डलास व्हिजीट २०१४

आनंद डलासहून २८ मे २०१४ ला  सुटी काढून मुंबईला एकटाच आला . पूर्णिमा दोन महिन्याच्या छोट्या (बाळाला ) वेदांतला आणि पांच वर्षाच्या आदीला घेऊन अम्मासोबत , तिच्या आईसोबत केरळला ,प्रवीणच्या लग्नानिमित्ताने , येडाऊर केरळला एक महिना अगोदरच आलेली होती . आनंद मुंबई येथून २ जूनला कोचीनमार्गे जाणार आहे .तेथून चार (४) जून २०१४ ला मुलांसोबत  निघून , मुंबईला येणार आहे . आनंदला फक्त १५ दिवसच सुटी मिळाली आहे . १५ दिवस त्याला Work from home करावे लागणार आहे . प्रवीणचे लग्नाचे नक्की नाही असे समजते .
त्याला अकोला , उंद्री आणि चिखलीलाही जाऊन यायचे आहे . अकोल्याला दाबकी रोडवर हिंगणेकरमामांकडे आता फक्त चि . कु. मेघा ,चि.कु.बाबी ,चि. कु. राजू आणि विनयदादा असे फक्त चारच व्यक्ति राहतात .पूर्वीचे नांवालौकिक असलेले हिंगणेकरमामांचे कुटुंबातील एकामागोमाग श्री .मोठेमामा ,लहानमामा, सौ .मोठ्यामामी ,सौ .लहानमामी , यांचे वृध्दीपकाळाने व दीर्घ आजाराने निधन झाले . त्यानंतर चि.कु .कविताताई तसेच मागीलवर्षात आनंदच्याच वयाच्या चि.वेणुगोपाल. उर्फवबाळूचे अचानक निधन झाले. राहिलेल्यापैकी मोठ्या चि.कु.मेघाला पायाच्या त्रासामुळे तर सर्वात लहान चि. कु.राजू हात व पायाच्या वातासारख्या त्रासामुळे जवळजवळ अंथरूणाला खिळलेली आहे . चि .बाबीला उच्च रक्तदाब व डोळ्याचा रँटीनाचा त्रास आहे .घरातील एकमेव पुरूष सदस्य असलेल्या चि. विनयला सध्या नैराश्याने ग्रासलेले आहे असे वाटते . त्यांच्या घरांत सर्वजण पदवीधर होते / आहेत .पण कमावते मात्र कोणीही दिसत नाही . मेघा बी. ए. एम . एस . ( आयुर्वेद ) तर राजू डि. एच .एम.एस .(होमिओपँथी ) डॉक्टर आहे ,चि .बाबी बी .एस .सी. तर विनय पँथाँलाजी पदवीधर आहे .
त्यांचेकडे आनंदला धांवत पळत जाणे गरजेचेआहे .
त्यानंतर उंद्रीला आनंदचे मामा श्री.रमेशमामा , चि. अजय ,सौ.उज्वला तिचा लहान मुलगा व्यंकटेश व मुलगी दिपाली राहतात ,सौ.सुशीलामामींचे एप्रिल २०१४ मध्ये मेंदुतील कँन्सरच्या गांठी व अचानक आलेल्या हार्ट अटँकमुळे निधन झालेले असल्याने ,जाणे अत्यावश्यक आहे .
चिखलीच्या श्री.श्रीराम मामांचा चिखलीच्या तहसील कार्यालयांत नोकरी करणारा एकुलता एक कमावता मुलगा विजय ११ नोंहेंबर २०१३ ला नागपूरला दवाखान्यातच निधन पावला . घरी दुसरे कोणी कमावते नाही . नातु अभिजीतचे पुणे येथे सुरू असलेले ईंजिनिअरींग डिप्लोमाचे शिक्षण आता सुरू कसे ठेवायचे? स्वत:च्या पेन्शनवर घर कसे चालवायचे ? कै.विजयची पेन्शन कधी मंजूर होणार ? शासनाकडून जिल्हा परिषदेमार्फत मिळणारी प्रॉव्हिडंड फंड /शिल्लक रजेचा पगार /औषधोपचाराच्या खर्चाची नियमाप्रमाणे मिळणारी थकबाकी / कुटुंब पेन्शन / ग्रँच्युइटी ….ई. ची थकबाकी रक्कम कधी हातात मिळणार ? अशी प्रश्नांची मालीकाच ति. जनार्दन मामाकडे सद्यस्थितीत समोर उभी आहे . नातु अभिजित ( सोनु ) बुद्धिने तसा विचारी , अकाली प्रौढत्व आलेला तरूण मुलगा आहे .आता ह्यापुढे त्याच्यावरच संपू्र्ण कुटुुंबाची जबाबदारी असल्याची त्याला जाणीव आहे. अशाही परिस्थितीत त्याने तुर्तास १२वीची परिक्षा बहि:शाल देऊन ह्यावर्षी उत्तीर्ण केली आहे . वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर त्याली नोकरी मिळेल परंतु किमान ४-५ वर्षे लागतील ह्याचीही त्याला कल्पना आहे . ह्या कुटुंबाला चिखलीला प्रत्यक्ष भेटून त्या सगळ्यांना मानसिक आधार देणे अत्यंत आवश्यक आहे , ह्याची आनंदला जाणीव आहे .
अकोल्याला चि. सौ .ज्योतिताई उंबरकरचे सासरे श्री, उद्धवरावांची प्रकृति वय वर्षे ७६,वृद्ध झाले आहेत.त्यांचीही भेट घेणे जरूरीचे आहे सुशील व निखिल ही दोनही मुले उच्चशिक्षित असूनही अजूनही त्यांना जॉब मिळू शकला नाही . कु.आरतीही पदवीधर आहे . श्री. सत्यशील उंबरकर एम. एस .ई . बी. तून ज्युनिअर इंजिनिअरपदावरून एक वर्षापूर्वी निवृत्त झाले आहेत .घरांत वृद्ध वडिलांशिवाय दोन वृद्ध आत्यांचीही जबाबदारी त्यांचेवरच आहे . हे कुटुंब सध्या आदर्श कॉलनीत राहते .
येथून जवळच वर्धमाननगरमध्ये सौ. सुषमाताई (माई ) राहते .ती सध्या श्री.अनिलदादा अँग्रीकल्चर ऑफीसरसह राहते .तिची दोन मुले मनोज आणि निखिल पुण्याला आय. टी. ईंजिनिअर आहेत.मोठ्या मनोजचे लग्नाचे प्रयत्न सुरू आहेत.मनोजने पुण्याला घर बुक केले आहे . नजीकच्या भविष्यात घराचा ताबा मिळेल असे वाटते.आंनदला आईसह( सौ. निर्मला ) २ दिवसाच्या कालावधीत धांवत पळत
अकोला ,चिखली व उंद्री भेटीनंतर नंतर शेगांवला गजानन महाराजांचे मंदिरात समाधीचे दर्शन घेऊन परत संध्याकाळी डोंबिवलीला रेल्वेनेच जायचे आहे .
मुलांना मुंबईला घेऊन आल्यावर कदचित मकरंद ,सौ.मृणाल ,मृणमयी ,सुनी़लसोबत लोणावळ्यालाही चेंज म्हणून जाणार आहे . परत आल्यावर २८जुलै२०१४ला अमेरीकेतील डलासला (टेक्सासराज्य) जाणार आहे , त्यानंतर ३० जुलै २०१४ला मी आणि सौ . निर्मला डलासला किमान तीन महिन्याकरीता जाण्याचे ठरले आहे . आम्हा दोघांची तिकीटे उशीराने मिळाली ,अन्यथा आनंद सोबतच डलासला जाता आले असते . डलासला त्याने रिचवुड , फ्रिस्कोमध्ये मागील वर्षीच नवीन दुमजली मोठे घर बांधून घेतले आहे . त्याने नेाव्हेंबर २०१३ मध्ये गणेश पूजन करून ” गृहप्रवेश ” केला . त्यान त्या अगोदर प्लेनो – हेरिटेजमधून सर्व सामान आणले . आम्ही दोघे गेल्यावर ३१ ऑगस्ट २०१४ला वास्तु पूजेचे आयोजन केले आहे . त्यादिवशी तेथीलच गुरूजी येऊन वास्तु पूजन करऊन घेणार आहेत. .हा घरगुती कार्यक्रम असल्याने , त्याच्या तेथील मित्रमंडळींना बोलाविणार नाही , असे ठरविले आहे . अपवाद फक्त मियामी येथे राहणारा समीर बालंखे . समीर , ठाणे – मुंबईच्या ति . गं.भा . शशी ( बालंखे) मावशीचा मुलगा . तो वास्तुपूजनाच्या अगोदर एकटाच शुक्रवारी येणार आहे . रविवारला वास्तुपूजन झाल्यावर सोमवारी सकाळी परत मियामीला परत जाणार आहे . त्याची पत्नी व ८ वीत शिकणारी मुलगी सुटी नसल्यामुळे वास्तुपूजनाला येऊ शकणार नाहीत. समीर अमेरिकेत जवळजवळ २० वर्षापासून आहे . त्याची पत्नी तियानी इटालीयन आहे . त्यांची मने , एकत्र नोकरी करतांना ,जुळली आणि त्यांनी लव्ह मँरेज केले . लग्नाला अमेरिकेतील समीरच्या नात्यातील एकमेव व्यक्ति श्री.टांकसाळे हजर होते .

समीरची आई , बहिण मेघा व मेहुण यांना पासपोर्ट / व्हिसा अभावी अमेरिकेत येणे अशक्य होते .

मकरंदसोबत आम्ही दोघे सर्वांचा निरोप घेऊन ,टँक्सीने रात्री आठ वाजता डोंबिवलीहून निघून ११ वाजता विमानतळावर पोहोेचलो, नी पहातच राहिलो. मकरंदने see off केले अन् तो लगेच डोंबिवलीला परत गेला .

भारतांतात महाराष्ट्रातील अंधेरीचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आता अद्यावत, प्रशस्त व जागतिक दर्जाचे बनविण्यात आले आहे .आमचे विमानाचे तिकिट रात्री एक वाजता कतार एअरवेजने दोहामार्गे होते .दोहा येथे दोन तासाच्या

मुक्कामानंतर पुन: कतार एअरवेजच्याच विमानाने अमेरिकेतील टेक्सास राज्यातील डलासला जायचे होते .मुंबई ते दोहा तिन तासांचा विमान प्रवास आहे.