Regency Pariwar , Dombivali East

रिजन्सी ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदावर माझी सर्वानुमते निवड झाली . त्यावेळी अगोदरचे अध्यक्ष , कै . डॉ. कोरान्ने ह्यांची प्रलंबित कामे पुर्ण करावयाचे मी ठरविले . हे पहिलेच वर्ष असल्याने , तसेच मलाही कोणतीही माहिती नसल्याने व मी काळजीवाहू अध्यक्ष असल्याने , माझी तारांबळ होत होती .परंतु श्री .शर्माजी व श्री .मेहताजी (सल्लागार ) , सेक्रेटरी श्री .खानविलकर , कँशिअर श्री .प्रकाश कुळकर्णी ,कॉम्युटर जाणकार श्री . सामंत व अंतर्गत ऑडीटर श्री. अप्पा सावंत -देसाई ह्या सगळ्यांनीच मला वेळोवेळी लागेल ती मदत स्वत: होऊन देऊन पुढची वाटचाल सुरू ठेवली . कोजागिरीचा कार्यक्रमास प्रत्येकी रू. ५०/- नोंदणी फी सर्वानुमते ठेवली . एकूण ४० ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी केली . मध्यंतरी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांमध्ये मतभेद निर्माण झाले . काही सदस्यांच्या मते ज्येष्ठ नागरिक संघाने सदस्यांना वारंवार कार्यक्रम घेऊन सदस्यांना चहापाणी दिलेच पाहिजे ,परंतु सर्व सदस्य दरमहाची फी नियमितपणे देत नव्हते .पैशा अभावी ईच्छा असुनही कार्यक्रम घेणे शक्य नव्हते .त्यामुळे मी , श्री .शर्माजी ,मेहताजी , व कारखानीस बगीच्यात एका बाजूला तर ईतर सदस्य एका बाजूला बसत असू .हळू हळू मी त्या सर्वांना ”विहिरीतच नाही तर पोहोर्यात कसे येणार ”हे समजाऊन सांगितले. कोजागिरी पौर्णिमेला प्रत्येकी रू .५०/- प्रवेश फी घेऊन आटीव दुध एक पेला व भेळ – वडा देण्यात आले . स्पॉन्सर पद्धतिने वेग वेगळ्या संस्थांमार्फत आरोग्य शिबिरे , डोंबिवलीतील ज्येष्ठ महिलांचा ” भारूड ” कार्यक्रम घेण्यांत आले .ह्या सगळ्या कार्यक्रमाला रिजन्सीतील सर्व नागरिकांची उपस्थिती लाभत होती . परिणामी ज्येष्ठ नागरिक संघात वर्षअखेर एकूण ७२ सदस्यांची नोंदणी पूर्ण झाली . ३१ मार्च २०१० रोजीचा ज्येष्ठ नागरिक संघाचा पहिला वार्षिक अहवाल श्री .सामंतांच्या मदतीने कॉम्प्युटरवर छापून सदस्यांना वार्षिक सर्व साधारण सभेत देण्यात आला . सर्व सदस्यांनी २०१० – ११ करीता माझ्या अध्यक्षतेखालील कार्यकारिणीचीच पुन: निवड केली . त्यानंतर मला दुसर्या वर्षातील १० महिन्यात विविध ३० कार्यक्रम सर्वांच्या सहकार्यीने यशस्वीरित्या पार पडले . मी एक नवीनच धाडस करण्याचे ठरविले . दुसरे वर्ष असुनही स्मरणिका जाहिरातीद्वारे संघामागे आर्थिक बळ ऊभारण्यासाठ, रक्कम जमा करण्यास सगळ्यांनी मनापासून सहकार्य करण्याचे मान्य केले.
स्मरणिका २०११ साठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या . छपाई समिति , जाहिरात संकलन समिति , छपाईनंतरची जाहिरात तपासणी , स्मरणिका वितरण समिति , नियंत्रण समिति , आर्थिक समिति ,…..इ . सगळे सदस्य , समित्या आपापल्या कामाला लागल्या . स्मरणिका (दुसरा वार्षीक अहवालासह ) प्रकाशन समारंभ ५ एप्रिल २०११ ला ज्येष्ठ नागरिक संघाच्या दुसर्या वर्घापन दिनाच्या दिवशी करपण्याचे ठरविले .प्रमुख पाहुणे डोंबिवलीतील मान्यवर प्रसिध्द लेखक ,नाटककार श्री .शं.ना .नवरे आणि शिक्षणतद्न्य श्री .विद्यावाचस्पती तसेच फेसकॉमच्या /समन्वय समिति डोंबिवलीच्या अध्यक्ष/सेक्रेटरींना तसेच डोंबिवलीतील समस्त ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष/सचिव ह्यांना बोलाविण्यात आले होते . रोटरी क्लब ग्रामिणच्या सहकार्याने तसेच रिजन्सीतील विविध कलाकारांच्या सहकार्याने करमणुकिचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते .तसेच उपस्थितांना अल्पोपहारही देण्यात आला . एकूण जमा रकमेतून खर्च वजा जाऊन सुमारे सव्वा लाख रूपये ज्येष्ठ नागरिक संघाच्या डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या Fixed Deposit खात्यात जमा करण्यात आले. एकंदरित हा स्मरणिकेचा कार्यक्रम अत्यंत यशस्विरित्या सगळ्यांच्या अमोल सहकार्याने पार पडला .
आता ज्येष्ठ नागरिक संघ रिजन्सी परिवाराची आर्थिक स्थिति बरीचशी स्थिर झालेली होती .पुढील सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणीला सगळा कार्यभार सोपविला .
त्यातच मकरंदला पुणे येथील मेसर्स निहिलेंट ह्या ईन्शुरन्स कंपनीत नोकरी मिळाल्याने आम्हा सगळ्यांना पुण्याला बिर्हाड हलविणे जरूरिचे होते . पुण्याला सौ .प्रीति सुनील भुर्के येरवडा भागात हरिगंगा को-ऑप. हाऊसिंग सोसायटीत राहत होते . तेथेच जवळपास मकरंदसाठी घराचा शोध सुरू केला.योगायोगाने सौ.प्रीतिच्याच Flll बिल्डिंगमध्येच दुसर्या मजल्यावरचे 2 BHK घर मिळाले. आवश्यक तेव्हढे सामान घेऊन ति. गं. भा .आईसह सगळेजण पुण्याला शिफ्ट झालो .चि.मृण्मयीला आता Play Group साठी जवळच्या विश्रांतवाडीतच ABC Montesary मध्ये प्रवेश मिळाला . सकाळी शाळेत पोहोचविणयास दररोज Auto येत असे . शाळेतून परत येतांना शाळेचीच व्हँन मृण्मयीला घरी आणून देत असे . हरिगंगा कॉम्लेक्समध्ये ११ मजल्याच्या जवळ जवळ २५ ईमारती होत्या . ज्येष्ठ नागरिक संघाच्या तसेच सोसायटी कार्यकारिणीच्या सहकार्याने हरिगंगातील सर्व सदस्यांसाठी शासनाच्या निर्देशाप्रमाणे आणि पोलीस आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे संगणकीय /सायबर गुन्हे बाबत माहिती देण्यासाठी व जागरूतता होण्यासाठी एक दिवशीय शिबीर आयोजित करण्यात आले होते . त्यामध्से नागरिकांनी मनापासून सहभाग घेऊन प्रश्नोत्तरांच्या तासाला भरपूर प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतले .AB C Montasary मध्ये चि.मृण्मयीचीचांगली प्रगती सुरू होती . त्यांच्या Annual Day च्या कार्यक्रमात चि.मृण्मयीने स्टेजवर ईतर मुलांमुलीसोबत जवळजवळ ४०० प्रेक्षकांसमोर न लाजता, अडखळता छानदार नृत्य सादर केले. बक्षीसे व प्रमाणपत्रही मिळाविले .
आनंद रिचमंडहून ईन्फोसिसच्याच कामासाठी कँलिफोर्नियाला गेला होता . पूर्णिमा त्याचवेळी कँलिफोर्नियाला चांगल्या कंपनीत लागली होती . आनंदची कंपनी थोड्या लांब अंतरावर होती .प्रथम बस ,मग रेल्वे ,पुन: बसचा प्रवास ,नंतर पायी पायी १५मिनिटे ,असा एकूण दोन तासांचा प्रवास होता . त्याने सारासार विचार करून तेथे सायकल विकत घेतली . बसच्या प्रवासा ऐवजी सायकलने प्रवास नंतर सायकलसह रेल्वेप्रवास नंतर बसऐवजी पुन: सायकलने कंपनी पर्यंत जायचे . पायी पायी चालण्यात जाणारा वेळ वाचला . कँलिफोर्निया राहणीमानाच्या द्दष्टिने तसे फार महागडे आहे . आनंद /पूर्णिमाचे अधिक चांगल्या नोकरीसाठीच्या प्रयत्नांना यश आले .
अमेरिकेतून आनंद , सौ . पूर्णिमा , चि .अद्वैत भारतात तीन आठवड्याच्या दिर्घ रजेवर आले . प्रथम केरळला येडावूरला अम्मा ,अच्चन , प्रवीण व इतर नातेवाईकांना भेटायला गेले .तेथे सर्वजण आनंदले .१० दिवसांनी पिटुकल्या अद्वैतला घेऊन आनंद व सौ . पूर्णिमा डोंबिवलीला रिजन्सी ईस्टेटमध्ये पोहोचले . ति.गं. भा . आईसाहेब ,सौ .निर्मला , मकरंद,मोठी सुनबाई सौ . मृणालिनी , चि .मृण्मयी सगळ्यांना खूपच आनंदून गेले . पुण्याहून ति. सौ .प्रिति ,सुनील भुर्के , मुद्दाम आनंद , सौ . पूर्णिमा ,चि . अद्वैतला भेटण्यासाठीआली . मकरंद , सौ . प्राजक्ता/मृणालिनी , चि . मृण्मयी आणि आनंद , सौ .पूर्णिमा व अद्वैतसह तुळजापूरला देवीच्या दर्शनासाठी जाऊन आले . आम्हा सगळ्यांना खूप आनंद व समाधान वाटले .
आनंदने एक खुषखबर सांगितली .सौ .पूर्णिमाने ईन्फोसिस कंपनी सोडून अमेरिकेतच टेक्सास राज्यातील डलास शहरात M/S Capital Bank कंपनीतच नोकरी मिळविली आहे . आनंदलाही टेक्सास राज्यातील M/S Kaygen कंपनीत नोकरी मिळाली आहे .त्याला व सौ .पूर्णिमाला मुख्यालयी डलासलाच राहता येणार होते . आनंदला आठवड्यातून ३-४ दिवस विमानाने वेगवेगळ्या राज्यात कंपनीच्या खर्चाने कामासाठी जावे लागणार आहे. त्याच्यासमोर मोठ्ठा प्रश्न होता की ,आनंदच्या गैरहजेरीत सौ .पूर्णिमा आणि चि .अद्वैतजवळ कोण राहणार ? पुढे थोड्याच दिवसात चि. अद्वैतला तेथेच मॉंटेसरी शाळेत Play Group ला Day Care मध्ये प्रवेशही घ्यावा लागणार आहे . सर्वानुमते किमान सहा महिन्यसााठी आनंदसोबत आई/पपांनी अमेरिकेत टेक्सास राज्यातील डलासला जाणे योग्य होईल .

पुन: अमेरिकेत :-
आनंदने अमेरिकेत जातांना मला व सौ .निर्मलाला त्यांच्या सोबतच नेण्याचा निर्णय घेतला . त्याप्रमाणे त्याने तशी आमची डलासला जाण्यासाठी व्हाया लंडन, न्युजर्सीची तिकीटे काढली . आम्ही सर्वजण मुंबई विमानतळावर पोहोचलो . रात्री एक वाजता विमानाने लंडनच्या दिशेने ऊड्डाण केले . लंडनला दोन तास मुक्काम करून न्युजर्सीच्या दिशेने विमान निघाले . न्युजर्सी अमेरिकेतच आहे , तेथेही दोन तास मुक्काम करून डलासच्या टर्मरिनसवर जाण्यासाठी मेट्रोने एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जावे लागले . डलासला पोहोचलो तेव्हा रात्रीचे ८.३० वाजले होते . आनंदने इंटरनेटवरच डलासला घर बुक केले होते .परंतु घरात कोणतीही सोय नव्हती , कोणतेही सामान नव्हते . त्यामुळे आम्हा सगळ्सांना हॉटेलमध्येच मुक्काम करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. आनंदने न्युजर्सीला हॉटेलमध्ये दोन रूम्स अगोदरच बुक केलेल्या होत्या . रात्री तेथेच जेवण करून झोपलो .दुसर्या दिवशी सकाळी चहा नाश्ता करून डलासला आमच्या हेरिटेज, ५९०० बे वॉटर ड्राईव्ह अपार्टमेंट क्रमांक २५०१ प्लेनो , टेक्सास ७५०९३-५७३६ पोहोचलो . त्या दिवशी आम्ही सर्वांनी बाहेरूनच जेवण मागविले . कँलीफोर्नियाहून त्यांचे सामानाची डिलीव्हरी घेऊन येणारा ट्रक दोन दिवसांनी येणार होता . त्यांची कँलिफोर्नियातील कार त्याच्या डलासमधील मित्राकडे पोहचली होती . ती त्याने आणून दिली . प्लँनोमधील ह्या कॉम्लेक्समध्ये दुमजली बरोबरच एक मजली बंगलेही होते . आमचा हा दुमजली बंगला खाली गाडीसाठी गँरेज ,पहिल्या मजल्यावर किचन , डायनींग रूम , हॉल ,बाथरूम , ऑफीस रूम तर वरच्या मजल्यावर दोन सेल्फ कंटेन्ड मोठ्या डबल बेडरूम्स, कपडे धुण्याची व वेगळी कपडे सुकविण्याची मशीन होती. आनंदने हळूहळू ईतर अत्यावश्यक वस्तु मॉल मधून आणून घरीच त्या सोबतच्या सूचनांप्रमाणे तयार करून योग्य जागी ठेवल्या . टि .व्ही. आणला ,सोबत भारतातील मी मराठी, झी टि .व्ही ., झी न्युज , ई.टि .व्ही ,सोनी ,ए.बी .पी . माझा . …..इ. हिंदी ,तसेच
मल्याळी चँनल्स केबल सेवाही घेतली . ह्याशिवाय मधून मधून हिंदी/ इंग्रजी मराठी व मल्याळम चित्रपटांच्या सी .डी . लावण्यासाठी व्हिडीओ प्लेअरही आणला .सौ. पूर्णिमा ३० जुलैला Capital One कंपनीत कामावर रूजुं होणार होती . आनंदने त्याच्या Kaygen कंपनीत पुढील आठवड्यात कामावर रूजुं होण्याचे ठरविले होते . आता आमचा दोघांचा अमेरिकेतील दिनक्रम सकाळी लवकर उठून Morning Walk , Gym मध्ये Trade Mill (पट्ट्यावर ) साधारणपणे ३०-४० मिनिटे चालणे . घरी परत आल्यावर सौ . पूर्णिमाने तयार केलेला चहा /कॉफी व नाश्ता करणे , आनंद व सौ . पूर्णिमा आपापला टिफीन घेऊन कामावर गेले की सौ .निर्मला देव-पूजा करायची . त्यानंतर इंटरनेटवर भारतातील मुंबईची वर्तमानपत्रे लोकसत्ता , महाराष्ट्र टाईम्स ,सकाळ ,टाईम्स वाचत वेळ जात असे ,सायंकाळी Silver Creek Lake Side ला फिरायला जाण्याचा कार्यक्रम असायचा .सकाळी झी टिव्हीवरYoga 4 You c हा योगावरचा कार्यक्रम ,बातम्या पाहण्यात वेळ कसा जाई हेच कळत नसे . दर गुरूवारी व चतुर्थीला Irving 1605 N.Britain Road Texas-75061 येथे हिंदु मंदिरात जाणयाचा कार्यक्रम असायचा .तेथे गणपती,विठ्ठल रूख्माई , राधा-कृष्ण ,अय्यपा….इ.च्या मुर्ति एकाच हॉलमध्ये होत्या . तेथे भारतातील विविध प्रदेशातील व्यक्ति आपापल्या कुटुंबातील लहानमोठ्या सदस्यांना घेऊन निरनिराळ्या कार्यक्रमाला हजेरी लावत असत . एकदा मुंबईतील गोरेगांव- मालाड लिंक रोडवर राहणारे श्री. म्हशेलकर Couple २५ ऑगस्ट २०१२ ला भारतात परत जाणारहोते .ते दैवड्ञ सोनार असून त्यांचे नातेवाईक डोंबिवली पूर्वेला दत्त मंदिर ,नामदेव पथवर राहतात .सौ .निर्लमाने त्यांना Regency ला येण्याचे आमंत्रण दिले .
१० ऑगस्टला Taj Grosary मध्ये Money Gram (मनी ट्रान्सफर कंपनीत ) Brand Ambasader म्हणून भारतातील श्री .सुनील गावस्कर येणार होते . तेथील बँटवर त्यांची स्वाक्षरी घ्यावी असा विचार केला. तेथे आम्ही आनंद/पूर्णिमा/आदी तसेच मी व निर्मला आदी/मनुसाठी छोटी १ – १ बँट घेऊन रांग लाऊन सुनील गावस्करची स्वाक्षरी करून घेतली . त्याच्यासोबत फोटो काढले . त्या दिवशी जन्माष्टमीचा उपास होता. त्यामुळे
सौ .निर्मलाने घरी परत जाऊन जन्माष्टमीचा उपास पूजा करून सोडला. सौ.निर्मलाने सुंठवड्याचा प्रसाद सगळ्यांना दिला.
आनंद/पूर्णिमाने मला Chetan Bhagat चे Revolution 20- 20 वाचायला दिले .मला ते पुस्तक खपच भावले .अधूनमधून डोंबिवलीलाघरी ति .गं भा. आई ,मकरंद ,सुनबाईशी व मृण्मयीशी Skyp बोलण्याची संधी आम्ही घेत होतो . तसेच श्री .व श्रीमती वेल्हाळ याच्याशी विक्रोळीलाही Skyp वर बोलत होतो . त्यामुळे मुंबईतील वर्तमान वेळोवेळी कळायचे . Regency Estate मधील दहिहंडीचा पुरूष व महिलांचा वेगवेगळा कार्यक्रम छानच रंगला होता .महिलांच्या गटाला रोख बक्षीसही मिळाले , त्यांत मोठी सुनबाई सौ.मृणालिनीही होती .
१५ ऑगस्ट २०१२ च्या बहारदार कार्यक्रमात रिजन्सीतील ८०वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आयोजित करण्यांत आला होता ,त्यांत ८७ वर्षाच्या ति.गं .भा. आईसाहेबांचाही सत्कार करण्यात करण्यात आला ही फारच समाधानाची बाब होती . त्याच दिवशी आमच्या शेजारच्या जयेश लाटेची एंगेजमेंट ,कळवा येथील मुलीशी झाली . ह्या कार्यक्रमाला घरचे सगळे जण जाऊन आले . नवरी मुलगी कळवा येथेच सारस्वत बँकेत नोकरी करीत होती . रिजन्सी ईस्टेटमधील श्री .खानविलकर , अध्यक्ष ,ज्येष्ठ नागरिक संघ, श्री .नष्टे , कार्याध्यक्ष , श्री. शर्माजी /मेहताजी ,सल्लागार ,श्री. कारखानीस ,सहसचिव , श्री. भुपेन्दर्सिंग खानी फोटोग्राफर, श्री .सामंत , कँशिअर …….. इ.ना मधून मधून फोन केल्यामुळे रिजन्सीतील सगळ्या बातम्या समजत असत. होळी , दहिहांडी , दसरा ऊत्सव , श्री .साईबाबामंदिरातून निघणारी पालखी मिरवणूक , ज्येष्ठांचे साजरे केलेले वाढदिवस ,दिवाळीपहाट , दिवाळी संध्या ,रिजन्सी खेल महोत्सव …इ. कार्यक्रमांची छायाचित्रे Face Book वर पाहायला मिळत असत .
टि. व्ही. वरील ABP Maza वरील बातम्यातून नागपूरच्या पोळ्याच्या दिवशीची मारबत , बडगेच्या मिरवणूकीतील भ्रष्टाचारादी विषयावरील मोठमोठे पुुतळे गेल्या १२७ वर्षापासून ,बनऊन गांवाबाहेरनेऊन जाळतात . त्यामुळे अशा बाबींना आळा बसेल असा नागपूरकरांचा विश्वास आहे .
त्यावेळी संपूर्ण अमेरिकेत WEST-LINE नांवाच्या डांसांपासून पसरणार्या Virus मुळे लोक मोठ्या प्रमाणावरआजारी पडत होते.पण टेक्सासमध्ये ८०% प्रादुर्भाव आढळल्याने आणिबाणि जाहिर केली होती .शरीराच्या उघड्या राहणार्या हात-पाय झाकणारेच कपडे घालणाच्या सुचनादेण्यांत होत्या .पाण्याचा वापरही काटकसरीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या .
एकदा आनंदच्या फेसबुकवर माझा प्रोफाईल डलासमधीलच सौ .राखी विचुरकरने पाहिला , तिचा लगेच आनंदला फोन आला /फेसबुकवरही मेसेज आला , ”मामा ,मी येथे डलासलाच आहे . माझ्या घरी मामीला घेऊन कधी येता? माझा पत्ता व फोन नंबर आनंदला दिला आहे ,मी खूपच आनंदून गेली आहे ,लवकरात लवकर सगळ्यांना घेऊन या , वाट पहात आहे . माझ्या सासु सासर्यांना ,नवरा राजेशना मी समजाऊन सांगीन .आम्हाला येथे येऊन १२ वर्षे होऊन गेली आहेत .मला २ मुले आहेत .
माझे व निर्मलाचे मन १२ वर्षे मागे गेले . माझी लहान बहिण सौ .सुषमा रत्नपारखीची चुलत नणंद ,अमडापूरची डॉक्टर राखी रत्नपारखीचे लग्न व्हायचे होते . कन्न्मवार नगरमधील विदर्भातीलच श्री .विंचुरकर माळवी सुवर्णकार संघ ,मुंबईचे सक्रीय कार्यकर्ते होते .त्यांचा लहाना मुलगा चि.राजेश हा ईंजिनिअर होता . त्याने मुंबईतील १५-२० मुली पाहिल्या ,पण मुलगी मनाप्रमाणे पसंत पडत नव्हती . त्यांची माझी ओळख झाल्यावर त्यांनी मला मुलींबाबत विचारले असता मी त्यांना कु .राखीबाबत सांगीतले .तिची मावशी मुंबईलाच बोरीवलीला राहात होती . मावशीने अमडापूरला फोन करून , मुलाची माहिती देऊन, कु .राखीला घेऊन तिच्या आई वडिलांना मुंबईलाबोलाऊन घेतले . मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम आमच्याच घरी पार पडला . मुलगी पसंतीचा निरोप मिळाला .माझे काम मुला-मुलीच्या पसंती पर्यंतच असल्याची स्पष्ट कल्पना देऊन , देणे घेणे बाबत मी सहभाग घेतला नाही . त्याचवेळी चि.राजेश विंचुरकर फेब्रुवारी महिन्यात कंपनीतर्फे अमेरिकेत ३ वर्षासाठी जाणार असल्याची बातमी आली . मी दोन्ही पक्षांना मुलगा अमेरिकेला जाण्या अगोदर उरकण्याची विनंती केली.अडचणींवर मात करून जानेवारी महिन्यांत त्यांना लग्नासाठी सोयीचा दादरला हॉल व कँटरर पाहून दिला . लग्न सुरळीत पार पडले . सौ.राखीचा पासपोर्ट काढण्यासाठी रिजनल पासपोर्ट ऑफीसर ,अमरावतीच्या श्री.हाडे साहेबांची मदत घेतली . देण्याघेण्यावरून श्री.विंचुरकर व श्री.बापू रत्नपारखी यांचे काहितरी बिनसले असावे ,त्यामुळे श्री.विंचुरकरांनी गैरसमजाने माझ्याशी मात्र अबोला धरला होता , तो आजतागायत कायम होता .

१ सप्टेंबर २०१२ :-
अमेरिकेत कार्यालयात पांच दिवसाचा आठवडा असतो. शनिवार,रविवारला जोडून सोमवारी सुटी असतांना Long Weak End चा फायदा घेऊन ,आनंद-पूर्णिमाने सेंट अँटोनीच्या Tower Of America चा कार्यक्रम ठरविला . सकाळी आठ वाजता डलासहून निघालो . सेंट अँटोनी टेक्सास राज्यातच २९५ मैल अंतरावर आहे .सरासरी ६५ मैल वेगाने गेल्यास , मधील एक तास नाश्तापाणी धरून साधारणपणे दुपारी दोन वाजता सेंटअँटोनीला आरक्षित केलेल्या हॉटेलांत पोहोचू असा अंदाज होता . प्रत्यक्षात दिड वाजता हॉटेलांत पोहोचलो . जेवणं करून दोन तास विश्रांती घेऊन ,चहा घेऊन टॉवर ऑफ अमेरिका पाहायला गेलो . सेंट अँन्टोनिओमधील ह्या टॉवरवर फिरते ऊपाहारगृह आहे . अमेरिकेतील Liberty Statue ( स्वातंत्र्य देवतेचा पुतळा) नंतर सर्वात उंच वास्तुत ह्याच टॉवरचा नंबर लागतो .सेंट अँटिनिओच्या डाऊन टाऊनमध्ये हे टॉवर आहे .ह् टॉवर ७५० फुट उंच आहे .ह्याची उभारणी ९ ऑगस्ट १९६६ ला सुरू झाली . तर ६ एप्रिल १९६८ रोजी तो जनतेसाठी खुला करण्यांत आला होता . O-Neil Ford ह्या वास्तुशात्रदञाने ह्याची रचना केली. Almo-City तील हा टॉवर सर्वात उंच Sky -Sraperआहे .ह्या टॉवरवर जाण्यासाठी दोन Lift Elevator असून , त्याला तळमजल्याशिवाय चार थांबे आहेत .१)Chart House, २)Bar ,३)Revolving Restaurant,तर ४)Observation Desk . टॉवरवर जाण्यासाठी प्रथम प्रत्येकी ५० डॉलरचे तिकीट काढावे लागते . तसेच Elevated Tag मनगटाभोवती बांधला. आम्ही सगळे चौथ्या थांब्यावरील Observation Desk मध्ये उभे राहिलो .तेथे मजबूत जाळ्या होत्या . तेथे अतिशय जोरात वारा होता .जाळ्याशिवाय तेथे उभे राहणे अशक्यच होते .आम्हाला पँरीसच्याआयफेल टॉवरची आठवण झाली . तेथे सगळ्यांची अशीच अवस्था होते . संपूर्ण सेंट अँटिनिओचे येथून दर्शन होते . सर्वत्र उंचच उंच ईमारती दिसतात .तेथेच भविष्य सांगणारा Fortune Teller बोलणारा पुतळा होता . आम्हा कोणालाच खाण्यापिण्यात वेळ दवडायचा नव्हता . तेथून खाली आलो . तळमजल्यावरील थियेटर मध्ये 4D-Texas Documentary Film दाखवितात .त्यात ३६ ईंच उंचीपेक्षा कमी मुलांना आत प्रवेश देत नाहीत . टेक्सासता ईतिहास ,Bull Fighting Play ,प्रक्षणिय स्थळे , विविध जंगले ,नद्या …ई .दाखवितात .
आम्हाला अप्रूप, उत्सूकता होती ती 4D-Film ची ,त्यासाठी विनामूल्य वेगळे चष्मे दिले जातात ,ते चष्मे डोळ्यावर ठेऊन आम्ही थियेटरमध्ये मागच्या बाजूला बसवो . जणूंकाही आम्ही प्रत्यक्षात ,खरोखरच, हेलीकॉप्टरमध्ये बसूनच Texas प्रवासाला निघालो . आमचे हेलीकॉप्टर उंचच उंचऊंच ईमारती,जंगलातील झाडांवर आदळते की काय ? समुद्रातील मोठमोठे Live Whale Fishes वर आपण हेलीकॉप्टरसह आदळतो की काय ? बुल फायटिंगचे Bulls तसेच हॉर्स रायडिंगचे Horses आपल्याला आता प्रत्यक्ष धडकतात असे वाटत होते. २० मिनिटांचा Show झाल्यावर सर्वजण बाहेर आलो . बाहेरच्या परिसरांत विविध रिटेल शॉप्स होते . त्यात टॉवर ऑफ अमेरिकाजवळ आपण उभे आहोत असे फोटो काढून देणारा फोटोग्राफर ,शंख ,शिंपले, टॉवर ऑफ अमेरिकाचे प्रिंटेड टी शर्टस् , लेडीज पर्सेस ….इ. ची रिटेल दुकाने, भोवतालच्या परिसरात Hemisphir park मध्ये लहान मोठ्यांसाठी Water parks सगळ्यांना आनंदून गेले .
त्यानंतर आम्ही जवळच्याच सेंटअँटिनिओ नदीच्या गोलाकार कालव्यामधून बोटीने जवळ जवळ ४५ मिनिटे आजुबाजुच्या विविध ईमारतींचे सौंदर्य पहात फेरफटका मारला .कालव्याच्या दोनही बाजूला २००-३०० छोटे- मोठे स्टॉल्स आहेत. त्यांत खाण्यापिण्याचे पदार्थ ,विविध व्यावसायिकीकडे विविध नवनवीन वस्तु विकत होत्ते .आपले हुबेहुब रेखाचित्र पेन्सिलीने २५-२० मिनिटांत काढून देणारे कलाकारही होते . आम्ही जवळ जवळ ३-३ तास पायी पायी ३-४ मैल फिरलो . आम्ही बाहेर आलो तोवर रात्रीचे १०.३० वाजले होते .शोधता शोधता आम्हाला एकमेव Indian Marsala Oak उघडे दिसले . तेथे बुफे डिनर घेऊन आम्ही हॉटेलवर पोहोचलो . त्या रात्री सगळे ढाराढूर झोपलो .
२ सप्टेंबर २०१२ :-
सेंट अँटिनिओ जवळच १२ मैल अंतरावर Sea-World आहे . तेथे कार पार्कींगसाठी मोठे मैदान आहे .तेथे कार पार्कींग सेवा केंद्र आहे.तेथून अर्ध्या मैलावर Sea-World चे प्रवेशद्वार आहे . तेथे तिकीट काढून आंत गेलो .आपल्या गांवाकडील जत्रेसारखी तेथे गर्दी,मनोरंजनाचे विविध ठिकाणी वेगवेगळे स्टॉल्स आहेत . ह्या परिसरांत फिरण्यासाठी २ दिवसही कमी पडतील . एका बाजूला Lost and Found स्टॉल , प्रत्येक ठिकाणी वेगळे तिकीट काढूनच जाता येते .planning करण्यासाठी दिवसभराच्यी कार्यक्रम पत्रिकासोबत Sea World चा संपूर्ण नकाशा दिला जातो . लहान मुले आणि वृद्ध व्यक्तिंसाठी Stroller घेऊन आम्ही निघालो .जगातील विविध पक्षी , प्राणी, विविध जातीचे साप ……इ. चे संवर्धन / संरक्षण कसे करावे ? ह्या साठी १-१ तासाने थियेटरमध्ये Show सुरू होते . Dolphin -Whale-Clove मध्ये मोठ्या तलावात मोठ मोठे शिकविलेले Dolphin/Whale Fish त्यांच्या प्रशिक्षकांसोबत पाण्यात सूर मारणे ,तलावाच्या पाmण्यांत पोहतांना विविध प्रकारच्या कवायती करून दाखवित होते . तलावातील पाणी स्टेडियम मध्येबसलेल्या प्रेक्षकांच्या अंगावर शेपटीच्या तडाख्याने उडऊन त्यांना ओलेचिंब करणे फारच मजेदार वाटले .प्रशिक्षक त्यांना मधूनमधून खायलाही देत होते . ह्याशिवाय Inverted RollerCoaster,Hyper Coaster ,Super Splash Water Ride ,Kiddle Roller Coaster …इ.चित्त्थरारक सफारिही आहेत , मधून मधूनप्रत्येक भागातील All Day Dinning मध्ये ५०% सवलतीत pizza ,Pasta,Buffet /Deserts …इ. चा आस्वाद घेऊन ताजेतवाने Fresh होऊन पुढे जात होतो .तेथील एका लहान तलावात/पाणवठ्यावर लहान मोठ्या
मगरीचे Crocodile Feeding ची मजा काही वेगळीच होती . हे सगळे पाहता पाहता पायी फिरता फिरता सगळेजण अगदी थकून गेलो .रात्री ९.४५ ला मोठा Fire Works Spectacular Show होता . तेथे आमची ओळख पुण्याच्या विजय औंधेकरशी झाली . अमेरिकेत , टेक्सासमधील सेंट अँटिनिओच्या सी -वर्ल्डमध्ये तो कुटुंबासह आला होता .पण पाण्याचे इन्फेक्शन झाल्याने त्याला ताबडतोब दवाखान्यांत दाखल करावेलागले होते . तो T.C.S.मध्ये Houstonमध्ये नोकरीला लागला होता . आम्हा कोणातच रात्री थांबायचे त्राण नव्हते . त्यामुळे परत हॉटेलवर येऊन जेऊन झोपलो .

४ सप्टेंबर २०१२ :-
चि.अद्वैतला डलासमधील Alpha Montesary मध्ये डे – केअर मध्ये प्रवेश घ्यायचा होता . ही शाळा पूर्णिमाच्या Capital One ऑफीसजवळच होते . सकाळी त्याला शाळेत सोडून पूर्णिमा ऑफीसला गेली . अद्वैतचा शाळेतील पहिलाच दिवस होता ,सोबत घरचे कोणीच न दिसल्याने तो रडायला लागला . तेथील संस्थापक व डायरेक्टर श्रीमती रूपाली भारतीयच होत्या .त्यांचे महाराष्ट्रातील सोलापूरजवळच अब्दुलपूर गांव होते .त्यामुळे त्यांना भारतीय मुलांविषयी विशेष आपुलकी होती .त्यांनी अद्वैतला मायेने जवळ घेऊन शांतपणे समजाविले. तो तेथेच जेवला,दुपारी तेथेच त्याच्या बेडवर झोपला . ईतर मुलांसोबत खाऊ खाल्ला , खेळला . पूर्णिमाने ऑफीस मधून परत येतांना घरी घेऊन आली .
सी- वर्ल्डहून डलास Plano ला घरी परतीच्या प्रवासांत हायवेवरच Whole Sale Direct Factory Outlet मधून Clothes खरेदी ५०% ते ७०%Discount असल्याने आम्ही
सर्वांनी आपापल्या पसंतीच्या कपड्यांची खरेदी केली . तेथील Bhurje’s Restaurant मध्ये लंच घेतला . सायंकाळ होत आली होती .
आम्हा G.P.S . च्या सँटेलाईट निर्देशाप्रप्रमाणे हायवेवर प्रवास सुरू केला . हायवेवर वाहतूक मोठ्या प्रमाणावर जाम झाल्याने साधारणत: १५ मैलाचा लांबचा टोल रस्ता मोकळा असल्याचे G.P.S.ने दाखविले . त्याप्रमाणे प्रवास करून आम्ही रात्री १० वाजता घरी परत आलो .

मकरंदची बरेच दिवसांची स्वत:चा बिझिनेस सुरू करण्याची मनीषा होती . त्याला त्याच्याच जुन्या मित्राने श्री.समीरने मनापासून सहकार्य करण्याचे मान्य केले . मकरंदने पुणे म्युनिसिपल काँर्पोरेशन कडून बिझिनेस लायसन्स , शॉप अँड एस्टँब्लिशमेंट लायसेंन्स मिळविले .पुणे येथेच बाणेर परिसरात तिसर्या मजल्यावर ऑफीससाठी जागा मिळाली. २-३ स्टाफ म्हणून कॉम्युटरऑपरेटर टेक्निकल सपोर्टरही मिळाले . कंपनीचे नांव ठेवले ” M/S Indrani Solutions ” हळूहळू , नवनवीन कंपन्यांची कामे मिळण्यास सुरवात झाली . मुख्यालय पुणे येथे मुख्यालय ठेऊन मुंबईत डोंबिवली (पूर्व ) येथे शाखा सुरू केली. कामापरत्वे मकरंद पुणे येथे जाऊन मिटींगला मार्गदर्शन विचारविनिमय करणे/घेणे करत होता .
थोड्याच दिवसांत मकरंदला एक फायनान्सर करणारी व्यक्ति मिळाली . सर्वांचा काम करण्याचा हुरूप वाढला . आता मकरंद व समीर मिळून प्रायव्हेट कंपनीची स्थापना केली , कंपनीचे नांव ठेवले M/S C- Duck Pvt Ltd . नवनवीन कंपनीची कामे मिळविण्यासाठी आता जोरदार प्रयत्न सुरू झाले . पुणे ऑफीस व तांत्रिक बाजू श्री . समीर सांभाळणार आणि मकरंद कंपन्यांशी संपर्क करणे , कामाच्या ऑर्डरस मिळविणे , तसेच त्या पुर्णत्वास नेण्यासाठी श्री . समीरकडे तांत्रिक बाबी कंपनीच्या तंत्रद्न्यींकडून पाठविणे ,वेळोवेळी पाठपुरावा करणे …. इ. तसेच कंपन्यांकडून वसुली करण्याची जबाबदारीही सांभाळत होता .
५ सप्टेंबर २०१२ :-
सप्टेंबर महिन्यात ति.गं.भा. आईसाहेब , चि.कु.मृण्मयी ,चि. मकरंद , चि.प्रमोदची पत्नी सौ.प्रिया ह्यांचा अनक्रमे ५ , ७ , १२ , व १८ सप्टेंबरला वाढदिवस
साजरा केला जातो . ह्या कार्यक्रमासाठी मुद्दाम पुण्याहून सौ .प्रिती व सुनील भुर्के आलेले होते . अकेल्याहून सौ .ज्योतिताई व सौ .सुषमाचे ( माई) ही फोन येऊन गेले . झी मराठी वर सकाळी ११.३० वाजता” राम राम महाराष्ट्र ” कार्यक्रमांत आईसाहेब ,मृण्मयी ,मकरंदचे फोटो दाखऊन वाढ -दिवसाच्या शुभेच्छा दाखविण्यांत येतात , आम्ही सगळ्यांनी अमेरिकेत टि.व्ही. चँनेलवर सर्वांचे फोटो पाहिले .त्यांचे फोटो आनंदने त्याच्या कँमेरात काढले . तसेच आज भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.राधाकृषणन यांचाही वाढदिवस शिक्षक दिन म्हणून भारतभर साजरा केला जातो . महाराष्ट्रात माननीय राज्यपालांच्या शुभ हस्ते राज्यातील आदर्श शिक्षकांना ” राज्य ” पुरस्कार दिले जातात .
चि.प्रमोदला मकरंदच्या रेफरन्सने चेंबुरला रू .१००००/- दरमहा पगारावर नोकरीला लागल्याची बातमी मन आनंदून गेली . सौ. निर्मलाने साईबाबांचे ९ गुरूवारचे व्रत , चि .प्रमोदला लवकरात लवकर चांगली नोकरी मिळ्ण्यासाठी सुरू केले होते . त्याची समाप्ति पुढील गुरूवारी आम्ही अत्यानंदाने साजरी केली. तेथील साईबाबांच्या देवळात जाऊन सर्व भक्तांसाठी यथाशक्ति प्रसाद घरूनच बनऊन नेला होता .

सप्टेंबर महिन्यातील वाढदिवसांच्या निमित्ताने सगळ्यांनी मिळून मुंबई-डोंबिवलीच्या घरातील मोठा हॉल पेंटिंग लाऊन सुशोभित केला होता. ह्या वाढदिवसाचे जवळ जवळ २६ फोटो मकरंद/सौ. मृणाल/ सौ.प्रितीने मिळून फेसबुकवर टाकले तसेच आनंदलाही पाठविले . सौ .प्रितीने मृण्मयीला Tent House Gift दिले .वाढदिवसाच्या दिवशी केक/लहान मुला-मुलींचे मुखवटे सगळे Angry man चेच होते . आम्ही सर्वांनी वाढदिवसाचा कार्यक्रम Skyp Vedeo live बघितला ,शुभेच्छा दिल्या .
ठाणे येथील गं. भा. शशीमावशीचा मुलगा अमेरिकेतच मियामीला जवळजवळ २० वर्षापासून नोकरी करीत आहे .त्याची बायको ईटालीत राहणारी आहे .त्याला मुलगीही आहे ,त्याच्याशी फोनवरून बोललो .त्याला फार आनंद झाला .त्याने मियामीला येण्याचे आमंत्रण दिले .
अद्वैतच्या शाळेत ६ सप्टेंबरला श्रीमती अदलापूरकरांनी आल्फा मॉंटेसरीत Grand Parents day आयोजित केला होता . आम्ही सगळेजण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो . श्रीमती अब्दुलपूरकरांशी भेटून खूप आनंद झाला. सर्वांनी कार्यक्रम एन्जॉय केला . ह्या शाळेत बहुतांश मुले भारतीय वंशाचीच आहेत . त्यांच्या पालकांशी परिचय झाला .
७ सप्टेंबर २०१२ :-
आज डोंबिवलीला चि.कु. मृणमयीचा वाढदिवस ,सौ .प्रीति सुनील भुर्के नी चि .कु .मृण्मयीला छोटेसेच टेंट हाऊस गिफ्ट आणून दिले .ती अतिशय आनंदून गेली. चि.सौ.मृणालिनी (मोठ्या सुनबाईने ) व सौ .प्रितीने फेसबुकवर जवळ जवळ २६ फोटो टाकले . तिच्या वाढदिवसानिमित्ताने रिजन्सी ईमारत क्रमांक ९ फ्लँट क्रमांक १२०३ मध्ये जिकडे तिकडे डेकोरेशन, केक ,लहान मुला – मुलींना दिलेले मुखवटे ….इ . Angry Man चेच साम्राज्य होते . सर्वच लहान मुला- मुलींनी खूप मज्जा केली . कु.मृण्मयीला आतु /मामानी दिलेले वाढदिवसाचे गिफ्ट, घरातीलच पण खेळण्यातील मोठ्ठा टेंन्ट ,खूपच आवडला .तीची शेजारच्या कु .त्रिशासोबत टेंन्टमध्ये आतून खिडकितून डोकाऊन पाहणे ,सारखे आतबाहेर जाण्या येण्याची लगबग पाहूनआम्ही सर्वजण आनंदून गेलो . कु . मृणमयीने Skyp वर ऊत्साहाने चि .अद्वैतला तिला मिळालेले सगळे Birth-Day गिफ्टस ,खेळणी , टेंन्ट क्रमाक्रमाने दाखविले. अद्वैतनेही तिला नवीनच आणलेला काचेचा Tea-Table तसेच छोटा गोल गोल फिरणारा टि – पॉयही तितक्याच ऊत्साहाने दाखविला . दुसर्याच दिवशी आनंदने अद्वैतसाठीही मृण्मयीसारखाच टेंन्ट आणला ,मग मात्र अद्वैतची कळी आणखीनच खुलली .त्याने लगेच Skyp वर कु .मृण्मयीला ” मलाही पप्पांनी तुझ्यासारखाच टेंन्ट आणला आहे, हे बघ ! असे अत्यानंदाने सांगीतले , आत – बाहेर जाणे , खिडकीतून डोकाऊन पाहण्याचा खेळ आनंद -पूर्णिमासोबत दाखविला . त्याच खुशीत झोपी गेला .दुसर्यी दिवशी सकाळीच Happy Happy होत न कुरकुरता टेंन्टमध्येच दूध पिऊन , नाश्ता करून आई -पप्पासोबत Alpha Montesary त गेला . आनंदने फ्लोरिडाहून येतांना अद्वैतसाठी School Bag आणली .
९ सप्टेंबर २०१२ :-
प्लँनो मधील हरिटेज कॉम्लेक्सच्या Gym मधील ट्रेड-मिल ( पट्टा ) वर मी व सौ . निर्मला दररोज सकाळी किमान दहा मिनिटात २.५ मैल अंतर चालत होतेा . त्यामुळे अनुक्रमे ३५ व ४५ कँलरीज जाळत ( Burn ) होतो . त्यामुळे बरे वाटत होते . वजनही हळूहळू कमी होत होते.
आम्ही सगळे Fun -Ashia थियेटरमध्ये ”शिरिन फरहीनकी तो निकल पडी” हा चित्रपट पहायला गेलो होतो .
दि.१२ व १४ सप्टेंबरला अनुक्रमे मकरंद व सौ .प्रिया प्रमोद लोणकरचा वाढदिवस होता.दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .मकरंदचा वाढदिवस तसेच त्याची मुलगी चि.कु .मृण्मयीचाही वाढदिवस सप्टेंबर महिन्यातच येतो .आनंदचा तसेच त्याचा मुलगा चि.अद्वैतचाही वाढदिवस एप्रिल महिन्यांतच येतो . ह्या योगायोग सर्वांचा आनंद द्विगुणित करून जातो . तसे पाहीले तर आमच्या लोणकरांच्या घरात सप्टेंबर महिन्यात सर्वांत जास्त व्यक्तिंचे वाढदिवस साजरे होतात .

१९ सप्टेंबर २०१२ :-
आज गणेश चतुर्थी असल्याने सगळेजण लवकरच ऊठलो . अद्वैतला सौ. निर्मला आजीने मुंबईहून आणलेली गणपतीबाप्पाची छोटीशीच पण रेखीव व सुंदर मूर्ती खूपच आवडली . त्याने मुंबईला सर्वांमिळून केलेले डेकोरेशन व गणपती बाप्पाची सुंदर व रेखीव मुर्ती पाहीली होती . त्याने आपल्या घरीही गणपतीबाप्पाची स्थापना करायचे सांगीतले .आम्ही सर्वांनी देवघराच्या बाजूलाच चकचकीत Goldan मोठे तबक ठेऊन, आरास केलेल्या जागेवर गणपतीबाप्पाची स्थापना केली . २१ मोदकांचा नैवेद्य दाखविला ,सौ. निर्मलाने १११ दुर्वा साईमंदिरातील गणपतीसाठी आणि २१-२१ दुर्वा घरच्या गणपतीसाठी निवडून ठेवल्या होत्या . अद्वैतने / पूर्णिमा /आनंद /सौ .निर्मला व मी सर्वांनी फुले, दुर्वादीने पूजा केली , अद्वैतने गणपतीची आरती मोठ्याने म्हटली , जेवणं झाली . आरती करतांना ऊदबत्ती लावतांना खिडकीजवळच ठेवली परिणामी धूर बाहेर जात होता . सेन्सॉरला धूर कळलाच नाही , त्यातून धोक्याचा आवाज आला नाही . सायंकाळी सर्वजण साईमंदीरात जाऊन आलो .
२२ सप्टेंबर २०१२ :–
आज सौ. राखी राजेश विंचुरकरचा गणपतीच्या निमित्ताने सत्यनारायण पुजेला येण्याचा आग्रहाचा आमंत्रणाचा फोन आला . आनंदने सर्वांना घेऊन जाण्याचे ठरविले . सौ.राखी व राजेश डल्लासला गेल्या १० -१२ वर्षापासून स्थाईक झालेले आहेत. त्यामुळे तिचे २० – २५ भारतीय कुटुंबांशी खास जवळचे संबंध आहेत . वर्षभरात सण समारंभाच्या निमित्ताने वेळोवेळी एकमेकांकडे जाणे येणे असते . त्या सगळ्यांशी ओळख होण्याचा योग आला होता . सौ. राखीची दोन मुले आहेत . चि. राजेशही आनंदप्रमाणेच I.T.कन्सलटंट आहे .त्याला दर आठवड्याला २-४ दिवस कामानिमित्ताने वेस्ट व्हर्जिनिआला जावे लागते .
आम्ही सर्वजण ठरल्याप्रमाणे ४४३७ -फ्लॉवर माउंट ,डल्लासला पूजेच्या दिवशी सकाळीच जाऊन पोहोचलो . दुपारी साधारणपणे २.३० वाजता सत्यनारायण पूजा आटोपली . सर्व मित्रमंडळी नेहमीप्रमाणे सहकुटुंब आली होती. भारतीय गुरूजींनी शुद्ध मराठीत पूजा सांगीतली ,आरती झाली .सर्वांनी तीर्थप्रसाद घेतला . एकत्र जमलेल्या सगळ्यांनी एकमेकांची ओळख करून घेतली . त्यांत महाराष्टातील मुंबईतील घाटकोपर पू.मधील शांतीपार्कमध्ये राहिवासी असलेल्या श्री.गणात्रांशी ओळख झाली . ईतरांपेक्षा वयोवृद्ध ,ज्येष्ठ नागरिक असलेले श्री .गणात्रा मुंबई महानगरपालीकेतून १९९८ साली निवृत्त झाले होते .त्यांचेशी गप्पा चांगल्याच रंगल्या . त्यांत वेळ कसा गेला हे कळलेच नाही .सायंकाळी ५ वाजता आनंद ,सौ. पूर्णिमा ,अद्वैत ,सौ.निर्मलासह घरी आलो .थोड्या गप्पागोष्टी झाल्यावर सगळेजण झोपलो .
२३ सप्टेंबर २०१२ :-
आज शुक्रवार असल्याने आनंद व पूर्णिमा लवकरच घरी आले . आनंदने जेवतांना रात्री तेथील Fun Ashia चित्रपटगृहात Burfi हा Oskar साठी नामांकन/ निवड झालेला चित्रपट पहायला जायचे ठरविले .त्यांत रणवीर कपूर व प्रियांका चोपडाच्या प्रमुख भुमिका आहेत .कमीत कमी संवाद व गाणीही जवळजवळ नाहीतच .रणवीर कपूर मुका तर प्रियांका मंदबुद्धि दाखविली आहे .ह्या दोघांनीही अप्रतिम अभिनय केला आहे . त्याला तोड नाही .
अगोदरच्या दिवशी ” मुक्काम पोष्ट लंडन ” हा चित्रपट घरीच C.D.आणूनT.V. वर पाहिला होता . त्यांत भरत जाधव (मुलगा) व मोहन जोशीं (वडिल )च्या प्रमुख भुमिका आहेत . भरत जाधव त्याच्या बालपणीचा त्याला वडिलांनी मांडिवर घेतलेला , २५ वर्षापूर्वीचा फोटो घेऊन लंडनला वडिलांना भेटायला जातो . त्या फोटोत त्याच्या वडिलांच्या हातात अंगठी असते , व त्यानंतर त्याच्या वडिलांनी लंडनहून त्याच्या आईला पाठविलेले ४ कोटिचे न वटविशाँपस्लेले चेक्सही सेबत घेऊन जातो . त्यानंतरची लंडन विमान तळावर उतरल्यापासूनची धमाल गंमत पाहण्यासारखी आहे . त्याचे वडील त्याच्या जवळील फोटोवरून त्याला ओळखतात , पण ओळख न दाखविता अप्रत्यक्षपणे आवश्यक ती सर्व मदत वेळोवेळी करतात . भारतातून आलेल्या नवख्या व्यक्तिला परदेशात , लंडनला कसकसा व किती त्रास होतो ह्याची त्यांनी पूर्ण जाणीव असते . सरते शेवटी वडील व मुलाची भेट झाल्यावक भरत जाधवला वडिलांची (मोहन जोशीची त्य वेळेची भुमिका कशी योग्य होती हे समजते ,त्याच्या मनातील गैरसमज दूर होतात .शेवटी बाप – लेकात समेट होतो.
अमेरिकेत भारतात असतात त्याप्रमाणे रिटेल किराणा दुकाने नाहीत .त्याऐवजी मोठमोठे होलसेल /रिटेल माँल आहेत ,अगदी भारतीय उपखंडातील नागरिकांच्या सोयीसाठी एअरकंडिशन ईंडियन मार्केट /मॉल मात्र आहेत .तेथे भारतीय उपखंडात मिळणार्या सगळ्या वस्तु मिळतात .आनंद ३-४ दिवसांसाठी कंपनीच्या कामासाठी Florida ला गेला.
अद्वैतच्या Alpha Montessori?di त त्यांच्या वर्गात मुलांना वेगवेगळे Project करायला दिले . अद्वैतला My Family चा Project मिळाला . आम्ही My Family Tree चा विषय निवडला . वॉलमार्ट /पटेल मॉलमधून त्यासाठीचे लागणारे साहित्य पूर्णिमा ,निर्मला व अद्वैतने जाऊन आणले . घरी आल्यावर Computer मधून अद्वैत , पूर्णिमा , अम्मा अच्चन ( पूर्णिमाचे आई /वडील ) च्या फोटोच्या प्रिंटस काढल्या .तसेच आनंद ,निर्मलाआजी व विनोदआजोबांच्याही फोटोप्रिंट काढल्या .आनंद / पूर्णिमाने पिंपळाचे झाड व फांद्या ,पाने सुचविले . परंतु Project अद्वैतच्या Level चे आहे , ही बाब लक्षात घेऊन त्याने पाहिलेल्या अमेरिकेतीलच मोठी लालसर /हिरवी पाने असलेला Tree मी व निर्मलाने सुचविला .सगळ्यांनी ही आयडिया फारच आवडली . मध्यभागी अद्वैत ,डाव्या बाजूला पूर्णिमा ,अम्मा व अच्चन च्या फोटो -प्रिंट तर उजव्या बाजूला आनंद , निर्मलाआजी व विनोद आजोबांच्या फोटो – प्रिंट लावायचे ठरविले . अद्वैत ,आनंद व पूर्णिमाचा फोटो हिरव्या पानांवर तर अम्मा , अच्चन , निर्मलाआजी व विनोदआजोबांचे फोटो लालसर पानांवर लावायचे ठरले . त्याप्रमाणे पुठ्ठयाला White Paper वरील मोठा Tree (लालसर ,हिरव्या पानांसह ) Computer Print चिकटविला त्यावर वरील सगळे फोटो -प्रिंटस् चिकटविले . हा Folding Family Tree सगळ्यांना खूपच आवडला . अद्वैतला My Family वर पांच वाक्ये बोलायची होती . त्याचीही तयारी करून घेतली होती .
दि .२७-९-२०१२ :-
आज सकाळीच अद्वैत लवकर झोपेतून जागा झाला . तो आज खूपच Happy Happy होता .आम्ही सगळ्यांनी अद्वैतच्या शाळेत जाण्याची तयारी केली .पूर्णिमाचेही ऑफीसमध्ये Presentation असल्याने तिने अद्वैतला Folding Tree सह शाळेत सोडले . आम्हा दोघांना शाळेत नेण्यासाठी आनंदने अगोदरच Taxi Booking केलेली होती .Taxi सकाळी १० वाजता येणार होती . नेहमीचा टँक्सीवाला बरोबर १० वाजता आला .त्याने आम्हा दोघांना १०.२० ला अद्वैतच्या शाळेत सोडले .अद्वैतच्या वर्गातील Friends Group चे My Family Tree project सुरू झाले .प्रत्येकाने आणलेल्या Project शी संबंधीत My Family वर ५-५ वाक्येही न घाबरता बोलून दाखवायला सुरवात केली .अद्वैतचा Folding My Family Tree त्याच्या Teachers सह सगळ्यांना खूपच आवडला . अद्वैतनेही MyFamily वर ५ वाक्ये बोलून दाखविली .
I am Adwait Anand Lonkar .
This is my father Anand Lonkar .
This is my mother Poornima Lonkar .
Amma/Achhan are my Grand mother and Grand father .
Nirmala Aajee /Vinod Ajoba also are my Grand mother and father .
उपस्थित Teachers ,Students व Parents नी जोरदार टाळ्या वाजविल्या .
एकंदरीत Presentation उत्कृष्ट झाले . मुला मुलींचे Stage Dairing वाढविण्याचा चांगला प्रयत्न झाला .दुपारनंतर कार्यक्रम संपता संपता पूर्णिमा ऑफीसातून आली होती . आम्ही सगळे अद्वैतला घेऊन घरी आलो .
आनंद फ्लोरिडाहून परत आला . आम्ही गुरूवारी श्री साई मॉदिरात जाऊन आलो .
दि .२९- ९- २०१२ :-
शनिवारी Irvin D.F.W. Dallas ला हिंदु टेंपलला सार्वजनिक गणपति दर्शनासाठी गेलो .अमेरिकेतील ह्या महाराष्ट्र मंडळाने श्री गणपतीची महाकाय मूर्ति मुंबईहून आणली होती . गणपती भोवतीची सजावट पाहून मुंबईच्या ”लालबाग ” सार्वजनिक गणपतीची आठवण झाली . मोठमोठे झांज ,तबला ,पेटी , ढोल ताशाच्या गजरात गणपतीची आरती सुरू झाली .डलासमधील सगळे भारतीय विविध धर्माचे ,पंथाचे लोक हजरराहून मनापासून तल्लीन होऊन आरती म्हणत होते . प्रसाद व ईडली -चटणीचा आस्वाद घेऊन रात्री ऊशीरा घरी परत आलो .
दि.३०-९-२०१२ :
आज रविवार असल्याने सगळेच ऊशीरा ऊठलो . अद्वैतला ताप ,खोकला , ऊलट्या होत होत्या .तांतडीचा ऊपचार म्हणून त्याला होमिओपँथी Gunpowder, Rescue २०-२०मिनिटांनी दिले . ताचे औषधही दिले . २-३ तासांनी त्याला झोप लागली . आनंद उद्या सोमवारी Work From Home करणार आहे .
दि.१-१०-२०१२ सोमवार :-
आज सकाळी अद्वैतचा ताप गेला ,कालपासून पुन: ऊलटी झाली नाही. चांगली झोप लागल्याने प्रसन्न दिसत होता . आम्ही दोघे नेहमीप्रमाणे जिममध्ये जाऊन आलो . आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन रिजन्सी इस्टेट ,डोंबिवलीला साजरा करण्यात आला . आज एकंदरित विचार करता ”विभक्त कुटुंब पध्दति ” अपरिहार्य झाली आहे .एकत्र कुटुंब पध्दतिचा र्हास होत आहे .नव्या पिढिला वृध्दांची अडचण वाटायला लागली आहे .त्यांची सतत अवहेलना करण्यात येत आहे . बहुलंख्येने म्हातारपणी मुलांवरच अवलंबून राहावे लागत आहे .पति वा पत्नीचे निधन झाल्यास मानसिकरित्या एकचेपण खायला येते .त्यांच्या हालअपेष्टा वाढतात .बाहेर कोणाजवळही बोलायची सोय नाही. होत असलेले अत्याचार ‘ तोंड दाबून ‘ मुकाट्याने सहन करीत राहण्याशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही . त्यांना स्वत:चे संरक्षणही करता येत नाही . आरोग्यविषयक सोयी ,सवलती नाहीत. ह्यावर एकच ऊत्तर ” ज्येष्ठ नागरिक संघ ”. त्याद्वारे आपल्या अडचणी शासनाकडे वा योग्य आस्थापनेकडे मांडता येतात . स्काईप वर मुंबईला घरी बोललो . सौ .प्रिति , सुनील पुण्याला सकाळीच डेक्कन एक्सप्रेसने गेले . आज अकोला ,ठाणे ,मुंबई भागांत वादळ ”मौसम ” हा चित्रपट झी टि. व्ही .वर आम्ही सगळ्यांनी पाहिला .
दि.२-१०- २०१२ मंगळवार :-
आज आनंद पूर्णिमाला ऑफीसमध्ये व अद्वैतला शाळेत सोडून आला . काल मुंबईला ”पितृपक्षातील प्रतिपदा ” होती . डोंबिवलीला एक कावळा सकाळपासूनच ‘ काsव ,काsव ‘ करित आम्हा दोघांना शोधत होता . त्याला सौ .निर्मलाच्या हाताने नेहमीप्रमाणे घास मिळाले नाहीत . येथे डलासमध्ये भारतासारखे कावळे शाकाहारी नाहीत , ते मांसाहारी आहेत . येथील भारतीय गुरूजींनी सांगीतल्याप्रमाणे श्री साईमंदिरात जाऊन तेथील गुरूजींना नमस्कार करून दक्षिणा देऊन आलो .तसे डोंबिवलीला ति.गं .भा. आईसाहेबांना व सगळयांना फोन करून सांगितले .
आज रिजन्सीमध्ये ईमारत क्रमांक १ च्या बाजूला बांधलेल्या बसस्टॉप वर ईमारतीच्या टेरेसवरील मोठ्ठा Angal पडला , त्याने प्रथम ईमारतीचा ग्लास फोडला व उभ्या असलेल्या बसमधील ड्रायव्हर/क्लिनरपैकी क्लीनरच्या डोक्यावरच पडला , त्यालातांतडीने दवाखान्यात नेले,तेथे १३ टाके घालावे लागले . असे मला मकरंदने फोनवरून सांगितले .

दि .६-१० – २०१२ :- शनिवार , नासा , ह्युस्टन भेट .
आनंदने ह्युस्टनला Spring Hills Suits Hotel माझ्या – Sr. Citizen च्या नांवावर Internet वरूनच Book केले .त्यामुळे चांगला Discount मिळाला . आनंद – पूर्णिमा सकाळीच ८-३० ला घरून निघालो . त्यांनी मोठी Car भाड्याने सांगितली होती ,त्यात Gas भरून घेतला . डलास -ह्युस्टन ६०० मैलाचे अंतर आहे . रस्त्यात एका ठिकाणी नाश्ता केला .
दुपारी १ वाजता हॉटेलवर पोहोचलो . काऊंटर मनला Online आरक्षण दाखविल्यावर त्याने दिलेल्या 511 Suit मध्ये पोहोचलो . सर्वजण फ्रेश झाल्यावर , घरूनच आणलेले पाणी , धपाटे , लोणचे , चटण्या ,कांदे ….इ .चा छान Lunch केला . त्यानंतर सगळ्यांनी तीन तास मस्तपैकी झोप घेतली . नंतर चार वाजता कारने एक तास अंतरावरील Sea -Beach वर पोहोचलो . तेथे वेगवेगळ्या Rides होत्या . आम्ही सर्वप्रथम स्वत:भोवती फिरतफिरत वरवर जाणार्या कांचेच्या बंद कँपसुल Ride ची निवड केली . वरवर जात असतांना आजुबाजूच्या विविध प्रकारच्या Rides चे दर्शन होत होते . तसेच बाजूच्याच समुद्रातील छोट्या छोट्या Rides ही दिसत होत्या . एकंदरीत अत्यंत नयनरम्य द्दृश्ये पाहात पाहात आम्ही कांचेच्या बंद कँपसुलमधून खाली आलो . आम्ही त्यानंतर Beach-Rail Train Ride मध्ये सर्वजण बसलो. ह्या Ride मधून आजूबाजूच्या बहुतांश Rides ची कल्पना येत होती . ह्या Train Ride मधून सफर करता करता मार्गातील बोगद्यातून आम्ही जात अचानकपणे गाडीतील प्रवाशांना गोळीबाराचे ,बॉंब तसेच पिस्तुलाच्या गोळीबाराचे आवाज ऐकू आले .सर्वजण खूपच घाबरले होते . थोडे अंतर पार केल्यावर ह्या आवाजांचे मुळ Train च्या आजूबाजूच्या पुतळारूपी हल्लेखोरांच्या गोळीबारात होते , हे अनाऊन्सरने वेळोवेळी सांगीतले .ही Train Ride कधी संपली हे कळले नाही . आता रात्रीचे ८-३० वाजले होते .
तेव्हड्यात पूर्णिमाच्या ह्युस्टनमधील दोन मैत्रिणिंचे फोन आले . त्यांनी तेथील Maharaja Bhog Restaurarant मध्ये Dinner चे आमंत्रण दिले . आम्ही रात्री ९-३० ला त्यांनी सांगीतलेल्या हॉटेलमध्ये पोहोचलो . तेथे पूर्णिमाच्या मैत्रिणीं सहकुटुंब उपस्थित होत्या .
Maharaja Bhog Restaurant हे भारतीय पद्धतीचे गुजराथी थाली हॉटेल होते . अगोदरच आरक्षण केलेले असल्याने लगेच आम्ही सगळे आत जाऊन स्थानापन्न् झालो .तेथील सगळे वेटर्स शाही पोषाखात सेवेला हजर होते. त्यांतील दोन वेटर्स पूर्वीच्या राजे महाराजांच्या सेवेत असत तशा प्रकारे जेवणाअगोदर हात धुण्यासाठी छिद्रा-छिद्राचे भांडे व ऊन ऊन पाण्याची झारी हातात घेऊन ऊभे होते.हात धुतल्यावर टॉवेलन् हात कोरडे केले . समोरच्या गुजराथी थालीत शाही वेषातील वेटर्सनी एकामागोमाग ५-६ भाज्यांच्या वाट्या, ३-४ वेगवेगळ्या आंबट -गोड चटण्या ,दहिवडा , पँटीस , बासुंदी , कढी , वरण -भात-साजूक तुपाची धार , पुरी /फुलके …इ .चे ऊत्कृष्ट भरपेट जेवणं झाली . त्यानंतर अमेरिकेत सहसा न मिळणारा त्रयोदशगुणी पानाचा विडा खाल्ला .तो चघळत चघळत आम्ही हॉटेलवर पोहोचलो ,अत्यंत समाधानी मनाने झोपलो .
७ आक्टोबर २०१४ :-मिनाक्षी टेंपल ,ह्युस्टन .
सकाळी लवकर ऊठलो .फ्रेश होऊन नाश्ता घेण्यासाठी मी व निर्मला तळमजल्यावर लिफ्ट समोरच्या खोलीत पोहोचलो . पँन-केक, ब्रेड, कॉफी,मध , केळी ,सफरचंद……इ . फळफळीवळेचा आस्वाद घेतला .थोड्याच वेळात आनंद ,पूर्णिमा व अद्वैतही खाली नाश्ता करायला आले . आम्ही सर्वांनी नाश्ता केला .पुन्हा ५११ सुट मध्ये जाऊन सगळे सामान एकत्र केले ,बँगा भरल्या .खाली जाऊन गाडीच्या डिक्कित बँगा ठेवल्या .काऊंटरवर जाऊन Check Out केले . सर्व जण गाडीत बसलो नी मिनाक्षी टेंपलकडे प्रयाण केले . आनंद व पूर्णिमा दोघेही ह्युस्टनला १-२ वर्षे नोकरी निमित्ताने होते .त्यामुळे मिनाक्षी टेंपलला पोहोचण्यासाठी कोणताही त्रास झाला नाही .
हे मंदिर दक्षिण भारतातील मदुराई येथील मिनाक्षी मंदिराचीच प्रतिकृति आहे . येथे महागणपति मंदीर , मिनाक्षी , शंकर ,पार्वती ,अय्यप्पा …इ .च्या सुरेख व कोरीव मुर्त्या असलेली सुंदर मंदीरे आहेत . त्यांतील जागृत दवी / दैवतांचे दर्शन घेतल्याने सगळ्यांची मने प्रसन्न झाली . आरती झाल्यानंतर तीर्थ-प्रसाद घेतला. त्यानंतर तेथीलच कँटिन मध्ये जाऊन ईडली- वडा ,सांबार ,लोणचे चटणीआणि एक गोड पदार्थ घेऊन भरपेट नाश्ता केला . बाजूच्या महागणपती मंदिरांत प्रथमच Lemon Lamp पाहिले . एकंदरीत मिनाक्षी मंदिर व परिसर पाहून सर्वांची मने खूप प्रसन्न झाली . आता दिड तास अंतरावर असलेल्या नाविन्यपूर्ण Nasa पाहण्यासाठी निघालो .
NASA :-
नासा हे दक्षिण अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ह्युस्टन येथे समुद्र किनार्यावरील Jonson Space Centre आहे . विस्तिर्ण जागेत ह्याची ऊभारणी करण्यांत आली आहे . येथे ११ आकर्षक ठिकाणे आहेत .
(१ ) माहिती ( Information Centre ) , १५ मिनिटे .
( २ ) Starship Gallary , ४५ मिनिटे .
(३ )Blast Off , ३० मिनिटे .
(४ )NASA Tram Tour , ९० मिनिटे .
( ५ )Zero -G dinner , १५ मिनिटे .
( ६ ) Space Centre Theatre , ६० मिनिटे .
( ७ )Living In Space , २५मिनिटे .
( ८ )Flight Stimulated , ६० मिनिटे .
( ९ )Space Centre Plaza , ६० मिनिटे .
(१०)Kid’s Space Place , ३० मिनिटे .
(११)Mission To Mars , ३० मिनिटे .
उपरोक्त सर्व ठिकाणे पाहण्यासाठी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजे पर्यंतचा वेळही कमी पडतो .
आम्ही सर्वजण नासाला पोहोचलो तोपावेतो दुपारचे १.३० वाजले होते . त्यामुळे
आम्ही काही निवडक ठिकाणी जाण्याचे ठरविले . माहिती केन्द्रातून माहिती घेतली . एकंदरीत आम्हाला मुंबईच्या वरळीच्या नेहरू सायंन्स सेंटरची प्रकर्षाने आठवण झाली .
(१ ) सर्वप्रथम आम्ही निवड केली Starship Gallary ची , एकूण ४५ मिनिटांचा हा भाग जगातील Largest Display Of Moon – Rocks आहे . अमेरिकन पहिला अंतराळवीर श्री .नील आर्मस्ट्रॉंग चांद्रयानातून चंद्रावर उतरला होता . तेथे त्याने चंद्रावरील माती,तसेच विविध खडकांचे नमुने जमा करून ,परत येतांना आणले .त्याचेच संपूर्ण प्रदर्शन आकर्षक पद्धतिने येथे मांडलेले आहे . चंद्रावरून आणलेल्या मातीचे ,लहान मोठ्या खडकांचे रासायनिक विश्लेषण तसेच पृथ्वीशी तुलना करून त्याची माहिती तेथे आहे . ह्या आणलेल्या मातीला ,खडकांना आपल्याला प्रत्यक्ष स्पर्श करण्याची परवानगी आहे . चंद्रावरून पृथ्वी निळसर रंगाची दिसते असे निरिक्षणही नील आर्मस्ट्रॉंगने नोंदविले आहे .
त्यानंतर आम्ही Blast Off Theatre मध्ये प्रवेश घेतला .एकंदर ३० मिनिटांच्या ह्या भागांत रॉकेट प्रक्षेपणाचा प्रत्यक्ष अनुभव आपण घेतो . त्यावेळी आपण 7 Millions Pounds चा धक्का तसेच 4.5 Millions Pounds चा Vehicle Skyward दाब अनुभवतो .त्यवेाळी उठलेल्या प्रचंड धुर -धुराळ्यामध्ये आपण थियेटरमध्ये हरवून जातो .
तद्वतच चंन्द्रावर चांद्रयान कसे उतरले ? चान्द्रयानातून अंतराळवीर चंद्रभूमी वर कसे उतरले ? अंतराळवीर बाहेर पडल्यावर चंद्राच्या पृष्ठभूमिवर सोबतच्या छोट्या यानातून फिरतांना तेथूल मातीचे/ लहानमोठ्या खडकांचे विविध नमुने कसे गोळा केले ? ते नमुने सोबत घेऊन छोटे यान चांद्रयानाशी पुन: कसे जोडले गेले ? तेथून परत पृथ्वीवरकसे उतरले ? ह्या सगळ्या गोष्टी समोर प्रत्यक्ष घडतांना आम्ही जणू काही अद्दश्यपणे चंद्रभूमिवरच हजर आहोत ,अस् वाटत होते .
ह्यानंतर NASA ची आतापर्यंतची व भविष्यातील Missions ,Explorations ची माहिती चलचित्राद्वारे दाखविली गेली . त्यानंतर अमेरिकेने आत्ता मंगळावर पाठविलेले Curiosity – Rover यान तेथे कसे उतरले ? तेथे हे Curiocity- Rover यान कशाकशाचा शोध घेणार आहे ? मंगळावर जीव सृष्टी आहे किंवा कसे ? तेथे पाण्याच्या प्रवाहामुळे दगड गोटे जसे दिसतात तसे असल्याने ,मंगळावर पूर्वी पाणी-प्रवाह असल्याचा पुरावाच मिळाला आहे .
अशा प्रकारची विविध माहिती समोरच्या पडद्यावर समजाऊन सांगूतली जात होती .
(३) NASA Tram Tour चा ९० मिनिटांचा आनंद घेण्यासाठी तिकीटे काढून Tram मध्ये बसलो . त्या ट्रामच्या १० डब्या-मिळून एकूण ७० व्यक्ति NASA ‘s JONSON SPACE CENTER ला फेरफटका मारण्यासाठी निघालो . प्रथम नासामध्ये Rocket प्रत्यक्ष बनवितांना त्यासाठी लागणारे विविध पार्टस् Spain आदी देशांत तसेच अमेरिकेतील विविध कँलिफोर्नियादी प्रदेशातही बनवून NASA ला पाठविले जातात .NASA मध्ये हे सगळे पार्टस् एकत्रित करण्याचे काम केले जातात . प्रत्येक भागाचे Experts त्यांच्या मदतनिसांकडून संपूर्ण Rocket तयार होते . येथेच अंतराळवीरांना विविध प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते .
अंतराळातून विविध ग्रहावरून परत आणलेले विविध प्रकारचे Rockets येथे प्रदर्शनासाठी ठेवलेले आहेत .
(४)Living In Space :- २५ मिनिटांच्या ह्या भागात रॉकेट – कँपसूलमध्ये प्रत्यक्ष जाऊन अंतराळवीरांची दिनचर्या कशी असते हे अनुभवता येते . तेथे सकाळी उठल्यावर शून्य गुरूत्वाकर्षणात स्नानादी प्रा:तकर्मे आटोपून
निरनिराळी कामे , जेवण , विश्रांती , संशोधनादी कामे कशी करतात हयाचा प्रत्याक्षानुभव घेतला .
ह्यानंतर ईतर भागांत जाऊन तेथील माहिती घेतली .विविध भागांतवेगवेगळे फोटोही काढले . तेथे D.V. D. ही मिळाली .
Kid’s भागांत जाऊन अद्वैत अंतराळवीक पोषाखात कसा दिसतो हे पाहिले .आम्ही सर्वांनीही त्या पोषाखात कसे वाटते हे अनुभवले . विविध ग्रहांवर आपापले वजन किती ? ह्याचा स्वानुभव घेतला . अमेरिकेत F.P. S. पद्धतीचा वापर होत असल्याने वजन पौंडात समजले .
सायंकाळी ६ वाजता NASA बंद होते .आम्ही सगळ्यांनी नाशिती घेतला .आणि परतीच्या प्रवासाला सुरवात केली . जवळजवळ ६ तासांच्या प्रवासांत पुन: नाश्ता , चहा ,कॉफी ,कोल्ड ड्रिंक्स घेतले .रात्री ११.४५ वाजता डलास प्लँनोला घरी पोहोचलो .
Annual Meeting Day In School १२-१०-२०१२ :- अद्वैतच्या आल्फा मॉन्टेसरी शाळेत आज Annual Meeting Day होता .त्यासाठी अद्वैतला नवीन Astrounut चा पोषाख आणला . नवीन Dress टायसह आणला तसेच Super -Man चाही ड्रेस आणला . अद्वैत कधी Astronaut
Engineer तर कधी Superman चा ड्रेस घालून खेळायचा . त्याच्या शाळेत आता स्पँनिश भाषाही शिकविणार आहेत .
१३ आक्टोबर २०१२ :-
मागील आठवड्यापासून पूर्णिमाचे Work From Home सुरू होते . तिने तिचे कंपनीचे काम विहित वेळेच्या आंत ऊत्तम रितीने पार पाडल्यामुळे मँनेजर कडून अभिनंदनाचा Message आला होता . त्यासाठी तिने सगळ्यांना ‘ फन एशिया ‘ चित्रपट गृहात English Vinglish हा चित्रपट सायंकाळी ६ ते ९.३० दाखविण्याचे मान्य केले . त्याप्रमाणे आम्ही सर्वजण ‘ फन एशिया ‘ चित्रपट गृहाला पोहोचलो .
ह्यांत श्रीदेवीचा मुख्य Roll आहे .चित्रपटांत तिचे नांव आहे ”शशी ”. पती व दोन मुले अशा तिच्या चौकोनी कुटुंबात सर्वजण गुण्या गोविंदाने राहात असतात. शशी चांगली गृहिणी आहे , ती ऊत्कृष्ट बुंदिचे लाडू तयार करून ऑर्डरप्रमाणे पुरविण्याचे काम करीत असते . शशीला पती व मुलांसारखे फाडफाड ईंग्रजी सफाईदारपणे बोलता येत नाही . तिला घरातील कोणीही समजून घेत नाही ,ऊलट नेहमी हेटाळणीच्या सुरांत बोलतात /बघतात . कोणीही तिला Respectfully वागणूक देत नाही .तिची मोठी बहिण ‘ मनू ‘ पति-निधनानंतर तिच्या २ मुलींना घेऊन अमेरिकेतच न्यु स्थायिक होऊन पतीचाच Business करीत असते . तिच्या मोठ्या मुलीच्या ‘राधाच्या ‘ लग्नानिमित्ताने ती शशी व तिच्या कुटुंबियांना अमेरिकेत येण्याचे आमंत्रण देते . परंतू शशीच्या पतीला कार्यालयीन कामामुळे तर मुलांच्या परिक्षेमुळे अमेरिकेत लवकर जाणे शक्य नसल्याने ,शेवटी शशीने एकटीनेच अमेरिकेत जावे असे सर्वानुमते ठरते . शशी तसे तिच्या मोठ्या बहिणीला ‘मनूला व राधाला ‘ कळविते . सासु ,पति व मुले लग्नाच्या वेळी अमेरिकेत हजर राहण्याचे कबूल करतात .
शशी विमानाने अमेरिकेत जायला निघते . शशीच्या मनांत ‘ मला ईंग्रजी चांगले बोलता येत नाही ‘ हा न्यूनगंड असतो .आता प्रवासांत व अमेरिकेत सगळे चांगले ईंग्रजी बोलतील ,तेव्हां मी काय करू ? कसे काय बोलू ? असे अनेक प्रश्न शशीला पडतात . विमानांत तिच्यासोबतचा सहप्रवासी “अभिताब बच्चन ” तिला धीर देतो , चांगले ईंग्रजी येत नाही म्हणून घाबरायचे नाही . इतरांसोबत जमेल तसे ईंग्रजी बिनधास्त बोलायचे . अमेरिकेतील लोकांना भारतांतील लोकांसारखे सफाईदार हिंदी कुठे बोलता येते ? ते भारतात आल्यावर जमेल तसे मोडके तोडके हिंदी न घाबरता बोलतातच ना ! आपण त्यांना कमी लेखत नाही . शशी विमान तळाबाहेर येते . तिला घ्यायला तिची मोठी बहिण मनू आणि राधा आलेली असते . न्युयॉर्कला घरी जातांना एका बसवरील जाहिरातीतील ”Learn English In 4 Weeks Only ” हे वाक्य ती लक्षात ठेवते .घरी गेल्यावर ती जाहिरातीतील फोन क्रमांकावर फोन करून पत्ता लिहून घेते . दुसर्याच दिवशी बाजारांत जातांना गुपचुपपणे 400 $ फी भरून ईंग्रजी वर्गात प्रवेश घेते . दररोज दुपारी बाजारात जाण्याचे निमित्त करून English क्लासला जाते . तेथे तिला डेव्हिड सर हे क्लासचे मुख्य तसेच इतर पाकिस्तानी ,फ्रेंच ,मल्याळम् असे ८-१० वर्गमित्र , विविध व्यवसाय सांभाळून ईंग्रजी शिकायला येत असतात . ह्या सगळ्यांशी तिची मैत्री होते . एके दिवशी Coffee-Day मध्ये कॉफी व सँडविचची Order देतांना ईंग्रजीत बोलतांना अडखळते , घाबरते , चिल्लर नाणी खाली पडतात . Self Service कॉफी व सँडविच नेतांना दुसर्या व्यक्तिचा धक्का लागून सगळे खाली सांडते .शशी रडवेली होऊन बाहेर पडते . केवळ चांगले ईंग्रजी बोलता न आल्यानेच ही फजिती झाली अले तिला वाटते . तिचा फ्रेंच -कुक वर्गमित्र तिला धीर देतो . पुन: कॉफी ,सँडविच घ्यायला Coffee Day मध्ये घेऊन जातो . शशीची ईंग्लिश क्लासमधील प्रगती चांगली सुरू असते .
शशीचा पति , २ मुले आणि सासुबाई Surprise देण्यासाठी ठरलेल्या वेळेआधीच लग्नासाठी न्युयॉर्कला येऊन पोहोचतात . शशीच्या ईंग्लिश क्लासबाबतची माहिती राधाला माहिती असते .ती तिला अप्रत्यक्षपणे मदतही करित असते . न्युयॉर्क -एम्पायर ईस्टेट बिल्डिंग पाहायला जायचे सर्वजण ठरवितात .शशीचा English Class त्याचवेळी असते ,शशी पाय दुखण्याचे निमित्त करून मागे मागे राहाते ,तिची व कुटुंबियांची चुकामुक होते .शशीला ती ईंग्लिश शिकत आहे ही गोष्ट सर्वांपासून लपवायची असते .शशी English class ला जाते . त्याचवेळी ईंग्रजीची फायनल परिक्षा जाहिर होते .त्याचवेळी घरी राधाच्या लग्नाची तयारी जोरात सुरू झालेली असते .आता काय करावे ? कसे करावे ? अशा संभ्रमात शशी गोंधळून जाते .
लग्नात बुंदिचे लाडू शशीच्याच हातचे बनविलेले सर्वांना हवे असतात . बनविलेले लाडू बाहेर आणतांना दरवाज्यातच मुलाचा धक्का लागून सगळे लाडू खाली पडतांत . शशी पुन: लाडू बनविते .
राधाच्या लग्नाच्या ( Wedding ) दिवशीच ईंग्लिश क्लासमध्ये शशीला Final Test असल्याचे कळते . ती तिच्या वर्गमित्रांना आणि डेव्हिड सरांना राधाच्या लग्नाला येण्याचे निमंत्रण द्यायला जाते ,त्यावेळी तिला काय करावे सुचत नाही . तेथे तिला 5 Minutes Speech in English द्यावयाचे होते.अमेरिकेतही शशीला चांगले ईंग्रजी बोलता येत नसल्याने तिचे पति व मुले Respect देत नाहीत . लग्नात सगळ्या पाहुण्यांना शशीने बनविलेले बुंदीच्या लाडूंची Gift अतिशय आवडतीत . त्यामुळे सर्वजण तिची स्तुति करतात .
लग्न झाल्यावर नवरदेव नवरीला पुढील आयुष्यासाठी राधाची आई , शशूचा पति,व घरचे English मध्ये शुभेच्छा देतात . शशीलाही शुभेच्छा देण्यासाठी आग्रह होतो .परंतु शशीचा पति तिला Good English बोलता येत नाही ह् सांगण्यासाठी ऊठतो . त्याचवेळी शशी पतिला अस्खलित /सफाईदार English मध्ये May I Speak म्हणून थांबवित शुभेच्छापर छोटेसे Speech देते . ऊपस्थित सर्वजण आणि शशीचे पति ,मुले सुुद्धा आश्चर्यचकीत होतात . शशीचे मनापासून टाळ्या वाजवून अभिनंदन करतात .
शशीच्या क्लासचे मुख्य डेव्हिडसर शशीचे विशेष अभिनंदन करतात ,कारण English Final Test मध्ये 5 Minutes पेक्षाही जास्त वेळ Speech शशीने दिल्याने ती Distinction मध्ये ऊत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र तिला देतात. शशी तिच्या वर्गमित्रांनी तिला Good English बोलण्यासाठी Self – Confidence मिळवून दिल्याने सर्वांचे आभार मानते .
आज चित्रपट गृह तुडुंब भरलेले होते .सर्वसाधारणपणे अमेरिकेत नेहमी २०-३० प्रेक्षकच चित्रपट पाहायला येतात . आजचा चित्रपट पाहणार्या प्रेक्षकांपैकी बहुतेकांना मला Good English बोलता येत नाही , असा न्युनगंड असणार्यांना पुन: Self Confidence मिळवून देणारा हा चित्रपट माझाच चित्रपट आहे अले वाटते .
आनंदने माझ्यासाठी Gugal Samsung Nexus Mobile , अगदी त्याच्याच मोबाईलसारखा ,आणला . सर्वांना अतिशय आवडला .
१२ आक्टोबर २०१२ रविवार :-
अमेरिकेतील डलास शहराच्या पंचागाप्रमाणे आज दुपार १२.५० पासून अमावस्या म्हणजेच सर्व- पितृमोक्ष अमावस्या आहे . मुंबईला ऐरोलीला प्रमोद पितरांसाठी तर्पण व अग्निघास टाकणार आहे . मला आज त्यासाठी ईंटरनेटवक आसाराम बापूंची सर्वपितृ अमावस्या पितरांसाठी तर्पण कसे करावे ह्या मंत्र व तर्पण विधीची माहिती देणारी You Tube मिळाली .
( १ ) त्यासाठी सोपा चार अक्षरी मंत्र खालीलप्रमाणे – ओम् र्हीं श्रीं क्लिं ! स्वधा देवयै स्वाहा:
(२ ) आवाहन : (१ ) सर्वपितृअमावस्येच्या दिवशी सर्व देव – देवता ,यक्ष ,किन्नर ,भूत ,पिशाच्च ,चिरपरिचित /अपरिचित व्यक्ति ,सर्व पितर ,पति – पत्नी दोघांच्याही नात्यातील ‘ कुळातील प्रपितामह , पितामह , पिता , पणजी , आजी , काका-काकी , मामा -मामी ……इ. मृतात्मे यांना तर्पणासाठी ,पिंडदानासाठी , प्रसन्नचित्ताने उपस्थित राहण्याचे आवाहन करायचे . त्यासाठी
दोन्ही हात एकमेकासमोर उभे करून धरायचे .
( ३ ) नैवेद्याच्या ताटात पोळी , शेंगाची भाजी ,कढी ,खीर ,वडे ,भजे ,सुकोडे ,वरण ,भात ,तूप…इ. वाढून सगळे पदार्थ एकत्र करून त्याचे ६+ ५पिंड अग्निघासासाठी तयार करायचे .
अशा रितीने आजचा सर्व पितृ मोक्ष अमावस्येचा दिवस शास्त्रोक्त रितीने पीर पडल्याने मनाला अत्यंत समाधान प्राप्त झाले .
डोंबिवलीला मकरंदने त्याला सांगितल्याप्रमाणे ऊपरोक्त पुजेच्या कार्यक्रमासाठी पितामह श्री .बळीरामजी (पणजोबा ), मातामह (लक्ष्मीबाई ) पणजी ,मोठे आजोबा (श्री .रामचंद्रपंत) ,तसेच आजोबा (श्री.वामनरावजी )हयांचे फोटो आम्हाला e – mail ने पाठविले होते .आनंदने त्या सगळ्या फोटोंच्या प्रिन्टस काढल्या . कार्डबोर्ड वर चिकटविल्या होते .ऊपरोक्त तर्पण विधिच्या वेळी समोरच सगळे फोटे लावलेले होते . नेहमीप्रमाणे फोटो स्वच्छ पुसून पांढरे गंध व पांढर्याच अक्षदा लाऊन हार घालून पूजन केले .नैवेद्य दाखऊन सगळ्यांनी साष्टांग नमस्कार केला .
ह्या दिवशी विशेष म्हणजे सौ. निर्मला दरवर्षी पितरांचा घास,नैवेद्य म्हणून पोळीला तूप लाऊन खिडकीत वा दरवाज्याबाहेर ठेवते ,त्या अगोदर एक कावळा येऊन काsव , काsव ओरडत असतो कावळा लगोलग ती पोळी खाऊन टाकतो . विक्रोळी ,डोंबिवली आणि आता अमेरिकेत डलासलाही कावळ्याने येऊन घास भक्षण केला .
आजच्या दिवशी आम्ही अग्निघास टाकल्यानंतर तोच नैवेद्य पत्रावळीवर वर गच्चीवर पितरांसाठी ठेवतो ,त्याभोवती पाणी फिरवून पितरांना आवाहन केल्याबरोबर कावळे येऊन नैवेद्य खातात . जणू कांही ते हयाच क्षणाची वाट पहात असतात . कधी कधी आजूबाजूला कावळे असूनही एकही कावळा पितरांसाठीचा पिंड खायला येत नाही .अशा वेळी पितरांच्या राहिलेल्या ईच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी घरातल्या कर्त्या व्यक्तिने बोलून दाखविल्यानंतरच कावळ्यांच्या रूपातील पितर पिंडाला स्पर्श करून तो खातो . कधी कधी अनेक कावळे येऊन पिंड भक्षण करतात . कांही लोकांच्या मते जगातील एकमेव सत्य सत्व हेच राहिले आहे .
१५ आक्टोबर २०१२ :-
आज सोमवार आठवड्याचा पहिला दिवस असल्याने अद्वैतला शाळेत जातांना सोबत त्याचे Bed नेणे आवश्यक असते . तसेच Hallow Weon पितर ,भूतपिशाच्चांसाठी पंधरवाडा सुरू होणारअसल्याने Pumpkin (गोल भोपळा ) व डोळे म्हणून Carrots पंधरवाडा सुरू होणार असल्याने प्रदर्शनासाठी Pumpkin व Carrot ही शाळेत न्यायच् होते . आज आनंद सकाळीच ५.३० ला विमानाने फ्लोरिडाला कंपनीच्या कामासाठी गेला . गुरूवारी परत येणार आहे .
१८आक्टोबर २०१२ गुरूवार :-
आज आनंदने फलोरिडाहून आल्याबरोबर विनायकी चतुर्थी असल्याने जवळच्याच देवीच्या मंदिरातील गणपतीला नेण्याचे कबूल केले . सौ.निर्मलाने त्याप्रमाणे पूर्णिमा , आनंद अद्वैतला शाळेत घेऊन गेल्यावर दुर्वा आणून निवडल्या व १११ दुर्वांचा हार तयार केला .सायंकाळी देवीच्या देवळांत पोहोचलो . ह्या देवळांत हिंदुमंदिराप्रमाणेच गणपती ,महालक्ष्मी ,हनुमान , देवी आणि साईबाबांच्या मोठ मोठ्या मनमोहक मूर्त्या आहेत . मंदिरांत ह्या देवतांचे दर्शन घेतांच मन प्रसन्न होते . येथे दक्षिण भारतीय पुजारी व भक्तगणांचाच वावर जास्त असतो .येथील
वैशिष्ठ्य म्हणजे येथे महालक्ष्मी स्तोत्र ,देवी स्तोत्र , अर्गला स्तोत्र ,शिव स्तोत्र ….इ. संस्कृतमधील स्तोत्रे तालसुरांत व शुद्ध व स्पष्ट ऊच्चारांत सामुहिकपणे स्त्री-पुरूष एकत्रित रित्या संथा म्हटल्यासारखे म्हणतात . सगळ्या वातावरणांत प्रसन्नता भरलेली असते . सौ.निर्मलाने १११ दुर्वांचा हार गणपतीला अर्पण केला .
२२आक्टोबर २०१२ डोंबिवलीचा नवरात्रीतील अष्टमी उत्सव :-
पुण्याहून प्रीति व सुनील खास अष्टमी पूजा उत्सवासाठी आलेले आहेत .एरोलीहून प्मोद -प्रिया येणार आहेत . ईटारसीहून चि. मुरलीधर ,सौ. अनुराधा व स्वाती अष्टमीच्या दिवशी सकाळीच येणार असल्याचाही दूरध्वनी आला . त्यामुळे सगळ्यांची मने आनंदून गेली . आम्हीही स्काईपवर अष्टमी पुजेसाठी हजर होतो . ति.गं. भा. आईसाहेबांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार अष्टमीला देवीची स्थापना ,धान बांधणे , फुलोरा लावला , भोनच्या प्रभाकर भाऊच्या लिखित सूचनांप्रमाणे क्रमाक्रमाने पूजेची तयारी केली व मंत्र म्हणून पूजा व आरत्या म्हणण्यांत आल्या . जेवणेही झाली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)