माझे गाव

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर श्री गजानन महाराजांमुळे शेगावला तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांची ही कर्मभूमि. रेल्वे स्थानकाजवळ संस्थानची विनामूल्य बस सेवा उपलब्ध आहे. असे म्हणतात की शिर्डीचे श्री संत साईबाबां संस्थान कोट्याधीश झाले आहे पण शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या शिकवणुकि प्रमाणे “धन संचय न कर्ता त्याचा विनियोग लोकोपयोगि कामासाठी करा”. संस्थेच्या विश्वस्तांनी ही शिकवण प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला आहे. भक्तांना राहाण्या साठी अनेक भक्तनिवास बांधलेले आहेत. संत गजानन महाराजांच्या समाधी दर्शना साठी दुमजली दर्शन बारि बांधली आहे. त्यामुळे ऊन वारा पाउस ह्याचा त्रास न होता कूलरची हवा घेत दर्शनाच्या रंगेत भक्त्गण पुढे सरकत असतात. भक्तांना पोथि, स्तोत्र पठ्णा साठी सभामन्डप आहे. मंदिर परीसर, सेवेकरि सतत स्वच्छ् ठेवण्यासाठि कार्यरत असतात.भक्तांना कोठेही दार्शनासाठी लाच द्यावी लागत नाही. व्रुद्धांना मुखदर्शनाची वेगळी सोय केलेली आहे. भक्तांसाठी महाप्रसाद  दुमजली -प्रासादात आहे. सकाळी अकरा ते एक ह्या वेळात स्थानिक / परीसरतील जनता तसेच बाहेर गावातुन आलेले हजारो भक्तगण तेथिल स्टेनलेस स्टील टेबल-स्टुलावर बसुन महप्रसादाचा लाभ घेतात. संस्थानचे अनेक प्रकल्प सुरू आहेत – आयुर्वेदिक, ऍलोपेथिक, होमीओपेथिक दवाखाना, किर्तन प्रशिक्षण, ईंजिनियरीग कॉलेज, बंगलोरचे गार्डन, त्यातिल कारंजे जे बंगलोरची आठवण करुन देतात…… इत्यादी. ह्या शिवाय बाळापुर रोड वरिल जवळ जवळ ३०० ते ४०० एकर परीसरात “आनंद सागर” हा मोठा प्रकल्प सुरु आहे.ह्याच्या बाजूला सर्व सोयीनीसह ८-१० भक्त निवास आहेत. ह्यात. अनेक सेवेकरी विना मोबद्ला काम करतात. संस्थानतर्फे त्यांना गणवेष, खाणेपीणे, वषातून दोनवेळा धान्य रूपाने मदत मिळते. अशा ह्या संतश्रेठ गजानन महाराजांच्या “संजीवनी समाधी” चे दर्शन घेवून आपण पूढील वाट्चाल करुया……. गावाकडं!