमचीसोय असणे गरजेचे होते. लहान मुलासाठी वेगळी व्यवस्थाअसणे आवश्यकहोते . त्याबरहुकूम आनंद -पूर्णिमाने जुने one room kitchan सोडून three room kitchan चे घर घेतले होते.अद्वैतच्या जन्माच्या वेळी पूर्णिमाचे आईवडील, अम्मा/अच्चन प्रथम रिचमंडला आले होते . अमेरिकेत मुलगा की मुलगी जन्मा अगोदरच आईवडीलांची ईच्छा असल्यास दवाखान्यात डॉक्टरांना गर्भजलपरिक्षण करून सांगण्याची परवानगी असते . त्यामुळे आईच्या गर्भारपणात तसे लाड /कोडकौतुक तिच्या कुटुंबियांकडून आनंदाने केले जाते .
आनंद आम्हा दोघांना घेऊन घरी पोहोचला . घरी पूर्णिमा , बाळराजे ,अम्मा , अच्चन सगहळे वाट पहात होते . आम्ही घरी पोहोचताच चहा ,नाश्ता घेऊन सचैल स्नान केले . आनंदने आम्हा दोघांना विमान प्रवासाचा शीण , Jet-lag जावा म्हणून पटकन झोपायला सांगीतले.२-३ तास झोप झाल्यावर एकदम प्रसन्न वाटायला लागले , खेळीमेळीत जेवणे झाली .घरात स्वयंपूर्ण किचन होते. भाजीपाल्याचा कचरा जाण्यासाठी किचनच्या बेसिन मधील बटन दाबले की सगळा काचरा खालच्या ड्रेनेजमध्ये जायची सोय होती . कपडे धुण्यासाठी वॉशींग मशीन , कपडे वाळविण्यासाठी Drier Machine होती . घराबाहेर कोठेही गटार -नाल्या , धुळ ……ई .चा पत्ताही नव्हता . ह्या कॉम्ल्पेक्समध्ये खूप भारतीय कुटंबिय आहेत असे समजले . घराजवळच एक मोठा छानसा तलाव होता , सभोवती उंच झाडीही होती . तलावाभोवती छानसा रस्ता व त्याभोवती लाकडाची २-३ मजली घरे होती . त्यांत अमेरिकेन तसेच भारतीय कुटुंबे लहान मोठ्या मुलांबाळासह , कुत्र्यांसह राहत होती .तलावाभोवतीच्या झाडीत खारूताई ,३-४ ससोबा, चिमण्या ,कावळ्यासारखे पक्षीही होते . कॉम्प्लेक्समध्ये Gymnasium /swimming pool ही होते .
आता बाळराजेंचे बारसे कधी करायचे ? सगळ्यांनी आपापले विचार मांडले , घराचे डेकोरेशन अच्चन आणि मी करायचे ठरविले .आनंदने व पूर्णिमाने बारशाला आमंत्रणे कोणाकोणाला द्यायची ह्याची यादी तयार केली . त्यात मित्रमैत्रीणी , ऑफीसमधील सहकारी , बाहेरच्या मित्रांपैकी वॉशींगटनचा सुंदरम्,वेल्हाळ , ह्यांचीही नांवे अंतर्भूत केली होती . सगळ्यात महत्वाचे बारशाची तारीख तीही सर्वानुमते ठरविली , बारशाच्यादिवशीचा जेवणाचा मेनुही ठरविला. आता सर्वात मोठ्ठा प्रश्न पाळणा व त्याची सजावट ही जबाबदारी सौ. निर्मला आणि सौ .पुन्नमा /अम्मा तसेच कॉलनीतल्या भारतीय कुटुंबातील महिला वर्गाने स्वत:वर घेतली . मी आनंदसोबत होलसेल मॉलमध्ये जाऊन पाळणा आणि ईतर सामान घेऊन आलो . बारशाच्या दिवशी सर्व निमंत्रितमंडळी आली .विशाल वेल्हाळ ६ तासांचा कार प्रवास करून वॉशिंगटनला आला .तेथून सुंदरमला सोबत घेऊन रिचमंडला आला .कॉम्पलेक्समधील सगळी भारतीय कुटुंबेआली .आनंद व पूर्णिमाच्या ऑफीसमधील मित्र-मैत्रिणीही आल्या . सगळ्यांनी मिळून घराची सजावट होताच , बाळराजेंच्या पाळण्याचीही अतिशय सुंदर सजावट केली . इंटरनेटवर बारशाची /पाळण्याची गाणी शोधून लावली , बारशाचा हा कार्यक्रम मुख्यत: महिलांचा कार्यक्रम .सगळ्यांना पूर्णिमाच्या सातव्या महिन्यातल्या Baby-Shower ची आठवण आली . बाळराजेंना पाळण्यात घालण्याच्या कार्यक्रमासाठी कमीतकमी पांच महिला सुवासिनींची आवश्यकता असते .तसेच बाळाते नांव ठेवायला , कानांत नांव सांगायसाठी बाळराजेंची आत्या ,बारशाच्या कार्यक्रमला ,सौ.प्रिती सुनील भुर्के असणे जरूरिचे होते .पण ती तर भारतात मुंबईला ? ह्यांतून सगळ्या I T अन्सनी अतिशय झटपट व सुंदर मार्ग काढला .बारशाच्या सगळा कार्यक्रम स्काईपवर प्रक्षेपित करायला सुरवात केली .कुणी ” गोविंद ” घ्या ! कुणी “गोपाळ “घ्या ! झाल्यावर , बाळराजेंना पाळण्यात ठेवले . सौ . प्रिती आत्याने स्काईपवरून बाळराजेंच्या कानांत तीन वेळा नांव सांगीतले ,’अद्वैत ‘! ‘अद्वैत ‘ ! ,” अद्वैत”! सौ .निर्मला आजीने नांव ठेवले , ” हिंदुराव ” .पण सर्वांना नांव आवडले ”अद्वैत “. रिचमंडला कॉम्लेक्स मधील अनेक भारतीय कुटुंबियांना बारशाला आवर्जून बोलाविले होते .
सर्वांनी ‘ अद्वैतला ‘ अभिष्ट चिंतले .आनंदने जेवायला तेथून जवळच असलेल्या हॉटेलमधून पार्सल बोलाविले, त्यात दोन स्विटस व जेवणानंतर आपापल्या आवडीचे आईस्क्रीमचाही समावेश होता . बारशाचा कार्यक्रमानंतर सुंदरम आणि विशाल वेल्हाळ कारने आपापल्या घरी गेले . विशालने प्रथम सुंदरमला वॉशिंगटनला सोडले थोडीशी विश्रांती घेऊन विशालही पुढे सहा तासांचा प्रवास करून घरी पोहोचला .त्याच्या जवळ GPS असल्याने पुढे ट्रँफिक जाम असल्यास कमी गर्दीचा पर्यायी रस्ताही GPS शोधून देत होता .

पूर्णिमाच्या अम्मा , अच्चन यांची नी निर्मलाची सगळी धांवपळ छोट्या अद्वैतसाठी सुरू असायची .त्याने दिवसा वा रात्री केव्हांही थोडेसा जरी रडायचा आवाज आला तरी तिघेही अस्वस्थ होऊन त्याचेकजे धांव घेत .कधीकधी तर हे सगळे त्याच्या खोलीत पाळण्याजवळ पोहोचेपर्यंत बाळराजे गाढ झोपलेले असायचे . एका आठवड्यानंतर मी , आनंद व पौर्णिमा ह्यांनी वेळापत्रक ठरविले . त्यामुळे सर्वांना विश्रांती , झोप व्यवस्थित मिळू लागली . साधारणत: २ महिन्यानंतर नायगाराचा प्रसिद्ध धबधबा पाहायला जायचे ठरले .अमेरिकेतील नियमांप्रमाणे प्रवासांत पाच वर्षेपर्संत कारसीट अत्यावश्यक होती आनंदने त्याप्रमाणे मोठी कार रेन्टवर आणली .आम्ही कारमध्ये मोठ्ठे थंड पाणी-जार ,कोल्ड ड्रिंक क्रेट आवश्यक तेव्हढेच कपडे ,नाश्ता ,चहा ,दूघ थर्मास ,नँपकीन्स व आवश्यक ते टावेल्स, पेपर नँपकीन्स ,लिक्विड सोप…….ई . घेतले . पूर्णिमाला कार चालविण्याची परवानगी नव्हती. अमेरिकेत FPS म्हणजे मोजमापाची फुट पौंड (भारतातील १९५७ पूर्वीची जुनी पद्धत ) अंतर मैलात तर पेट्रोल /डिझेल लिटरमध्ये मोजतात .अमेरिकेत हायवेवर कार कमीत कमी ६५ मैल प्रतितास म्हणजे साधारणपणे १०० किलोमीटर प्रतितास वेगाने चालवतात .

आनंद एकटाच कार चालविणार होता .पूर्णिमा पुढे, आनंदच्या बाजूला बसली .मी आणि अच्चन मधल्या सीटवर तर अम्मा आणि निर्मला मागे बसल्या ,दोघींच्या मध्ये कारसीटमध्ये ईवलासा ,छोट्टासा अद्वैत होता .प्रवास सुरू झाला. अमेरिकेतील सगळेच रस्ते स्वच्छ असतात .हायवे वर कुठेही थांबता येत नाही . साधारणत: ५० – ७५ मैलावर रेस्ट एरीया असते . तेथे टॉयलेटची सोय होती , लहान मुलांना वेगळा टेबल असतो .त्यावर लहान मुलांना ठेऊन स्वच्छता करता येते . सर्वांना हात , पाय , तोंड धुतल्यावर फार बरे वाटले . प्रत्येकाने चहा , कॉफी ,कोल्ड ड्रिंक ,कुकीज ,बिस्किटे जे आवडले ते घेतले .पुन्हा सर्वजण कारमध्ये आपापल्या सीटवर बसले .पुढचा प्रवास सुरू झाला . एकुण ६ तासाचा प्रवास होता . कार चालू असतांना अद्वैत /आदी केव्हांही रडायचा ,तेव्हां अम्मा व निर्मला दोघीही गडबडून बाळाजवळ जायच्या ,त्याला गप्प करायचा सतत प्रयत्न करायच्या . पण लहान बाळच ते त्याला डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे पहिले सहा महिने वेळापत्रकाप्रमाणे आईचेच दुधच हवे असायचे . त्यामुळे रेस्ट एरियात त्याचे पोट भरले की तो मस्तपैकी झोपायचा . रात्री ९ वाजता आनंदने अगोदरच बुकींग केलेल्या हॉटेलमध्ये पोहोचलो . आनंदला किमान सहा तास विश्रांतीची /झोपेची अतिशय आवश्यकता होती . आम्ही जेवणं झाल्यावर निद्रादेवीच्या अधीन झालो ते कळलेच नाही . सकाळी लवकर उठून तयारी केली , पोटभर चहा – नाश्ता केल्यावर पुन्हा पुढचा नायगाराचा ४ तासांचा प्रवास सुरू झाला . नायगारा धबधबा अमेरिकेतच नव्हे तर जगात प्रसिध्द आहे .आनंद व पूर्णिमा बाळाला घेऊन लोबत येणे शक्य नसल्याने बाहेरच थांबणार होते . तिकीटे काढून आम्ही चौघेही रांगेत उभे राहिलो . पुढे जाता जाता आम्ही कोणीतरी मराठीत बोलतांना ऐकले . अमेरिकेत भारतीय व्यक्ति , त्यातही महाराष्ट्रातील एकदम ६-७ जण भेटल्यावर खूप आनंद झाला . पुढे अधिक चौकशी केल्यावर ही मंडळी तर अकोल्याचीच निघाली , आपुलकी वाढली .मुलगा त्याच्या आई-वडिलांना तसेच सासु-सासर्यांना घेऊन नायगारा धबधबा दाखवायला घेऊन आला होता .आम्ही सर्व ९ जणांचा एक गट तयार केला .लिफ्टने खाली जाऊन ९ निळ्या रंगाचे रेनकोट घेऊन अंगावर चढविले . धबधब्याजवळ नेणार्या बोटीत आमचा नंबर आल्यावर चढलो . नायगारा धबधबा अमेरिका व कँनडाच्या सिमेवर आहे . नायगारा नदीच्या उंचच उंच पात्रातून पडणार्या हजारे लिटर पाण्याच्या जसजसे जवळ जात होतो ,तसतसे त्या पाण्याचे तुषार/थेंब वाढत चालले होते . आमची बोट नायगारा धबधब्याच्या मुख्य धारेच्या अधिकाधिक जवळ गेली ,पाण्याच्या थेंबांनी नव्हे धारांनी बोटीतील आम्ही सगळेजण रेनकोट असुनही नखशिकांत भिजलो .थोड्याच वेळात आमची बोट हळूहळू किनार्याकडे गेली . अमेरिका व कँनडाला जोडणारा उंच पूल व नायगारा धबधब्याचे रोमांचकारी दर्शन डोळ्यात साठवितच आम्ही किनार्यावर उतरलो . लिफ्टने वर आलो. आनंद ,पूर्णिमा व बाळराजे आमची वाटच पहात होते . आता आमच्या पोटांत कावळे ओरडत असल्याची जाणीव प्रकर्शाने झाली . आनंद आम्हा सर्वांना घेऊन जवळच्याच शाकाहारी हॉटेलात घेऊन गेला . तेथील पदार्थावरक यथेच्छ ताव मारल्यावर आईस्क्रीम खाल्ले , पोटात थंड थंड गेल्यावर पान खाण्याची तीव्र इच्छा झाली .पण हाय रे , दैवा अमेरिकेत कुठेही पानपट्टी नसल्याचे आनंदने सांगीतले . नंतर आम्ही नायगारा दर्शन ट्राम मध्ये तिकिट काढून बसलो ,नायगारा परिसर बघितला . तेथील लहान गवतालाही फुले आलेली दिसली ,नी मला ” गवत फुला रे ! गवत फुला ” ही कविता आठवली . नायगाराला येता जाता अंदाजे ५-६ मैलाचा कारचा प्रवास पाण्याच्या खालून बोगद्यातून करावा लागतो . नायगाराहून आठवणी दाखल नावीन्यपूर्ण वस्तू खरेदी केल्या . नायगाराचे पात्र समुद्रासारखे विशालआहे . त्यात मोठमोठ्या बोटी /जहाजेही दिसली .
परतीच्या प्रवासात मजल दर मजल करीत रिचमंडला रात्री उशीरा घरी पोहोचलो.सगळेजण प्रवासामुळे दमले होते .निद्रादेवीचा अंम्मल लगेचच सुरू झाला नी आपण कधी झोपेच्या अधीन झालो , हे कोणालाच कळले नाही.
रिचमंडला घराच्या जवळच छानसा तलाव होता . त्याभोवती फिरायला रस्ता तयार केलेला होता .तेथील कॉम्प्लेक्समधील लहान मुले सायकलवरून सकाळी आणि संध्याकाळी फिरायला येत असत .त्यांच्या सोबत त्यांचे आई-वडील, आजोबा-आजी धांवत असत .रस्त्यात भेटणारे स्थानिक ,परदेशी कोणीही असो ,प्रत्येकाला हात उंच करून हाय / हँलो /गुड मॉर्निंग /गुड ईव्हिनिंग म्हणत अभिवादन करीत असत .

पुढच्या विकएंडला वॉशींगटनला येण्याचे आग्रहाचे आमंत्रण आनंदच्या मित्राने सुंदरमने दिले होते . त्याप्रमाणे आनंदने सुंदरमला फोन करून शनिवारी येत असल्याचे कळविले . शनिवारी सकाळीच लवकर ६ वाजता सर्वजण निघालो . सुंदरमने वॉशींगटनला भेटण्याचे ठिकाण कळविले होते . त्याप्रमाणे १० वाजता सुंदरम आमची वाट पहात थांबला होता . भेट झाल्यावर प्रथम सर्वांनी चहा , कॉफी ,थंडपेय ,नाश्ता घेतला . अमेरीकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान ”व्हाईट हाऊस ” जवळच होते . अमेरीकेचे संसद-भवन , अंतरीक्ष भवन ,अब्राहम लिंकन स्मारक ,युध्दाचे स्मारक तसेच आजुबाजूला इतरही पाहण्यासारखी अनेक ठिकाणे होती . अमेरिकेचे बहुमतांनी निवडलेले अध्यक्ष श्री .बराक
ओबामांचे निवासस्थान ,व्हाईट हाऊससमोरच्या मैदानांत एका मोठ्या ग्रुपचा Rose Day चा कार्यक्रम सुरु होता . आम्ही सगळे त्यांच्या खेळात सामील झालो .सर्वजण अत्यांदित झाले . अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा कोणत्यातरी मिटींगसाठी परदेशात गेल्यामुळे त्यांच्या निवासस्थानात नव्हते . त्यामुळे व्हाईट -हाऊस पाहण्याचा योग हुकला . संसद भवन बाहेरूनच पाहिले. नंतर आम्ही अमेरिकेतील अत्यंत प्रसिध्द अंतरिक्ष भवन पहायला गेलो. पहिले चांद्रयान,अंतराळयान , पहिले राईटबंधुंनी बनविलेले विमान ,विविध रॉकेटस ,अंतराळ प्रवासांतील अंतराळवीरांचा दिनक्रम प्रत्यक्ष पाहायची संधी मिळाली . विविध शस्त्रात्रे जे अमेरिकेतील विविध युध्दात वापरात होती , समुद्रांत वापरावयाची निरनिराळी नवी जुनी आयुधे कशी वापरली जात…इत्यादीचे चित्रिकरण दाखविलेले पाहिले. सर्वांनी जवळच्या हॉटेलात जाऊन पोटोबा केला . अब्राहम लिंकन स्मारकाजवळ आम्ही सगळ्यांनी फोटो काढले . तेथील मला आवडला तो तेथील मधोमध वाहत असलेला मोठा कालवा .त्यातील मनोहारी पक्षी ,मासे……इ. युद्धातील वेगवेगळे प्रसंग त्रिमितितील भित्तिचित्रे ते प्रसंग हुबेहुब समोररच घडताहेतसे वाटत होते . संध्याकाळ होत आली होती .आम्ही सुंदरमचा निरोप घेऊन परतीच्या वाटेला लागलो . रात्री ऊशीरा घरी पोहोचलो थोडेसे खाऊन निद्रादेवीच्या कधी अधीन झालो ते आमचे आम्हालाही कळले नाही . अद्वैतशी खेळतांना ,बोबडे बोबडे बोलतांना वेळ कसा जाई ते कळत नव्हते. अच्चन , अम्मा केरळीय पद्धतिचे पदार्थ मधूनमधून बनवितअसत .सौ .निर्मला महाराष्ट्रीयन पदार्थ तयार करत असे . चि. सौ . पूर्णिमा हळूहळू कामावर जायला लागली . तिला केरळीय पदार्थाबरोबर सौ. निर्मलासोबत महाराष्ट्रीयन पदार्थ बनविण्याचीही हौस होती .मधून मधून पूर्णिमा टँबलेटवर इंटरनेटच्या मदतीने, पाहून पाहून रेसिपीप्रमाणे नवनवीन पदार्थ बनवित असे . अच्चन कोशिंबीर बनवितांना कैरी ,कांदा …इ .अगदी बारीक कापत असत . आनंद मधून मधून आम्हाला मॉलमध्ये घेऊन जात असे . तेथे आवश्यक त्या किराणा, भाजीपाला , कपडे , औषधी ,ईलेक्ट्रॉनिक वस्तु ….इ . थोडक्यात Pin to piano (Car/ T . V . सह ) मिळत असत . अमेरिकेत प्रत्येक घरी कार आवश्यक गोष्ट आहे . कारण घरापासून ऑफीस , मॉल ,मंदिर , ओळखीच्या व्यक्ति साधारणपणे कमीचकमी १५ किलोमीटर अंतरावर आहेत . सार्वजनिक वाहन व्यवस्था नगण्यच असल्याने स्वत:चे वाहन अत्यावश्यक ठरते . पायी पायी जाणे अशक्य , सायकलचा प्रवास करता येतो .पण Marketing करता स्वत:चेच वाहन हवे . मकरंदची ( M. I .T. )Verginia University रिचमंडमध्येच आहे . त्यानंतर आम्ही सर्वजण Sea Beach वर जाऊन आलो . रेसिंग करणार्या मोटार-बोटी , समुद्र काठावरच्या वाळूतून भटकणे , धावणे , विविध पदार्थ खाण्याची मजा लुटणे ……इ. गोष्टित आम्हा सर्वांचा दिवस कसा संपला ते कळलेच नाही .
मुंबईला मकरंद ,मुणालिनी सुनबाई , गं.भा.आईसाहेब होत्या . ह्या सगळ्यांची आम्हा दोघांना फार आठवण येत होती .आमचे परतीचे तिकीट रिचमंड-अटलांटा-मुंबई असे होते . रिचमंड विमानतळावर अद्वैत-बाळराजांसह सगळे निरोप द्यायला आले होते . सेक्युरिटी चेक झाले ,सगळे सामान चेक-ईन केले असल्याने आम्हाला त्याचा ताबा मुंबई विमान तळावरच मिळणार होते .विमानात प्रवेश करून आमच्या जागेवर बसलो. रिचमंडहून अटलांटाला पोहोचण्यास दोन तास लागले .
अटलांटा विमानतळ खूपच मोठे होते .दिवसभरात सुमारे २०० विमानेयेथून ऊड्डाण करतात . ईतर विमानाप्रमाणे , आमच्याही सामानाच्या बँगा रिचमंडच्या विमानांतून मुंबईच्या विमानात हलविण्याचे काम सुरू होते . अचानक आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले . मुसळधार पाऊस ,वीजांचा कडकडाट ,सोसाट्याचा वादळ वारा ह्यामुळे बाहेरचे सगळे काम थांबविणे भाग पडले . सगळ्याच विमानात न हलविलेल्या सामानाच्या बँगा मुसळधार पाऊस मनसोक्त भिजवित होता . सुमारे दोन तास चाललेले हे तांडव एकदाचे थांबले . सामानाच्या बँगा जशा आहेत तशा विमानात चढविण्यात आल्या .आमच्या विमानाचा ऊड्डाण करणास तयारच्या रांगेत ४८ वा क्रमांक होता . विमानात बसल्यावर चहा , नाश्ता , पेयपान …इ . झाल्यावर सगळ्यांच्या डोळ्यावर झोपेची जबरदस्त झापड आली होती . सगळेजण कधी निद्रादेवीच्या अधीन झाले ते समजलेच नाही . अटलांटा – मुंबई सलग प्रवास २० तासांचा होता . सकाळी सकाळी २ वाजता मुंबई विमानतळीवर ऊतरलो . सामान बेल्टवरून घेऊन , कस्टम चेक , ईमिग्रेशन चेक होईतो २ तास गेले . विमानतळाबाहेर मकरंद , सौ. प्रीति /सुनील तसेच श्री . बाबासाहेब भुर्के ( व्याही )गाडी घेऊन आलेले होते .रिजन्सी ईस्टेटमध्ये सकाळी पोहोचेपर्यत सकाळचे पांच वाजले होते .आमचा विमान प्रवासाचा Jet Lag जाण्यासाठी मस्तपैकी कडक चहा घेऊन झोपलो

डलास व्हिजीट २०१४

आनंद डलासहून २८ मे २०१४ ला  सुटी काढून मुंबईला एकटाच आला . पूर्णिमा दोन महिन्याच्या छोट्या (बाळाला ) वेदांतला आणि पांच वर्षाच्या आदीला घेऊन अम्मासोबत , तिच्या आईसोबत केरळला ,प्रवीणच्या लग्नानिमित्ताने , येडाऊर केरळला एक महिना अगोदरच आलेली होती . आनंद मुंबई येथून २ जूनला कोचीनमार्गे जाणार आहे .तेथून चार (४) जून २०१४ ला मुलांसोबत  निघून , मुंबईला येणार आहे . आनंदला फक्त १५ दिवसच सुटी मिळाली आहे . १५ दिवस त्याला Work from home करावे लागणार आहे . प्रवीणचे लग्नाचे नक्की नाही असे समजते .
त्याला अकोला , उंद्री आणि चिखलीलाही जाऊन यायचे आहे . अकोल्याला दाबकी रोडवर हिंगणेकरमामांकडे आता फक्त चि . कु. मेघा ,चि.कु.बाबी ,चि. कु. राजू आणि विनयदादा असे फक्त चारच व्यक्ति राहतात .पूर्वीचे नांवालौकिक असलेले हिंगणेकरमामांचे कुटुंबातील एकामागोमाग श्री .मोठेमामा ,लहानमामा, सौ .मोठ्यामामी ,सौ .लहानमामी , यांचे वृध्दीपकाळाने व दीर्घ आजाराने निधन झाले . त्यानंतर चि.कु .कविताताई तसेच मागीलवर्षात आनंदच्याच वयाच्या चि.वेणुगोपाल. उर्फवबाळूचे अचानक निधन झाले. राहिलेल्यापैकी मोठ्या चि.कु.मेघाला पायाच्या त्रासामुळे तर सर्वात लहान चि. कु.राजू हात व पायाच्या वातासारख्या त्रासामुळे जवळजवळ अंथरूणाला खिळलेली आहे . चि .बाबीला उच्च रक्तदाब व डोळ्याचा रँटीनाचा त्रास आहे .घरातील एकमेव पुरूष सदस्य असलेल्या चि. विनयला सध्या नैराश्याने ग्रासलेले आहे असे वाटते . त्यांच्या घरांत सर्वजण पदवीधर होते / आहेत .पण कमावते मात्र कोणीही दिसत नाही . मेघा बी. ए. एम . एस . ( आयुर्वेद ) तर राजू डि. एच .एम.एस .(होमिओपँथी ) डॉक्टर आहे ,चि .बाबी बी .एस .सी. तर विनय पँथाँलाजी पदवीधर आहे .
त्यांचेकडे आनंदला धांवत पळत जाणे गरजेचेआहे .
त्यानंतर उंद्रीला आनंदचे मामा श्री.रमेशमामा , चि. अजय ,सौ.उज्वला तिचा लहान मुलगा व्यंकटेश व मुलगी दिपाली राहतात ,सौ.सुशीलामामींचे एप्रिल २०१४ मध्ये मेंदुतील कँन्सरच्या गांठी व अचानक आलेल्या हार्ट अटँकमुळे निधन झालेले असल्याने ,जाणे अत्यावश्यक आहे .
चिखलीच्या श्री.श्रीराम मामांचा चिखलीच्या तहसील कार्यालयांत नोकरी करणारा एकुलता एक कमावता मुलगा विजय ११ नोंहेंबर २०१३ ला नागपूरला दवाखान्यातच निधन पावला . घरी दुसरे कोणी कमावते नाही . नातु अभिजीतचे पुणे येथे सुरू असलेले ईंजिनिअरींग डिप्लोमाचे शिक्षण आता सुरू कसे ठेवायचे? स्वत:च्या पेन्शनवर घर कसे चालवायचे ? कै.विजयची पेन्शन कधी मंजूर होणार ? शासनाकडून जिल्हा परिषदेमार्फत मिळणारी प्रॉव्हिडंड फंड /शिल्लक रजेचा पगार /औषधोपचाराच्या खर्चाची नियमाप्रमाणे मिळणारी थकबाकी / कुटुंब पेन्शन / ग्रँच्युइटी ….ई. ची थकबाकी रक्कम कधी हातात मिळणार ? अशी प्रश्नांची मालीकाच ति. जनार्दन मामाकडे सद्यस्थितीत समोर उभी आहे . नातु अभिजित ( सोनु ) बुद्धिने तसा विचारी , अकाली प्रौढत्व आलेला तरूण मुलगा आहे .आता ह्यापुढे त्याच्यावरच संपू्र्ण कुटुुंबाची जबाबदारी असल्याची त्याला जाणीव आहे. अशाही परिस्थितीत त्याने तुर्तास १२वीची परिक्षा बहि:शाल देऊन ह्यावर्षी उत्तीर्ण केली आहे . वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर त्याली नोकरी मिळेल परंतु किमान ४-५ वर्षे लागतील ह्याचीही त्याला कल्पना आहे . ह्या कुटुंबाला चिखलीला प्रत्यक्ष भेटून त्या सगळ्यांना मानसिक आधार देणे अत्यंत आवश्यक आहे , ह्याची आनंदला जाणीव आहे .
अकोल्याला चि. सौ .ज्योतिताई उंबरकरचे सासरे श्री, उद्धवरावांची प्रकृति वय वर्षे ७६,वृद्ध झाले आहेत.त्यांचीही भेट घेणे जरूरीचे आहे सुशील व निखिल ही दोनही मुले उच्चशिक्षित असूनही अजूनही त्यांना जॉब मिळू शकला नाही . कु.आरतीही पदवीधर आहे . श्री. सत्यशील उंबरकर एम. एस .ई . बी. तून ज्युनिअर इंजिनिअरपदावरून एक वर्षापूर्वी निवृत्त झाले आहेत .घरांत वृद्ध वडिलांशिवाय दोन वृद्ध आत्यांचीही जबाबदारी त्यांचेवरच आहे . हे कुटुंब सध्या आदर्श कॉलनीत राहते .
येथून जवळच वर्धमाननगरमध्ये सौ. सुषमाताई (माई ) राहते .ती सध्या श्री.अनिलदादा अँग्रीकल्चर ऑफीसरसह राहते .तिची दोन मुले मनोज आणि निखिल पुण्याला आय. टी. ईंजिनिअर आहेत.मोठ्या मनोजचे लग्नाचे प्रयत्न सुरू आहेत.मनोजने पुण्याला घर बुक केले आहे . नजीकच्या भविष्यात घराचा ताबा मिळेल असे वाटते.आंनदला आईसह( सौ. निर्मला ) २ दिवसाच्या कालावधीत धांवत पळत
अकोला ,चिखली व उंद्री भेटीनंतर नंतर शेगांवला गजानन महाराजांचे मंदिरात समाधीचे दर्शन घेऊन परत संध्याकाळी डोंबिवलीला रेल्वेनेच जायचे आहे .
मुलांना मुंबईला घेऊन आल्यावर कदचित मकरंद ,सौ.मृणाल ,मृणमयी ,सुनी़लसोबत लोणावळ्यालाही चेंज म्हणून जाणार आहे . परत आल्यावर २८जुलै२०१४ला अमेरीकेतील डलासला (टेक्सासराज्य) जाणार आहे , त्यानंतर ३० जुलै २०१४ला मी आणि सौ . निर्मला डलासला किमान तीन महिन्याकरीता जाण्याचे ठरले आहे . आम्हा दोघांची तिकीटे उशीराने मिळाली ,अन्यथा आनंद सोबतच डलासला जाता आले असते . डलासला त्याने रिचवुड , फ्रिस्कोमध्ये मागील वर्षीच नवीन दुमजली मोठे घर बांधून घेतले आहे . त्याने नेाव्हेंबर २०१३ मध्ये गणेश पूजन करून ” गृहप्रवेश ” केला . त्यान त्या अगोदर प्लेनो – हेरिटेजमधून सर्व सामान आणले . आम्ही दोघे गेल्यावर ३१ ऑगस्ट २०१४ला वास्तु पूजेचे आयोजन केले आहे . त्यादिवशी तेथीलच गुरूजी येऊन वास्तु पूजन करऊन घेणार आहेत. .हा घरगुती कार्यक्रम असल्याने , त्याच्या तेथील मित्रमंडळींना बोलाविणार नाही , असे ठरविले आहे . अपवाद फक्त मियामी येथे राहणारा समीर बालंखे . समीर , ठाणे – मुंबईच्या ति . गं.भा . शशी ( बालंखे) मावशीचा मुलगा . तो वास्तुपूजनाच्या अगोदर एकटाच शुक्रवारी येणार आहे . रविवारला वास्तुपूजन झाल्यावर सोमवारी सकाळी परत मियामीला परत जाणार आहे . त्याची पत्नी व ८ वीत शिकणारी मुलगी सुटी नसल्यामुळे वास्तुपूजनाला येऊ शकणार नाहीत. समीर अमेरिकेत जवळजवळ २० वर्षापासून आहे . त्याची पत्नी तियानी इटालीयन आहे . त्यांची मने , एकत्र नोकरी करतांना ,जुळली आणि त्यांनी लव्ह मँरेज केले . लग्नाला अमेरिकेतील समीरच्या नात्यातील एकमेव व्यक्ति श्री.टांकसाळे हजर होते .

समीरची आई , बहिण मेघा व मेहुण यांना पासपोर्ट / व्हिसा अभावी अमेरिकेत येणे अशक्य होते .

मकरंदसोबत आम्ही दोघे सर्वांचा निरोप घेऊन ,टँक्सीने रात्री आठ वाजता डोंबिवलीहून निघून ११ वाजता विमानतळावर पोहोेचलो, नी पहातच राहिलो. मकरंदने see off केले अन् तो लगेच डोंबिवलीला परत गेला .

भारतांतात महाराष्ट्रातील अंधेरीचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आता अद्यावत, प्रशस्त व जागतिक दर्जाचे बनविण्यात आले आहे .आमचे विमानाचे तिकिट रात्री एक वाजता कतार एअरवेजने दोहामार्गे होते .दोहा येथे दोन तासाच्या

मुक्कामानंतर पुन: कतार एअरवेजच्याच विमानाने अमेरिकेतील टेक्सास राज्यातील डलासला जायचे होते .मुंबई ते दोहा तिन तासांचा विमान प्रवास आहे.

Dallas visit

१ सप्टेंबर २०१२ :- अमेरिकेत कार्यालयात पांच दिवसाचा आठवडा असतो. शनिवार,रविवारला जोडून सोमवारी सुटी असतांना Long Weak End चा फायदा घेऊन ,आनंद-पूर्णिमाने सेंट अँटोनीच्या Tower Of America चा कार्यक्रम ठरविला . सकाळी आठ वाजता डलासहून निघालो . सेंट अँटोनी टेक्सास राज्यातच २९५ मैल अंतरावर आहे .सरासरी ६५ मैल वेगाने गेल्यास , मधील एक तास नाश्तापाणी धरून साधारणपणे दुपारी दोन वाजता सेंटअँटोनीला आरक्षित केलेल्या हॉटेलांत पोहोचू असा अंदाज होता . प्रत्यक्षात दिड वाजता हॉटेलांत पोहोचलो . जेवणं करून दोन तास विश्रांती घेऊन ,चहा घेऊन टॉवर ऑफ अमेरिका पाहायला गेलो . सेंट अँन्टोनिओमधील ह्या टॉवरवर फिरते ऊपाहारगृह आहे . अमेरिकेतील Liberty Statue ( स्वातंत्र्य देवतेचा पुतळा) नंतर सर्वात उंच वास्तुत ह्याच टॉवरचा नंबर लागतो .सेंट अँटिनिओच्या डाऊन टाऊनमध्ये हे टॉवर आहे .ह् टॉवर ७५० फुट उंच आहे .ह्याची उभारणी ९ ऑगस्ट १९६६ ला सुरू झाली . तर ६ एप्रिल १९६८ रोजी तो जनतेसाठी खुला करण्यांत आला होता . O-Neil Ford ह्या वास्तुशात्रदञाने ह्याची रचना केली. Almo-City तील हा टॉवर सर्वात उंच Sky -Sraperआहे .ह्या टॉवरवर जाण्यासाठी दोन Lift Elevator असून , त्याला तळमजल्याशिवाय चार थांबे आहेत .१)Chart House, २)Bar ,३)Revolving Restaurant,तर ४)Observation Desk . टॉवरवर जाण्यासाठी प्रथम प्रत्येकी ५० डॉलरचे तिकीट काढावे लागते . तसेच Elevated Tag मनगटाभोवती बांधला. आम्ही सगळे चौथ्या थांब्यावरील Observation Desk मध्ये उभे राहिलो .तेथे मजबूत जाळ्या होत्या . तेथे अतिशय जोरात वारा होता .जाळ्याशिवाय तेथे उभे राहणे अशक्यच होते .आम्हाला पँरीसच्याआयफेल टॉवरची आठवण झाली . तेथे सगळ्यांची अशीच अवस्था होते . संपूर्ण सेंट अँटिनिओचे येथून दर्शन होते . सर्वत्र उंचच उंच ईमारती दिसतात .तेथेच भविष्य सांगणारा Fortune Teller बोलणारा पुतळा होता . आम्हा कोणालाच खाण्यापिण्यात वेळ दवडायचा नव्हता . तेथून खाली आलो . तळमजल्यावरील थियेटर मध्ये 4D-Texas Documentary Film दाखवितात .त्यात ३६ ईंच उंचीपेक्षा कमी मुलांना आत प्रवेश देत नाहीत . टेक्सासता ईतिहास ,Bull Fighting Play ,प्रक्षणिय स्थळे , विविध जंगले ,नद्या …ई .दाखवितात . आम्हाला अप्रूप, उत्सूकता होती ती 4D-Film ची ,त्यासाठी विनामूल्य वेगळे चष्मे दिले जातात ,ते चष्मे डोळ्यावर ठेऊन आम्ही थियेटरमध्ये मागच्या बाजूला बसवो . जणूंकाही आम्ही प्रत्यक्षात ,खरोखरच, हेलीकॉप्टरमध्ये बसूनच Texas प्रवासाला निघालो . आमचे हेलीकॉप्टर उंचच उंचऊंच ईमारती,जंगलातील झाडांवर आदळते की काय ? समुद्रातील मोठमोठे Live Whale Fishes वर आपण हेलीकॉप्टरसह आदळतो की काय ? बुल फायटिंगचे Bulls तसेच हॉर्स रायडिंगचे Horses आपल्याला आता प्रत्यक्ष धडकतात असे वाटत होते. २० मिनिटांचा Show झाल्यावर सर्वजण बाहेर आलो . बाहेरच्या परिसरांत विविध रिटेल शॉप्स होते . त्यात टॉवर ऑफ अमेरिकाजवळ आपण उभे आहोत असे फोटो काढून देणारा फोटोग्राफर ,शंख ,शिंपले, टॉवर ऑफ अमेरिकाचे प्रिंटेड टी शर्टस् , लेडीज पर्सेस ….इ. ची रिटेल दुकाने, भोवतालच्या परिसरात Hemisphir park मध्ये लहान मोठ्यांसाठी Water parks सगळ्यांना आनंदून गेले . त्यानंतर आम्ही जवळच्याच सेंटअँटिनिओ नदीच्या गोलाकार कालव्यामधून बोटीने जवळ जवळ ४५ मिनिटे आजुबाजुच्या विविध ईमारतींचे सौंदर्य पहात फेरफटका मारला .कालव्याच्या दोनही बाजूला २००-३०० छोटे- मोठे स्टॉल्स आहेत. त्यांत खाण्यापिण्याचे पदार्थ ,विविध व्यावसायिकीकडे विविध नवनवीन वस्तु विकत होत्ते .आपले हुबेहुब रेखाचित्र पेन्सिलीने २५-२० मिनिटांत काढून देणारे कलाकारही होते . आम्ही जवळ जवळ ३-३ तास पायी पायी ३-४ मैल फिरलो . आम्ही बाहेर आलो तोवर रात्रीचे १०.३० वाजले होते .शोधता शोधता आम्हाला एकमेव Indian Marsala Oak उघडे दिसले . तेथे बुफे डिनर घेऊन आम्ही हॉटेलवर पोहोचलो . त्या रात्री सगळे ढाराढूर झोपलो . २ सप्टेंबर २०१२ :- सेंट अँटिनिओ जवळच १२ मैल अंतरावर Sea-World आहे . तेथे कार पार्कींगसाठी मोठे मैदान आहे .तेथे कार पार्कींग सेवा केंद्र आहे.तेथून अर्ध्या मैलावर Sea-World चे प्रवेशद्वार आहे . तेथे तिकीट काढून आंत गेलो .आपल्या गांवाकडील जत्रेसारखी तेथे गर्दी,मनोरंजनाचे विविध ठिकाणी वेगवेगळे स्टॉल्स आहेत . ह्या परिसरांत फिरण्यासाठी २ दिवसही कमी पडतील . एका बाजूला Lost and Found स्टॉल , प्रत्येक ठिकाणी वेगळे तिकीट काढूनच जाता येते .planning करण्यासाठी दिवसभराच्यी कार्यक्रम पत्रिकासोबत Sea World चा संपूर्ण नकाशा दिला जातो . लहान मुले आणि वृद्ध व्यक्तिंसाठी Stroller घेऊन आम्ही निघालो .जगातील विविध पक्षी , प्राणी, विविध जातीचे साप ……इ. चे संवर्धन / संरक्षण कसे करावे ? ह्या साठी १-१ तासाने थियेटरमध्ये Show सुरू होते . Dolphin -Whale-Clove मध्ये मोठ्या तलावात मोठ मोठे शिकविलेले Dolphin/Whale Fish त्यांच्या प्रशिक्षकांसोबत पाण्यात सूर मारणे ,तलावाच्या पाmण्यांत पोहतांना विविध प्रकारच्या कवायती करून दाखवित होते . तलावातील पाणी स्टेडियम मध्येबसलेल्या प्रेक्षकांच्या अंगावर शेपटीच्या तडाख्याने उडऊन त्यांना ओलेचिंब करणे फारच मजेदार वाटले .प्रशिक्षक त्यांना मधूनमधून खायलाही देत होते . ह्याशिवाय Inverted RollerCoaster,Hyper Coaster ,Super Splash Water Ride ,Kiddle Roller Coaster …इ.चित्त्थरारक सफारिही आहेत , मधून मधूनप्रत्येक भागातील All Day Dinning मध्ये ५०% सवलतीत pizza ,Pasta,Buffet /Deserts …इ. चा आस्वाद घेऊन ताजेतवाने Fresh होऊन पुढे जात होतो .तेथील एका लहान तलावात/पाणवठ्यावर लहान मोठ्या मगरीचे Crocodile Feeding ची मजा काही वेगळीच होती . हे सगळे पाहता पाहता पायी फिरता फिरता सगळेजण अगदी थकून गेलो .रात्री ९.४५ ला मोठा Fire Works Spectacular Show होता . तेथे आमची ओळख पुण्याच्या विजय औंधेकरशी झाली . अमेरिकेत , टेक्सासमधील सेंट अँटिनिओच्या सी -वर्ल्डमध्ये तो कुटुंबासह आला होता .पण पाण्याचे इन्फेक्शन झाल्याने त्याला ताबडतोब दवाखान्यांत दाखल करावेलागले होते . तो T.C.S.मध्ये Houstonमध्ये नोकरीला लागला होता . आम्हा कोणातच रात्री थांबायचे त्राण नव्हते . त्यामुळे परत हॉटेलवर येऊन जेऊन झोपलो . ४ सप्टेंबर २०१२ :- चि.अद्वैतला डलासमधील Alpha Montesary मध्ये डे – केअर मध्ये प्रवेश घ्यायचा होता . ही शाळा पूर्णिमाच्या Capital One ऑफीसजवळच होते . सकाळी त्याला शाळेत सोडून पूर्णिमा ऑफीसला गेली . अद्वैतचा शाळेतील पहिलाच दिवस होता ,सोबत घरचे कोणीच न दिसल्याने तो रडायला लागला . तेथील संस्थापक व डायरेक्टर श्रीमती रूपाली भारतीयच होत्या .त्यांचे महाराष्ट्रातील सोलापूरजवळच अब्दुलपूर गांव होते .त्यामुळे त्यांना भारतीय मुलांविषयी विशेष आपुलकी होती .त्यांनी अद्वैतला मायेने जवळ घेऊन शांतपणे समजाविले. तो तेथेच जेवला,दुपारी तेथेच त्याच्या बेडवर झोपला . ईतर मुलांसोबत खाऊ खाल्ला , खेळला . पूर्णिमाने ऑफीस मधून परत येतांना घरी घेऊन आली . सी- वर्ल्डहून डलास Plano ला घरी परतीच्या प्रवासांत हायवेवरच Whole Sale Direct Factory Outlet मधून Clothes खरेदी ५०% ते ७०%Discount असल्याने आम्ही सर्वांनी आपापल्या पसंतीच्या कपड्यांची खरेदी केली . तेथील Bhurje’s Restaurant मध्ये लंच घेतला . सायंकाळ होत आली होती . आम्हा G.P.S . च्या सँटेलाईट निर्देशाप्रप्रमाणे हायवेवर प्रवास सुरू केला . हायवेवर वाहतूक मोठ्या प्रमाणावर जाम झाल्याने साधारणत: १५ मैलाचा लांबचा टोल रस्ता मोकळा असल्याचे G.P.S.ने दाखविले . त्याप्रमाणे प्रवास करून आम्ही रात्री १० वाजता घरी परत आलो . मकरंदची बरेच दिवसांची स्वत:चा बिझिनेस सुरू करण्याची मनीषा होती . त्याला त्याच्याच जुन्या मित्राने श्री.समीरने मनापासून सहकार्य करण्याचे मान्य केले . मकरंदने पुणे म्युनिसिपल काँर्पोरेशन कडून बिझिनेस लायसन्स , शॉप अँड एस्टँब्लिशमेंट लायसेंन्स मिळविले .पुणे येथेच बाणेर परिसरात तिसर्या मजल्यावर ऑफीससाठी जागा मिळाली. २-३ स्टाफ म्हणून कॉम्युटरऑपरेटर टेक्निकल सपोर्टरही मिळाले . कंपनीचे नांव ठेवले ” M/S Indrani Solutions ” हळूहळू , नवनवीन कंपन्यांची कामे मिळण्यास सुरवात झाली . मुख्यालय पुणे येथे मुख्यालय ठेऊन मुंबईत डोंबिवली (पूर्व ) येथे शाखा सुरू केली. कामापरत्वे मकरंद पुणे येथे जाऊन मिटींगला मार्गदर्शन विचारविनिमय करणे/घेणे करत होता . थोड्याच दिवसांत मकरंदला एक फायनान्सर करणारी व्यक्ति मिळाली . सर्वांचा काम करण्याचा हुरूप वाढला . आता मकरंद व समीर मिळून प्रायव्हेट कंपनीची स्थापना केली , कंपनीचे नांव ठेवले M/S C- Duck Pvt Ltd . नवनवीन कंपनीची कामे मिळविण्यासाठी आता जोरदार प्रयत्न सुरू झाले . पुणे ऑफीस व तांत्रिक बाजू श्री . समीर सांभाळणार आणि मकरंद कंपन्यांशी संपर्क करणे , कामाच्या ऑर्डरस मिळविणे , तसेच त्या पुर्णत्वास नेण्यासाठी श्री . समीरकडे तांत्रिक बाबी कंपनीच्या तंत्रद्न्यींकडून पाठविणे ,वेळोवेळी पाठपुरावा करणे …. इ. तसेच कंपन्यांकडून वसुली करण्याची जबाबदारीही सांभाळत होता . ५ सप्टेंबर २०१२ :- सप्टेंबर महिन्यात ति.गं.भा. आईसाहेब , चि.कु.मृण्मयी ,चि. मकरंद , चि.प्रमोदची पत्नी सौ.प्रिया ह्यांचा अनक्रमे ५ , ७ , १२ , व १८ सप्टेंबरला वाढदिवस साजरा केला जातो . ह्या कार्यक्रमासाठी मुद्दाम पुण्याहून सौ .प्रिती व सुनील भुर्के आलेले होते . अकेल्याहून सौ .ज्योतिताई व सौ .सुषमाचे ( माई) ही फोन येऊन गेले . झी मराठी वर सकाळी ११.३० वाजता” राम राम महाराष्ट्र ” कार्यक्रमांत आईसाहेब ,मृण्मयी ,मकरंदचे फोटो दाखऊन वाढ -दिवसाच्या शुभेच्छा दाखविण्यांत येतात , आम्ही सगळ्यांनी अमेरिकेत टि.व्ही. चँनेलवर सर्वांचे फोटो पाहिले .त्यांचे फोटो आनंदने त्याच्या कँमेरात काढले . तसेच आज भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.राधाकृषणन यांचाही वाढदिवस शिक्षक दिन म्हणून भारतभर साजरा केला जातो . महाराष्ट्रात माननीय राज्यपालांच्या शुभ हस्ते राज्यातील आदर्श शिक्षकांना ” राज्य ” पुरस्कार दिले जातात . चि.प्रमोदला मकरंदच्या रेफरन्सने चेंबुरला रू .१००००/- दरमहा पगारावर नोकरीला लागल्याची बातमी मन आनंदून गेली . सौ. निर्मलाने साईबाबांचे ९ गुरूवारचे व्रत , चि .प्रमोदला लवकरात लवकर चांगली नोकरी मिळ्ण्यासाठी सुरू केले होते . त्याची समाप्ति पुढील गुरूवारी आम्ही अत्यानंदाने साजरी केली. तेथील साईबाबांच्या देवळात जाऊन सर्व भक्तांसाठी यथाशक्ति प्रसाद घरूनच बनऊन नेला होता . सप्टेंबर महिन्यातील वाढदिवसांच्या निमित्ताने सगळ्यांनी मिळून मुंबई-डोंबिवलीच्या घरातील मोठा हॉल पेंटिंग लाऊन सुशोभित केला होता. ह्या वाढदिवसाचे जवळ जवळ २६ फोटो मकरंद/सौ. मृणाल/ सौ.प्रितीने मिळून फेसबुकवर टाकले तसेच आनंदलाही पाठविले . सौ .प्रितीने मृण्मयीला Tent House Gift दिले .वाढदिवसाच्या दिवशी केक/लहान मुला-मुलींचे मुखवटे सगळे Angry man चेच होते . आम्ही सर्वांनी वाढदिवसाचा कार्यक्रम Skyp Vedeo live बघितला ,शुभेच्छा दिल्या . ठाणे येथील गं. भा. शशीमावशीचा मुलगा अमेरिकेतच मियामीला जवळजवळ २० वर्षापासून नोकरी करीत आहे .त्याची बायको ईटालीत राहणारी आहे .त्याला मुलगीही आहे ,त्याच्याशी फोनवरून बोललो .त्याला फार आनंद झाला .त्याने मियामीला येण्याचे आमंत्रण दिले . अद्वैतच्या शाळेत ६ सप्टेंबरला श्रीमती अदलापूरकरांनी आल्फा मॉंटेसरीत Grand Parents day आयोजित केला होता . आम्ही सगळेजण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो . श्रीमती अब्दुलपूरकरांशी भेटून खूप आनंद झाला. सर्वांनी कार्यक्रम एन्जॉय केला . ह्या शाळेत बहुतांश मुले भारतीय वंशाचीच आहेत . त्यांच्या पालकांशी परिचय झाला . ७ सप्टेंबर २०१२ :- आज डोंबिवलीला चि.कु. मृणमयीचा वाढदिवस ,सौ .प्रीति सुनील भुर्के नी चि .कु .मृण्मयीला छोटेसेच टेंट हाऊस गिफ्ट आणून दिले .ती अतिशय आनंदून गेली. चि.सौ.मृणालिनी (मोठ्या सुनबाईने ) व सौ .प्रितीने फेसबुकवर जवळ जवळ २६ फोटो टाकले . तिच्या वाढदिवसानिमित्ताने रिजन्सी ईमारत क्रमांक ९ फ्लँट क्रमांक १२०३ मध्ये जिकडे तिकडे डेकोरेशन, केक ,लहान मुला – मुलींना दिलेले मुखवटे ….इ . Angry Man चेच साम्राज्य होते . सर्वच लहान मुला- मुलींनी खूप मज्जा केली . कु.मृण्मयीला आतु /मामानी दिलेले वाढदिवसाचे गिफ्ट, घरातीलच पण खेळण्यातील मोठ्ठा टेंन्ट ,खूपच आवडला .तीची शेजारच्या कु .त्रिशासोबत टेंन्टमध्ये आतून खिडकितून डोकाऊन पाहणे ,सारखे आतबाहेर जाण्या येण्याची लगबग पाहूनआम्ही सर्वजण आनंदून गेलो . कु . मृणमयीने Skyp वर ऊत्साहाने चि .अद्वैतला तिला मिळालेले सगळे Birth-Day गिफ्टस ,खेळणी , टेंन्ट क्रमाक्रमाने दाखविले. अद्वैतनेही तिला नवीनच आणलेला काचेचा Tea-Table तसेच छोटा गोल गोल फिरणारा टि – पॉयही तितक्याच ऊत्साहाने दाखविला . दुसर्याच दिवशी आनंदने अद्वैतसाठीही मृण्मयीसारखाच टेंन्ट आणला ,मग मात्र अद्वैतची कळी आणखीनच खुलली .त्याने लगेच Skyp वर कु .मृण्मयीला ” मलाही पप्पांनी तुझ्यासारखाच टेंन्ट आणला आहे, हे बघ ! असे अत्यानंदाने सांगीतले , आत – बाहेर जाणे , खिडकीतून डोकाऊन पाहण्याचा खेळ आनंद -पूर्णिमासोबत दाखविला . त्याच खुशीत झोपी गेला .दुसर्यी दिवशी सकाळीच Happy Happy होत न कुरकुरता टेंन्टमध्येच दूध पिऊन , नाश्ता करून आई -पप्पासोबत Alpha Montesary त गेला . आनंदने फ्लोरिडाहून येतांना अद्वैतसाठी School Bag आणली . ९ सप्टेंबर २०१२ :- प्लँनो मधील हरिटेज कॉम्लेक्सच्या Gym मधील ट्रेड-मिल ( पट्टा ) वर मी व सौ . निर्मला दररोज सकाळी किमान दहा मिनिटात २.५ मैल अंतर चालत होतेा . त्यामुळे अनुक्रमे ३५ व ४५ कँलरीज जाळत ( Burn ) होतो . त्यामुळे बरे वाटत होते . वजनही हळूहळू कमी होत होते. आम्ही सगळे Fun -Ashia थियेटरमध्ये ”शिरिन फरहीनकी तो निकल पडी” हा चित्रपट पहायला गेलो होतो . दि.१२ व १४ सप्टेंबरला अनुक्रमे मकरंद व सौ .प्रिया प्रमोद लोणकरचा वाढदिवस होता.दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .मकरंदचा वाढदिवस तसेच त्याची मुलगी चि.कु .मृण्मयीचाही वाढदिवस सप्टेंबर महिन्यातच येतो .आनंदचा तसेच त्याचा मुलगा चि.अद्वैतचाही वाढदिवस एप्रिल महिन्यांतच येतो . ह्या योगायोग सर्वांचा आनंद द्विगुणित करून जातो . तसे पाहीले तर आमच्या लोणकरांच्या घरात सप्टेंबर महिन्यात सर्वांत जास्त व्यक्तिंचे वाढदिवस साजरे होतात . १९ सप्टेंबर २०१२ :- आज गणेश चतुर्थी असल्याने सगळेजण लवकरच ऊठलो . अद्वैतला सौ. निर्मला आजीने मुंबईहून आणलेली गणपतीबाप्पाची छोटीशीच पण रेखीव व सुंदर मूर्ती खूपच आवडली . त्याने मुंबईला सर्वांमिळून केलेले डेकोरेशन व गणपती बाप्पाची सुंदर व रेखीव मुर्ती पाहीली होती . त्याने आपल्या घरीही गणपतीबाप्पाची स्थापना करायचे सांगीतले .आम्ही सर्वांनी देवघराच्या बाजूलाच चकचकीत Goldan मोठे तबक ठेऊन, आरास केलेल्या जागेवर गणपतीबाप्पाची स्थापना केली . २१ मोदकांचा नैवेद्य दाखविला ,सौ. निर्मलाने १११ दुर्वा साईमंदिरातील गणपतीसाठी आणि २१-२१ दुर्वा घरच्या गणपतीसाठी निवडून ठेवल्या होत्या . अद्वैतने / पूर्णिमा /आनंद /सौ .निर्मला व मी सर्वांनी फुले, दुर्वादीने पूजा केली , अद्वैतने गणपतीची आरती मोठ्याने म्हटली , जेवणं झाली . आरती करतांना ऊदबत्ती लावतांना खिडकीजवळच ठेवली परिणामी धूर बाहेर जात होता . सेन्सॉरला धूर कळलाच नाही , त्यातून धोक्याचा आवाज आला नाही . सायंकाळी सर्वजण साईमंदीरात जाऊन आलो . २२ सप्टेंबर २०१२ :– आज सौ. राखी राजेश विंचुरकरचा गणपतीच्या निमित्ताने सत्यनारायण पुजेला येण्याचा आग्रहाचा आमंत्रणाचा फोन आला . आनंदने सर्वांना घेऊन जाण्याचे ठरविले . सौ.राखी व राजेश डल्लासला गेल्या १० -१२ वर्षापासून स्थाईक झालेले आहेत. त्यामुळे तिचे २० – २५ भारतीय कुटुंबांशी खास जवळचे संबंध आहेत . वर्षभरात सण समारंभाच्या निमित्ताने वेळोवेळी एकमेकांकडे जाणे येणे असते . त्या सगळ्यांशी ओळख होण्याचा योग आला होता . सौ. राखीची दोन मुले आहेत . चि. राजेशही आनंदप्रमाणेच I.T.कन्सलटंट आहे .त्याला दर आठवड्याला २-४ दिवस कामानिमित्ताने वेस्ट व्हर्जिनिआला जावे लागते . आम्ही सर्वजण ठरल्याप्रमाणे ४४३७ -फ्लॉवर माउंट ,डल्लासला पूजेच्या दिवशी सकाळीच जाऊन पोहोचलो . दुपारी साधारणपणे २.३० वाजता सत्यनारायण पूजा आटोपली . सर्व मित्रमंडळी नेहमीप्रमाणे सहकुटुंब आली होती. भारतीय गुरूजींनी शुद्ध मराठीत पूजा सांगीतली ,आरती झाली .सर्वांनी तीर्थप्रसाद घेतला . एकत्र जमलेल्या सगळ्यांनी एकमेकांची ओळख करून घेतली . त्यांत महाराष्टातील मुंबईतील घाटकोपर पू.मधील शांतीपार्कमध्ये राहिवासी असलेल्या श्री.गणात्रांशी ओळख झाली . ईतरांपेक्षा वयोवृद्ध ,ज्येष्ठ नागरिक असलेले श्री .गणात्रा मुंबई महानगरपालीकेतून १९९८ साली निवृत्त झाले होते .त्यांचेशी गप्पा चांगल्याच रंगल्या . त्यांत वेळ कसा गेला हे कळलेच नाही .सायंकाळी ५ वाजता आनंद ,सौ. पूर्णिमा ,अद्वैत ,सौ.निर्मलासह घरी आलो .थोड्या गप्पागोष्टी झाल्यावर सगळेजण झोपलो . २३ सप्टेंबर २०१२ :- आज शुक्रवार असल्याने आनंद व पूर्णिमा लवकरच घरी आले . आनंदने जेवतांना रात्री तेथील Fun Ashia चित्रपटगृहात Burfi हा Oskar साठी नामांकन/ निवड झालेला चित्रपट पहायला जायचे ठरविले .त्यांत रणवीर कपूर व प्रियांका चोपडाच्या प्रमुख भुमिका आहेत .कमीत कमी संवाद व गाणीही जवळजवळ नाहीतच .रणवीर कपूर मुका तर प्रियांका मंदबुद्धि दाखविली आहे .ह्या दोघांनीही अप्रतिम अभिनय केला आहे . त्याला तोड नाही . अगोदरच्या दिवशी ” मुक्काम पोष्ट लंडन ” हा चित्रपट घरीच C.D.आणूनT.V. वर पाहिला होता . त्यांत भरत जाधव (मुलगा) व मोहन जोशीं (वडिल )च्या प्रमुख भुमिका आहेत . भरत जाधव त्याच्या बालपणीचा त्याला वडिलांनी मांडिवर घेतलेला , २५ वर्षापूर्वीचा फोटो घेऊन लंडनला वडिलांना भेटायला जातो . त्या फोटोत त्याच्या वडिलांच्या हातात अंगठी असते , व त्यानंतर त्याच्या वडिलांनी लंडनहून त्याच्या आईला पाठविलेले ४ कोटिचे न वटविशाँपस्लेले चेक्सही सेबत घेऊन जातो . त्यानंतरची लंडन विमान तळावर उतरल्यापासूनची धमाल गंमत पाहण्यासारखी आहे . त्याचे वडील त्याच्या जवळील फोटोवरून त्याला ओळखतात , पण ओळख न दाखविता अप्रत्यक्षपणे आवश्यक ती सर्व मदत वेळोवेळी करतात . भारतातून आलेल्या नवख्या व्यक्तिला परदेशात , लंडनला कसकसा व किती त्रास होतो ह्याची त्यांनी पूर्ण जाणीव असते . सरते शेवटी वडील व मुलाची भेट झाल्यावक भरत जाधवला वडिलांची (मोहन जोशीची त्य वेळेची भुमिका कशी योग्य होती हे समजते ,त्याच्या मनातील गैरसमज दूर होतात .शेवटी बाप – लेकात समेट होतो. अमेरिकेत भारतात असतात त्याप्रमाणे रिटेल किराणा दुकाने नाहीत .त्याऐवजी मोठमोठे होलसेल /रिटेल माँल आहेत ,अगदी भारतीय उपखंडातील नागरिकांच्या सोयीसाठी एअरकंडिशन ईंडियन मार्केट /मॉल मात्र आहेत .तेथे भारतीय उपखंडात मिळणार्या सगळ्या वस्तु मिळतात .आनंद ३-४ दिवसांसाठी कंपनीच्या कामासाठी Florida ला गेला. अद्वैतच्या Alpha Montessori?di त त्यांच्या वर्गात मुलांना वेगवेगळे Project करायला दिले . अद्वैतला My Family चा Project मिळाला . आम्ही My Family Tree चा विषय निवडला . वॉलमार्ट /पटेल मॉलमधून त्यासाठीचे लागणारे साहित्य पूर्णिमा ,निर्मला व अद्वैतने जाऊन आणले . घरी आल्यावर Computer मधून अद्वैत , पूर्णिमा , अम्मा अच्चन ( पूर्णिमाचे आई /वडील ) च्या फोटोच्या प्रिंटस काढल्या .तसेच आनंद ,निर्मलाआजी व विनोदआजोबांच्याही फोटोप्रिंट काढल्या .आनंद / पूर्णिमाने पिंपळाचे झाड व फांद्या ,पाने सुचविले . परंतु Project अद्वैतच्या Level चे आहे , ही बाब लक्षात घेऊन त्याने पाहिलेल्या अमेरिकेतीलच मोठी लालसर /हिरवी पाने असलेला Tree मी व निर्मलाने सुचविला .सगळ्यांनी ही आयडिया फारच आवडली . मध्यभागी अद्वैत ,डाव्या बाजूला पूर्णिमा ,अम्मा व अच्चन च्या फोटो -प्रिंट तर उजव्या बाजूला आनंद , निर्मलाआजी व विनोद आजोबांच्या फोटो – प्रिंट लावायचे ठरविले . अद्वैत ,आनंद व पूर्णिमाचा फोटो हिरव्या पानांवर तर अम्मा , अच्चन , निर्मलाआजी व विनोदआजोबांचे फोटो लालसर पानांवर लावायचे ठरले . त्याप्रमाणे पुठ्ठयाला White Paper वरील मोठा Tree (लालसर ,हिरव्या पानांसह ) Computer Print चिकटविला त्यावर वरील सगळे फोटो -प्रिंटस् चिकटविले . हा Folding Family Tree सगळ्यांना खूपच आवडला . अद्वैतला My Family वर पांच वाक्ये बोलायची होती . त्याचीही तयारी करून घेतली होती . दि .२७-९-२०१२ :- आज सकाळीच अद्वैत लवकर झोपेतून जागा झाला . तो आज खूपच Happy Happy होता .आम्ही सगळ्यांनी अद्वैतच्या शाळेत जाण्याची तयारी केली .पूर्णिमाचेही ऑफीसमध्ये Presentation असल्याने तिने अद्वैतला Folding Tree सह शाळेत सोडले . आम्हा दोघांना शाळेत नेण्यासाठी आनंदने अगोदरच Taxi Booking केलेली होती .Taxi सकाळी १० वाजता येणार होती . नेहमीचा टँक्सीवाला बरोबर १० वाजता आला .त्याने आम्हा दोघांना १०.२० ला अद्वैतच्या शाळेत सोडले .अद्वैतच्या वर्गातील Friends Group चे My Family Tree project सुरू झाले .प्रत्येकाने आणलेल्या Project शी संबंधीत My Family वर ५-५ वाक्येही न घाबरता बोलून दाखवायला सुरवात केली .अद्वैतचा Folding My Family Tree त्याच्या Teachers सह सगळ्यांना खूपच आवडला . अद्वैतनेही MyFamily वर ५ वाक्ये बोलून दाखविली . I am Adwait Anand Lonkar . This is my father Anand Lonkar . This is my mother Poornima Lonkar . Amma/Achhan are my Grand mother and Grand father . Nirmala Aajee /Vinod Ajoba also are my Grand mother and father . उपस्थित Teachers ,Students व Parents नी जोरदार टाळ्या वाजविल्या . एकंदरीत Presentation उत्कृष्ट झाले . मुला मुलींचे Stage Dairing वाढविण्याचा चांगला प्रयत्न झाला .दुपारनंतर कार्यक्रम संपता संपता पूर्णिमा ऑफीसातून आली होती . आम्ही सगळे अद्वैतला घेऊन घरी आलो . आनंद फ्लोरिडाहून परत आला . आम्ही गुरूवारी श्री साई मॉदिरात जाऊन आलो . दि .२९- ९- २०१२ :- शनिवारी Irvin D.F.W. Dallas ला हिंदु टेंपलला सार्वजनिक गणपति दर्शनासाठी गेलो .अमेरिकेतील ह्या महाराष्ट्र मंडळाने श्री गणपतीची महाकाय मूर्ति मुंबईहून आणली होती . गणपती भोवतीची सजावट पाहून मुंबईच्या ”लालबाग ” सार्वजनिक गणपतीची आठवण झाली . मोठमोठे झांज ,तबला ,पेटी , ढोल ताशाच्या गजरात गणपतीची आरती सुरू झाली .डलासमधील सगळे भारतीय विविध धर्माचे ,पंथाचे लोक हजरराहून मनापासून तल्लीन होऊन आरती म्हणत होते . प्रसाद व ईडली -चटणीचा आस्वाद घेऊन रात्री ऊशीरा घरी परत आलो . दि.३०-९-२०१२ : आज रविवार असल्याने सगळेच ऊशीरा ऊठलो . अद्वैतला ताप ,खोकला , ऊलट्या होत होत्या .तांतडीचा ऊपचार म्हणून त्याला होमिओपँथी Gunpowder, Rescue २०-२०मिनिटांनी दिले . ताचे औषधही दिले . २-३ तासांनी त्याला झोप लागली . आनंद उद्या सोमवारी Work From Home करणार आहे . दि.१-१०-२०१२ सोमवार :- आज सकाळी अद्वैतचा ताप गेला ,कालपासून पुन: ऊलटी झाली नाही. चांगली झोप लागल्याने प्रसन्न दिसत होता . आम्ही दोघे नेहमीप्रमाणे जिममध्ये जाऊन आलो . आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन रिजन्सी इस्टेट ,डोंबिवलीला साजरा करण्यात आला . आज एकंदरित विचार करता ”विभक्त कुटुंब पध्दति ” अपरिहार्य झाली आहे .एकत्र कुटुंब पध्दतिचा र्हास होत आहे .नव्या पिढिला वृध्दांची अडचण वाटायला लागली आहे .त्यांची सतत अवहेलना करण्यात येत आहे . बहुलंख्येने म्हातारपणी मुलांवरच अवलंबून राहावे लागत आहे .पति वा पत्नीचे निधन झाल्यास मानसिकरित्या एकचेपण खायला येते .त्यांच्या हालअपेष्टा वाढतात .बाहेर कोणाजवळही बोलायची सोय नाही. होत असलेले अत्याचार ‘ तोंड दाबून ‘ मुकाट्याने सहन करीत राहण्याशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही . त्यांना स्वत:चे संरक्षणही करता येत नाही . आरोग्यविषयक सोयी ,सवलती नाहीत. ह्यावर एकच ऊत्तर ” ज्येष्ठ नागरिक संघ ”. त्याद्वारे आपल्या अडचणी शासनाकडे वा योग्य आस्थापनेकडे मांडता येतात . स्काईप वर मुंबईला घरी बोललो . सौ .प्रिति , सुनील पुण्याला सकाळीच डेक्कन एक्सप्रेसने गेले . आज अकोला ,ठाणे ,मुंबई भागांत वादळ ”मौसम ” हा चित्रपट झी टि. व्ही .वर आम्ही सगळ्यांनी पाहिला . दि.२-१०- २०१२ मंगळवार :- आज आनंद पूर्णिमाला ऑफीसमध्ये व अद्वैतला शाळेत सोडून आला . काल मुंबईला ”पितृपक्षातील प्रतिपदा ” होती . डोंबिवलीला एक कावळा सकाळपासूनच ‘ काsव ,काsव ‘ करित आम्हा दोघांना शोधत होता . त्याला सौ .निर्मलाच्या हाताने नेहमीप्रमाणे घास मिळाले नाहीत . येथे डलासमध्ये भारतासारखे कावळे शाकाहारी नाहीत , ते मांसाहारी आहेत . येथील भारतीय गुरूजींनी सांगीतल्याप्रमाणे श्री साईमंदिरात जाऊन तेथील गुरूजींना नमस्कार करून दक्षिणा देऊन आलो .तसे डोंबिवलीला ति.गं .भा. आईसाहेबांना व सगळयांना फोन करून सांगितले . आज रिजन्सीमध्ये ईमारत क्रमांक १ च्या बाजूला बांधलेल्या बसस्टॉप वर ईमारतीच्या टेरेसवरील मोठ्ठा Angal पडला , त्याने प्रथम ईमारतीचा ग्लास फोडला व उभ्या असलेल्या बसमधील ड्रायव्हर/क्लिनरपैकी क्लीनरच्या डोक्यावरच पडला , त्यालातांतडीने दवाखान्यात नेले,तेथे १३ टाके घालावे लागले . असे मला मकरंदने फोनवरून सांगितले . दि .६-१० – २०१२ :- शनिवार , नासा , ह्युस्टन भेट . आनंदने ह्युस्टनला Spring Hills Suits Hotel माझ्या – Sr. Citizen च्या नांवावर Internet वरूनच Book केले .त्यामुळे चांगला Discount मिळाला . आनंद – पूर्णिमा सकाळीच ८-३० ला घरून निघालो . त्यांनी मोठी Car भाड्याने सांगितली होती ,त्यात Gas भरून घेतला . डलास -ह्युस्टन ६०० मैलाचे अंतर आहे . रस्त्यात एका ठिकाणी नाश्ता केला . दुपारी १ वाजता हॉटेलवर पोहोचलो . काऊंटर मनला Online आरक्षण दाखविल्यावर त्याने दिलेल्या 511 Suit मध्ये पोहोचलो . सर्वजण फ्रेश झाल्यावर , घरूनच आणलेले पाणी , धपाटे , लोणचे , चटण्या ,कांदे ….इ .चा छान Lunch केला . त्यानंतर सगळ्यांनी तीन तास मस्तपैकी झोप घेतली . नंतर चार वाजता कारने एक तास अंतरावरील Sea -Beach वर पोहोचलो . तेथे वेगवेगळ्या Rides होत्या . आम्ही सर्वप्रथम स्वत:भोवती फिरतफिरत वरवर जाणार्या कांचेच्या बंद कँपसुल Ride ची निवड केली . वरवर जात असतांना आजुबाजूच्या विविध प्रकारच्या Rides चे दर्शन होत होते . तसेच बाजूच्याच समुद्रातील छोट्या छोट्या Rides ही दिसत होत्या . एकंदरीत अत्यंत नयनरम्य द्दृश्ये पाहात पाहात आम्ही कांचेच्या बंद कँपसुलमधून खाली आलो . आम्ही त्यानंतर Beach-Rail Train Ride मध्ये सर्वजण बसलो. ह्या Ride मधून आजूबाजूच्या बहुतांश Rides ची कल्पना येत होती . ह्या Train Ride मधून सफर करता करता मार्गातील बोगद्यातून आम्ही जात अचानकपणे गाडीतील प्रवाशांना गोळीबाराचे ,बॉंब तसेच पिस्तुलाच्या गोळीबाराचे आवाज ऐकू आले .सर्वजण खूपच घाबरले होते . थोडे अंतर पार केल्यावर ह्या आवाजांचे मुळ Train च्या आजूबाजूच्या पुतळारूपी हल्लेखोरांच्या गोळीबारात होते , हे अनाऊन्सरने वेळोवेळी सांगीतले .ही Train Ride कधी संपली हे कळले नाही . आता रात्रीचे ८-३० वाजले होते . तेव्हड्यात पूर्णिमाच्या ह्युस्टनमधील दोन मैत्रिणिंचे फोन आले . त्यांनी तेथील Maharaja Bhog Restaurarant मध्ये Dinner चे आमंत्रण दिले . आम्ही रात्री ९-३० ला त्यांनी सांगीतलेल्या हॉटेलमध्ये पोहोचलो . तेथे पूर्णिमाच्या मैत्रिणीं सहकुटुंब उपस्थित होत्या . Maharaja Bhog Restaurant हे भारतीय पद्धतीचे गुजराथी थाली हॉटेल होते . अगोदरच आरक्षण केलेले असल्याने लगेच आम्ही सगळे आत जाऊन स्थानापन्न् झालो .तेथील सगळे वेटर्स शाही पोषाखात सेवेला हजर होते. त्यांतील दोन वेटर्स पूर्वीच्या राजे महाराजांच्या सेवेत असत तशा प्रकारे जेवणाअगोदर हात धुण्यासाठी छिद्रा-छिद्राचे भांडे व ऊन ऊन पाण्याची झारी हातात घेऊन ऊभे होते.हात धुतल्यावर टॉवेलन् हात कोरडे केले . समोरच्या गुजराथी थालीत शाही वेषातील वेटर्सनी एकामागोमाग ५-६ भाज्यांच्या वाट्या, ३-४ वेगवेगळ्या आंबट -गोड चटण्या ,दहिवडा , पँटीस , बासुंदी , कढी , वरण -भात-साजूक तुपाची धार , पुरी /फुलके …इ .चे ऊत्कृष्ट भरपेट जेवणं झाली . त्यानंतर अमेरिकेत सहसा न मिळणारा त्रयोदशगुणी पानाचा विडा खाल्ला .तो चघळत चघळत आम्ही हॉटेलवर पोहोचलो ,अत्यंत समाधानी मनाने झोपलो . ७ आक्टोबर २०१४ :-मिनाक्षी टेंपल ,ह्युस्टन . सकाळी लवकर ऊठलो .फ्रेश होऊन नाश्ता घेण्यासाठी मी व निर्मला तळमजल्यावर लिफ्ट समोरच्या खोलीत पोहोचलो . पँन-केक, ब्रेड, कॉफी,मध , केळी ,सफरचंद……इ . फळफळीवळेचा आस्वाद घेतला .थोड्याच वेळात आनंद ,पूर्णिमा व अद्वैतही खाली नाश्ता करायला आले . आम्ही सर्वांनी नाश्ता केला .पुन्हा ५११ सुट मध्ये जाऊन सगळे सामान एकत्र केले ,बँगा भरल्या .खाली जाऊन गाडीच्या डिक्कित बँगा ठेवल्या .काऊंटरवर जाऊन Check Out केले . सर्व जण गाडीत बसलो नी मिनाक्षी टेंपलकडे प्रयाण केले . आनंद व पूर्णिमा दोघेही ह्युस्टनला १-२ वर्षे नोकरी निमित्ताने होते .त्यामुळे मिनाक्षी टेंपलला पोहोचण्यासाठी कोणताही त्रास झाला नाही . हे मंदिर दक्षिण भारतातील मदुराई येथील मिनाक्षी मंदिराचीच प्रतिकृति आहे . येथे महागणपति मंदीर , मिनाक्षी , शंकर ,पार्वती ,अय्यप्पा …इ .च्या सुरेख व कोरीव मुर्त्या असलेली सुंदर मंदीरे आहेत . त्यांतील जागृत दवी / दैवतांचे दर्शन घेतल्याने सगळ्यांची मने प्रसन्न झाली . आरती झाल्यानंतर तीर्थ-प्रसाद घेतला. त्यानंतर तेथीलच कँटिन मध्ये जाऊन ईडली- वडा ,सांबार ,लोणचे चटणीआणि एक गोड पदार्थ घेऊन भरपेट नाश्ता केला . बाजूच्या महागणपती मंदिरांत प्रथमच Lemon Lamp पाहिले . एकंदरीत मिनाक्षी मंदिर व परिसर पाहून सर्वांची मने खूप प्रसन्न झाली . आता दिड तास अंतरावर असलेल्या नाविन्यपूर्ण Nasa पाहण्यासाठी निघालो . NASA :- नासा हे दक्षिण अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ह्युस्टन येथे समुद्र किनार्यावरील Jonson Space Centre आहे . विस्तिर्ण जागेत ह्याची ऊभारणी करण्यांत आली आहे . येथे ११ आकर्षक ठिकाणे आहेत . (१ ) माहिती ( Information Centre ) , १५ मिनिटे . ( २ ) Starship Gallary , ४५ मिनिटे . (३ )Blast Off , ३० मिनिटे . (४ )NASA Tram Tour , ९० मिनिटे . ( ५ )Zero -G dinner , १५ मिनिटे . ( ६ ) Space Centre Theatre , ६० मिनिटे . ( ७ )Living In Space , २५मिनिटे . ( ८ )Flight Stimulated , ६० मिनिटे . ( ९ )Space Centre Plaza , ६० मिनिटे . (१०)Kid’s Space Place , ३० मिनिटे . (११)Mission To Mars , ३० मिनिटे . उपरोक्त सर्व ठिकाणे पाहण्यासाठी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजे पर्यंतचा वेळही कमी पडतो . आम्ही सर्वजण नासाला पोहोचलो तोपावेतो दुपारचे १.३० वाजले होते . त्यामुळे आम्ही काही निवडक ठिकाणी जाण्याचे ठरविले . माहिती केन्द्रातून माहिती घेतली . एकंदरीत आम्हाला मुंबईच्या वरळीच्या नेहरू सायंन्स सेंटरची प्रकर्षाने आठवण झाली . (१ ) सर्वप्रथम आम्ही निवड केली Starship Gallary ची , एकूण ४५ मिनिटांचा हा भाग जगातील Largest Display Of Moon – Rocks आहे . अमेरिकन पहिला अंतराळवीर श्री .नील आर्मस्ट्रॉंग चांद्रयानातून चंद्रावर उतरला होता . तेथे त्याने चंद्रावरील माती,तसेच विविध खडकांचे नमुने जमा करून ,परत येतांना आणले .त्याचेच संपूर्ण प्रदर्शन आकर्षक पद्धतिने येथे मांडलेले आहे . चंद्रावरून आणलेल्या मातीचे ,लहान मोठ्या खडकांचे रासायनिक विश्लेषण तसेच पृथ्वीशी तुलना करून त्याची माहिती तेथे आहे . ह्या आणलेल्या मातीला ,खडकांना आपल्याला प्रत्यक्ष स्पर्श करण्याची परवानगी आहे . चंद्रावरून पृथ्वी निळसर रंगाची दिसते असे निरिक्षणही नील आर्मस्ट्रॉंगने नोंदविले आहे . त्यानंतर आम्ही Blast Off Theatre मध्ये प्रवेश घेतला .एकंदर ३० मिनिटांच्या ह्या भागांत रॉकेट प्रक्षेपणाचा प्रत्यक्ष अनुभव आपण घेतो . त्यावेळी आपण 7 Millions Pounds चा धक्का तसेच 4.5 Millions Pounds चा Vehicle Skyward दाब अनुभवतो .त्यवेाळी उठलेल्या प्रचंड धुर -धुराळ्यामध्ये आपण थियेटरमध्ये हरवून जातो . तद्वतच चंन्द्रावर चांद्रयान कसे उतरले ? चान्द्रयानातून अंतराळवीर चंद्रभूमी वर कसे उतरले ? अंतराळवीर बाहेर पडल्यावर चंद्राच्या पृष्ठभूमिवर सोबतच्या छोट्या यानातून फिरतांना तेथूल मातीचे/ लहानमोठ्या खडकांचे विविध नमुने कसे गोळा केले ? ते नमुने सोबत घेऊन छोटे यान चांद्रयानाशी पुन: कसे जोडले गेले ? तेथून परत पृथ्वीवरकसे उतरले ? ह्या सगळ्या गोष्टी समोर प्रत्यक्ष घडतांना आम्ही जणू काही अद्दश्यपणे चंद्रभूमिवरच हजर आहोत ,अस् वाटत होते . ह्यानंतर NASA ची आतापर्यंतची व भविष्यातील Missions ,Explorations ची माहिती चलचित्राद्वारे दाखविली गेली . त्यानंतर अमेरिकेने आत्ता मंगळावर पाठविलेले Curiosity – Rover यान तेथे कसे उतरले ? तेथे हे Curiocity- Rover यान कशाकशाचा शोध घेणार आहे ? मंगळावर जीव सृष्टी आहे किंवा कसे ? तेथे पाण्याच्या प्रवाहामुळे दगड गोटे जसे दिसतात तसे असल्याने ,मंगळावर पूर्वी पाणी-प्रवाह असल्याचा पुरावाच मिळाला आहे . अशा प्रकारची विविध माहिती समोरच्या पडद्यावर समजाऊन सांगूतली जात होती . (३) NASA Tram Tour चा ९० मिनिटांचा आनंद घेण्यासाठी तिकीटे काढून Tram मध्ये बसलो . त्या ट्रामच्या १० डब्या-मिळून एकूण ७० व्यक्ति NASA ‘s JONSON SPACE CENTER ला फेरफटका मारण्यासाठी निघालो . प्रथम नासामध्ये Rocket प्रत्यक्ष बनवितांना त्यासाठी लागणारे विविध पार्टस् Spain आदी देशांत तसेच अमेरिकेतील विविध कँलिफोर्नियादी प्रदेशातही बनवून NASA ला पाठविले जातात .NASA मध्ये हे सगळे पार्टस् एकत्रित करण्याचे काम केले जातात . प्रत्येक भागाचे Experts त्यांच्या मदतनिसांकडून संपूर्ण Rocket तयार होते . येथेच अंतराळवीरांना विविध प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते . अंतराळातून विविध ग्रहावरून परत आणलेले विविध प्रकारचे Rockets येथे प्रदर्शनासाठी ठेवलेले आहेत . (४)Living In Space :- २५ मिनिटांच्या ह्या भागात रॉकेट – कँपसूलमध्ये प्रत्यक्ष जाऊन अंतराळवीरांची दिनचर्या कशी असते हे अनुभवता येते . तेथे सकाळी उठल्यावर शून्य गुरूत्वाकर्षणात स्नानादी प्रा:तकर्मे आटोपून निरनिराळी कामे , जेवण , विश्रांती , संशोधनादी कामे कशी करतात हयाचा प्रत्याक्षानुभव घेतला . ह्यानंतर ईतर भागांत जाऊन तेथील माहिती घेतली .विविध भागांतवेगवेगळे फोटोही काढले . तेथे D.V. D. ही मिळाली . Kid’s भागांत जाऊन अद्वैत अंतराळवीक पोषाखात कसा दिसतो हे पाहिले .आम्ही सर्वांनीही त्या पोषाखात कसे वाटते हे अनुभवले . विविध ग्रहांवर आपापले वजन किती ? ह्याचा स्वानुभव घेतला . अमेरिकेत F.P. S. पद्धतीचा वापर होत असल्याने वजन पौंडात समजले . सायंकाळी ६ वाजता NASA बंद होते .आम्ही सगळ्यांनी नाशिती घेतला .आणि परतीच्या प्रवासाला सुरवात केली . जवळजवळ ६ तासांच्या प्रवासांत पुन: नाश्ता , चहा ,कॉफी ,कोल्ड ड्रिंक्स घेतले .रात्री ११.४५ वाजता डलास प्लँनोला घरी पोहोचलो . Annual Meeting Day In School १२-१०-२०१२ :- अद्वैतच्या आल्फा मॉन्टेसरी शाळेत आज Annual Meeting Day होता .त्यासाठी अद्वैतला नवीन Astrounut चा पोषाख आणला . नवीन Dress टायसह आणला तसेच Super -Man चाही ड्रेस आणला . अद्वैत कधी Astronaut Engineer तर कधी Superman चा ड्रेस घालून खेळायचा . त्याच्या शाळेत आता स्पँनिश भाषाही शिकविणार आहेत . १३ आक्टोबर २०१२ :- मागील आठवड्यापासून पूर्णिमाचे Work From Home सुरू होते . तिने तिचे कंपनीचे काम विहित वेळेच्या आंत ऊत्तम रितीने पार पाडल्यामुळे मँनेजर कडून अभिनंदनाचा Message आला होता . त्यासाठी तिने सगळ्यांना ‘ फन एशिया ‘ चित्रपट गृहात English Vinglish हा चित्रपट सायंकाळी ६ ते ९.३० दाखविण्याचे मान्य केले . त्याप्रमाणे आम्ही सर्वजण ‘ फन एशिया ‘ चित्रपट गृहाला पोहोचलो . ह्यांत श्रीदेवीचा मुख्य Roll आहे .चित्रपटांत तिचे नांव आहे ”शशी ”. पती व दोन मुले अशा तिच्या चौकोनी कुटुंबात सर्वजण गुण्या गोविंदाने राहात असतात. शशी चांगली गृहिणी आहे , ती ऊत्कृष्ट बुंदिचे लाडू तयार करून ऑर्डरप्रमाणे पुरविण्याचे काम करीत असते . शशीला पती व मुलांसारखे फाडफाड ईंग्रजी सफाईदारपणे बोलता येत नाही . तिला घरातील कोणीही समजून घेत नाही ,ऊलट नेहमी हेटाळणीच्या सुरांत बोलतात /बघतात . कोणीही तिला Respectfully वागणूक देत नाही .तिची मोठी बहिण ‘ मनू ‘ पति-निधनानंतर तिच्या २ मुलींना घेऊन अमेरिकेतच न्यु स्थायिक होऊन पतीचाच Business करीत असते . तिच्या मोठ्या मुलीच्या ‘राधाच्या ‘ लग्नानिमित्ताने ती शशी व तिच्या कुटुंबियांना अमेरिकेत येण्याचे आमंत्रण देते . परंतू शशीच्या पतीला कार्यालयीन कामामुळे तर मुलांच्या परिक्षेमुळे अमेरिकेत लवकर जाणे शक्य नसल्याने ,शेवटी शशीने एकटीनेच अमेरिकेत जावे असे सर्वानुमते ठरते . शशी तसे तिच्या मोठ्या बहिणीला ‘मनूला व राधाला ‘ कळविते . सासु ,पति व मुले लग्नाच्या वेळी अमेरिकेत हजर राहण्याचे कबूल करतात . शशी विमानाने अमेरिकेत जायला निघते . शशीच्या मनांत ‘ मला ईंग्रजी चांगले बोलता येत नाही ‘ हा न्यूनगंड असतो .आता प्रवासांत व अमेरिकेत सगळे चांगले ईंग्रजी बोलतील ,तेव्हां मी काय करू ? कसे काय बोलू ? असे अनेक प्रश्न शशीला पडतात . विमानांत तिच्यासोबतचा सहप्रवासी “अभिताब बच्चन ” तिला धीर देतो , चांगले ईंग्रजी येत नाही म्हणून घाबरायचे नाही . इतरांसोबत जमेल तसे ईंग्रजी बिनधास्त बोलायचे . अमेरिकेतील लोकांना भारतांतील लोकांसारखे सफाईदार हिंदी कुठे बोलता येते ? ते भारतात आल्यावर जमेल तसे मोडके तोडके हिंदी न घाबरता बोलतातच ना ! आपण त्यांना कमी लेखत नाही . शशी विमान तळाबाहेर येते . तिला घ्यायला तिची मोठी बहिण मनू आणि राधा आलेली असते . न्युयॉर्कला घरी जातांना एका बसवरील जाहिरातीतील ”Learn English In 4 Weeks Only ” हे वाक्य ती लक्षात ठेवते .घरी गेल्यावर ती जाहिरातीतील फोन क्रमांकावर फोन करून पत्ता लिहून घेते . दुसर्याच दिवशी बाजारांत जातांना गुपचुपपणे 400 $ फी भरून ईंग्रजी वर्गात प्रवेश घेते . दररोज दुपारी बाजारात जाण्याचे निमित्त करून English क्लासला जाते . तेथे तिला डेव्हिड सर हे क्लासचे मुख्य तसेच इतर पाकिस्तानी ,फ्रेंच ,मल्याळम् असे ८-१० वर्गमित्र , विविध व्यवसाय सांभाळून ईंग्रजी शिकायला येत असतात . ह्या सगळ्यांशी तिची मैत्री होते . एके दिवशी Coffee-Day मध्ये कॉफी व सँडविचची Order देतांना ईंग्रजीत बोलतांना अडखळते , घाबरते , चिल्लर नाणी खाली पडतात . Self Service कॉफी व सँडविच नेतांना दुसर्या व्यक्तिचा धक्का लागून सगळे खाली सांडते .शशी रडवेली होऊन बाहेर पडते . केवळ चांगले ईंग्रजी बोलता न आल्यानेच ही फजिती झाली अले तिला वाटते . तिचा फ्रेंच -कुक वर्गमित्र तिला धीर देतो . पुन: कॉफी ,सँडविच घ्यायला Coffee Day मध्ये घेऊन जातो . शशीची ईंग्लिश क्लासमधील प्रगती चांगली सुरू असते . शशीचा पति , २ मुले आणि सासुबाई Surprise देण्यासाठी ठरलेल्या वेळेआधीच लग्नासाठी न्युयॉर्कला येऊन पोहोचतात . शशीच्या ईंग्लिश क्लासबाबतची माहिती राधाला माहिती असते .ती तिला अप्रत्यक्षपणे मदतही करित असते . न्युयॉर्क -एम्पायर ईस्टेट बिल्डिंग पाहायला जायचे सर्वजण ठरवितात .शशीचा English Class त्याचवेळी असते ,शशी पाय दुखण्याचे निमित्त करून मागे मागे राहाते ,तिची व कुटुंबियांची चुकामुक होते .शशीला ती ईंग्लिश शिकत आहे ही गोष्ट सर्वांपासून लपवायची असते .शशी English class ला जाते . त्याचवेळी ईंग्रजीची फायनल परिक्षा जाहिर होते .त्याचवेळी घरी राधाच्या लग्नाची तयारी जोरात सुरू झालेली असते .आता काय करावे ? कसे करावे ? अशा संभ्रमात शशी गोंधळून जाते . लग्नात बुंदिचे लाडू शशीच्याच हातचे बनविलेले सर्वांना हवे असतात . बनविलेले लाडू बाहेर आणतांना दरवाज्यातच मुलाचा धक्का लागून सगळे लाडू खाली पडतांत . शशी पुन: लाडू बनविते . राधाच्या लग्नाच्या ( Wedding ) दिवशीच ईंग्लिश क्लासमध्ये शशीला Final Test असल्याचे कळते . ती तिच्या वर्गमित्रांना आणि डेव्हिड सरांना राधाच्या लग्नाला येण्याचे निमंत्रण द्यायला जाते ,त्यावेळी तिला काय करावे सुचत नाही . तेथे तिला 5 Minutes Speech in English द्यावयाचे होते.अमेरिकेतही शशीला चांगले ईंग्रजी बोलता येत नसल्याने तिचे पति व मुले Respect देत नाहीत . लग्नात सगळ्या पाहुण्यांना शशीने बनविलेले बुंदीच्या लाडूंची Gift अतिशय आवडतीत . त्यामुळे सर्वजण तिची स्तुति करतात . लग्न झाल्यावर नवरदेव नवरीला पुढील आयुष्यासाठी राधाची आई , शशूचा पति,व घरचे English मध्ये शुभेच्छा देतात . शशीलाही शुभेच्छा देण्यासाठी आग्रह होतो .परंतु शशीचा पति तिला Good English बोलता येत नाही ह् सांगण्यासाठी ऊठतो . त्याचवेळी शशी पतिला अस्खलित /सफाईदार English मध्ये May I Speak म्हणून थांबवित शुभेच्छापर छोटेसे Speech देते . ऊपस्थित सर्वजण आणि शशीचे पति ,मुले सुुद्धा आश्चर्यचकीत होतात . शशीचे मनापासून टाळ्या वाजवून अभिनंदन करतात . शशीच्या क्लासचे मुख्य डेव्हिडसर शशीचे विशेष अभिनंदन करतात ,कारण English Final Test मध्ये 5 Minutes पेक्षाही जास्त वेळ Speech शशीने दिल्याने ती Distinction मध्ये ऊत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र तिला देतात. शशी तिच्या वर्गमित्रांनी तिला Good English बोलण्यासाठी Self – Confidence मिळवून दिल्याने सर्वांचे आभार मानते . आज चित्रपट गृह तुडुंब भरलेले होते .सर्वसाधारणपणे अमेरिकेत नेहमी २०-३० प्रेक्षकच चित्रपट पाहायला येतात . आजचा चित्रपट पाहणार्या प्रेक्षकांपैकी बहुतेकांना मला Good English बोलता येत नाही , असा न्युनगंड असणार्यांना पुन: Self Confidence मिळवून देणारा हा चित्रपट माझाच चित्रपट आहे अले वाटते . आनंदने माझ्यासाठी Gugal Samsung Nexus Mobile , अगदी त्याच्याच मोबाईलसारखा ,आणला . सर्वांना अतिशय आवडला . १२ आक्टोबर २०१२ रविवार :- अमेरिकेतील डलास शहराच्या पंचागाप्रमाणे आज दुपार १२.५० पासून अमावस्या म्हणजेच सर्व- पितृमोक्ष अमावस्या आहे . मुंबईला ऐरोलीला प्रमोद पितरांसाठी तर्पण व अग्निघास टाकणार आहे . मला आज त्यासाठी ईंटरनेटवक आसाराम बापूंची सर्वपितृ अमावस्या पितरांसाठी तर्पण कसे करावे ह्या मंत्र व तर्पण विधीची माहिती देणारी You Tube मिळाली . ( १ ) त्यासाठी सोपा चार अक्षरी मंत्र खालीलप्रमाणे – ओम् र्हीं श्रीं क्लिं ! स्वधा देवयै स्वाहा: (२ ) आवाहन : (१ ) सर्वपितृअमावस्येच्या दिवशी सर्व देव – देवता ,यक्ष ,किन्नर ,भूत ,पिशाच्च ,चिरपरिचित /अपरिचित व्यक्ति ,सर्व पितर ,पति – पत्नी दोघांच्याही नात्यातील ‘ कुळातील प्रपितामह , पितामह , पिता , पणजी , आजी , काका-काकी , मामा -मामी ……इ. मृतात्मे यांना तर्पणासाठी ,पिंडदानासाठी , प्रसन्नचित्ताने उपस्थित राहण्याचे आवाहन करायचे . त्यासाठी दोन्ही हात एकमेकासमोर उभे करून धरायचे . ( ३ ) नैवेद्याच्या ताटात पोळी , शेंगाची भाजी ,कढी ,खीर ,वडे ,भजे ,सुकोडे ,वरण ,भात ,तूप…इ. वाढून सगळे पदार्थ एकत्र करून त्याचे ६+ ५पिंड अग्निघासासाठी तयार करायचे . अशा रितीने आजचा सर्व पितृ मोक्ष अमावस्येचा दिवस शास्त्रोक्त रितीने पीर पडल्याने मनाला अत्यंत समाधान प्राप्त झाले . डोंबिवलीला मकरंदने त्याला सांगितल्याप्रमाणे ऊपरोक्त पुजेच्या कार्यक्रमासाठी पितामह श्री .बळीरामजी (पणजोबा ), मातामह (लक्ष्मीबाई ) पणजी ,मोठे आजोबा (श्री .रामचंद्रपंत) ,तसेच आजोबा (श्री.वामनरावजी )हयांचे फोटो आम्हाला e – mail ने पाठविले होते .आनंदने त्या सगळ्या फोटोंच्या प्रिन्टस काढल्या . कार्डबोर्ड वर चिकटविल्या होते .ऊपरोक्त तर्पण विधिच्या वेळी समोरच सगळे फोटे लावलेले होते . नेहमीप्रमाणे फोटो स्वच्छ पुसून पांढरे गंध व पांढर्याच अक्षदा लाऊन हार घालून पूजन केले .नैवेद्य दाखऊन सगळ्यांनी साष्टांग नमस्कार केला . ह्या दिवशी विशेष म्हणजे सौ. निर्मला दरवर्षी पितरांचा घास,नैवेद्य म्हणून पोळीला तूप लाऊन खिडकीत वा दरवाज्याबाहेर ठेवते ,त्या अगोदर एक कावळा येऊन काsव , काsव ओरडत असतो कावळा लगोलग ती पोळी खाऊन टाकतो . विक्रोळी ,डोंबिवली आणि आता अमेरिकेत डलासलाही कावळ्याने येऊन घास भक्षण केला . आजच्या दिवशी आम्ही अग्निघास टाकल्यानंतर तोच नैवेद्य पत्रावळीवर वर गच्चीवर पितरांसाठी ठेवतो ,त्याभोवती पाणी फिरवून पितरांना आवाहन केल्याबरोबर कावळे येऊन नैवेद्य खातात . जणू कांही ते हयाच क्षणाची वाट पहात असतात . कधी कधी आजूबाजूला कावळे असूनही एकही कावळा पितरांसाठीचा पिंड खायला येत नाही .अशा वेळी पितरांच्या राहिलेल्या ईच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी घरातल्या कर्त्या व्यक्तिने बोलून दाखविल्यानंतरच कावळ्यांच्या रूपातील पितर पिंडाला स्पर्श करून तो खातो . कधी कधी अनेक कावळे येऊन पिंड भक्षण करतात . कांही लोकांच्या मते जगातील एकमेव सत्य सत्व हेच राहिले आहे . १५ आक्टोबर २०१२ :- आज सोमवार आठवड्याचा पहिला दिवस असल्याने अद्वैतला शाळेत जातांना सोबत त्याचे Bed नेणे आवश्यक असते . तसेच Hallow Weon पितर ,भूतपिशाच्चांसाठी पंधरवाडा सुरू होणारअसल्याने Pumpkin (गोल भोपळा ) व डोळे म्हणून Carrots पंधरवाडा सुरू होणार असल्याने प्रदर्शनासाठी Pumpkin व Carrot ही शाळेत न्यायच् होते . आज आनंद सकाळीच ५.३० ला विमानाने फ्लोरिडाला कंपनीच्या कामासाठी गेला . गुरूवारी परत येणार आहे . १८आक्टोबर २०१२ गुरूवार :- आज आनंदने फलोरिडाहून आल्याबरोबर विनायकी चतुर्थी असल्याने जवळच्याच देवीच्या मंदिरातील गणपतीला नेण्याचे कबूल केले . सौ.निर्मलाने त्याप्रमाणे पूर्णिमा , आनंद अद्वैतला शाळेत घेऊन गेल्यावर दुर्वा आणून निवडल्या व १११ दुर्वांचा हार तयार केला .सायंकाळी देवीच्या देवळांत पोहोचलो . ह्या देवळांत हिंदुमंदिराप्रमाणेच गणपती ,महालक्ष्मी ,हनुमान , देवी आणि साईबाबांच्या मोठ मोठ्या मनमोहक मूर्त्या आहेत . मंदिरांत ह्या देवतांचे दर्शन घेतांच मन प्रसन्न होते . येथे दक्षिण भारतीय पुजारी व भक्तगणांचाच वावर जास्त असतो .येथील वैशिष्ठ्य म्हणजे येथे महालक्ष्मी स्तोत्र ,देवी स्तोत्र , अर्गला स्तोत्र ,शिव स्तोत्र ….इ. संस्कृतमधील स्तोत्रे तालसुरांत व शुद्ध व स्पष्ट ऊच्चारांत सामुहिकपणे स्त्री-पुरूष एकत्रित रित्या संथा म्हटल्यासारखे म्हणतात . सगळ्या वातावरणांत प्रसन्नता भरलेली असते . सौ.निर्मलाने १११ दुर्वांचा हार गणपतीला अर्पण केला . २२आक्टोबर २०१२ डोंबिवलीचा नवरात्रीतील अष्टमी उत्सव :- पुण्याहून प्रीति व सुनील खास अष्टमी पूजा उत्सवासाठी आलेले आहेत .एरोलीहून प्मोद -प्रिया येणार आहेत . ईटारसीहून चि. मुरलीधर ,सौ. अनुराधा व स्वाती अष्टमीच्या दिवशी सकाळीच येणार असल्याचाही दूरध्वनी आला . त्यामुळे सगळ्यांची मने आनंदून गेली . आम्ही सगळे स्काईपवर अष्टमी पुजेसाठी हजर होतो . ति.गं. भा. आईसाहेबांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार अष्टमीला देवीची स्थापना ,धान बांधणे , फुलोरा लावला , भोनच्या प्रभाकर भाऊच्या लिखित सूचनांप्रमाणे क्रमाक्रमाने पूजेची तयारी केली व मंत्र म्हणून पूजा व आरत्या म्हणण्यांत आल्या , जेवणेही झाली . देवी असेच सगळ्यांना नेहमी गुण्या गोविंदाने राहण्याची ,बोलण्याची सुबुद्धी देवो अशी प्रार्थना केली . सर्वांना एकत्र आल्याने समाधान वाटले . मुरलीधरच्या उजव्या हाताचा Tennis Elbow आता औषधोपचारानंतर बरा आहे . त्याला १ नोहेंबर २०१२ पासून वर्धा येथे नवीन नोकरीवर रूजूं व्हायला जायचे आहे . कु .स्वाती नियमित डायट केल्याने बरीच Reduce झाल्यासारखी वाटली . आनंद कंपनीतर्फे मियामीला Office Training देण्यासाठी गेला . मियामीला शशी मावशीचा समीर बालंखे आणि सौ. अपर्णा नितीन आवळींकर (बुलढाण्याच्या श्री. बंडू खिरोळकरांची मुलगी ) आहे . आनंद ऑफीस नंतर सौ.अपर्णाच्या घरी जाऊन भेटला . तेथे तिचे आई-वडील ३-४ महिन्यापासून आलेले होते . २४ आक्टोबर २०१२ विजया दशमी :-

Regency Pariwar , Dombivali East

रिजन्सी ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदावर माझी सर्वानुमते निवड झाली . त्यावेळी अगोदरचे अध्यक्ष , कै . डॉ. कोरान्ने ह्यांची प्रलंबित कामे पुर्ण करावयाचे मी ठरविले . हे पहिलेच वर्ष असल्याने , तसेच मलाही कोणतीही माहिती नसल्याने व मी काळजीवाहू अध्यक्ष असल्याने , माझी तारांबळ होत होती .परंतु श्री .शर्माजी व श्री .मेहताजी (सल्लागार ) , सेक्रेटरी श्री .खानविलकर , कँशिअर श्री .प्रकाश कुळकर्णी ,कॉम्युटर जाणकार श्री . सामंत व अंतर्गत ऑडीटर श्री. अप्पा सावंत -देसाई ह्या सगळ्यांनीच मला वेळोवेळी लागेल ती मदत स्वत: होऊन देऊन पुढची वाटचाल सुरू ठेवली . कोजागिरीचा कार्यक्रमास प्रत्येकी रू. ५०/- नोंदणी फी सर्वानुमते ठेवली . एकूण ४० ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी केली . मध्यंतरी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांमध्ये मतभेद निर्माण झाले . काही सदस्यांच्या मते ज्येष्ठ नागरिक संघाने सदस्यांना वारंवार कार्यक्रम घेऊन सदस्यांना चहापाणी दिलेच पाहिजे ,परंतु सर्व सदस्य दरमहाची फी नियमितपणे देत नव्हते .पैशा अभावी ईच्छा असुनही कार्यक्रम घेणे शक्य नव्हते .त्यामुळे मी , श्री .शर्माजी ,मेहताजी , व कारखानीस बगीच्यात एका बाजूला तर ईतर सदस्य एका बाजूला बसत असू .हळू हळू मी त्या सर्वांना ”विहिरीतच नाही तर पोहोर्यात कसे येणार ”हे समजाऊन सांगितले. कोजागिरी पौर्णिमेला प्रत्येकी रू .५०/- प्रवेश फी घेऊन आटीव दुध एक पेला व भेळ – वडा देण्यात आले . स्पॉन्सर पद्धतिने वेग वेगळ्या संस्थांमार्फत आरोग्य शिबिरे , डोंबिवलीतील ज्येष्ठ महिलांचा ” भारूड ” कार्यक्रम घेण्यांत आले .ह्या सगळ्या कार्यक्रमाला रिजन्सीतील सर्व नागरिकांची उपस्थिती लाभत होती . परिणामी ज्येष्ठ नागरिक संघात वर्षअखेर एकूण ७२ सदस्यांची नोंदणी पूर्ण झाली . ३१ मार्च २०१० रोजीचा ज्येष्ठ नागरिक संघाचा पहिला वार्षिक अहवाल श्री .सामंतांच्या मदतीने कॉम्प्युटरवर छापून सदस्यांना वार्षिक सर्व साधारण सभेत देण्यात आला . सर्व सदस्यांनी २०१० – ११ करीता माझ्या अध्यक्षतेखालील कार्यकारिणीचीच पुन: निवड केली . त्यानंतर मला दुसर्या वर्षातील १० महिन्यात विविध ३० कार्यक्रम सर्वांच्या सहकार्यीने यशस्वीरित्या पार पडले . मी एक नवीनच धाडस करण्याचे ठरविले . दुसरे वर्ष असुनही स्मरणिका जाहिरातीद्वारे संघामागे आर्थिक बळ ऊभारण्यासाठ, रक्कम जमा करण्यास सगळ्यांनी मनापासून सहकार्य करण्याचे मान्य केले.
स्मरणिका २०११ साठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या . छपाई समिति , जाहिरात संकलन समिति , छपाईनंतरची जाहिरात तपासणी , स्मरणिका वितरण समिति , नियंत्रण समिति , आर्थिक समिति ,…..इ . सगळे सदस्य , समित्या आपापल्या कामाला लागल्या . स्मरणिका (दुसरा वार्षीक अहवालासह ) प्रकाशन समारंभ ५ एप्रिल २०११ ला ज्येष्ठ नागरिक संघाच्या दुसर्या वर्घापन दिनाच्या दिवशी करपण्याचे ठरविले .प्रमुख पाहुणे डोंबिवलीतील मान्यवर प्रसिध्द लेखक ,नाटककार श्री .शं.ना .नवरे आणि शिक्षणतद्न्य श्री .विद्यावाचस्पती तसेच फेसकॉमच्या /समन्वय समिति डोंबिवलीच्या अध्यक्ष/सेक्रेटरींना तसेच डोंबिवलीतील समस्त ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष/सचिव ह्यांना बोलाविण्यात आले होते . रोटरी क्लब ग्रामिणच्या सहकार्याने तसेच रिजन्सीतील विविध कलाकारांच्या सहकार्याने करमणुकिचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते .तसेच उपस्थितांना अल्पोपहारही देण्यात आला . एकूण जमा रकमेतून खर्च वजा जाऊन सुमारे सव्वा लाख रूपये ज्येष्ठ नागरिक संघाच्या डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या Fixed Deposit खात्यात जमा करण्यात आले. एकंदरित हा स्मरणिकेचा कार्यक्रम अत्यंत यशस्विरित्या सगळ्यांच्या अमोल सहकार्याने पार पडला .
आता ज्येष्ठ नागरिक संघ रिजन्सी परिवाराची आर्थिक स्थिति बरीचशी स्थिर झालेली होती .पुढील सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणीला सगळा कार्यभार सोपविला .
त्यातच मकरंदला पुणे येथील मेसर्स निहिलेंट ह्या ईन्शुरन्स कंपनीत नोकरी मिळाल्याने आम्हा सगळ्यांना पुण्याला बिर्हाड हलविणे जरूरिचे होते . पुण्याला सौ .प्रीति सुनील भुर्के येरवडा भागात हरिगंगा को-ऑप. हाऊसिंग सोसायटीत राहत होते . तेथेच जवळपास मकरंदसाठी घराचा शोध सुरू केला.योगायोगाने सौ.प्रीतिच्याच Flll बिल्डिंगमध्येच दुसर्या मजल्यावरचे 2 BHK घर मिळाले. आवश्यक तेव्हढे सामान घेऊन ति. गं. भा .आईसह सगळेजण पुण्याला शिफ्ट झालो .चि.मृण्मयीला आता Play Group साठी जवळच्या विश्रांतवाडीतच ABC Montesary मध्ये प्रवेश मिळाला . सकाळी शाळेत पोहोचविणयास दररोज Auto येत असे . शाळेतून परत येतांना शाळेचीच व्हँन मृण्मयीला घरी आणून देत असे . हरिगंगा कॉम्लेक्समध्ये ११ मजल्याच्या जवळ जवळ २५ ईमारती होत्या . ज्येष्ठ नागरिक संघाच्या तसेच सोसायटी कार्यकारिणीच्या सहकार्याने हरिगंगातील सर्व सदस्यांसाठी शासनाच्या निर्देशाप्रमाणे आणि पोलीस आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे संगणकीय /सायबर गुन्हे बाबत माहिती देण्यासाठी व जागरूतता होण्यासाठी एक दिवशीय शिबीर आयोजित करण्यात आले होते . त्यामध्से नागरिकांनी मनापासून सहभाग घेऊन प्रश्नोत्तरांच्या तासाला भरपूर प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतले .AB C Montasary मध्ये चि.मृण्मयीचीचांगली प्रगती सुरू होती . त्यांच्या Annual Day च्या कार्यक्रमात चि.मृण्मयीने स्टेजवर ईतर मुलांमुलीसोबत जवळजवळ ४०० प्रेक्षकांसमोर न लाजता, अडखळता छानदार नृत्य सादर केले. बक्षीसे व प्रमाणपत्रही मिळाविले .
आनंद रिचमंडहून ईन्फोसिसच्याच कामासाठी कँलिफोर्नियाला गेला होता . पूर्णिमा त्याचवेळी कँलिफोर्नियाला चांगल्या कंपनीत लागली होती . आनंदची कंपनी थोड्या लांब अंतरावर होती .प्रथम बस ,मग रेल्वे ,पुन: बसचा प्रवास ,नंतर पायी पायी १५मिनिटे ,असा एकूण दोन तासांचा प्रवास होता . त्याने सारासार विचार करून तेथे सायकल विकत घेतली . बसच्या प्रवासा ऐवजी सायकलने प्रवास नंतर सायकलसह रेल्वेप्रवास नंतर बसऐवजी पुन: सायकलने कंपनी पर्यंत जायचे . पायी पायी चालण्यात जाणारा वेळ वाचला . कँलिफोर्निया राहणीमानाच्या द्दष्टिने तसे फार महागडे आहे . आनंद /पूर्णिमाचे अधिक चांगल्या नोकरीसाठीच्या प्रयत्नांना यश आले .
अमेरिकेतून आनंद , सौ . पूर्णिमा , चि .अद्वैत भारतात तीन आठवड्याच्या दिर्घ रजेवर आले . प्रथम केरळला येडावूरला अम्मा ,अच्चन , प्रवीण व इतर नातेवाईकांना भेटायला गेले .तेथे सर्वजण आनंदले .१० दिवसांनी पिटुकल्या अद्वैतला घेऊन आनंद व सौ . पूर्णिमा डोंबिवलीला रिजन्सी ईस्टेटमध्ये पोहोचले . ति.गं. भा . आईसाहेब ,सौ .निर्मला , मकरंद,मोठी सुनबाई सौ . मृणालिनी , चि .मृण्मयी सगळ्यांना खूपच आनंदून गेले . पुण्याहून ति. सौ .प्रिति ,सुनील भुर्के , मुद्दाम आनंद , सौ . पूर्णिमा ,चि . अद्वैतला भेटण्यासाठीआली . मकरंद , सौ . प्राजक्ता/मृणालिनी , चि . मृण्मयी आणि आनंद , सौ .पूर्णिमा व अद्वैतसह तुळजापूरला देवीच्या दर्शनासाठी जाऊन आले . आम्हा सगळ्यांना खूप आनंद व समाधान वाटले .
आनंदने एक खुषखबर सांगितली .सौ .पूर्णिमाने ईन्फोसिस कंपनी सोडून अमेरिकेतच टेक्सास राज्यातील डलास शहरात M/S Capital Bank कंपनीतच नोकरी मिळविली आहे . आनंदलाही टेक्सास राज्यातील M/S Kaygen कंपनीत नोकरी मिळाली आहे .त्याला व सौ .पूर्णिमाला मुख्यालयी डलासलाच राहता येणार होते . आनंदला आठवड्यातून ३-४ दिवस विमानाने वेगवेगळ्या राज्यात कंपनीच्या खर्चाने कामासाठी जावे लागणार आहे. त्याच्यासमोर मोठ्ठा प्रश्न होता की ,आनंदच्या गैरहजेरीत सौ .पूर्णिमा आणि चि .अद्वैतजवळ कोण राहणार ? पुढे थोड्याच दिवसात चि. अद्वैतला तेथेच मॉंटेसरी शाळेत Play Group ला Day Care मध्ये प्रवेशही घ्यावा लागणार आहे . सर्वानुमते किमान सहा महिन्यसााठी आनंदसोबत आई/पपांनी अमेरिकेत टेक्सास राज्यातील डलासला जाणे योग्य होईल .

पुन: अमेरिकेत :-
आनंदने अमेरिकेत जातांना मला व सौ .निर्मलाला त्यांच्या सोबतच नेण्याचा निर्णय घेतला . त्याप्रमाणे त्याने तशी आमची डलासला जाण्यासाठी व्हाया लंडन, न्युजर्सीची तिकीटे काढली . आम्ही सर्वजण मुंबई विमानतळावर पोहोचलो . रात्री एक वाजता विमानाने लंडनच्या दिशेने ऊड्डाण केले . लंडनला दोन तास मुक्काम करून न्युजर्सीच्या दिशेने विमान निघाले . न्युजर्सी अमेरिकेतच आहे , तेथेही दोन तास मुक्काम करून डलासच्या टर्मरिनसवर जाण्यासाठी मेट्रोने एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जावे लागले . डलासला पोहोचलो तेव्हा रात्रीचे ८.३० वाजले होते . आनंदने इंटरनेटवरच डलासला घर बुक केले होते .परंतु घरात कोणतीही सोय नव्हती , कोणतेही सामान नव्हते . त्यामुळे आम्हा सगळ्सांना हॉटेलमध्येच मुक्काम करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. आनंदने न्युजर्सीला हॉटेलमध्ये दोन रूम्स अगोदरच बुक केलेल्या होत्या . रात्री तेथेच जेवण करून झोपलो .दुसर्या दिवशी सकाळी चहा नाश्ता करून डलासला आमच्या हेरिटेज, ५९०० बे वॉटर ड्राईव्ह अपार्टमेंट क्रमांक २५०१ प्लेनो , टेक्सास ७५०९३-५७३६ पोहोचलो . त्या दिवशी आम्ही सर्वांनी बाहेरूनच जेवण मागविले . कँलीफोर्नियाहून त्यांचे सामानाची डिलीव्हरी घेऊन येणारा ट्रक दोन दिवसांनी येणार होता . त्यांची कँलिफोर्नियातील कार त्याच्या डलासमधील मित्राकडे पोहचली होती . ती त्याने आणून दिली . प्लँनोमधील ह्या कॉम्लेक्समध्ये दुमजली बरोबरच एक मजली बंगलेही होते . आमचा हा दुमजली बंगला खाली गाडीसाठी गँरेज ,पहिल्या मजल्यावर किचन , डायनींग रूम , हॉल ,बाथरूम , ऑफीस रूम तर वरच्या मजल्यावर दोन सेल्फ कंटेन्ड मोठ्या डबल बेडरूम्स, कपडे धुण्याची व वेगळी कपडे सुकविण्याची मशीन होती. आनंदने हळूहळू ईतर अत्यावश्यक वस्तु मॉल मधून आणून घरीच त्या सोबतच्या सूचनांप्रमाणे तयार करून योग्य जागी ठेवल्या . टि .व्ही. आणला ,सोबत भारतातील मी मराठी, झी टि .व्ही ., झी न्युज , ई.टि .व्ही ,सोनी ,ए.बी .पी . माझा . …..इ. हिंदी ,तसेच
मल्याळी चँनल्स केबल सेवाही घेतली . ह्याशिवाय मधून मधून हिंदी/ इंग्रजी मराठी व मल्याळम चित्रपटांच्या सी .डी . लावण्यासाठी व्हिडीओ प्लेअरही आणला .सौ. पूर्णिमा ३० जुलैला Capital One कंपनीत कामावर रूजुं होणार होती . आनंदने त्याच्या Kaygen कंपनीत पुढील आठवड्यात कामावर रूजुं होण्याचे ठरविले होते . आता आमचा दोघांचा अमेरिकेतील दिनक्रम सकाळी लवकर उठून Morning Walk , Gym मध्ये Trade Mill (पट्ट्यावर ) साधारणपणे ३०-४० मिनिटे चालणे . घरी परत आल्यावर सौ . पूर्णिमाने तयार केलेला चहा /कॉफी व नाश्ता करणे , आनंद व सौ . पूर्णिमा आपापला टिफीन घेऊन कामावर गेले की सौ .निर्मला देव-पूजा करायची . त्यानंतर इंटरनेटवर भारतातील मुंबईची वर्तमानपत्रे लोकसत्ता , महाराष्ट्र टाईम्स ,सकाळ ,टाईम्स वाचत वेळ जात असे ,सायंकाळी Silver Creek Lake Side ला फिरायला जाण्याचा कार्यक्रम असायचा .सकाळी झी टिव्हीवरYoga 4 You c हा योगावरचा कार्यक्रम ,बातम्या पाहण्यात वेळ कसा जाई हेच कळत नसे . दर गुरूवारी व चतुर्थीला Irving 1605 N.Britain Road Texas-75061 येथे हिंदु मंदिरात जाणयाचा कार्यक्रम असायचा .तेथे गणपती,विठ्ठल रूख्माई , राधा-कृष्ण ,अय्यपा….इ.च्या मुर्ति एकाच हॉलमध्ये होत्या . तेथे भारतातील विविध प्रदेशातील व्यक्ति आपापल्या कुटुंबातील लहानमोठ्या सदस्यांना घेऊन निरनिराळ्या कार्यक्रमाला हजेरी लावत असत . एकदा मुंबईतील गोरेगांव- मालाड लिंक रोडवर राहणारे श्री. म्हशेलकर Couple २५ ऑगस्ट २०१२ ला भारतात परत जाणारहोते .ते दैवड्ञ सोनार असून त्यांचे नातेवाईक डोंबिवली पूर्वेला दत्त मंदिर ,नामदेव पथवर राहतात .सौ .निर्लमाने त्यांना Regency ला येण्याचे आमंत्रण दिले .
१० ऑगस्टला Taj Grosary मध्ये Money Gram (मनी ट्रान्सफर कंपनीत ) Brand Ambasader म्हणून भारतातील श्री .सुनील गावस्कर येणार होते . तेथील बँटवर त्यांची स्वाक्षरी घ्यावी असा विचार केला. तेथे आम्ही आनंद/पूर्णिमा/आदी तसेच मी व निर्मला आदी/मनुसाठी छोटी १ – १ बँट घेऊन रांग लाऊन सुनील गावस्करची स्वाक्षरी करून घेतली . त्याच्यासोबत फोटो काढले . त्या दिवशी जन्माष्टमीचा उपास होता. त्यामुळे
सौ .निर्मलाने घरी परत जाऊन जन्माष्टमीचा उपास पूजा करून सोडला. सौ.निर्मलाने सुंठवड्याचा प्रसाद सगळ्यांना दिला.
आनंद/पूर्णिमाने मला Chetan Bhagat चे Revolution 20- 20 वाचायला दिले .मला ते पुस्तक खपच भावले .अधूनमधून डोंबिवलीलाघरी ति .गं भा. आई ,मकरंद ,सुनबाईशी व मृण्मयीशी Skyp बोलण्याची संधी आम्ही घेत होतो . तसेच श्री .व श्रीमती वेल्हाळ याच्याशी विक्रोळीलाही Skyp वर बोलत होतो . त्यामुळे मुंबईतील वर्तमान वेळोवेळी कळायचे . Regency Estate मधील दहिहंडीचा पुरूष व महिलांचा वेगवेगळा कार्यक्रम छानच रंगला होता .महिलांच्या गटाला रोख बक्षीसही मिळाले , त्यांत मोठी सुनबाई सौ.मृणालिनीही होती .
१५ ऑगस्ट २०१२ च्या बहारदार कार्यक्रमात रिजन्सीतील ८०वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आयोजित करण्यांत आला होता ,त्यांत ८७ वर्षाच्या ति.गं .भा. आईसाहेबांचाही सत्कार करण्यात करण्यात आला ही फारच समाधानाची बाब होती . त्याच दिवशी आमच्या शेजारच्या जयेश लाटेची एंगेजमेंट ,कळवा येथील मुलीशी झाली . ह्या कार्यक्रमाला घरचे सगळे जण जाऊन आले . नवरी मुलगी कळवा येथेच सारस्वत बँकेत नोकरी करीत होती . रिजन्सी ईस्टेटमधील श्री .खानविलकर , अध्यक्ष ,ज्येष्ठ नागरिक संघ, श्री .नष्टे , कार्याध्यक्ष , श्री. शर्माजी /मेहताजी ,सल्लागार ,श्री. कारखानीस ,सहसचिव , श्री. भुपेन्दर्सिंग खानी फोटोग्राफर, श्री .सामंत , कँशिअर …….. इ.ना मधून मधून फोन केल्यामुळे रिजन्सीतील सगळ्या बातम्या समजत असत. होळी , दहिहांडी , दसरा ऊत्सव , श्री .साईबाबामंदिरातून निघणारी पालखी मिरवणूक , ज्येष्ठांचे साजरे केलेले वाढदिवस ,दिवाळीपहाट , दिवाळी संध्या ,रिजन्सी खेल महोत्सव …इ. कार्यक्रमांची छायाचित्रे Face Book वर पाहायला मिळत असत .
टि. व्ही. वरील ABP Maza वरील बातम्यातून नागपूरच्या पोळ्याच्या दिवशीची मारबत , बडगेच्या मिरवणूकीतील भ्रष्टाचारादी विषयावरील मोठमोठे पुुतळे गेल्या १२७ वर्षापासून ,बनऊन गांवाबाहेरनेऊन जाळतात . त्यामुळे अशा बाबींना आळा बसेल असा नागपूरकरांचा विश्वास आहे .
त्यावेळी संपूर्ण अमेरिकेत WEST-LINE नांवाच्या डांसांपासून पसरणार्या Virus मुळे लोक मोठ्या प्रमाणावरआजारी पडत होते.पण टेक्सासमध्ये ८०% प्रादुर्भाव आढळल्याने आणिबाणि जाहिर केली होती .शरीराच्या उघड्या राहणार्या हात-पाय झाकणारेच कपडे घालणाच्या सुचनादेण्यांत होत्या .पाण्याचा वापरही काटकसरीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या .
एकदा आनंदच्या फेसबुकवर माझा प्रोफाईल डलासमधीलच सौ .राखी विचुरकरने पाहिला , तिचा लगेच आनंदला फोन आला /फेसबुकवरही मेसेज आला , ”मामा ,मी येथे डलासलाच आहे . माझ्या घरी मामीला घेऊन कधी येता? माझा पत्ता व फोन नंबर आनंदला दिला आहे ,मी खूपच आनंदून गेली आहे ,लवकरात लवकर सगळ्यांना घेऊन या , वाट पहात आहे . माझ्या सासु सासर्यांना ,नवरा राजेशना मी समजाऊन सांगीन .आम्हाला येथे येऊन १२ वर्षे होऊन गेली आहेत .मला २ मुले आहेत .
माझे व निर्मलाचे मन १२ वर्षे मागे गेले . माझी लहान बहिण सौ .सुषमा रत्नपारखीची चुलत नणंद ,अमडापूरची डॉक्टर राखी रत्नपारखीचे लग्न व्हायचे होते . कन्न्मवार नगरमधील विदर्भातीलच श्री .विंचुरकर माळवी सुवर्णकार संघ ,मुंबईचे सक्रीय कार्यकर्ते होते .त्यांचा लहाना मुलगा चि.राजेश हा ईंजिनिअर होता . त्याने मुंबईतील १५-२० मुली पाहिल्या ,पण मुलगी मनाप्रमाणे पसंत पडत नव्हती . त्यांची माझी ओळख झाल्यावर त्यांनी मला मुलींबाबत विचारले असता मी त्यांना कु .राखीबाबत सांगीतले .तिची मावशी मुंबईलाच बोरीवलीला राहात होती . मावशीने अमडापूरला फोन करून , मुलाची माहिती देऊन, कु .राखीला घेऊन तिच्या आई वडिलांना मुंबईलाबोलाऊन घेतले . मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम आमच्याच घरी पार पडला . मुलगी पसंतीचा निरोप मिळाला .माझे काम मुला-मुलीच्या पसंती पर्यंतच असल्याची स्पष्ट कल्पना देऊन , देणे घेणे बाबत मी सहभाग घेतला नाही . त्याचवेळी चि.राजेश विंचुरकर फेब्रुवारी महिन्यात कंपनीतर्फे अमेरिकेत ३ वर्षासाठी जाणार असल्याची बातमी आली . मी दोन्ही पक्षांना मुलगा अमेरिकेला जाण्या अगोदर उरकण्याची विनंती केली.अडचणींवर मात करून जानेवारी महिन्यांत त्यांना लग्नासाठी सोयीचा दादरला हॉल व कँटरर पाहून दिला . लग्न सुरळीत पार पडले . सौ.राखीचा पासपोर्ट काढण्यासाठी रिजनल पासपोर्ट ऑफीसर ,अमरावतीच्या श्री.हाडे साहेबांची मदत घेतली . देण्याघेण्यावरून श्री.विंचुरकर व श्री.बापू रत्नपारखी यांचे काहितरी बिनसले असावे ,त्यामुळे श्री.विंचुरकरांनी गैरसमजाने माझ्याशी मात्र अबोला धरला होता , तो आजतागायत कायम होता .

१ सप्टेंबर २०१२ :-
अमेरिकेत कार्यालयात पांच दिवसाचा आठवडा असतो. शनिवार,रविवारला जोडून सोमवारी सुटी असतांना Long Weak End चा फायदा घेऊन ,आनंद-पूर्णिमाने सेंट अँटोनीच्या Tower Of America चा कार्यक्रम ठरविला . सकाळी आठ वाजता डलासहून निघालो . सेंट अँटोनी टेक्सास राज्यातच २९५ मैल अंतरावर आहे .सरासरी ६५ मैल वेगाने गेल्यास , मधील एक तास नाश्तापाणी धरून साधारणपणे दुपारी दोन वाजता सेंटअँटोनीला आरक्षित केलेल्या हॉटेलांत पोहोचू असा अंदाज होता . प्रत्यक्षात दिड वाजता हॉटेलांत पोहोचलो . जेवणं करून दोन तास विश्रांती घेऊन ,चहा घेऊन टॉवर ऑफ अमेरिका पाहायला गेलो . सेंट अँन्टोनिओमधील ह्या टॉवरवर फिरते ऊपाहारगृह आहे . अमेरिकेतील Liberty Statue ( स्वातंत्र्य देवतेचा पुतळा) नंतर सर्वात उंच वास्तुत ह्याच टॉवरचा नंबर लागतो .सेंट अँटिनिओच्या डाऊन टाऊनमध्ये हे टॉवर आहे .ह् टॉवर ७५० फुट उंच आहे .ह्याची उभारणी ९ ऑगस्ट १९६६ ला सुरू झाली . तर ६ एप्रिल १९६८ रोजी तो जनतेसाठी खुला करण्यांत आला होता . O-Neil Ford ह्या वास्तुशात्रदञाने ह्याची रचना केली. Almo-City तील हा टॉवर सर्वात उंच Sky -Sraperआहे .ह्या टॉवरवर जाण्यासाठी दोन Lift Elevator असून , त्याला तळमजल्याशिवाय चार थांबे आहेत .१)Chart House, २)Bar ,३)Revolving Restaurant,तर ४)Observation Desk . टॉवरवर जाण्यासाठी प्रथम प्रत्येकी ५० डॉलरचे तिकीट काढावे लागते . तसेच Elevated Tag मनगटाभोवती बांधला. आम्ही सगळे चौथ्या थांब्यावरील Observation Desk मध्ये उभे राहिलो .तेथे मजबूत जाळ्या होत्या . तेथे अतिशय जोरात वारा होता .जाळ्याशिवाय तेथे उभे राहणे अशक्यच होते .आम्हाला पँरीसच्याआयफेल टॉवरची आठवण झाली . तेथे सगळ्यांची अशीच अवस्था होते . संपूर्ण सेंट अँटिनिओचे येथून दर्शन होते . सर्वत्र उंचच उंच ईमारती दिसतात .तेथेच भविष्य सांगणारा Fortune Teller बोलणारा पुतळा होता . आम्हा कोणालाच खाण्यापिण्यात वेळ दवडायचा नव्हता . तेथून खाली आलो . तळमजल्यावरील थियेटर मध्ये 4D-Texas Documentary Film दाखवितात .त्यात ३६ ईंच उंचीपेक्षा कमी मुलांना आत प्रवेश देत नाहीत . टेक्सासता ईतिहास ,Bull Fighting Play ,प्रक्षणिय स्थळे , विविध जंगले ,नद्या …ई .दाखवितात .
आम्हाला अप्रूप, उत्सूकता होती ती 4D-Film ची ,त्यासाठी विनामूल्य वेगळे चष्मे दिले जातात ,ते चष्मे डोळ्यावर ठेऊन आम्ही थियेटरमध्ये मागच्या बाजूला बसवो . जणूंकाही आम्ही प्रत्यक्षात ,खरोखरच, हेलीकॉप्टरमध्ये बसूनच Texas प्रवासाला निघालो . आमचे हेलीकॉप्टर उंचच उंचऊंच ईमारती,जंगलातील झाडांवर आदळते की काय ? समुद्रातील मोठमोठे Live Whale Fishes वर आपण हेलीकॉप्टरसह आदळतो की काय ? बुल फायटिंगचे Bulls तसेच हॉर्स रायडिंगचे Horses आपल्याला आता प्रत्यक्ष धडकतात असे वाटत होते. २० मिनिटांचा Show झाल्यावर सर्वजण बाहेर आलो . बाहेरच्या परिसरांत विविध रिटेल शॉप्स होते . त्यात टॉवर ऑफ अमेरिकाजवळ आपण उभे आहोत असे फोटो काढून देणारा फोटोग्राफर ,शंख ,शिंपले, टॉवर ऑफ अमेरिकाचे प्रिंटेड टी शर्टस् , लेडीज पर्सेस ….इ. ची रिटेल दुकाने, भोवतालच्या परिसरात Hemisphir park मध्ये लहान मोठ्यांसाठी Water parks सगळ्यांना आनंदून गेले .
त्यानंतर आम्ही जवळच्याच सेंटअँटिनिओ नदीच्या गोलाकार कालव्यामधून बोटीने जवळ जवळ ४५ मिनिटे आजुबाजुच्या विविध ईमारतींचे सौंदर्य पहात फेरफटका मारला .कालव्याच्या दोनही बाजूला २००-३०० छोटे- मोठे स्टॉल्स आहेत. त्यांत खाण्यापिण्याचे पदार्थ ,विविध व्यावसायिकीकडे विविध नवनवीन वस्तु विकत होत्ते .आपले हुबेहुब रेखाचित्र पेन्सिलीने २५-२० मिनिटांत काढून देणारे कलाकारही होते . आम्ही जवळ जवळ ३-३ तास पायी पायी ३-४ मैल फिरलो . आम्ही बाहेर आलो तोवर रात्रीचे १०.३० वाजले होते .शोधता शोधता आम्हाला एकमेव Indian Marsala Oak उघडे दिसले . तेथे बुफे डिनर घेऊन आम्ही हॉटेलवर पोहोचलो . त्या रात्री सगळे ढाराढूर झोपलो .
२ सप्टेंबर २०१२ :-
सेंट अँटिनिओ जवळच १२ मैल अंतरावर Sea-World आहे . तेथे कार पार्कींगसाठी मोठे मैदान आहे .तेथे कार पार्कींग सेवा केंद्र आहे.तेथून अर्ध्या मैलावर Sea-World चे प्रवेशद्वार आहे . तेथे तिकीट काढून आंत गेलो .आपल्या गांवाकडील जत्रेसारखी तेथे गर्दी,मनोरंजनाचे विविध ठिकाणी वेगवेगळे स्टॉल्स आहेत . ह्या परिसरांत फिरण्यासाठी २ दिवसही कमी पडतील . एका बाजूला Lost and Found स्टॉल , प्रत्येक ठिकाणी वेगळे तिकीट काढूनच जाता येते .planning करण्यासाठी दिवसभराच्यी कार्यक्रम पत्रिकासोबत Sea World चा संपूर्ण नकाशा दिला जातो . लहान मुले आणि वृद्ध व्यक्तिंसाठी Stroller घेऊन आम्ही निघालो .जगातील विविध पक्षी , प्राणी, विविध जातीचे साप ……इ. चे संवर्धन / संरक्षण कसे करावे ? ह्या साठी १-१ तासाने थियेटरमध्ये Show सुरू होते . Dolphin -Whale-Clove मध्ये मोठ्या तलावात मोठ मोठे शिकविलेले Dolphin/Whale Fish त्यांच्या प्रशिक्षकांसोबत पाण्यात सूर मारणे ,तलावाच्या पाmण्यांत पोहतांना विविध प्रकारच्या कवायती करून दाखवित होते . तलावातील पाणी स्टेडियम मध्येबसलेल्या प्रेक्षकांच्या अंगावर शेपटीच्या तडाख्याने उडऊन त्यांना ओलेचिंब करणे फारच मजेदार वाटले .प्रशिक्षक त्यांना मधूनमधून खायलाही देत होते . ह्याशिवाय Inverted RollerCoaster,Hyper Coaster ,Super Splash Water Ride ,Kiddle Roller Coaster …इ.चित्त्थरारक सफारिही आहेत , मधून मधूनप्रत्येक भागातील All Day Dinning मध्ये ५०% सवलतीत pizza ,Pasta,Buffet /Deserts …इ. चा आस्वाद घेऊन ताजेतवाने Fresh होऊन पुढे जात होतो .तेथील एका लहान तलावात/पाणवठ्यावर लहान मोठ्या
मगरीचे Crocodile Feeding ची मजा काही वेगळीच होती . हे सगळे पाहता पाहता पायी फिरता फिरता सगळेजण अगदी थकून गेलो .रात्री ९.४५ ला मोठा Fire Works Spectacular Show होता . तेथे आमची ओळख पुण्याच्या विजय औंधेकरशी झाली . अमेरिकेत , टेक्सासमधील सेंट अँटिनिओच्या सी -वर्ल्डमध्ये तो कुटुंबासह आला होता .पण पाण्याचे इन्फेक्शन झाल्याने त्याला ताबडतोब दवाखान्यांत दाखल करावेलागले होते . तो T.C.S.मध्ये Houstonमध्ये नोकरीला लागला होता . आम्हा कोणातच रात्री थांबायचे त्राण नव्हते . त्यामुळे परत हॉटेलवर येऊन जेऊन झोपलो .

४ सप्टेंबर २०१२ :-
चि.अद्वैतला डलासमधील Alpha Montesary मध्ये डे – केअर मध्ये प्रवेश घ्यायचा होता . ही शाळा पूर्णिमाच्या Capital One ऑफीसजवळच होते . सकाळी त्याला शाळेत सोडून पूर्णिमा ऑफीसला गेली . अद्वैतचा शाळेतील पहिलाच दिवस होता ,सोबत घरचे कोणीच न दिसल्याने तो रडायला लागला . तेथील संस्थापक व डायरेक्टर श्रीमती रूपाली भारतीयच होत्या .त्यांचे महाराष्ट्रातील सोलापूरजवळच अब्दुलपूर गांव होते .त्यामुळे त्यांना भारतीय मुलांविषयी विशेष आपुलकी होती .त्यांनी अद्वैतला मायेने जवळ घेऊन शांतपणे समजाविले. तो तेथेच जेवला,दुपारी तेथेच त्याच्या बेडवर झोपला . ईतर मुलांसोबत खाऊ खाल्ला , खेळला . पूर्णिमाने ऑफीस मधून परत येतांना घरी घेऊन आली .
सी- वर्ल्डहून डलास Plano ला घरी परतीच्या प्रवासांत हायवेवरच Whole Sale Direct Factory Outlet मधून Clothes खरेदी ५०% ते ७०%Discount असल्याने आम्ही
सर्वांनी आपापल्या पसंतीच्या कपड्यांची खरेदी केली . तेथील Bhurje’s Restaurant मध्ये लंच घेतला . सायंकाळ होत आली होती .
आम्हा G.P.S . च्या सँटेलाईट निर्देशाप्रप्रमाणे हायवेवर प्रवास सुरू केला . हायवेवर वाहतूक मोठ्या प्रमाणावर जाम झाल्याने साधारणत: १५ मैलाचा लांबचा टोल रस्ता मोकळा असल्याचे G.P.S.ने दाखविले . त्याप्रमाणे प्रवास करून आम्ही रात्री १० वाजता घरी परत आलो .

मकरंदची बरेच दिवसांची स्वत:चा बिझिनेस सुरू करण्याची मनीषा होती . त्याला त्याच्याच जुन्या मित्राने श्री.समीरने मनापासून सहकार्य करण्याचे मान्य केले . मकरंदने पुणे म्युनिसिपल काँर्पोरेशन कडून बिझिनेस लायसन्स , शॉप अँड एस्टँब्लिशमेंट लायसेंन्स मिळविले .पुणे येथेच बाणेर परिसरात तिसर्या मजल्यावर ऑफीससाठी जागा मिळाली. २-३ स्टाफ म्हणून कॉम्युटरऑपरेटर टेक्निकल सपोर्टरही मिळाले . कंपनीचे नांव ठेवले ” M/S Indrani Solutions ” हळूहळू , नवनवीन कंपन्यांची कामे मिळण्यास सुरवात झाली . मुख्यालय पुणे येथे मुख्यालय ठेऊन मुंबईत डोंबिवली (पूर्व ) येथे शाखा सुरू केली. कामापरत्वे मकरंद पुणे येथे जाऊन मिटींगला मार्गदर्शन विचारविनिमय करणे/घेणे करत होता .
थोड्याच दिवसांत मकरंदला एक फायनान्सर करणारी व्यक्ति मिळाली . सर्वांचा काम करण्याचा हुरूप वाढला . आता मकरंद व समीर मिळून प्रायव्हेट कंपनीची स्थापना केली , कंपनीचे नांव ठेवले M/S C- Duck Pvt Ltd . नवनवीन कंपनीची कामे मिळविण्यासाठी आता जोरदार प्रयत्न सुरू झाले . पुणे ऑफीस व तांत्रिक बाजू श्री . समीर सांभाळणार आणि मकरंद कंपन्यांशी संपर्क करणे , कामाच्या ऑर्डरस मिळविणे , तसेच त्या पुर्णत्वास नेण्यासाठी श्री . समीरकडे तांत्रिक बाबी कंपनीच्या तंत्रद्न्यींकडून पाठविणे ,वेळोवेळी पाठपुरावा करणे …. इ. तसेच कंपन्यांकडून वसुली करण्याची जबाबदारीही सांभाळत होता .
५ सप्टेंबर २०१२ :-
सप्टेंबर महिन्यात ति.गं.भा. आईसाहेब , चि.कु.मृण्मयी ,चि. मकरंद , चि.प्रमोदची पत्नी सौ.प्रिया ह्यांचा अनक्रमे ५ , ७ , १२ , व १८ सप्टेंबरला वाढदिवस
साजरा केला जातो . ह्या कार्यक्रमासाठी मुद्दाम पुण्याहून सौ .प्रिती व सुनील भुर्के आलेले होते . अकेल्याहून सौ .ज्योतिताई व सौ .सुषमाचे ( माई) ही फोन येऊन गेले . झी मराठी वर सकाळी ११.३० वाजता” राम राम महाराष्ट्र ” कार्यक्रमांत आईसाहेब ,मृण्मयी ,मकरंदचे फोटो दाखऊन वाढ -दिवसाच्या शुभेच्छा दाखविण्यांत येतात , आम्ही सगळ्यांनी अमेरिकेत टि.व्ही. चँनेलवर सर्वांचे फोटो पाहिले .त्यांचे फोटो आनंदने त्याच्या कँमेरात काढले . तसेच आज भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.राधाकृषणन यांचाही वाढदिवस शिक्षक दिन म्हणून भारतभर साजरा केला जातो . महाराष्ट्रात माननीय राज्यपालांच्या शुभ हस्ते राज्यातील आदर्श शिक्षकांना ” राज्य ” पुरस्कार दिले जातात .
चि.प्रमोदला मकरंदच्या रेफरन्सने चेंबुरला रू .१००००/- दरमहा पगारावर नोकरीला लागल्याची बातमी मन आनंदून गेली . सौ. निर्मलाने साईबाबांचे ९ गुरूवारचे व्रत , चि .प्रमोदला लवकरात लवकर चांगली नोकरी मिळ्ण्यासाठी सुरू केले होते . त्याची समाप्ति पुढील गुरूवारी आम्ही अत्यानंदाने साजरी केली. तेथील साईबाबांच्या देवळात जाऊन सर्व भक्तांसाठी यथाशक्ति प्रसाद घरूनच बनऊन नेला होता .

सप्टेंबर महिन्यातील वाढदिवसांच्या निमित्ताने सगळ्यांनी मिळून मुंबई-डोंबिवलीच्या घरातील मोठा हॉल पेंटिंग लाऊन सुशोभित केला होता. ह्या वाढदिवसाचे जवळ जवळ २६ फोटो मकरंद/सौ. मृणाल/ सौ.प्रितीने मिळून फेसबुकवर टाकले तसेच आनंदलाही पाठविले . सौ .प्रितीने मृण्मयीला Tent House Gift दिले .वाढदिवसाच्या दिवशी केक/लहान मुला-मुलींचे मुखवटे सगळे Angry man चेच होते . आम्ही सर्वांनी वाढदिवसाचा कार्यक्रम Skyp Vedeo live बघितला ,शुभेच्छा दिल्या .
ठाणे येथील गं. भा. शशीमावशीचा मुलगा अमेरिकेतच मियामीला जवळजवळ २० वर्षापासून नोकरी करीत आहे .त्याची बायको ईटालीत राहणारी आहे .त्याला मुलगीही आहे ,त्याच्याशी फोनवरून बोललो .त्याला फार आनंद झाला .त्याने मियामीला येण्याचे आमंत्रण दिले .
अद्वैतच्या शाळेत ६ सप्टेंबरला श्रीमती अदलापूरकरांनी आल्फा मॉंटेसरीत Grand Parents day आयोजित केला होता . आम्ही सगळेजण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो . श्रीमती अब्दुलपूरकरांशी भेटून खूप आनंद झाला. सर्वांनी कार्यक्रम एन्जॉय केला . ह्या शाळेत बहुतांश मुले भारतीय वंशाचीच आहेत . त्यांच्या पालकांशी परिचय झाला .
७ सप्टेंबर २०१२ :-
आज डोंबिवलीला चि.कु. मृणमयीचा वाढदिवस ,सौ .प्रीति सुनील भुर्के नी चि .कु .मृण्मयीला छोटेसेच टेंट हाऊस गिफ्ट आणून दिले .ती अतिशय आनंदून गेली. चि.सौ.मृणालिनी (मोठ्या सुनबाईने ) व सौ .प्रितीने फेसबुकवर जवळ जवळ २६ फोटो टाकले . तिच्या वाढदिवसानिमित्ताने रिजन्सी ईमारत क्रमांक ९ फ्लँट क्रमांक १२०३ मध्ये जिकडे तिकडे डेकोरेशन, केक ,लहान मुला – मुलींना दिलेले मुखवटे ….इ . Angry Man चेच साम्राज्य होते . सर्वच लहान मुला- मुलींनी खूप मज्जा केली . कु.मृण्मयीला आतु /मामानी दिलेले वाढदिवसाचे गिफ्ट, घरातीलच पण खेळण्यातील मोठ्ठा टेंन्ट ,खूपच आवडला .तीची शेजारच्या कु .त्रिशासोबत टेंन्टमध्ये आतून खिडकितून डोकाऊन पाहणे ,सारखे आतबाहेर जाण्या येण्याची लगबग पाहूनआम्ही सर्वजण आनंदून गेलो . कु . मृणमयीने Skyp वर ऊत्साहाने चि .अद्वैतला तिला मिळालेले सगळे Birth-Day गिफ्टस ,खेळणी , टेंन्ट क्रमाक्रमाने दाखविले. अद्वैतनेही तिला नवीनच आणलेला काचेचा Tea-Table तसेच छोटा गोल गोल फिरणारा टि – पॉयही तितक्याच ऊत्साहाने दाखविला . दुसर्याच दिवशी आनंदने अद्वैतसाठीही मृण्मयीसारखाच टेंन्ट आणला ,मग मात्र अद्वैतची कळी आणखीनच खुलली .त्याने लगेच Skyp वर कु .मृण्मयीला ” मलाही पप्पांनी तुझ्यासारखाच टेंन्ट आणला आहे, हे बघ ! असे अत्यानंदाने सांगीतले , आत – बाहेर जाणे , खिडकीतून डोकाऊन पाहण्याचा खेळ आनंद -पूर्णिमासोबत दाखविला . त्याच खुशीत झोपी गेला .दुसर्यी दिवशी सकाळीच Happy Happy होत न कुरकुरता टेंन्टमध्येच दूध पिऊन , नाश्ता करून आई -पप्पासोबत Alpha Montesary त गेला . आनंदने फ्लोरिडाहून येतांना अद्वैतसाठी School Bag आणली .
९ सप्टेंबर २०१२ :-
प्लँनो मधील हरिटेज कॉम्लेक्सच्या Gym मधील ट्रेड-मिल ( पट्टा ) वर मी व सौ . निर्मला दररोज सकाळी किमान दहा मिनिटात २.५ मैल अंतर चालत होतेा . त्यामुळे अनुक्रमे ३५ व ४५ कँलरीज जाळत ( Burn ) होतो . त्यामुळे बरे वाटत होते . वजनही हळूहळू कमी होत होते.
आम्ही सगळे Fun -Ashia थियेटरमध्ये ”शिरिन फरहीनकी तो निकल पडी” हा चित्रपट पहायला गेलो होतो .
दि.१२ व १४ सप्टेंबरला अनुक्रमे मकरंद व सौ .प्रिया प्रमोद लोणकरचा वाढदिवस होता.दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .मकरंदचा वाढदिवस तसेच त्याची मुलगी चि.कु .मृण्मयीचाही वाढदिवस सप्टेंबर महिन्यातच येतो .आनंदचा तसेच त्याचा मुलगा चि.अद्वैतचाही वाढदिवस एप्रिल महिन्यांतच येतो . ह्या योगायोग सर्वांचा आनंद द्विगुणित करून जातो . तसे पाहीले तर आमच्या लोणकरांच्या घरात सप्टेंबर महिन्यात सर्वांत जास्त व्यक्तिंचे वाढदिवस साजरे होतात .

१९ सप्टेंबर २०१२ :-
आज गणेश चतुर्थी असल्याने सगळेजण लवकरच ऊठलो . अद्वैतला सौ. निर्मला आजीने मुंबईहून आणलेली गणपतीबाप्पाची छोटीशीच पण रेखीव व सुंदर मूर्ती खूपच आवडली . त्याने मुंबईला सर्वांमिळून केलेले डेकोरेशन व गणपती बाप्पाची सुंदर व रेखीव मुर्ती पाहीली होती . त्याने आपल्या घरीही गणपतीबाप्पाची स्थापना करायचे सांगीतले .आम्ही सर्वांनी देवघराच्या बाजूलाच चकचकीत Goldan मोठे तबक ठेऊन, आरास केलेल्या जागेवर गणपतीबाप्पाची स्थापना केली . २१ मोदकांचा नैवेद्य दाखविला ,सौ. निर्मलाने १११ दुर्वा साईमंदिरातील गणपतीसाठी आणि २१-२१ दुर्वा घरच्या गणपतीसाठी निवडून ठेवल्या होत्या . अद्वैतने / पूर्णिमा /आनंद /सौ .निर्मला व मी सर्वांनी फुले, दुर्वादीने पूजा केली , अद्वैतने गणपतीची आरती मोठ्याने म्हटली , जेवणं झाली . आरती करतांना ऊदबत्ती लावतांना खिडकीजवळच ठेवली परिणामी धूर बाहेर जात होता . सेन्सॉरला धूर कळलाच नाही , त्यातून धोक्याचा आवाज आला नाही . सायंकाळी सर्वजण साईमंदीरात जाऊन आलो .
२२ सप्टेंबर २०१२ :–
आज सौ. राखी राजेश विंचुरकरचा गणपतीच्या निमित्ताने सत्यनारायण पुजेला येण्याचा आग्रहाचा आमंत्रणाचा फोन आला . आनंदने सर्वांना घेऊन जाण्याचे ठरविले . सौ.राखी व राजेश डल्लासला गेल्या १० -१२ वर्षापासून स्थाईक झालेले आहेत. त्यामुळे तिचे २० – २५ भारतीय कुटुंबांशी खास जवळचे संबंध आहेत . वर्षभरात सण समारंभाच्या निमित्ताने वेळोवेळी एकमेकांकडे जाणे येणे असते . त्या सगळ्यांशी ओळख होण्याचा योग आला होता . सौ. राखीची दोन मुले आहेत . चि. राजेशही आनंदप्रमाणेच I.T.कन्सलटंट आहे .त्याला दर आठवड्याला २-४ दिवस कामानिमित्ताने वेस्ट व्हर्जिनिआला जावे लागते .
आम्ही सर्वजण ठरल्याप्रमाणे ४४३७ -फ्लॉवर माउंट ,डल्लासला पूजेच्या दिवशी सकाळीच जाऊन पोहोचलो . दुपारी साधारणपणे २.३० वाजता सत्यनारायण पूजा आटोपली . सर्व मित्रमंडळी नेहमीप्रमाणे सहकुटुंब आली होती. भारतीय गुरूजींनी शुद्ध मराठीत पूजा सांगीतली ,आरती झाली .सर्वांनी तीर्थप्रसाद घेतला . एकत्र जमलेल्या सगळ्यांनी एकमेकांची ओळख करून घेतली . त्यांत महाराष्टातील मुंबईतील घाटकोपर पू.मधील शांतीपार्कमध्ये राहिवासी असलेल्या श्री.गणात्रांशी ओळख झाली . ईतरांपेक्षा वयोवृद्ध ,ज्येष्ठ नागरिक असलेले श्री .गणात्रा मुंबई महानगरपालीकेतून १९९८ साली निवृत्त झाले होते .त्यांचेशी गप्पा चांगल्याच रंगल्या . त्यांत वेळ कसा गेला हे कळलेच नाही .सायंकाळी ५ वाजता आनंद ,सौ. पूर्णिमा ,अद्वैत ,सौ.निर्मलासह घरी आलो .थोड्या गप्पागोष्टी झाल्यावर सगळेजण झोपलो .
२३ सप्टेंबर २०१२ :-
आज शुक्रवार असल्याने आनंद व पूर्णिमा लवकरच घरी आले . आनंदने जेवतांना रात्री तेथील Fun Ashia चित्रपटगृहात Burfi हा Oskar साठी नामांकन/ निवड झालेला चित्रपट पहायला जायचे ठरविले .त्यांत रणवीर कपूर व प्रियांका चोपडाच्या प्रमुख भुमिका आहेत .कमीत कमी संवाद व गाणीही जवळजवळ नाहीतच .रणवीर कपूर मुका तर प्रियांका मंदबुद्धि दाखविली आहे .ह्या दोघांनीही अप्रतिम अभिनय केला आहे . त्याला तोड नाही .
अगोदरच्या दिवशी ” मुक्काम पोष्ट लंडन ” हा चित्रपट घरीच C.D.आणूनT.V. वर पाहिला होता . त्यांत भरत जाधव (मुलगा) व मोहन जोशीं (वडिल )च्या प्रमुख भुमिका आहेत . भरत जाधव त्याच्या बालपणीचा त्याला वडिलांनी मांडिवर घेतलेला , २५ वर्षापूर्वीचा फोटो घेऊन लंडनला वडिलांना भेटायला जातो . त्या फोटोत त्याच्या वडिलांच्या हातात अंगठी असते , व त्यानंतर त्याच्या वडिलांनी लंडनहून त्याच्या आईला पाठविलेले ४ कोटिचे न वटविशाँपस्लेले चेक्सही सेबत घेऊन जातो . त्यानंतरची लंडन विमान तळावर उतरल्यापासूनची धमाल गंमत पाहण्यासारखी आहे . त्याचे वडील त्याच्या जवळील फोटोवरून त्याला ओळखतात , पण ओळख न दाखविता अप्रत्यक्षपणे आवश्यक ती सर्व मदत वेळोवेळी करतात . भारतातून आलेल्या नवख्या व्यक्तिला परदेशात , लंडनला कसकसा व किती त्रास होतो ह्याची त्यांनी पूर्ण जाणीव असते . सरते शेवटी वडील व मुलाची भेट झाल्यावक भरत जाधवला वडिलांची (मोहन जोशीची त्य वेळेची भुमिका कशी योग्य होती हे समजते ,त्याच्या मनातील गैरसमज दूर होतात .शेवटी बाप – लेकात समेट होतो.
अमेरिकेत भारतात असतात त्याप्रमाणे रिटेल किराणा दुकाने नाहीत .त्याऐवजी मोठमोठे होलसेल /रिटेल माँल आहेत ,अगदी भारतीय उपखंडातील नागरिकांच्या सोयीसाठी एअरकंडिशन ईंडियन मार्केट /मॉल मात्र आहेत .तेथे भारतीय उपखंडात मिळणार्या सगळ्या वस्तु मिळतात .आनंद ३-४ दिवसांसाठी कंपनीच्या कामासाठी Florida ला गेला.
अद्वैतच्या Alpha Montessori?di त त्यांच्या वर्गात मुलांना वेगवेगळे Project करायला दिले . अद्वैतला My Family चा Project मिळाला . आम्ही My Family Tree चा विषय निवडला . वॉलमार्ट /पटेल मॉलमधून त्यासाठीचे लागणारे साहित्य पूर्णिमा ,निर्मला व अद्वैतने जाऊन आणले . घरी आल्यावर Computer मधून अद्वैत , पूर्णिमा , अम्मा अच्चन ( पूर्णिमाचे आई /वडील ) च्या फोटोच्या प्रिंटस काढल्या .तसेच आनंद ,निर्मलाआजी व विनोदआजोबांच्याही फोटोप्रिंट काढल्या .आनंद / पूर्णिमाने पिंपळाचे झाड व फांद्या ,पाने सुचविले . परंतु Project अद्वैतच्या Level चे आहे , ही बाब लक्षात घेऊन त्याने पाहिलेल्या अमेरिकेतीलच मोठी लालसर /हिरवी पाने असलेला Tree मी व निर्मलाने सुचविला .सगळ्यांनी ही आयडिया फारच आवडली . मध्यभागी अद्वैत ,डाव्या बाजूला पूर्णिमा ,अम्मा व अच्चन च्या फोटो -प्रिंट तर उजव्या बाजूला आनंद , निर्मलाआजी व विनोद आजोबांच्या फोटो – प्रिंट लावायचे ठरविले . अद्वैत ,आनंद व पूर्णिमाचा फोटो हिरव्या पानांवर तर अम्मा , अच्चन , निर्मलाआजी व विनोदआजोबांचे फोटो लालसर पानांवर लावायचे ठरले . त्याप्रमाणे पुठ्ठयाला White Paper वरील मोठा Tree (लालसर ,हिरव्या पानांसह ) Computer Print चिकटविला त्यावर वरील सगळे फोटो -प्रिंटस् चिकटविले . हा Folding Family Tree सगळ्यांना खूपच आवडला . अद्वैतला My Family वर पांच वाक्ये बोलायची होती . त्याचीही तयारी करून घेतली होती .
दि .२७-९-२०१२ :-
आज सकाळीच अद्वैत लवकर झोपेतून जागा झाला . तो आज खूपच Happy Happy होता .आम्ही सगळ्यांनी अद्वैतच्या शाळेत जाण्याची तयारी केली .पूर्णिमाचेही ऑफीसमध्ये Presentation असल्याने तिने अद्वैतला Folding Tree सह शाळेत सोडले . आम्हा दोघांना शाळेत नेण्यासाठी आनंदने अगोदरच Taxi Booking केलेली होती .Taxi सकाळी १० वाजता येणार होती . नेहमीचा टँक्सीवाला बरोबर १० वाजता आला .त्याने आम्हा दोघांना १०.२० ला अद्वैतच्या शाळेत सोडले .अद्वैतच्या वर्गातील Friends Group चे My Family Tree project सुरू झाले .प्रत्येकाने आणलेल्या Project शी संबंधीत My Family वर ५-५ वाक्येही न घाबरता बोलून दाखवायला सुरवात केली .अद्वैतचा Folding My Family Tree त्याच्या Teachers सह सगळ्यांना खूपच आवडला . अद्वैतनेही MyFamily वर ५ वाक्ये बोलून दाखविली .
I am Adwait Anand Lonkar .
This is my father Anand Lonkar .
This is my mother Poornima Lonkar .
Amma/Achhan are my Grand mother and Grand father .
Nirmala Aajee /Vinod Ajoba also are my Grand mother and father .
उपस्थित Teachers ,Students व Parents नी जोरदार टाळ्या वाजविल्या .
एकंदरीत Presentation उत्कृष्ट झाले . मुला मुलींचे Stage Dairing वाढविण्याचा चांगला प्रयत्न झाला .दुपारनंतर कार्यक्रम संपता संपता पूर्णिमा ऑफीसातून आली होती . आम्ही सगळे अद्वैतला घेऊन घरी आलो .
आनंद फ्लोरिडाहून परत आला . आम्ही गुरूवारी श्री साई मॉदिरात जाऊन आलो .
दि .२९- ९- २०१२ :-
शनिवारी Irvin D.F.W. Dallas ला हिंदु टेंपलला सार्वजनिक गणपति दर्शनासाठी गेलो .अमेरिकेतील ह्या महाराष्ट्र मंडळाने श्री गणपतीची महाकाय मूर्ति मुंबईहून आणली होती . गणपती भोवतीची सजावट पाहून मुंबईच्या ”लालबाग ” सार्वजनिक गणपतीची आठवण झाली . मोठमोठे झांज ,तबला ,पेटी , ढोल ताशाच्या गजरात गणपतीची आरती सुरू झाली .डलासमधील सगळे भारतीय विविध धर्माचे ,पंथाचे लोक हजरराहून मनापासून तल्लीन होऊन आरती म्हणत होते . प्रसाद व ईडली -चटणीचा आस्वाद घेऊन रात्री ऊशीरा घरी परत आलो .
दि.३०-९-२०१२ :
आज रविवार असल्याने सगळेच ऊशीरा ऊठलो . अद्वैतला ताप ,खोकला , ऊलट्या होत होत्या .तांतडीचा ऊपचार म्हणून त्याला होमिओपँथी Gunpowder, Rescue २०-२०मिनिटांनी दिले . ताचे औषधही दिले . २-३ तासांनी त्याला झोप लागली . आनंद उद्या सोमवारी Work From Home करणार आहे .
दि.१-१०-२०१२ सोमवार :-
आज सकाळी अद्वैतचा ताप गेला ,कालपासून पुन: ऊलटी झाली नाही. चांगली झोप लागल्याने प्रसन्न दिसत होता . आम्ही दोघे नेहमीप्रमाणे जिममध्ये जाऊन आलो . आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन रिजन्सी इस्टेट ,डोंबिवलीला साजरा करण्यात आला . आज एकंदरित विचार करता ”विभक्त कुटुंब पध्दति ” अपरिहार्य झाली आहे .एकत्र कुटुंब पध्दतिचा र्हास होत आहे .नव्या पिढिला वृध्दांची अडचण वाटायला लागली आहे .त्यांची सतत अवहेलना करण्यात येत आहे . बहुलंख्येने म्हातारपणी मुलांवरच अवलंबून राहावे लागत आहे .पति वा पत्नीचे निधन झाल्यास मानसिकरित्या एकचेपण खायला येते .त्यांच्या हालअपेष्टा वाढतात .बाहेर कोणाजवळही बोलायची सोय नाही. होत असलेले अत्याचार ‘ तोंड दाबून ‘ मुकाट्याने सहन करीत राहण्याशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही . त्यांना स्वत:चे संरक्षणही करता येत नाही . आरोग्यविषयक सोयी ,सवलती नाहीत. ह्यावर एकच ऊत्तर ” ज्येष्ठ नागरिक संघ ”. त्याद्वारे आपल्या अडचणी शासनाकडे वा योग्य आस्थापनेकडे मांडता येतात . स्काईप वर मुंबईला घरी बोललो . सौ .प्रिति , सुनील पुण्याला सकाळीच डेक्कन एक्सप्रेसने गेले . आज अकोला ,ठाणे ,मुंबई भागांत वादळ ”मौसम ” हा चित्रपट झी टि. व्ही .वर आम्ही सगळ्यांनी पाहिला .
दि.२-१०- २०१२ मंगळवार :-
आज आनंद पूर्णिमाला ऑफीसमध्ये व अद्वैतला शाळेत सोडून आला . काल मुंबईला ”पितृपक्षातील प्रतिपदा ” होती . डोंबिवलीला एक कावळा सकाळपासूनच ‘ काsव ,काsव ‘ करित आम्हा दोघांना शोधत होता . त्याला सौ .निर्मलाच्या हाताने नेहमीप्रमाणे घास मिळाले नाहीत . येथे डलासमध्ये भारतासारखे कावळे शाकाहारी नाहीत , ते मांसाहारी आहेत . येथील भारतीय गुरूजींनी सांगीतल्याप्रमाणे श्री साईमंदिरात जाऊन तेथील गुरूजींना नमस्कार करून दक्षिणा देऊन आलो .तसे डोंबिवलीला ति.गं .भा. आईसाहेबांना व सगळयांना फोन करून सांगितले .
आज रिजन्सीमध्ये ईमारत क्रमांक १ च्या बाजूला बांधलेल्या बसस्टॉप वर ईमारतीच्या टेरेसवरील मोठ्ठा Angal पडला , त्याने प्रथम ईमारतीचा ग्लास फोडला व उभ्या असलेल्या बसमधील ड्रायव्हर/क्लिनरपैकी क्लीनरच्या डोक्यावरच पडला , त्यालातांतडीने दवाखान्यात नेले,तेथे १३ टाके घालावे लागले . असे मला मकरंदने फोनवरून सांगितले .

दि .६-१० – २०१२ :- शनिवार , नासा , ह्युस्टन भेट .
आनंदने ह्युस्टनला Spring Hills Suits Hotel माझ्या – Sr. Citizen च्या नांवावर Internet वरूनच Book केले .त्यामुळे चांगला Discount मिळाला . आनंद – पूर्णिमा सकाळीच ८-३० ला घरून निघालो . त्यांनी मोठी Car भाड्याने सांगितली होती ,त्यात Gas भरून घेतला . डलास -ह्युस्टन ६०० मैलाचे अंतर आहे . रस्त्यात एका ठिकाणी नाश्ता केला .
दुपारी १ वाजता हॉटेलवर पोहोचलो . काऊंटर मनला Online आरक्षण दाखविल्यावर त्याने दिलेल्या 511 Suit मध्ये पोहोचलो . सर्वजण फ्रेश झाल्यावर , घरूनच आणलेले पाणी , धपाटे , लोणचे , चटण्या ,कांदे ….इ .चा छान Lunch केला . त्यानंतर सगळ्यांनी तीन तास मस्तपैकी झोप घेतली . नंतर चार वाजता कारने एक तास अंतरावरील Sea -Beach वर पोहोचलो . तेथे वेगवेगळ्या Rides होत्या . आम्ही सर्वप्रथम स्वत:भोवती फिरतफिरत वरवर जाणार्या कांचेच्या बंद कँपसुल Ride ची निवड केली . वरवर जात असतांना आजुबाजूच्या विविध प्रकारच्या Rides चे दर्शन होत होते . तसेच बाजूच्याच समुद्रातील छोट्या छोट्या Rides ही दिसत होत्या . एकंदरीत अत्यंत नयनरम्य द्दृश्ये पाहात पाहात आम्ही कांचेच्या बंद कँपसुलमधून खाली आलो . आम्ही त्यानंतर Beach-Rail Train Ride मध्ये सर्वजण बसलो. ह्या Ride मधून आजूबाजूच्या बहुतांश Rides ची कल्पना येत होती . ह्या Train Ride मधून सफर करता करता मार्गातील बोगद्यातून आम्ही जात अचानकपणे गाडीतील प्रवाशांना गोळीबाराचे ,बॉंब तसेच पिस्तुलाच्या गोळीबाराचे आवाज ऐकू आले .सर्वजण खूपच घाबरले होते . थोडे अंतर पार केल्यावर ह्या आवाजांचे मुळ Train च्या आजूबाजूच्या पुतळारूपी हल्लेखोरांच्या गोळीबारात होते , हे अनाऊन्सरने वेळोवेळी सांगीतले .ही Train Ride कधी संपली हे कळले नाही . आता रात्रीचे ८-३० वाजले होते .
तेव्हड्यात पूर्णिमाच्या ह्युस्टनमधील दोन मैत्रिणिंचे फोन आले . त्यांनी तेथील Maharaja Bhog Restaurarant मध्ये Dinner चे आमंत्रण दिले . आम्ही रात्री ९-३० ला त्यांनी सांगीतलेल्या हॉटेलमध्ये पोहोचलो . तेथे पूर्णिमाच्या मैत्रिणीं सहकुटुंब उपस्थित होत्या .
Maharaja Bhog Restaurant हे भारतीय पद्धतीचे गुजराथी थाली हॉटेल होते . अगोदरच आरक्षण केलेले असल्याने लगेच आम्ही सगळे आत जाऊन स्थानापन्न् झालो .तेथील सगळे वेटर्स शाही पोषाखात सेवेला हजर होते. त्यांतील दोन वेटर्स पूर्वीच्या राजे महाराजांच्या सेवेत असत तशा प्रकारे जेवणाअगोदर हात धुण्यासाठी छिद्रा-छिद्राचे भांडे व ऊन ऊन पाण्याची झारी हातात घेऊन ऊभे होते.हात धुतल्यावर टॉवेलन् हात कोरडे केले . समोरच्या गुजराथी थालीत शाही वेषातील वेटर्सनी एकामागोमाग ५-६ भाज्यांच्या वाट्या, ३-४ वेगवेगळ्या आंबट -गोड चटण्या ,दहिवडा , पँटीस , बासुंदी , कढी , वरण -भात-साजूक तुपाची धार , पुरी /फुलके …इ .चे ऊत्कृष्ट भरपेट जेवणं झाली . त्यानंतर अमेरिकेत सहसा न मिळणारा त्रयोदशगुणी पानाचा विडा खाल्ला .तो चघळत चघळत आम्ही हॉटेलवर पोहोचलो ,अत्यंत समाधानी मनाने झोपलो .
७ आक्टोबर २०१४ :-मिनाक्षी टेंपल ,ह्युस्टन .
सकाळी लवकर ऊठलो .फ्रेश होऊन नाश्ता घेण्यासाठी मी व निर्मला तळमजल्यावर लिफ्ट समोरच्या खोलीत पोहोचलो . पँन-केक, ब्रेड, कॉफी,मध , केळी ,सफरचंद……इ . फळफळीवळेचा आस्वाद घेतला .थोड्याच वेळात आनंद ,पूर्णिमा व अद्वैतही खाली नाश्ता करायला आले . आम्ही सर्वांनी नाश्ता केला .पुन्हा ५११ सुट मध्ये जाऊन सगळे सामान एकत्र केले ,बँगा भरल्या .खाली जाऊन गाडीच्या डिक्कित बँगा ठेवल्या .काऊंटरवर जाऊन Check Out केले . सर्व जण गाडीत बसलो नी मिनाक्षी टेंपलकडे प्रयाण केले . आनंद व पूर्णिमा दोघेही ह्युस्टनला १-२ वर्षे नोकरी निमित्ताने होते .त्यामुळे मिनाक्षी टेंपलला पोहोचण्यासाठी कोणताही त्रास झाला नाही .
हे मंदिर दक्षिण भारतातील मदुराई येथील मिनाक्षी मंदिराचीच प्रतिकृति आहे . येथे महागणपति मंदीर , मिनाक्षी , शंकर ,पार्वती ,अय्यप्पा …इ .च्या सुरेख व कोरीव मुर्त्या असलेली सुंदर मंदीरे आहेत . त्यांतील जागृत दवी / दैवतांचे दर्शन घेतल्याने सगळ्यांची मने प्रसन्न झाली . आरती झाल्यानंतर तीर्थ-प्रसाद घेतला. त्यानंतर तेथीलच कँटिन मध्ये जाऊन ईडली- वडा ,सांबार ,लोणचे चटणीआणि एक गोड पदार्थ घेऊन भरपेट नाश्ता केला . बाजूच्या महागणपती मंदिरांत प्रथमच Lemon Lamp पाहिले . एकंदरीत मिनाक्षी मंदिर व परिसर पाहून सर्वांची मने खूप प्रसन्न झाली . आता दिड तास अंतरावर असलेल्या नाविन्यपूर्ण Nasa पाहण्यासाठी निघालो .
NASA :-
नासा हे दक्षिण अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ह्युस्टन येथे समुद्र किनार्यावरील Jonson Space Centre आहे . विस्तिर्ण जागेत ह्याची ऊभारणी करण्यांत आली आहे . येथे ११ आकर्षक ठिकाणे आहेत .
(१ ) माहिती ( Information Centre ) , १५ मिनिटे .
( २ ) Starship Gallary , ४५ मिनिटे .
(३ )Blast Off , ३० मिनिटे .
(४ )NASA Tram Tour , ९० मिनिटे .
( ५ )Zero -G dinner , १५ मिनिटे .
( ६ ) Space Centre Theatre , ६० मिनिटे .
( ७ )Living In Space , २५मिनिटे .
( ८ )Flight Stimulated , ६० मिनिटे .
( ९ )Space Centre Plaza , ६० मिनिटे .
(१०)Kid’s Space Place , ३० मिनिटे .
(११)Mission To Mars , ३० मिनिटे .
उपरोक्त सर्व ठिकाणे पाहण्यासाठी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजे पर्यंतचा वेळही कमी पडतो .
आम्ही सर्वजण नासाला पोहोचलो तोपावेतो दुपारचे १.३० वाजले होते . त्यामुळे
आम्ही काही निवडक ठिकाणी जाण्याचे ठरविले . माहिती केन्द्रातून माहिती घेतली . एकंदरीत आम्हाला मुंबईच्या वरळीच्या नेहरू सायंन्स सेंटरची प्रकर्षाने आठवण झाली .
(१ ) सर्वप्रथम आम्ही निवड केली Starship Gallary ची , एकूण ४५ मिनिटांचा हा भाग जगातील Largest Display Of Moon – Rocks आहे . अमेरिकन पहिला अंतराळवीर श्री .नील आर्मस्ट्रॉंग चांद्रयानातून चंद्रावर उतरला होता . तेथे त्याने चंद्रावरील माती,तसेच विविध खडकांचे नमुने जमा करून ,परत येतांना आणले .त्याचेच संपूर्ण प्रदर्शन आकर्षक पद्धतिने येथे मांडलेले आहे . चंद्रावरून आणलेल्या मातीचे ,लहान मोठ्या खडकांचे रासायनिक विश्लेषण तसेच पृथ्वीशी तुलना करून त्याची माहिती तेथे आहे . ह्या आणलेल्या मातीला ,खडकांना आपल्याला प्रत्यक्ष स्पर्श करण्याची परवानगी आहे . चंद्रावरून पृथ्वी निळसर रंगाची दिसते असे निरिक्षणही नील आर्मस्ट्रॉंगने नोंदविले आहे .
त्यानंतर आम्ही Blast Off Theatre मध्ये प्रवेश घेतला .एकंदर ३० मिनिटांच्या ह्या भागांत रॉकेट प्रक्षेपणाचा प्रत्यक्ष अनुभव आपण घेतो . त्यावेळी आपण 7 Millions Pounds चा धक्का तसेच 4.5 Millions Pounds चा Vehicle Skyward दाब अनुभवतो .त्यवेाळी उठलेल्या प्रचंड धुर -धुराळ्यामध्ये आपण थियेटरमध्ये हरवून जातो .
तद्वतच चंन्द्रावर चांद्रयान कसे उतरले ? चान्द्रयानातून अंतराळवीर चंद्रभूमी वर कसे उतरले ? अंतराळवीर बाहेर पडल्यावर चंद्राच्या पृष्ठभूमिवर सोबतच्या छोट्या यानातून फिरतांना तेथूल मातीचे/ लहानमोठ्या खडकांचे विविध नमुने कसे गोळा केले ? ते नमुने सोबत घेऊन छोटे यान चांद्रयानाशी पुन: कसे जोडले गेले ? तेथून परत पृथ्वीवरकसे उतरले ? ह्या सगळ्या गोष्टी समोर प्रत्यक्ष घडतांना आम्ही जणू काही अद्दश्यपणे चंद्रभूमिवरच हजर आहोत ,अस् वाटत होते .
ह्यानंतर NASA ची आतापर्यंतची व भविष्यातील Missions ,Explorations ची माहिती चलचित्राद्वारे दाखविली गेली . त्यानंतर अमेरिकेने आत्ता मंगळावर पाठविलेले Curiosity – Rover यान तेथे कसे उतरले ? तेथे हे Curiocity- Rover यान कशाकशाचा शोध घेणार आहे ? मंगळावर जीव सृष्टी आहे किंवा कसे ? तेथे पाण्याच्या प्रवाहामुळे दगड गोटे जसे दिसतात तसे असल्याने ,मंगळावर पूर्वी पाणी-प्रवाह असल्याचा पुरावाच मिळाला आहे .
अशा प्रकारची विविध माहिती समोरच्या पडद्यावर समजाऊन सांगूतली जात होती .
(३) NASA Tram Tour चा ९० मिनिटांचा आनंद घेण्यासाठी तिकीटे काढून Tram मध्ये बसलो . त्या ट्रामच्या १० डब्या-मिळून एकूण ७० व्यक्ति NASA ‘s JONSON SPACE CENTER ला फेरफटका मारण्यासाठी निघालो . प्रथम नासामध्ये Rocket प्रत्यक्ष बनवितांना त्यासाठी लागणारे विविध पार्टस् Spain आदी देशांत तसेच अमेरिकेतील विविध कँलिफोर्नियादी प्रदेशातही बनवून NASA ला पाठविले जातात .NASA मध्ये हे सगळे पार्टस् एकत्रित करण्याचे काम केले जातात . प्रत्येक भागाचे Experts त्यांच्या मदतनिसांकडून संपूर्ण Rocket तयार होते . येथेच अंतराळवीरांना विविध प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते .
अंतराळातून विविध ग्रहावरून परत आणलेले विविध प्रकारचे Rockets येथे प्रदर्शनासाठी ठेवलेले आहेत .
(४)Living In Space :- २५ मिनिटांच्या ह्या भागात रॉकेट – कँपसूलमध्ये प्रत्यक्ष जाऊन अंतराळवीरांची दिनचर्या कशी असते हे अनुभवता येते . तेथे सकाळी उठल्यावर शून्य गुरूत्वाकर्षणात स्नानादी प्रा:तकर्मे आटोपून
निरनिराळी कामे , जेवण , विश्रांती , संशोधनादी कामे कशी करतात हयाचा प्रत्याक्षानुभव घेतला .
ह्यानंतर ईतर भागांत जाऊन तेथील माहिती घेतली .विविध भागांतवेगवेगळे फोटोही काढले . तेथे D.V. D. ही मिळाली .
Kid’s भागांत जाऊन अद्वैत अंतराळवीक पोषाखात कसा दिसतो हे पाहिले .आम्ही सर्वांनीही त्या पोषाखात कसे वाटते हे अनुभवले . विविध ग्रहांवर आपापले वजन किती ? ह्याचा स्वानुभव घेतला . अमेरिकेत F.P. S. पद्धतीचा वापर होत असल्याने वजन पौंडात समजले .
सायंकाळी ६ वाजता NASA बंद होते .आम्ही सगळ्यांनी नाशिती घेतला .आणि परतीच्या प्रवासाला सुरवात केली . जवळजवळ ६ तासांच्या प्रवासांत पुन: नाश्ता , चहा ,कॉफी ,कोल्ड ड्रिंक्स घेतले .रात्री ११.४५ वाजता डलास प्लँनोला घरी पोहोचलो .
Annual Meeting Day In School १२-१०-२०१२ :- अद्वैतच्या आल्फा मॉन्टेसरी शाळेत आज Annual Meeting Day होता .त्यासाठी अद्वैतला नवीन Astrounut चा पोषाख आणला . नवीन Dress टायसह आणला तसेच Super -Man चाही ड्रेस आणला . अद्वैत कधी Astronaut
Engineer तर कधी Superman चा ड्रेस घालून खेळायचा . त्याच्या शाळेत आता स्पँनिश भाषाही शिकविणार आहेत .
१३ आक्टोबर २०१२ :-
मागील आठवड्यापासून पूर्णिमाचे Work From Home सुरू होते . तिने तिचे कंपनीचे काम विहित वेळेच्या आंत ऊत्तम रितीने पार पाडल्यामुळे मँनेजर कडून अभिनंदनाचा Message आला होता . त्यासाठी तिने सगळ्यांना ‘ फन एशिया ‘ चित्रपट गृहात English Vinglish हा चित्रपट सायंकाळी ६ ते ९.३० दाखविण्याचे मान्य केले . त्याप्रमाणे आम्ही सर्वजण ‘ फन एशिया ‘ चित्रपट गृहाला पोहोचलो .
ह्यांत श्रीदेवीचा मुख्य Roll आहे .चित्रपटांत तिचे नांव आहे ”शशी ”. पती व दोन मुले अशा तिच्या चौकोनी कुटुंबात सर्वजण गुण्या गोविंदाने राहात असतात. शशी चांगली गृहिणी आहे , ती ऊत्कृष्ट बुंदिचे लाडू तयार करून ऑर्डरप्रमाणे पुरविण्याचे काम करीत असते . शशीला पती व मुलांसारखे फाडफाड ईंग्रजी सफाईदारपणे बोलता येत नाही . तिला घरातील कोणीही समजून घेत नाही ,ऊलट नेहमी हेटाळणीच्या सुरांत बोलतात /बघतात . कोणीही तिला Respectfully वागणूक देत नाही .तिची मोठी बहिण ‘ मनू ‘ पति-निधनानंतर तिच्या २ मुलींना घेऊन अमेरिकेतच न्यु स्थायिक होऊन पतीचाच Business करीत असते . तिच्या मोठ्या मुलीच्या ‘राधाच्या ‘ लग्नानिमित्ताने ती शशी व तिच्या कुटुंबियांना अमेरिकेत येण्याचे आमंत्रण देते . परंतू शशीच्या पतीला कार्यालयीन कामामुळे तर मुलांच्या परिक्षेमुळे अमेरिकेत लवकर जाणे शक्य नसल्याने ,शेवटी शशीने एकटीनेच अमेरिकेत जावे असे सर्वानुमते ठरते . शशी तसे तिच्या मोठ्या बहिणीला ‘मनूला व राधाला ‘ कळविते . सासु ,पति व मुले लग्नाच्या वेळी अमेरिकेत हजर राहण्याचे कबूल करतात .
शशी विमानाने अमेरिकेत जायला निघते . शशीच्या मनांत ‘ मला ईंग्रजी चांगले बोलता येत नाही ‘ हा न्यूनगंड असतो .आता प्रवासांत व अमेरिकेत सगळे चांगले ईंग्रजी बोलतील ,तेव्हां मी काय करू ? कसे काय बोलू ? असे अनेक प्रश्न शशीला पडतात . विमानांत तिच्यासोबतचा सहप्रवासी “अभिताब बच्चन ” तिला धीर देतो , चांगले ईंग्रजी येत नाही म्हणून घाबरायचे नाही . इतरांसोबत जमेल तसे ईंग्रजी बिनधास्त बोलायचे . अमेरिकेतील लोकांना भारतांतील लोकांसारखे सफाईदार हिंदी कुठे बोलता येते ? ते भारतात आल्यावर जमेल तसे मोडके तोडके हिंदी न घाबरता बोलतातच ना ! आपण त्यांना कमी लेखत नाही . शशी विमान तळाबाहेर येते . तिला घ्यायला तिची मोठी बहिण मनू आणि राधा आलेली असते . न्युयॉर्कला घरी जातांना एका बसवरील जाहिरातीतील ”Learn English In 4 Weeks Only ” हे वाक्य ती लक्षात ठेवते .घरी गेल्यावर ती जाहिरातीतील फोन क्रमांकावर फोन करून पत्ता लिहून घेते . दुसर्याच दिवशी बाजारांत जातांना गुपचुपपणे 400 $ फी भरून ईंग्रजी वर्गात प्रवेश घेते . दररोज दुपारी बाजारात जाण्याचे निमित्त करून English क्लासला जाते . तेथे तिला डेव्हिड सर हे क्लासचे मुख्य तसेच इतर पाकिस्तानी ,फ्रेंच ,मल्याळम् असे ८-१० वर्गमित्र , विविध व्यवसाय सांभाळून ईंग्रजी शिकायला येत असतात . ह्या सगळ्यांशी तिची मैत्री होते . एके दिवशी Coffee-Day मध्ये कॉफी व सँडविचची Order देतांना ईंग्रजीत बोलतांना अडखळते , घाबरते , चिल्लर नाणी खाली पडतात . Self Service कॉफी व सँडविच नेतांना दुसर्या व्यक्तिचा धक्का लागून सगळे खाली सांडते .शशी रडवेली होऊन बाहेर पडते . केवळ चांगले ईंग्रजी बोलता न आल्यानेच ही फजिती झाली अले तिला वाटते . तिचा फ्रेंच -कुक वर्गमित्र तिला धीर देतो . पुन: कॉफी ,सँडविच घ्यायला Coffee Day मध्ये घेऊन जातो . शशीची ईंग्लिश क्लासमधील प्रगती चांगली सुरू असते .
शशीचा पति , २ मुले आणि सासुबाई Surprise देण्यासाठी ठरलेल्या वेळेआधीच लग्नासाठी न्युयॉर्कला येऊन पोहोचतात . शशीच्या ईंग्लिश क्लासबाबतची माहिती राधाला माहिती असते .ती तिला अप्रत्यक्षपणे मदतही करित असते . न्युयॉर्क -एम्पायर ईस्टेट बिल्डिंग पाहायला जायचे सर्वजण ठरवितात .शशीचा English Class त्याचवेळी असते ,शशी पाय दुखण्याचे निमित्त करून मागे मागे राहाते ,तिची व कुटुंबियांची चुकामुक होते .शशीला ती ईंग्लिश शिकत आहे ही गोष्ट सर्वांपासून लपवायची असते .शशी English class ला जाते . त्याचवेळी ईंग्रजीची फायनल परिक्षा जाहिर होते .त्याचवेळी घरी राधाच्या लग्नाची तयारी जोरात सुरू झालेली असते .आता काय करावे ? कसे करावे ? अशा संभ्रमात शशी गोंधळून जाते .
लग्नात बुंदिचे लाडू शशीच्याच हातचे बनविलेले सर्वांना हवे असतात . बनविलेले लाडू बाहेर आणतांना दरवाज्यातच मुलाचा धक्का लागून सगळे लाडू खाली पडतांत . शशी पुन: लाडू बनविते .
राधाच्या लग्नाच्या ( Wedding ) दिवशीच ईंग्लिश क्लासमध्ये शशीला Final Test असल्याचे कळते . ती तिच्या वर्गमित्रांना आणि डेव्हिड सरांना राधाच्या लग्नाला येण्याचे निमंत्रण द्यायला जाते ,त्यावेळी तिला काय करावे सुचत नाही . तेथे तिला 5 Minutes Speech in English द्यावयाचे होते.अमेरिकेतही शशीला चांगले ईंग्रजी बोलता येत नसल्याने तिचे पति व मुले Respect देत नाहीत . लग्नात सगळ्या पाहुण्यांना शशीने बनविलेले बुंदीच्या लाडूंची Gift अतिशय आवडतीत . त्यामुळे सर्वजण तिची स्तुति करतात .
लग्न झाल्यावर नवरदेव नवरीला पुढील आयुष्यासाठी राधाची आई , शशूचा पति,व घरचे English मध्ये शुभेच्छा देतात . शशीलाही शुभेच्छा देण्यासाठी आग्रह होतो .परंतु शशीचा पति तिला Good English बोलता येत नाही ह् सांगण्यासाठी ऊठतो . त्याचवेळी शशी पतिला अस्खलित /सफाईदार English मध्ये May I Speak म्हणून थांबवित शुभेच्छापर छोटेसे Speech देते . ऊपस्थित सर्वजण आणि शशीचे पति ,मुले सुुद्धा आश्चर्यचकीत होतात . शशीचे मनापासून टाळ्या वाजवून अभिनंदन करतात .
शशीच्या क्लासचे मुख्य डेव्हिडसर शशीचे विशेष अभिनंदन करतात ,कारण English Final Test मध्ये 5 Minutes पेक्षाही जास्त वेळ Speech शशीने दिल्याने ती Distinction मध्ये ऊत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र तिला देतात. शशी तिच्या वर्गमित्रांनी तिला Good English बोलण्यासाठी Self – Confidence मिळवून दिल्याने सर्वांचे आभार मानते .
आज चित्रपट गृह तुडुंब भरलेले होते .सर्वसाधारणपणे अमेरिकेत नेहमी २०-३० प्रेक्षकच चित्रपट पाहायला येतात . आजचा चित्रपट पाहणार्या प्रेक्षकांपैकी बहुतेकांना मला Good English बोलता येत नाही , असा न्युनगंड असणार्यांना पुन: Self Confidence मिळवून देणारा हा चित्रपट माझाच चित्रपट आहे अले वाटते .
आनंदने माझ्यासाठी Gugal Samsung Nexus Mobile , अगदी त्याच्याच मोबाईलसारखा ,आणला . सर्वांना अतिशय आवडला .
१२ आक्टोबर २०१२ रविवार :-
अमेरिकेतील डलास शहराच्या पंचागाप्रमाणे आज दुपार १२.५० पासून अमावस्या म्हणजेच सर्व- पितृमोक्ष अमावस्या आहे . मुंबईला ऐरोलीला प्रमोद पितरांसाठी तर्पण व अग्निघास टाकणार आहे . मला आज त्यासाठी ईंटरनेटवक आसाराम बापूंची सर्वपितृ अमावस्या पितरांसाठी तर्पण कसे करावे ह्या मंत्र व तर्पण विधीची माहिती देणारी You Tube मिळाली .
( १ ) त्यासाठी सोपा चार अक्षरी मंत्र खालीलप्रमाणे – ओम् र्हीं श्रीं क्लिं ! स्वधा देवयै स्वाहा:
(२ ) आवाहन : (१ ) सर्वपितृअमावस्येच्या दिवशी सर्व देव – देवता ,यक्ष ,किन्नर ,भूत ,पिशाच्च ,चिरपरिचित /अपरिचित व्यक्ति ,सर्व पितर ,पति – पत्नी दोघांच्याही नात्यातील ‘ कुळातील प्रपितामह , पितामह , पिता , पणजी , आजी , काका-काकी , मामा -मामी ……इ. मृतात्मे यांना तर्पणासाठी ,पिंडदानासाठी , प्रसन्नचित्ताने उपस्थित राहण्याचे आवाहन करायचे . त्यासाठी
दोन्ही हात एकमेकासमोर उभे करून धरायचे .
( ३ ) नैवेद्याच्या ताटात पोळी , शेंगाची भाजी ,कढी ,खीर ,वडे ,भजे ,सुकोडे ,वरण ,भात ,तूप…इ. वाढून सगळे पदार्थ एकत्र करून त्याचे ६+ ५पिंड अग्निघासासाठी तयार करायचे .
अशा रितीने आजचा सर्व पितृ मोक्ष अमावस्येचा दिवस शास्त्रोक्त रितीने पीर पडल्याने मनाला अत्यंत समाधान प्राप्त झाले .
डोंबिवलीला मकरंदने त्याला सांगितल्याप्रमाणे ऊपरोक्त पुजेच्या कार्यक्रमासाठी पितामह श्री .बळीरामजी (पणजोबा ), मातामह (लक्ष्मीबाई ) पणजी ,मोठे आजोबा (श्री .रामचंद्रपंत) ,तसेच आजोबा (श्री.वामनरावजी )हयांचे फोटो आम्हाला e – mail ने पाठविले होते .आनंदने त्या सगळ्या फोटोंच्या प्रिन्टस काढल्या . कार्डबोर्ड वर चिकटविल्या होते .ऊपरोक्त तर्पण विधिच्या वेळी समोरच सगळे फोटे लावलेले होते . नेहमीप्रमाणे फोटो स्वच्छ पुसून पांढरे गंध व पांढर्याच अक्षदा लाऊन हार घालून पूजन केले .नैवेद्य दाखऊन सगळ्यांनी साष्टांग नमस्कार केला .
ह्या दिवशी विशेष म्हणजे सौ. निर्मला दरवर्षी पितरांचा घास,नैवेद्य म्हणून पोळीला तूप लाऊन खिडकीत वा दरवाज्याबाहेर ठेवते ,त्या अगोदर एक कावळा येऊन काsव , काsव ओरडत असतो कावळा लगोलग ती पोळी खाऊन टाकतो . विक्रोळी ,डोंबिवली आणि आता अमेरिकेत डलासलाही कावळ्याने येऊन घास भक्षण केला .
आजच्या दिवशी आम्ही अग्निघास टाकल्यानंतर तोच नैवेद्य पत्रावळीवर वर गच्चीवर पितरांसाठी ठेवतो ,त्याभोवती पाणी फिरवून पितरांना आवाहन केल्याबरोबर कावळे येऊन नैवेद्य खातात . जणू कांही ते हयाच क्षणाची वाट पहात असतात . कधी कधी आजूबाजूला कावळे असूनही एकही कावळा पितरांसाठीचा पिंड खायला येत नाही .अशा वेळी पितरांच्या राहिलेल्या ईच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी घरातल्या कर्त्या व्यक्तिने बोलून दाखविल्यानंतरच कावळ्यांच्या रूपातील पितर पिंडाला स्पर्श करून तो खातो . कधी कधी अनेक कावळे येऊन पिंड भक्षण करतात . कांही लोकांच्या मते जगातील एकमेव सत्य सत्व हेच राहिले आहे .
१५ आक्टोबर २०१२ :-
आज सोमवार आठवड्याचा पहिला दिवस असल्याने अद्वैतला शाळेत जातांना सोबत त्याचे Bed नेणे आवश्यक असते . तसेच Hallow Weon पितर ,भूतपिशाच्चांसाठी पंधरवाडा सुरू होणारअसल्याने Pumpkin (गोल भोपळा ) व डोळे म्हणून Carrots पंधरवाडा सुरू होणार असल्याने प्रदर्शनासाठी Pumpkin व Carrot ही शाळेत न्यायच् होते . आज आनंद सकाळीच ५.३० ला विमानाने फ्लोरिडाला कंपनीच्या कामासाठी गेला . गुरूवारी परत येणार आहे .
१८आक्टोबर २०१२ गुरूवार :-
आज आनंदने फलोरिडाहून आल्याबरोबर विनायकी चतुर्थी असल्याने जवळच्याच देवीच्या मंदिरातील गणपतीला नेण्याचे कबूल केले . सौ.निर्मलाने त्याप्रमाणे पूर्णिमा , आनंद अद्वैतला शाळेत घेऊन गेल्यावर दुर्वा आणून निवडल्या व १११ दुर्वांचा हार तयार केला .सायंकाळी देवीच्या देवळांत पोहोचलो . ह्या देवळांत हिंदुमंदिराप्रमाणेच गणपती ,महालक्ष्मी ,हनुमान , देवी आणि साईबाबांच्या मोठ मोठ्या मनमोहक मूर्त्या आहेत . मंदिरांत ह्या देवतांचे दर्शन घेतांच मन प्रसन्न होते . येथे दक्षिण भारतीय पुजारी व भक्तगणांचाच वावर जास्त असतो .येथील
वैशिष्ठ्य म्हणजे येथे महालक्ष्मी स्तोत्र ,देवी स्तोत्र , अर्गला स्तोत्र ,शिव स्तोत्र ….इ. संस्कृतमधील स्तोत्रे तालसुरांत व शुद्ध व स्पष्ट ऊच्चारांत सामुहिकपणे स्त्री-पुरूष एकत्रित रित्या संथा म्हटल्यासारखे म्हणतात . सगळ्या वातावरणांत प्रसन्नता भरलेली असते . सौ.निर्मलाने १११ दुर्वांचा हार गणपतीला अर्पण केला .
२२आक्टोबर २०१२ डोंबिवलीचा नवरात्रीतील अष्टमी उत्सव :-
पुण्याहून प्रीति व सुनील खास अष्टमी पूजा उत्सवासाठी आलेले आहेत .एरोलीहून प्मोद -प्रिया येणार आहेत . ईटारसीहून चि. मुरलीधर ,सौ. अनुराधा व स्वाती अष्टमीच्या दिवशी सकाळीच येणार असल्याचाही दूरध्वनी आला . त्यामुळे सगळ्यांची मने आनंदून गेली . आम्हीही स्काईपवर अष्टमी पुजेसाठी हजर होतो . ति.गं. भा. आईसाहेबांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार अष्टमीला देवीची स्थापना ,धान बांधणे , फुलोरा लावला , भोनच्या प्रभाकर भाऊच्या लिखित सूचनांप्रमाणे क्रमाक्रमाने पूजेची तयारी केली व मंत्र म्हणून पूजा व आरत्या म्हणण्यांत आल्या . जेवणेही झाली .

सेवानिवृत्तिनंतर ……

मला माझ्या  आतापर्यंतच्या आयुष्याचे  सिंहावलोकन केले असता  पडद्यावर चित्रपटाचे एकामागून एक कालखंड  कसे दिसताील ह्याचा विचार मनात आला . ह्या चित्रपटाचे बालपण , प्राथमिक शिक्षण , माध्यमिक शिक्षण ,कॉलेज शिक्षण झाल्यावर पुढे काय ? ,खाजगी नोकरी ,शिक्षकी पेशा (अप्रशिक्षित/प्रशिक्षित),
प्रमोशनचा कालखंड येतेा .मध्यांतरापर्यंत मी मनाशीच घेतलेल्या ठाम निश्चयाप्रमाणे केलेल्या वाटचालीचा समावेश होतो . ह्या ठाम निश्चयाप्रमाणे मी नोकरीला लागल्यानंतर स्वत:च्या शैक्षणिक प्रगतिसाठी हायर मँट्रीक (११ वी )
नंतर कॉलेजांत जाऊन शिक्षण घेणे शक्य नसल्याने बहि:शाल शिक्षण ह्या पर्याय असलेला अत्यंत खडतर मार्ग स्विकारून वाटचाल केली . कॉलेजमध्ये मिळणारे लेक्चरर /प्राध्यापकांचे मार्गदर्शन  नाही ,शिवाय पुस्तके नाहीत आमच्या लोणकर घराण्यांत कोणाचाही मदतीचा हात नाही .आजूबाजूची बहुतांश  नातेवाईकमंडळी , मित्रपरिवार  , अधिकारी वर्ग नकारात्मक विचाराचे होते . सतत प्रोत्साहन देऊन ,आगे बढते जाव ! हम तुम्हारे सपोर्टर है !  आगे बढनेका स्पीड कम होगा ; चिंता मत करो .तुम्हारा लक्ष्य तुम्हारी राह देख रहाहै. ह्या सकारात्मक  विचाराच्या व्यक्तिंच्या पाठिंब्याने मी माझी प्रगती करण्यासाठी येणार्या अडचणी /अडथळे ह्यांना न जुमानता माझी वाटचाल  सुरूच ठेवली . ह्यात मला अकोला,पातूर, वाशीम येथील कॉलेजात शिकणारे विद्यार्थी , वाचनालयाचे कर्मचारी , प्राध्यापक माझे हितचिंतक सहकारी, मित्र ,अधिकारी  ह्यांनी सर्व सहकार्य केले .मी त्या काळात  दरवर्षी वर्षाला २ म्हणजेच दर सहा महिन्याला परिक्षा  देत होतो. एक परिक्षा शिक्षण खात्याची अन् एक नागपूर विद्यापीठाची , त्यावेळी मला असे वाटायचे की ह्या परिक्षा दर ३ महिन्याने घेतली असती तर सोन्याहून पिवळे वाटले असते.
माझ्या  आयुष्याचे कालखंड पुढील प्रमाणे .

१)बालपण १९४५ ते १९५०मुक्काम भोन . (५ वर्षे )
२)शिक्षण १९५०ते १९६३ प्राथमिक ,माध्यमिक व कॉलेज परिक्षेपर्यंत .(१३ वर्षे) अकोला जिल्हा .
३)पदवी व पदव्युत्तर परिक्षा , महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षा व मुलाखती ,स्थानांतर , पदोन्नति व  मुंबईला गोरेगांव येथे स्काऊट जांबोरेट कँप ,१९६३ ते १९७६. (१३ वर्षे)
४)मुंबईचे नवे आयुष्य १९७६ ते १९८९ विक्रीकर निरिक्षक पदी नेमणूक , ज्येष्ठ विक्रिकर निरिक्षक पदी पदोन्नति,वर्ग ३ कर्मचारी.महाराष्ट्र वाहन प्रवेशकर अधिकारी म्हणून नियुक्ति (१३ वर्षे)
५) मुंबई १९८९ -९० ते २००२-२००३ राजपत्रीत अधिकारी वर्ग २ अंमलबजावणी/निर्धारणा अधिकारी ; आणि  वर्ग १ राजपत्रीत अधिकारी ,कार्यासन अधिकारी ,आस्थापना ५ विक्रीकर आयुक्तांचे कार्यालय मुंबई .
महाराष्ट्र राज्यातील विक्रीकर विभागातील आस्थापना कार्यालयांची
तपासणी व त्यांचेसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन ,श्री आर. आर. पाटील , अध्यक्ष असलेल्या , लोक लेखासमितिसमोर विक्रीकर आयुक्त व अतिरिक्त विक्रीकर आयुक्तांसोबत, महसूलाबाबतच्या दोषारोपाबाबत स्पष्टिकरण देण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या विधान भवनाांत उपस्थिती .
मुक्काम मुंबई (१३ वर्ष )
६) सेवानिवृत्तिनंतर  ……..
सेवानिवृतिनंतर नियमितपणे कार्यालयात जाणे येणे बंद झाले होते .घरच्या जबाबदार्या संपल्या नव्हत्या .सर्वात लहान भाऊ प्रमोद अजूनही वयाची तिशी ओलांडली तरी पक्की नोकरी लागली नव्हती . लग्न सुध्दा व्हायचे होते . मकरंद २५ वर्षे वयाचा व आनंद २३ वर्षे वयाचे तर लहान मुलगी कु .प्रीतिही २१ वर्षाची , सगळ्यांची लग्ने , नोकरी ? अजून प्रलंबित होती . मकरंद व आनंद बी. ई .प्रथम श्रेणीत ऊत्तीर्ण झाले होते .पुढील चांगल्या नोकरीसाठी परिक्षा ,मुलाखती देणे सुरू होते .
प्रूतिचे लग्न :-
सर्वप्रथम चि .कु .प्रीतिचे लग्न करणे अत्यावश्यक होते. मकरंद व आनंदचे मित्र सोबत होतेच .तसेच ‘सुवर्णालंकार ‘ ह्या सेानार समाजाच्या नागपूरहून प्रसिध्द
होणार्या मासिकातील वरांच्या यादीतही संशोधन सुरू होते . इंटरनेटवरही शोध सुरू होता . कोकणातील देवगडजवळील पुरळ गांवच्या दैवद्ञ सोनारापैकी काशीनाथ भुर्केंचा लहान मुलगा सुनील पुणे येथे सत्यम कंपनीमध्ये ईलेक्ट्रीकल ईंजिनियर होता .त्याचे आई वडील डोंबिवली पश्चिमला ‘ प्रभुकृपा ‘ बिल्डिंगमध्ये राहात होते . त्यांची डोंबिवली एम .आय .डि .सी .मध्ये छोटे फँब्रिकेटींगचे वर्कशॉप होते . त्यांना दोन मुले होती . मोठा मुलगा मुंबईला कंपनीत केमिकल ईंजिनियर होता . लहान मुलगा सुनील सर्वांना आवडला . १४ ऑगस्ट २००५ ला साखरपुडा विक्रोळीलाच पार पडला . १४ डिसेंबर २००५ ला लग्नसमारंभ माँ कृपा बॉंकेट हॉल व लॉन , तीन हात नाका,ठाणे पश्चिम येथे धुमधडाक्यात पार पडला .गांवाहून,मध्यप्रदेशाहून व विदर्भातून ८० वर्हाडी नातेवाईक आमच्या घरातील पहिलेच लग्न असल्याने मुंबईला आले होते . सर्वांना लग्न समारंभ खूपच आवडला.लग्नानंतरची फटाक्याची आतिषबाजीने तर सगळ्यांची मने आनंदून गेली होती .मुलाकडील मोजकीच मंडळी लग्नाला हजर होती. ह्या लग्नामुळे वर,वधुकडील सर्व मंडळी आनंदून गेली होती .मकरंद आणि आनंद तसेच प्रीतिच्या मित्र, मैत्रिणींनी मिळून सर्व बाबतीत मनापासून सहकार्य केले . ह्या लग्न समारंभाला माझ्या विक्रीकर कार्यालयातील बरीच अधिकारी ,कर्मचारी मंडळी आवर्जून आली होती .

माझ्यापुढे सर्वात मोठा प्रश्न होता ,प्रमोदच्या नोकरीचा ! त्याचे नशीबच फार खडतर होते .प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे ! अशाप्रकारचा एक वाक्प्रचार आहे .त्यापेक्षाही खडतर प्रसंगातून प्रमोदला जावे लागत होते.गेल्या ५-६ वर्षापासून त्याच्या कोणत्याही नोकरीसाठी केलेले प्रयत्न करूनही ,त्याला नोकरी मिळत नव्हती . प्रमोदला उन्हाळ्याच्या सुटीत ति .गं. भा.आईसाहेबासोबत पाठविले अकोल्याला पाठविले होते . माझे मित्र श्री.ज्योतीस्वरूप जलोटा साो ह्यांच्या मदतीने Novel कंपनीत प्रमोद निवडला गेला. तेथे त्याच्याकडे स्टोअर्स डिपार्टमेंट आणि कॉम्युटर स्पेअर्स डिलिव्हरी संपूर्ण भारतभर पाठविणेचे काम हेाते . त्याने त्याचे सगळे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवले होते .त्यामुळे त्याला कोणत्याही प्रॉडक्टची , कोणत्याही दिवशीची माहिती त्याच्या वरिष्ठांना देणे शक्य होत होते . त्याच्या विविध क्षेत्रातील वरिष्ठ स्तरावरील व्यक्तिंशी ओळखी झाल्या होत्या.आता माझ्या मनात त्याच्या लग्नाचे विचार सुरू झाले .मुलीं पाहण्यासाठी अर्थातच विदर्भातच जाणे जरूरी होते .प्रमोदच्या वयोमानाप्रमाणे मुली शेाधून बघायच्या होत्या . चि.मुरलीधरलाही तिकडे बोलाविले होते . सरते शेवटी पातूरच्या श्री.रमेश पागनीसची तृतिय मुलगी
चि.कु .राणू पदवी परिक्षा देणारी मुलगी आम्हा सगळ्यांना ,श्री. ऊध्दवराव ऊंबरकर (चि .सौ .ज्येातिताईचे सासरे ), श्री. अनिल व सौ .सुषमा (माई) रत्नपारखींना, महत्वाचे म्हणजे चि .प्रमोदला साजेशी मुलगी होती . सौ ,निर्मलाच्याच पिंजरकर घराण्यातील मुलगी होती .तिचे वडील माझ्यासोबत नॉर्मल स्कूलमध्ये ( शिक्षकाच्या ट्रेनिंगला )सोबत होते .

stronguपरदेशी /पृथ्विवरील स्वर/ स्वित्झर्लंड वारी :-/u/strong
आनंद व मकरंद ही दोन्ही मुले नोकरीला होती .चि.आनंदला ईन्फोसीस ह्या आय .टी . कंपनीने परदेशात प्रथम स्वित्झरलंडला नंतर अमेरिकेला सॉफ्टवेअरचे काम करण्यासाठी पाठविले होते . त्यावेळी मी ,सौ .निर्मला,व प्रीति तिघेही१५ दिवसांचा व्हिसा काढून स्वित्झरलंडला २००४ मध्ये दिवाळीच्या सुटीत जाऊन आलो . स्वित्झरलंडला पृथ्वीवरचा स्वर्ग का म्हणतात ते तेथे गेल्यावर कळले . आमच्या व्हिसावर No Extention and No Job will be Granted असा स्पष्ट ऊल्लेख करण्याण्यात आला होता . ई स .२०००मध्ये आनंदला दक्षिण भारतात बंगलोर/मंगलोरला जॉबवर तर म्हैसूरला ट्रेनिंगला पाठविले होते . मंगलोरला त्याची ओळख केरळमधील कोचीनजवळच्या येडवूरच्या नवीनच ट्रेनिंगला रूजूं झालेल्या पूर्णिमा रामचंदशी झाली ओळखीचे रूपांतर हळूहळू प्रेमात कधी झाले ते त्यांनाही कळले नाही . दोघांच्याही घरी ह्या सगळयाची कल्पना होती .दोघांनीही आपापल्याघरून परवानगी मिळाल्यावरच विवाहबद्ध होण्याचे ठरविले. त्यासाठी डिसेंबर २००७ पर्यंतची कालमर्यादा त्यांनी ठरविली होती . पूर्णिमाचे वडील श्री. रामचंदजी केरळमध्ये शासकीय बांधकाम खात्यात ज्युनियर ईंजिनियर पदावर तर आई सौ.पुन्नमा केरळच्या शिक्षक महाविद्यालयात शिक्षणविभाग प्रमुख होती .केरळमधील लोक रूढी व परंपरा प्रिय आहेत . ह्याची आम्हा सगळ्यांना कल्पना होती.
आनंदचे लग्न :-
ई स.२००६ मध्ये आनंद व पूर्णिमाने पक्के ठरविल्याप्रमाणे प्रथम मी व सौ .निर्मला विमानाने कोचिनला पोहोचलो. चि. आनंद आमच्या अगोदरच कोचिन विमानतळावर:-) पोहोचला होता .आम्हाला घेण्यासाठी पूर्णिमाचे वडील विमानतळावर कार घेऊन आले होते . आम्ही कोचिनहून पेरांबऊर मार्गे एडाऊरला पोहेाचलो . त्यांच्या कुटुंबियांचा जवळ जवळ ८० लोकांचा पसारा होता . सगळे तेथे आनंदला व आम्हाला पाहण्यालाठी/भेटण्यासाठी पूर्णिमाच्या फार्म हाऊसमध्ये घरी एकत्र जमले होते . सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला . पूर्णिमाच्या आई,वडिलांना ,प्रवीण(भावाला ) तसेच दोन मामे भावांना मुबईला ( विक्रोळीला ) आमच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले .त्याप्रमाणे ते सर्वजण आले. 🙂 त्यांनी केरळमधील प्रथेप्रमाणे डावरी /हुंडा देण्याची गोष्ट काढली . परंतु आनंदने डावरी
परंतु आनंदने डावरी वा हुंड्याला साफ नकार दिला .दोन्ही बाजूंनी लग्नास कांही अटींवर होकार मिळाला , अट क्रमांक (१)लग्न केरळमध्ये येडवूरलाच होईल (२) लग्न महाराष्ट्रियन पद्धतिनेच प्रथम होईल नंतर केरळीय पद्धतिनेही होईल . (३ ) लग्नासाठी येणार्या निवडक मंडळींचा जाणे येणेचा खर्चाचा भार नवरीकडूनच करू देण्याची विनंती नाकारायची नाही .
त्याप्रमाणे निवडक मंडळींनाच आमंत्रणे पाठविली .६ ते ७ मंडळी (नवरदेवासह) विमानाने व बाकीची १५ -२० मंडळी रेल्वेगाडीने लग्नाला केरळला पोहोचली . दोन दिवसांचा लग्नाचा कार्यक्रम आटोपून परत मुंबईलाी परत आलो . येडवूरच्या लग्नाचा यथासांग कार्यक्रम साखरपुडा घरी केला तसेच महाराष्ट्रियन पध्दतिचे लग्नाचा कार्यक्रम तेथे केबलवरून दाखविणेत आला. तेथील लग्नाला १५०० लोक , राजकिय पुढारी, कुतुहूल म्हणून लग्नाला हजर होते .लग्नात वर,वधुनी एकमेकांना घालावयाचे फुलांचे हार तर जवळ जवळ ५-५ किलो वजनाचे होते . तेथे वर-वधुचे मोठमोठे पोस्टर्स तयार करून येडवूरला बंगल्याबाहेर व लग्नाच्या-कार्यालयात व कार्यालयाबाहेर लावलेले होते. व्हिडीओ शुटिंग तर होतेच .तिकडील प्रसिध्द गायक गायिकांची फर्माईशप्रमाणे गाणी मल्याळम तसेच हिंदी गाण्याचा बहारदार कार्यक्रम सुध्दा झाला .
केरळमधील ह्या लग्नात वेगवेगळी फुले भरपूर , ओल्या सुपार्या ….ई .ची रेलचेल होती .दक्षिण भारतात ,केरळमध्ये भात व रस्स्म ह्याचा भोजनांत जास्त ऊपयोग होतो.
परंतु त्यांनी केरळीय तसलेच महाराष्ट्रीय , दोनही पध्दतिची भोजनाची पंगतीची व्यवस्था केली होती . कुठेही कोणतीही न्यूनता वा उणीव भासली नाही . जवळच्याच हॉटेलमध्ये आमची सर्वांची राहण्याची सोय केलेली होती. परतीच्या प्रवास वर,वधु , शशीमावशी,सौ.निर्मला ,ति.गं .भा.आजी , मकरंद , प्रीती ,सुनील व मी विमानाने आलो .बाकी सगळी मंडळी रेल्वेने /ट्रेनने आली .मुंबई येथे विक्रोळीला घरी प्रमोदची पत्नी चि .सौ. प्रिया होती ,तसेच सौ .निर्मलाच्या हल्ली जालन्याला असलेल्या बालमैत्रीणीचा मुलगा सचिन आणि सुनबाई चि .सौ .आरती, ह्यांनी मिळून स्वागताची जय्यत तयारी करून ठेवली होती . नवरीचा गृहप्रवेश ऊत्कृष्ट झाला. त्यानंतर लग्नाच्या रिसेप्शनाचा कार्यक्रम २००-३०० मंडळींच्या उपस्थितित विक्रोळी (पूर्व), गोदरेज हॉलमध्ये थाटात साजरा झाला. लग्नानंतर रिसेप्शनच्या कार्यक्रमाला पूर्णिमाकडील काही नातेवाईक मंडळी आवर्जून उपस्थित राहण्यासाठी आली होती . त्यांनी येतांना लग्नाचे छानसे दोन अल्बम बनऊन आणले होते . हे अल्बम आगळे वेगळे होते .सर्वांना अल्बम खूपच आवडले . मधुचंद्रासाठी आनंद- पूर्णिमा केरळला जाऊन आले . नंतर ते दोघेही प्रथम मंगलोरला नंतर बंगलोरला घर घेऊन राहिले ..थोड्याच काळानंतर दोघांनाही ईंन्फोसिस कंपनीने अमेरिकेत H -l व्हिसा वर तेथील प्रोजेक्टसाठी पाठविले . अमेरिकेत रिचमंड व्हर्जिनिया राज्यात आनंद व पूर्णिमा कँपिटल वन बँकेच्या प्रोजेक्टवर काम करित होते .
पहिली अमेरिका वारी :- रिचमंड व्हर्जिनिआ व्हाया अटलांटा !
५ एप्रिल २००९ मध्ये आनंद – पूर्णिमाच्या संसार वेलीवर ५ एप्रिलला अद्वैतनांवाचे झकास फूल आले . मी व निर्मलाकरिता आनंदने Invitation Letter आणि मुंबई -अटलांटा -रिचमंडचे विमानाचे जाणे येणेचे तिकीटही पाठविले . आम्ही दोघांनीही अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज केला . आम्ही दोघेही अमेरिकेतन राहता परत भारतात येणारच ह्याचीौ खात्री झाल्याने आमहा दोघांना व्हिसा तोही १० वर्षे मुदतीचामंजूर करण्यात आला .

uअमेरीकेत – रीचमंड, व्हर्जिनीया /u
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आम्हा दोघांना निरोप देण्यालाठी घरातील सगळेजण आले होते . मुंबई – अटलांटा – रिचमंड हा विमानप्रवास २२ तासांचा तर डोंबीवली ते विमानतळ व रिचमंड ते आनंदचे घर ३+२ तासांचा कारमधून प्रवास ,असा एकूण २७ तासांचा प्रवास होता .सर्वांचा निरोप घेऊन प्रथम काऊंटरवर तिकिट तपासून विमानात बसण्याची जागा निश्चित करून घेतली. दोन मोठ्या बँगा Check in करून घेतल्या . आता त्या आम्हाला अटलांटा विमानतळावर मिळणार होत्या . आमच्याजवळ आता फक्त केबिन बँगाच राहिल्या होत्या .Security Check साठी रांगेतऊभे राहीलो . रत्री -पुरूषांची रांग वेग – वेगळी होती . तपासणीसाठी दिलेल्या ट्रे मध्ये बुट ,बेल्ट, पैशाचे पाकीट ,मोबाईलसह ईतर ईलेक्ट्रॉनिक वस्तु ठेवलिया आक्षेपार्ह वस्तु जसे लायटर ,दाढीचे रेझर, नेलकटर, चाकूसह कोणतेही शस्त्र, द्रवपदार्थ पाणी/ औषधी …ई . केबिनबँगमध्ये नेण्यास मनाई असल्याने त्या वस्तु जप्त केल्या जाताात . परंतु अशा वस्तु चेक -इन बँग मध्ये नेता येतात . सेक्युरेटीचेक झाल्यावर विमानात प्रवेश करण्यासाठी तिकिटावर दर्शविलेल्या गेटजवळ रांगेत बसलो .विमान सुटण्याच्या वेळेच्या अगोदर १० -१५ मिनिटे अगोदर प्थम बिझिनेस क्लासचे प्रवासी ,कडेवर लहान मुल असलेल्या स्त्रिया , अपंग प्रवासी , नंतर ईतर प्रवाशी अशागटागटाने विमानाला जोडलेल्या मार्मिकेतून विमानात प्रवेश करणयास सज्ज झालो . विमानाच्या प्रवेश द्वारातच हवाईसुंदरी तसेच विमानाचा कर्मचारी प्रवाशांचे स्वागत करित होते . आमही दोघेही आमच्या जागेवर स्थानापन्न झालो .
आमच्या बसण्याच्या जागेसमोर असलेल्या लहान टी .व्ही . च्या पडद्यावर आमच्या विमानाची संपूर्ण माहिती मुंबई-अटलांटा प्रवासाचे अंतर , लागणारा वेळ , विमानाची सद्यस्थिती उंची ,वेग , जगाच्या कोणत्या भूभागावरून आकाशातून ढगाच्या वरून जात आहे , बाहेरचे /आतले तपमान किती आहे , मुंबई तसेच अटलांटा येथे हवामान कसे आहे ….ई . बाबींची माहिती दिसत होती. तसेच करमणुकीचे कोणकोणते चित्रपट हिंदी/ईंग्रजी भाषेतून उपलब्ध आहेत हेहू दाखवत होता . विमान सुरू झाले नी हवाई सुंदरींनी सगळ्या प्रवाशांना आपापले सीट -बेल्ट बांधायला सांगीतले . विमान धांवपट्टीवरून उड्डाणासाठी वेगाने जाऊ लागले . एक झटका लागला , पोटात गोळा आला नी विमानाने आकाशात झेप घेतली . मुंबईतील उंचच उंच ईमारती लाईट्स दिसेनासे झाले . विमान पाहता पाहता ढगाच्याही वर गेले . विमानाचा वेग ठरविल्याप्रमाणे स्थिर झाल्यावर बांधलेले बेल्ट सोडले व विमानात फिरता येऊ लागले .
विमानातील कर्मचारी तसेच हवाई सुंदरी प्रवाशांना पाणी , फळांचे डबाबंद रस , चहा , कॉफी , व्हेज /नॉन व्हेज नाश्ता , जेवण , आवडीप्रमाणे ड्रिंकस् हसतमुखाने पुरविण्याची सेवा करीत होत्या .आमच्या बसण्याच्या जागेसमोरच्या छोट्या टि. व्ही.पडद्यावर आम्ही आवडणारा हिंदी चित्रपट पहायला सुरवात केली . हळू हळू निद्रादेवीच्या अधीन होऊ लागताच टि .व्ही . बंद केला .विमानात घरच्यासारखी झोप आली नाही . विमानात मध्यभागी तसेच मागील भागात लँव्हाटरीची सोय असते . आम्ही दोघांनी क्रमा क्रमाने त्याचा उपयोग केला . सकाळी पुन: चहा, नाश्ता देण्यात आला . विमानातील टि. व्ही. विमानाचा मार्ग नकाशा मधूनमधून दाखवित होता . विमानाने मुंबईपासून किती अंतरावर आलेले आहे ? त्याचप्रमाणे अटलांटा किती अंतरावर आहे ? किती वेळात अटलांटा विमानतळ येणार आहे ? आमचे विमानाला अटलांटा विमान तळावर दिड तास उशीरा पोहोचले . आमच्या चेक- ईन च्या बँगा लगेज बेल्टवरून यायला अर्धा तास लागला . नंतर बँगांचे नियमाप्रमाणे काटेकोरपणे कस्टम चेकींग अगडबंब अफ्रिकन कर्मतारी वर्गाने रांगेत उभेराहून क्रमाक्रमाने झाले .त्यात पुन: द्रव पदार्थ / शस्त्र /थोडक्यात आक्षेपार्ह वस्तू , फळफळावळे ….ईत्यादि ची कसून तपासणी करीत होता .आमच्या अगेादरच्या प्रवाशाच्या बँगा तपासायला जवळजवळ एक तास लागला होता . आमचा नंबरआला ,आमच्या बँगातून सगळे सामान बाहेर काढले . त्यात आक्षेपार्ह असे फक्त एकच सफरचंद सापडले .तेही देवाचा प्रसाद म्हणून आनंदसाठी आणला होता . त्यांनी आम्हाला पुढे जाण्यास सांगीतले . परंतु आता चौकशी केल्यावर रिचमंडचे विमान विमान केव्हाच निघून गेले होते .पुढचे विमान अर्ध्या तासाने होते .रिचमंडला जाणारे विमान २२ सीटर होते. २ तासांच्या प्रवासांत नाश्ता ,पाणी ,चहा वा कॉफी सगळ्या गोष्टी विकत मिळत होत्या . रिचमंडला पोहोचल्यावर आमच्या बँगा
बेल्टवरून घेऊन विमानतळाबाहेर आलो. आनंद आम्हा दोघांची बाहेर दोन तासांपासून वाट पहात होता . त्याने त्याच्या फोनवर आमचे रिचमंडचे विमान चुकल्याचेपाहिले होते . कार पार्किंगमध्येजाऊन आम्ही बँगा कारच्या डिकीत ठेवल्या .रिचमंडला अतिशय थंडी होती . पण कारमध्ये थंडी वाजतन नव्हती ,पण हायरे दुर्दैवा ! आनंदची कार रूसुन बसली होती .ईंजिन सुरूच होत नव्हते.आनंदने ईन्शुरन्स कंपनीलासर्व कळविले . सरते शेवटी टँक्सी भाड्याने घेऊन घरी जायला निघालो .
अमेरिका प्रशासनाच्या नियमाप्रमाणे कुटुंबतील प्रत्येक जोडीला घरात वेगळी झोपण्यासाठी वेगवेगळी रूमचीसोय असणे गरजेचे होते. लहान मुलासाठी वेगळी व्यवस्थाअसणे आवश्यकहोते . त्याबरहुकूम आनंद -पूर्णिमाने जुने one room kitchan सोडून three room kitchan चे घर घेतले होते.अद्वैतच्या जन्माच्या वेळी पूर्णिमाचे आईवडील, अम्मा/अच्चन प्रथम रिचमंडला आले होते . अमेरिकेत मुलगा की मुलगी जन्मा अगोदरच आईवडीलांची ईच्छा असल्यास दवाखान्यात डॉक्टरांना गर्भजलपरिक्षण करून सांगण्याची परवानगी असते . त्यामुळे आईच्या गर्भारपणात तसे लाड /कोडकौतुक तिच्या कुटुंबियांकडून आनंदाने केले जाते .
आनंद आम्हा दोघांना घेऊन घरी पोहोचला . घरी पूर्णिमा , बाळराजे ,अम्मा , अच्चन सगहळे वाट पहात होते . आम्ही घरी पोहोचताच चहा ,नाश्ता घेऊन सचैल स्नान केले . आनंदने आम्हा दोघांना विमान प्रवासाचा शीण , Jet-lag जावा म्हणून पटकन झोपायला सांगीतले.२-३ तास झोप झाल्यावर एकदम प्रसन्न वाटायला लागले , खेळीमेळीत जेवणे झाली .घरात स्वयंपूर्ण किचन होते. भाजीपाल्याचा कचरा जाण्यासाठी किचनच्या बेसिन मधील बटन दाबले की सगळा काचरा खालच्या ड्रेनेजमध्ये जायची सोय होती . कपडे धुण्यासाठी वॉशींग मशीन , कपडे वाळविण्यासाठी Drier Machine होती . घराबाहेर कोठेही गटार -नाल्या , धुळ ……ई .चा पत्ताही नव्हता . ह्या कॉम्ल्पेक्समध्ये खूप भारतीय कुटंबिय आहेत असे समजले . घराजवळच एक मोठा छानसा तलाव होता , सभोवती उंच झाडीही होती . तलावाभोवती छानसा रस्ता व त्याभोवती लाकडाची २-३ मजली घरे होती . त्यांत अमेरिकेन तसेच भारतीय कुटुंबे लहान मोठ्या मुलांबाळासह , कुत्र्यांसह राहत होती .तलावाभोवतीच्या झाडीत खारूताई ,३-४ ससोबा, चिमण्या ,कावळ्यासारखे पक्षीही होते . कॉम्प्लेक्समध्ये Gymnasium /swimming pool ही होते .
आता बाळराजेंचे बारसे कधी करायचे ? सगळ्यांनी आपापले विचार मांडले , घराचे डेकोरेशन अच्चन आणि मी करायचे ठरविले .आनंदने व पूर्णिमाने बारशाला आमंत्रणे कोणाकोणाला द्यायची ह्याची यादी तयार केली . त्यात मित्रमैत्रीणी , ऑफीसमधील सहकारी , बाहेरच्या मित्रांपैकी वॉशींगटनचा सुंदरम्,वेल्हाळ , ह्यांचीही नांवे अंतर्भूत केली होती . सगळ्यात महत्वाचे बारशाची तारीख तीही सर्वानुमते ठरविली , बारशाच्यादिवशीचा जेवणाचा मेनुही ठरविला. आता सर्वात मोठ्ठा प्रश्न पाळणा व त्याची सजावट ही जबाबदारी सौ. निर्मला आणि सौ .पुन्नमा /अम्मा तसेच कॉलनीतल्या भारतीय कुटुंबातील महिला वर्गाने स्वत:वर घेतली . मी आनंदसोबत होलसेल मॉलमध्ये जाऊन पाळणा आणि ईतर सामान घेऊन आलो . बारशाच्या दिवशी सर्व निमंत्रितमंडळी आली .विशाल वेल्हाळ ६ तासांचा कार प्रवास करून वॉशिंगटनला आला .तेथून सुंदरमला सोबत घेऊन रिचमंडला आला .कॉम्पलेक्समधील सगळी भारतीय कुटुंबेआली .आनंद व पूर्णिमाच्या ऑफीसमधील मित्र-मैत्रिणीही आल्या . सगळ्यांनी मिळून घराची सजावट होताच , बाळराजेंच्या पाळण्याचीही अतिशय सुंदर सजावट केली . इंटरनेटवर बारशाची /पाळण्याची गाणी शोधून लावली , बारशाचा हा कार्यक्रम मुख्यत: महिलांचा कार्यक्रम .सगळ्यांना पूर्णिमाच्या सातव्या महिन्यातल्या Baby-Shower ची आठवण आली . बाळराजेंना पाळण्यात घालण्याच्या कार्यक्रमासाठी कमीतकमी पांच महिला सुवासिनींची आवश्यकता असते .तसेच बाळाते नांव ठेवायला , कानांत नांव सांगायसाठी बाळराजेंची आत्या ,बारशाच्या कार्यक्रमला ,सौ.प्रिती सुनील भुर्के असणे जरूरिचे होते .पण ती तर भारतात मुंबईला ? ह्यांतून सगळ्या I T अन्सनी अतिशय झटपट व सुंदर मार्ग काढला .बारशाच्या सगळा कार्यक्रम स्काईपवर प्रक्षेपित करायला सुरवात केली .कुणी ” गोविंद ” घ्या ! कुणी “गोपाळ “घ्या ! झाल्यावर , बाळराजेंना पाळण्यात ठेवले . सौ . प्रिती आत्याने स्काईपवरून बाळराजेंच्या कानांत तीन वेळा नांव सांगीतले ,’अद्वैत ‘! ‘अद्वैत ‘ ! ,” अद्वैत”! सौ .निर्मला आजीने नांव ठेवले , ” हिंदुराव ” .पण सर्वांना नांव आवडले ”अद्वैत “. रिचमंडला कॉम्लेक्स मधील अनेक भारतीय कुटुंबियांना बारशाला आवर्जून बोलाविले होते .
सर्वांनी ‘ अद्वैतला ‘ अभिष्ट चिंतले .आनंदने जेवायला तेथून जवळच असलेल्या हॉटेलमधून पार्सल बोलाविले, त्यात दोन स्विटस व जेवणानंतर आपापल्या आवडीचे आईस्क्रीमचाही समावेश होता . बारशाचा कार्यक्रमानंतर सुंदरम आणि विशाल वेल्हाळ कारने आपापल्या घरी गेले . विशालने प्रथम सुंदरमला वॉशिंगटनला सोडले थोडीशी विश्रांती घेऊन विशालही पुढे सहा तासांचा प्रवास करून घरी पोहोचला .त्याच्या जवळ GPS असल्याने पुढे ट्रँफिक जाम असल्यास कमी गर्दीचा पर्यायी रस्ताही GPS शोधून देत होता .

पूर्णिमाच्या अम्मा , अच्चन यांची नी निर्मलाची सगळी धांवपळ छोट्या अद्वैतसाठी सुरू असायची .त्याने दिवसा वा रात्री केव्हांही थोडेसा जरी रडायचा आवाज आला तरी तिघेही अस्वस्थ होऊन त्याचेकजे धांव घेत .कधीकधी तर हे सगळे त्याच्या खोलीत पाळण्याजवळ पोहोचेपर्यंत बाळराजे गाढ झोपलेले असायचे . एका आठवड्यानंतर मी , आनंद व पौर्णिमा ह्यांनी वेळापत्रक ठरविले . त्यामुळे सर्वांना विश्रांती , झोप व्यवस्थित मिळू लागली . साधारणत: २ महिन्यानंतर नायगाराचा प्रसिद्ध धबधबा पाहायला जायचे ठरले .अमेरिकेतील नियमांप्रमाणे प्रवासांत पाच वर्षेपर्संत कारसीट अत्यावश्यक होती आनंदने त्याप्रमाणे मोठी कार रेन्टवर आणली .आम्ही कारमध्ये मोठ्ठे थंड पाणी-जार ,कोल्ड ड्रिंक क्रेट आवश्यक तेव्हढेच कपडे ,नाश्ता ,चहा ,दूघ थर्मास ,नँपकीन्स व आवश्यक ते टावेल्स, पेपर नँपकीन्स ,लिक्विड सोप…….ई . घेतले . पूर्णिमाला कार चालविण्याची परवानगी नव्हती. अमेरिकेत FPS म्हणजे मोजमापाची फुट पौंड (भारतातील १९५७ पूर्वीची जुनी पद्धत ) अंतर मैलात तर पेट्रोल /डिझेल लिटरमध्ये मोजतात .अमेरिकेत हायवेवर कार कमीत कमी ६५ मैल प्रतितास म्हणजे साधारणपणे १०० किलोमीटर प्रतितास वेगाने चालवतात .

आनंद एकटाच कार चालविणार होता .पूर्णिमा पुढे, आनंदच्या बाजूला बसली .मी आणि अच्चन मधल्या सीटवर तर अम्मा आणि निर्मला मागे बसल्या ,दोघींच्या मध्ये कारसीटमध्ये ईवलासा ,छोट्टासा अद्वैत होता .प्रवास सुरू झाला. अमेरिकेतील सगळेच रस्ते स्वच्छ असतात .हायवे वर कुठेही थांबता येत नाही . साधारणत: ५० – ७५ मैलावर रेस्ट एरीया असते . तेथे टॉयलेटची सोय होती , लहान मुलांना वेगळा टेबल असतो .त्यावर लहान मुलांना ठेऊन स्वच्छता करता येते . सर्वांना हात , पाय , तोंड धुतल्यावर फार बरे वाटले . प्रत्येकाने चहा , कॉफी ,कोल्ड ड्रिंक ,कुकीज ,बिस्किटे जे आवडले ते घेतले .पुन्हा सर्वजण कारमध्ये आपापल्या सीटवर बसले .पुढचा प्रवास सुरू झाला . एकुण ६ तासाचा प्रवास होता . कार चालू असतांना अद्वैत /आदी केव्हांही रडायचा ,तेव्हां अम्मा व निर्मला दोघीही गडबडून बाळाजवळ जायच्या ,त्याला गप्प करायचा सतत प्रयत्न करायच्या . पण लहान बाळच ते त्याला डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे पहिले सहा महिने वेळापत्रकाप्रमाणे आईचेच दुधच हवे असायचे . त्यामुळे रेस्ट एरियात त्याचे पोट भरले की तो मस्तपैकी झोपायचा . रात्री ९ वाजता आनंदने अगोदरच बुकींग केलेल्या हॉटेलमध्ये पोहोचलो . आनंदला किमान सहा तास विश्रांतीची /झोपेची अतिशय आवश्यकता होती . आम्ही जेवणं झाल्यावर निद्रादेवीच्या अधीन झालो ते कळलेच नाही . सकाळी लवकर उठून तयारी केली , पोटभर चहा – नाश्ता केल्यावर पुन्हा पुढचा नायगाराचा ४ तासांचा प्रवास सुरू झाला . नायगारा धबधबा अमेरिकेतच नव्हे तर जगात प्रसिध्द आहे .आनंद व पूर्णिमा बाळाला घेऊन लोबत येणे शक्य नसल्याने बाहेरच थांबणार होते . तिकीटे काढून आम्ही चौघेही रांगेत उभे राहिलो . पुढे जाता जाता आम्ही कोणीतरी मराठीत बोलतांना ऐकले . अमेरिकेत भारतीय व्यक्ति , त्यातही महाराष्ट्रातील एकदम ६-७ जण भेटल्यावर खूप आनंद झाला . पुढे अधिक चौकशी केल्यावर ही मंडळी तर अकोल्याचीच निघाली , आपुलकी वाढली .मुलगा त्याच्या आई-वडिलांना तसेच सासु-सासर्यांना घेऊन नायगारा धबधबा दाखवायला घेऊन आला होता .आम्ही सर्व ९ जणांचा एक गट तयार केला .लिफ्टने खाली जाऊन ९ निळ्या रंगाचे रेनकोट घेऊन अंगावर चढविले . धबधब्याजवळ नेणार्या बोटीत आमचा नंबर आल्यावर चढलो . नायगारा धबधबा अमेरिका व कँनडाच्या सिमेवर आहे . नायगारा नदीच्या उंचच उंच पात्रातून पडणार्या हजारे लिटर पाण्याच्या जसजसे जवळ जात होतो ,तसतसे त्या पाण्याचे तुषार/थेंब वाढत चालले होते . आमची बोट नायगारा धबधब्याच्या मुख्य धारेच्या अधिकाधिक जवळ गेली ,पाण्याच्या थेंबांनी नव्हे धारांनी बोटीतील आम्ही सगळेजण रेनकोट असुनही नखशिकांत भिजलो .थोड्याच वेळात आमची बोट हळूहळू किनार्याकडे गेली . अमेरिका व कँनडाला जोडणारा उंच पूल व नायगारा धबधब्याचे रोमांचकारी दर्शन डोळ्यात साठवितच आम्ही किनार्यावर उतरलो . लिफ्टने वर आलो. आनंद ,पूर्णिमा व बाळराजे आमची वाटच पहात होते . आता आमच्या पोटांत कावळे ओरडत असल्याची जाणीव प्रकर्शाने झाली . आनंद आम्हा सर्वांना घेऊन जवळच्याच शाकाहारी हॉटेलात घेऊन गेला . तेथील पदार्थावरक यथेच्छ ताव मारल्यावर आईस्क्रीम खाल्ले , पोटात थंड थंड गेल्यावर पान खाण्याची तीव्र इच्छा झाली .पण हाय रे , दैवा अमेरिकेत कुठेही पानपट्टी नसल्याचे आनंदने सांगीतले . नंतर आम्ही नायगारा दर्शन ट्राम मध्ये तिकिट काढून बसलो ,नायगारा परिसर बघितला . तेथील लहान गवतालाही फुले आलेली दिसली ,नी मला ” गवत फुला रे ! गवत फुला ” ही कविता आठवली . नायगाराला येता जाता अंदाजे ५-६ मैलाचा कारचा प्रवास पाण्याच्या खालून बोगद्यातून करावा लागतो . नायगाराहून आठवणी दाखल नावीन्यपूर्ण वस्तू खरेदी केल्या . नायगाराचे पात्र समुद्रासारखे विशालआहे . त्यात मोठमोठ्या बोटी /जहाजेही दिसली .
परतीच्या प्रवासात मजल दर मजल करीत रिचमंडला रात्री उशीरा घरी पोहोचलो.सगळेजण प्रवासामुळे दमले होते .निद्रादेवीचा अंम्मल लगेचच सुरू झाला नी आपण कधी झोपेच्या अधीन झालो , हे कोणालाच कळले नाही.
रिचमंडला घराच्या जवळच छानसा तलाव होता . त्याभोवती फिरायला रस्ता तयार केलेला होता .तेथील कॉम्प्लेक्समधील लहान मुले सायकलवरून सकाळी आणि संध्याकाळी फिरायला येत असत .त्यांच्या सोबत त्यांचे आई-वडील, आजोबा-आजी धांवत असत .रस्त्यात भेटणारे स्थानिक ,परदेशी कोणीही असो ,प्रत्येकाला हात उंच करून हाय / हँलो /गुड मॉर्निंग /गुड ईव्हिनिंग म्हणत अभिवादन करीत असत .

पुढच्या विकएंडला वॉशींगटनला येण्याचे आग्रहाचे आमंत्रण आनंदच्या मित्राने सुंदरमने दिले होते . त्याप्रमाणे आनंदने सुंदरमला फोन करून शनिवारी येत असल्याचे कळविले . शनिवारी सकाळीच लवकर ६ वाजता सर्वजण निघालो . सुंदरमने वॉशींगटनला भेटण्याचे ठिकाण कळविले होते . त्याप्रमाणे १० वाजता सुंदरम आमची वाट पहात थांबला होता . भेट झाल्यावर प्रथम सर्वांनी चहा , कॉफी ,थंडपेय ,नाश्ता घेतला . अमेरीकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान ”व्हाईट हाऊस ” जवळच होते . अमेरीकेचे संसद-भवन , अंतरीक्ष भवन ,अब्राहम लिंकन स्मारक ,युध्दाचे स्मारक तसेच आजुबाजूला इतरही पाहण्यासारखी अनेक ठिकाणे होती . अमेरिकेचे बहुमतांनी निवडलेले अध्यक्ष श्री .बराक
ओबामांचे निवासस्थान ,व्हाईट हाऊससमोरच्या मैदानांत एका मोठ्या ग्रुपचा Rose Day चा कार्यक्रम सुरु होता . आम्ही सगळे त्यांच्या खेळात सामील झालो .सर्वजण अत्यांदित झाले . अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा कोणत्यातरी मिटींगसाठी परदेशात गेल्यामुळे त्यांच्या निवासस्थानात नव्हते . त्यामुळे व्हाईट -हाऊस पाहण्याचा योग हुकला . संसद भवन बाहेरूनच पाहिले. नंतर आम्ही अमेरिकेतील अत्यंत प्रसिध्द अंतरिक्ष भवन पहायला गेलो. पहिले चांद्रयान,अंतराळयान , पहिले राईटबंधुंनी बनविलेले विमान ,विविध रॉकेटस ,अंतराळ प्रवासांतील अंतराळवीरांचा दिनक्रम प्रत्यक्ष पाहायची संधी मिळाली . विविध शस्त्रात्रे जे अमेरिकेतील विविध युध्दात वापरात होती , समुद्रांत वापरावयाची निरनिराळी नवी जुनी आयुधे कशी वापरली जात…इत्यादीचे चित्रिकरण दाखविलेले पाहिले. सर्वांनी जवळच्या हॉटेलात जाऊन पोटोबा केला . अब्राहम लिंकन स्मारकाजवळ आम्ही सगळ्यांनी फोटो काढले . तेथील मला आवडला तो तेथील मधोमध वाहत असलेला मोठा कालवा .त्यातील मनोहारी पक्षी ,मासे……इ. युद्धातील वेगवेगळे प्रसंग त्रिमितितील भित्तिचित्रे ते प्रसंग हुबेहुब समोररच घडताहेतसे वाटत होते . संध्याकाळ होत आली होती .आम्ही सुंदरमचा निरोप घेऊन परतीच्या वाटेला लागलो . रात्री ऊशीरा घरी पोहोचलो थोडेसे खाऊन निद्रादेवीच्या कधी अधीन झालो ते आमचे आम्हालाही कळले नाही . अद्वैतशी खेळतांना ,बोबडे बोबडे बोलतांना वेळ कसा जाई ते कळत नव्हते. अच्चन , अम्मा केरळीय पद्धतिचे पदार्थ मधूनमधून बनवितअसत .सौ .निर्मला महाराष्ट्रीयन पदार्थ तयार करत असे . चि. सौ . पूर्णिमा हळूहळू कामावर जायला लागली . तिला केरळीय पदार्थाबरोबर सौ. निर्मलासोबत महाराष्ट्रीयन पदार्थ बनविण्याचीही हौस होती .मधून मधून पूर्णिमा टँबलेटवर इंटरनेटच्या मदतीने, पाहून पाहून रेसिपीप्रमाणे नवनवीन पदार्थ बनवित असे . अच्चन कोशिंबीर बनवितांना कैरी ,कांदा …इ .अगदी बारीक कापत असत . आनंद मधून मधून आम्हाला मॉलमध्ये घेऊन जात असे . तेथे आवश्यक त्या किराणा, भाजीपाला , कपडे , औषधी ,ईलेक्ट्रॉनिक वस्तु ….इ . थोडक्यात Pin to piano (Car/ T . V . सह ) मिळत असत . अमेरिकेत प्रत्येक घरी कार आवश्यक गोष्ट आहे . कारण घरापासून ऑफीस , मॉल ,मंदिर , ओळखीच्या व्यक्ति साधारणपणे कमीचकमी १५ किलोमीटर अंतरावर आहेत . सार्वजनिक वाहन व्यवस्था नगण्यच असल्याने स्वत:चे वाहन अत्यावश्यक ठरते . पायी पायी जाणे अशक्य , सायकलचा प्रवास करता येतो .पण Marketing करता स्वत:चेच वाहन हवे . मकरंदची ( M. I .T. )Verginia University रिचमंडमध्येच आहे . त्यानंतर आम्ही सर्वजण Sea Beach वर जाऊन आलो . रेसिंग करणार्या मोटार-बोटी , समुद्र काठावरच्या वाळूतून भटकणे , धावणे , विविध पदार्थ खाण्याची मजा लुटणे ……इ. गोष्टित आम्हा सर्वांचा दिवस कसा संपला ते कळलेच नाही .
मुंबईला मकरंद ,मुणालिनी सुनबाई , गं.भा.आईसाहेब होत्या . ह्या सगळ्यांची आम्हा दोघांना फार आठवण येत होती .आमचे परतीचे तिकीट रिचमंड-अटलांटा-मुंबई असे होते . रिचमंड विमानतळावर अद्वैत-बाळराजांसह सगळे निरोप द्यायला आले होते . सेक्युरिटी चेक झाले ,सगळे सामान चेक-ईन केले असल्याने आम्हाला त्याचा ताबा मुंबई विमान तळावरच मिळणार होते .विमानात प्रवेश करून आमच्या जागेवर बसलो. रिचमंडहून अटलांटाला पोहोचण्यास दोन तास लागले .
अटलांटा विमानतळ खूपच मोठे होते .दिवसभरात सुमारे २०० विमानेयेथून ऊड्डाण करतात . ईतर विमानाप्रमाणे , आमच्याही सामानाच्या बँगा रिचमंडच्या विमानांतून मुंबईच्या विमानात हलविण्याचे काम सुरू होते . अचानक आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले . मुसळधार पाऊस ,वीजांचा कडकडाट ,सोसाट्याचा वादळ वारा ह्यामुळे बाहेरचे सगळे काम थांबविणे भाग पडले . सगळ्याच विमानात न हलविलेल्या सामानाच्या बँगा मुसळधार पाऊस मनसोक्त भिजवित होता . सुमारे दोन तास चाललेले हे तांडव एकदाचे थांबले . सामानाच्या बँगा जशा आहेत तशा विमानात चढविण्यात आल्या .आमच्या विमानाचा ऊड्डाण करणास तयारच्या रांगेत ४८ वा क्रमांक होता . विमानात बसल्यावर चहा , नाश्ता , पेयपान …इ . झाल्यावर सगळ्यांच्या डोळ्यावर झोपेची जबरदस्त झापड आली होती . सगळेजण कधी निद्रादेवीच्या अधीन झाले ते समजलेच नाही . अटलांटा – मुंबई सलग प्रवास २० तासांचा होता . सकाळी सकाळी २ वाजता मुंबई विमानतळीवर ऊतरलो . सामान बेल्टवरून घेऊन , कस्टम चेक , ईमिग्रेशन चेक होईतो २ तास गेले . विमानतळाबाहेर मकरंद , सौ. प्रीति /सुनील तसेच श्री . बाबासाहेब भुर्के ( व्याही )गाडी घेऊन आलेले होते .रिजन्सी ईस्टेटमध्ये सकाळी पोहोचेपर्यत सकाळचे पांच वाजले होते .आमचा विमान प्रवासाचा Jet Lag जाण्यासाठी मस्तपैकी कडक चहा घेऊन झोपलो .
दुपारी आमच्या सोबतच्या बँगा उघडल्या ,त्यातील बहुतांश कपडे अटलांटा विमानतळावर मुसळधार पावसांत भिजलेले व त्यानंतर २+२०+८=३० तास बँगेतच होते . काही कपड्यांना रंगही लागला होता . ते कपडे ड्राय क्लिनिंगला दिले. पण उपयोग झाला नाही . सरते शेवटी ते कपडे नाईलाजाने टाकून देणे भाग पडले .
हळूहळू JetLag मधून बाहेर पडलो , नित्यनियमाने रोजची कामे करू लागलो. आता ( मकरंदच्या पत्नीला ) मोठ्या सुनबाईला ,मृणालिनीला सातवा महिना लागला होता .साडी -चोळीचा घरगुती कार्यक्रम आटेपला . अमेरिकेतील अद्वैतच्या आगमनानंतरची ही बाब सर्वाना अतिशय आनंदून गेली . डोंबिवली पूर्वेच्या डॉ . कामतांच्या ममता हॉस्पिटलला सुनबाईच्या तपासणी फेर्या वाढू लागल्या . ५ सप्टेंबर २००९ला ति . गं .भा . आईचा ८३ वा वाढदिवस धड्याक्यात साजरा करण्यात आला .
मृणालिनि-मोठ्या सुनबाईला ६ सप्टेंबरला ममता हॉस्पिटलला भरती केले . ७ सप्टेंबर २००९ ला साधारणत: रात्री १० वाजता कन्यारत्न जन्माला आले . बाळंतपण शस्त्रक्रिया करून करावे लागले . सगळेजण आनंदून गेले , मकरंदने सगळ्यांना बर्फी वाटली . कन्यारत्नाला कावीळीची बाधा झाल्याने कांचेच्या पेटीत ठेवावे लागले . थोड्याच दिवसांनी बाळ – बाळंतीणीला दवाखान्यातून घरी जाण्यासाठी डॉक्टरांनी परवानगी दिली . बाळाचे बारशे सर्वांनुमते ठरविणेत आले . ति.गं .भा .आईसाहेबांच्या मार्गदर्शनाबरहुकूम बारशाची काटेकोरपणे तयारी करणेत आली ,कोठेही कोणतीही न्युनता राहणार नाही ह्याची काळजी घेण्यात आली .बारशाच्या दिवशीच , मकरंदचा वाढदिवस १२ सप्टेंबरचा व प्रमोदच्या पत्नीचा सौ .प्रियाचा १९ सप्टेंबरचा एकत्रच साजरा करण्याचे ठरविले. विलक्षण योगायोग आनंदचा आणि अद्वैतचा दोघांचाही जन्म एप्रिल महिन्यातच झालेला. तद्वतच मकरंद आणि त्याच्या मुलीचा जन्मही सप्टेंबर महिन्यातलाच ,हे लक्षात आल्यावर बारशाच्या समारंभातील लज्जत अधिकच वाढली . मकरंदच्या मुलीचेही नामकरण करतांना ते ‘ म ‘ अक्षरावरूनच ” मृण्मयी ” असे ठेवण्यांत आले . आमच्या रिजन्सी ईस्टेटमधील सौ .निर्मलाचा महिलामंडळातील महिला , सुनबाईच्या मैत्रिणी …..इत्यादिंची बारशाच्या दिवशी आवर्जून उपस्थिति होती .
५ एप्रिल २००९ रोजी रिजन्सी कॉम्प्लेक्समधील गार्डनमध्ये नियमितपणे सकाळ संध्याकाळ भेटणार्या डॉ. कोरान्ने , श्री.शर्माजी उपाख्य दादाजी ,श्री. मेहताजी , श्री . कासट ,श्री .खानविलकर …इ . ज्येष्ठ नागरिकांनी एकत्रित येऊन , रिजन्सी परिवार ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली .कोकण विभागीय ज्येष्ठ नागरिक संघ ( फेस्कॉम ) शी संलग्नता घेतली .त्यांचाच नोंदणी क्रमांक रिजन्सी जेष्ठ नागरिक संघाच्या लेटर हेडवर छापण्याची परवानगीही मिळाली .नवीन सभासद नोंदणी सुरू केली . आम्ही दोघेही त्यावेळी अमेरिकेत आनंदकडे अद्वैतच्या बारशासाठी गेलेलो होतो . भारतांत डोंबिवलीला परत आल्यानंतर सौ .निर्मला व मी सदस्यत्व घेतले .

बान्द्रे विभाग ,बांद्रे कुर्ला कॉम्लेक्स , बांन्द्रे पूर्व ,मुंबई

माझ्या एक वर्षापूर्वीच्या विनंती अर्जाप्रमाणे माझी बदली बान्द्रे  विभाग , कार्यालयात करणेत आली . विक्रीकर आयुक्त ,कार्यालय , माझगांव मुंबई -१०  येथील कार्यासन अधिकारी ,आस्थापना  (५ ) च्या कार्यभारातून मुक्त होऊन , मी विक्रीकर उपायुक्त , प्रशासन , बान्द्रे  विभाग येथे पुढील नियुक्तिसाठी उपस्थित झालो .
मला दिलेला विक्रीकर अधिकारी वर्ग १ ( ) च्या कार्यभारात फक्त १२० धारिण्या होत्या . मला वार्षिक लक्ष्य २४० ‘ पी ‘ ज पूर्ण करण्याचे होते . मी सदर बाब माझ्या सहा . विक्रीकर आयुक्त , प्रशासन (१३ )तसेच विक्रीकर उपायुक्त ,प्रशासन ,बांद्रा विभाग ,बांन्द्रा (पूर्व) मुंबई ५१ ह्यांनाही पत्राने कळविली. त्यांनी माझ्याकडे काही धारिण्या स्थानांतरणाने पाठविल्या . श्री.खंबायत, विक्रीकर उपायुक्तांनी नवीन क्रमांकाच्या धारिण्या माझ्याकडे पाठविणेबाबत आदेश काढले. नवीन धारिण्यांचा ‘ पी ‘ लक्ष्यासाठी तीन वर्षेपर्यंत कोणताही उपयोग होणार नव्हता .उलटपक्षी त्या धारिण्यांची मासीक विवरणपत्रे , त्यांना ‘क’ /एफ/एच फॉर्म देण्यातच माझ्या कर्मचार्याचा जास्त वेळ जाणार होता .पण आता हे सगळे बिनतक्रार सांभाळणे आले .मी माझ्या कार्यभाराचे वेगळे नियंत्रण रजिस्टर तयार केले . त्यात धारिण्यांची संपूर्ण माहिती नाव/ पत्ता धंद्याच्या जागेचा ,घरचा , गोडाऊनचा /बँकांची नावे /फेान , खाते क्रमांकासह /धंद्याचा प्रकार मँन्युफँक्चरर ,आयातदार ,फेरविक्रेता /मालाचे विवरण ( Goods details )/विवरणे नियमित दाखल करतो किंवा कसे /निर्यातदार असेल तर त्याची माहिती /थकबाकीदार आहे काय ? / त्याची निर्धारणा कोणत्या कालावधीची प्रलंबित आहे ?त्याची कारणे /व्यापारी सापडत नसेल तर पोलीस सेल कडे प्रकरण कधी पाठविले ,त्याचा पाठपुरावा करण्यासाठी शेवटचे पत्र पाठविल्याचा दिनांक /व्यापार्याने निर्धारणा आदेशा विरोधात अपिल दाखल केले आहे काय ?/कोठे स.वि .आ. ,विक्रीकर उपायुक्त , न्यायाधिकरण ,हायकोर्ट , सुप्रिम कोर्ट /शेवटचा पाठपुरावा कधी करण्सात आला /प्रकरणांत अंमलबजावणी विभागाकडे प्रलंबित आहे ? त्याची प्रगति , विषेश टिप्पणीसह /व्यापार्याच्या सल्लागाराचे नांव ,फोन क्रमांक /लेखापरिक्षण, स.वि.आ.,वि.उपा.,तसेच S.T.R.A.,ची .आकडेवारी/.प्रलंबित मुद्दे /परिछ्येद/ प्रलंबित तपासणी अहवाल…ई. चा अंतर्भाव केलेला होता . आमचे सहाय्यक विक्रीकर आयुक्त /विक्रीकर उपायुक्त ,प्रशासन, ह्यांच्या दालनात होणार्या प्रत्येक मिटींगच्यावेळी हे रजिस्टर माझ्याजवळ असले की मी माझ्या विक्रीकर निरिक्षक वा लिपिकाच्या मदतीशिवाय विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊ शकत होतो .
मी सदैव मला दिलेले लक्ष्य पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होतो . कालांतराने माझ्याकडे मधून मधून दुसर्या विक्रीकर अधिकार्याचा अतिरिक्त कार्यभार विक्रीकर उपायुक्तांच्या आदेशाने दिला जात असे .त्याच्या परिणाम स्वरूप माझे निर्धारणा /वसुलीचे लक्ष्य गाठण्यास मदतच होत असे. मी विक्रीकर उपायुक्तांच्या निर्देशाप्रमाणे व्यापार्यांकडे भेटी देण्यासाठी , विक्रीकर थकबाकी वसुलीसाठी , विक्रीकर निरिक्षकांस सोबत घेऊन जात असे .
अतिरिक्त कार्यभारातील थकबाकी वसुलीची कामे , स,वि. आ.( प्रशासन ), विक्रीकर उपायुक्त, (प्रशासन) तसेच महालेखापाल यांच्या प्रलंबित लेखापरिक्षण मुद्दे ,आणि परिच्छेदांना स्पष्टिकरण देणे निर्धारणा आदेश दुरुस्त करणे , रिव्हाईज करणे वा पुनर्निर्धारणा आदेश काढणे ह्याकडेही लक्ष द्यावे लागत होते.
माझ्याकडील माझ्या आणि अतिरिक्त कार्यभारात ईतर धारिण्यांसोबत जवळ जवळ ३० बार तसेच होलसेलर्स/ भिवंडीच्या गोडावून मध्ये साठवणूक करून रिबॉटलींग करून टिचर्स ब्रँड ही प्रिमियम परदेशी बनावटीची व्हिस्कीची विक्री करणारा व्यापारीही होता . परिणाम स्वरूप विक्रीकर उपायुक्त अशा प्रकरणांत माझ्याशी विचार विनिमय करून प्रत्यक्ष भेटीसाठी विक्रीकर अधिकारी /विक्रीकर निरिक्षक ह्यांना सूचना देऊन पाठवीत असत .
S.T.R.A.च्या प्रलंबित परिच्छेदावर संबंधित सहाय्यक विक्रीकर आयुक्त, प्रशासन ,आणि विक्रीकर अधिकारी यांची एकत्रित मिटींग घेऊन विक्रीकर कायद्याखाली , कोणत्या नियमाखाली कलम ५७ ,कलम ३५ ,वा कलम ६२ खाली कार्यवाही करणे योग्य होईल ह्याचा निर्णय घेतला जात असे . प्रकरणात अपील दाखल झाले असल्यास तो परिच्छेद संबंधित अपीलेट अधिकार्याकडे पाठवून अपीलावर निर्णय घेतांना उपरोक्त परिच्छेद विचारांत घेणयांत यावा असे त्यांना पत्राने कळविण्याचे निर्देश विक्रीकर उपायुक्तांनी दिले जात असत . बांद्रा विभागाचे एकंदर वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी विभागातील सर्व विक्रीकर अधिकारी आणि विक्रीकर निरिक्षक ह्यांनी संयुक्त प्रयत्न कसे करावे , ह्याचा आढावा घेऊन योग्य ते निर्देश विक्रीकर उपायुक्त दरवर्षी शेवटच्या तिमाहीत देत असत .
माझ्याकडे विक्रीकर उपायुक्त , प्रशासन ,बांन्द्रा यांच्या आदेशाप्रमाणे एका प्रकरणांत विभागीय चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक झाली . एकूण ३ प्रकरणांत मला शासनातर्फे चौकशी करून अहवाल सादर करावयाचा होता . १)पहिल्या प्रकरणात विनापरवानगी वारंवार रजेवर जाणार्या कर्मचार्याचे होते . २)दुसरे प्रकरणात तो कर्मचारी मुंबईतील हवामान मानवत नाही असे सांगून औरंगाबाद विभागांत दुसर्या खात्यात नोकरी करणारा कर्मचारी होता. ३) तिसर्या प्रकरणांत विक्रीकर विभागात नोकरीला लागतांना चुकीची जन्म तारीख नमूद केल्याचे होते .
वरील प्रकरणांत प्रत्येक कर्मचार्याला त्यांची बाजू मांडण्यासाठी बाहेरील वकील
व्यक्तिची नेमणूक करण्याची मुभा होती .
शासनाने विविध खात्यांसाठी नियुक्त केलेले विभागीय अधिकारी कस्टम हाऊस ईमारतीतील कार्यालयात बसत असल्याने त्यांनी दिलेल्या तारखेस खात्याने नेमलेले चौकशी अधिकारी , संबंधित कर्मचारी ,त्याच्या वकीलांना घेऊन हजर. राहात असत . विभागीय चौकशी अधिकार्यांच्या प्रश्नांना संबंधित कर्मचारी वा त्याचे वकील ,खात्याचे चौकशी अधिकारी लेखी ऊत्तरे देतअसत .त्याची
नोंद विभागीय चौकशी अधिकारी त्यांच्या फाईल मध्ये घेत असत .दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर योग्य त्या दिल्यावर विभागीय चौकशी अधिकारी त्यांचा दोषी/ निर्दोषाचा निर्णय संबंधित खात्याच्या मुख्य अधिकार्याकडे पुढील योग्य त्या निर्णयासाठी पाठऊन देत असत.
माझ्याकडील उपरोक्त तीन कर्मचार्यापैकी पहिल्या दोन प्रकरणांतील कर्मचारी दोषी ठरले . तिसर्या प्रकरणांत मात्र संबंधित कर्मचारी निर्दोष ठरला . कारण तहसीलदार कार्यालयातील अभिलेख हाच पुरावा सेवा पुस्तकांतील नोंदीशी जुळत होता .
माझेकडे स्थानांतरीत झालेल्या धारिण्यांत महाराष्ट्र गृह निर्माण मंडळाची नवीनच धारीणी होती .त्याप्रकरणात माझ्या असे लक्षात आले की Works Contract Act 2005 खाली सदर प्रकरणांत महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाच्या मुंबई ,नाशीक ,नागपूर ,औरंगाबाद विभाग नोंदीत आहेत परंतू कंत्राट कराच्या रक्कमेचे हिशेब एकत्रितकरून नोंदीत दिनांकापासून (सुरवातीपासून )चा तपशीलाचा अंतर्भाव वसुलीत केल्यास वसुलीचे लक्ष पूर्ण करता येईल .ही बाब मी श्री.खंबायत साहेब, विक्रीकर उपायुक्त , प्रशासन ,बांद्रा (पू .) ह्यांचे निदर्शनास आणली . परिणामस्वरूप २००२-२००३ ह्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात एकंदर वसुलीत बांद्रा विभाग प्रथम क्रमांकावर आला . त्यांत महाराष्ट्र गृह निर्माण मंडळाच्या कंत्राटकराचा वाटा रू.१.४ कोटीचा होता . मी माझ्या आणि अतिरिक्त कार्यभाराच्या जुन्या वसुलीच्या संदर्भात ( १ )पत्ता /व्यापारी सापडत नाही , तसेच व्यापार्याची मालमत्ता नाही ,अशा प्रकरणात स्वत: विक्रीकर निरिक्षकांसह भेटी देत होतो .
M.L.R. C.महाराष्ट्र लँड रेव्हुन्यू कोड खाली चल , अचल संपत्ती जप्तीची कारवाई करण्या आधी नोटीस क्रमांक व्यापार्यावर नियमाप्रमाणे (Service) बजाविली आहे ह्याची खात्री केल्यावरच पुढील कारवाई करता येते . एका व्यापाराचा मुंबई व पुणे येथे पँकींग बॉक्सेस तयार करण्याचा मोठ्ठा धंदा होता.कंपनीच्या ४ भागीदारापैकी एकाचा कँन्सरने मृत्यु झाला . उरलेल्या तीन भागीदारांवर जप्तीची कारवाई करायची होती .त्यापैकी एका महिला भागीदाराची मालमत्ता गोरेगांव (प) ला होती . सदर महिला भागीदाराचा उच्च शिक्षित मुलगा एका मोठ्या कंपनीत जनरल मँनेजर होता .हा मुलगा त्या महिला भागीदाराच्या फ्लँटमध्ये राहायचा ,त्याच्या कँन्सरग्रस्त पत्नीसह तो राहात होता . मुलाला फोनवर संपर्क करून मी माझ्या विक्रीकर निरिक्षकांसह त्याच्या फ्लँटवर गेलो. आता घरातील टि .व्ही .,कपाटे ,टेबल ,सोफा सेट , फेामच्या खुर्च्या , इतर फर्निचर ……..इ . मालमत्तेवर ( टांच )जप्त केल्याच्या माझ्या सही -शिक्याच्या चिठ्या त्यावर लावण्याचे काम झाल्यावर त्याची यादीतयार करून जप्ती आदेश तयार करणेत आले .सदर आदेशाची प्रत मुलाला ( भागीदाराच्या ) ,गृहनिर्माण सोसायटीच्या सेक्रेटरीलाही देण्यात आल्या . ही सगळी कारवाई करतांना तेथील ऑक्सीजन लावलेल्या कँन्सरग्रस्त पत्नीला आवाजाचाही त्रास होणार नाही , ह्याची माणुसकीच्या द्द्ष्टीने काळजी घेण्यात आली .सदर भेटीच्या अहवालाची प्रत आमच्या सहाय्यक विक्रीकर आयुक्त ,प्रशासन तसेच विक्रीकर उपायुक्त ,प्रशासन, बांन्द्रा विभाग, बांन्द्रा ह्यांनाही देण्यात आली . सदर महिला भागीदार त्यावेळी पुणे येथे कँन्सरने आजारी होती . तिच्या मुलाने पुण्याला फोनवरून ह्या संपूर्ण करवाईची माहिती दिली .त्याने आमच्या टिमचे ,सदर कारवाई करतांना त्याच्या कँन्सरग्रस्त पत्नीली यत्किंतितही त्रास होऊ न देता पार पाडल्याबाबत आभार मानले . मी व्यक्तिश: त्याच्या अशा परिस्थतितही ( अप्रिय ) कारवाईत मनापासून शांतपणे सहकार्य केल्याबद्द्ल आभार मानले .
दुसर्या एका प्रकरणात वडीलांनी आपला मुंबईचा प्रिटींग प्रेसचा धंदा मोठ्या मुलाच्या हाती सोपवला . त्यानंतर ते मुलीकडे परदेशी गेले . परंतु दुसर्याच वर्षी त्यांना परत भारतात मुंबईला यावे लागले . कारण मुलाने खरेदीदारांची देणी मोठ्या प्रमाणात थकविली होती , तसेच विक्री केलेल्या मालाची रक्क्म वसूल करणेस असमर्थ ठरला .महानगरपालीकेने प्रिंटींग प्रेसची जागा सील लाऊन बंद केली व प्रिंटींग मशीन उचलून नेली . विक्रीकरादी सर्व कराचा भरणा प्रलंबित राहिला होता . वडीलांनी परत येताच संपूर्ण माहिती घेतली . विक्रीकराची सर्व थकबाकी एकत्र करून त्याचा भरणा करण्याची योजना सादर करणेचे कबूल केले . त्याची राहण्याची जागा व नवीनच सुरू केलेल्या धंद्याची जागा जप्तिचे आदेशाची अंमलबजावणी करणेसाठी मी खार ( प ) येथे माझ्या विक्रीकर निरिक्षकासह पोहोचचलो . तेथीच चल तसेच अचल मालमत्तेची यादी करून ती जप्त करणेत आली . त्यावेळी वडिलांनी स्वत:च्या मालकीची मालमत्ता विकून मुलाची विक्रीकर थकबाकी भरण्याची तयारी दाखविली . मी त्यांना त्यासाठी विक्रीकर उपायुक्त , प्रशासन , बांद्रा विभाग ह्यांना प्रत्यक्ष भेटून विक्रीकराच्या थकबाकी भरण्यासाठी हप्त्यांची सवलत घेण्यास सांगीतले . विक्रीकर उपायुक्त ,प्रशासन ,बांन्द्रा विभाग ह्यांनी काही विक्रीकर अधिकार्यांना फक्त निर्धारणेसाठी धारिण्यांची यादी करून पूर्व मंजुरी घेऊन माझ्कडे स्थानांतरीत करणेचे निर्देश दिले . सहाय्यक विक्रीकर आयुक्त (निर्धारणा ) ह्यांचेकडीलही काही धारिण्या फक्त निर्धारणेसाठी स्थानांतरीत केल्या. मी माझ्या पध्दतिने सर्व प्रकरणांत ६ महिन्यात निर्धारणा पूर्ण केल्या .
विक्रीकर उपायुक्तांच्या निर्देशाप्रमाणे नवीनच आलेल्या विक्रीकर निरिक्षकांसाठी प्रशिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते .त्यावेळी काही माजी विक्रीकर अधिकारी/सहाय्य्क विक्रीकर आयुक्त यांचीही मदत घेण्यात आली. मुंबई विक्रीकर कायदा तसेच केंद्रिय विक्रीकर कायदा खालील विविध नमुने,त्यांच्या अटी, त्यांची योग्य/अयोग्यता, विक्रीकर थकबाकी वसुली करतांना M. L. R. C.खाली कारवाई करतांना कोणकोणते नमुने आहेत .त्या अगोदर विक्रीकर कायद्याखाली कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे .केन्द्रिय विक्रीकर कायद्याखाली Resale /Form E-l/ E-ll वर विक्री कशी करतात .त्याच्या कोणत्या अटी/शर्ती आहेत . Export म्हणजे काय ? H फॉर्म वर Deemed Export Sale मान्य कसा करता येतो . Bombay High ला केलेली विक्री Export होतो काय ? Deemed Export कसा, केव्हां ? ताळमेळ पत्रक Balance Sheet म्हणजे काय ? ती कशी समजून वाचावी ? निर्धारणा करतांना कोण कोणते मुद्दे लक्षात ठेवावे लागतात ? अपील,न्यायाधिकरण , हायकोर्ट ,सुप्रीम कोर्टाचे विविध निर्णयाचा निर्धारणा करतांना कसा उपयोग करून घेता येतो . लेखा परिक्षण ( Audit ) कोणकोणते होते? स.वि .आ. /वि . उ . आ ./S.T.R.A. म्हणजे काय ? परिक्षण म्हणजे निर्धारणा करतांना झालेल्या चुका ,दोष शोधून काढणे .त्यासाठी मुंबई विक्रीकर कायदा कलम ६२ वा कलम ५७ किंवा कलम ३५ खाली कार्यवाही कधी करता येते ? …….ई.सोधाहरण समजाऊन सांगीतले .

एकदा मला बांद्रा ऑफीसमध्ये असतांना चि. मुरलीधरचा फोन आला . त्याने रडवेल्या आवाजात त्याच्या जळगांवला शिकत असलेल्या मुलाला ऊज्वलला काल संध्याकाळी सायकलवरून घरी परत जातांना ट्रकच्या उघड्या दरवाजाच जोरदार धडक बसून अपघात झाला व तो आता जळगांवलाच दवाखान्यात भरती केले आहे .मी जळगांवला माझ्या मावसभाऊ ,श्री .विजय तुळशीराम ठोसरकडे फोन करून चौकशी केली. तेव्हा मला चि . ऊज्वल अँडमीट असलेल्या दवाखान्याचे नांव कळले . मी तांतडीने विक्रोळीला घरी फोन करून सौ .निर्मलाला थोडक्यात सगळे सांगीतले व जळगांवला मिळेल त्या गाडीने जाण्यासाठी तयारी करण्यास सांगीतले . ऑफीसात मी माझ्या मित्रांकडून तात्पुरते उसने पैसे जमा केले . संध्याकाळी घरी जाऊन आम्ही दोघेही रेल्वेने रात्री ३ वाजता जळगांवला पोहोचलो .ऊज्वल I.C .U.मध्ये अँडमीट होता . चि.मुरलीधर ( दिपक )व सौ. अनुराधा . चि . कु . स्वाती , मोहनमामा , गोपालमामा सर्वजण जागीच होते . मी चि .मुरलीधरजवळ रूपये दहा हजार दिले .तेथे आम्ही दोघेही सर्वात मोठे होतो.त्यामुळे मी मुरलीधर, सौ. अनुराधा, स्वातीसह सर्वींना मानसिक धीर दिला .ऊज्वलला २-४ दिवसातच खूपच बरे वाटेल .आठवडा भरातच त्याला दवाखान्यातून घरी जाता येईल . कोणत्याही प्रकारची काळजी न करता ईश्वराकडे ह्याप्रसंगातून पार पडण्यासाठी बळ मागा.चि .मुरलीधरजवळ तेव्हढीच रक्कम वेळप्रसंगी लागल्यास ठेवावयास दिले . सुदैवाने तसेच डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे ऊज्वल Out of Danger असल्याने I.C.U. तून Recovery Room ला हलविण्यांत आले .विक्रोळीला घरी फक्त मकरंद, आनंद , प्रीति , प्रमोद व ति. गं .भा . आजीच होती . त्यामुळे सौ .निर्मलाला मुंबईला परत जाणे अत्यंत जरूरीचे होते . जळगांव रेल्वे-स्टेशनला जाऊन हावडा एक्सप्रेसने सौ .निर्मलाला अनारक्षित डब्यात बसऊन दिले . कल्याण स्टेशनला सकाळी सकाळी ३.३० ला पोहोचणार होती . नंतर ५.३० ला लोकलने विक्रोळीला जाता येणार होते . मी परत दवाखान्यात पोहोचलो . डॉक्टरांना भेटलो , ऊज्वलच्या प्रकृतिबाबत तौकशी केली .त्यांनी त्याच्या Speedy Recovery बाबत समाधान व्यक्त केले . दुसर्या दिवशी ६ डिसेंबर असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबईला जाणार्यांची तुफान गर्दी सर्व रेल्वे गाड्यांमध्ये असल्याने मी जळगांव ऐवजी बसने भुसावळला जाऊन गितांजलीने मुंबईला रात्री ११ वाजता विक्रोळीला पोहोचलो . चि .सौ . अनुराधा एक जगड्व्याळ नवस , ऊज्वलसाठी बोलली होती ,”ऊज्वल आजारातून बरा झाल्यावर त्याला पुढील एक वर्षभर कपडे आई,वडील, मामा शिवाय ईतर नातेवाईक करतील ”
दरम्यान मी मकरंद ,आनंद ,प्रीति , ऊज्वल व स्वातीच्या नांवे लहानपणीच Unit Trust of India च्या Children Growth Scheme मध्ये त्यांना त्यांच्या वयाच्या २१ व्या वर्षी प्रत्येकी रू . २१०००/- मिळतील अशी गुंतवणूक केली होती . ऊज्वलने जळगांवला शिकत असतांना मला रू .२०००/-
कँमेरा घेण्यासाठी मागीतले होते .त्याला २००३ मध्ये त्याच्या बँकेच्या खात्यात जमा होणार्या उपरोक्त रकमेपैकी मी सेवानिवृत्त झाल्यावर पेन्शनचे पैसे मिळेपर्यंत थोडे पैसे देण्यास चि.मुरलीधरला कळविले. त्याने क्षणाचाहि विलंब न लावता ”तुम्हाला त्यातील एक पैसाही मिळणार नसल्याचे फोनवरच सांगीतले.”
त्यानंतर ति .कु .स्वातिचे मँच्युरिटीते पैसे मिळण्यासाठी बँकेत खाते उघडण्यास सांगीतले.
कु .स्वातीचे युनिट ट्रस्टचे प्रमाणपत्र दिसत नव्हते , प्रमाणपत्र मँच्युरिटीच्या अगोदर युनिट ट्रस्टने त्या प्रमाणपत्राऐवजी बॉंड देण्याते कळविले .मुरलीधरला वाटले की माझेकडून ते प्रमाणपत्र हरविले ही गोष्ट खोटी आहे . ऊज्वल एम .बी. ए . ची तयारी करण्यासाठी मुंबईला १५-२० दिवसासाठी घरी आला होता त्यावेळी त्याचे कोणतेतरी जाड पुस्तक दिसत नव्हते ते शोधण्याचे निमित्त करून त्याने घरातील भिंतिवरील सगळ्या शेल्फमधील फायली बाहेर काढून संपूर्ण तपासणी केली .एके दिवशी त्याचे ते जाड पुस्तक मशीनमागे कोपर्यात सापडले .त्याचवेळी त्याची बँग कोणीतरी ब्लेडने कापून त्यातील रू. ५००/- ची नोट नेल्याचे त्याने सांगीतले . मी माझे ऑफीसचे काम करीत असतांना त्याने मला ही बाब सांगीतली . मी त्याला माझी ऑफीसची बँगही तपासायला सांगीतले. कदाचित माझ्या बँगेत ती रू ५००/- नोट आली असेल.
आता मला सेवानिवृत्तीचे वेध लागले.माझ्या सेवा पुस्तकातील सर्व नोंदी तपासून घेतल्या .वेतन पडताळणी पथकाकडे माझे सेवा पुस्तक तपासणीसाठी पाठविले .त्यांनी मला कधीकाळी वेतन जादा -प्रदान केले किंवा कसे .? साधारणत: दोन महीन्यात कोणताही दोष नाही ,सगळ्या नोंदी बरोबर आहेत.असे विक्रीकर उपायुक्त ,प्रशासन , बांन्द्रा विभागाकडून समजले . त्यानंतर सेवापुस्तक महालेखापाल १ ,मुंबई ह्यांनी गोरेगांव (पू ) येथे पाठविले . तेथून पेन्शनची गणना करून पेन्शन पेमेंट ऑरडरच्या प्रति पे अँड अकाउंटस् ऑफीसला , विक्रीकर उपायुक्त , प्रशासन ,बांद्रा विभागाला , संबंधित व्यक्तिला पाठविल्या जात होत्या . त्यासोबतच प्रॉव्हिडंड फंडाची व्याजासह फायनल पेमेंट ऑरडर , पेन्शन ग्रँच्युईटी पेमेंट ऑरडरच्याही प्रति पाठविल्या जात असत .त्यानंतर सहाय्य्क विक्रीकर आयुक्त ,प्रशासन त्या त्या व्यक्तिच्या खाती शिल्लक अर्जित रजेच्या पगाराचे बिल तयार करून ईतर बिलांसह पे अँड अकाउंटस कार्यालयाला पाठवित असत . आतापावेतो मी ईतर सहकार्यांचा निरोप समारंभाला हजर राहायचो .माझी शासकीय सेवा पुस्तकांत नोंदलेली माझी जन्म तारीख १ -६ -१९४५ अशी होती .त्याप्रमाणे मला दिनांक १ जुन २००३ रोजी वयाची ५८ वर्षे पूर्ण होणार होती .मला दिनांक १ जुन २००३ रोजीच नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त व्हायचे होते . आता मला माझ्याच निरोप संमारंभाला दिनांक ३१-५- २००३ ला हजर राहण्याचे निमंत्रण देण्यात आले . श्री .नाईकसाहेब ,विक्रीकर उपायुक्त, प्रशासन, बांन्द्रा विभाग , ह्यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमचे सहाय्यक विक्रीकर आयुक्त ,प्रशासन ,स.वि.आ. (निर्धारणा ), सर्व सहकारी विक्रीकर अधिकारी , विक्रीकर निरिक्षक , लिपिक ,चपराशी वर्ग उपस्थित होते .क्रमाक्रमाने सहकार्यांनी माझ्याबद्दल माहिती व आठवणी सांगीतल्या. विक्रीकर उपायुक्तांनी माझ्याबद्दल सांगतांना आम्ही दोघे एकाच बँचचे विक्रीकर निरिक्षक होतो ,पुढे वयोमर्यादेत असल्याने विक्रीकर अधिकारी पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली आणि पुढील पदोन्नति क्रमाक्रमाने मिळाल्यानंतर आज विक्रीकर उपायुक्त पदावर आहे .श्री . लोणकर साहेबांनी सेवानिवृत्तीनंतर ह्या कार्यालयात काम असो नसो ह्या भागात आल्यावर न चुकता यावे ,त्यांचे सदोदित स्वागतच आहे . त्यांच्या अनुभवाचा आणि माहितीचा आम्हाला उपयोग करून घेता येईल .त्यांचा पुढील सेवानिवृत्तिचा काळ आरोग्य ,सुख व समाधानामुळे आनंदातच जाणार आहे . त्यांता लहाना मुलगा आनंद हा पृथ्वीवरील स्वर्ग असलेल्या स्वित्झरलंड येथे ईन्फोसिस ह्या प्रसिध्द कंपनीत सॉफ्टनेअर ईंजिनिअर आहे . त्यांनी तेथून परत आल्यावर आम्हाला खुर्चित बसल्या बसल्या स्वित्झरलंडची सफर घडवावी. आम्ही त्यासंधीची वाट पहात आहोत . आज ते त्यांच्या पत्नीसह उपस्थित आहेत . आम्हा सगळ्यांनी मिळून आणलेली ही प्रेमाची भेट त्यांनी स्विकारावी. नंतर मी सर्वांचे सहकार्याबद्द्ल आभार मानले . आम्ही सगळ्यांनी माझ्यातर्फे दिलेल्या सहभोजनाचा आनंद हसत खेळत घेतला.
त्यानंतर मला S. T . R .A . तर्फे दरवर्षी घेतल्या जाणार्या माझ्या चार्जच्या लेखा परिक्षणाच्या वेळी विक्रीकर कार्यालयात बोलाविले होते . एकूण १० लेखापरिक्षण परिच्छेदापैकी ८ परिच्छेदातील प्रकरणे P. D . P. झाले.त्यात झालेल्या महसूल हानी बाबत लोकलेखा समिती (Public Accounts Committee ) समोर अर्थ विभागाच्या मुख्यसचिवामार्फत विक्रीकर आयुक्तांना उपस्थित राहून परिच्छेदांतील महसूल हानीसाठी स्पष्टिकरण द्यावे लागते.त्याअगोदर संबंधित विक्रीकर अधिकारीकडून लेखी स्पष्टीकरण घेऊन विक्रीकर उपायुक्तामार्फत विक्रीकर आयुक्तांना पाठविणे आवश्यक होते. त्यानंतर विक्रीकर आयुक्त परिचछेद बंद करणेसाठी महालेखापालांकडे पाठवित असत . माझ्या सर्व १० परिच्छेदांतील प्रकरणांत माझी स्पष्टिकरणात्मक उत्तरे विक्रीकर उपायुक्तांच्या शिफारसीने पाठविली आणि सरतेशेवटी सर्व १० परिच्छेद बंद करणेतआले . माझ्या मित्रपरिवारातील श्री .नवरेसाहेब ,श्री .गुप्तासाहेब, श्री . राठोड साहेब ,श्री जलोटा साहेब ,श्री .मळवे साहेब तसेच श्री. नाईक ,विक्रीकर उपायुक्त , बांद्रा विभाग ,बांद्रा ह्या सगळ्यांनी मनापासून सहकार्य केले. त्यासाठी दोन वर्षाचा कालावधी लागला .

मुंबईचे नवे आयुष्य एक मोठे आव्हान

दिनांक  ७ फेब्रुवारी १९७६ रोजी मी  केन्द्रिय शाळा मुख्याध्यापक पदाचा कार्यभार तेथील दुय्यम शिक्षकाला देऊन कार्यमुक्त झालो .त्याचा अहवाल संवर्ग विकास अधिकारी ,पंचायत समिति , मुर्तिजापूर,शिक्षणाधिकारी जि. प. अकोला आणि मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद ,अकोला  ह्यांना पाठविला .मी दिनांक  ८ फेब्रुवारी १९७६ रोजी सायंकाळी हावडा एक्सप्रेसने अकोलाहून मुंबईसाठी निघालो . ति. रा. रा.मोठे हिंगणेकरमामा व मुरलीधर अकोला रेल्वे स्टेशनवर मला निरोप द्यायला आले होते .त्यावेळी मुंबईचे तिकीट होते फक्त रू.२७/- मी दिनांक ९/२/७६ ला सकाळी सात वाजता V. T. ला पोहोचलो . माझे स्काऊट बेडींग आणि पत्र्याची पेटी V. T . ला Clock Room मधे ठेवली .माझे सोबत आलेल्या जिल्हाधिकारी , अकोला कार्यालयातील लिपिक श्री .खानसरांसोबत तेथेच पहिल्या मजल्यावरील Cafeteria मध्ये हात – तोंड धुऊन चहा व नाश्ता घेतला . श्री. खान सर मंत्रालयात त्यांच्या शासकीय कामासाठी निघुन गेले .मी हार्बर लाईनवरील  डॉकयार्ड स्टेशनवर ऊतरलो . तेथून पश्चिमेला जवळच महाराष्ट विक्रिकर आयुक्तांचे कार्यालय , विक्रिकर भवन होते . हा विभाग माझगांव म्हणून परिचित होता . मी विक्रिकर आयुक्तांच्या कार्यालयात श्री . कुळकर्णी , लिपिकांना भेटलो.त्यांच्या साहेबांनी माझ्या नियुक्ति आदेशाच्या प्रतिवरच विक्रिकर उपायुक्त,(प्रशासन ) २, मुंबई , यांच्याकडे मला पुढील कार्यवाहीकरीता जाण्याचे निर्देश दिले .
मी त्याप्रमाणे विक्रीकर उपायुक्त ( प्रशासन ) २ , मुंबई यांना भेटलो . त्यांनी श्री. कोळेकर ,ज्येष्ठ विक्रीकर निरिक्षकांकडे जाणयास सांगीतले . त्यांच्या कार्यालयातील लिपिक श्री . सु .कुळकर्णी यांनी मला पुढील नियुक्ति विक्रीकर अधिकारी , (आस्थापना )’ क ‘ प्रभाग , पथक ३ ,मधील श्री .वि .मा . पाटील यांच्याकडे नियुक्ती दिली . दरम्यान मला श्री . कोळेकर साहेबांनी विचारणा केली की ” तुम्ही शिक्षकाच्या १३ वर्षांच्या सेवेचा राजीनामा देऊन , आज वयाच्या ३१ व्या वर्षी शासकीय सेवेत रूजूं होण्यासाठी कसे काय येऊ शकता ? शासकीय सेवेत रूजू होण्याची ईतर मागासलेल्या वर्गासाठीची वयोमर्यादा २८ आहे , ह्याची तुम्हाला माहिती नाही काय ? ” तुम्ही परत जाऊन शिक्षकाचा राजीनामा मागे घ्यावा हेच तुमच्या पुढील भविष्याच्या द्दष्टीने उत्त्तम राहील .

मी त्यांना नम्रपणे सांगीतले की आपण मला पुढील नियुक्ति लवकरात लवकर द्यावी . मला विक्रीकर निरिक्षक पदाच्या ३ महिने प्रशिक्षण काळात रू. १५० /-एव्हढे विद्यावेतन म्हणजेच रू.५ /- रोज मिळणार आहे , आता दुपारचे ४ वाजले आहेत .मला नियुक्ती अधिकारीकडे रूजू होता येईल असे करावे . आपल्या सगळ्या प्रश्नांची /शंकाचे निरसन मी उद्या करीनच. शासकीय सेवेत रूजू होण्यासाठीची वयोमर्यादा कोणी ? कधी ? तपासायची हे उद्या सविस्तरपणे बघता येईल . माझ्या ह्या बोलण्याचा त्यांना खूप राग आला असावा , कारण त्यांनी माझी विक्रीकर निरिक्षक पदाची नियुक्ति श्री. वि.मा. .पाटीलऐवजी श्री . R. C . Kadam अशी केली . त्यावेळी श्री . कदम साहेबांना बोंबाबोंब अधिकारी म्हणबन ओळखत . मी त्याप्रमाणे श्री . कदम साहेबांकडे रूजू झालो . आयुक्तांच्या आदेशात मला ३ महिने प्रशिक्षण घ्यावयाचे हेोते .माझेसोबत ईतर कोणीही प्रशिक्षणासाठी नव्हते. मी कोळेकरसाहेबांना माझी वयोमर्यादा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरिक्षकाच्या जाहिराती प्रमाणे १९७१ सालची बघायची आहे आता १९७६ साली बघायची नाही ही बाब समजाऊन सांगीतली .
आता माझ्यापुढे प्रश्नउभा होता , कोठे राहायचे ? तात्पुरते पर्याय होते दोन ,
१) श्री.भाऊराव कांबळेकडे राहणे , किंवा वांद्रे शासकीय वसाहतीतील, श्री .भास्करराव देशमुख यांचेकडे राहणे . ३) हॉटेल/लॉजमध्ये राहणे . तिसरा पर्याय आर्थिकद्दष्ट्या न परवडणारा होता .दुसरा पर्याय श्री .भास्करराव देशमुखांकडे माझा , ते डॉ .सुधाकर देशमुख यांचे मोठे भाऊ आहेत , एव्हडाच धागा होता . श्री . भाऊरार कांबळे , यांचा माझा मुंबईत ह्या सगळ्यापेक्षा जास्त परिचय होता . त्यांचेकडेच सद्यस्थितित राहण्याचा निर्णय घेतला . त्यांचे घर विक्रोळीला हरियाली व्हिलेजला रेल्वे लाईन जवळच होते .संध्याकाळी मी त्यांचेसोबतच घरी गेलो . त्यांचे घरी दोन लहान मुले व ( पत्नी )सौ. माला होती. भाऊरावनी त्यांच्या वडिलांचे सहकारी श्री . लोणकर गुरूजी हे आले आहेत . त्यांना आता विक्रीकर खात्यात निरिक्षक म्हणून मुंबईलाच नोकरी मिळाली असून येथेच राहणार असल्याचे सांगीतले . त्यांचेकडे जेवण करून मी झोपलो
सकाळी लवकर ऊठून तयारी केली , सोबत पोळी- भाजी घेऊन ऑफिसात १० वाजता पोहोचलो .माना . ता मुर्तिजापूर , जि .अकोला येथील श्री .W. H .Deshmukh ,तसेच घुसर ,ता .अकोला येथील श्री.सांगळे हे दोघेही सहाय्यक विक्रीकर आयुक्त पदावर होते .तसेच श्री. भाऊराव देशमुख , विक्रीकर अधिकारी , हे डॉक्टर सुधाकर देशमुखांचे बहिण जावई होते , ह्यांच्याशीओळखी करून घेतल्या .

दिनांक ११ फेब्रुवारी १९७६ रोजीही मी श्री. कांबळे कडून पोळी -भाजी घेऊन ऑफिसात निघालो , कुर्ला येथे ऊतरून हार्बर लाईन मार्गे डॉकयार्डला उतरून माझगावला ऑफीसात पोहेचलो .माझी डायरी चाळून बघता बघता मला सौ .शशी बालंखे , पाणी क्वार्टरस् , घाटकोपर , पश्चिम, मुंबई असा पत्ता दिसला .ह्याच शशी मावशीच्या अंगाखांद्यावर मी लहानपणी खेळलेलो होतो , ही आईची मैत्रीण होती .मी त्या दिवशी सौ.शशी बालंखे मावशीकडेजायचे ठरविले .सायंकाळी ऑफीस सुटल्यावर मी घाटकोपरला उतरलो .घाटकोपर पश्चिमेला पाईप लाईनला पाणी खात्याचे क्वार्टर्स शोधून श्री. बालंखे काकांचे क्वार्टर शोधून काढले .सौ . शशीमावशीला मी माझी ओळख सांगीतली . जुनी आठवण श्री . भाऊसाहेब हिंगणेकर , बकुळाबाईचा ( ति. गं . भा .प्रभावती , आईसाहेब ) मुलगा विनोद तो मीच , शशीमावशीच्या चेहर्यीवर ओळखीचे , आपुलकीचे खट्याळ भाव आले, ती म्हणाली म्हणज् तू बकुळाबाईचा महादेवच ना ! विनोद नांव कोणी /कधी ठेवले ? ये बैस ह्या बंगळीवर . सौ . शशीमावशीने मग जुन्या आठवणी सांगीतल्या .माझी चौकशी केली ,कधी आला , कोठे थांबला आहेस , ऑफीस कोठे आहे , कोणच्या नोकरीवर आहेस , सरकारी /खाजगी कोणती नोकरी आहे …? असे असंख्य प्रश्नांची ऊत्तरे देता देता माझी त्रेधातिरपट झाली . मला मावशीने आता माझे ट्रेनिंग पूर्ण होईपर्यंत माझ्या घरीच राहण्यास सांगीतले . जेवणानंतर मी माझी सर्व माहिती लहानपणापासून आजतागायतची मावशीला सांगीतली . दुसर्या दिवशी मावशीकडूनच पोळी -भाजी घेऊन ऑफीसला गेलो .

मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठ्ठा रेल्वे अपघात ११ फेब्रूवारी १९७६ रोजी मध्य रेल्वेच्या सायन-माटुंगा दरम्यान झाला होता . सकाळची ९.०० ची स्लो लोकल प्लँटफॉर्म क्रमांक दोन वरून सायनहून पुढच्या माटुंगा स्टेशनकडे निघाली . मधल्या डब्याला शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली .सकाळची वेळ असल्याने मुंबईकडे कामावर जाणार्या प्रवाशांनी गाडी खच्चून भरली होती .आग लागल्याचे समजतांच एकच गोंधळ झाला . डब्यातील प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारायला सुरवात केली . उजवी / डावीकडून उड्या मारलेले प्रवाशी मुंबई कडून येणार्या लोकलखाली सापडले . काही प्रवाशी गर्दीमुळे उतरू न शकल्याने गाडीतल्या चेंगराचेंगरीत जखमी झाले . काही प्रवाश्यांनी आम्हाला वाचवा !वाचवा ! म्हणत खिडकीतून दोन्ही हात बाहेर काढले , त्यांचा तसाच त्या आगीत कोळसा झाला. मला ऑफीसांत गेल्यावर हे सगळे ,पेपर वाचल्यावर कळले . मी अकोल्याला ति .हिंगणेकर मामांना (Telegram) तारेने कळविले . संध्याकाळी सौ मावशीकडे घरी गेलो .१३ फेब्रुवारी १९७६ लाही मुबईचे वातावरण मूळ पदावर आले नव्हते.
मी भाऊराव कांबळेकडे मी दिनांक ११ फेब्रुवारी पासून न गेल्यामुळे फार मोठा
गोंधळ झाला होता . तेथे मेडशीचे आणखी दोघे तिघे होते . ते सर्वजण काळजीत पडले . श्री .लोणकर गुरूजी मुंबईत अगदी नवीनच आहेत त्यांचे मुंबईतील ओळखीचे / नातेवाईकही माहिती नाहीत . . ते माझगांव विक्रीकर भवनांत कोठे बसतात माहिती नाही , काय करावे ? मुंबईतील K. E .M./J.J. / Nayar /Sion …इ . हॉस्पिटल मधे जाऊन जखमी पेशंट वा मृत पेशंटाची यादीही तपासून पाहीली. कोणालाच काही सुचेना . मी १३ फेब्रुवारीला संध्याकाळी कांबळेकडचे माझी पेटी , व बेडींग घ्यायला गेलो . मी पोहोचताच भाऊराव कांबळे ,त्याची पत्नी ,सासुबाई , लहान मुले , मेडशीचा पुंडलिक (गिरगांव पोस्टात कामाला असलेला )….. इ. मला बिलगून रडू लागले , आजुबाजूचे सगळे शेजारीही त्यात सामील झाले . मला कांहीच समजेना ! थोड्यावेळाने भाऊराव कांबळेनी मला सर्व समजावून सांगीतल्यावर कळले . दुसर्या दिवशी मी सौ . शशी मावशीकडे राहायला गेलो . अकोल्याला घरी तसे कळविले . माझे तीन महिन्याचे प्रशिक्षण ९ मे १९७६ ला संपेपर्यंत मी तेथेच राहिलो . एकदा सौ.शशी मावशीची आई इंदोरहून आली होती , तिचा Peculiar आवाज लहानपणापासून मनांत ठसला होता .मी संध्याकाळी घरी आल्याबरोबर तोच Peculiar आवाज मला ऐकू आला .मी बाहेरूनच घरात जाण्या अगोदर मावशीला विचारले आजी कधी आली ? मावशीला /आजीला फारच आश्चर्य वाटले ,तु कसे काय ओळखलेस ? त्यांना फार बरे वाटले .

ऊन्हाळ्याच्या सुटीत मावशी सहपरिवार गांवाला जाणार होती , आता पुन: पुढे कोठे राहायचे ? शासकीय निवासस्थान लवकर मिळणार नाही .तोपर्यत राहण्यासाठी मावशीच्या ओळखीच्या अकोटच्या डॉक्टर बानुबाकोडेंच्या बर्वेनगरमधील घरासमोरच एका ईमारतीचे बांधकाम सुरू होते . तेथील चौकिदाराच्या घराच्या बाजूला असलेल्या मीटर रूममध्ये राहता येईल , असा पर्याय निघाला . मी ती टिनाची मीटररूम पाहिली , त्यांत विटा , सीमेंट , टोपले ….इ .साहित्य होते . एका बाजूला माझ्या बेडींगसाठी जागा होती . भाडे ठरले फक्त मासिक रूपये २०/- . मी तेथे Shift झालो . माझा दिनक्रम ठरला होता . सकाळीच ५.३० ला उठून शौच, मुखमार्जनानंतर चौकिदाराच्याच ड्रमातून बादलीभर पाण्याने थंडगार पाण्याने स्नान करायचे ,आणि बाजूच्याच
हॉटेल “विश्व”मध्ये जाऊन गरम ताजा नाश्ता , चहा घेऊन घाटकोपरला रेल्वे स्टेशनवर येऊन लोकलने कधी कुर्ला- डॉकयार्ड तर कधी भायखळा/सँडहर्स्ट रोड मार्गे माझगांव ऑफीसला सकाळीच ९.३० ला पोहोचायचो . ऑफीस सकाळी ९.३० ते ५.३०आणि १० ते ६ असे होते मी सकाळी ९.३० ते ६.०० पर्यंत काम करायचे . नंतर माझ्या अकोल्याच्या मित्राच्या, मुकुंद राजूरकरांच्या बहिणीकडे डोंबिवलीला ‘ मोर्णा ‘ बंगल्यांत ,त्याच्या घरी जायचो . त्यांच्या ‘दधिची ‘ .नांवाच्या मुलाशी गप्पा मारायचो . त्याची आई सौ. शशी मावशीच्या बहिणीची सौ.ऊषामावशीची मैत्रीण होती . जून्या काळातल्या गोष्टी निघायच्या ,गमती, जमती, आठवणीत वेळ कसा जाचया समजतच नसे . कधी कधी बर्वेनगर वाचनालयात जाऊन पेपर वाचण्यात वेळ कसा जाई ,लक्षात येत नसे .
डोंबिवलीहून रात्री १० वाजता लोकलने निघून ११ वाजता घाटकोपरला बर्वे नगरला खोलीवर पोहोचायचो . पावसाळा सुरू होण्यापूर्वी मी विक्रोळीहून कांबळेकडून माझेसाठी एक खाट आणली होती .
कधी कधी ,मला वेळ मिळताच मी डॉक्टर सुधाकरचे मोठे भाऊ श्री .भास्करराव.
देशमुख , विक्रीकर निरिक्षकांना भेटायला वांन्द्रे शासकिय वसाहतीत जात असे ,कारण ते गेली ४-५ वर्षापासून सतत आजारी रजेवरच होते . एकदा संध्याकाळी मी त्यांचे भेटीस गेलो असता त्यांना Non stop उचकी लागली होती . क्षयाची बाधा होतीच . ते तसे हट्टीच होते . त्या दिवशी त्यांनी स्वत: मला तेंथेच थांबायची विनंती केली .मी त्यांचेकडे कॉफी घ्यायचो .त्यांनी ,” मला दवाखान्यात नेऊन अँडमीट करा ,मला आता सहन होत नाही .”
आता माझ्यापुढे प्रश्न निर्माण झाले ,जवळ पैसे नाहीत ,टँक्सीभाडे किती लागेल ?
कोणत्या दवाखान्यात नेणे सोयीचे होईल ? कोणत्या डॉक्टरांचा संदर्भ घ्यावा ? मुंबईत कोणाची ओळख नाही. पैशाची सोय कशी कोठून करावी ? विचार करता करता मला कॉलनीतल्या शासकीय डॉक्टरांची आठवण झाली . त्यांचेकडे जाऊन सेंट जॉर्ज रूग्णालयासाठी पत्र घेता येईल . त्यांचेकडे जाऊन पोहोचलो. तेथे भाऊसाहेब देशमुख बसले होते .मी त्यांना श्री . भास्करराव देशमुख बी-५७ (२ ) मध्ये आहेत त्यांना सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये अँडमीट करण्यासाठी डॉक्टरांचे पत्र देण्याची विनंती केली . श्री. भाऊसाहेब म्हणाले , आमचा त्याच बाबीवर विचार सुरू होता . आम्ही सगळ्यांनी त्याला दवाखान्यात अँडमीट करण्याचे खूप प्रयत्न केले पण त्यांचा सदा नकारच होता . आता तुम्ही प्रयत्न करताहात आम्ही तुमच्या सोबतच आहोत , कोणतीही मदत लागल्यास नि:संकोच सांगा .मी त्यांना ४००/- रू. मागीतले . त्यांनी लगेच पैसे काढून दिले . ह्याशिवाय डॉक्टरांचे पत्र तसेच डॉ. श्री. महालपूरकर आर. एम . ओ . ह्यांच्याशी फोनवरून संपर्क करून कॉटही आरक्षित ठेवण्याची विनंती केली . घरी जाऊन श्रीमती ताई देशमुखांना आणण्यास गेले .

मी भास्कररावांच्या घरी जातांनाच टँक्सी घेऊन गेलो . घरी गेल्यावर भास्करराव तयार होते . मला सौ. देशमुख वहिनी म्हणाल्या , ‘ लोणकर साहेब ह्यांना दवाखान्यात नेऊ नका , ह्यांना अँलोपँथीची औषधे भारी पडतात ,सहन होत नाहीत .’ मी सौ .वहिनींना म्हटले ,घरी ह्यांची तब्यत सुधारेलच अशी तुम्हाला खात्री नाही .दवाखान्यात सदोदीत लक्ष ठेवायला नर्स/ डॉक्टर्स असतात. जबाबदारी त्यांची असते . घरी काही विपरीत घडले तर सगळे तुम्हालाच जबाबदार धरतील ,मग ह्या दोन लहान मुलांकडे कोण बघणार ? ह्यांना दवाखान्यात नेऊन उपचार करणे फार जरूरीचे आहे . आतापर्यंत तुम्ही सर्वांनी ह्यांना दवाखान्यात दाखल करण्याचे खूप प्रयत्न केलेअसतील पणआज ते स्वत: दवाखान्यात दाखल करा असे म्हणताहेत ,कदाचित दैवानेच त्यांना तशी बुद्धी दिली आहे , ते चांगल्यासाठीच आहे . ईमारतीखाली भाऊसाहेब त्यांच्या कुटुंबियांसह हजर झाले होते . टँक्सी आली होती .मी भास्कररावांना घेऊन टँक्सीने सेंट जॉर्ज दवाखान्यात निघालो . टँक्सी माहिमला आली अन् बंद पडली . माहिमवरून दुसरी टँक्सी करून रात्री १० वाजता दवाखान्यात पोहोचलो . डॉ.महालपूरकरांनी कॉट आरक्षित करून ठेवली होती . भास्कररावांची कागद पत्रे भरली . डॉक्टरांनी तपासून मला काही औषधे आणायला सांगीतली . माझ्यासोबत दुसरी कोणीही माहितगार व्यक्ति नव्हती . दवाखान्याबाहेर आल्यावर एका टँक्सीवाल्याला थांबवले ,रात्री ११ वाजता कोणती औषधाची दुकाने , कोठेकोठे आहेत ? , ह्याची माहिती विचारली . त्याचेसोबत व्ही.टी . /मेट्रो ….इ . २४ तास उघडी असलेल्या दुकानात मला फक्त एकच औषध मिळाले . मी सी .टी. ओ. तून अकोल्याला श्री . भास्करराव देशमुख , ईलेक्ट्रीक कॉन्ट्रँक्टर , जुन्या कॉटन मार्केटसमोर वान्द्रयाच्या भास्करराव देशमुखांना सेंटजॉर्ज दवाखान्यात अँडमीट केल्याचे तार करून कळविले .
दोन दिवसांनी भास्कररावांचे मोठे भाऊ श्री. मधुकरराव देशमुख उपाख्य दादासाहेब २-४ मदतनिसांना घेऊन मुंबईला दवाखान्यात हजर झाले . मी दिवसा ऑफीसात व रात्री दवाखान्यातच राहात होतो .
अशा रीतीने तीन महिने औषधोपचार चालला .डाव्या फुफ्फुसाचे ऑपरेशन केले.ऑफिसमध्ये भास्कररावांची रजा मंजूर करणे , पगार बिले तयार करणेसाठी भास्करराव कोणत्या ऑफीसरच्या पे- रोलवर आहेत हे नक्की माहिती नव्हते . परिणामी एकदा तर दोन कार्यालयांनी एकाच वेळी पगार बिले पे अँड अकाऊंटसला पाठविली . त्यांचे चेक्सही तयार करणेत आले .परंतु चेक विभागाच्या दक्षतेमुळेडबल पेमेंट झाले नाही .एक बिल रद्द केले . ह्या सर्व प्रकरणांत श्री. टी . ए .देशमुख पे अँड अकाऊंट ऑफीसरांची खूप मदत
झाली .भास्कररावांचे फुफ्फुसाचे ऑपरेशन दहा डॉक्टरांच्या टिमने यशस्वीरित्या पार पडले .त्यांची क्षयाची बाधाही दूर झाली . डॉक्टरांनी दवाखान्यातून डिसचार्ज देतांना किमान एक वर्ष कुटुंबियांपासून दूर राहायला सांगीतले .त्यांचे लहान भाऊ डॉ.सुधाकर देशमुख त्या दरम्यान ईस्लामपूरला , होमिओपँथी कॉलेजचे प्राचार्य होते.त्यांचेकडे ५-६ महिने भास्कररावांना ठेवायचे नक्की केले .मला त्यांचेसोबत कोयना एक्सप्रेसने जावे लागले . ह्या सगळ्या कालावधीत माझे सर्व देशमुख कुटुंबियांशी कौटुंबिक संबंध पक्के झाले .
श्री. भाऊसाहेब देशमुख हे विदर्भ वैभव मंदीर ,दादर ह्या वैदर्भियांसाठीच्या द उपाध्यक्ष होते . अध्यक्ष माननीय श्री. वानखडे , अर्थ मंत्री , महाराष्ट्र राज्य , मुंबई होते . श्री. भाऊसाहेबांना माझ्याबाबत विदर्भातील एक चांगला माणूस आहे ,तसेच डॉ. सुधाकर देशमुखांचा जिवलग मित्र आहे . सर्वांना मनापासून , सदोदित मदतीचा हात पुढे करणारा माणूस आहे . मुंबईत एकटाच राहतो आहे . त्याचेसाठी वैदर्भिय पण मुंबईतीलच, एखादी चांगल्या घराण्यातील , शिकलेली मुलगी शोधावी असे त्यांच्या मनात आले . त्यांनी मुलगी दाखवायची ,पण आधुनिक पध्दतीने एकमेकाला न कळू देता असे ठरविले. एके दिवशी त्यांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावून , ”आपल्याला उद्या बाहेर लंचला जायचे आहे ,तयार राहा .” असे सांगीतले . योगायोगाने रात्री श्री .दादासाहेब देशमुख ,डोंगरगांवहून आले . एखादी गुप्त गेष्ट सांगावी तसे त्यांनी ”मी उद्या श्री , लोणकरसाहेबांना आपल्या विदर्भातीलच पण सध्या मुंबईतीलच घाटकोपरला राहणारीडॉ.बानबाकोडेंची डॉक्टर मुलगी नकळत दाखविणार आहे . उद्या मी हाँटेलमध्ये त्यांना घेऊन जेवायला जाणार आहे . मुलगा ,मुलगी एकमेकांना पाहतील मुलाच्या बाजूने मी आहेच . श्री , दादासाहेबांनी , श्री ,भाऊसाहेबांना विचारले की ,तुम्ही श्री. लोणकरांची घरची / कुटुंबाची माहिती विचारली काय ? त्यांना लग्नाबाबत विचारले काय ?अहो , श्री. लोणकरांचे Already लग्न झालेले आहे .तेव्हा आता असे काही न करता उद्याचा मुलगी दाखविण्याचा , जेवण्याचा कार्यक्रम , कृपया ताबडतोब रद्द करा . बाकी सगळे मी ,श्री .लोणकरांना उद्या जेवायला घ्ऊन जाईन व समजाऊन सांगेल . काळजी करू नका .
श्री .दादासाहेबांनी मला ऑफीसमध्ये येऊन सगळे सांगीतले . त्यांना सौ. निर्मला तूर्तास जानेफळलाच आहे , ह्याची कल्पना होती . श्री . भाऊसाहेबांचा मधला मुलगा विलास हा खामगांवलाय मृद संधारण खात्यात नोकरीला होता . माझा अकोला सरकारी दवाखान्यातील मित्र श्री . अशोक अवस्थीचीही मदत घेऊन , बुलढाण्याच्या श्री . राजाभाऊ खिरोळकरांशी ( सौ. निर्मलाचे मामा ) संपर्क करून सगळे व्यवस्थित करू असे ठरविले . मोठ्या बाका प्रसंगातून मी सुखरूप बाहेर आलो .
भगवद् गीतेतील ,’आत्मनो स्वये ऊध्दरेत ‘ ह्या चा अर्थ ‘ स्वत:चा ऊद्धार स्वत:
च करायचा असतो ‘. त्याबरहुकूम मला दिवाळीला अकोल्याला घरी जायचे होते, त्यामुळे मीच पुढाकार घेऊन, ति.रा. रा .किसनमामांना दिवाळीला सौ .निर्मलाला घेऊन येण्याबाबत पत्राने कळविले .
त्याप्रमाणे सौ .निर्मला तिच्या वडिलांसोबत अकोल्याला श्री .वाघाडेच्या चाळीत आली .दिवाळी होताच नुकत्याच सुरू झालेल्या ”गीतांजली सुपर फास्ट एक्सप्रेसने ” सौ . निर्मलाला घेऊन रात्री १० वाजता कॉटनग्रीनला (मुंबईला ) पोहोचलो . त्यावेळी गीतांजली एक्सप्रेस अकोला , भुसावळ , ईगतपुरी , मुंबई व्ही .टी. अशी धावत असे . सौ .निर्मलाच काय ! मलाही सुपर एक्सप्रेसचा हा प्रवास नवलाचा वाटला . माझ्या जीवनातील एक महत्वपूर्ण निर्णय मी घेतला होता .

प्रशिक्षण काळात मी ऑफीसमध्ये श्री . निमकर / मयेकर /श्रीमती शृंगारपुरे ह्यांच्या मदतीने २७ नंबरच्या नोटीसा /स्मरणपत्रे काढायचो .नंतर त्याची बजाावणी ( service) करणे , Cross Check काढून पाठविणे. तसेच निर्धारणा करून कमी करभरणा असल्यास थकबाकी नोटीस काढून वसुलीची, कार्यवाही करणे . वेळोवेळी गरज पडल्यास व्यापार्याच्या धंद्याच्या जागेला भेटी देण्याचे काम विक्रीकर निरिक्षकांकडेच होते.मुंबईत माणसांची खूपच गर्दी होती .जणू माणसांचा समुद्रच, पण आपले जवळचे कोणीही नाही. मी एकटाच होतो .

मला कार्यालयातील सगळेजण ” गुरूजी ” संबोधायचे . माझ्या ३ महीन्याच्या प्रशिक्षणाचा कोणताही कार्यक्रम प्रशासनाने आखला नव्हचा . मी तीनही महीने व्यापार्यांना निर्धारणेसाठी नमुना क्रमांक २७ च्या नोटीसा काढायचे काम केले , तसेच प्रलंबित वसुलीचे वार्षीक विवरणपत्रक तयार केले . प्रशिक्षणाचे ३ महीने संपत आले तरी सहाय्य्क विक्रीकर आयुक्त , (प्रशासन ) ५ , मुंबई नगर विभाग मुंबई , यांनी मला वैद्यकीय परिक्षेला G .T. Hospital ला पाठविले नाही , प्रशिक्षणाला विवरण शाखा , नोंदणी शाखा , निर्धारणा , अपील शाखा तसेच अंमलबजावणी शाखा …. ईत्यादी ठिकाणीही पाठविले नाही . श्री .कदम साहेबांनी तीन महीने संपतांना मला श्री. लाटकर , विक्रीकर निरिक्षक , ह्यांच्या मार्गदर्शनाखाली निर्धारणेचे काम करायला सांगीतले . मी प्रशासन कार्यालयाला विनंती करून वैद्यकीय परिक्षेला G.T. Hospital ला गेलो , तेथे Dean ना भेटून आठवडाभरात सर्व Tests पूर्ण केल्या आणि वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविले . प्रशासकीय कार्यालयाला ते सूपूर्द केले व माझ्या सेवा पुस्तकांत त्याची नोंद घेतली .दरम्यान श्री .कदम साहेबांची सहाय्यक आयुक्त,( प्रशासन) पदावर बढती झाली . त्यांचे जागेवर लालबाग कार्यालयातून श्री .का. छो. शेखसाहेब रूजूं झाले . माझा ३ महीन्याचा प्रशिक्षण कालावधी संपल्यावर ‘माझे प्रशिक्षण समाधानकारकपणे पूर्ण झाल्याचा ‘ अहवाल विहीत मार्गाने आयुक्त कार्यालयाला पाठवावयाचा होता . त्यासाठीआमचे ज्येष्ठ विक्रीकर निरिक्षक श्री. वंगाणी , मला घेऊन श्री. शेख साहेबांच्या केबीन मध्ये गेले . श्री.शेख साहेब म्हणाले ,मी श्री . लोणकरांचे काम पाहीलेले नाही .ते मी आलो तेव्हा ते आठवडाभर G. T . Hospital ला गेले होते . त्यांचे प्रशिक्षणाचा कालावधी वाढवावा असा अहवाल तयार करून पाठवा . त्यावर श्री. वंगाणीसाहेब म्हणाले ‘ त्यासाठी आपले Explanation ‘ सेाबत पाठवावे लागेल , कारण श्री .कदमहेबांनी अडीच महिन्याचे प्रशिक्षण समाधानकारक असल्याचा अहवाल दिला आहे . आपण सांगाल तसा अहवाल मी तयार करून देतो . त्यावर श्री. शेख साहेबांनी ”प्रशिक्षण समाधानकारकपणे पूर्ण केले आहे .” असा अहवाल तयार करून विहीत मार्गाने पाठविणेचे निर्देश श्री .वंगाणींना दिले .
प्रशिक्षण समाधानकारकपणे पूर्ण केल्याचा अहवाल विक्रीकर आयुक्तांना मिळाल्यानंतर त्यांनी मला विक्रीकर उपायुक्त , ( प्रशासन ) २ ,मुंबईनगर विभाग, मुंबई यांना विक्रीकर अधिकारी , ‘ क ‘ प्रभाग ,पथक , ३ मधील श्री .शेख साहेबांकडेच नियमित पगारावर ९ – ५- १९७६ पासून नियुक्ति दिली . मी आता विक्रीकर निरिक्षक म्हणजेच वर्ग ३ कर्मचारी झालो . माझे विद्यावेतन दरमहा रू. १५०/- बंद होऊन मला आता पगार मिळायला सुरवात झाली . मला निर्धारणा आदेशात विवरण पत्रकांप्रमाणे येणारी आकडेवारी कशी ठरवितात हेच प्रथमदर्शनी कळले नाही .
सर्वश्री . लाटकर साहेब , सावंत साहेब ,पारेख साहेब , आमच्या बाजूला बसणारे इतर विक्रीकर निरिक्षक मला सतत सांगत , Return वाच ,Return वाच . माझ्याद्दष्टीने चांगली बाब म्हणजे मला शाळेपासून श्री .जोग सरांनी लावलेली स्वयं-अध्ययनाची सवय . त्यामुळे मी विक्रीकर कायदा व नियम १९५९ , मध्यवर्ती कायदा १९५७ ……इ . पुस्तके स्वत: ३-४ वेळा वाचली . समजाऊन घेतली . अंमलबजावणी विभागाकडून आलेली एका पेपरवाल्याची Resaler ची निर्धारणा मी प्रथमच पूर्ण केली .पुढील Hearing करिता धारिणी श्री . शेखसाहेबांकडे पाठविली . माझा तपासणी -अहवालाप्रमाणे श्री. शेख साहेबांनी व्यापार्याची सुनावणी केली . व्यापारी गेल्यावर त्यांनी सर्वश्री. लाटकर, सावंत ,पारेख व मलाही केबिनमध्ये बोलावले . मला बसायला सांगून बाकीच्यांना माझा तपासणी अहवाल ( Report ) वाचावयास दिला .

श्री .शेख साहेब :- वाचा , वाचा नवीनच आलेल्या विक्रीकर निरिक्षक , श्री. लोणकरांनी , अगदी सर्व बाबींचा समावेश त्यांच्या तपासणी अहवालांत केलेला आहे , तुमच्या कोणाच्याच तपासणी अहवालात तसा उल्लेख नसतो .
कोणाच्याच काहिही लक्षात काही आले नाही .सगळे एकमेकाकडे पहात राहिले . सरते शेवटी श्री. शेख साहेबांनीच ” All purches bills are supported by 12 A certificate and R. C . numbers . No discribancy noticed .” असा उल्लेख नसतो , त्यामुळे S. T . R. A. मध्ये तसा दोषारोप होतो . ह्यापुढे ही बाब सगळ्यांनी लक्षात ठेवावी .
ह्या घटनेनंतर माझा आत्मविश्वास वाढला . तेव्हांपासून श्री. शेख साहेबांनी मलाही निर्धारणेची प्रकरणे /पुस्तके /खरेदी , विक्री बीले …..इ. तपासणीची काम देणेस सुरवात केली .मधूनमधून मला बोलाऊन काम अधिक चांगले कसे करता येते , ह्याचे मार्गदर्शनही करीत असत . मला हळूहळू मोठ्या व कठीण प्रकरणांत तपासणीचे काम देण्यास सुरवात झाली . काही दिवसात माझे स्थानांतरण श्री .ज .मा .गायकवाड ,सहाय्यक विक्रीकर आयुक्त ,( प्रशासन ) , परिक्षेत्र , ५ , मुंबई नगर विभाग , मुंबई -१० ह्यांचे कार्यालयात करणेत आले . तेथे माझेकडे Audit चे काम देण्यात आले .परिक्षेत्रातील सर्व विक्रीकर अधिकारी यांनी निर्धारणा आदेश पारीत केलेल्या निवडक प्रकरणांची यादी , त्या अधिकार्याचे निर्धारणा आदेश नोंदवहीतून घेऊन त्या सर्व प्रकरणांत (Audit ) परिक्षण करण्याते कामाची जबाबदारी मला देण्यात आली . उपरोक्त प्रकरणांत विक्रीकर कायदा व नियमाप्रमाणे
( १ ) शासकीय महसूलाची हानी झाली असल्यास तशा मुद्दे संबंधित विक्रीकर अधिकारी यांचे कडे स . वि .आ . ( प्रशा ) ,परिक्षेत्र ,५ , मुंबई ह्यांच्या स्वाक्षरीने Audit -Report पाठविण्यांत येई . त्याप्रमाणे विक्रीकर कायदा १९५९ ,च्या कलम ६२ प्रमाणे विक्रीकर अधिकारी ह्यांनी आदेश काढून महसूल हानी भरून काढण्याचे निर्देश देण्यात येत . अथवा /आणि ,
( २ ) विक्रीकर कायदा १९५९ ,कलम ५७ अंतर्गत ( Revised Order ) सुधारित आदेश स. वि. आ . ( प्रशा .) ,परिक्षेत्र ५ , ह्यांच्या स्वाक्षरीने ,विक्रेत्यास बोलाऊन आवश्यक तेथे आदेश काढण्यांत येई .
अशाच प्रकारे विक्रीकर उपायुक्त,( प्रशासन ), २ मुंबई , ह्यांच्या कडून आलेल्या निवडक- प्रकरण यादीप्रमाणे त्यांचेकडे धारीण्या पाठविल्या जात . ह्या कार्यालयांत मी मुंबई विक्रीकर कायदा ,१९५९ अंतर्गत कलम ५७ खालील आदेश , त्या वेळच्या शासकीय निर्देशाप्रमाणे मराठीतूनच काढीत असे . अर्थात हे आदेश श्री .गायकवाड ,साहेबांची पुर्व मंजुरी घेऊनच काढले जात .त्यांचा माझेवर खूप विश्वास होता .श्री. व्ही .व्ही .मोदी , वकील ,तर खाजगीत गमतीने , मला सहाय्यक , सहाय्यक विक्रीकर आयुक्त ,प्रशासन , परिक्षेत्र ,५ मुंबई ,म्हणत असत .
१९७६ सालच्या उन्हाळ्यात लहान भाऊ चि. मुरलीधरची रेल्वेमध्ये ‘ डिझेल – मेकँनिक ‘अँप्रेन्टिस ‘ च्या दोन वर्षाच्या प्रशिक्षणासाठी मध्यप्रदेशातील ईटारसी डिझेल शेडला निवड झाली . आता माझ्या अवघ्या रू.३००/- पगारातून माझा स्वत:चा मुंबईचा खर्च , अकोल्याचा घरचा खर्च आणि मुरलीधरचा ईटारसीचा खर्च अशी कसरत सुरू झाली . सुदैवाने त्याची वर्षानंतर ‘अँप्रेन्टीस ‘ करूता निवड झाली . डिझेल मेकँनिक आय .टि .आय. परिक्षेत ,त्याचा विदर्भीतून प्रथम क्रमांक येऊनही त्याची एम .एस .सी .बी ./एस. टी., …….इ. खात्यात Helper साठी सुद्धा निवड होऊ शकली नव्हती . आता तीन वर्षानंतर सुदैवाने त्याची रेल्वेत देन वर्षाच्या डिझेल मेकँनिक अँप्रेन्टीस ट्रेनिंगसाठी निवड झाली होती .
विक्रीकर निरिक्षकांची १९७४ च्या बँचमधील पुण्याच्या श्री . दिलीप टेंबेची नियुक्ति १९७६-७७ साली C- Ward Unit lll मध्येच श्री . शेख साहेबांकडेच करणेत आली . त्यांच्याही प्रशिक्षणानंतर ” प्रशिक्षण समाधानकारकपणे पूर्ण केले आहे .” असा अहवाल पाठविणेसाठी श्री .वंगाणी साहेबांची विशेष मदत झाली .श्री . टेंबेचे जवळचे नातेवाईक माझगांव /अंधेरीत होते , पण त्याला तेथे न जमल्याने,त्याने ‘मला तुझ्यासोबत राहू देण्याची कृपा कर ‘. अशी मला विनंती केली , मी त्याला मी कोठे, कसा राहतो हे सांगीतले . पण तो म्हणाला ‘मी तुझ्यासोबत खाटेखाली झोपायला तयार आहे ‘. माझे सहकारी विक्रीकर निरिक्षकांमध्ये आता श्री .आरेकर हे लिपिक पदावरून पदोन्न्ती मिळालेले तसेच स्थानांतरणाने अकोल्याचेच श्री .टोपले साहेबांचीही नियुक्ति झाली .
श्री . आरेकरांना कॉटनग्रीनला शासकिय निवास स्थान मिळाल्याचा आदेश मुंबई गृहनिर्माण मंडळ, महाराष्ट्र शासनाकडून मिळाला , त्यांनी १९६४ साली केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने १९७६ साली हा आदेश काढण्यात आला होता . श्री . आरेकरांना घाटकोपरला पंतनगरमध्ये पर्यायी घर मिळाले होते . त्यामुळे आता पुन: त्यांना शासकिय निवास स्थान नको होते , कारण पगारातून १० % कपातीशिवाय मेंटेनन्स मिळून अंदाजे रू .१५० /-भरावे लागणार होते .मला निवासस्थानाची फारच आवश्यकता होती .मी त्यांना रू. १५० /-दर महा देण्याचे मान्य केले .
मी श्री .आरेकरांसोबत गृह निर्माण कार्यालयाकडून निवासस्थानाचा ताबा घेतला . त्याच दरम्यान मेडशीचा सुभाष लोणकर (ब्राम्हण)हा मुलगा व त्याचेसोबत रिसोडचा सुभाष टाकळे हे दोघेजण जे पेईंग-गेस्ट म्हणून मस्जिदला राहीत होते ,माझेसोबत राहायला तयार केले.घरभाडे , राहण्याचा खर्च तिघांमध्ये
विभागला जाणार होता . त्याप्रमाणे आमचा तिघांचा ”ब्रम्हचारी आश्रम ” सुरू झाला . दिवाळीला अकोल्यालाजाऊन मी सौ. निर्मलाला घेऊन आलो . आता खर्चाचा निम्मा भार माझेवर पडला . पण माझा नवा संसार अनपेक्षितपणे सुरू झाला . डॉक्टर महालपूरकरांच्या सल्ल्याप्रमाणे सौ . निर्मलाची वैद्यकीय तपासणी(मूल होण्यासाठी) करून घेतली . क्युरेटीन करून घेतले, नमुना बीच कँडी हॉस्पिटलला तपासणीसाठी घेऊन गेलो . Pregnancy Report Positive आल्याने , मुलाची चाहूल लागताच अकोल्याहून ति . गं. भा . आईसाहेबांनाही घेऊन आलो . कॉटनग्रीनला सुभाष लोणकर ही मेडशीचाच राहणारा असल्याने सौ .निर्मलाला काही नवीन वाटले नाही . सोबत सुभाष टाकळेही होता .थोड्याच दिवसात माझा मेडशीचा वर्गमित्र व पूर्वाश्रमीचा हायस्कुल शिक्षक मित्र श्री . राजकुमार आहाळे उर्फ जैन आमच्या सोबतच कॉटनग्रीनला राहायला आला .
त्याच दरम्यान राज्य सरकारी कर्मचार्यांचा सर्वात मोठा ७४ दिवसांचा राज्यव्यापी संप सुरू झाला . माझी प्रकृति बिघडली होती पण सौ .निर्मलाची काळजी घेणे जास्त महत्वाचे होते . माझ्या मदतीला आता श्री. दादासाहेब देशमुख डोंगरगांवकर आणि श्री राजकुमार आहाळे (जैन ) होते . यथावकाश आमच्या संसार वेलीवर ७/९/७८ला ”मकरंद ”हे फूल आले. सर्वांची मने आनंदून गेली . अकोल्याला तार करून कळविले . ति .रा.रा.मोठे हिंगणेकरमामांना खूप आनंद झाला . सेंट जॉर्ज दवाखान्यात डॉक्टर महालपूरकरांनी बाळ/ बाळंतिणीची सगळी काळजी घेतली .
सगळ्या उपलब्ध लस टोचण्या वेळेवर दिल्या .लहान बाळाचे ( मकरंदचे )बारसे घाटकोपर येथे सौ .शशीमावशीकडे करण्याचे ठरले .बारसे अत्यानंदात पार पडले , रिसोडचे सुभाष टाकळेचे मामा व श्री. काटोले(आमचे नातेवाईक ) सुद्धा आले होते . अकोल्याला ति. रा. रा. मामा , मामी, आजी , ताई ,माई सगळ्यांना बाळाला ( मकरंद ) पाहण्याची फार घाई झाली होती .त्यामुळे ति .गं .भा .आई, सौ . निर्मला व लहानगा मकरंद ह्यांना घेऊन मी अकोल्याला गेलो . तेथे ति. रा .रा.मोठेमामा , लहान मामा , सौ .मोठ्या मामी ,ति.गं.भा . आजी (आईची आई)
चि.आशा मकरंदबरोबर खेळायला नियमित येत असत .
आता श्री . आरेकरांना त्यांच्या खोलीत राहायला यायचे होते , मला ही खोली सोडणे आवश्यक होते . नवीन खोली शोधण्याचे काम सुरू केले . सोबतीला सुभाष लोणकर , सुभाष टाकळे , माझे मित्र श्री.राजकुमार आहाळे ( जैन )ही मंडळी होतीच. टिटवाळा पर्यंत आमच्या बजेटमध्ये खोली मिळविण्याचे प्रयत्नचालू होते .

त्याच दरम्यान मुरलीधरला त्याच्या डिझेल मेकँनिक
अँप्रेन्टिस ट्रेनिंगचे एक वर्ष संपताच रेल्वे खात्याला अत्यंत आवश्यकता असल्याने तांतडीने डिझेल मेकँनिक पदावर कामावर रूजू करून घेतले होते , परंतू नंतर तो वयोमानात बसत नाही हे लक्षांत येताच पुन्हा ट्रेनिंगला परत पाठविले . तो आता पुढे काय करायचे? हे ठरविण्यासाठी मुंबईला आला होता . त्यावेळी सोनारांना शासकिय नोकरीत ५ वर्षे सवलत देण्याचे शासकीय आदेश आहेत ह्याची, त्याला आठवण करून दिली .तसे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तो अकोल्याला गेला . त्याच वेळी श्री.देशमुखांच्या नात्यातील चाळीसगांवचे श्री. नानासाहेब हे रेल्वे प्रवासी संघटना ,भुसावळचे सदस्यहोते ,ते भुसावळला जाऊन तेथील डिव्हीजनल ऑफीसरला प्रत्यक्ष भेटले. त्यांची धुळे येथे राहणारे मा. श्री .पटेल ,गृह राज्य मंत्री केंद्र सरकार , ह्यांची भेट झाली .त्यांनी डिव्हीजनल अधिकारी ह्यांना ” रेल्वेमध्ये अँप्रेेंटीसमध्ये येतांना जे उमेदवार ,वयोमर्यादेच्या आत असतील, त्यांना अँप्रेन्टीसशिप संपल्यावर रेल्वेच्या सेवेत सामाऊन घेतांना वयोमर्यादेची अट नसावी .” असा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले . मुरलीधरचे दोन वर्षाचे अँप्रेन्टीसशिप ट्रेनिंग संपले . दरम्यानच्या काळात मुंबईला माटुंगा रेल्वे वर्कशाँपमध्ये डिझेल मेकँनिकची तांतडीने आवश्यकता होती .तेथील वर्कशॉप प्रमुख योगा योगाने दिल्लीच्या माननीय श्री . मोरारजी देसाई ,पंतप्रधानांच्या घनिष्ट संबंधात होते .त्यांनी त्यांची अडचण श्री .मोरीरजींना बोलता बोलता मांडली . जाहिरात काढून डिझेल मेकँनिकची जागा भरण्यास दिर्घ कालावधी लागेल, त्यामुळे रेल्वे कामगार युनियनकडून संमती घेऊन विशेष बाब म्हणून तांतडीन् डिझेल मेकँनिकची जागा भरण्याचे निर्देश मिळविले . परंतू जागा मंजूर पदात अंतर्भूत नसल्याने तूर्तास ईलेक्ट्रीक मेकँनिक पदासाठी मुरलीधरची मुलाखत घेऊन निवड करणेत आली . पण प्रत्यक्षात काम मात्र डिझेल मेकँनिकचे करावयाचे अशी ईमर्जन्सी व्यवस्था करणेत आली . पगारही नियमित वेतन श्रेणी प्रमाणे सुरू झाला . एक वर्षाच्या कालावधीत बोनस तसेच यथावकाश पहिले ईन्क्रीमेंटही मिळाले .
तोपर्यंत केन्द्रीय गृह मंत्रालयाकडून अँप्रेन्टीसशिप कायद्यात , उमेदवार प्रवेश घेतांना वयोमर्यादेत असेल तर प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ”वयोमर्यादेची अट लागू करण्याची गरज नाही ” अशी सुधारणा करणेत आली होती .त्याबरहुकूम
चि .मुरलीधरला ईटारसीहून मुलाखतीसाठी हजर राहणेचे पत्र आले . रेल्वे मुलाखतीत उमेदवार रंग -आंधळा नाही ह्याची खात्री झाल्यावरच नियुक्ति देण्यात येते . त्याप्रमाणे मुरलीधरची मुलीखतीनंतर , नियुक्ति डिझेल मेकँनिक पदावर ईटारसी डिझेल शेडमध्येच झाली .
कॉटन ग्रीनचे घर सोडून विक्रोळीला टागोर नगर मध्ये ईमारत क्रमांक ३० मध्ये नांदुरा जवळच्या सौ निर्मलाच्या मामाच्या , दहीगांव माटोडाचे रहिवासी . श्री.वाघमारेच्या खोलीत , श्री. भाऊराव कांबळेच्या ओळखीने राहावयास आलो .तेथे श्री .कनगुटकर व श्री .मालवणकर हे आमचे शेजारी होते .मकरंद एक वर्षाचा झाला .त्यावेळी मुंबई पाहायला अकोल्याहून ति.मोठे हिंगणेकरमामा , आशा ,उषा ,मेघा ,सौ .निर्मला , मकरंदसह आले . विक्रोळीहून मुंबईला गेटवे ऑफ इंडिया , म्युझियम , गिरगांवचे तारापोरवाला मत्स्यालय ,समुद्र व चौपाटी , मलबार हिलचे हँगिंग गार्डन , व्हि .टी . स्टेशन ,प्रभादेवीचे उजव्या सोंडेचे गणपती मंदीर , काळबादेवी मंदीर , मुंबादेवी मंदीर ,घाटकेापरचे सर्वोदय हॉस्पिटल , तेथील काचेचे जैन मंदीर , समुद्रातील एलीफंटा, बोरीवलीचे संजय गांधी उद्यान , पवई तलावाजवळील उंच शिवमंदिर …ई. पाहून झाले . आता टिटवाळा गणपती मंदीर पाहायला जायचे ठरविले . टिटवाळापर्यंत लोकलने गेलो . तेथून घोडागाडीतून /टांग्यातून निघालो . त्यावेळी स्टेशनजवळच रोडवर उतार व वळण होते . नेमक्या तेथेच एका मोठ्या दगडावरून घोडागाडी घसरली . आम्ही सगळेजण टांग्यातून फेकल्या गेलो .मकरंदला नुकतेच खाली वर २-२ दांत आले होते . त्याचीच जीभ त्याच्याच दाताखाली आली .सगळे तोंड रक्ताळले होते . सौ .निर्मलाच्या नाकाला सूज आली. मी पडल्याबरोबर २ क्षण बेशुद्ध होतो . ति. मोठेमामा तर खूपच घाबरले होते . टिटवाळा मंदिरांत जाणार्या २-४ ऑटो चालकांनी त्यातील प्रवासी उतरऊन दिले व आम्हा सर्वांना टिटवाळा मंदिरात घेऊन गेले . तेथे अग्रक्रमाने आम्ही महागणपतीचे दर्शन घेतले . ऑटो चालकांनी आम्हाला पुन्हा टिटवाळा रेल्वे स्टेशनला आणले . तेथे राहाणार्या डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार करून घेऊन आम्ही सर्वजण विक्रोळीला परत आलो . सेंट जॉर्ज दवाखान्यात जाऊन सर्वांचे चेकअप करून घेतले . आमच्या ईमारत क्रमांक ३० मध्ये मकरंद हा एकमेव लहान मुलगा होता .त्याच्या भोवती लहान मुले आणि मोठी माणसे सदोदीत असत .शेजारचे दादा कनगुटकरांचा घोडा ,घोडा ,फार आवडायचा . ते माजी नगरसेवक होते .त्यांची लहान मुले , मुुली, तसेच मालवणकरांची मुले ईतर लहान मुलांच्या गराड्यातच मकरंद दिवसभर असायचा . त्या घराचा करारनामा संपत आला होता . नवीन घराचा शोध सुरू होता . मुरलीधरला अकोल्याला जायचे होते . त्याचेसोबत मकरंदला न्यायला त्याची तयारी होती .मकरंदचे कपडे ,खेळणी ..,ई.वेगळ्या पिशवीत भरून आम्ही हावडा मेलवर पोहोचलो . किमान पंधरा मिनीटे मकरंद तुम्हा दोघांनाही सोडून एकटा राहीला , तरच मी त्याला रात्रभर सांभाळून अकोल्याला घेऊन जाणे शक्य होईल , अन्यथा तुम्ही मकरंदला घरी घेऊन जाणे योग्य राहील.

त्याप्रमाणे शेवटी मकरंदला घेऊन ,आम्ही दोघेही विक्रोळीला आलो .विक्रोळी रेल्वे स्टेशनवरून घरी येतांना श्री .मालवणकरांच्या प्रिंटींग प्रेसमधील एका मुलाने मकरंदला बोलावले.श्री.मालवणकरांनी विचारले ,एव्हड्या रात्री १० वाजता ,लहानग्या मकरंदला घेऊन कोठून आला आहात . आम्ही दोघांनीही त्यांना मकरंदला अकोल्याला मुरलीधरसोबत पाठवयाचे होते . एव्हड्या लहान मुलगा एकटा , आईशिवाय कसा राहील ? प्रेसमधला तो मुलगाही म्हणाला , कारण काय मकरंदला अकोल्याला पाठवावयाचे ? अहो माझ्या बहीण जावयाची ईमारत क्रमांक २९ मधील खोली , जर आज रात्री १२ वाजेपर्यंत व्यवहाराची रक्क्म न मिळाल्यास ती खोली श्री .लोणकर काकांना देण्याची मी व्यवस्था करू शकेन . रात्री १२ वाजता संबंधित व्यक्तिने रक्कम दिली नाही . श्री .कनगुटकरांचा संदर्भ असल्याने डिपॉझीट न घेता खोलीची किल्ली ताब्यात घेतली आणि रातोरात सामानही ईमारत क्रमांक २९ मधील तिसर्या मजल्यावरील खोाली क्रमांक ९४८ ताब्यात घेऊन हलविले . नंतर यथावकाश
डिपॉझीटची रू.३० हजाराची रक्क्म हप्त्याहप्त्याने खोलीवाल्याला श्री ,कनगुटकरांच्या हस्ते दिली .तो काळ १९७९-८० चा होता .माझे फक्त महाराष्ट्र बँक ,माझगांव येथेच सेव्हींग खाते होते . मला डिपॉझीटची रकमेची जुळवा जुळव करायची होती .ति.रा.रा.हिंगणेकरमामांकडे विनंती केली ,त्यांनी मला रू.१००००/- ची रक्क्म S.B .I .डिमांड ड्राफ्टने पाठविली .त्यासाठी मी स्टेट बँके विक्रोळी (प ) येथे बचत खाते उघडले . मकरंद हळूहळू मोठा होत होता .
आता पुन्हा लहान बाळाची चाहूल लागली . मी सौ .निर्मलाला सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये भरती केले.मकरंदला घेऊन विक्रोळीला घरी आलो . स्वयंपाक केला . मकरंदला खाऊ , पिऊ घातले ,झोपवले . दुसर्या दिवशी निर्मलासाठी भाकरी ,भाजी ,लोणचे घेऊन दवाखान्यात गेलो . मला मकरंदला ऑफीसमध्ये नेणे शक्य नव्हते , सुटीही काढता येत नव्हती . ह्या सगळ्या बाबी मी डॉक्टरांना सांगीतल्या . त्यांना मी सौ.निर्मलाला अकोल्याला माझ्या जबाबदारीवर घेऊन जाण्याची परवानगी मागीतली . डॉक्टरांनी अकोला येथील लेडी हार्डींग्ज हॉस्पिटलच्या मुख्य डॉक्टरांना देण्यासाठी पत्र दिले .माझी प्रकृतिही ठिक नव्हती . मी सौ. निर्मला व मकरंदला घेऊन अकोल्याला गेलो , रेल्वे स्टेशनजवळच्या लेडी हार्डिंग हॉस्पिटलमध्ये सौ .निर्मलाचे नांवाची नोंदणी केली. घराजवळच्या ,दाबकीरोड वरील कस्तुरबा दवाखान्यातही नांव नोंदणी केली होती . लेडी हार्डींग्ज दवाखाना रेल्वे स्टेशनजवळ होता .तेथे निर्मलाची जानेफळची मैत्रीण व नातेवाईक सौ . झाडे ह्या मिडवाईफ होत्या . त्यांच्या सल्याने माझे शासकीय ओळखपत्र दाखऊन स्पेशल रूम घेतली . अकोल्याला ऊन्हाळा जास्तच असतो, बाळ बाळंतिणीसाठी स्पेशल रूम व आमच्या जुन्या ओळखीच्या श्रीमती शांताबाई २४ तास मदतीसाठी होत्याच . मी सौ . निर्मलाला घेऊन दवाखान्यात आलो . ऑपरेशन रूममध्ये निर्मलाला नेले . दिनांक २२/४/१९८० आम्ही सर्वजण बाहेर सौ निर्मलाच्या सुरक्षित सुटकेसाठी देवाची प्रार्थना करीत होतो ,सौ. झाडे नर्सबाईंनी बाहेर येऊन मुलगा झाला , बाळ बाळंतीण सुखरूप आहेत . ऑपरेशनचे काम पडले नाही . सर्वांना खूप आनंद झाला . सर्वांना पेढेे वाटले . बाळ बाळंतिणीसाठी श्रीमती शांताबाई होत्याच .
एप्रिलचा कडक ऊन्हाळा असल्याने पाळण्याात बााळाच्या छोट्या तालगुलीखाली ( अंथरूणाखाली ) गुणाने थंड अशी बारीकचिवळची भाजी दररोज टाकावी लागत असे . अकोल्याला आमचे नातेवाईक खूप होते , दवाखान्यात दररोज बाळाला बघायला रांग लागायची .बाळाचे बारसे धुमधडाक्यात पार पडले . बाळाचे नांव ”आनंद ” ठेवले .माझी प्रकृतिची तक्रार पार पळाली .सरकारी डॉक्टरांचे फिट सर्टिफिकेट घेऊन मुंबईला परत कामावर रूजू झालो . ऑफीसात श्री .शेख साहेबांनी मला डॉक्टरांच्या प्रमाणपत्रावर अकोल्याच्या सिव्हिल सर्जनची स्वाक्षरी आणायला सांगीतले . त्याप्रमाणे स्वाक्षरी आणल्यावर मला माझी अर्जित रजा मंजूर करून पूर्ण वेतनहि मिळाले . यथावकाश सौ .निर्मला ,मकरंद व आनंदसह मुंबईला आले .आनंदने मुंबईला आपल्याच घरात प्रवेश केला . मकरंद व आनंदची जोडी टागोर नगर , ईमारत क्रमांक २९ /९४८ लवकरच सर्वांची आवडती झाली .त्यांचा आजुबाजूच्या छोट्या मित्रांसमवेत त्यांचा दिवस कसा जाई समजत नसे.

त्याच दरम्यान चि. कु.ज्योतीताईचे लग्न खामगांवच्या श्री. उद्धवराव उंबरकरांच्या ज्येष्ठ मुलाशी चि.सत्यशीलशी ठरले . लग्न अकोल्यालाच करायचे ठरले . मी माझ्या मित्रमंडळींकडून उसने पैसे घेऊन रू.१५ हजार जमविले . ति. हिंगणेकर मामांच्या चि .आशाचे लग्न निंभोरा (खानदेश )येथील चि. रविंद्र काशीनाथ बुटेशी अकोल्याल्याच ३ महिन्यापूर्वीच पार पडले होते.दोघेही एम .एस .ई .बी .मध्ये ज्यनिअर ईंजिनिअर पदावर होते . ति .मोठेमामांनी चि . मुरलीधरच्या लग्नासाठी मुली पाहायचे ठरविले . चि.ज्योतीचे लग्न होऊन तीची सासरी पाठवणी खामगांवला केल्यानंतर लगेच ति.मोठेमामांना घेऊन मी चि .मुरलीधरसाठी वधु संशोधनास निघालो. प्रथम कै .गीता मावशीच्या मुलाला श्री .प्रेमभाऊला घेण्यासाठी बैतुलला गेलो . तेथून मुरलीधरला घेण्यासाठी ईटारसीला डिझेलशेडला पोहोचलो . तेथे त्याच्या लेक्चरर श्री . करंदीकरांकडून ४-५ दिवसाची सुटी मंजुर करून घेतली . तेथून आम्ही चौघेही प्रथम भोपाळला गेलो . त्यानंतर धारला संध्याकाळी पोहोचलो .तेथे मुलगी पाहून व धारच्या प्रसिद्ध देवीचे दर्शन घेऊन खंडवा येथे ३-४ मुली पाहिल्या . तेथून बर्हाणपूरला चि. सौ .आशा बुटेच्या चुलत सासर्याची मुलगी पाहायला गेलो .तेथे पाहुणचार घेऊन खामगांवला सत्यनारायण पुजेला चि .सौ .ज्योतीताईकडे गेलो . अकोल्याला घरी गेल्यावर प्रेमभाऊच्या सल्याने व ति .हिंगणेकरमामांचा सारासार विचार घेऊन चि .मुरलीधरने खंडव्याची चि. कु .अनुराधा सोनी पसंत असल्याचे सांगीतले . त्याप्रमाणे खंडव्याला मुलीकडे पसंती कळविली . लग्नाचा खर्च वर , वधूने आपापला करावा असे ठरले . मी मुंबईला परत आलो .पुन्हा लग्नासाठी अकोल्याला पोहोचलो . खंडव्याला अकोल्याहून रेल्वेने लग्नाच्या वर्हाडासह पोहोचलो . खंडवा (म. प्र. ) भागात धर्मशाळेत लग्न व वराचा जानोसा (थांबण्याची) व्यवस्था केली होती . लग्नानंतर वधु , सौ . अनुराधाला घेऊन अकोल्याला परत आलेा . मुरलीधर ईटारसीला पुन्हा ट्रेनिंगला गेला .आम्ही सर्व मुंबईला परत आलो . मित्र परिवाराची ऊसनवारी हळूहळू ह्प्त्या हप्त्याने पुढे ४-५ वर्षे परतफेड करीत होतो. सौ. निर्मलाला पुन्हा बाळाची चाहूल लागली.हयावेळी विक्रोळीला कन्न्मवार नगरमध्ये शुश्रुशा हॉस्पिटलमध्ये , सेंट जॉर्ज हॉस्पिटल,व्ही. टी. ,घाटकोपर (पश्चिम)ला म्युनिसिपल दवाखान्यात (सौ. शशीमावशीचे घरा जवळच्या )सुध्दा नांव नोंदविले होते . ह्यावेळी सौ निर्मलाला विक्रोळी/व्हि.टी./ घाटकोपर अशा सर्व ठिकाणी दिलेल्या तारखेस आणि वेळेवर जाऊन डॉक्टरांकडून तपासणी करून घेत असे . सौ.निर्मलाला ह्या
तपासणीस जाण्याचा खूप त्रास झाला . मी ऑफीस कामामुळे तर ,घरून मकरंद /आनंदला सांभाळावयाचे असल्याने सौ . निर्मलाला एकटीला जावे लागे .
दिनांक ६/१ /१९८२ ला प्रीतिचा जन्म सेन्ट जॉर्ज हॉस्पिटलला झाला .आता सौ. निर्मलाची डॉक्टरांच्या सल्याप्रमाणे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली . छोट्या बाळाचे बारशाचा समारंभ थाटाने व आनंदाने पार पडला . त्यानंतर सर्वजण यथावकाश जानेफळला श्री. किसनराव पिंजरकर आजोबा ,आजीला भेटायला जाऊन आलो .
माझी बदली विक्रिकर निरिक्षक, पदावरच वि .उपा . प्रशासन ,कोकण भवन ,नवी मुंबई येथे झाली . परंतु श्री. गायकवाड , स.वि. आ .प्रशा .,परि ,५ , ह्यांनी श्री. वा. हि . देशमुख , तत्कालीन अपर विक्रीकर आयुक्त ,महाराष्ट्र राज्य , मुंबई ह्यांना प्रत्यक्ष भेटून , विनंती करून ,पुढील आदेशापर्यंत श्री . वि . वा .लोणकर , विक्रीकर निरिक्षक, ह्यांना कार्यमुक्त करू नये , असा आदेश मिळविला . मी स. वि. आ . प्रशासन ,परिक्षेत्र , ५ , मुंबई नगर विभाग , मुंबई ,१० येथेच कार्यरत राहीलो .
पुढील वर्षी माझी बदली विक्रीकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य ,मुंबई ह्यांच्या कार्यालयात कार्यासन अधिकारी Rec -2 च्या श्री . व्ही . टी. देशमुख साहेबांकडे करणेत आली . त्यांचाही माझेवर खूप विश्वास होता .तेथे माझे संबंध ऑफीस कामानिमित्य ,मंत्रालयातील , श्री . कुळकर्णी , सहाय्यक सचिव, अर्थ विभाग , ह्यांचेशी बरेच वेळा आला . पुढील काळात मला त्याचा खूप उपयोग झाला . त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून प्रकरणे येत . मला बरेच नवनवीन शिकायला मिळाले .श्री .देशमुख साहेबांचा माझेवर खूप विश्वास होता . त्यांचे साहेब, अपर विक्रीकर आयुक्त , महाराष्ट्र राज्य ,मुंबई पदावर श्री .न.का .फडणवीस साहेब (I.A.S. ) होते . दरम्यान माझे वेतनात १९७६ साली वेतननिश्चिती करतांना एक वेतनवाढ जास्त दिल्याचे Pay Fixtation Unit ने निदर्शनास आणले . परिणामी माझ्या पगारातून जादा दिलेल्या रकमेची (Excess Payment ) वसुली करावयाची होती . त्याचवेळी विक्रीकर निरिक्षकाच्या सेवा ज्येष्ठता यादीतील माझ्यानंतरच्या श्री . मराठे विक्रीकर निरिक्षकाचे वेतन माझ्यापेक्षा एका – वेतन वाढीने जास्त निश्चित झाल्याने , माझेवर अन्याय झाल्याचे स्पष्ट झाले . त्या अनुषंगाने माझे वेतनही श्री . मराठे , यांच्या इतकेच निश्चित करणेत यावे ह्यासाठीचा माझा विनंती अर्ज मंत्रालयात अर्थ विभागाकडेच प्रलंबित होता . परंतू माझा अर्ज फेटाळण्यात आला . माझ्या जादा वेतन-वाढीमुळे जादा दिलेल्या (Excess Payment ) रकमेच्या वसुलीबाबत , ”श्री . लोणकर , यांचे पगारातून रू. १५०/- प्रमाणे २० हप्त्यात वसूल करावी ” असा मंत्रालयातून आदेश प्राप्त झाला . त्याप्रमाणे माझ्या त्या महिन्याच्या वेतनातून रू . १५० /- इतकी वसुलीही करणेतआली . उपरोक्त मंत्रालयाच्या आदेशाची प्रत मला देण्यात आली नव्हती , ह्याशिवाय सदर आदेशाप्रमाणे माझेकडून एकूण रू.३०००/-ची रक्कम कशी काढली हे स्पष्ट नव्हते . तसेच एकतर ऱू.१५०/- दरमहा किंवा २० हप्ते कोणत्यातरी एकाच पध्दतिने वसूली करणे योग्य होते .
त्यामुळे मी आयुक्तांकडे अर्ज करून १) माझ्या पगारातून रू .१५०/-केलेली कपात रद्द करणेत यावी . २)मंत्रालयाचा आदेश चुकीचा असल्याने फेरआदेशासाठी मंत्रालयांला परत पाठविणेत यावा . ३)मंत्रालयातून येणारा आदेश प्रथम माझेवर बजावण्यात यावा , त्यानंतरच माझ्या पगारातून वसुली करणेत यावी.
४) जादा वेतन वाढीमुळे किती जादा रक्कम मला अदा करणेत आली हे प्रथम निश्चित केल्यानंतरच प्रकरण मंत्रालयाला पाठविणेत यावे . अशी विनंती केली .
सुमारेदोन महिन्यानंतर मंत्रालयातून ‘ दर महा रू.१५०/-प्रमाणे जादा अदा केलेल्या वेतनाच्या रकमेची वसुली करण्याचे आदेश प्राप्त झाले .
माझे साहेब श्री .व्ही .टी . देशमुख , यांचे आई व वडीलांचे दीर्घ आजारानंतर २५ दिवसांच्या अंतराने निधन झाले . त्यामुळे श्री .देशमुखसाहेब रजेवर होेते .त्यांनी रजा वाढविण्यासाठीचा अर्ज परस्पर न पाठविता Self Responsibility मानून स्वत:Additional C.S.T. म,रा,मुंबई, श्री . फडणवीस साहेबांना भेटायला आले होते .
त्याच दिवशी सकाळी आमच्या ऑफीस मध्ये स्वत: श्री.फडणवीस साहेब , अ. वि. आ. म. रा. मुंबई हे भेट देण्यासाठी आले होते . श्री. देशमुख साहेब रजेवर असल्याने त्यांच्या कार्यालयात जाणारा धारिणींचा ओघ थांबला होता . श्री .फडणवीस साहेब आले तसेच , श्री .देशमुख साहेबांच्या केबिनमध्ये जाऊन पोहोचले. तेथे पाहतात तो काय ? सगळा टेबल धारिण्यांनी भरलेला होता .
श्री .देशमुख साहेबांचा कामाचा कार्यभार ( Charge )अद्याप पावेतो कोणालाही दिला नव्हता, ही बाब त्यांच्या लक्षांत आली .
त्या दिवशी श्री . देशमुख साहेब येतांच श्री. फडणवीस साहेबांनी त्यांना पहिलाच प्रश्न विचारला ; तुमचा Charge कोणाला देणे योग्य होईल ?
मागील महीनाभरापासून कामाची Pendancy आहे त्याची जबाबदारी कोण घेणार ?
श्री.देशमुख साहेबांनी थोडा विचार करून सांगीतले की , माझ्याच कार्यालयातील , श्री.लोणकर , विक्रीकर निरिक्षक यांचेकडे माझा Charge देण्यास हरकत नाही . त्यासाठी त्यांना आवश्यक तेथे स्वाक्षरीचे अधिकार देण्यात यावे . ते १५-२० दिवसात सगळी Pendancy खात्रीने काढतील . त्यांचेवर माझा पूर्ण विश्वास आहे .श्री.फडणवीस साहेबांनी मला केबिनमध्ये बोलाऊन घेतले , अन् , कार्यासन अधिकारी Rec-2 ची Pendancy काढायला सांगीतले .त्यासाठी शासनाकडे पाठवावयाची पत्रे वगळता सगळ्या पत्रांवर स्वाक्षरीचे अधिकार ,श्री. देशमुख साहेबांच्या संमतीने तुम्हाला देण्यात येत आहेत असे सांगीतले . मी स्मरणपत्रे , विक्रीकर उपायुक्तांकडून मागवावयाच्या माहीतीची पत्रे ……इ .वर कार्यासन अधिकारी ,वसुली -२ तसेच अपर विक्रीकर आयुक्त ,महाराष्ट्र राज्य ,मुंबई करिता महणून स्वाक्षरी करायला सुरवात केली . साधारणपणे २० दिवसांत सर्व Pendancy संपली . ही बाब त्यावेळच्या माझ्याबरोबरच्या सहकारी कर्मचारी वर्गाच्या कायम लक्षांत राहीली. सर्व विक्रीकर उपायुक्तांना त्यांच्याकडील शासनाकडे पाठवावयाच्या प्रकरणांत प्राधान्याने लक्ष देण्यासाठी अपर विक्रीकर आयुक्तांच्या स्वाक्षरीने पत्रे पाठविली .श्री .देशमुख साहेब रजेवरून परत आल्यानंतर त्यांचेकडे श्री. फडणवीस , अपर विक्रीकर आयुक्त ,महाराष्ट्र राज्य ,मुंबई ह्यांनी माझ्या केलेल्या कामाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले . ह्याचा फायदा मला माझ्या पुढच्या ज्येष्ठ विक्रीकर निरिक्षक पदी ,पदोन्न्तीच्या वेळी झाला . मला V.V. Mody, वकीलांनी तर मी विक्रीकर भवनांत कोठेही भेटलो तर वाकून ,”नमस्कार , Additional ‘ ,Additional C. S . T. साहेब ,” म्हणायला सुरवात केली . मंत्रालयात ऑफीसच्या कामासाठी Finance Department मध्ये साहेब मलाच पाठवीत असत .
आता माझ्यावर माझ्या कुटुंबातील चि. कु . सुषमा उर्फ माईच्या लग्नाची जबाबदारी राहीली होती . मी आता विक्रोळीला आई ,प्रमोद ,माई , सौ .निर्मला, मकरंद व आनंद राहात होतो .प्रमोदचे शिक्षण सुरू होते . ति .हिंगणेकरमामांना त्यांचेकडे आलेल्या पाहुण्यांना चि .उषा पसंत नसल्यास ,त्या पाहुण्यांना आमचा पत्ता देण्याची विनंती केलेली होती . ह्याचे कारण आमचा सोनार समाज बहुतांश विदर्भातच जास्त आहे .
एकदा मी सौ .निर्मला , मकरंद, आनंद व प्रीतिसह जानेफळला गेलो असता ,ति. पिंजरकर मामांनी अमडापूरच्या दिगंबरपंत उपाख्य तात्यां रत्नपारखीच्या मधल्या मुलाबद्द्ल विचारले . सदर मुलगा चि. अनिल हा अकोला येथून M.Sc .(Agriculture )झाल्यावर ठाणे जिल्ह्यात मोखाडा येथे कृषि अधिकारी पदावर काम करित असल्याची माहिती दिली .परतीच्या प्रवासात आम्ही अमडापूरला गेलो . तेव्हां त्यांची श्री. तात्यांना घेऊन मुंबईला बॉंम्बे हॉस्पिटलला तपासणीसाठी घेऊन जाण्याची तयारी झालेली होती. आम्ही त्यांना आमच्या सोबतच , हावडा एक्सप्रेसने अनारक्षित डब्यात न जाता
रात्री सेवाग्राम एक्सप्रेसने चलण्याची विनंती केली . नाशीकला मोखाड्याहून आलेला लहाना मुलगा अनिल रत्नपारखी ,अँग्रीकल्चर ऑफीसर ,सॉईल कॉन्झरव्हेशन खात्यात नोकरीला होता तो आम्हाला सेऊन मिळाला . आमच्या सोबत दिगंबर रत्नपारखींसोबत (तात्या) त्यांचा मोठा मुलगा सुभाष, मुलगी, पत्नी ,दोन पुतणेही होते . मी सगळ्यांना बोरीवलीला श्री . कालीदास बानोरेकडे (नातेवाईकाकडे) जाण्याऐवजी विक्रोळीला घरी येण्याची विनंती केली .आमचे घर लहान One Room Kitchen 200 चौरस फुटाचे असले तरी सौ.निर्मलााचे मन फार मोठे होते . आम्ही आता घरी एकूण १६ जण झालो होतो .

हयाच सुमारास माझी ज्येष्ठ विक्रीकरनिरिक्षक पदी पदोन्न्ती झाली . माझ्या जादा प्रदान केलेल्या वेतन वसुलीच्या कामात सुलभता यावी , या द्दष्टीने माझी ज्येष्ठ विक्रीकर निरिक्षक पदावर स. वि . आ . (प्रशासन ), परिक्षेत्र ,५ , मुंबई नगर विभाग , मुंबई येथेच नियुक्ति करणेत आली. त्यावेळी श्री . शिरोळकर साहेब , सहाय्यक विक्रीकर आयुक्त प्रशासन , परिक्षेत्र , ५ , होते . ह्या
कार्यालयात मी तीन वर्षे कार्यरत राहीलो . त्यावेळी श्री .शिरोळकर साहेबांच्या खास मर्जीतील मी व श्री . चव्हाण , विक्रीकर निरिक्षक ,असे दोघेच होतो . स.वि. आ .प्रशा, परिक्षेत्र , ५ ,अंतर्गत ११ विक्रीकर अधिकारी व त्यांचा कर्मचारी वर्ग होता . त्या सगळ्यांची निर्धारणा , वसुली ,Audit (परिक्षण ),विवरण पत्रके , मुंबई विक्रीकर कायदा अंतर्गत काढलेले परतावा आदेश काढणे , आलेले Cross Check तपसणीसाठी पाठविणे , राज्यात तसेच राज्याबाहेर ( R . R .C. ) पाठविणे …इ कामावर लक्ष ठेवणे , विक्रीकर अधिकार्यांना मध्यवर्ती विक्रीकर कायद्याखालील C /H/ E 1……ई . नमुने ( Declarations ) मागणी प्रमाणे देऊन त्याचा हिशेब ठेवणे , शिवाय आस्थापनेची कामे वेतन बिले काढणे ,अर्जित रजा मंजूर करणे , वार्षिक अंदाज पत्रक तयार करून विक्रीकर उपायुक्त कार्यालयाला पाठविणे ….इ . कामे करून घेई . विक्रीकर अधिकारी कार्यालयाला अचानक भेटी देऊन त्यांच्या कामातील दोष /चुका काढून त्याचे निराकरण करून घेणे ….ई. कामावर नियंत्रण ठेवणे , स. वि.आ .प्रशा. परि.५, ह्यांच्या संमतीने करावी लागत. तेथे असतांना एका लेखा परिक्षणाच्या प्रकरणात विक्रेत्याचे प्रतिनिधि श्री. संपत ,अँडव्होकेट हजर होणार होते . मला त्याच दिवशी अचानकपणे मकरंदच्या डोळ्याच्या पापणीवर आलेल्या गाठीच्या संदर्भात दादरला डॉक्टर बढेंकडे जावे लागल्याने कार्यालयात येण्यास ३० मिनिटे उशीर झाला होता .श्री. संपत साहेब माझी वाट पाहत थांबले होते .मी ऑफीसमध्ये येताच माझ्या टोबलावरील संबंधित फाईल काढली .श्री. संपत अँडव्होकेटना बोलाविले ,त्यांची कोणत्याही प्रकरणात समोरच्या तपासणी अधिकार्याशी बोलतांना वैयक्तिक ( Personnel ) बोलण्याची सवय होती .विक्रीकर विभागातील ५-६ अग्रगण्य वकिलांत अत्यंत हुशार Consultant म्हणून १९४७ सालापासून दरारा होता .आमचे स.वि.आ. श्री.शिरोळकर साहेबांनी त्यांच्यामुळेच( Legal Division) लिगल विभागातून बदली करवून घेतली होती . आज माझी त्यांच्याशी गाठ होती,त्यातही माझ्या ऊशीरा ऊपस्थितिमुळे ते वैतागलेले होते ,मी त्यामानाने अगदीच अननुभवी होतो . आमचे संभाषण खालीलप्रमाणे :-
मी : नमस्कार , या साहेब , बसा.
श्री .संपत अंडव्होकेट : ही पहा ,तुम्ही काढलेली नोटीस .माझ्या विक्रेत्याची धारिणी काढा .अगोदरच मला एक तास खोळंबावे लागले आहे .
मी : ही पहा तुमच्या विक्रेत्यची घारिणी . मी कालच ती टेबलवर काढून ठेवली होती . आज मला माझ्या मुलाला व पत्नीला घेऊन तांतडीने डॉक्टर बढेंकडे दादरला जावे लागले . त्यामुळे मला येण्यास ऊशीर झाला , क्षमा असावी .
श्री .संपत : ठिक आहे .
मी : महोदय , माझ्या जन्माअगोदरपासून आपण ह्या व्यवसायांत आहात . मी अगदीच अननुभवी आहे .आपणास माझी विनंती आहे की , आपणासोबत मी ह्या प्रकरणात कायद्याबाबत वादविवाद करू शकत नाही .आपण मला प्रथम फक्त ५-६ वाक्ये बोलण्याची संधी द्यावी .
श्री .संपत : O. K.
मी : आज आपण सदर प्रकरणांत १) आपल्या लेटरहेडवर वा विक्रेत्याच्या लेटर- हेडवर ,विक्रीकर कायद्याखालील नियमाप्रमाणे आवश्यक असे Authaurity Letter आणलेले नाही असे दिसते
२) ह्यासाठी आपणास विनंती की , मी माझा सदर प्रकरणातील अहवाल Report लिहितांना आपली ऊपस्थिति नोंदवून आपले म्हणणे “ऊदगारवाचक” चिन्हात लिहितो .आपणास तो मान्य झाल्यास आपण त्याखाली तुमची स्वाक्षरी करावी . मी माझा अहवाल पुर्ण करून माझी सही करून , साहेबांकडे फाईलघेऊन जाईन .
३) आपण कायदेशीर बाबींचा ऊहापोह आमच्या साहेबांशी करावा , असे मला वाटते .
श्री . संपत : O. K.
मी ऊपरोक्त ठरल्याप्रमाणे माझा अहवाल लिहिला .त्यावर प्रथम श्री.संपत अँजव्होकेटांची स्वाक्षरी घेतली . माझी सही करून फाईल आंत केबिनमध्ये साहेबांकडे घेऊन गेलो .श्री .शिरोळकर साहेबांना मी ऊशीरा येत असल्याबाबत कळविले होतेच . मी केबिनमध्ये जाताच साहेब मला म्हणाले , लोणकर , हजेरीपटावर सही नंतर करा प्रथम बाहेर श्री .संपत अँडव्होकेट एक तासापासून खोळंबलेले आहेत.कोणत्या प्रकरणांत ते हजर झाले आहेत ,ते पहा .लगेच जा बघु .
मी : सर ,मी श्री.संपत अँडव्होकेटना अटेंड करूनच व त्यांची माझ्या Report वरच ते मान्य असल्याची सही आहे .
श्री. शिरोळकरसाहेब : अहो ,जो माणूस फाईलच्या प्रोसिडिंग शीटवर ४ वेळा वाचल्या शिवाय सही करत नाही त्या माणसाने तपमही लिहिलेल्या रिपोर्टवर सही केली असे तुम्ही म्हणता ,ते मान्य करायला माझी तयारू नाही .
तेव्हढ्यात श्री .संपत अँडव्होकेटच केबिनच्या दरवाज्यातून परवानगी घेऊनआत आले .त्यांनी माझ्या रिपोर्टवर सही केल्याचे मान्य केले आणि सदर प्रकरणात १५ दिवसानंतरची तारीख मागीतली . साहेबांनी मला तसे करण्यास सांगीतले. श्री .संपत : साहेब ,माझी आणखी एक विनंति आहे . मी १९४७ पासून प्रँक्टिस करित आहे ,पण श्री .लोणकरांनी मला वादविवाद न करता माझेकडून त्यांना पाहिजे तसे महसुलाचे नुकसान न होऊ देता माझेकडून वदऊन घेतले व माझी त्यावर सहीसुद्धा घेतली ,कृपया ही फाईल तुमच्याच ताब्यात ठेवावी, मी शासनाकडून योग्य तो बदल कायद्यात करून घेऊन येतो .
ह्यानंतर माझी व श्री. संपत ,अँडव्होकेट यांची जेव्हा जेव्हा कार्यालयात वा कार्यालयाबाहेर भेट होई त्या त्या वेळी त्यांच्या सोबत कोणीही ,कितीहीव्यक्ति असल्यातरी नमस्कार करित असत .सगळ्यांना ह्या बाबीचे फार आश्चर्य वाटत असे .
मला विक्रीकर निरिक्षकाची खात्याची (Departmental Examination) परिक्षा भाग १ व २ ची परिक्षा तीन वर्षात उत्तीर्ण होणे आवश्यक होते . मी भाग १ व २ ची परिक्षा एकाचवेळी देण्याचे ठरविले . त्याप्रमाणे मी दोनही परिक्षेचे अर्ज सहाय्यक विक्रीकर आयुक्त, ( प्रशासन ) ,५ मुबई नगर विभाग , मुंबई-१० यांचे मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविणेसाठी दिला .परंतु एका वर्षी एकाच परिक्षेचा फॉर्म भरता येईल , असे मला सांगण्यात आले . मी स्वत: श्री .वंजारी , स. वि . आ .( प्रशा. ) ५ , ह्यांना भेटलो . विक्रीकर निरिक्षकाची परिक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयेगाकडून घेतली जाणार आहे . त्यांनी अशी कोणतीही अट नमूद केलेली नाही , असे वाटते . तसे असेल तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग मला भाग २ च्या परिक्षेचा अर्ज न स्वीकारता परत पाठविल . तेव्हां माझे भाग १ व २ च्या परिक्षेचे अर्ज पुढे पाठविणेचे आदेश द्यावेत ही विनंती . त्याप्रमाणे माझे परिक्षेचे दोनही अर्जही पुढील कार्यवाहीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविणेत आले . माझे परिक्षेची प्रवेश -पत्रे ही आली. परिक्षेचा निकालजाहीर झाला . मी , विक्रीकर निरिक्षक भाग १ व २ दोनही परिक्षेत एकाचवेळी उत्त्तीर्ण झालेला संपूर्ण महाष्ट्रातील पहिलाच ऊमेदवार होतेा . माझ्या सेवापुस्तकांत परिक्षा उत्तीर्ण झाल्याची नेांद घेण्यात आली . तद्वतच महाराष्ट्र शासनाची ‘ मराठी ‘ आणि ‘ हिंदी ‘ परिक्षाही अगोदरच समकक्ष परिक्षा उत्तीर्ण झालेलो असल्याने त्यातून ‘ सूट ‘असल्याची नोंदही सेवा पुस्तिकांत घेण्यात आली . महाराष्ट्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे मी विक्रीकर निरिक्षकाची परिक्षा उत्तीर्ण झालो असल्याने आता मी विक्रिकर अधिकारी पदावर पदोन्नती झाली नसली तरीही खात्याची ( Departmental ) महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणार्या ” विक्रीकर अधिकारी ” पदासाठीच्या परिक्षेला बसण्यास पात्र होतो . अशावेळी मला कालावधीची अट लागू होत नव्हती . मला ‘ विक्रीकर अधिकारी ‘ पदावर पदोन्नती , विक्रीकर निरिक्षकाच्या सेवा-ज्येष्ठतेचे प्रकरण बरीच वर्षे हायकोर्टात ( High Court ) न्यायप्रविष्ट असल्याने फार उशीरा मिळणार होती

त्या अगोदर मला ” ज्येष्ठ विक्रीकर निरिक्षक ” पदावर पदोन्न्ती मिळाली त्या पदावर मी तीन वर्षे काम केले . महाराष्ट्र शासनाने राज्यात नवीनच ‘ प्रवेश कर ‘ ( Entry Tax ) लागू केला , त्यावेळी मला ” प्रवेश कर अधिकारी ” ( Entry Tax Officer ) पदावर पदोन्न्ती देण्यात आली . सदर पद ( Gazated Post ) ‘ राजपत्रित अधिकारी ‘ म्हणून गणले गेले . एक वर्षभर सदर पदावर मी रमाबाई आंबेडकर नगर , घाटकोपर , येथे R.T. O . कार्यालयात काम केले. परंतु पगार/वेतन मात्र ज्येष्ठ विक्रीकर निरिक्षकाचे मिळायचे . घाटकोपरला मी R.T.O. कार्यालयात ( Entry Tax Officer ) प्रवेश कर अधिकारी पदावर रूजू होण्यासाठी गेलो . तेथे ( R.T.O. ) परिवहन अधिकारी , यांना भेटलो . माझी बसण्याची जागा म्हणजे एक खिडकी (Counter ) होते . माझी नेमणूक कोणी टँक्सी – मालक , रिक्षा-मालक वा कार -मालक बाहेरून आणलेल्या वाहनांचा प्रवेश कर (Entry Tax ) भरण्यासाठी आला तर त्याला कायदेशीर मार्गदर्शन करून योग्य तेव्हडा प्रवेश कर तसेच आवश्यक असेल त्या प्रमाणे दंड आकारणी करून देण्यासाठी होती . प्रवेश- कर बँकेत भरून त्याची चलान दिल्यावर त्याला परिवहन अधिकारी यांना देण्यासाठी ‘ नाहरकत प्रमाणपत्र ‘(No Objection Certificate )माझ्या स्वाक्षरीने तयार करून दिले जाई . सदर प्रमाणपत्र दिल्याशिवाय परिवहन अधिकारी कार्यालय संबंधित गाडीची नोंदणी (Registration ) करीत नसत .’ प्रवेश कर ‘ घेण्यास स्टेट बँकेसह ईतरही बँका सुरवातीला नकार देत . अशा वेळी मला संबंधित बँक त्याच्या मँनेजरला प्रत्यक्ष भेटून भारतीय रिझर्व्ह बँकेचे प्रवेश कराबाबतचे परिपत्रकाची प्रत दिल्यावर प्रवेश कराचा भरणा करून घेत .

घाटकोपर परिवहन अधिकारी कार्यालयात पहिल्याच दिवशी सर्व टँक्सीवाल्यांचा मोर्चा ‘हम एन्ट्री टँक्स नही भरेंगे , नही भरेंगे ! अशा घोषणा देत आला , आणि मला ‘ घेराव ‘घातला .परिवहन अधिकारी व तेथील कर्मचारीबाहेर आले , कोण हे नवीन प्रवेश कर अघिकारी आले हे पहायला ! मी येण्याअगोदर त्यांना कोणी सांगीतले सगळ्यांच्या चेहर्यावर प्रश्नार्थक भाव होते .
मी मोर्च्याला शांततेने सामोरा गेलो , त्यांच्या पुढारी व्यक्तिला बोलाऊन विचारले . तुम्हाला प्रवेश कर भरण्याची जबरदस्ती कोणी केली आहे ? कोणाकडूनही प्रवेश कर जबरदस्तीने भरून घेण्यात येणार नाही . तुमचा प्रवेश कर भरण्यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी माझी नेमणूक झाली आहे . मी तुम्हाला प्रवेश कराचा भरणा योग्य केला आहे की नाही ह्याची खात्री केल्यावरच त्याबाबतचे ” नाहरकत प्रमाणपत्र ” परिवहन अधिकारी यांचेकडे देण्यासाठी आलो आहे . त्यापैकी एकजण पुढे येऊन म्हणाला ‘ मला प्रवेश कर भरावयाचा आहे , किती रक्कम भरायची ते सांगा . मी त्याला त्याने परराज्यात भरलेल्या कराचा परतावा विचारात घेऊ प्रवेश कर व दंडाची रक्कम भरावयाची चलान तयार करून दिली .त्याने सांगीतले की माझगांवच्या संबंधित अधिकार्यांनी ह्या रकमेपेक्षा कमी रक्कम भरायला सांगीतले होते. त्यांचे नांव माझ्या लक्षात नाही . मी त्यांना विचारले की तुम्ही त्यांना समोर पाहूनओळखू शकाल काय ? आत्ता आपण जाऊन त्यांना भेटू . त्यावेळी ते तयार झाले , सोबत २५-३० टँक्सीवालेही माझगांवला जायला तयार झाले . मी त्यापैकी ४-५ जणांनाच सोबत येण्याची विनंती केली . त्याप्रमाणे आम्ही ३ टँक्सीतून माझगांवला जाण्याची तयारी केली .त्याअगोदर मी परिवहन अधिकारी ,कार्यालयातून माझगांवला श्री . कामत विक्रीकर अधिकारी आणि श्री. जैन ,विक्रीकर उपायुक्त, अंमलबजावणी , ह्यांना दूरध्वनी करून थोडक्यात सर्व परिस्थिती सांगीतली . त्या दिवशी अचानक आकाशात काळे ढग जमा झाले व मोठ्ठा पाऊस सुरू झाला . आम्ही आमचा माझगांव कार्यालयांला जाण्याचा रस्ता सायन पुलाखालून न जाता ,माटुंगा स्टेशनकडून निवडला . कारण १५ मिनिटां सायन पुलाखाली खूप पाणी सांचले ,त्यातून टँक्सी जाऊ शकत नव्हती . माझगांव विक्रीकर कार्यालयात जाऊन विक्रीकर उपायुक्त , अंमलबजावणी ,श्री . जैन साहेबांची ओळख करून दिली . पहिल्याच दिवशी टँक्सीवाल्यांचा मोर्चा/ घेराव ? हे टँक्सी मालक विक्रीकर आयुक्त ,कार्यालयातील श्री .दिक्षित साहेबांचे ऐकतील की नाही, अशी शंका त्यांना आली ,पण मी सर्व व्यवस्थित हाताळू शकेन असा ठाम विश्वास हे श्री. जैन साहेबांना होता . मी सर्वांना श्री.दिक्षित साहेबांकडे , आयुक्त कार्यालयात घेऊन गेलो . श्री.दिक्षित, सहाय्यक विक्रीकर आयुक्त , (कायदा व नियम ) , ह्यांच्या केबिनमध्ये सर्वांना नेले .त्यांना पाहताच, ह्याच साहेबांनी आम्हाला वाहन प्रवेश कराबाबत सांगितले होते . श्री . दिक्षित साहेबांनी प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली . प्रवेश कराची संबंधीत फाईल काढून मागच्या वेळी तुम्ही मला टँक्सीच्या बिलात शेजारच्या गुजराथ राज्यात कर भरणा केल्याचे कागदपत्र दिले होते ,त्याप्रमाणे मी भरायला येणार्या प्रवेश कराची रक्कर्म सांगीतली होती , आता तुम्हीआमच्या श्री . लोणकर, प्रवेश कर अधिकारी ह्यांना संबंधित वाहनावर गुजराथ राज्यात कर भरल्याचा कोणताही कागदोपत्री पुरावा दिला नाही , परिणामी आता भरायला आलेला प्रवेश कराची रक्कम जास्त आली आहे आणि ती श्री . लोणकर साहेबांनी योग्यच सांगीतली आहे . त्याप्रमाणे प्रवेश कर भरल्याची चलान दाखविल्यावरच ते तुम्हाला नियमा -प्रमाणे ‘ ना हरकत प्रमाणपत्र ‘ स्वाक्षरीत करून देतील.
त्याची प्रत परिवहन अधिकारी, कार्यालयात दिल्यावरच ते तुमचे वाहनाची नोंदणीकागद पत्रे तुम्हाला देतील . आमचे अधिकारी श्री , लोणकर हे कधीही अयोग्य कर आकारणी करणार नाहीत , ह्याचा विक्रीकर खात्यातील आम्हा वरिष्ठांना पक्का विश्वास आहे . ह्या प्रसंगानंतर मला घाटकोपर परिवहन कार्यालयात प्रवेश कराचे कामात कोणताही अडथळा आला नाही . तेथे माझ्या बाजूलाच व्यवसाय कर अधिकारी श्री .चौरसिया साहेब होते . जेव्हा मोर्चा /घेराव आला तेव्हा सगळेच जण चिंतेत पडले होते . माझगांवहून आल्यावर , मोर्चा /घेराव यशस्वी रितीने हाताळला करीता म्हणून सर्वांनी मनापासून माझे अभिनंदन केले . सुमारे वर्षभर प्रवेश कराचे काम घाटकोपरला करतांना माझ्या परिवहन विभागातील कर्मचारी वर्गाशिवाय इतरही नवनवीन व्यक्तिंशी परिचय झाला .

त्यावेळी मी स .वि . आ .प्रशासन , परिक्षेत्र ,५,मुंबई नगर विभाग ,मुंबईच्या आस्थापनेवरच होतो . ह्या दरम्यान विक्रीकर अधिकारी पदी , बढतीच्या वर्ग २ राजपत्रीत , विक्रीकरअधिकारी पदाच्या यादीत माझे नांव अग्रक्रमावर असल्याचे कळले . मी चिंतेत पडलो , कारण मला आता , महाराष्ट्राच्या गोंदिया/ चंद्रपूर वा भंडारा सारख्या ठिकाणी कदाचित जावे लागेल अशी मनांत धास्ती वाटू लागली . परंतु नंतर मला कळले की , माझे मागील तिन वर्षाचे गुप्त अहवाल ,तत्कालीन स .वि.आ.परिक्षेत्र ५ ,श्री .आहूजासाहेब , सिमला येथे ट्रेनिंगला गेलेले असल्याने ,माझे त्या अगोदरच्या स. वि . आ . श्री .शिरोडकरसाहेबांनीच देण्याचे निर्देश आयुक्त कार्यालयाकडून देण्यांत आले आहेत . मागील वर्षाचे गुप्त अहवाल विक्रीकर उपायुक्त़ ,अंमलबजावणी , मुंबई यांचे मार्फतजाणार होतेच . माझ्या कामाचे मागील तिन वर्षाचे गुप्त अहवालावरून ,मुल्यमापन करणेत येणार होते . त्यावर माझी ( राजपत्रित ) ‘ विक्रीकर अधिकारी , वर्ग, २ ‘ पदावर पदोन्नती गोंदिया/ चंद्रपूर/ मुंबई /पुणे कोठे ? होणार हे ठरणार होते .
एकदाचा जवळ जवळ १२ वर्षापासून प्रलंबित असणारा ‘ विक्रीकर अधिकारी ‘ पदोन्न्ती आदेश निघाला .
माझी नियुक्ति विक्रीकर अधिकारी , ( २४ ) , अंमलबजावणी विभाग , विक्रीकर उपायुक्त , अंमलबजावणी ( अ ), मुंबई येथे झाली .त्याप्रमाणे मला स. वि. आ. प्रशासन , परिक्षेत्र , ५ ,यांनी मला कार्यमुक्त केले .मी लगेचच चौथ्या मजल्यावरील वि. उपा . अंमलबजावणी शाखा , ( अ), मुंबई ,येथे रूजू झालो. परंतु विक्रीकर अधिकारी ,(२४),अंमलबजावणी हे रजेवर असल्याने मला त्यापदाचा कार्यभार घेता आला नाही .ते ८ दिवसानंतर कामावर रूजू झाले .मी त्यावेळी त्यांचेकडून कार्यभार स्वीकारला . जुना कार्यभारातून मुक्त हेऊन नवीन कार्यभार स्वीकारला ,यामधील कालावधीचे काय ? नियमाप्रमाणे, राजपत्रित अधिकार्याचा हा कालावधी नियमित करण्याचे अधिकार शासनाने विक्रीकर विभागाच्या खातेप्रमुखाकडे ( विक्रीकर आयुक्तांकडे ) दिलेले नव्हते ,ते अधिकार अर्थ विभागाच्या सचिवांकडे होते .त्यामुळे मी विहीत मार्गाने माझा अर्ज शासनाकडे पाठविणेसाठी आयुक्त कार्यालयाकडे पाठविला . तेथील कार्यासन अधिकारी (आस्थापना ),२ ह्यांनी मला व स. वि . आ . प्रशा .परिक्षेत्र,५ ह्यांनाही बोलाऊन घेतले ,आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे माझी ज्येष्ठ विक्रीकर निरिक्षक पदावरून कार्यमुक्तता आठ दिवसानंतर केली आहे असा अहवाल तयार करणेचा निर्देश श्री .आहूजा साहेब .स.वि. आ .प्रशासन ,परिक्षेत्र , ५ ह्यांना दिला .थोडक्यात माझी राजपत्रित पदावरील ज्येष्ठता अबाधित ठेऊन मी राजपत्रित पदाचा कार्यभार ,ज्येष्ठ विक्रीकर निरीक्षक पदावर असतांना रजा संपल्यावर घेतला आहे .असे कागदोपत्री दाखविणेत आले. त्या काळी राजपत्रित अधिकारी स्वत:चा पगाराचे बिल ट्रेझरीला स्वत : च्या सहीने काढीत असे . विक्रीकर अधिकारी (२४) ,अंमलबजावणी, चा कार्यभारात High Seas Transaction ची प्रकरणे जास्त होती .तसेच एकूण २४ कपाटे भरून धारीण्या होत्या . अंमलबजावणी विभागांत विक्रीकर उपायुक्तांच्या लिखित आदेशाप्रमाणे (Assignment ) अधिकारपत्र घेऊन व्यापार्याच्या धंद्याच्या ठिकाणी ,गोडाऊन आणि निवासाच्या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकणे ,तेथे असलेल्या विक्रीकराच्या विक्री-नोंदी, खरेदी- नोंदी , मालाच्या खरेदी -,विक्रीच्या चलान ,स्टॉक बुक ,ताळमेळ पत्रक , विविध फॉर्म वरील खरेदी-विक्री , कँशबुकातील शिल्लक रक्कम व प्रत्यक्ष मिळालेली रक्कम …इ .तील अनियमितता शोधण्याचे काम विक्रीकर अधिकारी आणि त्यांचे विक्रीकर निरिक्षकांना करावे लागत असे . आवश्यक तेव्हा व्यापार्याची सर्व पुस्तके व्यापार्याच्या संमतीने अथवा जप्ती आदेश काढून , ताब्यात घेऊन त्याची रितसर पावती त्याला दिली जात असे . शक्यतो सदर अनियमितता रकमेवर नियमाप्रमाणे विक्रीकर आणि व्याज किंवा दंड लाऊन वसुली आदेश काढले जात असत .विक्रेत्याकडे सूर्यास्तानंतर वा सुर्याेदयाअगोदर प्रवेश करता येत नसे. परंतु एकदा प्रवेश घेतला तर मात्र त्यानंतर रात्रभर तपासणी काम करता येत असे . व्यापार्याकडे भेटीच्या वेळी व नंतर व्यापार्याच्या वकीलाला हजर राहण्याची मुभा असायची . व्यापार्याने स्वत:हून दिलेल्या वा जप्त केलेली हिशेबाची पुस्तके ५ व्या मजल्यावरील कस्टडीत पावती घेऊन ठेवण्याची परवानगी होती . तेथे पुस्तकांच्या सगळ्या पानांवर अनुक्रमांक टाकण्याचे काम केले जात असे . आवश्यक तेथे व्यापार्यीला नोटीस काढून / प्रत्यक्ष बेालाऊन निर्धारणा , पुनर्निधारणा आदेश काढले जात . तसेच व्यापार्याने विक्रीकर अधिकार्यात्या आदेशाप्रमाणे , करभरणा न केल्यास , मुंबई विक्रीकर कायदा १९५९ मधील फॉर्म ३९ ची नोटीस काढून , त्याची बँक खाती गोठविण्याची दमनकारी कार्यवाही केली जात असे . तद्वतच तपासणी दरम्यान विक्रेता करभरणा , सहजा सहजी करणार नाही , अशी विक्रीकर उपायुक्त अंमलबजावणी ‘अ ‘ यांची खात्री पटल्यास फॉर्म ३९-अ खालील नोटीस काढून निर्धारणेचा आदेश नसतांनाही, विक्रेत्याची बँक खातीच नव्हे तर धनकोचीही खाती गोठविली जात असत .
मी ,सहाय्यक विक्रीकरआयुक्त , ( प्रशासन ) ,अंमलबजावणी ,’ अ ‘ श्री . लांडेसाहेब , यांच्या कार्यालयाच्या नियंत्रणाखाली काम करीत होतो . माझ्यासह ८ विक्रीकर अधिकारी, त्यांचे नियंत्रणाखाली काम करीत होते .आमच्या विक्रेत्याकडील भेटीच्या वेळात स.वि.आ. श्री .शिर्सीकरसाहेब तसेच श्री .गिरी , I. A . S . वि.उपा . ‘अ ‘ अंमलबजावणी हे अचानक भेट देऊन पाहणी करत असत .
नवरात्रीत आम्ही ६ विक्रीकर अधिकारी ,स.वि.आ.श्री. लांडेसाहेब आणि श्री.गिरिराज,आय. ए. एस . वि. उपा . अंमल .’अ ‘ एका प्रकरणांत नांदेडला गेलो होतो . नांदेड शहर व नांदेड एम . आय .डी .सी . मध्ये मागास भागातील उद्योगांनी शासनाच्या सवलतीचा फायदा घेऊन , किती प्रकरणात प्रत्यक्ष उद्योग सुरू केलेले आहेत ? त्यांची तपासणी करण्याची आवश्यकता आहे ? नसल्यास सद्यस्थिती काय आहे ? हे तपासायचे होते .परत येतांना विजयादशमी/दसरा दोनच दिवसावर असल्याने दक्षिण भारतातील नागरिकांची नागपूरला जाण्यासाठी खूप गर्दी होती . आमचे रेल्वेचे आरक्षण रद्द करावे लागले . नांदेड-औरंगाबाद प्रवास एस. टि .ने व नंतरचा औरंगाबाद -मनमाड प्रवास मेट्याडोरने केला . मनमाड – मुंबई प्रवास प्रथम श्रेणीतून रेल्वेने केला .
कोणतीही अडचण आल्यास त्याचे निराकरण त्यांच्यासोबत चर्चा करून काढल्या जात असे .श्री .गिरीसाहेबानंतर ,अंमलबजावणी ‘ अ ‘ चा कार्यभार काही दिवसांकरीता ,श्री . डि .के .जैन ,I . A .S . विक्रीकर उपायुक्त ,अंमलबजावणी ‘ ब’ . ह्यांचेकडे होता .त्यांच्या अधिपत्याखाली विक्रीकर विभागाचा C. I .D .सेल होता . विक्रेता सापडत नाही , वारंवार नोटीसा देऊनही विक्रेता विवरण पत्रे भरत नाही , अशी प्रकरणे ह्या सेलकडे पाठविली जात असत . अंमलबजावणी विभागाचा विक्रीकर विभागात मोठा दरारा होता .नवीन आलेले श्री .पोरवालसाहेब I .A . S. हे फार कडक स्वभावाचे , होते .परंतु त्यांचा कामाचा उरक फार मोठा होता . त्यावेळी श्री.गहरोत्रा हे विक्रीकर आयुक्त ,महाराष्ट्र राज्य , मुंबई होते .त्यांनी काही वर्षापूर्वी विक्रीकर उपायुक्त अंमलबजावणी ‘ अ ‘ ह्या पदाचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळला होता …
मला मधूनमधून अँसिडीटीचा त्रास होत होता ,तसेच खोकल्याचाही त्रास होत होता .त्याच वेळी मला बॉम्बे हॉल्पिटलमधील डॉक्टर केणींची माहिती मिळाली . त्यांची अपॉईंटमेंट ३-४ महिन्यांच्याअगोदर मिळत नसे .त्यांचेकडे ठरविलेल्या वेळी पोहोचलो ,माझा नंबर आल्यावर आत त्यांच्या खोलीत गेलो. सोबत सौ .निर्मला होतीच .तेथे मंद संगीत चालु होते ,संत साईबाबांचा फोटोजवळच तुपाची निरांजन होती . डॉक्टर केणींची तपासणीची अनोखी पद्धत होती .रुग्णाला काय काय होत आहे ? हे विचारले नाही ,फक्त नांव ,वय आणि कोठून आला एव्हढेच विचारले .नंतर माझ्या दोनही हाताच्या मुठी बांधून दोनही अंगठे जवळजवळ ठेवायला सांगीतले . डॉक्टर केणींनी माझ्या अंगठ्यावर त्यांचा डाव्या हाताचा तळवा २-३ क्षण ठेवला व त्यांच्या जवळच्या केसपेपरवर शरिरांत कोठे ? काय काय त्रास होत आहे ते क्रमाक्रमाने सांगायला सुरवात केली .मला फारच आश्चर्य वाटले . त्यांनी अँलोपँथी आणि आयुर्वेदीक अशी दोन्ही कॉस्टली औषधे लिहून दिली .त्यांचे वळणदार अक्षर मी पहातच राहिलो .दिलेली औषधे नियमितपणे पोटात घेतलीच गेली पाहिजेत पुन्हा महिनाभराने यायला सांगीतले .सौ .निर्मलालाही तपासून औषधे लिहून दिली . माझा वारंवार येणारा खोकल्याचा ठसका , हा दमा नाही हे खात्रीपूर्वक सांगीतले . ह्यानंतर मी माझ्या अनेक मित्रांना /नातेवाईकांना त्यांचेकडेच जाण्याचा सल्ला दिला .
माझे सहकारी मित्र श्री.नवरे साहेबांची पत्नी सौ . मंगलाची लहान बहिण सौ . पिंगल दोघीही , मी मेडशीला शिक्षक असतांनाच्सा विद्यार्थिनी होत्या .सौ .पिंगलला अनेक डॉक्टरांची औषधे घेऊनही फायदा होत नव्हता. योग्य निदान होत नव्हते ,तिचा एकच घोषा ”मी आता मरणार , माझ्या मुलाते कसे होणार ? सौ ,पिंगलला मी डॉक्टर केणींकडे पाठविले . अवघ्या २-३ महिन्यातच लक्षणीय फरक पडला .
मी एकदा मस्जिद येथे विक्रेत्याकडे सकाळी १० वाजता ,विक्रीकर उपायुक्त’अ’ च्या आदेशाप्रमाणे तपासणीसाठी जाऊन पोहोचलो . मी माझ्या तीन विक्रीकर निरिक्षाकासह तेथील ऑफीसात पोहोचताच तेथे उपस्थित असलेल्या विक्रेत्याच्या प्रतिनिधिला माझे ओळखपत्र आणि तपसणीसाठीचे अधिकार पत्र दाखविले . एका विक्रीकर निरिक्षकाला मुख्य दरवाजातून कोणालाही बाहेर सोडतांना त्याची झडती म्हणजे बँग , पिशवी ,खिशातील सामान ….इ .तपासायचा हुकूम दिला . उरलेल्या दोन निरिक्षकांना सोबत घेऊन ईतर ठिकाणची कागदपत्तरे तपासायला सुरवात केली . पहिली १५ मिनिटे मी तेथील फोनचे Incoming /Out coming Calls बंद ठेवण्याची विनंती केली .तेव्हड्यात मला कोणाचा तरी मोठ्या मोठयाने चिडून बोलण्याचा आवाज ऐकू आला . मी त्या ठिकाणी पोहोचायलो तर त्या कंपनीचे M.D .चा आवाज होता. मी तेथे पोहोचलो व त्यांना माझे ओळखपत्र दाखविले .
M.D . :- You have not disclosed , your Assignment and identity ? Thousands of my people will make an affedevit in the court , and Your visit will be phat . l want to talk your Commissinor immediately .
I told his telephone oprater to connect the Commissioner of Sales Tax , Mazgaon .
Accordingly The Commissioner was contacted .
M .’D .:- Hear is your Officer , He has not disclosed his Identity and Authority and he has prohibited us to use the Phones.Thosands of my people will make an Affedevit in the court and the visit will be phat .
Commissiner :- Let me know , whether you will Coperate my officer or not . Otherwise , l have no option but to send the Police Authority ,not below the rank of Dy .commissioner of Police , there ! Please get me my Officer ,immediately .
श्री . गहरोत्रा , (आय . ए .एस .) कमिश्नर :- विक्रेत्याने केलेली तक्रार खरी आहे काय ?
मी :- Sir , How can I ask the authorities in this office not to use the phones , without disclosing my Identity ?
कमिश्नर :- महोदय , तुमच्या सहाय्यासाठी तुमच्यापेक्षा ज्येष्ठ साहेबांना पाठविण्याचे निर्देश मी विक्रीकर उपायुक्त , अंमलबजावणी ‘अ ‘ ना देतो . तुम्ही विक्रेत्याला काहीच बोलू नका . जैसे थे Position ठेवा .
मी :-Yes sir .
M. D .: – What the Police Author will do ?
मी :- आता आमचे वरिष्ठ साहेब आल्यावरच बोलू .
M. D. :- साहेब ,आपण माझ्या केबिन मध्ये बसून बोलू . मी तुम्हाला पूर्ण सहकार्य करायला तयार आहे . माझ्या ब्रीफकेसची झडती घ्या . हे पहा बँगेत काहीही आक्षेपार्ह नाही .
मी:- कृपया आपण मुक्त आहात , आमचे साहेब आल्यावर त्यांच्या निर्देशाप्रमाणेच पुढील कामे होतील.
तेव्हड्यात माझे वरिष्ठ स. वि. आ. अंमलबजावणी , त्यांच्या तीन विक्रीकर निरिक्षकांसह आले .त्यांचेपाठोपाठ तीन विक्रीकर अधिकारी त्यांच्या विक्रीकर निरिक्षकांसह आले . विक्रेत्याच्या आणखीही कंपन्यांची ऑफिसेस त्याच ईमारतीत होती . त्या सर्वच कार्यालयातील कागदपत्रे व हिशेबाची रजिस्टरे तपासायला सुरवात झाली . विक्रीकर उपायुक्त , अंमलबजावणी (अ) हेही थोड्या वेळाने तेथे निरिक्षणासाठी आले .त्यांच्या निर्देशाप्रमाणे मागील तिन वर्षाची हिशेबाची सर्व पुस्तके आणि कागदपत्रे जप्तीचे आदेश काढण्यात आले .त्या दिवशी रात्री ११ वाजता टेम्पो भरून पुस्तके विक्रीकर भवनात कस्टडीत ठेऊन आम्ही घरी परतलो .आमचे नवीन विक्रीकर उपायुक्त,अंमलबजावणी ‘अ ‘ पदावर श्री . पोरवाल (आय .ए .एस .) साहेबांची नियुक्ति झाली . त्यांनी त्यांच्या केबिनमध्ये ”स्पिकर फोन ” लावला होता . त्यांचा कामाचा स्पीड व प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रत्येक विक्रीकर अधिकारी तसेच त्यांचे विक्रीकर निरिक्षकांकडे किती प्रकरणे प्रलंबित आहेत , ह्याबाबतची सखोल माहिती असायची . विक्रीकर अधिकारी केबिनमध्ये कोण कोण येते , काय बोलणी होताहेत , ह्याची बित्तंबातमी त्यांचेकडे कशी आहे हे कोडे कोणालाही उलगडले नाही . अंमलबजावणी विभागांत Informants होते.परंतू आता त्यांचेवर काटेकोर नियंत्रण आलेले होते .

मी वि . अ . अंमलबजावणी (२४ ) असतांना माझ्या ताब्यात २४ कपाटे होती .त्यापैकी ५ कपाटे वि. उपा .अंमलबजावणी ‘अ ‘ ह्यांना हवी होती ,त्यासाठी आस्थापना विभागाचा लिपिक /विक्रीकर निरिक्षक/ आस्थापना अधिकारी ह्यांनी स्वत: येऊन मला कपाटे देण्याची विनंती केली .मी त्यांना त्या कपाटील फाईली कोठे ठेऊ ह्याचे निर्देश देण्याची विनंती केली . एके दिवशी अचानकपणे वि. उपा . अंमल . ‘अ ‘ स्वत: माझ्या केबिन मध्ये आले . त्यांनी प्रथम केबिनमधील ६ कपाटे उघडून बघितली ,नंतर बाहेरची कपाटे उघडून प्रत्येक कपाटातील कोणतीही धारीणी उघडून ती कोणत्या प्रकरणाची आहे हे तपासावयास सुरवात केली .माझ्या रेकॉर्ड ठेवण्याच्या पद्धतीप्रमाणे कपाटाच्या प्रत्येक कप्यावर धारिण्यांची अनुक्रमे नांवे लिहीलेली होती . त्यामुळे मी लिपिक/ विक्रीकर निरिक्षक / चपराशी कोणाच्याही मदतीशिवाय कोणत्याही धारीणीचे विक्रेत्याचे नांव व प्रकरण कशासाठी प्रलंबित आहे हे सांगायचो. थोड्याच वेळात आमचे स .वि . आ . /पलीकडच्या दालनाचे स . वि . आ . तेथे येउन पोहोचले .विक्रीकर भवनांत ही बातमी पसरली . सगळी कपाटे तपासून झाल्यावर श्री.पोरवाल,साहेबांनी कपाटावरील धारीण्यांविषयी विचारले ? रेकॉर्डला किती धारिण्या पाठविल्या , किती धारिण्या नष्ट केल्या ? काहीही काम केलेले दिसत नाही ! का ? माझ्या मदतीला श्री .लांडेसाहेब स.वि.आ .आले , त्यांनी श्री .पोरवालसाहेबांना सांगीतले की ,सर्वात जास्त धारिण्या रेकॉर्डला
पाठविल्या ,धारिण्या नष्ट केल्या त्या श्री .लोणकर साहेबांनीच असेआमचे रेकॉर्ड दाखविते . श्री . पोरवाल साहेबांनी त्यानंतर सांगीतले ,तर तुम्ही एकही कपाट रिकामे करून देऊ शकत नाही ,हे मला समजले आहे , हरकत नाही ,पर्यायी व्यवस्था करावी लागेल !
आता शासनाने विक्रीकर विभागाचा नवीनच पँटर्न /पुनर्रचना मंजूर केली . त्याप्रमाणे अंमल बजावणी विभागांतील विक्रीकर अधिकार्याची सर्व पदे वर्ग १ ची करण्यात आली .माझी नियुक्ति वर्ग २ पदावर असल्याने माझी बदली विक्रीकर उपायुक्त ,प्रशासन,माझगांव विभाग , माझगांव ,मुंबई येथे करण्यात आली . मी स.वि. आ. श्री . गुजे साहेब , आणि विक्रीकर उपायुक्त श्री .खवले साहेब होते . प्रत्येक विक्रीकर अधिकार्याकडे नवीन धारिण्या स्थानांतरीत करण्यात आल्या होत्या . येथे माझे सहकारी होते , श्री. चौरसिया साहेब , श्री .पवार साहेब ,श्री.डोईफोडे साहेब ,श्री .टेंबे साहेब …… ई . होते . येथे मला निर्धारणेचे काम ,विवरण पत्रे तपासणे ,कराचा भरणा केलेल्या चलान तपासणे , विवरणपत्राप्रमाणे व्यापार्याने कमी कर भरणा केलेला असल्यास ३९ क्रमांकाची नोटीस व्यापार्याला व बँकेला देऊन वसुलीची कार्यवाही करण्याची कामे लिपिक , विक्रीकर निरिक्षकाच्या मदतीने करावी लागे . वसुलीचे / निर्धारणेचे दिलेले लक्ष्य पुर्ण करण्यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न करावे लागायचे . नोटीस क्रमांक २७ ,स्मरणपत्रे , व्यापार्याच्या धंद्याच्या /राहण्याच्या /गोडाऊनच्या जागेला भेटीही द्याव्या लागत . मोठा करभरणा करणार्या व्यापारी वर्गाकडे विशेष लक्ष द्यावे लागे .
ह्याशिवाय विक्रीकर थकबाकी असलेल्या व्यापारांचा पाठपुरावा करून वरिष्ठांच्या निर्दशाप्रमाणे ( १ )बँकखाते गोठविणे , (२) त्यांचे धनको शोधून त्यांचेकडून थकबाकी वसूल करणे , (३) (M.L.R.C .)जमीन महसूल कायद्यालील वसुलीसीठी नोटीस क्रमांक १ दिल्यावर ,त्याची मालमत्ता जप्तिची कार्यवाही करणे जसे धंद्याची /राहण्याची जागा /मशीनरी /कार / कच्चा माल/
……ई . नंतर स्थानिक वर्तमान पत्रात त्याची जाहिरात देऊन लिलाव करणे .तसेच कोर्टात व्यापारी मालक /भागीदार /डायरेक्टर ……ई.विरूध्द प्रॉसिक्युशन केस दाखल करणे .ही कामे विक्रीकर निरिक्षकाच्या मदतीने करून घ्यावी लागत . हे सगळे कायद्याच्या चैाकटीत राहून आणि माणुसकीचा विचार करूनच करण्याची कसरत करावी लागायची .
ह्याशिवाय निर्धारणा आदेशातील दोष , स.वि.आ. प्रशासन व विक्रीकर उपायुक्त प्रशासन आणि S.T.R.A . लेखा परिक्षणाप्रमाणे दाोष दूर करण्यासाठी नोटीसा काढून विक्रीकर कायदा कलम ६२ खाली निर्धारणा दुरूस्ती आदेश काढणे/ वा नोटीस क्रमांक २९ काढून फेर निर्धारणा आदेश काढण्याची कार्यवाही करावी लागायची . तसा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठविणेचे निर्देश लिपिक व विक्रीकर निरिक्षकांना देऊन पूर्तता करावी लागे .

एकदा मी विक्रोळीहून लोकलने दादरला जायला निघालो . माझी छोटी पर्स मी बसण्याच्या जागेच्या वर रँकवर ठेवली होती . दादर अगोदर माटुंगा स्टेशन येते . मला कशी कोण जाणे डुलकी लागली . दादरला लोकल पोहोचतांनाच मला जाग आली . मी घाईघाईने उतरलो ,पूलाच्या पाच सहा पायर्या चढलो असेन ,मला माझ्या पर्सची आठवण झाली . पण लोकल निघून गेली होती .मी धांवतच पोलीसल्टेशन गाठले ,तेथे त्यांनी मला स्टेशन मास्तरकडे जाण्यास सांगीतले . मी त्यांना सगळी हकिगत सांगीतली . त्यांनी मला कोणत्या ( ठाणे / कल्याण/ अंबरनाथ / कर्जत / कसारा) लोकलने आलात असे विचारले . मी त्यांना १५ मिनिटे अगोदरच्या लोकलने आल्याचे सांगीतले .नक्की लोकल माहिती नसल्याने त्यांनी मला व्ही .टी.ला जाऊन तक्रार करण्याचा सल्ला दिला . त्याप्रमाणे मी लोकलने व्हि .टी .ला जाण्यासाठी निघालो . भायखळ्याला मला आठवले की ,विक्रोळीला लोकल आली तेव्हां मोटारमनच्या डब्यासमोरच्या बोर्डावर A म्हणजे अंबरनाथ लिहिलेले होते . मी लगेच पुढच्या स्टेशनवर सँडहर्स्ट -रोडला उतरलो , आणि स्टेशन मास्तरांना जाऊन भेटलो . त्यांना मी सगळी हकिगत सांगितली , त्यांनी चाईम टेबल पाहून अंबरनाथहून आलेली लोकल गाडी आता व्हि . टी. हून ‘ कर्जत ‘ लोकल म्हणून लागलेली असून आता आपल्या ‘ सँडहर्स्ट रोड ‘ स्टेशनहून निघाली आहे . त्यांनी मला व्हि. टी .ला लोकल स्टेशन मास्तरांना भेटा ,ते तुम्हाला योग्य ती सगळी मदत करतील. मी लगेच लोकलने व्हि . टी .ला जाऊन लोकल- स्टेशन मास्तरांना भेटलो . त्यांनी माझे म्हणणे पूर्णपणे ऐकून घेतले . टाईम टेबल पाहून त्यांनी ‘कर्जत ‘लोकल आता कुर्ला स्टेशनला पेाहोचत आहे , मी स्टेशन मास्तरांना फोन करून ‘ कसारा ‘ लोकल थांबऊन पोलीसांना संबंधित बोगी व स्पॉट चेक करायला सांगतो . तेव्हढ्यात तिकिट क्लार्क एका प्रवाशासाोबत भांडत तेथे आले . स्टेशन मास्तरांनी त्यांना समजाऊन सांगितले व भांडण मिटविले . तोपर्यंत ‘ कसारा ‘ लोकल घाटकोपरला पोहोचत होती . घाटकोपर स्टेशन मास्तरांनी , व्हि . टी .स्टेशन मास्तरांच्या निर्देशाप्रमाणे दोन पोलीसांना पाठऊन मधल्या प्रथम वर्गाच्या बाजूच्या हाफ डब्यात कोपर्यात रँकवर ठेवलेली छोटी पर्स शोधून ताब्यात घेतली . पोलीस परत स्टेशन मास्तरांच्या कार्यालयात पोहोचताच ,घाटकोपर स्टेशन मास्तरांनी व्हि . टी . लेाकल स्टेशन मास्तरांना ” Goods Recovered with details as provided by you , please send the concern to me , Regards . ”
मी व्हि . टी . लोकल स्टेशनमास्तरांकडून पाकिटांत पत्र घेतले .”हे पत्र घेऊन येणारे श्री. विनोद लोणकर , ह्यांना कसारा लोकल मधून पोलीसांनी घाटकोपर स्टेशनला शोधून काढलेली पर्स व त्यांतील सगळा ऐवज ओळख पटऊन देण्यात यावा . सदर घटनेमुळे मुंबईतील लाखो प्रवाशांपैकी सगळ्यात भाग्यवान व्यक्ति म्हणूनआपण सगळे त्यांचा योग्य तो आदर करावा .”
मी घाटकोपर स्टेशन मास्तरांना जाऊन उपरोक्त पत्र दिले . त्यांनी बँग शोधून काढणार्या पोलीसांना बोलाविले . मी सर्वांसाठी चहा-बिस्किटे बोलाविले . माझ्या पर्समधील वस्तुंची यादी दिली . त्यात माझे ओळखपत्र , कँलक्युलेटर , ऑफीसची कागदपत्रे , पैशांची विगतवारी ,ई …..होते . मी सर्वांते आभार मानले. पण घाटकोपर स्टेशन: मास्तरांनीच माझा पाहुणचार केला . सर्वांचे तोंड मिठाईने गोड केले .

त्यानंतर माझी बदली ”व्यवसाय कर अधिकारी ” ह्या पदावर झाली . तेथे श्री .नडंगेसाहेब माझे स .वि .आ .प्रशासन , होते . विक्रीकर उपायुक्त , ( प्रशासन ) , व्यवसाय कर हे विभाग प्रमुख होते . तेथे माझ्या अधिपत्याखाली एकूण ३००० प्रकरणे देणयात आली होती .मी दादर ते बोरिवली तसेच दादर ते मुलुंड एव्हढा विभाग होता . डॉक्टर्स ,वकील ,सल्लागार, शॉप अँड एस्टँब्लीशमेंट कायद्याखालील व्यवसाय करणारे सर्व व्यापारी ह्यांना (१) कंपनीचा व (२)कर्मचार्यांचा असे अनुक्रमे Registrstion Number व Enrolment Number नेांदणी करून त्याप्रमाणे प्रत्येक वर्षी नियमाप्रमाणे मासिक /सहमाही वा वार्षिक विवरणपत्र दाखल करावे लागत असे . ह्या बाबींचा संपूर्ण मुंबईच्या द्दृष्टीने विचार करून व्यवसायकर नोंदणी वाढविणेसाठी विक्रीकर उपायुक्त , ( प्रशासऩ ), व्यवसायकर ,मुंबई , ह्यांच्या निर्देशाप्रमाणे आम्ही कामाला लागलो . मी ह्या योजनेचा प्रमुख होतो . मुंबई मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे वरील प्रत्येक M . I .D.C .तील प्रमुख अधिकार्याला भेटून त्यांच्या अधिपत्याखालील प्रत्येक उद्योगाला व्यवसायकर कायद्याखालील R.C./E.C. नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्याचे काम क्रमाक्रमाने करायला सुरवात केली. महाराष्ट्र लघुउद्योग संघाच्या वार्षिक सभेला , गोरेगांव ( पश्चिम ) मुंबईला ,आम्ही ६ व्यवसायकर अधिकारी, आपापल्या व्यवसायकर निरिक्षकांसह, स .वि .आ .आणि विक्रिकर उपायुक्त ,प्रशासन ,व्यवसायकर मुंबई , ह्यांचेसोबत उपस्थित होतो .तेथे व्यावसायिकांनी विचारलेल्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली गेली .
ह्यानंतर विक्रीकर उपायुक्त ,प्रशासन , व्यवसाय कर, महाराष्ट्र राज्य ,मुंबई ह्यांचे मुंबई आकाशवाणीवर भाषण झाले . त्याची तयारी करण्याचे कामातही माझा भाग होता .
ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम झाला तो म्हणजे व्यवसायकर कायद्याखालील नोंदणी मागील वर्षाच्या तुलनेत तिनपट झाली . व्यवसायकराच्या कामात हिरे तयार करण्याच्या उद्योगाचे केंद्रीकरण मुंबईत गोरेगांव ( प ) ,मालाड (प) भागात झालेले होते . तेथेही प्रत्यक्ष भेटी देऊन व्यवसायकराच्या
नोंदणीचे काम करणेसाठी मला मुख्यत्वेकरून श्री . संखेसाहेब , व्यवसायकर अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले होते .
त्याच दरम्यान माझा मोठा मुलगा मकरंद चेंबुरला विवेकानंद पॉलिटेक्निकला Instrumentation च्या शेवटच्या वर्षाला होता . त्या कॉलेजच्या महिला प्रिन्सिपल प्रशासनात फारच कडक शिस्तिच्या होत्या . कोणत्यातरी कारणामुळे गैरसमजुतीने त्यांच्या स्मरणात मकरंद हा क्लास सतत बंक करणारा मुलगा म्हणून स्मरणांत राहिला होता .एकदा मकरंद टागोर नगरमधून कन्नमवार नगरमध्ये शाळेत अभ्यासिकेत जातांना रस्ता ओलांडतांना मोटर – सायकलने उडविल्याने कॉलेजात न जाता गैरहजर होता . डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेऊन तो हजर झाला व नियमितपणे कॉलेजमध्ये जाऊ लागला .मी त्याची कॉलेजच्या वेळापत्रकाप्रमाणे प्रत्येक तासाची हजेरी माझ्या डायरीत लिहीत होतो . मकरंद कॉलेजात तासांना सतत गैरहजर राहत असल्याचे पत्र मला मिळाले . मला कॉलेजात व्यवसायकराच्या तपासणीसाठी जायचे होतेच .
मी कॉलेजमध्ये मकरंदच्या गैरहजेरीचे पत्र घेऊन श्रीमती सत्याल , प्रिन्सिपलना भेटण्यासाठी पोहोचलो . त्यांनी मकरंदबाबत काळजी व्यक्त केली .मी त्यांना मकरंदच्या बँचला शिकविणार्या सगळ्या लेक्चरर्सना हजेरीपटासह चर्चेसाठी तसेच मकरंदला त्याच्या क्लासमधील ३-४ विद्यार्थ्यांसह बोलाविण्याची विनंती केली . प्रिन्सिपल मँडमचा आवाज वाढला ,मी त्यांना शांतपणे मला सदर प्रकरणांतील बाबींची पूर्णपणे शहानिशा करण्याचा मला हक्क आहे , आपण मला पत्र पाठवून बोलाविले आहे . कृपया प्रथम मुलांना बोलवावे . मकरंद त्याच्या मित्रांसह ऑफीसात येऊन उभा राहिला . प्रिन्सिपल मँडमनी मकरंदलाही बोलाविणेस सांगीतले , मी समजलो की प्रिन्सिपल मँडम मकरंदला प्रत्यक्ष ओळखत नाहीत फक्त नांव माहिती आहे . मी प्रिन्सिपल मँडमना सांगीतले की मी मकरंदची गेल्या महिनाभराची कॉलेजमधील प्रत्येक दिवसाची विषय – वेळापत्रकाप्रमाणे काय काय शिकविले त्याची नोंद माझ्या डायरीत घेतलेली आहे. आता आपण सर्व लेक्चरर्सना हजेरीपट घेऊन बोलवा , ज्याच्या आधारावर हे पत्र पाठविलेले आहे . जर मकरंद गैरहजर असेल तरमाझ्याजवळ ह्या नोंदी कशा ? ह्या प्रश्नांची उत्तरे फक्त संबंधित लेक्चरर्सच देऊ शकतील असे मला वाटते . प्रिन्सिपल मँडम आता मात्र गडबडून /गोंधळून गेलेल्या दिसल्या . त्यांना मी मकरंदला प्रत्यक्ष कधी पाहिले होते ? अशी विचारणा केली . थोड्या वेळाने विचार करून त्यांच्या लक्षांतआले की ,कोठेतरी चुकले आहे .त्यांनी लगेच मकरंदच्या गैरहजेरिचे पत्र मागे घेऊन मला झालेल्या मनस्तापाबददल माफी मागीतली . तसेच ” तुम्ही तुमच्या मुलाबाबत इतके बारीक लक्ष ठेऊन आहात ही फारच समाधानाची बाब आहे ” तसेच ही बाब फारच किरकोळ आहे . ह्यापुढे मकरंदच्याबाबतीत असे घडणार नाही ह्याची काळजी घेण्यात येईल .
ह्या दरम्यान मी ‘ विक्रीकर अधिकारी ‘ची खात्याची परिक्षा उत्तीर्ण झालो होतो.आता माझे नांव वर्ग १ अधिकारी पदासाठीच्या यादीत समाविष्ट करणेत आले होते .
माझी विक्रीकर अधिकारी वर्ग १ पदावर पदोन्नति होऊन माझी नियुक्ति आयुक्त कार्यालयात कार्यासन अधिकारी , आस्थापना (५ ) म्हणून करणेत आली . येथे माझेकडे महाराष्ट्र राज्यातील सर्व विक्रीकर विभागाचे वार्षिक अंदाजपत्रक Buget तयार करून शासनास पाठविणे , त्यानुसार शासनाकडून Grants मिळऊन विक्रीकर विभागाच्या महाराष्ट्रातील विक्रीकर आयुक्तांचे कार्यालय. , सर्व अपर विक्रीकर आयुक्तांची कार्यालये , सर्व विक्रीकर उपायुक्त , प्रशासन , ची कार्यालये ह्यांना वितरीत करण्याचे तसेच त्यावर नियंत्रणाचे काम होते .ह्याशिवाय राज्यातील अधिकारी ,कर्मचारी वर्गाला घरासाठी ,मोटार कार घेण्यासाठी , मोटार सायकल ,सायकल तसेच संगणक घेण्यासाठी त्यांच्या विक्रीकर उपायुक्त कार्यालयामार्फत अर्ज मागविले जात . नंतर त्याची तपासणी करणेत येई . नंतर उपरोक्त प्रकरणे, अपर विक्रीकर आयुक्त ,महाराष्ट्र राज्य ,मुंबई ह्यांच्या शिफारशी व स्वाक्षरीने शासनाकडे मंजुरीसाठी पाठविणेत येत . शासनाची मंजुरी घेऊन संबंधित आदेश संबंधित विक्रीकर उपायुक्त प्रशासनाकडे पुढील कार्यवाहीकरिता पाठविणेत येत असे.तसेच महाराष्ट्रातील विक्रीकर विभागाने भाड्याने घेतलेल्या ईमारतींचे भाडे वाढविण्याचे प्रस्ताव संबंधित विक्रीकर उपायुक्त , प्रशासन , ह्यांच्या शिफारसीव स्वाक्षरीने येत .सदर प्रस्तावही अपर विक्रीकर आयुक्त ,महाराष्ट्र राज्य , मुंबई ह्यांच्या स्वाक्षरीने शासनाच्या मंजुरीसाठी पाठविले जात . माझेकडे ४ विक्रीकर निरिक्षक ,आणि ६ लिपिक व१ चपराशी असा कर्मचारीवर्ग होता . त्यावेळी महाराष्ट्रात एकूण १६ विक्रीकर उपायुक्त प्रशासन होते. पुणे आणि नागपूर येथे अपरविक्रीकर आयुक्त होते .
शासनाकडे पाठवावयाचे सर्व प्रस्ताव माझ्या स्वाक्षरीने अपर विक्रीकर आयुक्त ,महाराष्ट्र राज्य मुंबई , ह्यांचेकडे सरळ पाठविले जात .कोणत्याही स.वि.आ . अथवा विक्रीकर उपायुक्त मार्फत प्रकरणे /प्रस्ताव पाठविले जात नसत . त्यामुळे मला अपर विक्रीकर आयुक्तांनीच त्यांच्या दालनांत कधीही सरळ धारीण्या /प्रकरणे घेऊन येण्याचे निर्देश दिले होते . ह्याची कल्पना विक्रीकर भवनात सर्वांना होती .श्री .व्ही . व्ही .मोदी ,अँडव्होकेट ह्यांना हे कळताच त्यांनी गंमतीने खाजगीत मला अपर,अपर विक्रीकर आयुक्त म्हणायला सुरवात केली . माझी आयुक्त कार्यालयात नियुक्ति झाली त्यावेळी माननीय श्री. सतबिर सिंग , ( भा .प्र. से .)हे अपर विक्रीकर आयुक्त ,म. रा .मुंबई , होते . त्यांना प्रत्येक प्रस्तावासोबत संबंधीत शासकिय निर्णयाच्या प्रतीला फ्लँग लावण्याचे निर्देश दिले होते . त्याच्या परिणाम स्वरूप सर्व शासकीय निर्णयांची धारीणी तयार झाली . तसेच मुंबई फायनँनशियल रूल्स ही अद्यावत धारीणीत लागले . त्यामुळे खाते प्रमुख , विभाग प्रमुख ,आयुक्त ,मंत्रालयातील सचिव , मुख्य सचिव ….ई.चे आर्थिक अधिकाराबाबत माहिती झाली .तसेच विविध कामे करण्याचे नियम व अधिकार यांचीही माहिती झाली .
श्री.सतबिर सिंग भा. प्र .से .नंतर श्री .एस . एस . संधु ,( भा .प्र .से .) ह्यांची अपर विक्रीकर आयुक्त ,पदावर नियुक्ति झाली . त्यांनीही मागील सगळ्या प्रथा मागील पानावरून पुढे सुरू ठेवल्या . विक्रीकर आयुक्त म. रा. मुंबई , ह्या पदावर श्री. क्षत्रिय ,( भा .प्र.से .) होते . विक्रीकर विभागात येण्यापूर्वी श्री .क्षत्रिय साहेब व श्री .संधुसाहेब दोघेही महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळात अनुक्रमे मुख्याधिकारी व उप मुख्याधिकारी होते . तेथीलच निवासांत राहात होते .
S.T.R .A. ने काढलेल्या ( Expenditure )विक्रीकर विभागाच्या आस्थापना ५ च्या दोषारोपांच्या मुद्यांना लोक लेखा समितिसमोर विक्रीकर आयुक्तांनाच उत्तरे देण्याची परंपरा होती . दोषारोपाचा कालावधी ९३-९४, ९४-९५आणि ९५-९६ होता . त्यावेळचे कार्यासन अधिकारी स्थानांतरणानंतर दुसरीकडे काम करीत होते .श्री.क्षत्रिय साहेब आयुक्त , पदावर , विक्रीकर विभागांत येऊन अवघे तिनच महिने झाले होते . श्री संधुसाहेब ,अपर विक्रीकर आयुक्त , पदावर त्यांच्या अगोदर चार महिने अगोदर विक्रीकर विभागांत आले होते .
लोकलेखा समितीसमोर सर्वात जास्त गेली १० वर्षे सदोदीत येणारा दोषारोप ,
(१) शासनाकडून मिळविलेल्या Grants रक्कमा विविध शीर्षाखाली वर्षानुवर्षे खर्च होत नाहीत वा शासनास वर्षअखेरीस परतही केल्या गेल्या नाहीत .कारणे?
ह्यावर श्री .क्षत्रिय ( भा . प्र .से .) विक्रीकर आयुक्त , महाराष्ट्र राज्य , मुंबई ह्यांनी मागील दोषारोपांचा तसेच आताच्या दोषारोपांचा सांगोपांग विचार करून उत्तर तयार केले .
”मागील आर्थिक वर्षात विविध शीर्षाखाली (Grants under all Heads)
खर्च न झालेल्या Grants आर्थिक वर्ष संपण्या अगोदरच शासनास परत करण्यात आलेल्या आहेत . तसेच ह्यापुढेही अशी काळजी (Precautions) घेण्यात येईल ,तशा सूचना विक्रीकर खात्यातील कार्यासन अधिकारी ,आस्थापना ( ५) , ह्यांचे मार्फत राज्यातील १५० आस्थापना अधिकारी ह्यांना परिपत्रकाद्वारे देण्यात येतील. ” मंत्रालयातील अर्थ विभागातील सचिव ,मुख्य सचिव ह्यांचेशी चर्चा करणेत आली . लोक लेखा समितीसाठी वरिलप्रमाणे उत्तराला संमती घेण्सात आली . विधान भवनांत ११ व्या मजल्यावर लोक लेखा समितीसमोर विक्रीकर आयुक्तांसोबत अपर विक्रीकर आयुक्त,श्री .संधु (भा. प्र .से.) आणि मी , कार्यासन अधिकारी , आस्थापना ५ म्हणून उपस्थित होतो . त्यावेळी लोक लेखासमितीचे अध्यक्ष होते श्री .आर .आर . पाटील , ते अत्यंत अभ्यासु व्यक्तिमत्व होते . त्यांना शासनाचे सगळे शासकीय विभाग , सनदी अधिकारी फार वचकून असत.
त्यानंतर अ. वि .आ .श्री.संधूसाहेबांच्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्रातील विक्रीकर विभागांतील सगळ्या आस्थापना अधिकारीवर्गासाठी मंत्रालयातील अर्थ विभागातील अधिकार्यांच्या सहकार्याने प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करणेत आले होते . तसेच आस्थापना विभागातील कर्मचार्यींसाठी अंदाजपत्रक, ग्रँट खर्च,
घरकर्ज/कार कर्ज/मोटार सायकल कर्ज/संगणक कर्ज ……इ .विषयावर वेळोवेळी परिपत्रके काढण्यात आली . तसेच महाराष्ट्रातील नागपूर /औरंगाबाद/ नाशीक/कोल्हापूर/मुंबई विभागातील कोकण भवन /वांद्रे/अंधेरी/बोरीवली/चर्चगेट/नरिमन पॉईंट ……..इ. विक्रीकर विभागातील आस्थापना कार्यालयाचे मूल्यमापन व मार्गदर्शनासाठी प्रत्यक्ष भेटी देण्यासाठी श्री. संधूसाहेब( भा.प्र.से.) यांच्या मंजुरीने कार्यक्रम आखण्यात आला .
शासनाने राजपत्रित अधिकारी वर्गासाठी ” संगणक कर्ज ” प्रत्येकी ४५ हजार रूपये प्रमाणे उपलब्ध करण्याची योजना जाहीर केली होती . १९९९-२००० ह्या आर्थिक वर्षीत प्रत्येक खात्यासाठी २० लाख रूपये एव्हढी तरतूद अंदाजपत्रकांत करणेत आली होती . परंतू ह्या रकमेत फक्त ४० अधिकार्यांनाच कर्ज देणे शक्य होते .त्यामुळे सर्वांनी ही रक्कम शासनास परत केली . मी ह्याच संधीचा फायदा घेण्याचे ठरविले . पुरवणी अंदाजपत्रकांत फक्त विक्रीकर विभागाने १ कोटी रूपये ग्रँट अर्थ विभागाकडे मागणी नोंदऊन ,मिळविले . विक्रीकर भवन कार्यीलयात Y 2 LATE , APPLY , FOR COMUTER LOAN . अशी सूचना लावली होती . सुमारे ४०० विक्रीकर अधिकार्यांना संगणक कर्ज शासनाकडून मंजूर करून घेऊन देण्यांत आले .
माझेकडे आयुक्त कार्यालयांतील आस्थापनेचा , स. वि. आ. (व्यवसायकर ),महाराष्ट्र राज्याचा कार्यभार सुद्धा देण्यात आला होता .
ह्याच सुमारास मकरंद ( मोठा मुलगा ) विवेकानंद पॉलिटेक्निक ,चेंबुर येथे तिसर्या वर्षात शिकत होता .तेथील महिला प्राचार्या प्रशासनाच्या कामात फारच कडक शिस्तिच्या म्हणून प्रसिद्ध होत्या .कॉलेजच्या परिसरात कोठेही कागदाचा कपटा जरी दिसला तर तो स्वत: तो स्वत:च्या कोटाच्या खिशात टाकायच्या ,अन् त्यांच्या ह्या सवईमुळे परिस स्वच्छ असायचा .मकरंद कन्नमवार नगरमध्ये नगरपालीकेच्या शाळेतील अभ्यासिकेत दररोज दुपारी अभ्यास करायला जात असे .एके दिवशी त्याला मोटार सायकलने रस्ता ओलांडतांना उडविले होते ,जास्त लागले नव्हते,पण मुका मार लागल्याने त्याला ८-१० दिवस कॉलेजात जाता आले नाही .डॉक्टरांचे आजारी असल्याचे प्रमाणपत्र घेऊन ते कॉलेजात हजर झाला . त्या दिवसापासून मी त्याला विचारून प्रत्येक दिवशी कोणत्या पिरियडला काय काय शिकविले ह्याची डायरीत नोंद करून ठेवायला सुरवात केली . एकदा शनिवारी कॉलेजातील काही मुले पिरियड बंक करून भिंतिवरून उड्या मारून शिर्डीला श्री साईबाबांच्या दर्शनाला गेले .त्या मुलांमध्ये मकरंद लोणकर होता ! असा गैरसमज प्राचार्यांचा झाला होता .त्यांनी मकरंदला प्रत्यक्ष पाहिले नव्हते ,पण नांव मात्र पक्के लक्षात ठेवले होते . त्यानुसार मकरंद लोणकर कॉलेजात सतत गैरहजर असल्याचे पत्र घरी आले. माझ्या व्यवसायकर अधिकारी पदाच्या कालावधीत चेंबुर विभागातील सर्व शाळा ,कॉलेज , सरकारी /खाजगी कार्यालयांची तपासणी करण्याचे अधिकार होते . मकरंदच्या गैरहजेरीबाबतचे पत्र घेऊन मी कॉलेजात प्राचार्यांना भेटायला गेलो .
प्राचार्यांना मी आल्याचे त्यांच्या चपराशाने कळविले . मी त्यांच्या ऑफीसात गेलो त्यावेळी ईतर कोणीही नव्हते . प्राचार्यांनी मकरंदच्या गैरहजेरीबाबत काळजी व्यक्त केली . मी त्यांना मकरंदच्या बँचला शिकविणार्या सगळ्या लेक्चर्रसना ऑफिसात चर्चेच्यावेळी बोलाविण्याची विनंती केली . प्राचार्यांच्यामते हा त्यांच्यावर अविश्वास दाखवण्यासारखे आहे ,त्यांचा आवाज वाढला ! मी त्याांना सांगीतले की माझा आवाजही त्यांच्यापेक्षा मोठा आहे ,पण मला तसे करायचे नाही .तुम्ही मकरंद तसेच त्याच्या बँचमधील आणखी २-३ मुलांनाही ऑफीसात बोलवा .माझ्या डायरीत मकरंदला कॉलेजात गेल्या महिन्याभरात प्रत्येक दिवशी प्रत्येक पिरियडला काय काय शिकविले त्याची नोंद आहे ती पडताळून पाहायची आहे , प्रथम मुलांना आंत बोलवावे असे मला वाटते .
प्राचार्यांनी मुलांना आत बोलाविले ,मुले आंत आल्यावर ,प्राचार्यांनी मकरंदला बोलवायला चपराशाला पाठविले . ह्याचा अर्थ प्राचार्या मकरंदला प्रत्यक्ष ओळखत नव्हत्या .मी मुलांना बाहेर जायला सांगीतले .
मी माझी नोंदीची डायरी प्राचार्यांना निरिक्षणासाठी दिली . त्यांच्या लक्षात सगळा प्रकार आला . त्यांनी मकरंदबाबत पाठविलेले पत्र मागे घेतले .मला झालेल्या मनस्तापाबाबत दिलगिरी व्यक्त केली .
त्यानंतर मी माझे व्यवसायकर अधिकारी पदाचे ओळखपत्र दाखविले व त्याबाबतची पगाराची बिले , व्यवसायकराचा भरणा केल्याच्या चलानस् ….ई. कागदपत्रे दाखविणेस संबंधित अधिकार्यांना सहकार्य करण्याची विनंति केली .
मकरंद ईन्स्ट्रुमेंटेशन डिप्लोमा प्रथम श्रेणीत ऊत्तीर्ण झाला .
त्यानंतर डिग्रीसाठी सेकंड ईयरला प्रवेशासाठी औरंगाबादला गेलो . मेरीटप्रमाणे क्रमाक्रमाने उमेदवारांना हॉलमध्ये बोलाविले .आपापल्या पसंतिची कॉलेजे अग्रक्रमाने दिलेल्या कार्डावर लिहून कॉम्प्युटर विभागाला पाठविली .परंतु कॉम्युटर विभागात मेरीटप्रमाणे कार्ड न ठेवता प्रथम आलेले कार्ड प्रथम कॉम्प्युटरमध्ये फिड केले गेले .परिणामी मेरीटमध्ये मकरंदच्या नंतरच्या मुलाला मुंबईतील एम. जी. एम. कॉलेजमध्ये फ्रि सीट मिळाली भरायची फी रूपये ४०००/- तर मकरंदला ठाणे येथील पार्श्वनाथ ईंजिनिअरींग कॉलेजमध्ये
पेमेंट सीटकरिता रूपये ३२०००/- त्वरित भरायला सांगण्यात आले . ह्या सगळ्या प्रकाराची तक्रार तेथील मुख्य अधिकारी (प्राचार्यांना) कडे करण्यासाठी मकरंदसोबत ५० पालक त्या रात्री आले होते . औरंगाबादला सुरू असलेली द्वितिय वर्ष पदवीच्या प्रवेश प्रक्रिया नियमाप्रमाणे नसल्याने रद्द करणेत यावी अशी तक्रार आम्ही सगळे संचालक मुंबई तसेच हायकोर्टात करणार आहोत . तेथील उपसंचालक तथा प्राचार्यांनी प्रक्रियेतील दोष मान्य करून उद्या मकरंदला उपलब्ध फ्री सिट देण्याचे मान्य केले . आम्ही ठाणे येथील पेमेंट सिट मान्य केल्याने पुन्हा प्रकरण वाढवावयाचे नाही असे ठरविले . कारण मुंबईबाहेरच्या फ्री सीटचा खर्च तुलनेने जास्तच होतो . ठाण्याचे पार्श्वनाथ ईंजिनिअरिंग कॉलेजही A ग्रेडचे होते . चेंबुरच्या विवेकानंद कॉलेजप्रमाणेच ह्या कॉलेजातही फारच कडक शिस्त होती . कॉलेजच्या पिरियड काळात कॉलेजच्या कॉरिडॉरमध्ये विद्यार्थी दिसल्यास/कॉलेजमध्ये जीन्स पँट घालून विद्यार्थी आला तर प्रत्येक दिवशी रूपये ५००/- दंड आकारून वसुलीकेली जाई .मकरंदला विवेकानंदची नेहमी आठवण येत असे .हे कॉलेज त्यावेळी ठाणे – बोरिवली रोडवर कासारवडवलीला होते .मी मकरंदजवळ त्याच्या दररोजच्या खर्चाव्यतिरीक्त रूपये १००/-पाकीटात वेगळेच आकस्मिक खर्चासाठी ठेवायची सवय लावली होती . एकदा अचानकपणे रेल्वेचासंप झाला होता , त्याचवेळी T.M. T. बससेवासुद्धा बंद होती . मकरंदने त्याच्या ४-५ मित्रांना घेऊन ५ मैल अंतर चालत येण्यापेक्षा रिक्षाने ठाणे रेल्वे स्टेशन गांठले .तेथून विक्रोळीला टँक्सीने आला व घरी येऊन टँक्सीभाडे दिले .
मकरंदने बी. ई .(ईन्स्ट्रुमेटेशन) ची पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्यावर ठाणे येथेच वागळे ईस्टेटमधील E.M. C. O . ह्या ईलेक्ट्रिकल कंपनीत रूपये ३०००/- पगारावर ४वर्षे नोकरी केली .त्याचवेळी ईतरत्र नोकरीसाठी प्रयत्न सुरू ठेवले होते . सुदैवाने बंगलोर येथील Team Lease कंपनीत मुलाखत झाली . त्या कंपनीचे काम मोठमोठ्या कंपन्यांना कॉन्ट्रँक्ट पद्धतीने सर्व प्रकारचे ऊमेदवार पुरविण्याचे होते .मकरंदची पुणे येथे Honey Welकंपनीत निवड झाली .सदर कंपनी महाराष्ट्र/मध्यप्रदेश/ गुजराथ/ छत्तीसगड ….इ .ठिकाणी राज्य विद्युत मंडळाच्या कामाचे कंत्राट घेण्याचे काम करीत असे .त्यासाठी त्याला दर महिन्याला खूप प्रवास रेल्वे/ बस /कारने करावालागत असे .विविध क्षेत्रातील अनेक अधिकारी /व्यक्तिंशी त्याचा परिचय झाला .घनिष्ट संबंध वाढले. ह्यातील एक खूपच भारदस्त ,अत्यंत हुशार ,माजी आर्मी कर्मचारी , हरहुन्नरी ,सर्वांच्या मदतीस तत्पर ,अतिशय योग्य सल्लागार व्यक्तिमत्व मकरंदवर मनापासून प्रेम तसेच वेळोवेळी योग्य तेच मार्गदर्शन करणारे नागपूरचे श्री. गोलाईकर भेटले . त्यांनी मकरंदचा काम करतांना स्वत:ला पूर्णपणे झोकून देण्याची वृत्ती तसेच कामाचा झपाटा (वेग )पाहिला .त्याच्यातील ( Spark) ठिणगी जाणवली . त्यांनी त्या ठिणगीला फुंकर घातली .त्यांनी त्याला पुढे शिकून MBA करण्याची प्रेरणा दिली .सुदैवाने त्याचवेळी मुंबईला अंधेरी पुर्वेला असणार्या Sardar Patel Collegeची MBAची माहिती त्याला मिळाली.अधिक चौकशी केल्यावर त्याला कळले की सोबतच अमेरिकेतील व्हर्जिनिया विद्यापीठाची MIT (Master In Information Technology) ची सोय तेथे होऊ घातली आहे . अमेरिकेतील तेथील प्राध्यापक वर्ग येथे S.P.College मध्ये येऊन शिकविणार आहेत .अशी सुवर्णसंधी ( एकाच वर्षात MBA/ MIT(U.S.)मिळविण्याची सोय आयतीच चालून आलेली .त्यान अँडमिशन घेण्याची मानसिक तयारी केली .पण पुर्णवेळ कॉलेज करायचे तर रू.३००००/- द.म.ची नोकरी सोडली पाहिजे. त्याच्या मागे लहान भाऊ आनंदचीही B.E.(Bio-Medical) पदवी घेतल्यानंतर रू. ३०००/_ पगारीवर नोकरी सुरू होती. ‘. लहान बहिण कु. प्रीति B.Com .च्या शेवटच्या वर्षाला शिकत होती . वडिल रिटायरमेंटला आलेले ! त्याने एके दिवशी घरी विषय काढला .मी त्याला तात्काळ Go Ahead ,Don’t Leave The Opportunity, GRAB IT .I Will Manage for Further Three Years असे सांगीतले .मला त्याच्या पुढची झेप घेण्याच्या धाडसी वृत्तीते फार कौतुक वाटले .एकूण काय तर History Repeats बापसे बेटा निकला सवाई !! एकाच वेळी दोन पदव्युत्तर पदव्या ,त्यातील एक परदेशातील तीही तेथे न जाता ! त्याने S.P. College मध्ये M.B. A. करिता प्रवेश घेतला . त्याच्या ह्या कोर्ससाठी सहा लाख रूपये कर्ज स्टेट बँकऑफ इंडिया ,.अंधेरी शाखा, ह्यांच्या सहकार्याने होते .त्याची परतफेड मकरंदला नोकरी लागल्यानंतर सात वर्षात करायची होती . पण मला आता MBA /MIT ची दोन वर्षे व त्यानंतर नोकरी लागल्यावर किमान तीन महिने तरी घरखर्च सांभाळणे क्रमप्राप्त होते .त्यादरम्यान मकरंदने ईन्शुरन्सबाबत एका अखिल भारतीय स्पर्धेत भाग घेतला होता . विविध कंपन्यांचे मुख्य अधिकारीही त्यांत सहभागी होते .अखिल भारतीय स्तरावर मकरंदची स्वित्झरलंडच्या ४-५ दिवसांच्या शिबिरासाठी निवड झाल्याचे पत्र आले , जाणे /येणे/राहणेचा खर्च तेथील कंपनीच करणार होती .पुढील जास्त दिवसासाठीचा खर्च उमेदवाराने स्वत: करावयाचा होता . मकरंदला त्याच्या कॉलेजने पासपोर्ट/व्हिसासह खर्चाच्या काही रकमेची तरतुद करून दिली होती .स्वित्झर्लंड म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच जणू , पाहण्याची संधी मकरंदने घेतली .तेथे नवीनच ओळखी झालेल्या मित्र मैत्रिणिसोबत संपूर्ण स्वित्झर्लंड पाहून आला .नवीन ओळखी / माहितीचा त्याला पुढे उपयोग होणार होता .MBA /MIT साठी वेळो व्हर्जिनिआ – अमेरिका येथून तेथील प्रोफेसर कॉलेजमध्ये शिकवायला येत असत .मकरंदची निवड कँपसमधून Mastek IT ह्या ईन्शुरन्स कंपनीत झाली .

आनंदने बी .ई . बायोमेडीकल ईंजिनिअरिंगची पदवी विलेपार्ले येथील डि. जे.संघवी कॉलेजमधून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली . त्याने बारावीनंतर ईंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता . त्याची उंची बारावीपर्यंत फार कमी होती . परंतु नंतर त्याची उंची हळूहळू वाढली .पदवीनंतर त्याला दहिसरलाच बायोमेडिकल कंपनीतच रूपये ३०००/- द.म. नोकरी मिळाली . तेथून त्याला बाहेरच्या राज्यातही मोठमोठ्या दवाखान्यातील ऑपरेशनच्या मशीन्स दुरूस्तीसाठी दावे लागायचे . हैद्राबादला तर त्याला तेथील दवाखान्यातच चांगल्या पगारावर नोकरीची संधी दिली होती . त्याचीही चांगल्या कंपनीत नोकरीसाठी प्रयत्न सुरू होते . त्याला सी .डँक. कंपनीत आणि इन्फोसिस कंपनीत मुलीखतीसाठी बंगलेारला जायचे होते . त्याने इन्फोसिस कंपनीतील नोकरीसाठी प्राधान्य दिले. दुसर्याच वर्षी कंपनीने स्वित्झरलंडला परदेशात जाण्यस सांगीतले .तेा त्याप्रमाणे तेथे गेलाही . आमच्या लोणकर घराण्यातील मुंबईला नोकरीसाठी आलेली पहिली व्यक्ति मी होतो ,नी आता पहिली परदेशात जाणारी ”बापसे बेटा सवाई ” अशी व्यक्ति ‘आनंद ‘ ठरला . स्वित्झरलंडला पृथ्विवरचा स्वर्ग म्हणतात असे ऐकले होते . मी पुढील वर्षी रिटायर्ड होणार होतो .
माझे आयुक्त कार्यालयातील नियुक्तिला दोन ऐवजी चार वर्षे पुर्ण झाली होती .
मी मागील वर्षी माझ्या आईच्या प्रकृति अस्वास्थ्यामुळे माझे स्थानांतरण वांद्रे येथे करणेसाठी अर्ज केला होता . त्याचा आता विचार करून माझे स्थानांतरण वांद्रे विभाग कार्यालयात करणेत आले .माझी आता शासकीय सेवेची शेवटची तीन वर्षे मी वान्द्रे कार्यालयात काम करणार होतो . ही मा.झी माझगांव येथील विक्रीकर विभागाच्या मुख्य ईमारतीतील २५ वर्षाच्या सेवेनंतरची पहिलीच बदली , तीही ईमारतीबाहेर बांन्द्रा विभागात झाली होती . तेथे श्री .खंबायतसाहेब माझ्या बांद्रा विभागात विक्रीकर उपायुक्त ( प्रशासन ) पदावर होते . ह्याशिवाय बांद्रा येथील उपनगरिय विक्रीकर भवनात अंधेरी विभाग व बोरीवली विभागही होते . माझेकडे निर्धारणा अधिकारी पदाचा पदभार देण्यात आला होता .

आता मुक्काम केंद्रिय शाळा हातगांव

मी सुधारित आदेशाप्रमाणे पंचायत समिति ,मुर्तिजापूर कार्यलयांत माननीय संवर्ग विकास अधिकारी , सहाय्यक ऊपशिक्षणाधिकारी श्री. खानझोडेसाहेबांना भेटलो .त्यांच्या लेखी निर्देशाप्रमाणे ४ किलोमीटर अंतरावरील हातगांव शाळेवर मुख्याध्यापकांना भेटलो .ह्यावेळेपावेतो दुपारचे ५.३० वाजून गेले होते .तेथील मुख्याध्यापक आरखेडकरांना ऊद्या शुक्रवारी कार्यमुक्त करतो मी आजपासूनच कार्यभार घेईन असे सांगून अकोल्याला परत आलो . हातगांवला शुक्रवारी मुर्तिजापूर बाजारचा दिवस असल्याने सकाळची शाळा होती . त्याप्रमाणे मी सकाळीच ७ वाजता शाळ्वर हजर झालो . जुन्या आदेशाप्रमाणे दुसरे गुरूजीही केंद्रिय शाळा मुख्याध्यपकाचा कार्यभार घेण्यासाठी कालच हजर झाले होते . ते गुरूजीसुध्दा हजर झाले .श्री . आरखेडकर गूरूजीही आले . तेव्हड्यात मुर्तिजापूरहून श्री . खानझोडेसाह्बही शाळेला भेट देण्यासाठी आले . त्या दिवशी शाळेवर ३ मुख्याध्यापक हजर होते .
श्री .खानझोडे साहेबांनी आम्हा तिघांनाही प्रश्न विचारला . आज आता नवीन केंद्रिय शाळा मुख्याध्यापकाचा कार्यभार तुमच्या तिघांपैकी कोण घेणार आहे ? श्री . आरखेडकर गुरूजी तर पदवीधारक नाहीत , ऊरले तुम्ही दोघे ! मी बोललो, ‘ सर आपण वरिष्ठ अधिकारी आहात ,आपला निर्णय आम्ही मान्य करू .’ श्री. खानझोडे साहेबांनी विचारले ,कोणाचा आदेश Latest आहे , दाखवा बघु मला , आता .हा श्री .लोणकर गुरूजींचा सुधारित आदेश Latest आहे .त्यामुळे केन्दिय शाळा हातगांवच्या मुख्याध्यापकाचा कार्यभार तेच स्विकारतील आणि ईतर दोघांनाही त्वरीत कार्यमुक्त करतील .
त्याप्रमाणे मी हातगांव शाळेच्या सर्व १८ शिक्षकांना बाजूच्या खोलीत एकत्र बोलाविले , दोघांचे कार्यमुक्त अहवाल तयार करण्याचे काम श्री .ठाकरे गुरूजींना सांगितले . ईतरांना शाळेच्या स्टॉकबुकाची अनुक्रमणिका प्रमाणे , उदा . लाकडी फर्निचर , सायंसची उपकरणे , वाचनालयील पुस्तके…….ई. ची हजर स्टॉकच्या प्रत्येकी चार प्रतित तयार करण्यास सांगितले . सातव्या वर्गातील ३ मुलांना जवळच्या स्टँडवरील हॉटेल मधून २५ चहा-पोहे आणायला सांगितले . हातगांव शाळेचा कार्यभार गेल्या २० – २२ वर्षापासून कोणीही पाहिला , दिला – घेतला नव्हता .साधारणपणे ४० मिनिटात दस्त ऐवज जसा आहे तसा सर्व कार्यभाराच्या प्रत्येेकी ४ – ४ प्रति तयार झाल्या . मी त्यावर स्वाक्षरी केली , जावक बारनिशीचा क्रमांक टाकून कार्यभार घेतल्याच्या अहवाल -प्रति
१ ) श्री .आरखेडकर गुरूजींना २ ) पं .सं .मुर्तिजापूरला ३ )शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद अकोला व ४ )स्थळ प्रत तयार झाल्या . सर्वांचा चहा-नास्ता झाला.
श्री . खानझोडे साहेबांना कार्यभार घेतल्याचा अहवाल सुपूर्द केला . त्यांना खूपच आश्चर्य वाटले , आनंद वाटला . कारण कार्यभार घेणे फारच किचकट व वेळखाऊ काम असते .ते काम ईतक्या झटपट झाले होते . मी ह्याचे श्रेय माझ्या शिक्षकवर्गाला दिले . मी फक्त एवहढेच म्हणालो , सर मला मिळालेल्या वस्तुंची जबाबदारी माझी . न मिळालेल्या वस्तुबाबत नंतर यथावकाश ठरविता येईल .
नंतर मी शाळा समितिचे अध्यक्ष व सरपंच यांना प्रत्यक्ष जाऊन भेटलो . शाळा समितिचे जुने अध्यक्ष व जुने सरपंच यांनाही जाऊन भेटलो . हातगांव शाळेचे पोस्ट ऑफिसचे पासबुक नव्या सरपंच व मुख्याध्यपकांच्या नांवाने बदलून देण्यासाठी त्यांना विनंती केली . परंतु तसे सहकार्य करण्यास त्यांनी तयारी दाखविली नाही .
मी सहाय्यक उपशिक्षणाधिकारी , श्री .खानझोडे साहेबांशी विचारविनिमय केला. त्यांचे आदेशाप्रमाणे हातगांव शाळेचे पोस्टाचे पासबुक जैसे थे ! ठेवण्याचा निर्णय घेतला . शाळेतील मुलांची वर्गवार जमा केलेल्या फीसाठी वेगळ्या रजिस्टरमध्ये नोंद घेण्याची जबाबदारी श्री. ठाकरे गुरूजींकडे दिली .
हातगांवची शाळा सकाळ व दुपार अशी दुबार पध्दतिने भरविली जात असे . शाळेसाठी गावातीलच ३ – ४ जागेवरील खोल्या विनामुल्य वापरावयाला दिलेल्या होत्या . ह्याशिवाय गावाबाहेर जिल्हा परिषदेने बांधून दिलेल्या दोन पक्क्या खोल्या होत्याच . वर्ग १ ते ७ वर्गांमिळून एकूण २६५ पटसंख्या होती . शाळेत दैनंदीन उपस्थिती जेमतेम १५० असायची . शाळेतील विद्यार्थ्यांची ऊपस्थिति वाढविणेसाठीप्रथम प्रयत्न करणे आवश्यक होते . त्यासाठी
( १ )सर्व शिक्षकांची आठवड्यातून एकदा एकत्र बैठक घेण्याचे ठरविले .
( २ ) शाळा समितिचे संपूर्ण सहकार्य मिळविणेसाठी सर्वांची मासीक बैठक घेण्याचे ठरविले .
( ३ ) शाळेत सकाळी १०. ३० वाजता वर्ग १ ते ७ ची एकत्र प्रार्थना शाळेसमोर घेण्याचे ठरविले . त्यावेळी वर्गातील नियमित हजेरी शिवाय प्रार्थनेच्यावेळीच छोटी हजेरी घेण्याचे ठरविले .
( ४ )प्रार्थनेसाठी शाळेच्या समोरच्या मैदानात वर्गवार विटा जमीनीत लावल्या ,प्रथम वर्गशिक्षक , त्यांच्यासमोर वर्गप्रमुख व त्यासमोर त्या वर्गाचे विद्यार्थी उभे राहतील अशी व्यवस्था केली .
आता माझेवर केन्द्रिय शाळा मुख्याध्यापकाची जबाबदारी होती . मला माझ्या शाळेच्या मुख्याध्यापकाच्या जबाबदारी व्यतिररिक्त १० किलोमीटर परिसरातील जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळांच्या नियमित तपासणीचीही जबाबदारी होती .मला माझ्या शाळा तपासणी कार्यक्रमाचा तपशील , पंचायत समिति व जि .प . शिक्षणाधिकारी ह्यांचेकडे महिन्याच्या अगोदर आणि शाळा तपासणी नंतर तपासणी अहवालासह पाठवावा लागत असे .
मी माझ्या केंद्र शाळा अंतर्गत १० किलोमीटर परिसरातील सर्व शिक्षकांची एकत्रित सभा हातगांवला घेतली . नवीन घटक नियोजन म्हणजे काय ? त्याचे महत्व सगळ्यांना समजावून सांगितले . दररोज शाळेत आल्यावर वेळापत्रकाप्रमाणे कोणत्या वर्गाला कोणता भाग शिकवावयाचा आहे , ह्याचे टांचण घटक नियोजन रजिस्टरमध्ये लिहून काढावयाचे !
शाळेतील विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीची कारणे सांगतांना बहुतांश शिक्षकांनी आपापल्या लहान भावंडांना सांभाळण्याच्या कामामुळे मुले ,मुली शाळेत येऊ शकत नाहीत , हे कारण सांगितले . घरची गरीबी हेही एक कारण होते . ह्यासाठी गावातील शाळा समिति व्यतिरिक्त प्रतिष्ठित व्यक्तिंचे सहकार्य फार जरूरिचे होते , अत्यावश्यक होते , ह्यासाठी त्यांचीही वेगळी बैठक घेतली . सर्वांना हे पटले व त्यांनी गावकर्यांना समजाऊन सांगितले .

शुक्रवारी शाळेला चपराशी नसल्याने ,सकाळी मीच शाळेत येऊन घंटी वाजविली ,प्रार्थनेनंतर सर्व मुलामुलींना गावांत परत पाठविले आणि गावातील हजर मुला-मुलींना त्यांच्या लहान भावंडांसह शाळेत घेऊन यायला सांगितले . त्यांना पाटी-पुस्तक , लेखणी ,पेन काहिही नसले तरी चालेल . त्यांना
शाळेत गोळ्या , बिस्कीटे मिळणारआहेत असे सांगा . सगळेजण गावांत गेले अन् आपापल्या वर्गातील शाळेत न येणार्या मुलामुलींना सोबत घेऊनच शाळेत आले .मी सगळ्यांना एकत्र बसवून गोळ्या , बिस्किटे दिली . निरनिराळे खेळ खेळायला लावले . शाळा संपल्यावर सगळी मुले मुली घरी गेल्या .

प्रत्येक वर्गखोलीत सकाळी व दुपारी वर्ग भरत असूनही कोणतेही चित्रे ,म्हणी व वाकप्रचार , तक्ते काहीही लावलेले नव्हते . कोणीही शिक्षक घटक नियोजनाप्रमाणे शिकवत नव्हते . कोणीही घटक नियोजन बनविलेले नव्हते . शाळेत मुलांना बसायला तरटपाट नव्हते . मुला-मुलींना अवांतर वाचनाची आवड नसल्याने वाचनालयातील पुस्तके तशीच कपाटात पडून होती . शाळेला तारेचे कम्पांऊंड व गेटसुध्दा नव्हते . मी श्री ,खानझोडे साहेबांशी विचारविनिमय करून तसेच शाळा समितिशी चर्चा करून शाळेच्या फंडातून तसेच देणगीद्वारे जास्तीत जास्त गोष्टी कशा मिळविता येतील ह्याची योजना तयार केली . आता ठरविलेल्या योजनेची लवकरात लवकर अंमलबजावणी करायची होती .
(१ ) सर्वप्रथम अकोल्याला जाऊन वर्गवार प्रत्येकी एक म्हण ,एक वाकप्रचार ,तक्ता व एकेक चित्र शैक्षणिक साहित्य दुकानातून विकत आणले . प्रत्येक वर्गशिक्षकाला कार्यालयात बोलावून त्यांना त्यांच्या वर्गातील भिंतींवर लावण्यास उपरोक्त साहित्य लावावयास’दिले .सर्व भिंती मशीदीसारख्या होत्या त्या सजल्या ,नटल्या .वर्गातील मुले आनंदित झाली . आता प्रत्येक शिक्षकाने दरमहा किमान एक म्हण वा वाकप्रचार , तक्ता आणि चित्र तयार करून लावलेच पाहिजे असा नियम केला . केलेल्या खर्चाला दरमहा शाळा समितिच्या बैठकीत प्रत्यक्ष पावत्या दाखवून मंजुरात घेण्याची सवय लावून घेतली . शाळासमितिच्या बैठकीचा अहवाल लगेच पंचायत समितिच्या शिक्षण विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्याची जबाबदारी एका शिक्षकाकडे दिली .
(२ )शाळेच्या कार्यालयात तसेच बाहेरही भिंतीवर २-२ ब्लँकबोर्ड तयार करून घेतले . कार्यालयातील फळ्यावर शाळेची माहिती नांव ,वर्गवार पटसंख्या ,मुले,मुली , परगांवावरून येणारे विद्यार्थी ,अनुसुचित जाती , जमाती , ईतर मागास विद्यार्थी ……इ .माहिती खडू ओला करून लिहून घेतली .
(३ ) कार्यालयाबाहेरच्या फळ्यावर दररोज २-२ सुविचार ,दररोजच्या महत्वाच्या बातम्या लिहिण्याची जबाबदारी वेगवेगळ्या शिक्षकांवर सोपविली .
( ४ ) पिण्याच्या पाण्यासाठी गावातील कुंभाराकडून ४ माठ झाकणांसह देणगीत मिळाले , सुताराकडून माठ टेवण्यासाठी लाकडाचे स्टँड मिळाले ,.भांड्याच्या दुकानदाराने प्रत्येकी ६-६ पाणी काढायची भांडी , पेले …..इ .दिले. मुलांसाठी ,मुलींसाठी , शिक्षकांसाठी व कार्यालयासाठी अशी व्यवस्था झाली. माठात दररोज स्वच्छ धुऊन पाणी भरून ठेवण्यासाठी वर्ग ५ , ६ व ७ च्या मुला- मूलींच्यावर वर्गशिक्षकांच्या देखरेखेखाली जबाबदारी दिली .
(५ )पंचायत समितिकडून ४ नवीन तरटपाट मिळाले .शाळा समितिच्या सदस्यांकडून प्रत्येकी एक तरटपाट देणगी मिळाले .गावातील ईतर प्रतिष्ठित व्यक्तिंकडून मिटींगसाठी खूर्च्या , महापुरूषांचे फोटो देणगी मिळाले .
(६ ) जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करून शाळेसाठी गेट व कंपांऊड लाऊन मिळाले.
(७ )सर्व शिक्षकांना मुख्यालयीच राहण्याचे प्रशासनाचे आदेश होते . त्यासाठी प्रत्येक शिक्षकाने गावातच राहण्यासाठी भाड्याने खोली घेतली .
(८ ) शाळेच्या वाचनालयातील पुस्तके विद्यार्थी वाचनालयाच्या तासात वाचू लागले .
(९ ) १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन , २ आक्टोंबर गांधी-जयंती ,२९ नोहेंबर महात्मा फुले जयंती , २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन …ई .
च्यावेळी गांवातून लेझीमच्या तालावर मिरवणूक निघायची . शाळेत मिरवणूक विसर्जित व्हायची . विद्यार्थ्यांना प्रसंगोपात गोळ्या , चॉकलेट , मिठाई वाटप होत असे .
(१० )खेळाच्या तासात हुतूतू , खोखो , लंगडी …इ खेळ खेळले जात .
(११ ) शिक्षकांच्या वादविवाद स्पर्धा वेगवेगळ्या विषयावर प्रत्येक आठवड्याला आठवडी बाजारच्या दिवशी सुरू केल्या .
(१२ )शिक्षकांच्या मासिक सभांमध्ये शैक्षणीक अडचणी सोडविण्याबाबत चर्चाकरून निर्णय घेतले जात .

मुर्तिजापूर तालुका युवक कॉंग्रेसच्या शिबीराला माननीय शिक्षण राज्य-मंत्री श्री .रामनाथजी पांडे हजर राहणार होते . त्यासाठी शाळेच्या खोल्या वापरण्यासाठी लेखी परवानगी हातगांवच्या सरपंचांनी संवर्ग विकास अधिकारी ,पं .स. मुर्तिजापूर ह्यांचेकडून आणली होती .सायंकाळी सभेला मान .सरपंच हातगांव , सभापती पं .स . मुर्तिजापूर , तसेच कॉंग्रेसचे राजकीय पुढारी कार्यकर्त्यांसह हजर होते . शाळेतच कार्यक्रम असल्याने मी तब्येत ठीक नव्हती
तरी हजर राहणे आवश्यक होते . कारण शाळेला चपराशी नव्हता.
मेडशीचे निवृत्त मुख्याध्यापक श्री .हाते गुरूजी मुर्तिजापूर येथेच’भारतीय ग्ञानपीठावर प्राचार्य होते . त्यांचे मार्गदर्शनही मला मिळत होते .शाळेतील खेळाडू मुर्तिजापूर येथे खेळायला गेले गतवर्षीपेक्षा जास्त बक्षीसे जिंकून आले .
माझी निवड वाशीम अध्यापक विद्यालयात एक महिना मुख्याध्यापक प्रशिक्षणासाठी झाली . त्याचवेळी ति. रा. रा. बाबांची तब्येत जास्त बिघडल्याने त्यांना अकोला येथे मोठ्या सरकारी दवाखान्यात भरती केले होते . दवाखान्यात ति. मुरलीधर थांबायचा , भोनहून श्री ,रामचंद्रकाका व श्रीयुत सदाशिवकाका मधून मधून येत होते . ति.बाबांना कफाचा त्रास होत होता . घशातून येणारा कफ चिकट होता . जुन्या आजाराची आठवण करून देत होता.
वैद्य गोपाळ सुताराचे त्यावेळचे औषधोपचार व त्याचे बोल आठवले . कदाचित म्हातारपणी ताकद कमी झाल्यावर पुन्हा चिकट कफाचा त्रास होऊ शकतो . दवाखान्यातील डॉक्टर राठोडांनी अँडमीट करून घेतले . औषधोपचाराने ति. बाबांची तब्येत सुधारायला लागली . त्यांनी मला वाशीमला ट्रेनिंगला जायला परवानगीही दिली . मी त्यावेळी सातव्या वर्गाच्या ईंग्रजी विषयाची गाईड छापून घेतली होती . त्याचे वितरण मला प्रशिक्षणार्थींना करायचे होते . त्याच्या प्रति कमी पडल्या त्यासाठी मी दुपारी २ वाजता मेडशीला घरी आलो होतो . तेथे माझी भेट श्री. कासारकाकांशी झाली . ते नुकतेच अकोल्याला दवाखान्यात ति. बाबांना भेटून आले होते . त्यांनी सांगितले की डॉक्टर श्री . राठोड ह्यांच्या आदेशाप्रमाणे ति .बाबांना पायाच्या घोडनसेतून सलाईन सुरू केलेले आहे .मी मेडशीला सौ. निर्मला ,कु ताई ,माई व प्रमोदला अकोल्याला जायची तयारी करायला सांगून वाशीमला Last Day ला दि.२८जानेवारी १९७५ ला एक महिन्याचे मुख्याध्यपकाचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आणायला गेलो . लगोलग मेडशीला परत आलो व रात्री ८ वाजताच्या एस .टी . ने अकोल्याला ति. हिंगणेकर मामांकडे रात्री १०.३० वाजता जाऊन पोहोचलो . ति. गं. भा .आजीने (आईची आई ) आम्हाला आता दवाखान्यात जाऊन फायदा नाही . फार ऊशीर झाला आहे ,घरीच थांबा असे सांगितले . आम्हा सर्वांना आजीने चहा -पाणी , जेवण करून घ्यायला सांगितले .
थोड्याच वेळात ति. हिंगणेकरमामा अचेतन बाबांना घेऊन घरी पोहोचलेे , घरात एकच हलकल्लोळ झाला . कोणी कोणाला समजावयाचे , आवरायचे काहीच समजेना .मला ,मुरलीधरला ति .मोठेमामांनी समजावले ,पोटाशी धरले ,सारखे पाठीवरून हात फिरवत राहीले .मी अचेतन बाबांजवळच रात्रभर बसून होतो . माझ्या डोळ्यातील अश्रूच आटले होते , घशातून रडण्याचाही आवाज येत नव्हता . ति .सौ .मोठ्यामामी , आजी , आईला ,ताई ,माईला समजावत होत्या. जेमतेम तीन वर्षाच्या प्रमोदला तर हे सगळे कां रडताहेत ? हेच समजत नव्हते . दि. २९ जानेवारीला दुपारी बाबांचा अंत्यसंस्कार अकोल्यालाच करण्यात आला. दि.३० जानेवारीला मला मुख्याध्यापक प्रशिक्षणानंतर हातगांवला शाळेवर हजर होणे अत्यावश्यक होते .त्याप्रमाणे मी सकाळीच हातगांवला शाळेवर हजर झालो . सर्वांना वडिलांच्या दु:खद निधनाची बातमी साश्रु नयनांनी सगळ्यांना सांगीतली व २ दिवसांची किरकोळ रजा घेऊन अकोल्याला परत आलो . तिसरा दिवशी अस्थि व रक्षा घेऊन कै .बाबांच्या ईच्छेप्रमाणे अकोला जवळच्या गांधीनगरला जाऊन पूर्णा नदीत अस्थि व रक्षा विसर्जन केले . १० वा ,१३ वा दिवस मेडशीला करण्याचे ठरविले .
आता सर्वप्रथम Legal Heir Certificate तहसीलदार , अकोला , ह्यांचेकडून तांतडीने कसे मिळवायचे ह्या विचारांत पडलो . कारण राहणार मेडशी ता.वाशीम ह्या पत्यामुळे उपरोक्त प्रमाणपत्र तहसीलदार वाशीमकडूनच घ्यावे लागले असते . अकोला येथील पोळा चौक प्रभागाच्या ( वार्डाच्या ) नगरसेवकाकडून आम्ही सर्व लोणकर कुटुंबीय , मूळ राहणार मेडशी ता. वाशीम , हे ,अकोला येथे पोळाचौकातील श्री .गायकर ह्यांचे घरात भाड्याने राहतात असे प्रमाणपत्र घेतले . कै .बाबांचे सरकारी दवाखान्यातून मिळालेले मृत्यू प्रमाणपत्र होतेच . अकोला तहसील येथील स्टँप व्हेंडरने सांगीतल्याप्रमाणे अँफेडेव्हीट केले आणी सगळी उपरोक्त कागदपत्रे सोबत जोडून वारसा प्रमाणपत्र मिळण्यासाठी विनंती अर्ज अकोला तहसीलदारांकडे केला . त्याप्रमाणे त्यांनी कै .वामनराव बळीराम लोणकर यांचे वारसा प्रमाणपत्र आम्हाला दिले . मेडशीला कै.बाबांचे वास्तव्य १९५५ ते २८ जानेवारी १९७५ पर्यंत होते .मेडशी पंचक्रोशीत त्यांना सगळे पोतद्दार म्हणूनच आदरार्थी बोलवित , प्रेमाने जोडलेली अगणित मंडळी
मेडशी परिसरात होती . ती सगळी मंडळी कै .बाबांच्या मृत्युची बातमी कळताच खूपच हळहळली .त्या सर्वांनी आमचे सांन्त्वन केले . धीर दिला .
मेडशी शाळासुध्दा केन्द्रिय शाळा होती . २९ ,३०, ३१ जानेवारी १९७५ ह्या ३ दिवसांचा पगार चलानने भरण्यास देऊन उरलेल्या २८ दिवसांचा कै. बाबांचा पगार मिळाला , मेडशी परिसरातील सगळ्या लहान थोरांनी सर्वांनी आवश्यक ती सगळी मदत करून १० वा , १३ वा दिवसाचा कार्यक्रम आटोपला .मेडशीला अकोला ,पातूर ,बाळापूर , भोनचे सर्व नातेवाईक ह्या कार्यक्रमाला आले होते .

आता घरात कमावता फक्त मीच राहीलो . तसेच मोठा मुलगा ह्या नात्याने घरादाराची लहान भावंडांचे शिक्षण ,लग्न … ईत्यादी सगळी जबाबदारी फक्त माझीच होती . आता मेडशीला कोणालाही ठेवणे शक्य नव्हते . हातगांवला नेण्यापेक्षा अकोल्याला भाड्याने खोली घेऊन राहणेचा पर्याय ति.मोठेमामांनी सुचविला . सर्वानुमते हा पर्याय अतिशय योग्य वाटला . आता अकोल्याला तेही जुन्या शहरात दाबकी रोडवर घर शोधले . अकोल्याला ति . मोठेमामांचे जातायेता लक्ष राहणार होते . अकोला जिल्ह्याचे ठिकाण होते . तेथे शाळा , कॉलेज सह सर्व सोयी होत्या . मला हातगांवहून जाणे येणेही करणे शक्य होते .सकाळी व संध्याकाळी हावडा एक्सप्रेसने अकोला- मुर्तिजापूर-हातगांव करणे सहज शक्य होते . अकोला रेल्वे -स्टेशनवर आणि मुर्तिजापूर रेल्वे- स्टेशनवर प्रत्येकी एक सायकल ठेवली की , Up-Down करणेस कोणताही त्रास होणार नव्हता .मेडशीला १९५५ ते १९७५ वीस वर्षे कै. बाबा भोनहून येथे नोकरी निमित्ताने आले. त्यावेळी मेडशीला कै. तुळशीराम धरमकर हे एकमेव सोनाराचे घर होते . पाहतापाहता बाबा जणू मेडशीतचेच झाले , एव्हढे प्रेम मेडशी व परिसरातील ब्राम्हणवाडा , मारसूळ , रिधोरा , वाकळवाडी….ई मधील शिक्षकांनी , गांवकर्यानी त्यांना दिले . त्यांना सर्वच आदरार्थी संबोधत . मेडशीला नागनाथ हायस्कूल सुरू झाले , हायस्कूलच्या मुख्याध्यापकांच्या मुलाखतीच्यावेळी श्री .शेंडेगुरूजी (अमडापूर-बुलढाणा ), श्री,संगई ( पातूर ) ,श्री. थोरात ( चिखलगांव ) येथून आले . ह्या सर्वांचे मेडशीत आल्यापासून सदोदीद बाबाशी प्रेमाचे तसेच कौटुंबिक सबंध राहिले . तसेच हायस्कूल शिक्षक श्री .पाठक ( अमरावतीकर ) ,श्री . सावरकर ( मुर्तिजापूरकर ), श्री. राजकुमार आहाळे (मोठा राजूरा ) ,श्री . डॉक्टर सुधाकर देशमुख (डोंगरगांवकर )ह्यासगळ्यांशी प्रेमाचे व जिव्हाळ्याचे संबंध ते मेडशीहून बदलून गेले तरी कायम होते . सौ. आईने व ति. बाबांनी अत्यंत हलाखीत (गरीबीत ) दिवस काढले होते.आपण भोगलेला त्रास कोणालाही होऊ नये ह्यासाठी ते सदासर्वदा तत्पर असत . मेडशीतील सगळ्याच शिक्षक , शिक्षिका ईतकेच नव्हे तर पोलीस कर्मचारी , मलेरिया कर्मचारी , कृषी सहाय्य्क ह्यांच्या मदतीला सर्व प्रथम आठवण यायची ”श्री .पोतदार (लोणकर ) ” याचीच . गावांत कोणत्याही घरी आजारी वा कठीण प्रसंगी प्रथम धाऊन जाण्याची त्यांची सवयच होती .एकदा गावात संचार- बंदी होती ,पोलीसांचा कडक बंदोबस्त होता , पोलीस कोणालाही घराबाहेरपडू देत नव्हते . अशा परिस्थितीत पोलीस शेवटी माणूसच आहे , सरकार त्यांची चहा-पाणी ,नास्ता ,जेवणाचीसोय करू शकत नाही . त्यांना ऊपाशी पोटी, पाण्याशिवाय ड्युटी करावी लागते अशा वेळी ५० – ६० भाकरी आणि बेसन आईने तयार केले . बाबांनी जीव धोक्यात घालून दरवाजा थोडासा ऊघडला व एका पोलीसाला विनंती करून त्याच्या जवळ सगळे खाण्याचे व हंडाभर पाणी ,तांब्या दिला .त्यावेळी त्या पोलीसांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या .त्याने आपल्या सहकारी पोलीसांना बोलाविले . त्या सर्वांनी क्रमाक्रमाने जेवणं केली . सगळयांनी मनापासून ह्या दयाळू वृत्तिला सलाम केला . थंडीचे दिवस होते , मी मालेगांवहून दोन ब्लँकेट आणले होते . २-३ दिवसानंतर अचानक एक साधू आला . बाबांनी त्याला खायला दिले , पाणी दिले अंगात पतले कपडे होते . बाबांनी आईला नवे ब्लँकेट त्याला द्यायला सांगीतले . बाबा म्हणाले देव कोणाच्या रूपात येईल सांगता येत नाही. रंजल्या गांजलेल्यांना मदत करण्यांत आई-बाबा आपापल्या परिने हातभार लावत होते.

शेवटी सर्वानुमते अकोल्याला जुन्या शहरात दाबकी रोडवर भाड्याने घर घेऊन राहण्याचे ठरले . मेडशीचे लोकांचे घेणे – देणे आटोपून सगळयांचा निरोप घेवून आम्ही सर्वजण अकोल्याला आलो . श्री .रावजी टालवाल्याची खोली भाड्याने मिळाली . ति.मोठेमामांचे घर जवळच होते . मी हातगांवला शाळेवर हजर झालो.

हातगांव शाळा व परिसरातील शाळांमिळून विद्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्याचे ठरविले . सर्व विद्यार्थी ह्या कामात लागले .सोपे सोपे सायंसचे प्रयोग त्यामागील रहस्य त्या गटाचे विद्यार्थीच समजाऊन सांगत . हातगांवला स्काऊट पथक नव्हते , मी स्काऊट टीचरचे प्रशिक्षण घेतले होतेच . मुंबईला अखिल भारतीय स्काऊट मेळावा घेण्याचे ठरविण्यासाठी अकोला जिल्हा स्काऊट प्रमुख श्री .कुळकर्णीसरांनी मिटींगला मी अकोला येथे उपस्थित राहण्यासाठी गेलो . त्यानंतर आठवडाभर आजारी होतो . मी तसे पं . स .मुर्तिजापूरला व हातगांव शाळेलाही कळविले होते . हातगांव शाळेत मी वयाने लहान होतोच तसेच एकूण सेवाज्येष्ठतेनेही कनिष्ठ होतो .पण प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या ( M. A ., D . Ed . ) यादीत वरिष्ठ होतो . आमच्या हातगांव शाळेत मुर्तिजापूरचे श्री . देशमुख गुरूजीही पदवीधर होते . त्यांना माझी नेमणूक रूचली नव्हती . ते असंतुष्ट होते . माझ्याविरूध्द तक्रार करण्याची एकही संधी ते कधीही सोडत नसत . मी आजारी असतांना त्यांनी सरपंच हातगांव यांचेकडे श्री . लोणकर गुरूजी काहीही न सांगता गैरहजर आहेत. शाळा समिती अध्यक्ष या नात्याने सरपंचांनी दररोज प्रार्थनेच्यावेळी हजर राहून ‘आज रोजी शाळेला भेट दिली असता मुख्याध्यापक श्री लोणकर गुरूजी गैरहजर आहेत . हया भेटीचा अहवाल पंचायत समितीला पाठविणेत यावा .’ स्वत: सरपंच पं . स. मुर्तिजापूर येथे जाऊन सभापती महोदयांना भेटून उपशिक्षणाधिकारी हयांना शाळेवर पाठऊन चौकशी करण्याची विनंती करीत . शेवटी एके दिवशी सभीपतींनी श्री .खानझोडेसाहेबांना हातगांव शाळेवर जाऊन चौकशी अहवाल देण्यास सांगीतले . श्री . खानझोडे साहेबांकडे माझा आजारी असल्याबाबत डॉक्टरांचे प्रमाणपत्र मिळाले होते.
श्री.खानझोडे साहेब हातगांव शाळेत गेले . सगळी चौकशी करतांना श्री. लोणकर कधीपासून शाळेवर आलेले नाहीत ? त्यांनी त्याबाबत काही कळविले आहे काय ? असल्यास केव्हा ? ते वारंवार काहीही न कळविता गैरहजर राहतात काय ? श्री.ठाकरे गुरूजींकडे पोस्टाचा कार्यभार होता . त्यांनी सांगीतले की कालच्याच टपालात श्री .लोणकर गुरूजींचे पत्र व आजारी असल्याबाबत वैद्यकीय दाखला पाठविलाआहे . ते ३ दिवसाच्या स्काऊट मिटींगला अकोल्याला गेले होते , तेथेच आजारी पडले . त्याबाबतचा वैद्यकीय ऊपचार घेत असल्याचे प्रमाणपत्र त्यांनी शाळेला पाठविले आहे , त्याची प्रत पं. स . ला पाठविली आहे . ते नियमित कामावर असतात . त्यांनी कार्यभार घेतल्यापासून शाळेची ऊपस्थिती वाढली आहे , निरनिराळे ऊपक्रम ते सतत राबवित असतात .आतापर्यंतच्या ईतिहासात नुकतेच विदञान प्रदर्शन हातगांव केंद्राच्या परिसरातील शाळांच्या सहभागाने यशस्वीरित्या पार पडले आहे ,तसेच कधी नव्हे ती शाळा समितीची मसिक सभा घेऊन सगळा हिशेब व शाळेच्या प्रगतीचा लेखा-जोखा पारदर्शी पध्दतीने समोर ठेवत असतात . श्री .खानझोडे साहेबांनी शाळा समिति अध्यक्षांनाही प्रत्यक्ष बोलावून ह्याबाबत विचारणा केली . तसेच ईतर शाळासमिति सदस्यांनाही विचारणा केली असता त्यांना सत्य परिस्थितिचे आकलन झाले. नंतर त्यांनी पंचायत समितीला आलेले पत्र व माझे आजारी असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्रही सर्वांना दाखविले. चौकशी अहवालात सगळ्या बाबींचा उहापोह करून सभापतीं मुर्तिजापूर आणि संवर्ग विकास अधिकारी यांना अहवाल सादर केला .आजारातून बरा झाल्यानंतरचे वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन मी शाळेवर हजर झालो . कामावर रूजुं झाल्याचा अहवाल वैद्यकीय प्रमाणपत्रासह संवर्ग विकास अधिकारी ,पंचायत समिती ,मुर्तिजापूरला पाठविला .
डिसेंबर १९७५च्या शेवटच्या आठवड्यात आरेकॉलनी , गोरेगांव , पश्चिम ,मुंबई येथे अखिल भारतीय स्काऊट आणि गाईड मेळावा आहे ,त्यासाठी स्काऊट सुपरवायझरच्या पदावर तसेच श्री.कुळकर्णी, जिल्हा प्रमुख , स्काऊट / गाईड , ह्यांचे मदतनीस म्हणून माझी निवड करणेत आल्याचे आदेश मला प्राप्त झाला.त्याप्रमाणे मी मुंबईला जाण्याची तयारी सुरू केली . ति. गं .भा .आईने माझ्यासाठी तहानलाडू भुकलाडू तयार करून दिले . मी श्री. कांबळे गुरूजींच्या भाऊराव कांबळेचा पत्ता घेतला . माझे सोबत मुर्तिजापूर पंचायत समितीतून आणखी एक शिक्षक श्री. भडंगेसुद्धा होते . आम्ही गोरेगांव आरे कॉलनीतील स्काऊट /गाईड कँपच्या जागेवर पोहोचलो . संपूर्ण भारतातून आलेल्या शिबीरार्थींना त्यांच्या त्यांच्या तंबूत पोहोचण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे आमचेकडे दिले होते . तसेच सर्वसाधारण बाबींकडे लक्ष देण्याची जबाबदारीही आमचेवरच होती . मुंबईत फिरण्यासाठी जातांना स्काऊट ड्रेसमध्येच जाण्याच्या सूचना सर्वांना देण्यात आल्या होत्या . मुंबईच्या लोकल गाड्या नऊ डब्यांच्या होत्या .प्रत्येक स्टेशनवर १/२ मिनिट् थांबायची . तेव्हड्या वेळेत लोक लोकल मधून चढायचे /उतरायचे काम करीत . जवळ जवळ ८ दिवस मला भाऊराव कांबळेचा ऑफीसचा पत्ता सापडला नाही .३०डिसेंबर १९७५ ला मात्र मला पत्ता सापडला .भाऊराव कांबळेकडून विक्रिकर भवनाचा पत्ता घेतला. तेथे आयुक्तांचे कार्यालयातील संबंधित लिपिकाकडे गेलो . तो काय आश्चर्य माझा विक्रीकर निरिक्षक पदाचा नियुक्ति आदेश त्यांच्या टेबलवरच होता .पत्ता मेडशीचा होता .मी त्यांना विनंती करून अकोल्याच्या ति. हिंगणेकरमामांच्या दाबकी रोड , जुने शहर , अकोला ह्या पत्यावर तो आदेश पाठविण्याची व्यवस्था केली .
अकेल्याला परत येतांना शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाची पहिली योजना रद्द करून मी सरळ अकोल्याला परतलो .ति. मोठे हिंगणेकरमामांना आणि घरी मुंबईचे वृत्त् सांगीतले . विक्रीकर निरिक्षक पदावर नियुक्तिचा आदेश आठवडाभरात मिळेल असा अंदाज सांगीतला . ति. मोठेमामांच्या मते शिक्षकाची नोकरीचा राजीनामा द्यावा ,पण एक महिन्याची पूर्व सूचना देऊनच . ह्याचा फायदा शिक्षकाची नोकरी कायम स्वरूपाची असल्याने पूर्व सूचना न देता तडकाफडकी राजीनामा दिल्यास नियमा प्रमाणे ३ महिन्याचा पगार भरावा लागेल तो वाचेल .तुला तेथे ३ महिन्याचे प्रशिक्षण घ्यावे लागेल .
विक्रीकर विभागाने पाठविलेला माझा विक्रीकर निरिक्षक नियुक्ति आदेश दिनांक ३ जानेवारी रोजी रजिस्टर पोस्टाने पाठविला . सदर रजिस्टर पत्र मामांकडे आले परंतू त्यावर माझे नाव असल्याने पोस्टमनने ते दिले नाही . रात्री मी हातगांवहून परत आल्यावर मला ते समजले .मी लगेच दुसर्या दिवशी मुख्य पोस्ट ऑफीसात जाऊन बीट पोस्टमन कडून ओळख पटवून रजिस्टर पत्र ताब्यात घेतले .सोबत मुरलीधरला आणले होते ,त्याच्याकडे ति.हिंगणेकरमामांना व घरी दाखविण्यासाठी ते रजिस्टर पत्र दिले . मी हातगांवला गेलो ,मुर्तिजापूर पंचायत समितीत श्री . खानझोडे साहेबांना ही बातमी पिथम सांगीतली , त्यांनीही राजीनामा पूर्वसूचना देण्याचा सल्ला दिला. हातगांवला शाळेत ही बातमी सांगताच सर्वींची मने आनंदून गेली . मी डॉ. सुधाकर देशमुखांच्या मोठ्या भावाचा ,श्री .भास्करराव देशमुखांचा ,वांद्रा ( पूर्व ), मुंबईचा पत्ता , तसेच ती .गं. भा .आईच्या मैत्रीणीचा मुंबईचा पत्ता घेतला .
मी दिनांक ६/१/१९७६ ला राजीनामा पुर्वसूचना पत्र माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी , जिल्हा परिषद ,अकोला ह्यांना पं. स. मुर्तिजापूर व शिक्षणाधिकारी जि . प .अकोला मार्फत पाठविले . श्री. माटे ,प्रसिध्दी अधिकारी, जि .प . अकोला आणि श्री . आगरकर ,उपशिक्षणाधिकारी ,जि . प.अकोला ,(दोघेही माझे शाळेतील शिक्षक होते .)ह्यांनाही सगळे वर्तमान सांगीतले. दोघेही खूप आनंदले . त्यांनी मुंबईला जाण्याचा माझा निर्णय अगदी योग्य असल्याचे ठामपणे सांगीतले . तुमच्या प्रगतीची हीच योग्य दिशा आहे . आगे बढो ! ईश्वराचे तुम्हाला पुढे ह्यापेक्षाही अधिक प्रगतीसाठी सहाय्य लाभणार आहेच . तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास आम्ही सगळे आहेातच , ह्याची खात्री बाळगा . शाळेचा कार्यभाराची यादी तयार झाली ,माझ्या शाळेतील सिनियर शिक्षकाला चार्ज दिला . माझ्या निरोप समारंभाला परिसरातील सर्व शाळांचे शिक्षक , गावातील प्रतिष्ठीत व्यक्ति ,शाळा समिती सदस्य ह्याशिवाय एकूण ३७५ विद्यार्थ्यांपैकी ३६० विद्यार्थी उपस्थित होते .मला ह्यावेळी घुसरच्या श्री .गोरले गुरूजींच्या भविष्यवाणीची प्रकर्षाने आठवण झाली . त्यांनी १९६३ सालीच माझ्या शिक्षकाच्या प्रथम नियुक्तिच्या वेळीच मला ”तुम्ही भविष्यात वर्ग १ , अधिकारी होणार ” असे सांगीतले होते .
मी माझ्या भाषणात सांगीतले की ,मी तुम्हा सर्वांच्या आठवणी सोबत घेऊन जाणार आहे . मी आता मुंबईला सजीव नसलेल्या कागदांच्या सोबत राहणार आहे. त्यांच्यासोबत राहणार , बोलणार आहे . तेथेही माझा मोठा मित्रपरिवार असणार आहे. तुम्हा सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार,काही अधिक -ऊणे बोललो असल्यास क्षमस्व .
तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनेा शिकून खूप मोठे व्हा ,आई-वडीलांचे ,गावाचे ,शाळेचे नांव उज्वल करा .भविष्य काळात कोठे भेटलात तर ओळख ठेवा.मुर्तिजापूरला श्री.हाते गुरुजींना भेटलो ,तेही आनंदून गेले ,अन म्हणाले कै.पोतदार स्वर्गातून तुम्हाला आशीर्वाद देत आहेत . तुम्ही वर्ग १ अधिकारी निश्चित होणार आहात .
सर्वांचा शिक्षक वर्गाचा,गावकर्यांचा निरोप घेऊन अकोल्याला घरी आलो . माझे स्काऊट बेडींग व ईतर आवश्यक सामानाची पेटी तयार झाली .चि. मुरलीधर , ज्योतीताई , सुषमा उर्फ माई व चारच वर्षाच्या प्रमोदची काळजी करू नकाेस असे सगळ्यांनी सांगीतले . कै .बाबांची मनातील अतृप्त ईच्छा पूर्ण करण्याचे बळ मिळावे म्हणून प्रार्थना केली . मुंबईला पहिले तीन महिने प्रशिक्षण काळात मला रू. १५०/-एव्हढीच रक्कम मिळणार होती . ति, रा . रा. मोठेमामांनी मला रू .५००/- खर्चासाठी दिले . घरून भुकलाडू ,तहान लाडू दिले होते .

ति.मोठेमामांनी मला , जिल्हाधिकारी , अकोला कार्यालयातील लिपिक ,श्री.खान हे रविवार दिनांक ८/२/१९७६ रोजी सायंकाळी हावडा एक्सप्रेसने मुंबईला जाणार आहेत , ही माहिती दिली . त्यामुळे मला माझ्या मुंबईपर्यंतच्या प्रवासात साथीदार मिळाला . सगळ्या वडील मंडळींचा आशिर्वाद घेऊन ति.रा. रा.मोठेमामा व मुरलीधर सेाबत अकोला रेल्वे स्टेशनवर आलो . हावडा एक्सप्रेसने श्री. खान लिपिकासोबत माझे स्काऊट बेडींग आणि पेटी घेऊन मुंबईला निघालो .

मुक्काम रिधोरा (बाळापूर )-अकोला .

अकोला येथून ९ .मैलावर बाळापूर रोडवर रिधोरा हे गांव आहे . गावाची प्रसिध्दी म्हणजे त्यावेळचे मंत्री महोदय माननीय श्री .गोविंदराव सरनाईकांची सासुरवाडी रिधोरा . गांव तसा मोठा जागृत कार्यकर्त्यांचा , त्यातही तरूण कार्यकर्ते जास्त .गावचे श्री . रंगराव पाटील यांचा तसा दरारा होताच .त्यांचा ट्रँक्टर दुरूस्तिचा कारखाना अकोल्याला सावतराम मिल रस्यावर होता . त्यांचे गावातील सर्व घडामोडींकडे बारीक लक्ष असायचे .रिधोरा ऊच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री .खाकरे गुरूजीअनेक वर्षापासून रिधोरा येथेच होते .त्यांचा रिधोरा गावच्या जडणघडणीत मोठा सहभाग होता . श्री . खाकरेगुरूजी स्काऊटचे अकोला जिल्हयाचे  उपप्रमुखही होते .स्काऊटचे जिल्हा प्रमुख श्री .कुळकर्णी , हे अकोला जिल्हापरिषदेत उपशिक्षणाधिकारीही होते .  माझे मावसभाऊ  पातूरचे श्री . प्रभाकर तुळशीराम ठोसर हे शिक्षक म्हणून रिधोरा शाळेवर बरेच वर्षापासून होते . त्यांनी सेवानिवृत्तीचे कारणावरून पातूर जवळ बदली मागीतली होती . परंतू गांव आणि रंगरावबापू त्यांना सोडायला तयार नव्हते .आई -वडील वृध्द आहेत , त्यांच्या सेवेसाठी गांवी नाहीतर गावाजवळ जाणे अत्यावश्यक आहे हे त्यांना पटवून सांगीतल्यावर ते श्री . ठोसर गुरूजींच्या बदलीसाठी ते सर्व राजी झाले ,पण त्यांचे जागेवर तसेच दुसरे गुरूजीं त्यांना मिळाले पाहिजेत ही अट होती . योगायोगाने मला अकोला जवळील गांवाला बदली मिळाली ,त्यांचेही समाधान झाले .

रिधोरा शाळा केंद्रिय ऊच्च प्राथमिक शाळा केल्याचा आदेश शिक्षण संचालकांच्या सहमतीने अकोला जिल्हा परिषदेने निर्गमित केला . आता रिधोरा शाळेवर पदवीधर प्राथमिक शिक्षक मुख्याध्यापकाची नियुक्ती होणार असल्याने आताचे मुख्याध्यापक श्री . खाकरेगुरूजींची बदली निश्चित होणार , ही बातमी रिधोरा ग्रामवासीयांना समजली , श्री .रंगराव पाटीलांनाही कळली . आता काय करावे ? सगळ्यांनी अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी ह्यांची भेट घेतली . स्थानिक राजकीय पुढारीसुध्दा विचारात पडले . केंद्र शाळा बदलण्याचा निर्णय शिक्षण संचालक ,पुणे हयांचेकडे असल्याने अकोला जिल्हा परिषदेला निर्णय घेणे शक्य नव्हते . रिधोरा गावाने अनोखा सत्याग्रहाचा निर्णय घेतला . श्री. रंगराव पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गावात समांतर शाळा सुरू केली . शाळेत एकही मुलगा पाठविणार नाही . शाळेत स्वत: श्री .रंगराव पाटलांनी येऊन सर्व शिक्षकांना ह्याची कल्पना दिली . सर्व स्थानिक राजकीय पुढारी एकत्र आले . महाराष्ट्र शासनाच्या मंत्र्यांना अकोला- बाळापूर – अकोला हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ बंद करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला . माननीय श्री .गोविंदराव सरनाईकांना ही बातमी कळली . त्यांनी स्थानिक पुढार्यांना बोलावून घेतले , चर्चा केली . शासनाच्या शिक्षण विभागाशीही चर्चा केली अकोला जिल्हा परिषदेतील , बाळापूर पंचायत समितिमध्ये केंद्रिय शाळा , रिधोरा ऐवजी वाडेगांव जवळच्या नकाशी येथील मोठ्या शाळेची निवड करण्याचे सुचविले . त्याप्रमाणे पुणे शिक्षण संचालकांकडे तसे निवेदन , ठराव अकोला जिल्हा परिषदेमार्फत पाठविणेत आले . त्याप्रमाणे रिधोरा केंद्र शाळेऐवजी नकाशी येथे केंद्र शाळा स्थानांतरीत करणेत आली .
मला अकोला-बाळापूर रोडवर अकोला येथेच पोळा चौकात भाड्याने खोली मिळाली होती . ति.रा. रा.बाबांची तब्येत दाखविणेसाठी अकोल्याला आणले होते. डॉक्टरांनी पूर्ण विश्रांती घेण्यास सांगीतले .मेडशीला घरी लहान भाऊ मुरलीधर व प्रमोद तसलेच ज्योती व सुषमा ह्या दोन बहिणी होत्या .मुरलीधरला अकोल्याला ति.सौ. आईसोबत आणावे लागले . मेडशीला सौ . निर्मलासोबत ज्योतीताई , प्रमोद व माई (सुषमा )ला ठेवावे असा निर्णय घेतला . वैद्यकिय ऊपचार सुरू झाले .
एके दिवशी मी जिल्हा परिषद शिक्षण विभागात गेलो ,तेथे श्री .पल्हाडे शिक्षण लिपिकांच्या टपालात केंद्रिय शाळेवर पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या बढतीचा आदेश होता . त्यांत पहिल्याच क्रमांकावर माझे नांव होते . नियुक्तितचे ठिकाण भर- जहागीर पंचायत समिति रिसोड दाखविले होते.माझा ह्यावर विश्वासच बसेना अकोला जिल्ह्याच्या मराठवाडा सिमेजवळ माझी नियुक्ति करणेत आली होती . रिधोरा येथे नियुक्ति झालेल्या केंद्रिय शाळा मुख्याध्यापकांची व माझी २-३ दिवसापूर्वीच भेट झाली होती ,पण त्यांच्या बोलण्यातून माझ्या नियुक्तिबाबत काहिही कळले नव्हते . मी लगेच ति.रा.रा. मोठेमामांकडे गेलो .ते मुख्य कार्यकारीअधिकारी अधिकारी ,जि . प. अकोला यांचेकडे स्वीय सहाय्यक होते , त्यांनी उपरोक्त आदेशाची प्रत फोन करून मागविली व खात्री करून घेतली . वडील आजारी आहेत , वैद्यकीय उपचार सुरू आहेत .भर-जहागीर हे अकोला पासून वाशीम- रिसोड मार्गावर एस. टी. ने ६ तास अंतरावर असल्याने निकडीच्या वेळी अकोल्याला येणे अशक्य कोटीची बाब आहे . हे कारण नमूद करून माझी नेमणूक भर -जहागीर ऐवजी अकोला जवळच्या केंद्रिय शाळेवर करणेत यावी असा विनंती अर्ज आवश्यक ती कागदपत्रे जोडून, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद , अकोला यांचेकडे तांतडीने करणेत आला .
रिधोरा येथे शाळेत आणि गावात ही बातमी कळली , त्याचवेळी रिधोरा केंद्रशाळा नकोचे वारे जोरात होते . श्री.रंगरावपाटील स्वत: शाळेत आले. ”आमच्या रिधोराहून श्री .लोणकर गुरूजींची बदली होऊ देणार नाही ”.मुख्याध्यापक श्री.खाकरे आणि इतरांनीही त्यांना सांगीतले की श्री.लोणकर गुरूजींना प्रमोशन मिळाल्याने ते केंद्रियशाळा मुख्याध्यापक पदावर भर-जहागीरला जाणारआहेत . हे ऐकताच श्री. रंगराव पाटील म्हणाले ‘भर-जहागीरला गोसाव्यांचीच चलती आहे .पण मी त्यांच्यासाठीच पत्र देतो . ते आपलाच माणूस म्हणून सांभाळतील ,बिलकूल काळजी करायची नाही . दरम्यान
मुख्य कार्यकारी अधिकारी , जि. प. अकोला हयांच्या सुधारित आदेशाप्रमाणे माझी फेर- नियुक्ति केंद्रिय शाळा मुख्याध्यापक , हातगांव , पंचायत समिति ,मुर्तिजापूर येथे करण्यात आली .
मी ह्या सुधारित आदेशाप्रमाणे पंचायत समिति ,मुर्तिजापूर कार्यलयांत माननीय संवर्ग विकास अधिकारी , सहाय्यक ऊपशिक्षणाधिकारी श्री. खानझोडेसाहेबांना भेटलो .त्यांच्या लेखी निर्देशाप्रमाणे ४ किलोमीटर अंतरावरील हातगांव शाळेवर मुख्याध्यापकांना भेटलो .ह्यावेळेपावेतो दुपारचे ५.३० वाजून गेले होते .तेथील मुख्याध्यापक आरखेडकरांना ऊद्या शुक्रवारी कार्यमुक्त करतो मी आजपासूनच कार्यभार घेईन असे सांगून अकोल्याला परत आलो . हातगांवला शुक्रवारी मुर्तिजापूर बाजारचा दिवस असल्याने सकाळची शाळा होती . त्याप्रमाणे मी सकाळीच ७ वाजता शाळ्वर हजर झालो . जुन्या आदेशाप्रमाणे दुसरे गुरूजीही केंद्रिय शाळा मुख्याध्यपकाचा कार्यभार घेण्यासाठी कालच हजर झाले होते . ते गुरूजीसुध्दा हजर झाले .श्री . आरखेडकर गूरूजीही आले . तेव्हड्यात मुर्तिजापूरहून श्री . खानझोडेसाह्बemही शाळेला भेट देण्यासाठी आले . त्या दिवशी शाळेवर ३ मुख्याध्यापक हजर होते .
श्री .खानझोडे साहेबांनी आम्हा तिघांनाही प्रश्न विचारला . आज आता नवीन केंद्रिय शाळा मुख्याध्यापकाचा कार्यभार तुमच्या तिघांपैकी कोण घेणार आहे ? श्री . आरखेडकर गुरूजी तर पदवीधारक नाहीत , ऊरले तुम्ही दोघे ! मी बोललो ‘ सर आपण वरिष्ठ अधिकारी आहात ,आपला निर्णय आम्ही मान्य करू .’ श्री. खानझोडे साहेबांनी विचारले ,कोणाचा आदेश Latest आहे , दाखवा बघु मला , आता .हा श्री .लोणकर गुरूजींचा सुधारित आदेश Latest आहे .त्यामुळे केन्दिय शाळा हातगांवच्या मुख्याध्यापकाचा कार्यभार तेच स्विकारतील आणि ईतर दोघांनाही त्वरीत कार्यमुक्त करतील .
त्याप्रमाणे मी हातगांव शाळेच्या सर्व १८ शिक्षकांना बाजूच्या खोलीत एकत्र बोलाविले , दोघांचे कार्यमुक्त अहवाल तयार करण्याचे काम श्री .ठाकरे गुरूजींना सांगितले . ईतरांना शाळेच्या स्टॉकबुकाची अनुक्रमणिका प्रमाणे , उदा . लाकडी फर्निचर , सायंसची उपकरणे , वाचनालयील पुस्तके…….ई. ची हजर स्टॉकच्या प्रत्येकी चार प्रतित तयार करण्यास सांगितले . सातव्या वर्गातील ३ मुलांना जवळच्या स्टँडवरील हॉटेल मधून २५ चहा-पोहे आणायला सांगितले . हातगांव शाळेचा कार्यभार गेल्या २० – २२ वर्षापासून कोणीही पाहिला , दिला – घेतला नव्हता .साधारणपणे ४० मिनिटात दस्त ऐवज जसा आहे तसा सर्व कार्यभाराच्या प्रत्येेकी ४ – ४ प्रति तयार झाल्या . मी त्यावर स्वाक्षरी केली , जावक बारनिशीचा क्रमांक टाकून कार्यभार घेतल्याच्या अहवाल -प्रति
१ ) श्री .आरखेडकर गुरूजींना २ ) पं .सं .मुर्तिजापूरला ३ )शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद अकोला व ४ )स्थळ प्रत तयार झाल्या . सर्वांचा चहा-नास्ता झाला.
श्री . खानझोडे साहेबांना कार्यभार घेतल्याचा अहवाल सुपूर्द केला . त्यांना खूपच आश्चर्य वाटले , आनंद वाटला . कारण कार्यभार घेणे फारच किचकट व वेळखाऊ काम असते .ते काम ईतक्या झटपट झाले होते . मी ह्याचे श्रेय माझ्या शिक्षकवर्गाला दिले . मी फक्त एवहढेच म्हणालो , सर मला मिळालेल्या वस्तुंची जबाबदारी माझी . न मिळालेल्या वस्तुबाबत नंतर यथावकाश ठरविता येईल .