सेवानिवृत्तिनंतर ……

मला माझ्या  आतापर्यंतच्या आयुष्याचे  सिंहावलोकन केले असता  पडद्यावर चित्रपटाचे एकामागून एक कालखंड  कसे दिसताील ह्याचा विचार मनात आला . ह्या चित्रपटाचे बालपण , प्राथमिक शिक्षण , माध्यमिक शिक्षण ,कॉलेज शिक्षण झाल्यावर पुढे काय ? ,खाजगी नोकरी ,शिक्षकी पेशा (अप्रशिक्षित/प्रशिक्षित),
प्रमोशनचा कालखंड येतेा .मध्यांतरापर्यंत मी मनाशीच घेतलेल्या ठाम निश्चयाप्रमाणे केलेल्या वाटचालीचा समावेश होतो . ह्या ठाम निश्चयाप्रमाणे मी नोकरीला लागल्यानंतर स्वत:च्या शैक्षणिक प्रगतिसाठी हायर मँट्रीक (११ वी )
नंतर कॉलेजांत जाऊन शिक्षण घेणे शक्य नसल्याने बहि:शाल शिक्षण ह्या पर्याय असलेला अत्यंत खडतर मार्ग स्विकारून वाटचाल केली . कॉलेजमध्ये मिळणारे लेक्चरर /प्राध्यापकांचे मार्गदर्शन  नाही ,शिवाय पुस्तके नाहीत आमच्या लोणकर घराण्यांत कोणाचाही मदतीचा हात नाही .आजूबाजूची बहुतांश  नातेवाईकमंडळी , मित्रपरिवार  , अधिकारी वर्ग नकारात्मक विचाराचे होते . सतत प्रोत्साहन देऊन ,आगे बढते जाव ! हम तुम्हारे सपोर्टर है !  आगे बढनेका स्पीड कम होगा ; चिंता मत करो .तुम्हारा लक्ष्य तुम्हारी राह देख रहाहै. ह्या सकारात्मक  विचाराच्या व्यक्तिंच्या पाठिंब्याने मी माझी प्रगती करण्यासाठी येणार्या अडचणी /अडथळे ह्यांना न जुमानता माझी वाटचाल  सुरूच ठेवली . ह्यात मला अकोला,पातूर, वाशीम येथील कॉलेजात शिकणारे विद्यार्थी , वाचनालयाचे कर्मचारी , प्राध्यापक माझे हितचिंतक सहकारी, मित्र ,अधिकारी  ह्यांनी सर्व सहकार्य केले .मी त्या काळात  दरवर्षी वर्षाला २ म्हणजेच दर सहा महिन्याला परिक्षा  देत होतो. एक परिक्षा शिक्षण खात्याची अन् एक नागपूर विद्यापीठाची , त्यावेळी मला असे वाटायचे की ह्या परिक्षा दर ३ महिन्याने घेतली असती तर सोन्याहून पिवळे वाटले असते.
माझ्या  आयुष्याचे कालखंड पुढील प्रमाणे .

१)बालपण १९४५ ते १९५०मुक्काम भोन . (५ वर्षे )
२)शिक्षण १९५०ते १९६३ प्राथमिक ,माध्यमिक व कॉलेज परिक्षेपर्यंत .(१३ वर्षे) अकोला जिल्हा .
३)पदवी व पदव्युत्तर परिक्षा , महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षा व मुलाखती ,स्थानांतर , पदोन्नति व  मुंबईला गोरेगांव येथे स्काऊट जांबोरेट कँप ,१९६३ ते १९७६. (१३ वर्षे)
४)मुंबईचे नवे आयुष्य १९७६ ते १९८९ विक्रीकर निरिक्षक पदी नेमणूक , ज्येष्ठ विक्रिकर निरिक्षक पदी पदोन्नति,वर्ग ३ कर्मचारी.महाराष्ट्र वाहन प्रवेशकर अधिकारी म्हणून नियुक्ति (१३ वर्षे)
५) मुंबई १९८९ -९० ते २००२-२००३ राजपत्रीत अधिकारी वर्ग २ अंमलबजावणी/निर्धारणा अधिकारी ; आणि  वर्ग १ राजपत्रीत अधिकारी ,कार्यासन अधिकारी ,आस्थापना ५ विक्रीकर आयुक्तांचे कार्यालय मुंबई .
महाराष्ट्र राज्यातील विक्रीकर विभागातील आस्थापना कार्यालयांची
तपासणी व त्यांचेसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन ,श्री आर. आर. पाटील , अध्यक्ष असलेल्या , लोक लेखासमितिसमोर विक्रीकर आयुक्त व अतिरिक्त विक्रीकर आयुक्तांसोबत, महसूलाबाबतच्या दोषारोपाबाबत स्पष्टिकरण देण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या विधान भवनाांत उपस्थिती .
मुक्काम मुंबई (१३ वर्ष )
६) सेवानिवृत्तिनंतर  ……..
सेवानिवृतिनंतर नियमितपणे कार्यालयात जाणे येणे बंद झाले होते .घरच्या जबाबदार्या संपल्या नव्हत्या .सर्वात लहान भाऊ प्रमोद अजूनही वयाची तिशी ओलांडली तरी पक्की नोकरी लागली नव्हती . लग्न सुध्दा व्हायचे होते . मकरंद २५ वर्षे वयाचा व आनंद २३ वर्षे वयाचे तर लहान मुलगी कु .प्रीतिही २१ वर्षाची , सगळ्यांची लग्ने , नोकरी ? अजून प्रलंबित होती . मकरंद व आनंद बी. ई .प्रथम श्रेणीत ऊत्तीर्ण झाले होते .पुढील चांगल्या नोकरीसाठी परिक्षा ,मुलाखती देणे सुरू होते .
प्रूतिचे लग्न :-
सर्वप्रथम चि .कु .प्रीतिचे लग्न करणे अत्यावश्यक होते. मकरंद व आनंदचे मित्र सोबत होतेच .तसेच ‘सुवर्णालंकार ‘ ह्या सेानार समाजाच्या नागपूरहून प्रसिध्द
होणार्या मासिकातील वरांच्या यादीतही संशोधन सुरू होते . इंटरनेटवरही शोध सुरू होता . कोकणातील देवगडजवळील पुरळ गांवच्या दैवद्ञ सोनारापैकी काशीनाथ भुर्केंचा लहान मुलगा सुनील पुणे येथे सत्यम कंपनीमध्ये ईलेक्ट्रीकल ईंजिनियर होता .त्याचे आई वडील डोंबिवली पश्चिमला ‘ प्रभुकृपा ‘ बिल्डिंगमध्ये राहात होते . त्यांची डोंबिवली एम .आय .डि .सी .मध्ये छोटे फँब्रिकेटींगचे वर्कशॉप होते . त्यांना दोन मुले होती . मोठा मुलगा मुंबईला कंपनीत केमिकल ईंजिनियर होता . लहान मुलगा सुनील सर्वांना आवडला . १४ ऑगस्ट २००५ ला साखरपुडा विक्रोळीलाच पार पडला . १४ डिसेंबर २००५ ला लग्नसमारंभ माँ कृपा बॉंकेट हॉल व लॉन , तीन हात नाका,ठाणे पश्चिम येथे धुमधडाक्यात पार पडला .गांवाहून,मध्यप्रदेशाहून व विदर्भातून ८० वर्हाडी नातेवाईक आमच्या घरातील पहिलेच लग्न असल्याने मुंबईला आले होते . सर्वांना लग्न समारंभ खूपच आवडला.लग्नानंतरची फटाक्याची आतिषबाजीने तर सगळ्यांची मने आनंदून गेली होती .मुलाकडील मोजकीच मंडळी लग्नाला हजर होती. ह्या लग्नामुळे वर,वधुकडील सर्व मंडळी आनंदून गेली होती .मकरंद आणि आनंद तसेच प्रीतिच्या मित्र, मैत्रिणींनी मिळून सर्व बाबतीत मनापासून सहकार्य केले . ह्या लग्न समारंभाला माझ्या विक्रीकर कार्यालयातील बरीच अधिकारी ,कर्मचारी मंडळी आवर्जून आली होती .

माझ्यापुढे सर्वात मोठा प्रश्न होता ,प्रमोदच्या नोकरीचा ! त्याचे नशीबच फार खडतर होते .प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे ! अशाप्रकारचा एक वाक्प्रचार आहे .त्यापेक्षाही खडतर प्रसंगातून प्रमोदला जावे लागत होते.गेल्या ५-६ वर्षापासून त्याच्या कोणत्याही नोकरीसाठी केलेले प्रयत्न करूनही ,त्याला नोकरी मिळत नव्हती . प्रमोदला उन्हाळ्याच्या सुटीत ति .गं. भा.आईसाहेबासोबत पाठविले अकोल्याला पाठविले होते . माझे मित्र श्री.ज्योतीस्वरूप जलोटा साो ह्यांच्या मदतीने Novel कंपनीत प्रमोद निवडला गेला. तेथे त्याच्याकडे स्टोअर्स डिपार्टमेंट आणि कॉम्युटर स्पेअर्स डिलिव्हरी संपूर्ण भारतभर पाठविणेचे काम हेाते . त्याने त्याचे सगळे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवले होते .त्यामुळे त्याला कोणत्याही प्रॉडक्टची , कोणत्याही दिवशीची माहिती त्याच्या वरिष्ठांना देणे शक्य होत होते . त्याच्या विविध क्षेत्रातील वरिष्ठ स्तरावरील व्यक्तिंशी ओळखी झाल्या होत्या.आता माझ्या मनात त्याच्या लग्नाचे विचार सुरू झाले .मुलीं पाहण्यासाठी अर्थातच विदर्भातच जाणे जरूरी होते .प्रमोदच्या वयोमानाप्रमाणे मुली शेाधून बघायच्या होत्या . चि.मुरलीधरलाही तिकडे बोलाविले होते . सरते शेवटी पातूरच्या श्री.रमेश पागनीसची तृतिय मुलगी
चि.कु .राणू पदवी परिक्षा देणारी मुलगी आम्हा सगळ्यांना ,श्री. ऊध्दवराव ऊंबरकर (चि .सौ .ज्येातिताईचे सासरे ), श्री. अनिल व सौ .सुषमा (माई) रत्नपारखींना, महत्वाचे म्हणजे चि .प्रमोदला साजेशी मुलगी होती . सौ ,निर्मलाच्याच पिंजरकर घराण्यातील मुलगी होती .तिचे वडील माझ्यासोबत नॉर्मल स्कूलमध्ये ( शिक्षकाच्या ट्रेनिंगला )सोबत होते .

stronguपरदेशी /पृथ्विवरील स्वर/ स्वित्झर्लंड वारी :-/u/strong
आनंद व मकरंद ही दोन्ही मुले नोकरीला होती .चि.आनंदला ईन्फोसीस ह्या आय .टी . कंपनीने परदेशात प्रथम स्वित्झरलंडला नंतर अमेरिकेला सॉफ्टवेअरचे काम करण्यासाठी पाठविले होते . त्यावेळी मी ,सौ .निर्मला,व प्रीति तिघेही१५ दिवसांचा व्हिसा काढून स्वित्झरलंडला २००४ मध्ये दिवाळीच्या सुटीत जाऊन आलो . स्वित्झरलंडला पृथ्वीवरचा स्वर्ग का म्हणतात ते तेथे गेल्यावर कळले . आमच्या व्हिसावर No Extention and No Job will be Granted असा स्पष्ट ऊल्लेख करण्याण्यात आला होता . ई स .२०००मध्ये आनंदला दक्षिण भारतात बंगलोर/मंगलोरला जॉबवर तर म्हैसूरला ट्रेनिंगला पाठविले होते . मंगलोरला त्याची ओळख केरळमधील कोचीनजवळच्या येडवूरच्या नवीनच ट्रेनिंगला रूजूं झालेल्या पूर्णिमा रामचंदशी झाली ओळखीचे रूपांतर हळूहळू प्रेमात कधी झाले ते त्यांनाही कळले नाही . दोघांच्याही घरी ह्या सगळयाची कल्पना होती .दोघांनीही आपापल्याघरून परवानगी मिळाल्यावरच विवाहबद्ध होण्याचे ठरविले. त्यासाठी डिसेंबर २००७ पर्यंतची कालमर्यादा त्यांनी ठरविली होती . पूर्णिमाचे वडील श्री. रामचंदजी केरळमध्ये शासकीय बांधकाम खात्यात ज्युनियर ईंजिनियर पदावर तर आई सौ.पुन्नमा केरळच्या शिक्षक महाविद्यालयात शिक्षणविभाग प्रमुख होती .केरळमधील लोक रूढी व परंपरा प्रिय आहेत . ह्याची आम्हा सगळ्यांना कल्पना होती.
आनंदचे लग्न :-
ई स.२००६ मध्ये आनंद व पूर्णिमाने पक्के ठरविल्याप्रमाणे प्रथम मी व सौ .निर्मला विमानाने कोचिनला पोहोचलो. चि. आनंद आमच्या अगोदरच कोचिन विमानतळावर:-) पोहोचला होता .आम्हाला घेण्यासाठी पूर्णिमाचे वडील विमानतळावर कार घेऊन आले होते . आम्ही कोचिनहून पेरांबऊर मार्गे एडाऊरला पोहेाचलो . त्यांच्या कुटुंबियांचा जवळ जवळ ८० लोकांचा पसारा होता . सगळे तेथे आनंदला व आम्हाला पाहण्यालाठी/भेटण्यासाठी पूर्णिमाच्या फार्म हाऊसमध्ये घरी एकत्र जमले होते . सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला . पूर्णिमाच्या आई,वडिलांना ,प्रवीण(भावाला ) तसेच दोन मामे भावांना मुबईला ( विक्रोळीला ) आमच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले .त्याप्रमाणे ते सर्वजण आले. 🙂 त्यांनी केरळमधील प्रथेप्रमाणे डावरी /हुंडा देण्याची गोष्ट काढली . परंतु आनंदने डावरी
परंतु आनंदने डावरी वा हुंड्याला साफ नकार दिला .दोन्ही बाजूंनी लग्नास कांही अटींवर होकार मिळाला , अट क्रमांक (१)लग्न केरळमध्ये येडवूरलाच होईल (२) लग्न महाराष्ट्रियन पद्धतिनेच प्रथम होईल नंतर केरळीय पद्धतिनेही होईल . (३ ) लग्नासाठी येणार्या निवडक मंडळींचा जाणे येणेचा खर्चाचा भार नवरीकडूनच करू देण्याची विनंती नाकारायची नाही .
त्याप्रमाणे निवडक मंडळींनाच आमंत्रणे पाठविली .६ ते ७ मंडळी (नवरदेवासह) विमानाने व बाकीची १५ -२० मंडळी रेल्वेगाडीने लग्नाला केरळला पोहोचली . दोन दिवसांचा लग्नाचा कार्यक्रम आटोपून परत मुंबईलाी परत आलो . येडवूरच्या लग्नाचा यथासांग कार्यक्रम साखरपुडा घरी केला तसेच महाराष्ट्रियन पध्दतिचे लग्नाचा कार्यक्रम तेथे केबलवरून दाखविणेत आला. तेथील लग्नाला १५०० लोक , राजकिय पुढारी, कुतुहूल म्हणून लग्नाला हजर होते .लग्नात वर,वधुनी एकमेकांना घालावयाचे फुलांचे हार तर जवळ जवळ ५-५ किलो वजनाचे होते . तेथे वर-वधुचे मोठमोठे पोस्टर्स तयार करून येडवूरला बंगल्याबाहेर व लग्नाच्या-कार्यालयात व कार्यालयाबाहेर लावलेले होते. व्हिडीओ शुटिंग तर होतेच .तिकडील प्रसिध्द गायक गायिकांची फर्माईशप्रमाणे गाणी मल्याळम तसेच हिंदी गाण्याचा बहारदार कार्यक्रम सुध्दा झाला .
केरळमधील ह्या लग्नात वेगवेगळी फुले भरपूर , ओल्या सुपार्या ….ई .ची रेलचेल होती .दक्षिण भारतात ,केरळमध्ये भात व रस्स्म ह्याचा भोजनांत जास्त ऊपयोग होतो.
परंतु त्यांनी केरळीय तसलेच महाराष्ट्रीय , दोनही पध्दतिची भोजनाची पंगतीची व्यवस्था केली होती . कुठेही कोणतीही न्यूनता वा उणीव भासली नाही . जवळच्याच हॉटेलमध्ये आमची सर्वांची राहण्याची सोय केलेली होती. परतीच्या प्रवास वर,वधु , शशीमावशी,सौ.निर्मला ,ति.गं .भा.आजी , मकरंद , प्रीती ,सुनील व मी विमानाने आलो .बाकी सगळी मंडळी रेल्वेने /ट्रेनने आली .मुंबई येथे विक्रोळीला घरी प्रमोदची पत्नी चि .सौ. प्रिया होती ,तसेच सौ .निर्मलाच्या हल्ली जालन्याला असलेल्या बालमैत्रीणीचा मुलगा सचिन आणि सुनबाई चि .सौ .आरती, ह्यांनी मिळून स्वागताची जय्यत तयारी करून ठेवली होती . नवरीचा गृहप्रवेश ऊत्कृष्ट झाला. त्यानंतर लग्नाच्या रिसेप्शनाचा कार्यक्रम २००-३०० मंडळींच्या उपस्थितित विक्रोळी (पूर्व), गोदरेज हॉलमध्ये थाटात साजरा झाला. लग्नानंतर रिसेप्शनच्या कार्यक्रमाला पूर्णिमाकडील काही नातेवाईक मंडळी आवर्जून उपस्थित राहण्यासाठी आली होती . त्यांनी येतांना लग्नाचे छानसे दोन अल्बम बनऊन आणले होते . हे अल्बम आगळे वेगळे होते .सर्वांना अल्बम खूपच आवडले . मधुचंद्रासाठी आनंद- पूर्णिमा केरळला जाऊन आले . नंतर ते दोघेही प्रथम मंगलोरला नंतर बंगलोरला घर घेऊन राहिले ..थोड्याच काळानंतर दोघांनाही ईंन्फोसिस कंपनीने अमेरिकेत H -l व्हिसा वर तेथील प्रोजेक्टसाठी पाठविले . अमेरिकेत रिचमंड व्हर्जिनिया राज्यात आनंद व पूर्णिमा कँपिटल वन बँकेच्या प्रोजेक्टवर काम करित होते .
पहिली अमेरिका वारी :- रिचमंड व्हर्जिनिआ व्हाया अटलांटा !
५ एप्रिल २००९ मध्ये आनंद – पूर्णिमाच्या संसार वेलीवर ५ एप्रिलला अद्वैतनांवाचे झकास फूल आले . मी व निर्मलाकरिता आनंदने Invitation Letter आणि मुंबई -अटलांटा -रिचमंडचे विमानाचे जाणे येणेचे तिकीटही पाठविले . आम्ही दोघांनीही अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज केला . आम्ही दोघेही अमेरिकेतन राहता परत भारतात येणारच ह्याचीौ खात्री झाल्याने आमहा दोघांना व्हिसा तोही १० वर्षे मुदतीचामंजूर करण्यात आला .

uअमेरीकेत – रीचमंड, व्हर्जिनीया /u
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आम्हा दोघांना निरोप देण्यालाठी घरातील सगळेजण आले होते . मुंबई – अटलांटा – रिचमंड हा विमानप्रवास २२ तासांचा तर डोंबीवली ते विमानतळ व रिचमंड ते आनंदचे घर ३+२ तासांचा कारमधून प्रवास ,असा एकूण २७ तासांचा प्रवास होता .सर्वांचा निरोप घेऊन प्रथम काऊंटरवर तिकिट तपासून विमानात बसण्याची जागा निश्चित करून घेतली. दोन मोठ्या बँगा Check in करून घेतल्या . आता त्या आम्हाला अटलांटा विमानतळावर मिळणार होत्या . आमच्याजवळ आता फक्त केबिन बँगाच राहिल्या होत्या .Security Check साठी रांगेतऊभे राहीलो . रत्री -पुरूषांची रांग वेग – वेगळी होती . तपासणीसाठी दिलेल्या ट्रे मध्ये बुट ,बेल्ट, पैशाचे पाकीट ,मोबाईलसह ईतर ईलेक्ट्रॉनिक वस्तु ठेवलिया आक्षेपार्ह वस्तु जसे लायटर ,दाढीचे रेझर, नेलकटर, चाकूसह कोणतेही शस्त्र, द्रवपदार्थ पाणी/ औषधी …ई . केबिनबँगमध्ये नेण्यास मनाई असल्याने त्या वस्तु जप्त केल्या जाताात . परंतु अशा वस्तु चेक -इन बँग मध्ये नेता येतात . सेक्युरेटीचेक झाल्यावर विमानात प्रवेश करण्यासाठी तिकिटावर दर्शविलेल्या गेटजवळ रांगेत बसलो .विमान सुटण्याच्या वेळेच्या अगोदर १० -१५ मिनिटे अगोदर प्थम बिझिनेस क्लासचे प्रवासी ,कडेवर लहान मुल असलेल्या स्त्रिया , अपंग प्रवासी , नंतर ईतर प्रवाशी अशागटागटाने विमानाला जोडलेल्या मार्मिकेतून विमानात प्रवेश करणयास सज्ज झालो . विमानाच्या प्रवेश द्वारातच हवाईसुंदरी तसेच विमानाचा कर्मचारी प्रवाशांचे स्वागत करित होते . आमही दोघेही आमच्या जागेवर स्थानापन्न झालो .
आमच्या बसण्याच्या जागेसमोर असलेल्या लहान टी .व्ही . च्या पडद्यावर आमच्या विमानाची संपूर्ण माहिती मुंबई-अटलांटा प्रवासाचे अंतर , लागणारा वेळ , विमानाची सद्यस्थिती उंची ,वेग , जगाच्या कोणत्या भूभागावरून आकाशातून ढगाच्या वरून जात आहे , बाहेरचे /आतले तपमान किती आहे , मुंबई तसेच अटलांटा येथे हवामान कसे आहे ….ई . बाबींची माहिती दिसत होती. तसेच करमणुकीचे कोणकोणते चित्रपट हिंदी/ईंग्रजी भाषेतून उपलब्ध आहेत हेहू दाखवत होता . विमान सुरू झाले नी हवाई सुंदरींनी सगळ्या प्रवाशांना आपापले सीट -बेल्ट बांधायला सांगीतले . विमान धांवपट्टीवरून उड्डाणासाठी वेगाने जाऊ लागले . एक झटका लागला , पोटात गोळा आला नी विमानाने आकाशात झेप घेतली . मुंबईतील उंचच उंच ईमारती लाईट्स दिसेनासे झाले . विमान पाहता पाहता ढगाच्याही वर गेले . विमानाचा वेग ठरविल्याप्रमाणे स्थिर झाल्यावर बांधलेले बेल्ट सोडले व विमानात फिरता येऊ लागले .
विमानातील कर्मचारी तसेच हवाई सुंदरी प्रवाशांना पाणी , फळांचे डबाबंद रस , चहा , कॉफी , व्हेज /नॉन व्हेज नाश्ता , जेवण , आवडीप्रमाणे ड्रिंकस् हसतमुखाने पुरविण्याची सेवा करीत होत्या .आमच्या बसण्याच्या जागेसमोरच्या छोट्या टि. व्ही.पडद्यावर आम्ही आवडणारा हिंदी चित्रपट पहायला सुरवात केली . हळू हळू निद्रादेवीच्या अधीन होऊ लागताच टि .व्ही . बंद केला .विमानात घरच्यासारखी झोप आली नाही . विमानात मध्यभागी तसेच मागील भागात लँव्हाटरीची सोय असते . आम्ही दोघांनी क्रमा क्रमाने त्याचा उपयोग केला . सकाळी पुन: चहा, नाश्ता देण्यात आला . विमानातील टि. व्ही. विमानाचा मार्ग नकाशा मधूनमधून दाखवित होता . विमानाने मुंबईपासून किती अंतरावर आलेले आहे ? त्याचप्रमाणे अटलांटा किती अंतरावर आहे ? किती वेळात अटलांटा विमानतळ येणार आहे ? आमचे विमानाला अटलांटा विमान तळावर दिड तास उशीरा पोहोचले . आमच्या चेक- ईन च्या बँगा लगेज बेल्टवरून यायला अर्धा तास लागला . नंतर बँगांचे नियमाप्रमाणे काटेकोरपणे कस्टम चेकींग अगडबंब अफ्रिकन कर्मतारी वर्गाने रांगेत उभेराहून क्रमाक्रमाने झाले .त्यात पुन: द्रव पदार्थ / शस्त्र /थोडक्यात आक्षेपार्ह वस्तू , फळफळावळे ….ईत्यादि ची कसून तपासणी करीत होता .आमच्या अगेादरच्या प्रवाशाच्या बँगा तपासायला जवळजवळ एक तास लागला होता . आमचा नंबरआला ,आमच्या बँगातून सगळे सामान बाहेर काढले . त्यात आक्षेपार्ह असे फक्त एकच सफरचंद सापडले .तेही देवाचा प्रसाद म्हणून आनंदसाठी आणला होता . त्यांनी आम्हाला पुढे जाण्यास सांगीतले . परंतु आता चौकशी केल्यावर रिचमंडचे विमान विमान केव्हाच निघून गेले होते .पुढचे विमान अर्ध्या तासाने होते .रिचमंडला जाणारे विमान २२ सीटर होते. २ तासांच्या प्रवासांत नाश्ता ,पाणी ,चहा वा कॉफी सगळ्या गोष्टी विकत मिळत होत्या . रिचमंडला पोहोचल्यावर आमच्या बँगा
बेल्टवरून घेऊन विमानतळाबाहेर आलो. आनंद आम्हा दोघांची बाहेर दोन तासांपासून वाट पहात होता . त्याने त्याच्या फोनवर आमचे रिचमंडचे विमान चुकल्याचेपाहिले होते . कार पार्किंगमध्येजाऊन आम्ही बँगा कारच्या डिकीत ठेवल्या .रिचमंडला अतिशय थंडी होती . पण कारमध्ये थंडी वाजतन नव्हती ,पण हायरे दुर्दैवा ! आनंदची कार रूसुन बसली होती .ईंजिन सुरूच होत नव्हते.आनंदने ईन्शुरन्स कंपनीलासर्व कळविले . सरते शेवटी टँक्सी भाड्याने घेऊन घरी जायला निघालो .
अमेरिका प्रशासनाच्या नियमाप्रमाणे कुटुंबतील प्रत्येक जोडीला घरात वेगळी झोपण्यासाठी वेगवेगळी रूमचीसोय असणे गरजेचे होते. लहान मुलासाठी वेगळी व्यवस्थाअसणे आवश्यकहोते . त्याबरहुकूम आनंद -पूर्णिमाने जुने one room kitchan सोडून three room kitchan चे घर घेतले होते.अद्वैतच्या जन्माच्या वेळी पूर्णिमाचे आईवडील, अम्मा/अच्चन प्रथम रिचमंडला आले होते . अमेरिकेत मुलगा की मुलगी जन्मा अगोदरच आईवडीलांची ईच्छा असल्यास दवाखान्यात डॉक्टरांना गर्भजलपरिक्षण करून सांगण्याची परवानगी असते . त्यामुळे आईच्या गर्भारपणात तसे लाड /कोडकौतुक तिच्या कुटुंबियांकडून आनंदाने केले जाते .
आनंद आम्हा दोघांना घेऊन घरी पोहोचला . घरी पूर्णिमा , बाळराजे ,अम्मा , अच्चन सगहळे वाट पहात होते . आम्ही घरी पोहोचताच चहा ,नाश्ता घेऊन सचैल स्नान केले . आनंदने आम्हा दोघांना विमान प्रवासाचा शीण , Jet-lag जावा म्हणून पटकन झोपायला सांगीतले.२-३ तास झोप झाल्यावर एकदम प्रसन्न वाटायला लागले , खेळीमेळीत जेवणे झाली .घरात स्वयंपूर्ण किचन होते. भाजीपाल्याचा कचरा जाण्यासाठी किचनच्या बेसिन मधील बटन दाबले की सगळा काचरा खालच्या ड्रेनेजमध्ये जायची सोय होती . कपडे धुण्यासाठी वॉशींग मशीन , कपडे वाळविण्यासाठी Drier Machine होती . घराबाहेर कोठेही गटार -नाल्या , धुळ ……ई .चा पत्ताही नव्हता . ह्या कॉम्ल्पेक्समध्ये खूप भारतीय कुटंबिय आहेत असे समजले . घराजवळच एक मोठा छानसा तलाव होता , सभोवती उंच झाडीही होती . तलावाभोवती छानसा रस्ता व त्याभोवती लाकडाची २-३ मजली घरे होती . त्यांत अमेरिकेन तसेच भारतीय कुटुंबे लहान मोठ्या मुलांबाळासह , कुत्र्यांसह राहत होती .तलावाभोवतीच्या झाडीत खारूताई ,३-४ ससोबा, चिमण्या ,कावळ्यासारखे पक्षीही होते . कॉम्प्लेक्समध्ये Gymnasium /swimming pool ही होते .
आता बाळराजेंचे बारसे कधी करायचे ? सगळ्यांनी आपापले विचार मांडले , घराचे डेकोरेशन अच्चन आणि मी करायचे ठरविले .आनंदने व पूर्णिमाने बारशाला आमंत्रणे कोणाकोणाला द्यायची ह्याची यादी तयार केली . त्यात मित्रमैत्रीणी , ऑफीसमधील सहकारी , बाहेरच्या मित्रांपैकी वॉशींगटनचा सुंदरम्,वेल्हाळ , ह्यांचीही नांवे अंतर्भूत केली होती . सगळ्यात महत्वाचे बारशाची तारीख तीही सर्वानुमते ठरविली , बारशाच्यादिवशीचा जेवणाचा मेनुही ठरविला. आता सर्वात मोठ्ठा प्रश्न पाळणा व त्याची सजावट ही जबाबदारी सौ. निर्मला आणि सौ .पुन्नमा /अम्मा तसेच कॉलनीतल्या भारतीय कुटुंबातील महिला वर्गाने स्वत:वर घेतली . मी आनंदसोबत होलसेल मॉलमध्ये जाऊन पाळणा आणि ईतर सामान घेऊन आलो . बारशाच्या दिवशी सर्व निमंत्रितमंडळी आली .विशाल वेल्हाळ ६ तासांचा कार प्रवास करून वॉशिंगटनला आला .तेथून सुंदरमला सोबत घेऊन रिचमंडला आला .कॉम्पलेक्समधील सगळी भारतीय कुटुंबेआली .आनंद व पूर्णिमाच्या ऑफीसमधील मित्र-मैत्रिणीही आल्या . सगळ्यांनी मिळून घराची सजावट होताच , बाळराजेंच्या पाळण्याचीही अतिशय सुंदर सजावट केली . इंटरनेटवर बारशाची /पाळण्याची गाणी शोधून लावली , बारशाचा हा कार्यक्रम मुख्यत: महिलांचा कार्यक्रम .सगळ्यांना पूर्णिमाच्या सातव्या महिन्यातल्या Baby-Shower ची आठवण आली . बाळराजेंना पाळण्यात घालण्याच्या कार्यक्रमासाठी कमीतकमी पांच महिला सुवासिनींची आवश्यकता असते .तसेच बाळाते नांव ठेवायला , कानांत नांव सांगायसाठी बाळराजेंची आत्या ,बारशाच्या कार्यक्रमला ,सौ.प्रिती सुनील भुर्के असणे जरूरिचे होते .पण ती तर भारतात मुंबईला ? ह्यांतून सगळ्या I T अन्सनी अतिशय झटपट व सुंदर मार्ग काढला .बारशाच्या सगळा कार्यक्रम स्काईपवर प्रक्षेपित करायला सुरवात केली .कुणी ” गोविंद ” घ्या ! कुणी “गोपाळ “घ्या ! झाल्यावर , बाळराजेंना पाळण्यात ठेवले . सौ . प्रिती आत्याने स्काईपवरून बाळराजेंच्या कानांत तीन वेळा नांव सांगीतले ,’अद्वैत ‘! ‘अद्वैत ‘ ! ,” अद्वैत”! सौ .निर्मला आजीने नांव ठेवले , ” हिंदुराव ” .पण सर्वांना नांव आवडले ”अद्वैत “. रिचमंडला कॉम्लेक्स मधील अनेक भारतीय कुटुंबियांना बारशाला आवर्जून बोलाविले होते .
सर्वांनी ‘ अद्वैतला ‘ अभिष्ट चिंतले .आनंदने जेवायला तेथून जवळच असलेल्या हॉटेलमधून पार्सल बोलाविले, त्यात दोन स्विटस व जेवणानंतर आपापल्या आवडीचे आईस्क्रीमचाही समावेश होता . बारशाचा कार्यक्रमानंतर सुंदरम आणि विशाल वेल्हाळ कारने आपापल्या घरी गेले . विशालने प्रथम सुंदरमला वॉशिंगटनला सोडले थोडीशी विश्रांती घेऊन विशालही पुढे सहा तासांचा प्रवास करून घरी पोहोचला .त्याच्या जवळ GPS असल्याने पुढे ट्रँफिक जाम असल्यास कमी गर्दीचा पर्यायी रस्ताही GPS शोधून देत होता .

पूर्णिमाच्या अम्मा , अच्चन यांची नी निर्मलाची सगळी धांवपळ छोट्या अद्वैतसाठी सुरू असायची .त्याने दिवसा वा रात्री केव्हांही थोडेसा जरी रडायचा आवाज आला तरी तिघेही अस्वस्थ होऊन त्याचेकजे धांव घेत .कधीकधी तर हे सगळे त्याच्या खोलीत पाळण्याजवळ पोहोचेपर्यंत बाळराजे गाढ झोपलेले असायचे . एका आठवड्यानंतर मी , आनंद व पौर्णिमा ह्यांनी वेळापत्रक ठरविले . त्यामुळे सर्वांना विश्रांती , झोप व्यवस्थित मिळू लागली . साधारणत: २ महिन्यानंतर नायगाराचा प्रसिद्ध धबधबा पाहायला जायचे ठरले .अमेरिकेतील नियमांप्रमाणे प्रवासांत पाच वर्षेपर्संत कारसीट अत्यावश्यक होती आनंदने त्याप्रमाणे मोठी कार रेन्टवर आणली .आम्ही कारमध्ये मोठ्ठे थंड पाणी-जार ,कोल्ड ड्रिंक क्रेट आवश्यक तेव्हढेच कपडे ,नाश्ता ,चहा ,दूघ थर्मास ,नँपकीन्स व आवश्यक ते टावेल्स, पेपर नँपकीन्स ,लिक्विड सोप…….ई . घेतले . पूर्णिमाला कार चालविण्याची परवानगी नव्हती. अमेरिकेत FPS म्हणजे मोजमापाची फुट पौंड (भारतातील १९५७ पूर्वीची जुनी पद्धत ) अंतर मैलात तर पेट्रोल /डिझेल लिटरमध्ये मोजतात .अमेरिकेत हायवेवर कार कमीत कमी ६५ मैल प्रतितास म्हणजे साधारणपणे १०० किलोमीटर प्रतितास वेगाने चालवतात .

आनंद एकटाच कार चालविणार होता .पूर्णिमा पुढे, आनंदच्या बाजूला बसली .मी आणि अच्चन मधल्या सीटवर तर अम्मा आणि निर्मला मागे बसल्या ,दोघींच्या मध्ये कारसीटमध्ये ईवलासा ,छोट्टासा अद्वैत होता .प्रवास सुरू झाला. अमेरिकेतील सगळेच रस्ते स्वच्छ असतात .हायवे वर कुठेही थांबता येत नाही . साधारणत: ५० – ७५ मैलावर रेस्ट एरीया असते . तेथे टॉयलेटची सोय होती , लहान मुलांना वेगळा टेबल असतो .त्यावर लहान मुलांना ठेऊन स्वच्छता करता येते . सर्वांना हात , पाय , तोंड धुतल्यावर फार बरे वाटले . प्रत्येकाने चहा , कॉफी ,कोल्ड ड्रिंक ,कुकीज ,बिस्किटे जे आवडले ते घेतले .पुन्हा सर्वजण कारमध्ये आपापल्या सीटवर बसले .पुढचा प्रवास सुरू झाला . एकुण ६ तासाचा प्रवास होता . कार चालू असतांना अद्वैत /आदी केव्हांही रडायचा ,तेव्हां अम्मा व निर्मला दोघीही गडबडून बाळाजवळ जायच्या ,त्याला गप्प करायचा सतत प्रयत्न करायच्या . पण लहान बाळच ते त्याला डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे पहिले सहा महिने वेळापत्रकाप्रमाणे आईचेच दुधच हवे असायचे . त्यामुळे रेस्ट एरियात त्याचे पोट भरले की तो मस्तपैकी झोपायचा . रात्री ९ वाजता आनंदने अगोदरच बुकींग केलेल्या हॉटेलमध्ये पोहोचलो . आनंदला किमान सहा तास विश्रांतीची /झोपेची अतिशय आवश्यकता होती . आम्ही जेवणं झाल्यावर निद्रादेवीच्या अधीन झालो ते कळलेच नाही . सकाळी लवकर उठून तयारी केली , पोटभर चहा – नाश्ता केल्यावर पुन्हा पुढचा नायगाराचा ४ तासांचा प्रवास सुरू झाला . नायगारा धबधबा अमेरिकेतच नव्हे तर जगात प्रसिध्द आहे .आनंद व पूर्णिमा बाळाला घेऊन लोबत येणे शक्य नसल्याने बाहेरच थांबणार होते . तिकीटे काढून आम्ही चौघेही रांगेत उभे राहिलो . पुढे जाता जाता आम्ही कोणीतरी मराठीत बोलतांना ऐकले . अमेरिकेत भारतीय व्यक्ति , त्यातही महाराष्ट्रातील एकदम ६-७ जण भेटल्यावर खूप आनंद झाला . पुढे अधिक चौकशी केल्यावर ही मंडळी तर अकोल्याचीच निघाली , आपुलकी वाढली .मुलगा त्याच्या आई-वडिलांना तसेच सासु-सासर्यांना घेऊन नायगारा धबधबा दाखवायला घेऊन आला होता .आम्ही सर्व ९ जणांचा एक गट तयार केला .लिफ्टने खाली जाऊन ९ निळ्या रंगाचे रेनकोट घेऊन अंगावर चढविले . धबधब्याजवळ नेणार्या बोटीत आमचा नंबर आल्यावर चढलो . नायगारा धबधबा अमेरिका व कँनडाच्या सिमेवर आहे . नायगारा नदीच्या उंचच उंच पात्रातून पडणार्या हजारे लिटर पाण्याच्या जसजसे जवळ जात होतो ,तसतसे त्या पाण्याचे तुषार/थेंब वाढत चालले होते . आमची बोट नायगारा धबधब्याच्या मुख्य धारेच्या अधिकाधिक जवळ गेली ,पाण्याच्या थेंबांनी नव्हे धारांनी बोटीतील आम्ही सगळेजण रेनकोट असुनही नखशिकांत भिजलो .थोड्याच वेळात आमची बोट हळूहळू किनार्याकडे गेली . अमेरिका व कँनडाला जोडणारा उंच पूल व नायगारा धबधब्याचे रोमांचकारी दर्शन डोळ्यात साठवितच आम्ही किनार्यावर उतरलो . लिफ्टने वर आलो. आनंद ,पूर्णिमा व बाळराजे आमची वाटच पहात होते . आता आमच्या पोटांत कावळे ओरडत असल्याची जाणीव प्रकर्शाने झाली . आनंद आम्हा सर्वांना घेऊन जवळच्याच शाकाहारी हॉटेलात घेऊन गेला . तेथील पदार्थावरक यथेच्छ ताव मारल्यावर आईस्क्रीम खाल्ले , पोटात थंड थंड गेल्यावर पान खाण्याची तीव्र इच्छा झाली .पण हाय रे , दैवा अमेरिकेत कुठेही पानपट्टी नसल्याचे आनंदने सांगीतले . नंतर आम्ही नायगारा दर्शन ट्राम मध्ये तिकिट काढून बसलो ,नायगारा परिसर बघितला . तेथील लहान गवतालाही फुले आलेली दिसली ,नी मला ” गवत फुला रे ! गवत फुला ” ही कविता आठवली . नायगाराला येता जाता अंदाजे ५-६ मैलाचा कारचा प्रवास पाण्याच्या खालून बोगद्यातून करावा लागतो . नायगाराहून आठवणी दाखल नावीन्यपूर्ण वस्तू खरेदी केल्या . नायगाराचे पात्र समुद्रासारखे विशालआहे . त्यात मोठमोठ्या बोटी /जहाजेही दिसली .
परतीच्या प्रवासात मजल दर मजल करीत रिचमंडला रात्री उशीरा घरी पोहोचलो.सगळेजण प्रवासामुळे दमले होते .निद्रादेवीचा अंम्मल लगेचच सुरू झाला नी आपण कधी झोपेच्या अधीन झालो , हे कोणालाच कळले नाही.
रिचमंडला घराच्या जवळच छानसा तलाव होता . त्याभोवती फिरायला रस्ता तयार केलेला होता .तेथील कॉम्प्लेक्समधील लहान मुले सायकलवरून सकाळी आणि संध्याकाळी फिरायला येत असत .त्यांच्या सोबत त्यांचे आई-वडील, आजोबा-आजी धांवत असत .रस्त्यात भेटणारे स्थानिक ,परदेशी कोणीही असो ,प्रत्येकाला हात उंच करून हाय / हँलो /गुड मॉर्निंग /गुड ईव्हिनिंग म्हणत अभिवादन करीत असत .

पुढच्या विकएंडला वॉशींगटनला येण्याचे आग्रहाचे आमंत्रण आनंदच्या मित्राने सुंदरमने दिले होते . त्याप्रमाणे आनंदने सुंदरमला फोन करून शनिवारी येत असल्याचे कळविले . शनिवारी सकाळीच लवकर ६ वाजता सर्वजण निघालो . सुंदरमने वॉशींगटनला भेटण्याचे ठिकाण कळविले होते . त्याप्रमाणे १० वाजता सुंदरम आमची वाट पहात थांबला होता . भेट झाल्यावर प्रथम सर्वांनी चहा , कॉफी ,थंडपेय ,नाश्ता घेतला . अमेरीकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान ”व्हाईट हाऊस ” जवळच होते . अमेरीकेचे संसद-भवन , अंतरीक्ष भवन ,अब्राहम लिंकन स्मारक ,युध्दाचे स्मारक तसेच आजुबाजूला इतरही पाहण्यासारखी अनेक ठिकाणे होती . अमेरिकेचे बहुमतांनी निवडलेले अध्यक्ष श्री .बराक
ओबामांचे निवासस्थान ,व्हाईट हाऊससमोरच्या मैदानांत एका मोठ्या ग्रुपचा Rose Day चा कार्यक्रम सुरु होता . आम्ही सगळे त्यांच्या खेळात सामील झालो .सर्वजण अत्यांदित झाले . अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा कोणत्यातरी मिटींगसाठी परदेशात गेल्यामुळे त्यांच्या निवासस्थानात नव्हते . त्यामुळे व्हाईट -हाऊस पाहण्याचा योग हुकला . संसद भवन बाहेरूनच पाहिले. नंतर आम्ही अमेरिकेतील अत्यंत प्रसिध्द अंतरिक्ष भवन पहायला गेलो. पहिले चांद्रयान,अंतराळयान , पहिले राईटबंधुंनी बनविलेले विमान ,विविध रॉकेटस ,अंतराळ प्रवासांतील अंतराळवीरांचा दिनक्रम प्रत्यक्ष पाहायची संधी मिळाली . विविध शस्त्रात्रे जे अमेरिकेतील विविध युध्दात वापरात होती , समुद्रांत वापरावयाची निरनिराळी नवी जुनी आयुधे कशी वापरली जात…इत्यादीचे चित्रिकरण दाखविलेले पाहिले. सर्वांनी जवळच्या हॉटेलात जाऊन पोटोबा केला . अब्राहम लिंकन स्मारकाजवळ आम्ही सगळ्यांनी फोटो काढले . तेथील मला आवडला तो तेथील मधोमध वाहत असलेला मोठा कालवा .त्यातील मनोहारी पक्षी ,मासे……इ. युद्धातील वेगवेगळे प्रसंग त्रिमितितील भित्तिचित्रे ते प्रसंग हुबेहुब समोररच घडताहेतसे वाटत होते . संध्याकाळ होत आली होती .आम्ही सुंदरमचा निरोप घेऊन परतीच्या वाटेला लागलो . रात्री ऊशीरा घरी पोहोचलो थोडेसे खाऊन निद्रादेवीच्या कधी अधीन झालो ते आमचे आम्हालाही कळले नाही . अद्वैतशी खेळतांना ,बोबडे बोबडे बोलतांना वेळ कसा जाई ते कळत नव्हते. अच्चन , अम्मा केरळीय पद्धतिचे पदार्थ मधूनमधून बनवितअसत .सौ .निर्मला महाराष्ट्रीयन पदार्थ तयार करत असे . चि. सौ . पूर्णिमा हळूहळू कामावर जायला लागली . तिला केरळीय पदार्थाबरोबर सौ. निर्मलासोबत महाराष्ट्रीयन पदार्थ बनविण्याचीही हौस होती .मधून मधून पूर्णिमा टँबलेटवर इंटरनेटच्या मदतीने, पाहून पाहून रेसिपीप्रमाणे नवनवीन पदार्थ बनवित असे . अच्चन कोशिंबीर बनवितांना कैरी ,कांदा …इ .अगदी बारीक कापत असत . आनंद मधून मधून आम्हाला मॉलमध्ये घेऊन जात असे . तेथे आवश्यक त्या किराणा, भाजीपाला , कपडे , औषधी ,ईलेक्ट्रॉनिक वस्तु ….इ . थोडक्यात Pin to piano (Car/ T . V . सह ) मिळत असत . अमेरिकेत प्रत्येक घरी कार आवश्यक गोष्ट आहे . कारण घरापासून ऑफीस , मॉल ,मंदिर , ओळखीच्या व्यक्ति साधारणपणे कमीचकमी १५ किलोमीटर अंतरावर आहेत . सार्वजनिक वाहन व्यवस्था नगण्यच असल्याने स्वत:चे वाहन अत्यावश्यक ठरते . पायी पायी जाणे अशक्य , सायकलचा प्रवास करता येतो .पण Marketing करता स्वत:चेच वाहन हवे . मकरंदची ( M. I .T. )Verginia University रिचमंडमध्येच आहे . त्यानंतर आम्ही सर्वजण Sea Beach वर जाऊन आलो . रेसिंग करणार्या मोटार-बोटी , समुद्र काठावरच्या वाळूतून भटकणे , धावणे , विविध पदार्थ खाण्याची मजा लुटणे ……इ. गोष्टित आम्हा सर्वांचा दिवस कसा संपला ते कळलेच नाही .
मुंबईला मकरंद ,मुणालिनी सुनबाई , गं.भा.आईसाहेब होत्या . ह्या सगळ्यांची आम्हा दोघांना फार आठवण येत होती .आमचे परतीचे तिकीट रिचमंड-अटलांटा-मुंबई असे होते . रिचमंड विमानतळावर अद्वैत-बाळराजांसह सगळे निरोप द्यायला आले होते . सेक्युरिटी चेक झाले ,सगळे सामान चेक-ईन केले असल्याने आम्हाला त्याचा ताबा मुंबई विमान तळावरच मिळणार होते .विमानात प्रवेश करून आमच्या जागेवर बसलो. रिचमंडहून अटलांटाला पोहोचण्यास दोन तास लागले .
अटलांटा विमानतळ खूपच मोठे होते .दिवसभरात सुमारे २०० विमानेयेथून ऊड्डाण करतात . ईतर विमानाप्रमाणे , आमच्याही सामानाच्या बँगा रिचमंडच्या विमानांतून मुंबईच्या विमानात हलविण्याचे काम सुरू होते . अचानक आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले . मुसळधार पाऊस ,वीजांचा कडकडाट ,सोसाट्याचा वादळ वारा ह्यामुळे बाहेरचे सगळे काम थांबविणे भाग पडले . सगळ्याच विमानात न हलविलेल्या सामानाच्या बँगा मुसळधार पाऊस मनसोक्त भिजवित होता . सुमारे दोन तास चाललेले हे तांडव एकदाचे थांबले . सामानाच्या बँगा जशा आहेत तशा विमानात चढविण्यात आल्या .आमच्या विमानाचा ऊड्डाण करणास तयारच्या रांगेत ४८ वा क्रमांक होता . विमानात बसल्यावर चहा , नाश्ता , पेयपान …इ . झाल्यावर सगळ्यांच्या डोळ्यावर झोपेची जबरदस्त झापड आली होती . सगळेजण कधी निद्रादेवीच्या अधीन झाले ते समजलेच नाही . अटलांटा – मुंबई सलग प्रवास २० तासांचा होता . सकाळी सकाळी २ वाजता मुंबई विमानतळीवर ऊतरलो . सामान बेल्टवरून घेऊन , कस्टम चेक , ईमिग्रेशन चेक होईतो २ तास गेले . विमानतळाबाहेर मकरंद , सौ. प्रीति /सुनील तसेच श्री . बाबासाहेब भुर्के ( व्याही )गाडी घेऊन आलेले होते .रिजन्सी ईस्टेटमध्ये सकाळी पोहोचेपर्यत सकाळचे पांच वाजले होते .आमचा विमान प्रवासाचा Jet Lag जाण्यासाठी मस्तपैकी कडक चहा घेऊन झोपलो .
दुपारी आमच्या सोबतच्या बँगा उघडल्या ,त्यातील बहुतांश कपडे अटलांटा विमानतळावर मुसळधार पावसांत भिजलेले व त्यानंतर २+२०+८=३० तास बँगेतच होते . काही कपड्यांना रंगही लागला होता . ते कपडे ड्राय क्लिनिंगला दिले. पण उपयोग झाला नाही . सरते शेवटी ते कपडे नाईलाजाने टाकून देणे भाग पडले .
हळूहळू JetLag मधून बाहेर पडलो , नित्यनियमाने रोजची कामे करू लागलो. आता ( मकरंदच्या पत्नीला ) मोठ्या सुनबाईला ,मृणालिनीला सातवा महिना लागला होता .साडी -चोळीचा घरगुती कार्यक्रम आटेपला . अमेरिकेतील अद्वैतच्या आगमनानंतरची ही बाब सर्वाना अतिशय आनंदून गेली . डोंबिवली पूर्वेच्या डॉ . कामतांच्या ममता हॉस्पिटलला सुनबाईच्या तपासणी फेर्या वाढू लागल्या . ५ सप्टेंबर २००९ला ति . गं .भा . आईचा ८३ वा वाढदिवस धड्याक्यात साजरा करण्यात आला .
मृणालिनि-मोठ्या सुनबाईला ६ सप्टेंबरला ममता हॉस्पिटलला भरती केले . ७ सप्टेंबर २००९ ला साधारणत: रात्री १० वाजता कन्यारत्न जन्माला आले . बाळंतपण शस्त्रक्रिया करून करावे लागले . सगळेजण आनंदून गेले , मकरंदने सगळ्यांना बर्फी वाटली . कन्यारत्नाला कावीळीची बाधा झाल्याने कांचेच्या पेटीत ठेवावे लागले . थोड्याच दिवसांनी बाळ – बाळंतीणीला दवाखान्यातून घरी जाण्यासाठी डॉक्टरांनी परवानगी दिली . बाळाचे बारशे सर्वांनुमते ठरविणेत आले . ति.गं .भा .आईसाहेबांच्या मार्गदर्शनाबरहुकूम बारशाची काटेकोरपणे तयारी करणेत आली ,कोठेही कोणतीही न्युनता राहणार नाही ह्याची काळजी घेण्यात आली .बारशाच्या दिवशीच , मकरंदचा वाढदिवस १२ सप्टेंबरचा व प्रमोदच्या पत्नीचा सौ .प्रियाचा १९ सप्टेंबरचा एकत्रच साजरा करण्याचे ठरविले. विलक्षण योगायोग आनंदचा आणि अद्वैतचा दोघांचाही जन्म एप्रिल महिन्यातच झालेला. तद्वतच मकरंद आणि त्याच्या मुलीचा जन्मही सप्टेंबर महिन्यातलाच ,हे लक्षात आल्यावर बारशाच्या समारंभातील लज्जत अधिकच वाढली . मकरंदच्या मुलीचेही नामकरण करतांना ते ‘ म ‘ अक्षरावरूनच ” मृण्मयी ” असे ठेवण्यांत आले . आमच्या रिजन्सी ईस्टेटमधील सौ .निर्मलाचा महिलामंडळातील महिला , सुनबाईच्या मैत्रिणी …..इत्यादिंची बारशाच्या दिवशी आवर्जून उपस्थिति होती .
५ एप्रिल २००९ रोजी रिजन्सी कॉम्प्लेक्समधील गार्डनमध्ये नियमितपणे सकाळ संध्याकाळ भेटणार्या डॉ. कोरान्ने , श्री.शर्माजी उपाख्य दादाजी ,श्री. मेहताजी , श्री . कासट ,श्री .खानविलकर …इ . ज्येष्ठ नागरिकांनी एकत्रित येऊन , रिजन्सी परिवार ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली .कोकण विभागीय ज्येष्ठ नागरिक संघ ( फेस्कॉम ) शी संलग्नता घेतली .त्यांचाच नोंदणी क्रमांक रिजन्सी जेष्ठ नागरिक संघाच्या लेटर हेडवर छापण्याची परवानगीही मिळाली .नवीन सभासद नोंदणी सुरू केली . आम्ही दोघेही त्यावेळी अमेरिकेत आनंदकडे अद्वैतच्या बारशासाठी गेलेलो होतो . भारतांत डोंबिवलीला परत आल्यानंतर सौ .निर्मला व मी सदस्यत्व घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)