बान्द्रे विभाग ,बांद्रे कुर्ला कॉम्लेक्स , बांन्द्रे पूर्व ,मुंबई

माझ्या एक वर्षापूर्वीच्या विनंती अर्जाप्रमाणे माझी बदली बान्द्रे  विभाग , कार्यालयात करणेत आली . विक्रीकर आयुक्त ,कार्यालय , माझगांव मुंबई -१०  येथील कार्यासन अधिकारी ,आस्थापना  (५ ) च्या कार्यभारातून मुक्त होऊन , मी विक्रीकर उपायुक्त , प्रशासन , बान्द्रे  विभाग येथे पुढील नियुक्तिसाठी उपस्थित झालो .
मला दिलेला विक्रीकर अधिकारी वर्ग १ ( ) च्या कार्यभारात फक्त १२० धारिण्या होत्या . मला वार्षिक लक्ष्य २४० ‘ पी ‘ ज पूर्ण करण्याचे होते . मी सदर बाब माझ्या सहा . विक्रीकर आयुक्त , प्रशासन (१३ )तसेच विक्रीकर उपायुक्त ,प्रशासन ,बांद्रा विभाग ,बांन्द्रा (पूर्व) मुंबई ५१ ह्यांनाही पत्राने कळविली. त्यांनी माझ्याकडे काही धारिण्या स्थानांतरणाने पाठविल्या . श्री.खंबायत, विक्रीकर उपायुक्तांनी नवीन क्रमांकाच्या धारिण्या माझ्याकडे पाठविणेबाबत आदेश काढले. नवीन धारिण्यांचा ‘ पी ‘ लक्ष्यासाठी तीन वर्षेपर्यंत कोणताही उपयोग होणार नव्हता .उलटपक्षी त्या धारिण्यांची मासीक विवरणपत्रे , त्यांना ‘क’ /एफ/एच फॉर्म देण्यातच माझ्या कर्मचार्याचा जास्त वेळ जाणार होता .पण आता हे सगळे बिनतक्रार सांभाळणे आले .मी माझ्या कार्यभाराचे वेगळे नियंत्रण रजिस्टर तयार केले . त्यात धारिण्यांची संपूर्ण माहिती नाव/ पत्ता धंद्याच्या जागेचा ,घरचा , गोडाऊनचा /बँकांची नावे /फेान , खाते क्रमांकासह /धंद्याचा प्रकार मँन्युफँक्चरर ,आयातदार ,फेरविक्रेता /मालाचे विवरण ( Goods details )/विवरणे नियमित दाखल करतो किंवा कसे /निर्यातदार असेल तर त्याची माहिती /थकबाकीदार आहे काय ? / त्याची निर्धारणा कोणत्या कालावधीची प्रलंबित आहे ?त्याची कारणे /व्यापारी सापडत नसेल तर पोलीस सेल कडे प्रकरण कधी पाठविले ,त्याचा पाठपुरावा करण्यासाठी शेवटचे पत्र पाठविल्याचा दिनांक /व्यापार्याने निर्धारणा आदेशा विरोधात अपिल दाखल केले आहे काय ?/कोठे स.वि .आ. ,विक्रीकर उपायुक्त , न्यायाधिकरण ,हायकोर्ट , सुप्रिम कोर्ट /शेवटचा पाठपुरावा कधी करण्सात आला /प्रकरणांत अंमलबजावणी विभागाकडे प्रलंबित आहे ? त्याची प्रगति , विषेश टिप्पणीसह /व्यापार्याच्या सल्लागाराचे नांव ,फोन क्रमांक /लेखापरिक्षण, स.वि.आ.,वि.उपा.,तसेच S.T.R.A.,ची .आकडेवारी/.प्रलंबित मुद्दे /परिछ्येद/ प्रलंबित तपासणी अहवाल…ई. चा अंतर्भाव केलेला होता . आमचे सहाय्यक विक्रीकर आयुक्त /विक्रीकर उपायुक्त ,प्रशासन, ह्यांच्या दालनात होणार्या प्रत्येक मिटींगच्यावेळी हे रजिस्टर माझ्याजवळ असले की मी माझ्या विक्रीकर निरिक्षक वा लिपिकाच्या मदतीशिवाय विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊ शकत होतो .
मी सदैव मला दिलेले लक्ष्य पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होतो . कालांतराने माझ्याकडे मधून मधून दुसर्या विक्रीकर अधिकार्याचा अतिरिक्त कार्यभार विक्रीकर उपायुक्तांच्या आदेशाने दिला जात असे .त्याच्या परिणाम स्वरूप माझे निर्धारणा /वसुलीचे लक्ष्य गाठण्यास मदतच होत असे. मी विक्रीकर उपायुक्तांच्या निर्देशाप्रमाणे व्यापार्यांकडे भेटी देण्यासाठी , विक्रीकर थकबाकी वसुलीसाठी , विक्रीकर निरिक्षकांस सोबत घेऊन जात असे .
अतिरिक्त कार्यभारातील थकबाकी वसुलीची कामे , स,वि. आ.( प्रशासन ), विक्रीकर उपायुक्त, (प्रशासन) तसेच महालेखापाल यांच्या प्रलंबित लेखापरिक्षण मुद्दे ,आणि परिच्छेदांना स्पष्टिकरण देणे निर्धारणा आदेश दुरुस्त करणे , रिव्हाईज करणे वा पुनर्निर्धारणा आदेश काढणे ह्याकडेही लक्ष द्यावे लागत होते.
माझ्याकडील माझ्या आणि अतिरिक्त कार्यभारात ईतर धारिण्यांसोबत जवळ जवळ ३० बार तसेच होलसेलर्स/ भिवंडीच्या गोडावून मध्ये साठवणूक करून रिबॉटलींग करून टिचर्स ब्रँड ही प्रिमियम परदेशी बनावटीची व्हिस्कीची विक्री करणारा व्यापारीही होता . परिणाम स्वरूप विक्रीकर उपायुक्त अशा प्रकरणांत माझ्याशी विचार विनिमय करून प्रत्यक्ष भेटीसाठी विक्रीकर अधिकारी /विक्रीकर निरिक्षक ह्यांना सूचना देऊन पाठवीत असत .
S.T.R.A.च्या प्रलंबित परिच्छेदावर संबंधित सहाय्यक विक्रीकर आयुक्त, प्रशासन ,आणि विक्रीकर अधिकारी यांची एकत्रित मिटींग घेऊन विक्रीकर कायद्याखाली , कोणत्या नियमाखाली कलम ५७ ,कलम ३५ ,वा कलम ६२ खाली कार्यवाही करणे योग्य होईल ह्याचा निर्णय घेतला जात असे . प्रकरणात अपील दाखल झाले असल्यास तो परिच्छेद संबंधित अपीलेट अधिकार्याकडे पाठवून अपीलावर निर्णय घेतांना उपरोक्त परिच्छेद विचारांत घेणयांत यावा असे त्यांना पत्राने कळविण्याचे निर्देश विक्रीकर उपायुक्तांनी दिले जात असत . बांद्रा विभागाचे एकंदर वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी विभागातील सर्व विक्रीकर अधिकारी आणि विक्रीकर निरिक्षक ह्यांनी संयुक्त प्रयत्न कसे करावे , ह्याचा आढावा घेऊन योग्य ते निर्देश विक्रीकर उपायुक्त दरवर्षी शेवटच्या तिमाहीत देत असत .
माझ्याकडे विक्रीकर उपायुक्त , प्रशासन ,बांन्द्रा यांच्या आदेशाप्रमाणे एका प्रकरणांत विभागीय चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक झाली . एकूण ३ प्रकरणांत मला शासनातर्फे चौकशी करून अहवाल सादर करावयाचा होता . १)पहिल्या प्रकरणात विनापरवानगी वारंवार रजेवर जाणार्या कर्मचार्याचे होते . २)दुसरे प्रकरणात तो कर्मचारी मुंबईतील हवामान मानवत नाही असे सांगून औरंगाबाद विभागांत दुसर्या खात्यात नोकरी करणारा कर्मचारी होता. ३) तिसर्या प्रकरणांत विक्रीकर विभागात नोकरीला लागतांना चुकीची जन्म तारीख नमूद केल्याचे होते .
वरील प्रकरणांत प्रत्येक कर्मचार्याला त्यांची बाजू मांडण्यासाठी बाहेरील वकील
व्यक्तिची नेमणूक करण्याची मुभा होती .
शासनाने विविध खात्यांसाठी नियुक्त केलेले विभागीय अधिकारी कस्टम हाऊस ईमारतीतील कार्यालयात बसत असल्याने त्यांनी दिलेल्या तारखेस खात्याने नेमलेले चौकशी अधिकारी , संबंधित कर्मचारी ,त्याच्या वकीलांना घेऊन हजर. राहात असत . विभागीय चौकशी अधिकार्यांच्या प्रश्नांना संबंधित कर्मचारी वा त्याचे वकील ,खात्याचे चौकशी अधिकारी लेखी ऊत्तरे देतअसत .त्याची
नोंद विभागीय चौकशी अधिकारी त्यांच्या फाईल मध्ये घेत असत .दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर योग्य त्या दिल्यावर विभागीय चौकशी अधिकारी त्यांचा दोषी/ निर्दोषाचा निर्णय संबंधित खात्याच्या मुख्य अधिकार्याकडे पुढील योग्य त्या निर्णयासाठी पाठऊन देत असत.
माझ्याकडील उपरोक्त तीन कर्मचार्यापैकी पहिल्या दोन प्रकरणांतील कर्मचारी दोषी ठरले . तिसर्या प्रकरणांत मात्र संबंधित कर्मचारी निर्दोष ठरला . कारण तहसीलदार कार्यालयातील अभिलेख हाच पुरावा सेवा पुस्तकांतील नोंदीशी जुळत होता .
माझेकडे स्थानांतरीत झालेल्या धारिण्यांत महाराष्ट्र गृह निर्माण मंडळाची नवीनच धारीणी होती .त्याप्रकरणात माझ्या असे लक्षात आले की Works Contract Act 2005 खाली सदर प्रकरणांत महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाच्या मुंबई ,नाशीक ,नागपूर ,औरंगाबाद विभाग नोंदीत आहेत परंतू कंत्राट कराच्या रक्कमेचे हिशेब एकत्रितकरून नोंदीत दिनांकापासून (सुरवातीपासून )चा तपशीलाचा अंतर्भाव वसुलीत केल्यास वसुलीचे लक्ष पूर्ण करता येईल .ही बाब मी श्री.खंबायत साहेब, विक्रीकर उपायुक्त , प्रशासन ,बांद्रा (पू .) ह्यांचे निदर्शनास आणली . परिणामस्वरूप २००२-२००३ ह्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात एकंदर वसुलीत बांद्रा विभाग प्रथम क्रमांकावर आला . त्यांत महाराष्ट्र गृह निर्माण मंडळाच्या कंत्राटकराचा वाटा रू.१.४ कोटीचा होता . मी माझ्या आणि अतिरिक्त कार्यभाराच्या जुन्या वसुलीच्या संदर्भात ( १ )पत्ता /व्यापारी सापडत नाही , तसेच व्यापार्याची मालमत्ता नाही ,अशा प्रकरणात स्वत: विक्रीकर निरिक्षकांसह भेटी देत होतो .
M.L.R. C.महाराष्ट्र लँड रेव्हुन्यू कोड खाली चल , अचल संपत्ती जप्तीची कारवाई करण्या आधी नोटीस क्रमांक व्यापार्यावर नियमाप्रमाणे (Service) बजाविली आहे ह्याची खात्री केल्यावरच पुढील कारवाई करता येते . एका व्यापाराचा मुंबई व पुणे येथे पँकींग बॉक्सेस तयार करण्याचा मोठ्ठा धंदा होता.कंपनीच्या ४ भागीदारापैकी एकाचा कँन्सरने मृत्यु झाला . उरलेल्या तीन भागीदारांवर जप्तीची कारवाई करायची होती .त्यापैकी एका महिला भागीदाराची मालमत्ता गोरेगांव (प) ला होती . सदर महिला भागीदाराचा उच्च शिक्षित मुलगा एका मोठ्या कंपनीत जनरल मँनेजर होता .हा मुलगा त्या महिला भागीदाराच्या फ्लँटमध्ये राहायचा ,त्याच्या कँन्सरग्रस्त पत्नीसह तो राहात होता . मुलाला फोनवर संपर्क करून मी माझ्या विक्रीकर निरिक्षकांसह त्याच्या फ्लँटवर गेलो. आता घरातील टि .व्ही .,कपाटे ,टेबल ,सोफा सेट , फेामच्या खुर्च्या , इतर फर्निचर ……..इ . मालमत्तेवर ( टांच )जप्त केल्याच्या माझ्या सही -शिक्याच्या चिठ्या त्यावर लावण्याचे काम झाल्यावर त्याची यादीतयार करून जप्ती आदेश तयार करणेत आले .सदर आदेशाची प्रत मुलाला ( भागीदाराच्या ) ,गृहनिर्माण सोसायटीच्या सेक्रेटरीलाही देण्यात आल्या . ही सगळी कारवाई करतांना तेथील ऑक्सीजन लावलेल्या कँन्सरग्रस्त पत्नीला आवाजाचाही त्रास होणार नाही , ह्याची माणुसकीच्या द्द्ष्टीने काळजी घेण्यात आली .सदर भेटीच्या अहवालाची प्रत आमच्या सहाय्यक विक्रीकर आयुक्त ,प्रशासन तसेच विक्रीकर उपायुक्त ,प्रशासन, बांन्द्रा विभाग, बांन्द्रा ह्यांनाही देण्यात आली . सदर महिला भागीदार त्यावेळी पुणे येथे कँन्सरने आजारी होती . तिच्या मुलाने पुण्याला फोनवरून ह्या संपूर्ण करवाईची माहिती दिली .त्याने आमच्या टिमचे ,सदर कारवाई करतांना त्याच्या कँन्सरग्रस्त पत्नीली यत्किंतितही त्रास होऊ न देता पार पाडल्याबाबत आभार मानले . मी व्यक्तिश: त्याच्या अशा परिस्थतितही ( अप्रिय ) कारवाईत मनापासून शांतपणे सहकार्य केल्याबद्द्ल आभार मानले .
दुसर्या एका प्रकरणात वडीलांनी आपला मुंबईचा प्रिटींग प्रेसचा धंदा मोठ्या मुलाच्या हाती सोपवला . त्यानंतर ते मुलीकडे परदेशी गेले . परंतु दुसर्याच वर्षी त्यांना परत भारतात मुंबईला यावे लागले . कारण मुलाने खरेदीदारांची देणी मोठ्या प्रमाणात थकविली होती , तसेच विक्री केलेल्या मालाची रक्क्म वसूल करणेस असमर्थ ठरला .महानगरपालीकेने प्रिंटींग प्रेसची जागा सील लाऊन बंद केली व प्रिंटींग मशीन उचलून नेली . विक्रीकरादी सर्व कराचा भरणा प्रलंबित राहिला होता . वडीलांनी परत येताच संपूर्ण माहिती घेतली . विक्रीकराची सर्व थकबाकी एकत्र करून त्याचा भरणा करण्याची योजना सादर करणेचे कबूल केले . त्याची राहण्याची जागा व नवीनच सुरू केलेल्या धंद्याची जागा जप्तिचे आदेशाची अंमलबजावणी करणेसाठी मी खार ( प ) येथे माझ्या विक्रीकर निरिक्षकासह पोहोचचलो . तेथीच चल तसेच अचल मालमत्तेची यादी करून ती जप्त करणेत आली . त्यावेळी वडिलांनी स्वत:च्या मालकीची मालमत्ता विकून मुलाची विक्रीकर थकबाकी भरण्याची तयारी दाखविली . मी त्यांना त्यासाठी विक्रीकर उपायुक्त , प्रशासन , बांद्रा विभाग ह्यांना प्रत्यक्ष भेटून विक्रीकराच्या थकबाकी भरण्यासाठी हप्त्यांची सवलत घेण्यास सांगीतले . विक्रीकर उपायुक्त ,प्रशासन ,बांन्द्रा विभाग ह्यांनी काही विक्रीकर अधिकार्यांना फक्त निर्धारणेसाठी धारिण्यांची यादी करून पूर्व मंजुरी घेऊन माझ्कडे स्थानांतरीत करणेचे निर्देश दिले . सहाय्यक विक्रीकर आयुक्त (निर्धारणा ) ह्यांचेकडीलही काही धारिण्या फक्त निर्धारणेसाठी स्थानांतरीत केल्या. मी माझ्या पध्दतिने सर्व प्रकरणांत ६ महिन्यात निर्धारणा पूर्ण केल्या .
विक्रीकर उपायुक्तांच्या निर्देशाप्रमाणे नवीनच आलेल्या विक्रीकर निरिक्षकांसाठी प्रशिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते .त्यावेळी काही माजी विक्रीकर अधिकारी/सहाय्य्क विक्रीकर आयुक्त यांचीही मदत घेण्यात आली. मुंबई विक्रीकर कायदा तसेच केंद्रिय विक्रीकर कायदा खालील विविध नमुने,त्यांच्या अटी, त्यांची योग्य/अयोग्यता, विक्रीकर थकबाकी वसुली करतांना M. L. R. C.खाली कारवाई करतांना कोणकोणते नमुने आहेत .त्या अगोदर विक्रीकर कायद्याखाली कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे .केन्द्रिय विक्रीकर कायद्याखाली Resale /Form E-l/ E-ll वर विक्री कशी करतात .त्याच्या कोणत्या अटी/शर्ती आहेत . Export म्हणजे काय ? H फॉर्म वर Deemed Export Sale मान्य कसा करता येतो . Bombay High ला केलेली विक्री Export होतो काय ? Deemed Export कसा, केव्हां ? ताळमेळ पत्रक Balance Sheet म्हणजे काय ? ती कशी समजून वाचावी ? निर्धारणा करतांना कोण कोणते मुद्दे लक्षात ठेवावे लागतात ? अपील,न्यायाधिकरण , हायकोर्ट ,सुप्रीम कोर्टाचे विविध निर्णयाचा निर्धारणा करतांना कसा उपयोग करून घेता येतो . लेखा परिक्षण ( Audit ) कोणकोणते होते? स.वि .आ. /वि . उ . आ ./S.T.R.A. म्हणजे काय ? परिक्षण म्हणजे निर्धारणा करतांना झालेल्या चुका ,दोष शोधून काढणे .त्यासाठी मुंबई विक्रीकर कायदा कलम ६२ वा कलम ५७ किंवा कलम ३५ खाली कार्यवाही कधी करता येते ? …….ई.सोधाहरण समजाऊन सांगीतले .

एकदा मला बांद्रा ऑफीसमध्ये असतांना चि. मुरलीधरचा फोन आला . त्याने रडवेल्या आवाजात त्याच्या जळगांवला शिकत असलेल्या मुलाला ऊज्वलला काल संध्याकाळी सायकलवरून घरी परत जातांना ट्रकच्या उघड्या दरवाजाच जोरदार धडक बसून अपघात झाला व तो आता जळगांवलाच दवाखान्यात भरती केले आहे .मी जळगांवला माझ्या मावसभाऊ ,श्री .विजय तुळशीराम ठोसरकडे फोन करून चौकशी केली. तेव्हा मला चि . ऊज्वल अँडमीट असलेल्या दवाखान्याचे नांव कळले . मी तांतडीने विक्रोळीला घरी फोन करून सौ .निर्मलाला थोडक्यात सगळे सांगीतले व जळगांवला मिळेल त्या गाडीने जाण्यासाठी तयारी करण्यास सांगीतले . ऑफीसात मी माझ्या मित्रांकडून तात्पुरते उसने पैसे जमा केले . संध्याकाळी घरी जाऊन आम्ही दोघेही रेल्वेने रात्री ३ वाजता जळगांवला पोहोचलो .ऊज्वल I.C .U.मध्ये अँडमीट होता . चि.मुरलीधर ( दिपक )व सौ. अनुराधा . चि . कु . स्वाती , मोहनमामा , गोपालमामा सर्वजण जागीच होते . मी चि .मुरलीधरजवळ रूपये दहा हजार दिले .तेथे आम्ही दोघेही सर्वात मोठे होतो.त्यामुळे मी मुरलीधर, सौ. अनुराधा, स्वातीसह सर्वींना मानसिक धीर दिला .ऊज्वलला २-४ दिवसातच खूपच बरे वाटेल .आठवडा भरातच त्याला दवाखान्यातून घरी जाता येईल . कोणत्याही प्रकारची काळजी न करता ईश्वराकडे ह्याप्रसंगातून पार पडण्यासाठी बळ मागा.चि .मुरलीधरजवळ तेव्हढीच रक्कम वेळप्रसंगी लागल्यास ठेवावयास दिले . सुदैवाने तसेच डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे ऊज्वल Out of Danger असल्याने I.C.U. तून Recovery Room ला हलविण्यांत आले .विक्रोळीला घरी फक्त मकरंद, आनंद , प्रीति , प्रमोद व ति. गं .भा . आजीच होती . त्यामुळे सौ .निर्मलाला मुंबईला परत जाणे अत्यंत जरूरीचे होते . जळगांव रेल्वे-स्टेशनला जाऊन हावडा एक्सप्रेसने सौ .निर्मलाला अनारक्षित डब्यात बसऊन दिले . कल्याण स्टेशनला सकाळी सकाळी ३.३० ला पोहोचणार होती . नंतर ५.३० ला लोकलने विक्रोळीला जाता येणार होते . मी परत दवाखान्यात पोहोचलो . डॉक्टरांना भेटलो , ऊज्वलच्या प्रकृतिबाबत तौकशी केली .त्यांनी त्याच्या Speedy Recovery बाबत समाधान व्यक्त केले . दुसर्या दिवशी ६ डिसेंबर असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबईला जाणार्यांची तुफान गर्दी सर्व रेल्वे गाड्यांमध्ये असल्याने मी जळगांव ऐवजी बसने भुसावळला जाऊन गितांजलीने मुंबईला रात्री ११ वाजता विक्रोळीला पोहोचलो . चि .सौ . अनुराधा एक जगड्व्याळ नवस , ऊज्वलसाठी बोलली होती ,”ऊज्वल आजारातून बरा झाल्यावर त्याला पुढील एक वर्षभर कपडे आई,वडील, मामा शिवाय ईतर नातेवाईक करतील ”
दरम्यान मी मकरंद ,आनंद ,प्रीति , ऊज्वल व स्वातीच्या नांवे लहानपणीच Unit Trust of India च्या Children Growth Scheme मध्ये त्यांना त्यांच्या वयाच्या २१ व्या वर्षी प्रत्येकी रू . २१०००/- मिळतील अशी गुंतवणूक केली होती . ऊज्वलने जळगांवला शिकत असतांना मला रू .२०००/-
कँमेरा घेण्यासाठी मागीतले होते .त्याला २००३ मध्ये त्याच्या बँकेच्या खात्यात जमा होणार्या उपरोक्त रकमेपैकी मी सेवानिवृत्त झाल्यावर पेन्शनचे पैसे मिळेपर्यंत थोडे पैसे देण्यास चि.मुरलीधरला कळविले. त्याने क्षणाचाहि विलंब न लावता ”तुम्हाला त्यातील एक पैसाही मिळणार नसल्याचे फोनवरच सांगीतले.”
त्यानंतर ति .कु .स्वातिचे मँच्युरिटीते पैसे मिळण्यासाठी बँकेत खाते उघडण्यास सांगीतले.
कु .स्वातीचे युनिट ट्रस्टचे प्रमाणपत्र दिसत नव्हते , प्रमाणपत्र मँच्युरिटीच्या अगोदर युनिट ट्रस्टने त्या प्रमाणपत्राऐवजी बॉंड देण्याते कळविले .मुरलीधरला वाटले की माझेकडून ते प्रमाणपत्र हरविले ही गोष्ट खोटी आहे . ऊज्वल एम .बी. ए . ची तयारी करण्यासाठी मुंबईला १५-२० दिवसासाठी घरी आला होता त्यावेळी त्याचे कोणतेतरी जाड पुस्तक दिसत नव्हते ते शोधण्याचे निमित्त करून त्याने घरातील भिंतिवरील सगळ्या शेल्फमधील फायली बाहेर काढून संपूर्ण तपासणी केली .एके दिवशी त्याचे ते जाड पुस्तक मशीनमागे कोपर्यात सापडले .त्याचवेळी त्याची बँग कोणीतरी ब्लेडने कापून त्यातील रू. ५००/- ची नोट नेल्याचे त्याने सांगीतले . मी माझे ऑफीसचे काम करीत असतांना त्याने मला ही बाब सांगीतली . मी त्याला माझी ऑफीसची बँगही तपासायला सांगीतले. कदाचित माझ्या बँगेत ती रू ५००/- नोट आली असेल.
आता मला सेवानिवृत्तीचे वेध लागले.माझ्या सेवा पुस्तकातील सर्व नोंदी तपासून घेतल्या .वेतन पडताळणी पथकाकडे माझे सेवा पुस्तक तपासणीसाठी पाठविले .त्यांनी मला कधीकाळी वेतन जादा -प्रदान केले किंवा कसे .? साधारणत: दोन महीन्यात कोणताही दोष नाही ,सगळ्या नोंदी बरोबर आहेत.असे विक्रीकर उपायुक्त ,प्रशासन , बांन्द्रा विभागाकडून समजले . त्यानंतर सेवापुस्तक महालेखापाल १ ,मुंबई ह्यांनी गोरेगांव (पू ) येथे पाठविले . तेथून पेन्शनची गणना करून पेन्शन पेमेंट ऑरडरच्या प्रति पे अँड अकाउंटस् ऑफीसला , विक्रीकर उपायुक्त , प्रशासन ,बांद्रा विभागाला , संबंधित व्यक्तिला पाठविल्या जात होत्या . त्यासोबतच प्रॉव्हिडंड फंडाची व्याजासह फायनल पेमेंट ऑरडर , पेन्शन ग्रँच्युईटी पेमेंट ऑरडरच्याही प्रति पाठविल्या जात असत .त्यानंतर सहाय्य्क विक्रीकर आयुक्त ,प्रशासन त्या त्या व्यक्तिच्या खाती शिल्लक अर्जित रजेच्या पगाराचे बिल तयार करून ईतर बिलांसह पे अँड अकाउंटस कार्यालयाला पाठवित असत . आतापावेतो मी ईतर सहकार्यांचा निरोप समारंभाला हजर राहायचो .माझी शासकीय सेवा पुस्तकांत नोंदलेली माझी जन्म तारीख १ -६ -१९४५ अशी होती .त्याप्रमाणे मला दिनांक १ जुन २००३ रोजी वयाची ५८ वर्षे पूर्ण होणार होती .मला दिनांक १ जुन २००३ रोजीच नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त व्हायचे होते . आता मला माझ्याच निरोप संमारंभाला दिनांक ३१-५- २००३ ला हजर राहण्याचे निमंत्रण देण्यात आले . श्री .नाईकसाहेब ,विक्रीकर उपायुक्त, प्रशासन, बांन्द्रा विभाग , ह्यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमचे सहाय्यक विक्रीकर आयुक्त ,प्रशासन ,स.वि.आ. (निर्धारणा ), सर्व सहकारी विक्रीकर अधिकारी , विक्रीकर निरिक्षक , लिपिक ,चपराशी वर्ग उपस्थित होते .क्रमाक्रमाने सहकार्यांनी माझ्याबद्दल माहिती व आठवणी सांगीतल्या. विक्रीकर उपायुक्तांनी माझ्याबद्दल सांगतांना आम्ही दोघे एकाच बँचचे विक्रीकर निरिक्षक होतो ,पुढे वयोमर्यादेत असल्याने विक्रीकर अधिकारी पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली आणि पुढील पदोन्नति क्रमाक्रमाने मिळाल्यानंतर आज विक्रीकर उपायुक्त पदावर आहे .श्री . लोणकर साहेबांनी सेवानिवृत्तीनंतर ह्या कार्यालयात काम असो नसो ह्या भागात आल्यावर न चुकता यावे ,त्यांचे सदोदित स्वागतच आहे . त्यांच्या अनुभवाचा आणि माहितीचा आम्हाला उपयोग करून घेता येईल .त्यांचा पुढील सेवानिवृत्तिचा काळ आरोग्य ,सुख व समाधानामुळे आनंदातच जाणार आहे . त्यांता लहाना मुलगा आनंद हा पृथ्वीवरील स्वर्ग असलेल्या स्वित्झरलंड येथे ईन्फोसिस ह्या प्रसिध्द कंपनीत सॉफ्टनेअर ईंजिनिअर आहे . त्यांनी तेथून परत आल्यावर आम्हाला खुर्चित बसल्या बसल्या स्वित्झरलंडची सफर घडवावी. आम्ही त्यासंधीची वाट पहात आहोत . आज ते त्यांच्या पत्नीसह उपस्थित आहेत . आम्हा सगळ्यांनी मिळून आणलेली ही प्रेमाची भेट त्यांनी स्विकारावी. नंतर मी सर्वांचे सहकार्याबद्द्ल आभार मानले . आम्ही सगळ्यांनी माझ्यातर्फे दिलेल्या सहभोजनाचा आनंद हसत खेळत घेतला.
त्यानंतर मला S. T . R .A . तर्फे दरवर्षी घेतल्या जाणार्या माझ्या चार्जच्या लेखा परिक्षणाच्या वेळी विक्रीकर कार्यालयात बोलाविले होते . एकूण १० लेखापरिक्षण परिच्छेदापैकी ८ परिच्छेदातील प्रकरणे P. D . P. झाले.त्यात झालेल्या महसूल हानी बाबत लोकलेखा समिती (Public Accounts Committee ) समोर अर्थ विभागाच्या मुख्यसचिवामार्फत विक्रीकर आयुक्तांना उपस्थित राहून परिच्छेदांतील महसूल हानीसाठी स्पष्टिकरण द्यावे लागते.त्याअगोदर संबंधित विक्रीकर अधिकारीकडून लेखी स्पष्टीकरण घेऊन विक्रीकर उपायुक्तामार्फत विक्रीकर आयुक्तांना पाठविणे आवश्यक होते. त्यानंतर विक्रीकर आयुक्त परिचछेद बंद करणेसाठी महालेखापालांकडे पाठवित असत . माझ्या सर्व १० परिच्छेदांतील प्रकरणांत माझी स्पष्टिकरणात्मक उत्तरे विक्रीकर उपायुक्तांच्या शिफारसीने पाठविली आणि सरतेशेवटी सर्व १० परिच्छेद बंद करणेतआले . माझ्या मित्रपरिवारातील श्री .नवरेसाहेब ,श्री .गुप्तासाहेब, श्री . राठोड साहेब ,श्री जलोटा साहेब ,श्री .मळवे साहेब तसेच श्री. नाईक ,विक्रीकर उपायुक्त , बांद्रा विभाग ,बांद्रा ह्या सगळ्यांनी मनापासून सहकार्य केले. त्यासाठी दोन वर्षाचा कालावधी लागला .