मुक्काम मेडशी

अकोला जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या आदेशाप्रमाणे माझी नियुक्ति मेडशी शाळेवर करणेत आली . त्याप्रमाणे मी मेडशी शाळेत रूजू झालो . तेथे मी सर्वात तरूण , अविवाहीत आणी सर्वात जास्त ( कॉलेज ) शिकलेला होतो . येथे मुख्याध्यापक , श्री. हाते गुरूजी , सर्वश्री . शिनगारे , पाठक , आझम , कांबळे ,
चिमणकर , गोसावी , काळे , भुस्कुटे , भोळे ,तसेच श्रीमती पाठक ,दिक्षीत ग…इ.खूपअनुुभवी शिक्षक वर्ग होता . मेडशी येथे प्राथमिक शाळेच्या समोर रोडच्या बाजुला श्री नागनाथ हायस्कुल ,जि. प. प्राथमिक कन्या शाळा हेोती . मेडशी शाळेची स्थापना १८६९ साली

वत्सगुल्म (आताचे वाशीम ) जिल्हा असतांना झाली होती .मेडशी शाळा पूर्वी शासकीय मुलोद्योग शाळा ह्या नांवाने होती . १९६२ पूर्वी अकोला जिल्ह्यात अशा सहा शाळा होत्या . तेथे कापसाच्या पेळूपासून टकळीवर सूत कातणे ,कापड तयार करणेच्या सगळ्या प्रक्रीया शिकविल्या जात.मेडशी येथे 1964 साली श्री . विनोबा भावे आले त्यावेळी त्यांचे स्वागत फुलांच्या हाराऐवजी सुताचा हार घालून करण्यात आले होते .अकोला जिल्हा परिषदेची १९६२ साली स्थापना झाली . त्यानंतर ह्या सर्व शासकीय शाळा जिल्हा परिषदेत विलीन करणेत आल्या . त्यावेळी सर्व कर्मचारी शासकीय सेवेतून जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले . शासकीय मुलोद्योग शाळेचे नांवआता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ,असे करणेत आले .
मेडशी येथे प्राथमिक शाळा सातव्या वर्गापर्यत होती . मेडशीचे दानशूर गांवकरी श्री. बाबुरावजी घुगे ह्यांनी प्राथमिक शाळेला लगतची शेत जमीन दान दिली होती. श्री . हाते गुरूजी पंचक्रोशीत अतिशय लोकप्रिय होते .
आपल्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकवर्ग तसेच इतर सर्व वर्ग ४ च्या कर्मचार्यांनाही
आदरार्थी बोलण्या वागण्याची सवय त्यांनी सर्वांना लावली होती . त्यांनी पंचक्रोशीतील गांवकर्यांकडून लोकवर्गणी जमा करून मेडशीला हायस्कूल सुरू केले . मेडशी हायस्कुलचे नांव ग्रामदैवत श्री नागनाथ (शंकराचे एक नांव ) हायस्कुल असे सर्वानुमते ठेवण्यात आले . हायस्कुलचा कर्मचारी वर्ग , प्राथमिक शाळा , तसेच कन्या शाळेचा कर्मचारी वर्ग , पोलीस कर्मचारी , गांवातील इतर शासकीय कर्मचारी ……इ . कोणत्याही सभारंभात जणू एकाच संस्थेचे कर्मचारी असल्यासारखे , आपुलकीने एकत्र येऊन कामे करीत .गांवातील कोणत्याही सामाजीक कार्यातही सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे विलक्षण कसब श्री . हाते गुरूजींकडे होते . त्यांचे नांवाची शिफारस जिल्हा परिषदेने ” आदर्श ” शिक्षकांसाठी केलेली होती . प्रत्येक दसरा ,दिवाळी व इतर महत्वाच्या दिवशी गावातील प्रतिष्ठीत व्यक्ति सर्व कर्मचार्यांना त्यांच्या घरी आदराने बोलावीत .श्री .हाते गुरूजी हायस्कुलच्या ,आमच्या वा कोणत्याही कर्मचार्यांना आदरार्थि’च बोलत . माझे वडीलही आमच्या शाळेत चपराशी (attendant grade l)होते.

मला मेडशी शाळेत नियुक्ती मिळाली नी माझ्या जीवनाला ,अगदी वेगळे वळण मिळाले . श्री .हाते गुरूजींनी माझेवर वर्ग ५_६ _७ च्या ‘अ ‘ आणी ‘ ब ‘ डिव्हीजनपैकी ‘ ब ‘ डिव्हीजनला इंग्रजी , गणित , सायंन्स हे विषय शिकवायची जबाबदारी माझेवर सोपविली . ह्याशिवाय शाळेचा पी. टी . आय . , स्काऊट टिचर , शाळेचा बँड , शाळेला लागूनच असलेले भाजी- शेतीचे वाफे , शाळेचे हिशेब , स्कॉलरशिपचे वर्ग ….इ.चीही जबाबदारी माझेवर सोपविली होती .

मला हे सगळे नवीनच होते . कोणतीही जबाबदारी प्रसन्नतेने पार पाडायची हे मी ठरविले . त्यासाठी मी माझ्या पध्दतिने नियोजन करण्याचे ठरविले . प्रथम वर्ग ७ साठी सकाळीच दोन जादा तास घेणे सुरू केले . रात्री प्रत्येक वार्डात एक एक गटप्रमुख नेमुन गटागटाने एकत्रित अभ्यास करण्याची सवय लावली . वर्ग ४ तसेच वर्ग ७ च्या विद्यार्थ्यासाठी दररोज सकाळीच ग्रामपंचायत कार्यालयात वीजेच्या दिव्यात विषेश वर्ग सुरू केले . १९६८ – ६९ साली वर्ग ४ च्या प्राथमिक शिष्यवृति परिक्षेत अकोला जिल्ह्यातून पहिल्या तीन क्रमांकात मेडशी शाळेचे दोन विद्यार्थी होते .

शाळेचा पी . टी . आय . म्हणून सर्वप्रथम प्रार्थनेसाठी प्रत्येक वर्गासाठी शाळेच्या प्रांगणात एका आडव्या रांगेत वर्गप्रमुखासाठी प्रत्येकी एक वीट जमिनीत पक्की केली . सकाळी प्रार्थनेच्या वेळी वर्ग -प्रमुखामागे वर्ग-शिक्षक व समोर त्या त्या वर्गाची मुले , मुली रांगेत उभ्या ऱाहत . एक प्रकारची वेगळी शिस्त शाळेतील विद्यार्थ्यांना लागली .आमच्या मुख्याध्यापकांना , सर्व शिक्षकांना तसेच गांवकर्यांना हा बदल खूप खूप भावला .

स्काउट शिक्षक प्रशिक्षण कापशी (तलाव) , अकोलासाठी माझी निवड झाली . सदर प्रशिक्षण दिनांक १० मार्च १९६९ ते २१ मार्च १९६९ ह्या कालावधीत होते . श्री . मु . ना .कुळकर्णी , जिल्हा स्काऊट प्रमुख , हे शिबीर प्रमुख होते . त्यांचे सोबत .श्री .ए . आर . खान जिल्हा सेक्रटेरी (स्काऊट )तसेच श्री . धाबलीया , स्काऊट प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले . प्रशिक्षणाच्या काळांत गुढी पाडवा सण सर्वांनी आनंदाने व मौजमजेत साजरा केला .सर्वांना विषेशत: नवनवीन मित्रांना कैरीचे पन्हे खूपच आवडले .

मेडशी सर्कलचे खेळ मेडशीलाच खेळविले जात असत . पंचायत समिती स्तरावरील सामने मालेगांवला झाल्यावर जिल्हा ऑलिंपीकसाठी अकोल्याला जावे लागायचे .मेडशी शाळेचे खेळाडू कुस्ती , खो खो , हॉलीबॉल ,हुतूतू ……इ. खेळांत जिल्हा ऑलींपिक मध्ये असायचे . चंदू गवळी , तसेच उदालाल हे दोन्ही खेळाडू कुस्तीमध्ये आणि खो खो चमू जिल्हा पदके दरवर्षी जिंकून आणत .

मोर्णा नदीच्या काठावर जंगलात ( डागेत ) ग्रामदैवत श्री .नागनाथाचे (महादेवाचे) मंदीर होते . महाशिवरात्रीचिया दिवशी तेथे जत्रा भरविली जायची . तसेच अकोला वाशीम रोडवर आमराईजवळ खंडोबाचे देऊळ होते . खंडोबाची जत्रा रथ सप्तमीच्या अगोदर अमावस्येला भरविली जायची . आजुबाजूच्या खेड्यातील लोक अतिशय उत्साहाने भाग घेत .

रथसप्तमीला मालेगांवजवळच्या डव्हा येथील श्री . नाथ नंगे महाराजांची मोठ्ठी यात्रा ७ दिवस (आठवडाभर) असायची . तेथे श्री . नाथ नंगे महाराजांचे शिष्य , श्री . विश्वनाथ महाराजांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तसेच श्री . पंडीत बाबा , गांवोगांवच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या सहकार्याने जवळजवळ चार महिने अगोदरपासून तयारी सुरू करायचे , प्रसादाच्या पुर्या , बुंदी , पत्रावळी अंदाजे चार ते पाच लाख लोकांना पुरतील इतक्या मोठया प्रमाणात तयार करून कोठिघरात साठवायचे काम सुरू असायचे . दरवर्षी पुरूष , महिला स्वेच्छेने व एकोप्याने ही कामे वाटून घेऊन झपाटल्यासारखे पूर्ण करीत असत.

जानेवारीमध्ये शेतीतील पिके नुकतीच काढून झालेली असतात. ह्याचा फायदा
घेऊन श्री. विश्वनाथ महाराजांनी श्री . नाथ नंगेमहाराजांच्या रथ सप्तमीच्या दरवर्षीच्या आठवडाभराच्या यात्रेची आखणी केलेली होती .यात्रा समितीने एकमताने त्याला संमती दिली होती .

मंदीराभोवतीच्या जवळजवळ १५ एकर शेतीत ट्रँक्टरने प्रत्येक ३० फुटावर सरळ लाईन्स नांगरल्या जात . महाप्रसादाच्या दिवशी सकाळपासूनच यात्रेला आडलेले लोक , प्रत्येक लाईनच्या दोन्ही बाजूस पाठीला पाठ लाऊन नंबर लाऊन बसत . प्रत्येक दोन लाईन्स मधून एकामागे एक अनुक्रमे पत्रावळी , पुरी , बुंदी घेतले ट्रक्स चालविले जात . ट्रकच्या दोन्ही बाजूला बसलेल्या लोकांना प्रसाद म्हणून प्रत्येकी ४ पुर्या आणि ओंजळभरून बुंदी प्रत्येकाला दिल्या जाई . त्याअगोदर श्री . विश्वनाथ महाराज स्वत: कोठीघरांत जाऊन अन्नपूर्णा देवीला पाणी फिरऊन नैवेद्य दाखवित . रांगेतील शेवटच्या व्यक्तिला प्रसाद मिळाल्याची खातरजमा
झाल्यावर उंच उभारलेल्या स्टेजवरून श्री . विश्वनाथ महाराज आणी इतर उपस्थित संत मंडळींकडून ” पुंडलीक वरदा हरि विठ्ठलाचा ” गजर झाल्यावरच सगळ्या जनताजनार्दनाला प्रसाद ग्रहण करण्याची तेथे प्रथा आहे . तळाशी नागाची समाधी त्यावर श्री .नाथ नंगे महाराजांची समाधी , त्यावर शंकराचे मंदिर ,सर्वात वर देवीचे दर्शन घेऊन बाजूलाच बिनखांबी मंदिरात ब्रम्हदेवाचे दर्शन घेऊन, विविध ठिकाणी जाऊन यात्रेची मौजमजा लुटायचेा . तमाशाचे फड ,तंबुची चित्रपटगृहे , मौतका कुवा . भांड्याची दुुकाने , प्रसाद ,रेवड्या , डाळ्या , कपडे ,
खेळण्यांची दुकाने …….इ .ना भेटी देऊन त्याचीही मजा घ्यायची बालगोपाळांना तर फार मेाठी सुसंधी असायची .अशा यात्रेत नवीन खेळणी , कपडे ,खाऊ ….इ मिळाल्याने बच्चे मंडळी आनंदून जातात .तरूण -तरूणींची लग्ने जुळतात ,तुटलेली नाती पुन: भेटल्याने जुळतात .

आम्ही शिक्षक मंडळी मेडशीहून १० मैलाचा रस्ता जवळच्या पाऊलवाटेने ब्राम्हणवाडा , राजुरा ,सुकांडा ,कुरळा ह्यी गावातून तेथील मित्रमंडळींना भेटून , चहापाणी , नाश्ता ,घेत घेत मजल दर मजल करीत डव्हा येथे पोहोचायचो . महाप्रसाद घेऊन रात्रभर यात्रेत तमाशा , चित्रपट ,…….इ चा आस्वाद घेतल्यावर दुसर्या दिवशी रात्री घरी परत यायचो . मेडशी येथील वयोवृद्ध शिक्षक श्री . शिनगारे सेवा निवृत्तीनंतर डव्हा येथे संस्थानातच राहत होते . त्यांची तेथे गेल्यावर भेट होत असे . त्यांच्यावर श्री विश्वनाथ महाराजांची विषेश कृपा होती . त्यांच्या एकुलत्या एक मुलीचे लग्न महाराजांनी स्वत: पुढाकार घेऊन जऊळका येेथील पोलीसाशी लाऊन दिले होते .
श्री क्षेत्र डव्हा येथे गांवापासून ४ मैलावर काटेपूर्णा नदी पूर्ववाहीनी असल्याने पवित्र क्षेत्र झाले आहे . त्यालाच ” चाsकs ” असेही म्हणतात . नदीकाठावरच श्री विश्वनाथ बाबांचे निवासस्थान ‘ झेापडी ‘ आहे . तेथे श्री विश्वनाथ बाबांची रेड्याच्या समाधीजवळ बसल्यावर , जेंव्हा समाधी लागायची , तेंव्हा त्याच्या तोंडून निघालेल्या ओव्या आम्ही ४-५ जण लेखणीने उतरऊन घ्यायचो , अशाच ओव्यांचीच पुढे पोथी तयार झाली .
मेडशी सर्कल , मालेगांव झोन , तसेच अकोला जिल्हा ऑलींपिकच्याही खेळांच्या स्पर्धा संपन्न झाल्या . २६ जानेवारीला बक्षीस समारंभ पार पडला .
गांवची जत्रा झाली , श्री नाथ नंगे महाराजांची आठवडाभर चाललेली यात्राही संपली अन् मग पुन: शाळेची लगबग सुरू झाली . वर्ग ४ व ७ च्या मुलांसाठीची अनुक्रमे प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे वर्ग जोरात सुरू झाले . मुले ,मुली ईलेक्ट्रीक लाईट असलेल्या ग्राम पंचायत कार्यालयात पहाटेच ५ वाजता दोन तास जादा वर्गासाठी येत असत .
पुन्हा घरी जाऊन सकाळी सात वाजता वर्ग ७ ची मुले नऊ वाजता गणिताच्या व सायन्सच्या जादा वर्गासाठी शाळेत हजर असत . पंचायत समिती स्तरावरील भारत स्काऊट आणि गाईडचा जऊळका येथे कँप घ्यायचे ठरले . गाईड टिचर श्रीमती मंगला पाठकबाई व स्काऊट टिचर म्हणून मी होतोच .१५ स्काऊटची मुले व १५ गाईडच्या मुली घेऊन आम्ही सर्वजण जऊळका येथे वेळेवर जाऊन पोहोचलो . त्यात श्री. भागवत , सिनिअर ग्रामसेवक श्री. भागवतांची २ मुले व १ मुलगी यांचा विषेश सहभाग होता . कँपच्या मैदानात एकमेकांच्या मदतीने तंबु तयार केला . दररोजच्या स्वयंपाकात , फायर कँप (शेकोटी ) , नकला , गाणी ह्या सगळ्या कार्यरक्रमात सहभागी होत असत . स्काऊट व गाईडचा आठवडाभराचा कँपच्या कालावधीत खेळीमेळीने सगळे कार्यक्रम पार पडले . समारोपाच्या दिवशी मेडशी शाळेकडून , लग्नाची वरात मुला-मुलींनी मिळून झोकात पार पाडली . गाईड शिक्षिका श्रीमती पाठकबाई नवरी झाल्या होत्या .मेडशी शाळेच्या स्काऊट गाईड चमुने द्वितीय पारितोषिकही मिळविले . कँपहून परत आल्यावर मेडशी शाळेच्या मुला – मुलींना घेऊन मी कधी कधी गावाबाहेरच्या मोर्णा नदीच्या काठावरील डाक बंगला , चोंढी – धरण ,नागनाथ मंदिराजवळील जंगलात ट्रेकींगला घेऊन जात असे .
वर्ग ४ व ७ च्या स्कॉलरशीपच्या परिक्षा आटोपल्या . १९६८-६९ सालच्या प्रथमच झालेल्या ह्या परिक्षेत मेडशी शाळेचा जिल्हयात खूप चांगला निकाल लागला . पुर्व-प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेत अकोला जिल्हयात पहिल्या तीन विद्यार्थ्यापैकी पहिले दोन विद्यार्थी मेडशी शाळेचेच होते . त्यांना शाळेतच नव्हे तर पुढे कॉलेजमधील पदवी परिक्षेनंतरही उच्च शिक्षणासाठीही दरवर्षी वाढत जाणारी शिष्यवृत्ती मिळणार होती . वर्ग ४ व ७ च्या इतरही ८-१० विद्यार्थ्यांना ३- ३ वर्षे शिष्यवृत्ती मिळणार होती .
मेडशीचा आठवडी बाजार दर शुक्रवारी असायचा .त्यादिवशी सर्व शाळा सकाळीच ११ वाजेपर्यंतच असायच्या .त्यानंतर सर्व शिक्षक- शिक्षिकांची वादविवाद स्पर्धा असायची . दर आठवड्याचे विषय वेगवेगळे असायचे .उदाहरणार्थ गणपती , हरीतालीका , मंगळागौर , दिवाळी , होळी …..इत्यादी भारतीय सण केव्हा ? का ? कसे ? तसेच का ? ……..इत्यादी मुद्यांवर सर्वांनी आपापली मते मांडायची , त्यावर चर्चा करायची , जणू आम्हा सर्वाना त्याची सवयच लागली होती .
गणपती त्याची विविध रूपे , त्याला दुर्वाच वा विशिष्ट वनस्पतीच का वाहायच्या ? गणपती म्हणजे काय ? गणपती अथर्व शिर्षमध्ये हयाचे उत्तर दिलेले आहे .’ गणांनां त्वं गणपती ! ‘ गण ‘ म्हणजे समुदाय त्याचा मुख्य तेेा गणपती ! हा गणपतीचा पहिला अर्थ .गणपतीला हत्तीचे मस्तक लावलेले आहे , त्याचे सुपा सारखे कान ,लांब सोंड का ? एकदंत का म्हणतात ? तुंदील – तनु का म्हणतात ,गणपतीचे वाहन उंदिरच का ? पुरातन काळापासून आपल्याला आपल्या पूर्वजांनी गणपतीच्या जन्माबाबत कोणकोणत्या कथा सांगितल्या ,अष्टविनायक -गणपती कोठेकोठे आहेत ?अष्टविनायक यात्रेचा योग-संधी आल्यास त्याचा अवश्य लाभ घ्या ! आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात अष्टविनायकाशिवाय इतर ठिकाणच्या गणपती मंदिरांची माहिती , त्यांच्या कथा-गोष्टी यांची आणखी माहिती मिळऊन पुढील आठवडयांमध्ये क्रमाक्रमाने सांगण्याचे आवाहन श्री . हाते गुरूजींनी सगळ्यांना केले .
घरातील सुनबाईने हरितालीकाचे व्रत का ? कसे ? केव्हा ? ते त्याच कालावधीत (श्रावण महिन्यातच ) का साजरे करायचे ? हरितालीकेची पूजा पाटा वरवंटयावरच का मांडायची .आजुबाजूच्या वनस्पतीची ३२ -३२ पाने , फळे, फुलेच ….का जमा करून आणायची , घरची सासू त्याबाबत काय काय मार्गदर्शन करते ? आजुबाजूच्या पंचक्रोशीतील वनस्पती पाने , फुले ,फळे यांचा लहान मुलांना होणारा औषधी उपयोगाची माहिती देते की नाही ? ….इ चा उहापोह सविस्तर पद्धतिने व्हायचा .हरितालीका व्रत नववधुने पहिली पाचवर्षेच का करावे ? कारण त्यावेळी ह्या काळातच नवपरिणीत वधुला नवीन बाळ झाले की ,पंचक्रोशीत वैदय ,डॉक्टर उपलब्ध नसल्याने आजीबाईच्या बटव्यातील औषधासोबतच आजुबाजुच्या वनस्पतीची ओळख ,त्याचे औषधी गुणधर्म , बाळगुटी , केव्हा केव्हा ,कधीकधी द्यायची ह्याची माहिती होत असे . तसेच गुढीपाडवा ते होळीपर्यंतचे भारतीय सण , व्रत – वैकल्ये कालमानानुसार कशी आचरायची ह्याची माहिती घरातील सासुबाई , आजीबाईकडून नववधूला प्राप्त होत असे.पाटयावर वनस्पतीची पाने वरवंटंयान वाटता येतात . कपड्यात लगदा घेऊन रस पाहिजे तेव्हा गाळून घेता येतो .हयाशिवाय वेगवेगळ्या वनस्पतींचा औषधी उपयोगाची माहिती मिळविण्यास सांगितले .
उदाहरणार्थ : –
( १ )जास्वंदीची पाने , फुले खोबरेल तेलात उकळऊन जास्वंद तेल तयार करता येते .
( २ )पेरूच्या झाडाची कोवळी कोवळी पाने चाऊन तयार झालेली गोळी दाताखाली , दाढेखाली ठेवल्यास दातदुखी ,दाढदुखी लगेच थांबते .
(३ )आपल्या विभागातच नव्हे तर सर्वत्र निर्गुडीची झुडपे आढळतात .त्यापासून आपल्या गावातील श्री .बाबू कैकाडी वेगळ्या आकाराच्या कणग्या बनवितो ह्यामुळे त्याच्या कुुटुंबियांना वर्षभर रोजगार – हमी सारखे काम मिळालेले आहे .
(४ ) निरगुडीच्या पानापासून वातरोगावर अत्यंत उपयोगी असे निर्गुडीचे – तेल मिळते .
(५ ) निरगुडीची पाने पोत्यावर ठेऊन त्यांवर बांधकामासाठी वापरकरतात ती वीट चुलीतील आगीत गरम करून त्याने पाय , हात , पाठ ….इ .ला शेक दिल्यास तेथील वातरोग आटोक्यात ठेवता येतो .
हया माहितीमुळे गावाबाहेर राहणारा अडाणी /अशिक्षित /उपेक्षित अशा कैकाड्याकडून पिढीजात औषधीची अधिक माहिती मिळविण्यासाठी , सगळ्यांनी त्याच शुक्रवारी आठवडी बाजारात श्री . बाबु कैकाड्याच्या झोपडीला भेट दिली . सतत समाजोपयोगी पडणार्या कैकाड्याची हलाखीची आर्थिक परिस्थिती आमच्या लक्षात आली .त्यानंतर त्याच्याकडे बघण्याचा आम्हा सगळ्यांचा द्दष्टिकोनच बदलला .

माझेकडे शाळेचे हिशेब , पत्रव्यवहार , शेती-भाजीचे वाफे ,स्काऊट , बँड ,खेळ ,शिष्यवृत्ती परिक्षा ,वर्ग ७ चे ईंग्रजी, गणित ,सायन्स , पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेशी संबंधीत कामाची जबाबदारी मुख्याध्यापक श्री .हाते गुरूजींनी सोपविली होती . ह्याव्यतिरिक्त मी बी . एस . सी .पार्ट १ ची नागपूर विद्यापिठाची बही:शाल परिक्षाही देण्याचे’ठरविले . तसेच सिनिअर पी . टी .सी .ची परिक्षाही दिली . मी नॉर्मल स्कुलमध्ये ट्रेनिंगला असतांनाही परिक्षेला बसलो होतो .त्यावेळीB.S. C part I चा Practical Inorganic/organic सह
एक विषय केमेस्ट्री राहीला होता . त्यावेळी मला केमेस्ट्रीच्या पहिल्या पेपरमध्ये ५० पैकी २७ मार्क मिळाले होते ,तर दुसर्या पेपरमध्ये ५० पैकी फक्त ३ च मार्क मिळाले होते .
नागपूर विद्यापीठाकडे मी फेरतपासणीसाठी अर्ज केला पण काहिही उपयोग झाला नाही .
मी मुख्याध्यापकांची परवानगी व जरूरीपुरती रजा घेऊनपरिक्षेसाठी अकोल्याला गेलो . परंतू एक पेपर फुटल्यामुळे मला तेथेच थांबावे लागले . परिक्षा झाल्यावर मी परत मेडशीला शाळेत हजर झालो . दरम्यानच्या काळात माझ्या वडिलांची प्रकृति ठिक नसल्याने अर्जित रजेवर (earned leave )होते परंतू आपण उन्हाळ्याची व दिवाळीची सुट्टी उपभोगत असल्याने (vacation department ) अर्जित रजेस पात्र नाही . सबब आपणास अर्धपगारी रजाा मंजूर करण्यात येत असल्याचे कळविले होते .पगाराच्या दिवशी आम्हा दोघांनाही हे सगळे कळले . आता दोघांमिळून अर्धाच पगार हातात आला . आता मात्र मी खूपच निऱाश झालेा होतो .शेवटी सर्व मिळून ह्या महिन्यात मिळू शकणारी भि .सी.आम्हाला दिली .त्यापैशामिळून त्या महिन्याचा खर्च भागवला .पगाराच्या अगोदर १० दिवस पंचायत समितीकडून तसे पत्राने शाळेला कळविणेत आले होते .
मी ताबडतोब पंचायत समितीत जाऊन शिक्षण लिपिकाला भेटलो . त्यांनी अर्धपगारी रजेचा घेतलेला निर्णय B .C .S R . नियमाप्रमाणे योग्यच असल्याचे सांगितले .मला जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे जाण्याचा पर्याय खुला होता .त्याप्रमाणे मी प्रकरणी ति . रा . रा .बाबांना अर्ज करण्यास सांगितले .प्रकरणाचा पाठपुरावा सुरू झाला . जवळ जवळ एक वर्षानंतर शिक्षणाधिकार्यांनी ति.बाबा दिवाळीची आणी उन्हाळ्याची सुटी उपभोगतात की शाळेत उपस्थित असतात हयाची तपासणी करणयाचे आदेश काढले . त्यासाठी त्यांच्या नेमणुकीपासूनचे १९५५ पासूनचे हजेरी पट काढून तपासले . तेव्हा तेथे ति . बाबांनी उन्हाळ्याच्या /दिवाळीच्या दिवसातही सुटी न उपभेगता दररोजच्या स्वाक्षर्या केल्याचे नजरेस आले . ह्याचाच अर्थ ति . बाबा Vacation Department प्रमाणे दिवाळी आणी उन्हाळ्याची सुटी उपभोगत नाहीत . त्यामुळे त्यांची रजा अर्धपगारी करण्याचा पंचायत समिती मालेगाव ,शिक्षण विभागाचा आदेश रद्द् करून श्री .वामनराव बळीराम लोणकरांना ,अर्जित रजा
मंजूर करणेचे आदेश काढावेत असे निर्देश जि. प . शिक्षण विभागाने दिले .ह्या सर्व प्रकरणांत अकोला जि . प . शिक्षण विभागातील सुपरिंटेंडेंट श्री .कारखानीस साहेबांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले . मालेगांव पंचायत समिती शिक्षण विभागाने अर्जित रजा मंजुरीचे आदेश काढून पगाराची थकबाकीही दिली .शेवटी सत्याचाच विजय झाला ,न्याय मिळाला .
श्री . वा .शं . हाते ,गुरूजींना राज्य शासनाचा ‘आदर्श प्राथमिक शिक्षक ‘ पुरस्कार जाहिर झाला . मुंबई येथे राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार मिळाला .मेडशीला परत आल्यानंतर स्टँडवर त्यांचे स्वागत करण्यामत आले . पाच सुवासिनींनी ओवाळल्यावर त्यांची गावाच्या मुख्य रस्त्यावरून ढोल ,लेझीम ,बिगुल वाजवत , स्काऊट -गाईडसह भव्य मिरवणूक काढणेत आली .गावातील चौकाचौकात गावकर्यांनी त्यांचे स्वागत केले . शाळेत आल्यावर त्यांच्या गौरवपर भाषणे झाली . श्री . हाते गुरूजींनी त्यांच्या मुंबई पुरस्कार सोहळ्यातील त्यांचे अनुभव सांगीतले .

पुढील वर्षी १९६९ – ७० मध्ये मेडशी शाळेची स्थापना होऊन १०० वर्षे पूर्ण होत असल्याने शताब्धी वर्ष साजरे करायचे होते .त्यासाठी विविध कार्यक्रमांची आखणी करून त्याचे नियोजन करणेत आले . कार्यक्रमाची गटवार विभागणी करून तालमी सुरू झाल्या . मुख्य पाहुणे म्हणून माननीय रामरावजी झनक , आमदार , मेडशी विभाग , यांना आमंत्रित करण्याचे ठरले . जि . प. अकोलाचे शिक्षणाधिकारी , पंचायत समिती सभापती , /शिक्षणाधिकारी हयांनाहीआमंत्रित करण्याचे ठरले . त्याप्रमाणे निमंत्रण पत्रिका पाठविणेत आल्या .
प्राथमिक विभाग वर्ग १ ते ४ मुले /मुली ,माध्यमिक विभाग वर्ग ५ ते ७
मुले /मुली तसेच मुला- मुलींची एकत्रीत असे गट करून निरनिराळी गाणी , नाट्यछटा ……इ .कार्यक्रमाच्या तालमी जोरात सुरू झाल्या .
मधल्या काळात शेतकरी मेळावाचे आयोजन पंचायत समिति , मालेगांव तर्फे मेडशी येथे करण्यात आले होते .तीन दिवस चाललेल्या ह्या मेळाव्यात शेतकर्यांची राहणे , जेवण ,चहा , नाश्ता …..इ. ची व्यवस्था शासनातर्फे करण्यात आलेली होती . जि. प. अकोलाचे पदाधिकारी , कृषि विभागाचे अधिकारी ,तसेच प्रगतिशील शेतकरी ह्यांनी मार्गदर्शन केले . सदर मेळावा-शिबीर यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक ,शिक्षिका ,कर्मचारी वर्गाने सहकार्य केले . ह्या शिबीरामुळे मेडशी शाळेच्या शताब्दी सोहळ्याची जणूकाही रंगीत तालीमच झाली .
मेडशी शाळेच्या शताब्दी सोहळ्याला माननीय रामरावजी झनक आमदार , मेडशी विभाग ह्यांच्यासोबत नामदार बाबासाहेब सरनायक मंत्रीमहोदयांनाही बोलविंण्यात आले .त्यामुळे जिल्ह परिषद अध्यक्ष , शिक्षण विभागाचे सभापती ,पंचायत समिती , मालेगांवचे सभापती , पंचायत समितीचे शिक्षणविभागाचे अधिकारी …….इ . ची उपस्थिती अपरिहार्य झाली . ह्यासगळ्या बाबींचा बारकाईने विचार करून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले . स्काऊट आणि गाईडच्या विद्यार्थ्यांनी नेमबाजीचे प्रात्यक्षिक दाखवितांना उपस्थितांना स्वागताचा फुलांचा हार , त्याचा वरचा धागा धनुष्य बाणाने तोडताच पाहुण्यांच्या गळ्यात ,टाळ्यांच्या कडकडाडात अलगतपणे घालता येतो , हे दाखविले .प्रत्येकाने आपापल्या भाषणात त्यासाठी स्काऊट -गाईडांचे मनापासून अभिनंदन केले .मुख्य पाहुणे आपल्या भाषणांत म्हणाले , ” मी तर खूपच घाबरलो होतो . हाराचा धागा अचुकपणे भेदला गेला नी फुलाच्या हार माझ्या गळ्या पडला अन माझा जीवही भांड्यात पडला ! ह्यासाठी मी त्या स्काऊट -गाईडांचे तसेच त्यांच्या प्रशिक्षकांचे मनापासून अभिनंदन करतेा आणि ह्यासगळ्या चमूला माझ्यातर्फे रू. ५०१ चे पारितोषिक जाहीर करतो.” टाळयांचा प्रचंड कडकडाट झाला ” . त्यानंतर प्रत्येक पाहुण्याने आपापली रोख बक्षीसे जाहीर केली .

त्यानंतर प्राथमिक विभागाने आणि नंतर पूर्व प्राथमिक विभागातील मुला मुलींनी विविध गाणी ,नाट्यछटा , नृत्य ….इ कार्यक्रम सादर केले . श्री .हाते गुरूजींनी शाळा स्थापन झाल्यापासून आजपर्यंतची शाळेची प्रगती कशी कशी होत गेली ह्याची सविस्तर माहिती सांगितली . त्यानंतर त्यांनी पूर्व- माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत अकोला जिल्ह्यातील पहिल्या तीनपैकी दोन विद्यार्थी मेडशी शाळेचेच आहेत तसेच माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेतही बरेच विद्यार्थी मेेरीटमध्ये आल्याने शिष्यवृत्तीस पात्र ठरल्याचे जाहिर केले .

ह्या सगळ्या कामाच्या गदारोळात मी माझ्या स्वत:च्या प्रगतिबाबतही जागरूक होतो.माझ्या कुटुंबात मी मोठा असल्याने , माझ्या लहान भावंडांची भविष्यात प्रगति उत्कृष्ट पध्दतिने होण्यासाठी , प्रथम त्यांना योग्य व पोषक वातावरण निर्माण करणे गरजेचे ठरते . ह्या विचारानेच मला माझा मार्ग गवसला .मी प्रथम माझी स्वत:ची प्रगति करणे हा एकमेव मार्ग असल्याची जाणीवही मला होती .मार्ग सोपा नव्हता . नोकरी होती , ह्याआधारावरच , वरिष्ठांची मर्जी सांभाळून (१ ) पदवी संपादन करणे , (२ )पदवी धारक झाल्यावर , उघडलेल्या विस्तिर्ण अशा क्षितिजात , महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रिय लोकसेवा आयोगाची परिक्षा देता येतील . (३ )आर्थिक पाठबळाच्या सहाय्याने लहान बहिण- भावंडांचे शिक्षण , नोकरीसाठी जोरकस प्रयत्न करता येतील , असे मनाशी पक्के ठरविले .

मी B.A . part 1 च्या नागपूर विद्यापीठाच्या बहि:शाल परिक्षेचा फॉर्म भरायचे ठरविले . त्यावेळी बँक ऑफ बडोदा , कापड बाजार , शाखेत , परिक्षेचा अर्ज ,परिक्षा फी भरल्याची चलान , त्यामागे सोबत जोडलेल्या मूळ प्रमाणपत्रांची यादी (हाय्यर सेकंडरी स्कुल सर्टिफुिकेट परिक्षेचे प्रमाणपचर तसेच गुणपत्रिकेची प्रत ) लेखी नमूद करावयाची होती , चलनाची चौथी प्रत बँकेने मला दिली .
साधारणपणे २० दिवसांनी मली विद्यापिठाकडून पत्र मिळाले . त्यांत माझे एच . एस . एस . सी ची मार्क प्रमाणपत्र मिळाले नसल्याचे नमूद केल् होते . आता माझ्यापुढे सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला की H. S . S . C . चे दुसरे मुळ (original ) प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका तांतडीने मिळणार कोठून ? त्याला पर्याय काय ? Duplicate Certificate /Mark list मिळवायला किमान ३ ते ४ महिने लागतील . कालावधी तर मर्यादित दिला आहे . नाहीतर परीक्षेला बसता येणे अशक्य कोटितील बाब ठरणार .सगळी स्वप्ने भंगणार . No Progress , Never think of the dreams . हा विचार करतांना मला माझ्या शाळेची आठवण झाली .

माझ्या Govt . Multipurpose Higher Secondary School , Near Akola Railway Station ,ला भेट देऊन कोणाची भेट होते काय? पहावे प्रयत्न करून अशा विचाराने शाळेच्या कार्यालयात प्रवेश केला . तेथे ओळखीचा चेहरा शोधू लागलो . तोच कानावर शब्द आले , काय विनोदराव ? कसले काम आहे ? आवाजाच्या दिशेने निरखून पाहिले ,तर श्री . गजरेमामा (श्री .हिंगणेकर मामांचे मित्र ) मला बोलावत होते .त्यांना सर्व वर्तमान सांगितले . त्यांनी मला ताबडतोब रूपये पांच ची चलान ट्रेझरीत भरायला सांगितले . शाळेतून जन्म- तारखेचा दाखला तांतडीने मिळावा यासाठी मुख्याध्यापकांच्या नांवे अर्ज करावयास सांगितले . अवघ्या दोन तासात ”श्री . विनोद वामनराव लोणकर ह्यांची जन्म तारीख शाळेच्या रजिस्टरमध्ये नोंदल्याप्रमाणे दिनांक १ जून १९४५ अशी आहे . त्यांनी नागपूर माध्यमिक मंडळाची उच्च माध्यमिक परिक्षा मार्च १९६१ साली पास झाल्याने शाळा सेाडली .” असा दाखला दिला . श्री .गजरे मामांनी माझी आपुलकीने माहिती विचारली . त्यांच्या रूपात मला प्रथमच देव भेटल्याचा आनंद झाला . नागपूर विद्यापीठाला शाळेतून मिळालेला दाखला , बँक मँनेजरचा दाखला , चलानची चवथी प्रत ……इ . रजिस्टर पोस्टाने पाठविली . परिक्षेचे तात्पुरते प्रवेश पत्र श्री . शिवाजी हायस्कुलच्या परिक्षा केंद्रावरून मिळवून परिक्षा दिली .

पण माझा परिक्षेचा निकाल नागपूर विद्याुपीठाने जााहीर केला नाही ,राखून (Withheld )ठेवण्यात आला . मी शाळेच्या शताब्दी महोत्सवाच्या गडबडीतही न विसरता पुन: पुरवणी (Supplementary ) परिक्षेला बसलो , पात्र परिक्षेच्या ( Qualifying ) ठिकाणी मात्र मार्च १९६८ च्या परिक्षेची माहिती लिहीली त्यांत RESULT NOT KNOWN असा उल्लेख केला . पुढे १९६९च्या उन्हाळ्यात माझे अकोल्याचे शेजारी व मित्र श्री . अवस्थी Blood Technition च्या प्रशिक्षणासाठी नागपूरला गेले होते . तेथे नागपूर विद्यापीठाच्या रजिष्ट्रारचा मुलगाही प्रशिक्षणासाठी सोबतच होता .त्या मित्राचे घरी एकदा माझाही विषय निघाला. तेथे त्याचे वडीलही हजर होतेे . त्यांच्याकडे माझ्या मित्राने फक्त माझाच B. A .Part 1 निकाल एक वर्षापासून प्रलंबित असल्याचे निदर्शनास आणून दिले .त्यानंतरच्याच आठवड्यात माझा निकाल जाहीर होऊन मला बी .ए. भाग १ ,मार्च १९६८ च्याच परिक्षेत ”उत्तीर्ण ”घोषित करणेत आले .

१९६९ हे वर्ष माझ्या जीवनातील अतिशय महत्वाचे ठरले .माझ्या जीवनाला वेगळीच कलाटणी / वळण मिळाले .मी बी . ए .भाग १ ची परिक्षा पास झाल्याचे जवळ जवळ एक वर्षानंतर कळले . मला व घरच्या सगळ्यांनाचखूप आनंद झाला.माझा पुढील प्रगतीचा आणि लख्ख प्रकाशाचा मार्ग खुला झाला. माझ्या प्रयत्नांना आशेची पालवी फुटली . त्याच कालावधीत ति .रा. रा. हिंगणेकरमामा
मेडशीला आले . त्यांनी ति. बाबांना व मला जानेफळ जि . बुलढाणा येथे श्री .किसनराव पिंजरकरांची S.S. C. ला शिकत असलेली , मुलगी कु . निर्मलाला पाहण्यास नेले . अगोदरच ठरल्याप्रमाणे बुलढाण्याचे श्री . राजाभाऊ खिरोळकरमामा आलेले होते . मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला . जेवण झाल्यावर आम्ही तिघेही मेहेकर -मालेगांव मार्गे मेेडशीला परत आलो.त्यादिवशी रात्री मी अर्धवट झोपेतअसतांना ती .बाबा , सौ. आईला ति .रा . रा. हिंगणेकरमामांनी विनोदसाठी पाहिलेली मुलगी चि. कु. निर्मलाच्या Face-Reading प्रमाणे मुलीच्या घरची आर्थीक परिस्थिती बेताचीच असली तरीही ही मुलगी ज्या घरी जाईल त्या घरची लक्ष्मी बनेल . मला चि. विनोदसाठी ही मुलगी पसंत आहे . तुमच्या घरात ही मुलगी आल्यावर तुमच्या प्रगतीचा आलेख वरवरच चढत जाणार आहे . असे त्या मुलीच्या चेहर्यावरून स्पष्ट दिसते .आणखी महत्वाची बाब म्हणजे आपल्या समाजामध्ये आपल्या भागात दुसरी कोणतीही ह्यासारखी मुलगी दिसत नाही . त्या रात्री मी अर्धवट झोपेत एवढेच ऐकले होते .. सकाळी ऊठल्यावर चहा पिता पिता मला ती .आई बाबांनी तसेच ति. हिंगणेकरमामांनी पसंती विचारली . मी लगेच होकार दिला . चि. कु.निर्मलाचे वडील निवृत्त शिक्षक होते .ते अप्रशिक्षित असल्याने त्यांना निवृत्त्तीनंतर मिळालेली रक्कम फार तुटपुंजी होती . माझ्या लग्नाचा २६ मे १९६९ हा गेारज मुहूर्त ठरविण्यात आला . लग्न निर्मलाच्या मामाच्या गांवाला नांदुरा (मध्य रेल्वे) जवळच्या दहिगां (माटोडा ) येथे ठरविण्यात आले . ति. हिंगणेकरमामांनी मी फक्त ‘ मुलाचा मामा ‘ म्हणून विनोदच्या मागे उभा राहील असे स्पष्टपणे सांगितले . त्याप्रमाणे मुलीकडे
मुलीच्या मामाकडे ” वधुपसंती ” कळविणेत आली . ति . हिंगणेकरमामांच्या भविष्याची मला लगेच प्रचिती आली . मी लग्नाला फक्त होकारच दिला नी दुसरेच दिवशी माझा B. A . part l चा एक वर्षापासून प्रलंबित निकाल पोस्टाने मिळाला . मी मार्च १९६८ च्याच परिक्षेत ऊत्तीर्ण झालो होतो . सगळ्यानी माझे अभिनंदन केले . अत्यानंदाने लग्नाची तयारी सुरू केली . भोनला ति.रामचंद्रकाका व ति. सदाशिवकाका तसेच ईतर नातेवाईकांनाही लग्न-पत्रिका पाठविणेत आल्या.लग्नाचा कार्यक्रम दहिगांव (माटोडा ) येथे रामाच्या मंदिरात आनंदाने पार पडला .
मेडशी येथे परत आल्यावर सत्यनारायणाची पूजा झाली .त्यानंतर पंगत देण्यात आली . पंगतीत पुरी ,वांगे-बटाटा भाजी , भजी ,व बुंदीलाडू केले होते . पंगतीत श्री .जगन्नाथदादा सर्वाधिकारी होते . ही पंगत दीर्घकाळ सर्वांच्या स्मरणात राहीली .श्री . गजानन महाराजांची पालखी पंढरपूरला जातांना , तसेच श्री .गाडगेबाबा व वारकरी मेडशीला थांबत . ह्या सर्व वारकरी मंडळींच्या जेवणाच्या पंगतीचे सर्वाधिकारी श्री . जगन्नाथ दादाच असत .

पुढील वर्ष बी .ए . भाग २ ला नागपूर विद्यापीठाने परिक्षा न घेण्याचे जाहीर केले होते . शाळेच्या शताब्दी महोत्सवामुळे मी पुस्तकांना स्पर्शही करू शकलो नव्हतो . पुढील वर्ष १९७० हे बी.ए. फायनलचे वर्ष होते . मी पातूर , अकोला ,तसेच वाशीम येथील कॉलेजमधून , प्राध्यापकांकडून पुस्तके आणली . रविवार ,शुक्रवार,

तसेच ,सुटीच्या दिवशी वेळ मिळेल तेव्हा पुस्तकातून लेखी टिप्पण्या काढण्याचे काम वर्षभर केले. कारण मार्च महिन्यात सगळ्या कॉलेजमध्ये घेतलेली पुस्तके परत करावी लागणार होती . अर्थशास्त्रासह सगळ्या विषयाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका मिळवून मी घड्याळ लाऊन तीन तासात प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव केला . अकोल्याला सीताबाई आर्टस कॉलेजातील अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांना भेटून सोडविलेली प्रश्नपत्रिका दाखविली . त्यांनी ती तपासली व एवढे लिहिले तरी तुुम्ही पास होणारच हे नक्की . माझा शाळेचा कामाचा व्याप सांभाळून मला B. A. Final ची तयारी करायची होती . दररोज सायंकाळी शाळा सुटल्यावर मी घरी जाऊन कपभर चहा घ्यायचो .त्यानंतर गांवाबाहेर वाशीम रोडवर मोर्णा नदीच्या पुलापलीकडे जाऊन शेतात झाडाखाली बसून वाचन करायचो . संध्याकाळी शिक्षकवर्ग , मोर्णा नदीच्या पुलाच्या बाजूच्या टेकडीवर रेस्ट हाऊस कडे फिरायला येत . माझे तासभर वाचन झाल्यावर मी ह्या शिक्षकांसोबतच घरी परत यायचो .परिक्षा झाली , परिक्षेचा निकाल जाहीर झाला .
मनात धाकधूक होती . कारण अर्थशास्त्राचे पेपर श्री . मुताटकर नामे प्राध्यापकांकडे तपासणीसाठी होते . कॉलेजमधील प्रथम श्रेणीत पास होण्याची खात्री असलेले विद्यार्थीसुध्दा त्यात नापास झाल्याचे समजले . मला एकूण २११ मार्क मिळाले होते . मेडशीला श्री . जोशी मेडीकल ऑफीसरांचे लहान भाऊ
श्री . सत्यनारायण जोशी , अमरावतीला श्री .शिवाजी महाविद्यालयात ईंग्रजीचे प्राध्यापक हेोते . ते अत्यंत हजरजबाबी होते . त्यांनी पोष्टातच माझी बी
. ए . फायनलची गुणपत्रिका पाहिली नी उद्गागारले “You are winner Sir , you deserve for this great achievement . You are the first Person who got 1 st External Degree of the Nagpur University . ” नंतर हळूच म्हणाले But you have obtained only 211 (अडीच) Marks only . मला काहीच कळले नाही . नंतर सगळे लक्षात आले .

आता माझेसाठी पदवीधारकांसाठींचे स्पर्धेचे क्षेत्र खुले झाले होते . M.P S.C./U.P. S . C . केंद्रीय लोकसेवा आयोग , राज्य लोकसेवा आयोग …..इ . परिक्षादेता येतील .ध्येयपुर्तिसाठीचे पुढचे आणखी एक पाऊल पुढे वाटचाल सुरू झाली .त्यावेळी १९७० -७१ साली राज्यलोकसेवा आणी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांची माहिती सहजपणे ऊपलब्ध नव्हती.स्थानिक ‘ मातृभुमी ‘ वर्तमानपत्रात त्याची दोनओळींची जाहिरात शोधायची .पंचायत समिती मालेगांव,कार्यालयात जाऊन संवर्ग विकास अधिकारी , श्री. प्रचंडसाहेबांच्या परवानगीने शासकीय राजपत्रातील,मध्य ऊपविभाग,भाग १ ताब्यात घेणे . त्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राजपत्रित अधिकारी वर्ग १ वा २ च्या परिक्षेची माहिती मिळविण्यासाठी मुंबई येथील बँक ऑफ ईंडिया ईमारतीतील आयोगातसेचच्या कार्यालयातून परिक्षेचे अर्ज मागविणे .सदर अर्ज शाळा , पंचायत समिती मालेगांव,जिल्हा परीषद शिक्षणाधिकारी ,जि.प. अकोला मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयेागाकडे पाठविणे ह्या प्रक्रियेतून जावे लागायचे .त्यानंतर शासकीय बुक डेपो मुंबई ,औरंगाबाद ,पुणे व नागपूर येथे पत्र पाठवून राजपत्रीत अधिकारी परिक्षेचे पेपर्स मागवावे लागत .Papers are not available अशी ऊत्तरे यायची .मागील परिक्षेचे पेपर्स मिळायचे नाहीत . मग मी Career Competition Review मासीक लावले .General Knowledge चे अद्ययावत प्रत मिळवायची . अभ्यास सुरू केला . परिक्षेचे केंद्र नागपूर निवडले .
नागपूरला मी प्रथमच जाणार होतो . मला नागपूरची काहिही माहिती नव्हती . परिक्षा केंद्र कोठे आहे . ४ ते ५ दिवस राहायचे , जेवणाचे काय करायचे ? कसे करायचे ? अकोला ते नागपूर तसेच नागपूर येथील प्रवासाची सोय करूनच मला जावे लागणार होते . ति. रा. रा . बाबांना श्री . सालफळे काकांचा सध्याचा पत्ता माहिती नव्हता . फक्त वाकर रोड , माताचे देवळाजवळ ,नागपूर . एवढाच जुना पत्ता आजोबांच्या काळातला लक्षात राहीला होता . जवळ फक्त रू. ३० .०० घेऊन नागपूर वारी करायचा होती .त्यावेळी फोनचीही सोय नवहती . पत्रव्यवहार करून भोननहून मोठ्या काकांना नेमका पत्ता विचारायला वेळही नव्हता .अकोला-नागपूर रेल्वे प्रवास वजा करून रू .१० .०० शिलकीतून आठवडा काढायचा होता . अकोला येथून पँसेंजरने मिलीटरी बोगीत बसून निघालो . पँसेंजर रात्री ११ वाजता नागपूरला पोहोचणार होती . बडनेरा जंक्शन येथे अमरावतीहून आजीबा सोबत एक तरूण नातही आमच्या बोगीत चढली . आमची रेल्वेगाडी पुलगांव स्टेशनवररून सुटता सुटता ५-६ कामकरी बायका चढल्या त्याही आमच्याच बोगीत ‘थेाडयाच वेळात त्यांच्या गप्पा सुरू झाल्या .थोड्या वेळाने त्यापैकी एका बाईने माझ्या बाजूलाच बसलेल्या आजीबाईला कोठे जाता ? नागपूरला का ? पण तुम्ही नातीसाठी चांगला नवरा शोधला बरे ! चांगली राधा-कृष्णाची जोडी जमवली आहे . आजीसोबतची ती तरूणी लाजून चूर झाली . नागपूर येता येता आजीबाईनी मला त्यांचे सोबतच त्यांच्या मोठ्या मुलीकडे वाकर रोडच्या बाजूलाच येण्याची गळ घातली . मलाही आयतीच सोबत मिळाली , रिक्षाचा खर्च वाचला . त्यांच्याकडे चहा घेऊन मी रिक्षावाल्याला श्री. सालफळे , वाकर रोड , माताचे देवळाजवळ ह्या पत्यावर चलण्यास सांगीतले . वाकर रोडवर आजूबाजूला मिळून ४ – ५ माताचे देवळे पाहीली पण श्री . सालफळे काकांचे घर सापडले नाही. शेवटी एक तासानंतर तेथे जवळच्या संघ कार्यालयातील काही कार्यकर्ते भेटले . त्यांनी वाकर रोडवरच हिमालय दवाखान्याजवळ माताचे देऊळ आहे . त्याच्या जवळच रेल्वेवाले सालफळे राहतात . मी हिमालय दवाखान्याकडील दरवाजा वाजविला . रात्रीचे दोन वाजत आले होते . दरवाजा म्हातारीने ऊघडला . कोण ? विचारताच मी भोनच्या श्री .वामनराव लोणकरांचा मोठा मुलगा विनोद ! असे ऐकताच म्हातारीला आनंद वाटला . तेव्हड्यात श्री .सालफळे काकांनी विचारले , एव्हड्या रात्री कोण आलं ? म्हातारीने उत्तर दिले ‘भोनच्या वामनचा मोठा पोरगा आहे . मला आता आठवले ही म्हातारी ति . बाबांनी सांगीतलेली ‘मामी ‘असावी . मी आत गेलो , पडवीत थांबलेा , काकांनी पाणी आणून दिले व दरवाजा बंद केला . मी माझे स्काऊटचे बेडींग ऊघडून झोपलो . सकाळी पाच वाजताच श्री. सालफळेकाका व सौ. कमल मावशी ऊठले . भुशाची शेगडी पेटऊन पितळेच्या:-) बटात (मातीच्या मोठ्या गाडग्यासारख्या ) चहा करित होते . मीô सगळ्यांना नमस्कार केला . ति. सालफळे काकांना माझी सगळी माहिती सांगीतली .श्री .सालफळे काका मितभाषी हेाते . त्यांना खूप बरे वाटले , लोणकरापैकी
एक मुलगा पुढे जाण्यासाठी धडपड करतो आहे हे ऐकून ते आनंदी झाले . त्यांनी मला बाजूच्याच दुकानातून ओळख देवून दिवसभरासाठी देान रूपये दराने सायकल भाड्याने मिळवून दिली . परिक्षा केन्द्राचा रस्ता समजावून सांगीतला . सौ. कमल मावशीने नाश्ता बनविला ते पोटभखाऊन मी परीक्षा केन्द्रावर गेलो .पेपर कठीण वाटले नाहित . तिसरे दिवशी सालफळेकाकांचा , सौ . कमलमावशी (कमरेत खूप वाकलेली ), त्यांचा मुलगा प्रमोद व त्याच्या बहिणीचा निरोप घेऊन मेडशीला परतलो .
मधल्या काळात मी सिनिअर पी . टी .सी . परिक्षा पास झालो . D. Ed .Part 1 ची परिक्षा द्यायची असे ठरविले .अकोल्याला नॉर्मल स्कुलमध्ये बहि:शाल व दर रविवारी ट्रेनिंगला सुरवात झाली . महाराष्ट्र शासनाने D. Ed .Part 2 चीही परिक्षा एकाच वर्षी देता येईल असे दिवाळीचे वेळी कळविले . मी लगेच ह्या संधीचा फायदा घेण्याचे ठरविले. मला अकोल्याच्या विद्यामंदीर मुलींच्या पत्रव्यवहाराने शाळेच्या मुख्याध्यापीका श्रीमती मिश्रा ह्यांची साथ मिळाली . मला मुलींच्या नॉर्मल स्कुलमध्ये D.Ed ,. Part साठी प्रवेश मिळाला होता . परिक्षा झाली ,
निकालाच्या दिवशी D. Ed ,part 2 चा परिक्षेचा निकाल प्रथम लागला . मी त्यावेळच्या प्राचार्या श्रीमती डिडोळकर भेटल्या त्यांना अत्यानंद झाला . D. Ed . part 1 चाही निकाल आठवडाभरात लागला .मी ऊत्तीर्ण झालो होतो . मी ह्या काळात M. A. Part 1 व 2 (राज्यशास्त्र)ही ऊत्तीर्ण झालो होतो . माPझे नांव़आता पदवीधर प्राथमिक शिक्षकाच्या वेगळ्या यादीत स्थान मिळाले होते . मी इतरही X- Ray Technition , T . B . Technition …..ई. ची मुखलाखातही दिली .
M.P.S.C.ची परिक्षा देणे सुरू होते .U. P.S.C. केन्द्रिय लोकसेवा आयोगाच्या नियमाप्रमाणे वयोमर्यादा सवलतीत न बसल्याने मी राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेकडेच माझे पूर्ण लक्ष केंद्रित केले . १९७१ च्या राजपत्रित अधिकारी वर्ग १ च्या परिक्षेसाठी अर्ज करतांना आर्थिक द्दष्ट्या मागालसलेल्या वर्गासाठी आरक्षण ठेवलेले होते .त्यासाठी वैयक्तिक मासीक उत्पन्न, सर्व मार्गांमिळून रू . २००.०० च्या वर नसावे तसेच सदर प्रमाणपत्र तहसिलदाराच्या वरच्या महसूल अधिकार्याने दिलेले असावे ही अट होती . मुलाखतीच्या अगोदर मी सदर प्रमाणपत्र वाशीम येथील S.D. O. श्री . शहापूरकर (I .A.S. ) समोर कोर्टात प्रत्यक्ष हजर राहून मिळविले होते . हे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडू शकलो नव्हतो .
नागपूरला प्रत्यक्ष मुलाखतीच्यावेळी मी ते घेऊन गेलो होतो .मुलाखतीच्या दिवशी रवी भवनला मी एकटाच आवारात फिरत होतो .तेव्हड्यात एका ईमारतीच्या तिसर्या मजल्यावरून आवाज आला , A mister will you please come up . मी त्याप्रमाणे त्यांच्या खोलीत गेलो . त्यांची रूम एका बाजूला होती .त्यामुळे तसेच कामाच्या घाईत विश्रामगृहाचा खानसामाने ९ वाजत आले तरी त्यांच्या खोलीत चहा , नाश्ता आणून दिला नव्हता . त्यांच्या खोलीतील फोनही बंद होता . त्यांनी त्यांची ओळख करून दिली . ” I am Wankhede , Chairman , M. P. S .C . , Will you please arrange Tea and Breakfast for me . ” माझ्या लक्षात आले की ,खानसामा चहा – नाश्ता द्यायला विसरला असावा . मी तांतडीने खानसामाकडे गेलो . त्याला विचारले की तुम्ही अजूनपर्यंत एम .पी.एस.सी. चेअरमन , श्री. वानखेडेसाहेबांना चहा – नाश्ता कां नेऊन दिला नाही ? त्याने मला माफी मागीतली व लगेच माझेसोबतच चही- नाश्ता घेऊन निघाला .श्री .वानखडे साहेबांच्या खोलीत पोहोचलो. श्री. वानखेडेसाहेबांनी Thanks म्हणून मला Please join me म्हणाले .मी त्यांचे आभार मानले . थोड्या वेळाने त्यांचेसोबतच मुलाखतीच़्या जागी आलो . ते तेथून दुसर्या मजल्यावर गेले .
मी माझी सगळ्या मूळ प्रमाणपत्राची फाईल तयार करून
तेथील मुलाखतीच्या अगोदर प्रमाणपत्र तपासणी करीत असलेल्या अधिकार्याला दाखविली . माझे आर्थिकद्दश्टया कमकुवतचे प्रमाणपत्र पाहताच , ते अतिशय रागावले .
तपासणी अधिकारी- मी सदर प्रमाणपत्र तपासणार नाही .You can’t claim now. Who is this ‘Bloody ‘officer to issue this Certificate?
मला ह्या गोष्टीचा राग आला होता ,पण त्यावेळी रागात काहिही बोलणे योग्य नव्हते .
मी बोललो -If you have Guts ,Have a lighting call and ask him ”you Bloody, How You Have issued this Certificate” . That S.D. O . is I .A. S. ,He will give you proper answer .
तपासणी अधिकारी -I will not verify anybody’s certificates .
मी बोललो That is your duty , and you are answerable to your Authorituy .You may or you may not ,your choice!
त्या दिवशी फक्त १६ ऊमेदवारांचीच M.P .S.C . मुलाखत होणार होती . माझा नंबर तिसरा होता . माझ्या अगोदरच्या ऊमेदवाराची मुलाखत सुरू होती . माझ्या बोलण्याचा तपासणी अधिकार्याला खूप राग आला. . त्यांनी प्रमाणपत्र तपासणी थांबविली आणि पहिल्या मजल्यावरील मुलाखतीच्या खोलीकडे गेले .
क्रमांक दोनवरील ऊमेदवाराची मुलाखत झाल्यावर तो बाहेर येताच, तपासणी अधिकारी आत गेले . मी मनाशी खुणगांठ मारली नी समजलो की आता आजच्या मुलाखतीत मी यशस्वी होणे अशक्य आहे.
तपासणी अधिकारी बाहेर आल्यावर पांच मिनिटानंतर मी स्वत:ला सावरले नी आंत शिरलो .
मुलाखत घेणारे दोनच अधिकारी व्यक्ति होत्या . त्यांनी त्यांची ओळख करून दिली , चेअरमन श्री . एम. एन . वानखडे आणि सदस्य श्री. रिझवी . त्यांनी मला जागेवर बसायला सांगीतले नी मुलाखतीला सुरवात झाली .

मुक्काम उमरवाडी

उमरवाडी हे गांव अकोला-वाशीम रोडवर मेडशी गट ग्रामपंचायत अंतर्गत ,मेडशी गावापासून ३ मैलावर आहे .गांवाची लोकसंख्या अवघी ४०० होती .बहुतांशी आंध
समाजाचे गांव ,मेडशी गट ग्रामपंचायतचा सरपंच-पदाचा मान उमरवाडीच्याच श्रीमान कोंडजी धंदरे यांनाच मिळाला होता .  उमरवाडीची शाळा गावाच्या सुरवातीलाच एका खोलीच्या पक्या ईमारतीत  भरत असे . ही शाळा एक शिक्षकी होती . येथे पहिली , दुसरी व तिसरी असे  ३ वर्ग असले तरी तिनही वर्गासाठी शिक्षक मात्र एकच असायचा .पहिलीत १० विद्यार्थी , दुसरीत  ७ विद्यार्थी तर तिसरीत  ५  विद्यार्थी होते . एका पट्टीवर पहिलीचे , दुसर्या व तिसर्या पट्टीवर अनुक्रमे दुसरी व तिसरीचे विद्यार्थी बसत .

मी उमरवाडी येथे रूजू होण्यासाठी प्रथम पंचायत समिती , मालेगांव येथे शिक्षण विभागात गेलो . तेथे संवर्गअधिकारी पदावर श्री . प्रचंडसाहेब होते , पंचायतषक समिती शिक्षणाधिकारी श्री . कविश्वरसाहेबांनागही भेटलो . त्यांच्या लेखी आदेशाप्रमाणे उमरवाडीला जाऊन कामावर रूजू झालो . तसा अहवाल पंचाायत समितीला पाठविला . शाळा समितीतील सर्व सभासदांशी ओळख करून घेतली . सरपंच श्री. कोंडजी धंदरे हे शाळा समितीचे पदसिध्द अध्यक्ष होते . इतर सदस्यांपैकी वयोवृध्द श्री . देवरामपाटील हे माझ्या आज ही स्मरणांत आहेत . त्यांनी गावात घरोघरी माझ्यासोबत फिरून शाळेची पटसंख्या जवळ जवळ ७५ पर्यंत वाढविणेसाठी मोलाची मदत केली होती .

उमरवाडी गांव साक्षर करणेबाबत जिल्हा परिषद , अकोला तसेच पंचायत समिती , मालेगांव यांच्या अधिकारी ,ग्रामपंचायत मेडशीचे सरपंच व पदाधिकारी यांचे मार्गदर्शनाप्रमाणे प्रौढ साक्षरता कार्यक्रम राबविण्यात आला . मेडशी उच्च प्राथमिक शाळेमधील सर्व शिक्षक , शिक्षिका , विद्यार्थी यांचे तसेच आजूबाजूच्या कोळदरा , काळाकामठा , वाकळवाडी …इ . गावच्या साक्षरता साठी तेथील , शिक्षकांनी खूप सहकार्य केले . ह्या सर्व गावांचा एकत्रीत ”साक्षरता गौरव ” समारंभ सर्वानुमते उमरवाडीलाच घ्यायचे निश्चीत झाले . सभापति , पं . स . मालेगांव , संवर्ग विकास अधिकारी , शिक्षणाधिकारी तसेच उपशिक्षणाधिकारी ,सरपंच , मेडशी गट ग्रामपंचायत , तसेच त्या त्या गांवचे शिक्षकवर्ग व समस्त गांवकरी मंडळीं ह्या सर्वांचे उत्कृष्ट सहकार्य लाभले . अविस्मरणीय असा ” ग्राम साक्षरता गौरव” समारंभ साजरा झाला. ह्याचा अहवाल मालेगांव पंचायतसमिति ,तसेच अकोला जिल्हा परिषदेलाही पाठविणेत आला .

एकदा उमरवाडी शाळेच्या मागील झोपड्यांना सकाळी १० वाजता आग लागली होती .बघता बघता आग सगळ्या गांवात पसरायला सुरवात झाली . मी शाळेत पोहोचतो तो आग लागलेली . गांवातील तरूण पुरूष ,बायका , मुले …. सगळे गावाबाहेर शेतात काम करायला गेलेले होते . गांवात फक्त म्हातारी मंडळी होती , नी शाळेतील १०_१५ विद्यार्थी . पाहता पाहता आग डोंब उसळला . आगीचे लेाळ. दिसताच जवळपासचे लोक धाऊन यायला सुरवात झाली .मी सर्वप्रथम गांवातील एकमेव विहिरीपासून आग लागलेल्या भागाकडे दोन रांगा वआग न लागलेल्या भागाकडे अशा तीन रांगा तून लोकांना उभे केले . विहिरीतून पाणी काढून देणारी मंडळी ,बादली , गुंड …इ .भरून देऊ लागली . आग लागलेल्या भागावर सतत पाणी टाकू न आग पसरून देता , नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सरू केले .तर दुसरीकडे आगीच्या भक्षस्थानी पडू शकणाऱ्या जवळच्या झोपड्या पाडायला सुरूवात केली .थोडक्यात आग पसरणार नाही ह्याची खबरदारी घेणे सुरू केले . त्याचवेळी ४ मैलावरील मेडशी पोलीस स्टेशन तसेच मेडशी प्राथमिक शाळा , हायस्कुल ,ग्राम पंचायत मेडशी ह्यांना सूचना देण्यासाठी माणसे पाठविली . आजूबाजूच्या शेतातील , गावातील माणसेही मदतीला आली . एव्हढी मोठी आग प्रथमच लागली होती . आग दुपारी चार वाजता आटोक्यात आली .

गावातील एकमेव पक्या ईमारतीत शाळेच्या खोलीत ,आग पिडीतांची खाणे – पिणे व राहण्याची सोय करणेत आली .चोहो बाजूंनी यथाशक्ती खाण्यासाठी , धन – धान्य , कपडे , औषधी ….इ. चा ओघ सुरू झाला . पोलीसही आले . फायर बिग्रेडचीही गाडी आली . त्यादरम्यान शाळा समोरच्याच मोठ्या पिंपळाखाली भरविण्याची व्यवस्था करणेत आली .

एके दिवशी मला मालेगांव पंचायत समिती मधून निरोप आला . मला तांतडीने जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी , अकोला ह्यांचे कार्यालयात उपस्थित राहावयाचेआहे .मी लगेच अकोला जिल्हा परिषद ,शिक्षणाधिकारी यांचे कार्यालयात हजर झालो . तेथे आमचे अध्यापक विद्यालयातील इंग्रजीचे सर्व प्राध्यापक मला भेटले . शिक्षण संचालक , पुणे यांचा दौरा आयोजित करण्यांत आला असून ,त्यांना १९६५-६६ मध्ये इंग्रजी विषय घेऊन प्राविण्याने उत्तीर्ण झालेले शिक्षक त्यांच्या शाळेत वर्ग ५- ६ -७ मधील विद्यार्थ्यांना इंग्रजी कसे शिकवितात ह्याचे निरिक्षण करावयाचे आहे .
मी अध्यापक विद्यालयात इंग्रजी विषयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो होतो . त्यामुळे सर्वांचे लक्ष माझेवरच केन्द्रीत झाले नसते तर नवलच घडले असते . पण येथे वेगळाच घोळ झाला होता . अकोला जि. प. शिक्षण विभागाच्या आदेशाप्रमाणे माझी नियुक्ति एक शिक्षकी शाळेवर करण्यात आली होती . तेथे मी वर्ग ५_ ६ _७ नव्हे तर वर्ग १_२_३ ला शिकवित होतो .तेथे मला इंग्रजी विषय शिकविणे कोणत्याही परिस्थितीत शक्य नव्हते . जि . प . शिक्षण विभाग तीन दिवसात माझी बदली जवळच्या मोठ्या शाळेवर करू शकत नव्हता . ह्या पेचप्रसंगातून सुरक्षीत मार्ग कसा काढावा ? मेडशी शाळेत ५_६_७ वर्गावर इंग्रजी शिकविले तर शिक्षण संचालकांचा त्याबाबतचा अभिप्राय , श्री .लोणकरांनी शिकविले तरी , मेडशी शाळेला मिळेल . सरते शेवटी सर्वानुमते शिक्षण संचालकांचा दौरा पुढील वर्षी घेण्यासाठी प्रयत्न करावेतअसा निर्णय घेण्यात आला . पुढील शैक्षणिक वर्षात माझी बदली मेडशी उच्च् प्राथमिक शाळेवर करण्यात आली,आश्वासन पुर्ति करण्यातआली .

अध्यापक विद्यालय /नॉर्मल स्कुल ,अकोला , प्रशिक्षण .

जिल्हा परिषद , अकोलामधील सर्वच  अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना महाराष्ट्र शासनाच्या धोरणाप्रमाणे एक वर्ष कालावधीच्या प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा  निर्णय घेण्यात आला . त्याप्रमाणे दिनांक १-७-१९६५ पासून मी एक वर्ष कालावधीच्या प्रशिक्षणासाठी अध्यापक विद्यालय / नॉर्मल स्कुल , अकोला येथे रूजू झालो . प्रशिक्षण कालावधीत वसतिगृहात राहाणे अत्यावश्यक होते . तेथेच सर्वांच्या सहकार्याने Mess सुरू करणेत आली होती . स्वयंपाकगृहात तीन मोठ्या भट्या होpत्या . बाजूलाच कोठीघर होते . एकूण चार स्वयंपाकी होते . Mess ची  ३  वैशिष्ठे होती , भल्यामोठ्या  मोठ्या परातीएवढ्या  पोळ्या  सोबत बहुतेक वेळा बगारनी /फोडणीचे वरण असायचे . लग्न प्रसंगातील पंगतीप्रमाणे पट्या टाकून मोठ्या हॉलमध्येआम्ही सर्व प्रशिक्षणार्थी जेवावयास बसायचो . स्वयंपाक गृहात पदार्थ तयार करणे , त्याचे वितरण , पोळ्यांचे मोठ्या सराट्याने ४ – ६ तुकडे करणे  , पोळी , बगारनी वाढणे ….इ कामे आम्ही गटागटाने – क्रमवारीने करायचो .  त्यावर देखरेख करणेसाठी  एक  प्रिफेक्ट ,व त्यांचे नऊ जणांचे निवडलेले मंडळ होते . ह्या सगळयांना  Mess -Incharg , शिक्षक ,आणि प्राचार्य  मार्गदर्शन करीत असत .  प्रशिक्षण कालावधीत प्रत्येकाला रूपये ५०/- एवढे मानधन मिळायचे .

एक वर्ष प्रशिक्षणा नंतर Jr . P. T . C .चे म्हणजेच Junior  Primary  Teacher’s Training  Certificate मिळणार होते . आम्हाला  प्रशिक्षणात गणिताऐवजी नवीन ईंग्रजी घेण्याची मुभा होती . ह्याशिवाय मराठी , हिंदी ,  इतिहास-नागरिकत्व , विज्ञान ,  सुतकताई ,टावेल तयार करण्याठी सूत
!–more–
कातणे, त्यावर प्रक्रिया करणे , हातमागावर  टावेल कसा विणायचा  , धोटा कसा चालवायचा ……..ई. ह्याचे प्रात्यक्षिक – आठवड्यातून दोन दिवस दिले जायचे . मी ईंग्रजी विषय निवडला होता . नवीन ईंग्रजी कसे शिकवावे ह्यासाठी  केंद्रिय इंग्रजी संस्था , हैद्राबादच्या मुंबई येथील शाखेतून नऊ महिन्याचे विषेश   प्रशिक्षण घेऊन आलेले सर्वश्री खानसर , कुरेशीसर , देशपांडेसर तसेच श्रीमती  इंदुमती कुळकर्णी ……इ. आले होते .

प्रशिक्षणाची सुरवात प्रार्थनेने व्हायची . प्रार्थना , ”नमितो तुज शारदे , विद्या सुखदायिनी …….” ह्या श्री. पाटील , संगीत शिक्षकांच्या पेटीच्या तालसुरावर होई,
त्यानंतर वेळापत्रकाप्रमाणे वेगवेगळ्या विषयाचे प्रशिक्षण दिले जाई . प्रत्येक विषय कसा शिकवला पाहिजे हे तेथील , नॉर्मल स्कुलच्या संबंधित वर्गाच्या विद्यार्थ्यांना , प्रत्यक्ष शिकविण्याचे काम  प्रथम प्राध्यापक  करून दाखवीत .नंतर   आम्हा प्रशिक्षणार्थ्यांपैकी कुणालाही तोच  शिकविलेला भाग पुन्हा शिकविण्यास सांगितले जायचे . जेथे अयोग्य वाटले तेथे ,प्राध्यापक पुन्हा शिकवून दाखवित असत . त्यासाठी वेगवेगळी शैक्षणीक साधनांचा , प्रत्यक्ष वस्तुंचा वापर/ उपयोग करण्याची मुभा होती .  खाली सोधाहरण दिले आहे ,

विषय:- ईंग्रजी    (English )                  वर्ग:- ६       तुकडी:- ब.      
धडा  (Lesson ) 1 One     नांव (Name) The Mouse’s Tail
साहित्य :- Pictures (mouse , cat , cow ,, farmer , bakerman , ……etc .  , cup of milk , grass , bread ,….etc. )
A mouse and a cat were friends .Both were playing  together .1 )One day the cat cut the mouse ‘s Tail . 2) The mouse prayed to return the tail .  3)The cat asked to give her milk first . 4) The mouse went to the cow and requested to give milk . 5) The cow asked to give her grass first . 6) The  mouse went to the farmer and requested to give  grass. 7) The farmer asked to give bread first . .8 ) The mouse went to the bakerman and requested for bread  . 9 )The bakerman  gave the bread to the mouse  . 10 )The mouse gave the bread to the farmer . 11 ) The farmer gave the grass to the cow . 12)The cow gave the mouse milk . 13 )The mouse gave the milk to the cat . 14 )The cat gave back the Tail to the mouse . 15) The mouse became happy again .
जिल्हाऑलींपीक खेळ
प्रशिक्षण काळात वसतिगृहात राहात असतांना मी माझ्या सहकारी मित्रांना गणित शिकवायचो . एकदा मेडशी शाळेचे शिक्षक जिल्हा ऑलिंपीकसाठी खेळाडूंना घेऊन अकोल्याला आले होते . त्यांच्या तात्पुरत्या मुक्कामाची तसेच जेवणाची सोय मला करायची होती . आमच्या मेसचा ( प्रिफेक्ट ) मुख्य माझ्याच ग्रुपचा होता . मी त्याला विनंती करून १०_१२ जणांसाठी पोळ्या , मोठ्या गंजात बगारनी ( फोडणीचे वरण ) आणून ठवलेले हेाते . सर्वांची जेवणं झाल्यावर हॉलमध्ये झोपण्याची सोय केली होती .
प्रशिक्षण सुरू असतांना मी B. Sc .part 1 च्या परिक्षेचा अर्ज भरला . त्यासाठी मी १५ दिवसांची सुट्टी व संमती प्राध्यापकांकडून मिळविली . दैवयोगाने परिक्षेचे केंद्र जवळच श्री . शिवाजी हायस्कुल , मिळाले होते . मी वसतिगृहातच राहात होतो , मेसचे जेवण होतेच . सर्वांचे सहकार्य असल्याने मला हे करतांना कोणतीही अडचण आली नाही .
नवीन ईंग्रजीचे प्रशिक्षण
शाळेत इ यत्ता ५ वी पासून ईंग्रजीचे शिक्षणाची सुरवात होते . लहान मूल जशी मातृभाषा शिकते , अगदी त्याच पध्दतिने इयत्ता ५ वी तील विद्यार्थ्यांनी ईंग्रजी भाषा शिकावी , असा उद्देश नवीन पद्धतिने नवीन ईंग्रजी शिकवितांना असणे आवश्यक आहे . वेगळे व्याकरण शिकविणे गरजेचे नाही .
संगीताची कोणतीही माहिती नसतांना चित्रपटातील गाणे लहान मूल गुणगुणतेच ना !
खालील उदाहरणाने ही बाब अधिक स्पष्ट होते .
This (हा , ही , हे ) /That (तो , ती , ते ) शिकवायचे आहे .
This is a pen . (जवळच्या वस्तसाुठी )This is a girl .
That is a chair .(लांबच्या वस्तुसाठी ) That is a boy .
इयत्ता ५ वी , ६ वी ,आणि ७ वी अशी तीन वर्षे इंग्रजीचे अध्यापन करायचे आहे .त्यावेळी इतरही चित्रे , वस्तु , साहित्याचा आवश्यक तेथे उपयोग करता येतो .
परिक्षेच्या वेळी प्रश्नपत्रिका ही वस्तुनिष्ठ प्रश्नांचा जास्तीत जास्त अंतर्भाव असलेली असावी .

माझ्या अंतिम प्रात्यक्षिकाच्या वेळी जिल्हा शिक्षणाधिकारी , अकोला , प्राचार्य ,अध्यापक विद्यालय , तसेच ईंग्रजीचे सगळे प्राध्यापक , उपस्थित होते . कारण अस्मादीक ईंग्रजीच्या वर्गात प्रथम क्रमांकावर होते ना ! प्रात्यक्षिकाला दिलेला पाठ होता , ” Time And Clock ”
साहित्य : – घड्याळ्याची चित्र – प्रतिकृति (घड्याळ्याचे काटे फिरणारेअसावेत )

अध्यापक विद्यालयाला जोडूनच वर्ग ५ ते ७ ची शाळा होती , ह्या शाळेत मोठमोठ्या अघिकार्यांची मुले- मुली ह्यांनाच प्रवेश मिळायचा . अर्थात मुले – मुली अत्यंत हुुषार असत . आपल्याला शिकवायला येणारे शिकाऊ शिक्षकांचा प्रात्यक्षिकाचा तास उघळता कसा येईल येईल हयाची पुरेपुर दक्षता ही खोडकर मुले घेत . मी माझ्या प्रात्यक्षीक पाठाच्या वहीत घ्यावयाच्या पाठाचे टांचण , व्यवस्थितपणे , आकृत्यांसह लिहून काढलेले होते . वर्गात प्रवेश घेतल्यावर सर्व विद्यार्थ्यांनी Good Morning , Sir म्हटले .सुरवात तर छानच झाली होती .

This is a clock . It has two hands . This is long hand . This is short hand . long hand is called Minute hand . Short hand is called Hour hand . This is a dial of the clock .
(1 )When the long hand is on Twelve (12 ) and short hand is on One ( 1 ) , It is one ” O ” clock now .
What time is it now ?
No student gave any answer !
( 2 )When the long hand is on Three ( 3 ) and short hand is just ahead of One ( 1 ) , It is Quarter past One (1 ).

What time is it now ?
No student gave any answer !
( 3 )When the long hand is on Six ( 6 ) and the short hand is betwean One (1 )and Two ( 2 ), It is half past One now
What time is it now ?
No student gave any answer !
( 4 )When the long hand is on Nine (9 ) , and the short hand is near Two (2 ) , It is Quarter to Nine ( 9)
What time is it now ?
No student gave any answer !
( 5 ) When the long hand is on Two ( 2 ) an d the short hand is on Two ( 2 ) , It is Two (2 ) “O ” click now .
What time is it now ?
No student gave any answer .

सगळे परिक्षक गडबडून गेले . त्यांना काही कळेनासे झालेे होते .त्यांनी माझी प्रात्यक्षिकाची वही पुन्हापुन्हा पडताळून पाहिली .त्यात तर सगळे अगदी बरोबर होते . शिकविलेले सगळे सुध्दा प्रात्यक्षिक वही प्रमाणेच होते .
वर्गातील मुलांपैैकी एकही मुलगा उत्तर कां देत नाही ?

आमच्या प्राध्यापकांपैकी श्री. कुरेशीसरांना काहीतरी सुचले . त्यांनी पुढे येऊन पुन: नव्याने सुरवात केली .
What time is it now ?
It is one ‘O ‘ clock now ! (घड्याळ्याच्या प्रतिकृतीत एक वाजलेला आहे हे दाखऊन . )
Repeat after me . It is One ” O ” clock now !

 सर्व मुलांनी एकसुरात Repeat केले .
त्याप्रमाणे मी पुन्हा सगळे शिकऊन प्रत्येकवेळी विद्यार्थ्यांकडून Repeat करऊन घेतले .
सगळ्या परिक्षकांनी समाधानाचा सुस्कारा सोडला .
माझा लेखी परिक्षेप्रमाणे , प्रात्यक्षीक परिक्षेतही प्रथम क्रमांक आला .

सूतकताई करून , तयार केलेल्या सूतावर प्रक्रिया केली ,त्यानंतर त्यापासून खादीचा टावेल स्वहस्ते तयार केला . श्री . पाटील सरांच्या वर्षभराच्या आमच्यावर घेतलेल्या मेहनतीचेच हे फळ होते .
परिक्षा झाली . सर्वांना Jr .P T. C . प्रमाणपत्र देण्यात आले . आम्हा सर्वांत मैत्रीचा अतुट बंध निर्माण झाला होता . भविष्यात बरीच वर्षे तो कायम राहिला .
जिल्हा परिषद ,अकोलाकडून पुनर्नियुक्तिचे आदेशाप्रमाणे तेराही पंचायत समित्यांमध्ये नियुक्तिच्या ठिकाणी कामावर हजर झालो . आता आम्ही सगळे प्रशिक्षित असल्यामुळे वेतन श्रेणी लागू झाली . माझी नेमणूक पंचायत समिती ,मालेगांव मध्ये उमरवाडी येथे एक शिक्षकी शाळेवर झाली .

मुक्काम कुरणखेड/काटेपूर्णा

अन्वी -मिर्झापूरहून स्थानांतरणाने , माझी बदली कुरणखेड/काटेपूर्णा ,पंचायत समिती ,अकोला येथे करण्यात आली . अकोला -मुर्तिजापूर रोडवर २० मैलावर कुरणखेड हे गांव आहे . गांवाजवळ काटेपूर्णा नदीच्या काठावर अतिपुरातन असे देवीचे देऊळ आहे .येथे जुन्या कुरणखेड जवळ मूर्तिजापूर रोडवर कोळंबी गांवाच्या अलिकडे नवीन कुरणखेड वसविलेले आहे . येथील शाळा नदीकाठावरच टेकडीवर आहे .येथील जि.प.मराठी माध्यमिक शाळा ,दुबार पध्दतिने भरायची ,वर्ग १ ते ४ सकाळी तर वर्ग ५ ते ७ दुपारी भरविले जात. येथील मुख्याध्यापक , अकोल्याजवळच्या उगवा या गावाचे , श्री .देशमुख आप्पा होते . श्री.लोनसने गुरूजी शेगांव जवळच्या पातूर्डयाचे ,अकोल्याचे डॉ.कुळकर्णी गुरूजी , नवीन कुरणखेडमध्ये राहणारे श्री.नानोटी गुरूजी ,श्री. ओवे गरूजी तर जुन्या कुरणखेडमधील श्री. जामोदेगुरूजी ,श्री.छत्रपालसिंह राजपूत , श्रीमती जोशीबाई ,श्रीमती कस्तुरेबाई , श्री. जेाशी गुरूजी ,श्रीमती अलका देशमुखबाई श्रीमती नानेोटीबाई….इ. शिक्षकवृंद होता . मी कामावर रूजू झालो .येथे सुध्दा मी वयाने सर्वात लहान होतो . मला नवीन कुरणखेड गावात श्री. शंकर कुंभाराची खोली भाड्याने मिळाली .समोरच्या खोलीत अकोल्याजवळच्या डोंगरगांवचे डॉक्टर श्री .देशमुख होते .माझे ह्यासगळ्यांबरोबर छानच जमले होते .डॉक्टर देशमुखांचे काका श्री.भाऊसाहेब देशमुख स्वातंत्र्य-सैनिक होते . त्यांचे मोठे भाऊ डोंगरगांवचे सरपंच होते, मधले भाऊ मुंबईला विक्रीकर खात्यात , विक्रीकर निरीक्षक , पदावर कार्यरत होते ,सगळ्यात लहान भाऊ बाळासाहेब कृषिखात्यात ,पंजाबराव कृषी विद्यापीठात नोकरीला होते .मी डोंगरगांवला त्यांच्या घरी मधून मधून जात असे . श्रीमती नानोटी बाईंच्या भावाची अकोल्याला , श्री. विजय ईंडस्ट्री नावाचा कारखाना होता . श्री.नानोटी गुरूजींचे मोठे भाऊ , पंचक्रोशीत प्रसिध्द व नावाजलेले श्री. नानासाहेब , प्रसिध्द वैद्य होते . पुतण्याही मुर्तिजापूरला डॉक्टर होता .श्री.नानोटी गुरूजींच्या वाड्यात डॉ. कुळकर्णी गुरूजीही राहत.त्यांच्या घराजवळच मलेरीया खात्यातील श्री.देशमुख तसेच बांधकाम खात्यात काम करणारे श्री. काळे साहेब राहात होते. माझे नवीनच झालेले मित्र श्री.शंकरराव बोळे आमच्या घरा जवळच राहात .ह्या सर्वांशी माझी चांगली गट्टी जमली होती.

शाळेत तर सर्व शिक्षकवृंद , विद्यार्थांचा मी आवडता गुरूजी झालेलो होतो. सकाळीच शाळेत गेलो की मला मुख्याध्यापक श्री. देशमुख. गुरूजींच्या आदेशाप्रमाणे प्रार्थनेला पी. टी.आय. म्हणून हजर असायचो . नंतर शिष्यवृत्ती परिक्षेची तयारी , वर्ग ४ तसेच वर्ग ७ च्या विद्यार्थ्यांचे विषेश वर्ग घेई . त्यानंतर शाळेचे विविध अहवालाचे काम करण्याची जबाबदारीही माझेवरच दिली गेली . शाळेच्या वरच्या वाड्यात श्री.देशमुख आप्पा , श्री. जोशी गरूजी , श्री. जामेादे गुरूजी तसेच श्रीमती जोशीबाई राहात . माझी जेवणाची , दुपारच्या चहाची सोयग वरच्या वाड्यातच असे , बोलवायचे मुख्याध्यापक पण बहुतांशी श्रीमती जोशी बाईंनाच चहा करायला सांगीतले जायचे .श्रीमती जोशीबाईंना स्वयंपाकही फारसा येत नव्हता मुख्याध्यापक श्री. देशमुख आणी इतर शिक्षक श्रीमती जोशीबाईंची मधूनमधून फिरकी घेत असत. एका प्रकारे जोशी बाईंचे कम्पलसरी ट्रेनिंग सुरू होते . मी गहू दळण्यासाठी आणलेली पिशवी सकाळीच ,माझ्या सायकल वरून अदृुश्य व्हायची . दुपारी घरी जातांना त्या पिशवीत गव्हाचे पीठअसायचे .

गावाच्या सरपंच श्रीमती देशमुखबाई होत्या . त्यांचे मोठे दिर श्री. जे . वाय,. देशमुखसाहेब जिल्हा परिषद, अकोलाचे , मुख्य कार्यकारी अधिकारी , म्हणून कार्यरत होते . मुंबई – कलकत्ता व्हाया नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरच कुरणखेड हे गांव होते . बव्हंशी शासकीय / निमशासकीय कार्यालयाचे अघिकारी, कर्मचारी कुरणखेडलाच मुख्यालयी राहत होते . डॉ. देशमुख होमिओपँथीची औषधे देत असत .त्यांच्या अकोल्याच्या होमिओपँथी कॉलेजचे , प्राचार्य ,डॉक्टर श्रॉफ होते . त्यांना मी माझ्या लहानपणापासून चांगले ओळखत होतो . अत्यंत हुषार आणि निष्णात डॉक्टर म्हणून त्यांची प्रसिध्दी होती . ते ति . मोठे मामांच्या घरी कौटुम्बीक संबंध असल्याने नेहमीच येत असत . मी आणि लहान मामांची मीठ खाण्याची जणू शर्यतच लागायची . डॉक्टर श्रॉंफांची औषध घेतल्या नंतर आमची अति मीठ खाण्याची सवय बंद झाली होती .
एकदा कधी नव्हे त्यावेळी नवीन कुरणखेडमधील कादर नांवाच्या मुलाला कुळकर्णीसरांच्या सायकलवर घेऊन शाळेत आणत होतो . अचानक त्या मुलाचा एक पाय सायकलमधे पुढच्या चाकात गेला , सायकलच्या पुढच्या चाकाचे ७-८ स्पोक तुटले,कादरचा पाय रक्ताळला गेला. मी त्याला घेऊन शाळेजवळच्या डॉक्टर देशमुखांकडे घेऊन गेलो . त्यांनी कादर खानच्या पायाला मलमपट्टी करून दिली .औषधीही दिली . मी कादरला घेऊन ,त्याच्या घरी पोहेाचविले . सायकल श्री. कुळकर्णी सरांसोबत अकोल्याला नेऊन दुरूस्त करून दिली

नवीन कुरणखेड गावात माझे मित्रमंडळात श्री. वामनराव बोळे , नाटकवाले सप्रे कुटुंबीय कधी सामील झाले ,कळलेच नाही. श्री. नानोटी गुरूजींचा मित्रपरिवार खुप मोठा होता. ते स्वत: ” पाणी रे पाणी तेरा रंग कैसाss , जिसमे मिलाए वैसा ,” ह्या म्हणीप्रमाणे सब गुणी मौला सारखे होते .सर्व बरे-वाईट गुणसंपन्न तसेच आधुनीक विचाराचे होते. कमलपत्राप्रमाणे चिखलातील पाण्यात राहूनही पाण्याचा थेंबही धरून ठेवायचे नाहीत . त्यांचे आयुष्यातील गमतीजमती ते लहर आली तर खूप रंगवून सांगत .त्यांच्या मते नवीन पिढीने बरे वाईट अनुभव स्वत: घेऊन आधुनिक विचाराने असे का ? कसे ? कधी ? स्वत: निर्णय घेणे आवश्यक आहे . सप्रे कुटुंबीयातील सगळे सदस्य ,अगदी ६ व्या वर्गात शिकणार्या मुलीसह नाटकात काम करीत . त्यासाठी ते सर्वजण गावोगावी फिरत . मलेरीया सुपरवायझर श्री. देशमुखांचा सप्रे कुटुंबीयांशी घरोब्याचे संबंध होते.

कुरणखेडला आमचा ग्रुप चांगलाच जमला होता .शाळेतील श्री. छत्रपालसिंह राजपूत सरांनी आम्हा सर्व शिक्षकांना वर्धा राष्ट्रभाषा प्रवीण , हिंदी परिक्षेला बसविले होते. आमच्या कुरणखेड केंद्रातील ८०% शिक्षक ऊत्तीर्ण झाले होते.मी कुरणखेड केंद्रात प्रथम आलो होतो . त्यानिमित्ताने गेट-टुगेदर पार्टीत इतर सर्व शिक्षक-शिक्षिकाही सामील झाल्या होत्या . एकंदरीत सर्वत्र अत्यंत खेळीमेळीचे व सलोख्याचे वातावरण तयार झाले होते . मला ह्यातून नवनवीन गोष्टी , अनुभवातून शिकायला मिळाले .

सर्व शिक्षकांनी मिळून दर महिन्यात प्रत्येकी १० रूपये प्रमाणे भि .सी . सुरू केली होती . परतफेड १० रूपये अतिरीक्त प्रमाणे करून तात्पुरते कर्ज घेण्याची सोयही करण्यात आली होती.

नवीन कुरणखेड जुन्या गावापासून दोन मैलावर होते. गांवातील घरे लांब लांब अंतरावर होती .त्यामुळे मधून मधून चोरीचे प्रकार होत . दिवाळी जवळच आली असल्याने घरोघरी गोड-धोड पदार्थ जसे लाडू , करंजी , अनारसे तसेच चकली ,शेव …..इ. तयार करण्यात येत होते . श्री . नानोटी गुरूजींचे घर म्हणजे एक मोठा दुमजली वाडाच होता. वरच्या मजल्यावर खोल्या काढलेल्या होत्या .खालच्या भागात स्वयंपाक-घर ,कोठी-घर ,वैद्य नानासाहेबांचा चार खोल्यांचा प्रशस्त दवाखाना होता , अत्यवस्थ रोग्यांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी तीन खोल्या राखून ठेवण्यात आल्या होत्या .स्वयंपाक-घराच्या लागूनच नानोटींच्या वृध्द मातोश्रींची झोपण्याची खोली होती . झोपण्याच्या पलंगाजवळ हवेसाठी मोठी खिडकी होती .

दिवाळी पंधरा दिवसांवर आलेली असल्याने सगळ्या गृहिणींची वेगवेगळे पदार्थ तयार करण्याची लगबग जोरात होती .रात्री उशीरापर्यंत जागरणं होत असत . अंथरूणावर पाठ टेकल्या-टेकल्या कोणाला कधी झोप लागली हे समजले नाही .सर्वांना गाढ झोपा लागल्या . लहान आवाजाने झोपमोड होणार नव्हती . ह्याऊलट वृध्द मातोश्रींची झोप मात्र जागृत होती . एकदा मध्यरात्रीनंतर ४ – ५ चोर खिडकिचे गज वाकवून मातोश्रींच्या खोलीत शिरले . चोरांना वाटलं म्हातारी गाढ झोपलेली असेल .म्हातारीला ओलांडून चोर आत शिरले . म्हातारीने प्रसंगओळखला . अंधार असल्याने एका चोराचा पाय म्हातारीला लागल्याचे त्याच्या लक्षात आले नाही.एका चोराने स्वयंपाक घर शोधलं , इतरांना स्पर्शाने मागोमाग बोलावले , सगळ्यांना बनविलेल्या पदार्थांच्या ताज्या वासाने आपल्याला प्रचंड भुक लागल्याची जाणीव झाली . तेवढ्यात म्हातारीचा झोपेतच बरळल्यासारखा आवाज आला , ”पोट भरून खा s s रे s s बाबांनो , आवाज जास्त करू नका , घरातले इतर लोक जागे होतील नाही ss तर . चोरांना वाटलं ,आपल्यापैकीच कोणीतरी बोललं असेल ! सगळ्या चोरांनी पोटाला तडस लागे पर्यंत खाल्लं ! ! आधीच तेलकट , तुपकट , त्यातच गोsड गोsड चव मग सर्वजणांवर निद्रादेवी अति s च प्रसन्न झाली . सगळ्यांना अगदि -गा s s ढ झोपा लागल्या . पहाट झाली , सर्व गृहिणी लगबगीने उठल्या , स्नानादी आटोपून त्यापैकी दोघीजणी स्वयंपाक घराजवळ आल्या , बघतात तो काय ? दरवाजा सता s ड उघडा , नी सगळे चोर गा s ढ झोपलेले .

पुरूष मंडळींना उठविण्यात आले . स्वयंपाक – घराच्या दाराची कडी बाहेरून लावून पोलीसांना पाचारण करण्यात आले . पंचनामा करायचा , तर चोरीला काय काय गेले ? कोणालाही सांगता आले नाही . शेवटी पोलीस चोरांना घेऊन पोलीस स्टेशनला गेले . तेथे जुन्या गावात श्रीमती अलका देशमुखबाईंच्या घरी तिसर्या मजल्यावर चोरी झाल्याची तक्रार घेऊन आल्या होत्या . चोरांनी साखर , चहा ,
तुर-डाळ पळविली होती .

मी आणि डॉक्टर देशमुख शंकर कुंभाराच्या खोलीत समोरासमोर राहात होतो .आमच्या दोन्ही खोल्यात बरेच वेळा रात्री सर्वत्र काळ्या मुंग्या निघत . ह्या मुंग्या कोठून येत कधीही समजले नाही . खोलीच्या सगळ्या भिंती ,छत , खाली फरशीवर , जणूं काही आच्छादनच ( cover ) केले आहे ,असे कोणालाही वाटे .सकाळी मात्र अचानकपणे जशा येत तशाच अंतर्धान पावत . परिणामी आम्हा दोघांनाही खोलीच्या बाहेर व्हरांड्यात पथारी पसरून निद्रादेवीची आळवणी करावी लागे .

मला नवीन कुरणखेडमधील दुधवालीच्या पाचवीतील मुलीची शिकवणी घ्यावी लागली होती . सकाळी मी चहा , नाश्ता , जेवण …..इ. ची तयारी करतां करता त्या मुलीची शिकवणी घेत असे . गुढी-पाडव्याचा दिवस होता , मी सर्वांना surprise करायचे असा विचार केला . मी एकटाच राहात होतो .वर्षारंभिचा पहिलाच सण म्हणून पुरणपोळी करायच ठरविले . माझ्याकडे वातीचा स्टोव्ह होता. दुकानदाराकडून आणलेले रॉकेल तेल स्टोव्हमध्ये पूर्ण भरलेले होते . हरबर्याची डाळ लहान पातेल्यात टाकली ,पाणी घालून डाळ शिजायला टाकली . मला वाटले दहा पंधरा मिनिटांत डाळ शिजेल ,पाहतो तर स्टोव्ह विझला होता . वाती जळून गेल्या होत्या ,पातेल्यातील पाणी संपले होते . स्टोव्हच्या वाती वर सरकऊन पुन्हा पातेल्यात थंड पाणी घालून डाळ शिजायला ठेवली. थोड्याच वेळात स्टोव्ह वुिझला . रॉकेल तर पुर्ण भरलेले होते . मग स्टोव्ह का विझला ? कारण समजेना .
तेवढ्यात दुधवालीबाई मुलगी घरी यायला उशीर कां झाला ? पाहायला आली . स्टोव्हवर पातेले , मी विचारात ? त्या बाईंनी डाळ शिजली .काय ? पहायला पातेल्याचे झाकण काढले . तिच्या लक्षात सर्व प्रकार आला . डाळ शिजली नाही , तर बठ्रठरली आहे ., कधीही शिजणार नाही . तिने विचारले गुरूजी पुरण-पोळीचा बेत आहे वाटते ! ! पण डाळ वाटणार कशावर ? मी ही डाळ घेऊन जाते . पुरण पोळ्या पाठवून देते . माझ्या तसेच डॉक्टर देशमुखांच्याही लक्षात
आले की, रॉकेलमध्ये पाणीच जास्त आहे . आम्ही दोघेही दुकानदाराकडे गेलो . त्याने झालेली चूक कबूल केली , पुन्हा भेसळ नसलेले रॉकेल दोन लिटर दिले व पुढे प्रकरण नेऊ नका अशी विनंती केली .

प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीला शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची प्रभात फेरी गावातून काढण्यात आली . प्रत्येक शिक्षक आपापल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसोबत होते , मी शाळेचा पि . टि . आय . असल्याने माझ्या हातात निर्गुडीचा फोक छडीसारखा होता . संपूर्ण प्रभात फेरी अगदी शिस्तीत , घोषणा देत , हातात घोषणांचे फलक घेऊन , बँडच्या तालावर कुरणखेड गावाच्या मुख्य रस्त्यावरून जात होती . ग्रामपंचायतच्या मैदानात आपल्या देशाचा मानबींदू असलेल्या तिरंगी झेंडा फडकविण्यात आला . झेंडावंदन , राष्ट्रगीत , सरपंच श्रीमती देशमुखबाईंचे , तसेच मुख्याध्यापक श्री . आप्पा देशमुख , गावातील प्रतिष्ठितांची थोडक्यात भाषणे झाली. मुलांना खाऊ म्हणून छान आंबटगोड गोळ्या वाटण्यात आल्या .

वर्ष संपत आले , शाळेच्या परिक्षा झाल्या , निकालही जाहीर झाले . उन्हाळ्याच्या सुट्या लागणार होत्या . मी अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षक तोही जादा शिक्षक असल्याने १ मे पासून सेवेतून कमी करण्यात आले .अकोला जिल्हा परिषदेतील सर्वच अप्रशिक्षीत प्राथमिक शिक्षकांना कमी करण्यात आले होते .

अन्वीमिर्झापूर

उन्हाळयाच्या सुटीनंतर ‘अप्रशिक्षित जादा शिक्षकांना ‘१ जुलै १९६४ पासून पुन: नियुक्तीचे आदेश अकोला, जि.प.शिक्षणाधिकारी यांनी दिले.त्याप्रमाणे मला पंचायत समिती ,अकोला मधील अन्वी-मिर्झापूर येथे प्राथमिक शाळेत नियुक्ति
मिळाली.अन्वीमिर्झापूर हे गांव अकोला मुर्तिजापूर ह्या मध्य-रेल्वेच्या मार्गावरील बोरगांव रेल्वे स्टेशनपासून चार फर्लांगावर आहे.तेथील जि.प. प्राथमिक शाळेवर माझी जादा शिक्षक म्हणून नेमणूक झाली . तेथे कारंजाचे , श्री. देशमुखगुरूजी मुख्याध्यापक होते . ह्या व्यतिरीक्त पळसो-बढेचे श्री.बढे गुरूजी,श्री.तायडेगुरूजी व शेगांवचे ,श्री. बायसगुरूजीही होते. मी कामावर रूजू झालेा, पाचवा जादा शिक्षक महणून .मी आणि श्री. बायस गुरूजी बन्सीधरांच्या खोलीत राहायला लागलो . सायंकाळी आम्हीआठजण जेवावयाला एकत्र बसत होतो . श्री.हरिभाऊ आणि श्री.शंकरराव हे दोन मळेवाले,श्री.देशमुखगुरूजींचे भाऊ सगळे मिळून एका कुटूंबातीलच होतो , जणू . कामावर रुजू झालो त्यादिवशी मी मामाच्या घरून डबा आणला होता . दुपारच्या सुटीत श्री.तायडेगुरूजींनी घरी जातांना मला त्यांच्या घरी जेवायला चलण्याचा आग्रह केला .त्यांचे घर शाळेच्या जवळच होते.मला जातीभेद मान्य नव्हता. श्री.तायडे गुरूजी बौध्द होते . त्याच दिवशी दुपारच्या सुटीत मी त्यांच्या घरी जेवायला गेलो. त्यांच्या घरी म्हातारी आई , पत्नी , मुलगा मिळून ४ जणांचे चौकोनी कुटूंब होते . त्या दिवशी म्हातारीने तुरीच्या दाण्याचे मसाल्याचे वरण केले होते .ते मला फार आवडले

तेथील श्री.कादरपाटील , हे गांवचे पोलीस पाटील होते .त्यांचा लहान मुलगा तिसरीत शिकत होता .त्याला तिसरीत असुनही काहिच येत नव्हते. त्याची शिकवणी कोणीही घ्यायला तयार नव्हते ,मला सर्वांच्या आग्रहाखातर त्याची शिकवणी घ्यावी लागली .येथेही वयाने सगळ्यात लहान /अननुभवी पण शिक्षण सर्वात जास्त .श्री.कादर पाटलाचा एक मुलगा कॉलेजमध्ये अकोल्याला शिकत होता ,तर दुसरा मलगा बोरगांव-मंजू येथे दहावीत शिकत होता. त्या दोघांचीही शिकवणी घ्यावी , असा पोलीस पाटलांचा आग्रह होता. परंतू मला वेळे अभावी वरच्या वर्गातील मुलांची शिकवणी घेणे शक्य होणार नाही असे मी कादर पाटलांना प्रत्यक्ष भेटून सांगीतले . त्यांच्या लहान मुलाच्या शिकवणुकीबाबत मी त्यांना दोन अटीं सांगितल्या (१ ) मी त्यांच्या घरी शिकवणीसाठी येणार नाही , मुलाला मी माझ्या घरी शिकवीन.(२ ) मी दरमहा २० रूपये प्रमाणे चार महिन्याचे ८० रूपये अगोदर घेईन , त्याची प्रगती पाहून पुढे योग्य तो निर्णय घेऊ. श्री.कादर पाटलांनी सर्व अटी मान्य केल्या . शिकवणी सुरू झाली मुलगा सकाळी ८ वाजता शिकवणुकीला येवू लागला , मी घरचे काम करता करता शिकवायचो . दोन महिन्यात मुलाची चांगली प्रगती झाली . श्री.कादर पाटलांना बरे वाटले . त्यांचे घरी दुधदुभते होते ,त्यांचे घरून दही ,ताक , दूध ,..इ. मधून मधून पाठविले जायचे . श्री .बायस्कर गुरूजींना स्वयंपाक चांगला येत होता , मधून मधून कढी छानच बनवायचे ,भाज्यासुध्दा छानच करायचे .

त्यावेळी जिल्हा परिषदेच्या खाती पगाराची ग्रँट शासनाकडून न आल्याने तीन महिन्याचा पगार कोणालाच मिळाला नव्हता. मला B.Sc. Part One च्या परिक्षेचा Supplementary चा अर्ज भरायचा होता . परंतू परिक्षा फी ५० रू. भरायची सोय कशी करावी ? मला मार्ग सुचेना ! मुख्याध्यापक श्री. देशमुखगुुरूजीं आणि श्री.बायस्करगुरूजींना एक मार्ग सुचला . बोरगांव-मंजू रेल्वे-स्टेशनवर अकोल्याच्या श्री.हाशमशेटचा बंगला आहे .त्यांचेकडून ५० रूपये हातऊसने घेवून पगार झाल्यावर परत देता येतील.मला हा विचार पटला .त्याप्रमाणे त्याचदिवशी शाळा सुटल्यावर श्री. हाशमशेटच्या बंगल्यावर जायचे ठरविले .श्री.देशमुखगुरूजी आणि श्री.बायस्करगुरूजींना घेवून मी सायंकाळी जेवणं झाल्यावर श्री.हाशमशेटच्या बंगल्यावर पोहोचलो .त्यांना सर्व समजावून सांगीतले .त्यांना आपला एका शिक्षक उच्च शिक्षणासाठी धडपडतो आहे ,ही बाब फार आवडली.त्यांनी लगेच ५० रूपये काढून दिले.परत घरी येतांना श्री.बायस्कर अंधारातून येतांना विंचू चावला . ह्यापुढे मला पुढे कोणतीही अडचणआल्यास न संकोचता येण्यास श्री. हाशमशेठ यांनी सांगीतले.मी लगेच अकोल्याला जावून परिक्षेचा फॉर्म भरला.

श्री.हरीभाऊंच्या आणि श्री. शंकररावांच्या मळ्यात केळी ,पानकोबी , फुलगोबी , ऊस ,…इ . ची लागवड केलेली होती .आम्ही सर्वजण सुटीच्या दिवशी त्यांच्या मळ्यात कधी शाकाहारी ,कधी मांसाहारी जेवणासाठी आमंत्रीत असायचो .ते दोघेही मुळचे खानदेशातील निवासी असल्याने भाज्या अतिशय तिखट असायच्या. पहिल्याच दिवशी जेवतांना ,पहिल्याच घास घेतला , आणी अतितिखट भाजीमुळे जोराssचा ठसका लागला , इतका की ५ मिनिटे ठसका काही थांबेना .सर्वजण घाबरले . तांब्याभर पाणी पिऊन झाले , गुळाचा मोठा खडा हळुहळू खाऊन झाला . ठसका कमी झाला. नंतर माझ्यासाठी भााजी , फिक्की करून जेवणं झाली.

अन्वी मिर्झापूरला आठवडी बाजार दहीगांव – गावंडेचा बाजार , दर गुरूवारी असायचा . बाजाराची जबाबदारी माझेकडे होती . एकदा मी एकटाच दहिगांव -गावंडेला बाजारासाठी गेलो . बाजारातून निघतांना ऊशीरच झाला . सायकलवरून येतांना रस्त्यातच अंघार झाला . शेतीतून येतांना लागलेली पाऊलवाट चुकली , नी मी शेतातल्या उभ्या पिकात कधी शिरलेा ते कळलेच नाही . मी सायकल हातात घेऊन गावातल्या चक्कीच्या डिझेल इंजिनाच्या आवाजाच्या दिशेने जायला लागलो गांवाच्या बाहेर असलेल्या उकिरड्यावर उतरलो ते दिसलेच नाही , कारण जवळ बँटरी नव्हती ना ! कसातरी घरी पोहोतलो , सर्वजण चिंताक्रांत होऊन काळजी करीत होते .

बोरगांव-मंजू रेल्वे स्टेशन अगदी लहान आहे , तेथे एक्सप्रेस , मेल ,गाड्या थांबत नाहीत , पँसेंजर गाड्या थांबतात .प्लँटफॉर्म नाहीत , अन्वी -मिर्झीपूरला जाणारे रेल्वे-प्रवासी रेल्वे डब्याच्या पायर्या वरून उतरतात . बोरगांव बस स्टेशन पासून रेल्वे स्टेेशन ,४ मैल अंतरावर आहे . पँसेंजर गाडी रात्री ९ वाजता बोरगांवला येते. एकदा मीअकोल्याहून निघालो , गाडीत श्री. बायस्कर गुरूजी भेटले ,१५ मिनिटांत बोरगांव रेल्वे स्टेशन येते , त्यामुळे आम्ही दोघेही दरवाज्याजवळ थांबलो होतो. गाडी फक्त २ मिनिटे थांबते , श्री . बायस्करगुरूजी प्रथम उतरले , मी माझी कपडे असलेले थैली त्यांच्याजवळ दिली , पण मी उतरण्यापूर्वीच गाडी सुरू झाल्याने , नाईलाजाने पुढच्या काटेपूर्णा स्टेशनवर उतरलो . थंडी होती ,जवळ कपडे नाहीत , पैसे नाहीत, परत जायला गाडी नाही.काटेपुर्णा रेल्वे स्टेशनवरून ३ मैलावर कुरणखेड गांव आहे . रस्त्यावर दिवे नाहीत . रात्री २-४ च प्रवासी रेल्वेने येतात .काटेपूर्णा स्टेशन मास्तरांनी मला तिकीट विचारले , मी त्यांना सत्य परिस्थिती सांगीतली . मला स्टेशन मास्तरांनी ,त्यांच्या घरी बरेच पाहुणेआले असल्याने , घरी नेणे शक्य नव्हते . मी ऑफीस बाहेरच रात्रभर थांबलो .सकाळी गांवात पोहेचलो. योगायोगाने कुरणखेड मराठी माध्यमिक शाळेवर माझे अन्वी मिर्झापूरहून बदलीने स्थानांतरण झाल्याचे आदेश आले होते . तेथील मुख्याध्यापकांना मी जावून भेटलो . त्यांचेकडून तात्पुरते उसने पैसे घेऊन मोटार-गाडीने बोरगांव मार्गाने अन्वी मिर्झापूरला पोहोचलो.

मुक्काम घुसर :

माझी शाळेतील सगळया गुरूजनांशी , मुख्याध्यापक श्री .मानकर गुरूजींनी ,ओळख करून दिली. सगळ्यात वृध्द श्री. गोरले गुरूजी होते . अकोला जवळ असलेल्या भौरदचे गावंडे गुरूजी होते . मी एकटाच सर्वात तरूण, कॉलेजमध्ये शिकलेला होतो. इतर सर्वजण १०-१५ वर्ष अनुभवी शिक्षक होते. बहुतेक शिक्षक ७ वी झालेले , आणि नॉर्मल स्कुल मधून शिक्षकाचे ट्रेनिंग घेतलेले , विवाहीत ,मुले, मुली असलेले होते. अकोला पंचायत समिति समितिचे सभापति , श्री. ओंकारराव पागरूत घुसरचेच राहणारे होते. घुसरचेच डॉक्टर पागरूत ह्यांनी शिक्षक पदाचा राजीनामा दिला होता . त्यांच्याच तिसर्या वर्गातील मुलांना, मला शिकवावयाचे होते . आतापर्यंत मी शिकत होतो. ह्यापुढे मला लहान मुलांना गोडीगुलाबीने शिकवावयाचे होते , न चिडता , शक्यतो न मारता . ते जानेवारीतील थंडीचे दिवस होते .
माझ्यासाठी २-४ महिने राहण्यासाठी घराचा शोध सुरू होता .मला शाळेजवळच राहण्यासाठी जागा मिळाली . माझेसोबत श्री . गावंडे गुरूजी राहायला आले . मी वातीचा स्टोव्ह , पोळपाट ,बेलणे , तवा , सराटा ,दोन पातेले , चमचे , पकड , चहागाळणी , दोन कपबशा …इ . आणले होते . मी बनविलेली पहिली पोळी म्हणजे आस्ट्रेलीयाचा नकाशा झाला होता . आतापर्यंत कधीही स्वयंपाक करायचे कामच पडले नव्हते . श्री . गावंडे गुरूजींनी मला हात न लावता पोळपाटावर गोल पोळी कशी लाटावी , ह्याचे प्रात्यक्षिक दाखविले . चवीष्ट चहा , भाजीही करायला शिकविले . घुसर हे गांव फार मोठे नव्हते . तेथे पिण्याचे पाणी गावाजवळच्या एकमेव तलावातून आणावे लागायचे . ऊन्हाळ्यात तलाव आटायचा . काही व्यक्ति कावडीने पाणी पुरविण्याचा व्यवसाय करीत .
मी सुटीच्या दिवशी अकोल्याला मामांकडे जायचेा .ति.गं. भा.आजीला ‘ घुसर ‘ हे गांव अकोला येथून ८ मैलावर , खारे-पाणी पट्यात आहे ,पिण्याचे पाणी गावाजवळच्या तलावातून आणावे लागते . २५- ३० वर्षापासून घुसर गांवात फार बदल झालेले नाहीत ,सगळे माहिती होते.
शिक्षकांचे एक दिवसाचे शिबीर जवळच्या आपातापा येथे होते . पोट-शिक्षकांची तेथे सभाही होती . त्या दिवशी आम्ही शिक्षक-शिक्षिका सकाळीच ३ मैल पायी चालतच आपातापा येथे पोहोचलो . मी एकटाच कोट-प्यांटमध्ये होतो .सर्वात तरूणही होतो . आमच्या मुख्याध्यापकांनी माझी सर्वांशी ओळख करून दिली . चहा ,नाश्ता झाल्यावर सगळ्यांनी आपापल्या अडचणी मांडल्या . मार्च-एप्रीलमध्ये घ्यावयाच्या परिक्षेबाबत पंचायत समिती , विभाग- शिक्षणाधिकारी यांचेशी चर्चा , झाली . त्यांनी सविस्तदर मार्गर्शन केले . मध्यंतरात जेवणे झाली.पुन्हा चर्चासत्र सुरू झाले.सायंकाळी कार्यक्रम संपला .दरम्यान मला अस्वस्थ वाटू लागले.कुणाचेतरी डोळे माझा पाठलाग करताहेत असे मला वाटत होते. घुसरला सर्वजण परत आलो. त्या रात्री मी ग्रामपंचायत गोडाऊन मध्ये मलेरिया कर्मचार्यांसोबतच झोपलो. मला खूूप ताप आला. दुसर्या दिवशी मी डॉक्टरांचा सल्ला घेतला ,अतिशय थकवा आला होता.मी तांतडीने मेडशीला जायचे ठरविले. मोटार स्टँडवर मिळेल त्या एस .टी .ने मेडशीला निघालो . त्यावेळी डव्हा येथे श्री. नाथ नंगेमहाराजांची यात्रा सुरू होती.मी मेडशीला रात्री १० वाजता कसाबसा घरी पोहोचलो. ति.सौ.आईने दरवाजा उघडला ,मी आsssईss एवढीच हाक मारली नी घाडकन खाली बेशुध्द होउन पडलो . शुध्दिवर आलो तेच मुळी ३ तासांनी. मेडशीचे डॉक्टर पाठक तोपर्यंत माझ्याजवळच बसून होते .सर्वांना हायसे वाटले. १५ दिवसांनी प्रकृतित सुधारणा झाल्यावर डॉक्टर पाठकांच्या परवानगीने कामावर जायचे ठरविले. डॉक्टरांचे तसे मेडीकल सर्टिफिकेट घेतले. ति.आईच्या मते मला कोणीचीतरी जबरदस्त नजर लागली असावी. डॉकटर पाठकांच्या मते मला ‘व्हायरल फिवर ‘ आला होता.मला आईने विचारणा केली , त्यावेळी मी अगोदरच्या दिवशी आपातापा या गावाला शिबीराला गेल्याची हकिगत सांगितली. त्या रात्रीच मला अचानक अस्वस्थ वाटू लागले, कोणीतरी माझ्याकडे एकसारखे पाहत आहे .पाहणराचे टपोरे डोळे , माझा सतत पाठलाग करित आहेत ,असा भास होत होता हे सांगीतले. हे सगळे ऐकल्यावर आईने माझ्यावरून मीठ – मिरच्या ओवाळून चूलीत विस्तवावर टाकल्या . त्यावेळी कोणालाहि ठसकाss आला नाही,मग मात्र आईची खात्रीच झाली की मला नक्कीच नजर झाली होती. आजारातून बरे झाल्यावर सुमारे १५ दिवसांनी मी वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन पुन: शाळेवर हजर होण्यासाठी मेडशीहून निघालो .

मी घुसरला शाळेवर हजर होण्यासाठी अकोल्याला अकोट स्टँडवर गेलो. तेथून टांग्यात बसून घुसरला निघालो.टांगा बाबू टांगेवाल्याचा होता.जाताजाता गोष्टी सुरू झाल्या,त्यावेळी शाळेच्या गोष्टिही निघाल्या.घुसर गांव तसे चांगलेच आहे.अकोला ह्या ८ मैलावरच्या, जिल्ह्याच्या ठिकाणाशी चांगल्या रस्याने जोडलेले आहे.गांवाला तलावाचे पाणी पिण्यासाठी आणावे लागते . उन्हाळ्यात तलावाचे पाणी कमी होते.तेवढाच त्रास आहे .अकोला पंचायत समितीचे सभापती, श्री. ओंकारराव पागरूत हे घुसरचेच आहेत. गांवात माध्यमिक शाळा ,सातव्या वर्गापर्यंत आहे. हेडमास्तर ,श्री. मानकर खूप अनुभवी आहेत.सगळे मास्तरही अनुभवी आहेत.आता काळानुरूप ३-४ जण नवीनआले आहेत.दोन शिक्षिका आहेत, त्या
अकोल्याच्याच आहेत. नवीन आलेले दोन शिक्षक,तेही तरूणआहेत, अकोल्याचेच आहेत. पण त्यापैकी नवीन आलेल्या श्री. लोणकर गुरूजींना मला भेटायचे आहे. ते १० – १५ दिवस सुटीवर गेलेले आहेत . तसे ते गुरूजी खूप शिकलेले आहेत . सर्व मुला – मुलींना ,गुरूजींना आवडतात. पण माझ्या तिसरीतल्या मुलाला त्यांनी हातावर स्केलने मारले होते,त्याचा अंगठा २ दिवस दुखत होता. मी श्री. बाबू टांगेवाल्याच टांग्यात त्याच्या जवळच बसलो होतो. मी त्याला विचारले ,त्या गुरूजींनी फक्त तुमच्याच मुलाला का बरे मारले असावे ? त्यावर बाबू टांगेवाला म्हणाला,नाही , नाही त्या गुरूजींनी , सर्वच मुलांना १ – १ छडी मारली होती कारटं तस मस्तीखोरच आहे. त्यानच छडी मारायच्यावेळी हात फिरवला आसल ! छडी लागली अंगठयावर. पोरान तस कबूलही केल आहे .माझ्या मनात आता त्याचा राग नाही.

पण मला त्या गुरूजींना भेटीयच आहे,एकदा तरी . तोपर्यंत गांव आलं होत .त्याने मला विचारले, तुम्हाला कोठे जायचे आहे गांवात ? नवीनच दिसता , म्हणून विचारले ! मी म्हणालो मला शाळेत काम आहे. आम्ही सगळे खाली उतरलो. बाबू टांगेवाला म्हणाला चला , मलाही शाळेतच काम आहे , सोबतच जावु . आम्ही दोघेही शाळेत पोहोचलो . ऑफीसात गेलो , सर्वांना नमस्कार केला.
सर्व गुरूजींनी ही माझे स्वागत केले , नमस्कार ! या लोणकर गुरूजी, आता बरं वाटतयना ? आम्हा सर्वांना तुमचीच काळजी वाटत होती .शाळेतील विद्यार्थिही तुमची वाट पहात आहेत . दोन महिन्यातच तुम्ही सगळ्यांना लळा लावला . माझ्या सोबत बाबू टांगेवाला आला आहे हे सगळे विसरूनच गेले होते .

आमच्या शाळेत ऑफीसमध्येच पोस्टऑफीस होते . शाळेचे मुख्याध्यापकच पोस्ट-मास्तरही होते.श्री. मानकर गुरूजींनी बाबू टांगेवाल्याला बसायल सागितले. काय काम काढलं आहे बाबू ? बाबू म्हणाला , ‘ मी लोणकर गुरूजींनाच पाहायला आणि भांडायला आलो होतो. मग त्याने मुलाच्या अंगठ्याला मारामुळे आलेल्या सुजेबद्दल सांगीतले , नवीन आलेल्या गुरूजींनी सर्वांबरोबर मारले म्हणालं पोरगं . त्यांनाच पाहायला व भेटयला आलो होतो . आता समजलं हेच ते नवीन आलेले लोणकर गुरूजी ! अहो हे गुरूजी अकोल्याहून माझ्याच टांग्यात आले ,आमच्या खुप गप्पा रंगल्या ,मलाही हे गुरूजी आवडले ,तुमच्या सर्वांना आवडले तसेच.आता माझ्या मनातला राग केव्हाच गेला. ह्या गुरूजींनी मुद्दाम , दुखापत व्हावी म्हणून मारलं नव्हत. माझ्याच मस्तीखोर कारट्यान हात ओढला म्हणून छडीचा मार अंगठ्यावर लागला . हे मला पटलं आता . मी बाबू टांग्यावाल्याची माफी मागीतली . तो म्हणाला’ तुमची चुकच नाही ! तर माफीची गरज नाही . उलट गांवात तम्हाला कोणताही त्रास झालाच तर मी तुमच्यासोबतच राहीन. पुन्हा भेटूच .
सर्व गुरूजनांना बाबू टांगेवाला पहेलवान माणूस आहे, तो केव्हा बिथरेल नेम नसतो हे माहीती होते. पण आता सर्वांची काळजी मिटली होती . मी डॉकटरांचे सर्टिफिकेट व गैरहजेरीच्या काळासाठी रजेचा अर्ज श्री. मानकर गुरूजींना दिला. परिक्षा जवळ आल्या होत्या. मला परिक्षाप्रमुखाची जबाबदारी सर्वानुमते दिली गेली . श्री . गोरले गुरूजींनी माझी कामाची पध्दति खूपच आवडली .त्यांनी सर्वांसमोरच भविष्यवाणी केली , ” श्री . लोणकर गुरूजी मोठे साहेब होतील .” मी दर आठवडयाला अकोल्याला मामाकडे जायचो त्यावेळी श्रीमती मोहरीलबाई सोबत असायच्या ,त्यांचा लहान भाऊ माझ्यासोबत इयत्ता ९-१० -११ ला शाळेत शिकत होता . तो भुमितीत फार हुषार होता.१० वीत असतांनाच ११ वीची भुमितीची प्रमेय स्वत:च तयार करून सरांना दाखवायचा . श्रीमती मोहरीलबाई जुन्या शहरातच साधुबुवाच्या मठजवळच राहायच्या . त्यांच्या घराजवळच पुढे दाबकी रोडवर ति. मामांचे घर होते . श्रीमती करमरकरबाईही अकोल्याच्याच ,रतनलाल प्लॉटमध्ये राहायच्या. त्यांचे वडील अकोल्यालाच नगरपालीका शाळा क्रमांक १ मध्ये प्राथमिक शिक्षक होते . वर्ग पहिली ते सातवी च्या परिक्षा वेळापत्रकाप्रमाणे , पार पडल्या . इयत्ता चौथी आणि सातवीच्या सार्वत्रीक परिक्षाही पार पडल्या.

घुसरला मधून मधून सप्रे बंधू नाटक कंपनी येत असे. ह्या कुरणखेडच्या कंपनीने निरनिराळी मराठी नाटके बसविलेली होती. काम करणारे सगळे नट , नट्या एकाच कुटुंबातील होते. त्यावेळी नाटक बंद स्टेजवर असे. स्टेजच्या समोर मोठ्ठ्या चौकोनी खड्यात गांवातील प्रतिष्ठीत व्यक्तिंना आमंत्रित करून बसविले जाई. गांवातील आणि आजूबाजूच्या गांवातील प्रेक्षकवर्ग आपापली सतरंजी घेवून बसत असत. नाटकाच्या जागेभोवती कपड्याचे पडदे लावलेले असायचे. त्यावेळी प्रसिध्द झलेली त्यांच्या नाटकापैकी ‘भांडखोर बायको ‘ हे गमतीदार नाटक सर्वांना खूप आवडायचे. साध्यासाध्या संवादातील मजेदार व निख्खळ विनोदामुळे सर्व प्रेक्षकवर्ग खळखळून हसत असे .” घटका गेली, पळे गेली, तास वाजे ठणाssणा !, आयुष्याचा नाश होतो, राम तरी म्हणाना ” हे पद माझ्या
आजही स्मरणांत आहे. ‘जाssरे भटजीला घेऊन ‘ये ‘ अर्घवट ऐकून मुलगा जाऊन ‘भटजी ‘ ऐवजी ‘ ट ‘गाळून बाजूच्या हॉटेलमधून १ किलो ‘ भजी ‘घेऊन येतो.हे काय ? मुलगा विचारतो ,पुरतील ना !, तळलेल्या मिरच्या वेगळ्या आणल्या आहेत !, गावात किर्तन करणारे बुवा महाराज एका मुलाला बाजूच्या दुकानातून ‘ ‘ खडीसाखर ‘आणयला पाठवितात . तोपर्यंत बुवा महाराजांचा ‘ अभंग ‘ संपलेला असतो . ‘ तssर तुकाराम महाराज काय म्हणतात ? ‘ तेवढेयात परत आलेला मुलगा येऊन मोठ्या आवाजात सांगतेा ,” खडीसाखर नाही ! संपली म्हणतात ”

उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या नी ”अप्रशिक्षित शिक्षक जादा शिक्षकांना ” मे आणि जुन २ महिन्यासाठी अकोला जिल्हा शिक्षणाधिकार्यांच्या आदेशाप्रमाणे कमी करण्यात आले . मला सर्व शिक्षकांनी एका छोट्या समारंभानंतर निरोप दिला. मी सर्व गुरूजनांचे व गांवकर्यांचे सहकार्याबद्दल आभार मानले. विशेषत:बाबू टांगेवाल्याने मला अकोल्याला मामाच्या घरी रोहोचविले. मी घुसरच्या वयोवृध्द श्री.गोरले गुरजींची ”तुम्ही मोठे वर्ग १ अधिकारी होणार ”ही ,’भविष्यवाणी ‘ सदोदित लक्षात ठेवली. भौरदच्या श्री. गावंडे गुरुजींनी हातही न लावता गोल पोळ्या कशा लाटायच्या ह्याचे तंत्र शिकविले . त्या अगोदर माझ्या पोळ्या श्रीलंकेचा – आस्ट्रेलीयाच्या नकाशाच्या प्रतिकृतीच असायच्या . श्री .दोळ गुरूजींकडून थोडी नाट्यकला शिकलो . इतर सहकार्यांकडून प्रेमाची देवाण घेवाण आणि मनाची शांतता ठेवणे ….इ. , शिकण्याचा प्रयत्न करणे शिकलो .माझ्या भावी नोकरीच्या काळात मला ह्या सगळ्यांचा खूप उपयोग झाला.

पुढे काय!?

मी लहान ५ -६ वर्षाचा असतांना ति. मोठेमामा भोनला आले होते. त्यावेळी घरची आर्थिक परीस्थिती हलाकीची होती. तसेच गांवात फक्त चौथीपर्यंतच शाळा होती. ह्या सगळ्या परिस्थितिचा विचार करून ति.मोठेमामांनी , आई-बाबांना वचन दिले. !
” मी तुमच्या मुलाला अकोल्याला शिकायला घेउन जातेा , मॅट्रिकपर्यंत माझ्याच जवळ ठेवतो, सगळा खर्च करीन. तुम्ही दोघेही मधूनमधून भेटायला येत जा. तोपर्यंत तुमची परिस्थितिही सुधारेल.” त्यानंतर संधी मिळताच त्यांनी ति.बाबांनाही मेडशीला शाळेत सरकारी नोकरीत लावून दिले. माझ्या शिक्षणात खंड पडला नाही. मामांकडेच राहिलो, अकरावी मॅट्रीक झाल्यावर पुढे काॅलेजमध्ये दोन वर्षे शिकलो. गांवापेक्षा मेडशीला नोकरीला असल्याने आर्थिक परिस्थितिही सुधारली होती. ह्या सगळ्या बाबींचा साकल्याने विचार केला , आई-बाबांशीही विचार- विनिमय केला.ति. मोठेमामांशी चर्चा केल्यानंतर सर्वानुमते निर्णय घेतला.
“आता स्वत:च्या बळावर नोकरी करून पुढील शिक्षण घेत राहायच, प्रगति करायची , स्वत:बरोबर भावंडांचेही शिक्षण , विवाह….इ.च्या प्रगतीसाठी प्रयत्न करायचे”
त्याच दरम्यान जिल्हा परिषद, अकोला ,ची ‘अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षक’ पदांसाठी जाहिरात आली होती .ति.मोठेमामा पश्चिम वर्हाड विभागात , सुपरिन्टेडेटचे ,स्वीय सहाय्यक ,होते .त्यावेळी त्यांना सर्व शाळांच्या तपासणीसाठी जावे लागायचे .त्यामुळे गावोगावच्या प्राथमिक शिक्षकांना ,त्या गावच्या पुढार्यांकडून मिळणार्या , हरकाम्या व्यक्तिसारखी अपमानास्पद ,वागणूक दिली जाते , ह्याची कल्पना होती .गुरूजींना मिळणारी आदराची वागणूक दिली जात नाही. ह्याची जाणीव असल्याने , शिक्षकाच्या नोकरीस पसंती नव्हती . परंतू सर्वच गावात ,सरसकटपणे अशी वागणूक दिली जात नाही , हेही मान्य होते. त्यामुळे त्यांच्या संमतिनंतरच , मी अप्रशिक्षीत प्राथमिक शिक्षकाच्या जागेसाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतला . त्याकाळी सरळ निवड व्हायची .माझा नेमणुकीचा आदेश मेडशीच्या पत्यावर गेला .ति. रा.रा.बाबा तेा आदेश घेऊन अकोल्याला आले. अर्ज केल्यापासून चार महिन्यानंतर नेमणुकीचे आदेश निघाले होते.
मला ‘घुसर ‘ पंचायत समिती, अकोला, येथे जिल्हा परिषद मराठी माध्यमिक शाळेवर ‘जादा शिक्षक’ या पदावर नेमणूक , शिक्षणाधिकारी जि. प. अकोला ,यांच्या लेखी आदेशाप्रमाणे देण्यात आली. ‘ घुसर ‘ हे गाव अकोला येथून ८ मैलावर होते . अकोला रेल्वे स्टेशनच्या पलीकडे आपातापा रोडवर घुसर हे गांव होते . सदर रस्ता कच्चा होता , रस्त्यात दोन तीन खोल नाले होते . पलिकडल्या वा अलीकडल्या काठावरच्या कोणालाही नाल्यातला माणूस दिसत नसे . मी एकटाच सायकलने घुसरला निघालो . सुटीचा दिवस तसेच दुपार असल्याने रस्त्याने क्वचितच माणसे दिसत . गावांत पोहोचलो ,तो समोरच शाळा दिसली . त्याचवेळी मी समोरच्या व्यक्तिकडे मुख्याध्यापक श्री . मानकरगुरूजींची चौकशी केली .योगायोगाने मी ज्यांना विचारले तेच मुख्याध्यापक श्री . मानकरगुरूजी होते .त्यांना मी माझ्या ‘ जादा शिक्षक ‘ म्हणून घुसरला नेमणूक झाल्याचे सांगीतले . त्यांनी मला उद्या शनिवारी दि .२८/ १२/१९६३ रोजी सकाळी शाळेवर रूजूं होण्यासाठी होण्यासाठी येण्याचा सल्ला दिला . घरी परत आल्यावर मी घरी घुसरला जाऊन आल्याचे सांगीतले . ति .गं .भा .आजीच्या जुन्या आठवणीप्रमाणे घुसर हे खूप खार्या पाण्याचे गांव आहे . तेथे फक्त एकच तलाव आहे .सदर तलाव उन्हाळ्ळयात आटतो .

त्यावेळी अकोला येथे जिल्हा ऑलींपिकचे खेळ सुरू हेाते . मी दुसर्याच दिवशी, दिनांक २८ डिसेंबर १९६३ हया दिवशी घुसरला शाळेत कामावर रूजूं होण्यासाठी निघालो . जातांना मला डाबकी रोडवरचे माझ्या ओळखीचे पोस्टाचे सुपरवायझर भेटले .त्यांनाही पोस्ट तपासायला घुसरलाच जायते होते . ते वृद्ध असून पुढच्या सहा महिन्यानंतर सेवानिवृत्त होणार होते .आम्हा दोघांनाही घुसरला जाण्यासाठी एकमेकाची सोबत होणार होती . पोस्टाचा चार्ज शाळेच्या मुख्याध्यापकांकडेच होता . ते मला म्हणाले मी तुमच्या मुख्याध्यापकांना तुम्ही माझ्या सोबत आल्याने उशीर झाला असे सांगीन . आम्ही दोघेही घुसरला सकाळी ८.३० ला पोहोचलो . तेथे पोहोचल्यावर ते पोस्टाचे सुपरवायझर काहीच बोलले नाहीत .तेथे सिनिअर ग्रामसेवक श्री ,टापरेसाहेब बसलेले होते . त्यांनी माझा नेमणुकीचा आदेश पाहताच मुख्याध्यापकांना श्री . लोणकर गुरूजींची नेमणूक कोणात्या गुरूजींच्या जागेवर झाली आहे ,ह्यचाा खुलासा होत नाही. आपल्या शाळेतील श्री . पागरूत डॉक्टर गुरूजींनी राजीनामा दिला आहे . पण श्री .लोणकर गुरूजींची नेमणूक ‘जादा शिक्षक’ पदावर झाली आहे .त्यांना श्री .पागरूत गुरूजींच्या जागी कसे रूजू करून घेणार ? आपण जादा शिक्षकाची मागणीही केली नाही . तुम्ही आता ह्यांना शाळेत कामावर कसे काय रूजू करून घेणार ? पंचायत समितिच्या साहेबांकडून ह्यांना स्पष्ट खुलासा करून , घेऊन येण्यास सांगावे अले मला वाटते . आता ‘जादा शिक्षक ‘ शब्दाचा अर्थ लक्षात न आल्याने ,मला मुख्याध्यापकांनी , कामावर रूजू करून घेण्यास नकार दिला . तसेच मला श्री .टापरेंनी सुचविल्याप्रमाणे शिक्षणाधिकारी कडून योग्य तो खुलासा करून , घेऊन आल्यावरच मी तुम्हाला रूजू करून घेईन . मला आता काय करावे ? सुचले नाही.दुसरे दिवशी रविवार असल्याने पंचायत समिती /जिल्हा परिषद कार्यालयही बंद असणार होते . लगेचच्या कामाच्या दिवशी मी ,”मुख्याध्यापक, म. मा.शाळा , घुसर,पं .स.अकोला , ह्यांनी , मला कामावर रूजू करून घेण्यास , नकार दिला . हा आपल्या आदेशाचा ‘ अवमान ‘ करण्यात आला आहे , तरी आता योग्य तो आदेश तांतडीने देण्याची कृपा करावी ” , असा विनंतीवजा, तक्रार अर्ज, शिक्षणाधिकारी , जि. प. अकोला यांचेकडे घेऊन गेलो .

त्या दिवशी उप- शिक्षणाधिकारी, श्री. पुराणिकसाहेबांचे कार्यालयात सकाळी कार्यालय सुरू होण्याची वेळ होती .त्याचवेळी सहाय्यक उपशिक्षणाधिकारी, श्री. आमलेसाहेबांना , तांतडीचा फोनआला.” श्री. पुराणिकसाहेबांना Heart Attack आला आहे ,ताबडतोब या. माझा अर्ज वाचून ”श्री.आमलेसाहेबांनी ,पत्र लिहून ,त्या पत्रावर स्वाक्षरी केली , पाकीट बंद करून मला घुसरच्या मुख्याध्यापकांचा पत्ता लिहायला सांगून ते पाकीट त्यांना त्वरीत नेवून द्यायला सांगितले , नी स्वत: पुराणिक साहेबांच्या घरी तांतडीने गेले.
मी ते बंद पाकीट त्याच दिवशी , श्री.मानकर, मुख्याध्यापक , मराठी माध्यमिक शाळा , घुसर . ह्यांना नेवून दिले . त्यांनी ते पत्र वाचताच ,त्यांचा चेहरा पडला ,थरथरत्या हातांनी ,शिक्षकांचा हजेरीपट काढून माझेजवळ दिला . पत्रातील आदेशाप्रमाणे मला दिनांक २८डिसेंबर १९६३ रोजी रूजू झाल्याची सही ,हजेरीपटात करायला सांगितली .थोड्या वेळाने पाणी पिऊन झाल्यावर ,” तुम्हाला रुजू करून न घेता परत पाठविले , ही माझी मोठी चुकच झाली .”असे कबूल केले . त्यानंतर तसे स्पष्टिकरण करणाऱे पत्र (१ ) शिक्षणाधिकारी, जि. प. अकोला ,आणि (२) संवर्ग विकासअधिकारी ,पंचायत समिती ,अकोला, ह्यांना उलट टपाली पाठविले .

कॉलेज शिक्षण – नागपुर विद्यापीठ

त्यावेळी नागपूर विद्यापीठाला सपीठाची चाळणी म्हणत.विदर्भात गव्हाचे पीठअगदी बारीक चाळायला लागणार्या चाळणीला “सपीठाची चाळणी ” म्हणतात. नागपूर विद्यापीठाच्या परिक्शांचे निकाल अतिशय कडक लागत.१५ टक्केच् मुले उत्तीर्ण म्हणजे खूपच चांगला निकाल समजला जाइ एकेका वर्गात १०० विद्यार्थ्यापैकी फक्त १० टक्के विद्यार्थि कॉलेजमध्ये उत्तीर्ण होणे ही चांगल्या कॉलेजचे लक्षण समजत.ह्या बाबींचा विचार ति.मोठेमामांनी केला.मी अकरावी पास असल्याने सरळ प्रथम वर्ष विज्ञानला प्रवेश घेता आला असता. परंतु सर्वानुमते प्रि युनिव्हर्सिटी विज्ञानला प्रवेश घेतला.अकरावीत सर्व विषयाचे माध्यम मराठी होते. आता कॅालेजमध्ये शिक्षणाचे माध्यम इंग्रजीच होते. येथे वर्गात १०० विद्यार्थी होते. वेगवेगळे प्राध्यापक येवून त्या त्या विषयाचे लेक्चर देत, तुम्हाला सगळे समजले का ? समजले नसल्यास पुन्हा विचारा असेहि सांगत. पण आदरयुक्त भीतिने आणि एवढ्या सगळ्या समोर मी एकटाच कसा विचारू ? सगळे विद्यार्थी हसतील ! त्यापेक्षा सगळ्याप्रमाणे आपणही गुपचूप बसाणे योग्य वाटे. मग लेक्चर संपले की प्राध्यापक हाॅलमधून निघून जात . पण घरी गेल्यावर त्या त्या विषयाचे पुस्तक उघडले की काही काही समजत नसे. आता ह्यावर उपाय काय ? शाळेत गुरूजी प्रत्येकाला नांव घेवून समजले काय ? आपुलकीने विचारीत . मग मला शाळेतील श्री. जोग गुरूजींची प्रकर्षाने आठवण आली. स्वयं – अध्यापनाची सवय लाव ! पुढील आयुष्यात फार उपयोग होईल. मग मला त्यावेळीं घेतलेल्या Dictionary ची आठवण झाली. पुन्हा Science dictionary विकत घेतली. स्वयं अध्यापन सुरू झाले.ह्या काॅलेजमध्ये शिकवायला सर्व प्राध्यापक श्री.जोशी, देशमुख, सरनाईक, नागनाथ, पटवर्धन, श्रीमती नांदे यायच्या सगळ्यांचे आवडते होते जोशी व पटवर्धन. जेाशीसर प्रिन्सिपल तर होतेच पण N.C. C. Incharge ही होते.माझी एन.सी.सी.चे प्रशिक्षण घेण्याची तीव्र इच्छा होती. काॅलेजमध्ये एन .सी. सी. “बी” सर्टिफिकेट मिळाले. नागपूरला खदान येथे ८ दिवसाचा कॅंप सुध्दा केला. पातूर जवळ फायरींगला खरी ३०३ रायफल होती . परंतु माझ्या बाजुच्या मुलाला नजरचुकीने डमी रायफल दिली गेली होती . सर्वांनी ५ काडतुसेही लोड केली. टारगेटवर लक्ष केंद्रीत करून फायरचा हुकूम मिळतांच बंदुकीचा घोडा-चाप ओढला, सर्वांनी गोळी झाडली नी अचानक ईमर्जनसी शिट्यांचा कल्लोळ झाला. फायरींग थांबविले गेले. तपासणी केली गेली, डमी रायफलचा ताबा घेतला गेला. पुढील फायरींग सुरू झाले.मातीच्या उंचवटयावर लाईंग पोझीशनमध्ये होतो म्हणून आम्हा कोणालाही कोणतिही इजा झाली नाही.डमी रायफलमधून सुटलेली गोळी आमच्या पाचही जणांच्या अंगावरून गेली हेोती.रायफलमधून सुटलेली गोळी ज्या वेगाने पुढे जाते त्याच वेगाने रायफल मागे येत असते, हे लक्षात घेता रायफल खांदयाला घट्ट दाबून ठेवावी लागते नाहीतर खांदाच निखळण्याचा संभव असतो.

एन.सी.सी.नागपूर कँप
एन.सी.सी.चा नागपूर येथे ८ दिवसाचा कँप ठरला नी सर्वांची मन् आनंदून गेली.हा कँप खदान येथे आयोजित करण्यात आला होता.मिलीट्रीसारखाच होता हा एन. सी. सी.चा कँप .टेंटमध्ये राहायचे, प्रत्येकाने आपापले काम स्वतःच करायचे .दैनिक दिनक्रमाप्रमाणे सकाळी ४ वाजताच उठायचे ,प्रातर्विधी आटेापून ,टमरेल भरून चहा घेवून तय्यार राहायचे. ५ वाजता जॉगींगला २ मैल जाऊन यायचे. नंतर अर्ध्या तासात नास्ता, चहा घेऊन पूर्ण ड्रेस घालून परेडसाठी हजर राहायचे. एक तासाने परत टेन्ट मध्ये यायचे. दोन तासात स्नानादी कार्यक्रम झाला की बौध्दीक चालायचे ११ वाजेपर्यत. जेवण , विश्रांती चालायची दुपारी ४ वाजेपर्यंत,मग ट्रेनिंग आणि खेळ . ५ वाजता शहरात फेरफटका मारायला सुटी,पण रात्री ९ वाजेपर्यंतच , उशीर झाला ,कोडवर्ड विसरला तर ! पकडले जाऊन मिलीटरी टाईप शिक्षा ठरलेली. १) पाठीवर झोपून दोन्ही पाय उंच सरळ ठेवायचे, पायाला आधार द्यायचा नाही पण पाय खाली आले तर पार्श्वभागावर केनचे फटके बसायचे.
२)क्राउलींग म्हणजे पोटावर झोपून हाताच्या ढोपरावऱ पुढेपुढे चालायचे….इ.

आमच्या कॉलेजमध्ये बेरार ऑइल इंडस्ट्रीच्या मँनेजरची मुलगी श्यामला बालसुब्रम्हण्यम माझ्या वर्गात होती. ती फ्रॉक घाालून ,चष्मा लावून कॉलेजमध्ये येत असे.तिला प्रत्येक विषयाच्या पेपर मध्ये ८० टक्याच्य वरच मार्क मिळत असत.ती युनिव्हर्सिटीत प्रत्येक वर्षी मेरीट पहीली यायची . तिला सर्व विषयाची शिष्यवृति मिळत असे. प्रथम वर्ष बी .एस.सी. पासून एम.एस.सी. पर्यंत दर वर्षी त्यांची घोडदौड सुरूच राहिली. पुढे आय. ए.एस., आय.पी. एस., आय. एफ .एस. च्या केन्द्रीय लेाकसेवा आयेागाच्या परिक्षेतही प्रथम आली. तिने आय.एफ. एस. ची निवड केली. तिची स्विट्झरलँड मघ्ये charge the affairs म्हणुन नेमणुक झाली.

कॉलेजमधल्या गंमती

आमच्या कॉलेजमध्ये एकाच वर्गात त्रैवार्षिक,पंचवार्षीक योजनेेप्रमाणे वाटचाल करणारे भागडे, पाटील सारखे अनेक विद्यार्थी होते.साहजिकच त्यांना पिरीअड बंक करून बाहेर एन्जॉय करण्यात जास्त रसअसायचा . सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेणार्या फक्त ३ च मुली होत्या.कु.देव, कु. चिपळुणकर आणि कु .बालसुब्रम्ह्ण्यम . वर्ग कसला हॉलच होता,त्यात एका बाजूला कोपर्यात तिन्ही मुली बसायच्या.बडोद्याच्या मोठ्या व प्रसिध्द सायन्स काॅलेजमध्ये बरीच वर्षे हेड ऑफ दि फिजीक्स डिपार्टमेंट राहिलेल्या एका सिनिअर प्राध्यापकांना , शेगावच्या संत गजानन महाराजांचा स्वप्नात आदेश मिळाला. त्याप्रमाणे ते अकोल्याच्या सीताबाई आर्टस काॅलेज मध्ये फिजीक्स डिपार्टमेंटला आले होते . अध्यात्मिक वृत्तिचे हे प्राध्यापक अंगावर विभुतिचे पट्टे लावून लुंगी घालूनच प्रयेागशाळेत बसत असत.त्यांना फिजीक्समधील कोणत्याही विभागातील, कोणताही प्रश्न कधीही विचारला तरी तरी त्याचे निरसन विनाविलंब करीत.तसेच रसायन शास्त्राचे मुख्य प्राध्यापक श्री. पटवर्धनांनी सांगीतले होते. मला केव्हाही ,कोठेही ,रसायनशास्त्रातील केाणत्याही भागावरील कोणताही प्रश्न कधीही विचारा. अकोला रेल्वे स्टेशनवरून येतांना आम्हा ४-५ जणांना श्री.पटवर्धनसर भेटले, आम्ही त्यांना आमची रसायनशास्त्रातील अडचण सांगीतली. त्यांनी तेथेच रस्त्याच्या बाजूला दगडावर बैठक मारली नी विचारलेल्या प्रश्नाचे सेेाप्या भाषेत निरसन करणे सुरू केले ४५ मिनिटानंतर , आणखी काही विचारायचे आहे ? आम्ही सर्वांनी त्यांचे मनापासून आभार मानले. थोड्याच अंतरावरील रेस्टॉरेंटमध्ये सर्वजण फ्रेश झालेा.आम्हाला इंग्रजीसाठी श्री. बी.एन.झांबरे सर होते , त्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व वाखाण्यासारखे होते.त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी पुन्हा Elocution and Debate स्पर्धेत भाग घ्यायला लागलो.त्यांनी मला तसे प्रमाणपत्र दिले होते,ते मी आजतागायत जपून ठेवले आहे.
त्यावेळीआमच्या कॉलेज मध्ये कु शिंदे,ही जिल्ह्याधिकारी , अकोला यांची मुलगी कला विभागात शिकत होती. कॉलेजच्या वार्षीक स्नेहसंमेलनात ह्याच मुलीने सिनेमातील एक पूर्ण गाणे शिट्टीवर म्हटले होते. त्यावेळी ज्येष्ठ गायीका सुलोचनाबाईंच्या पार्टीचाही गाण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता.

एकदा यवतमाळच्या कॉलेजचे प्राचार्य आणी विश्वस्त असलेले प्रसिध्द मराठी शायर श्री. भाऊसाहेब पाटणकर ,यांचा शायरीचा कार्यक्रम १९६२-६३ मध्ये आमच्या कॉलेजमध्ये आयेजित करण्यात आला होता. शायरीचा कार्यक्रम म्हणताच , मुली उठून बाहेर जायला लागल्या, आयोजित पाहुणे अत्यंत रागाने उभे राहिले नी दरडावून म्हणाले ,” कोणीहि बाहेर जायची गरज नाही, शायरीत आक्षेपार्ह असे काहिही नसते फमक्त हलके-फुलके, मनाला आनंदून टाकणारे विनोद असतात.” मलाही जबादारीची जाणीव आहे,मीसुध्दा माझ्या कॉलेजचा प्राचार्य व विश्वस्त ही आहे. सर्व मुली परत जागेवर येउन बसल्या.कार्यक्रम सुरू झाला.

कॉलेज कुमारांसाठी:
केसास वेुव्हज,आम्ही फेस पावडर लावतो !
बुशकोट जसा, ब्लावूज आम्ही घालतो !!

पेड वेणीचे, करू नकोस मागे पुढे !
आम्ही तरी कितीदा,पहायचे मागेपुढे !!

वृध्दांसाठी:
अरे म्रृत्यो , येतास जर का तू सांगुनी !
तर बघितले असते , केाण तू ,अन् कोण मी !!

एकदा मेल्यावरी,मी परतुनी आलो घरी !
तेच होते दार आणि तीच होती ओसरी !!

हेाती तिथे तसबीर माझी , भिंतीवरी टांगली !
खूप होती धूळ आणी कसर होती लागली !!

हॉलमधून एक हात वर झाला,उभे राहून उस्फुर्ततेने बोलला,

मित्रांसाठी:
गर्दीत लागला धक्का, पण होता मऊ !
मी म्हटले , सॉरी ss, तिने म्हटले थँक्युss !!

हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला .असा हा मजेदार ,मनोरंजनात्मक कार्यक्रम नंतर ३-४ तास चालला. सर्वांच्या मनातील शायरी ह्या प्रकाराबाबतचे गैरसमज दूर झाले.शायरी सर्वांना स्वत: करावीशी वाटली . सिनेमा पाहिल्यावर आवडलेले गाणे जसे प्रत्येकजण गुणगुणतच बाहेर पडतो, तसेच काहिसे शायरीच्या कार्यक्रमाचे झाले.

बी.एस.सी. ची वार्षिक परिक्षा झाली. नागपूर विद्यापीठाचा निकाल १७ %लागला.तर कॉलेजचा निकाल ९ % च लागला. ज्याची मला भिती वाटत होती तसेच झाले. माझा organic केमिस्ट्री हा विषय राहीला.

माझ्या आयुष्यातील शाळा-कॉलेजमध्ये जावून शिकण्याचा एकूण १३ वर्षाचा कालावधी संपला.
पुढे काय !? करायचे !?

मी लहान ५ -६ वर्षाचा असतांना ति. मोठेमामा भोनला आले होते. त्यावेळी घरची आर्थिक परीस्थिती हलाकीची होती. तसेच गांवात फक्त चौथीपर्यंतच शाळा होती. ह्या सगळ्या परिस्थितिचा विचार करून आई-बाबांना वचन दिले. !
” मी तुमच्या मुलाला अकोल्याला शिकायला घेउन जातेा , मॅट्रिकपर्यंत माझ्याच जवळ ठेवतो , सगळा खर्च करीन .” तुम्ही दोघेही मधूनमधून भेटायला येत जा. तोपर्यंत तुमची परिस्थितिही सुधारेल. त्यानंतर संधी मिळताच ति.बाबांनाही मेडशीला शाळेत सरकारी नोकरीत लावून दिले. माझ्या शिक्षणात खंड पडला नाही. मामांकडेच राहिलो, अकरावी मॅट्रीक झाल्यावर पुढे काॅलेजमध्ये दोन वर्षे शिकलो. गांवापेक्षा मेडशीला नोकरीला असल्याने आर्थिक परिस्थितिही सुधारली होती. ह्या सगळ्या बाबींचा साकल्याने विचार केला , आई-बाबांशीही विचार- विनिमय केला.ति. मोठेमामांशी चर्चा केल्यानंतर सर्वानुमते निर्णय घेतला.
” आता स्वत:च्या बळावर नोकरी करून पुढील शिक्षण घेत राहायच ,प्रगति करायची , स्वत:बरोबर भावंडांचेही शिक्षण , िववाह….इ.च्या प्रगतीसाठी प्रयत्न करायचे. ”

!!

माध्यमिक शिक्षण..H.S,S.C.

श्री.नारायण मंत्री – मारवाडी शेतात गडी-माणसांसोबत काम करित होते. त्यांनी मला दुरूनच आवाज देऊन थांबविले. त्यांनी मला पाणी प्यायला दिले, मी घाट पीयीपयीच सायकल हातात घेऊन चढून आलेलो होतो . माझाही घसा सुकला होता. पाणी पिल्यावर बरे वाटले. संपूर्ण ३० मैल प्रवासात भेटलेली पहिली ओळखीची व्यक्ति,त्यांनी मला खूप धीर दिला. ते म्हणाले घोड्यावारच्या प्रवासासारखा सायकल प्रवास तसा बराच आरामाचा, दोन -चार पायडल मारले, उतारावर तर पायडल न मारता नुसते सीटवर बसायचे.थोडी विश्रांतीही मिळाली. तलाववाडीत रस्ता उताराचाच होता , वर चढून दोन- तीन वळणे पार केली की आमराई ,भोपळी -फुलांचा मळा नंतर खंडोबाचे देऊळ,येथे रथसप्तमीला मोठी यात्रा असते. त्यानंतरचा लहान ओढा ओलांडला की आलेच , ‘ मेडशी ‘ गांव . मोटार स्टॅंडवरून डावीकडे वळायचे, पुढे चक्कीजवळून डावीकडे वळून श्रीमती धनाबाई आंबेवालीच्या घरामागेच आमचेे घरी पोहोचलो. सायकल भिंतीला लावली,आत गेलो. ति. साै. आईसाहेबांना मी दिसताच खूप आश्चर्य वाटले. तू एकटाच ? कसा आलास ? सामानाची पिशवी ? थांब, चहा करते . मी पाणी पिलो, पाट घेउन बसलेा. अग , मी एकटाच सायकलवर आलो, सामान आणलेच नाही. मला प्रथम काहितरी खायला दे, मग चहा घेतेा.ति. बाबा शाळेतच असतील ना ? थोडेसे पोटात ढकलून ,चहा घेऊन सायकलनेच शाळेत पोहोचलो. शाळा बंद करून ति. बाबा घरीच निघाले होते . मला सायकलवरून उतरतांना पाहताच , तू सायकलवरून एकटाच ? कसा ? एवढे तांतडीचे कोणते काम आहे? शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व गुरूजन ,हायस्कुलसाठी वर्गणी गोळा करायला बाजूच्या गावात गेले आहेत .

मी घरी जाता जाता ति. बाबांना थोडक्यात माझी अकरावीची मँट्रिकची फी भरायची आहे, ति. मोठेमामा दाैर्यावर आहेत,फी उद्या सोमवारीच भरायची आहे, वेळ नाही.त्यासाठीच मी तांतडीने सायकलवरून आलो , मामाच्या घरी कोणालाही माहिती नाही, आजच परत अकोल्याला जायचे आहे. सकाळीच ९ वाजता एकटाच निघालो, जवळ पैसे नाहीत, कोठेही न थांबता आलो. ति. बाबांच्या लक्षात सर्व परिस्थिति आली. मुख्याध्यापक श्री. हाते गुरूजीहि गांवात नाहीत, जाता जाता श्री. रामेश्वरशेटजींना त्यांनी सगळी परिस्थिति समजाऊन सांगीतली. त्यांनी ताबडतोब ५० रूपये काढून दिले. प्रथम श्री. हाते गुरूजींच्या घरी निरोप ठेवला.घरी ति. सोै. आई काळजीत होती, आमची दोघांची वाट पाहत होती. घरी पोहोचलो, सायंकाळचे ७ वाजले होते. शेवटची मोटारगाडी रात्री ८.३० वाजता होती. ति. सोै. आईचा स्वयंपाक तयारच होता. आम्ही तिघेही जेवलो, तयारी केली . मोटार-स्टँडवर सायकल घेऊन पोहोचलो.

शेवटच्या गाडीवर सायकल टाकली ति. बाबा आणि मी गाडीत बसलो. रात्री १०.३० ला मामांच्या घरी पोहोचलो.मला धड चालताही येत नव्हते . माझी बसायची जागा अगदी हुळहूळ झाली होती. मामांच्या घरी सगळेच फार फार काळजीत होते.खिडकीत टेबल-लँप बांधून अंगणात ऊजेड केला होता. सगळेच खूप काळजीत होते. आम्हा दोघांना पाहून त्या सगळयांचा जीव भांड्यात पडला.
मामांच्या घरी मी सायकलवर एकटाच मेडशीला गेलो ,ही गोष्ट माझ्या देशमुख नावाच्या मित्राकडून कळली , नी आजीच्या काळजाचे ठोके वाढले. आजी मोठ्या मामीला घेवून लहान पुलाजवळच्या धोब्याच्या घरी गेली. तो पंचागातून हरवलेल्या/अचानक गांवाला गेलेल्या व्यक्तिबाबतच्या प्रश्नांची उत्तरे शोधून सांगायचा.आजीने माझे नांव सांगून , मी केाठे ? कसा आहे ? सुखरूप घरी परत कधी येईल ? असे प्रश्न विचारले.त्याने विनोद सुखरूप आहे, तो आजच परत येईल. आजी आणि मेठ्या मामी घरी परत आल्या. आता फक्त वाट पाहत घरी थांबणे हातात होते.सर्वांना माझा खूप राग आला, काळजीहि वाटत होती.
मी मात्र मनातून खूप घाबरलेलो होतो. पण ति. बाबांनी आजीला ३० रूपये दिले , विनोदने खूप मोठी चूक केली आहे, त्याने आम्हाला सगळ्या गोष्टी सांगीतल्या, जवळ एकही पैसा नसतांना एकटयाने, घरी कोणालाही न सांगता सायकलने ३० मैल मेडशीला यावयास नको होते.दैवाची कृपा म्हणून रस्त्याने येतांना पातूरच्या २ मैल घाटात कोणी लुटले नाही. मागच्या पंधरवाड्यात तलाववाडीच्या घाटात एका व्यक्तिचा खून करण्यात आला होता. भविष्यात तो अशा चुकीच्या गोष्टी करणार नाही.
मीही माझ्या चुकांसाठी सर्वांची पाया पडून माफी मागीतली.सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.मामाच्या घरीही कोणी जेवले नव्हते. सर्वांची जेवणे झाल्यावर ,सगळे झोपलो.
सकाळी चहा-नास्ता झाल्यावर ति. बाबा मेडशीला परत गेले,ति. साै. आई घरी एकटीच होती ना ! सोमवारी एच. एस. एस. सी. परिक्षेचा अर्ज भरला ,परिक्षेची फी वर्गशिक्षकांकडे जमा केली. आता मला प्रिलीमनरी आणि फायनल परिक्षेची तयारी करावयाची होती. आम्ही मित्रमंडळींनी फक्त ४ तासच झोपायचे ठरविले. त्याप्रमाणे रात्रंदिवस विषयवार वेळात्रक तयार करून अभ्यास सुरू केला. फिजिक्स, केमिस्ट्रीच्या नोटबुक्स पूर्ण करून त्यावर गुरूजींच्या स्वाक्षरी करून घेतल्या.त्याला ‘ ए ‘ ग्रेड मिळाली. मग जोमाने लेखी परिक्षेची तयारी सुरू केली. मागील ३ वर्षाच्या प्रश्न – पत्रिका मिळविल्या .त्यातून महत्वाचे प्रश्न निवडले,घड्याळ समोर ठेवून ३ तासात प्रश्नपत्रिका- प्रमाणे उत्तर पत्रिका लिहिण्याचा सराव सुरू केला.
ह्याचा फायदा मला प्रिलीम- परिक्षेतही झाला. वर्गात पहिल्या ७ क्रमांकात मी आलो. शाळेतील गुरूजनांच्या आणि घरच्यांच्यासुध्दा अपेक्षा वाढल्या. पण बोर्डाच्या परिक्षेचे पेपर्स बाहेरिल परिक्षक तपासतात, असे आमच्या गुरूजींनी सांगितलेले होते़. ह्याशिवाय उत्तरपत्रिका कडक रितीने तपासल्या जातात. ह्याच्या परीणामस्वरूप मार्कांची टक्केवारी शाळेपेक्षा बरीच खाली येते. प्रॅक्टीकल परिक्षेचे मार्कही विचारात घेतले जातात. फायनल परिक्षेचे वेळापत्रक आले . त्याप्रमाणे प्रॅक्टिकल परिक्षा झाली. त्यासाठी बाहेरील परिक्षक आले होते. काही दिवसातच लेखी परिक्षा होती . दरम्यान जागरणाचा परिणाम प्रकृतिवर झाला होता. सवय नसल्याने तब्यतीची कुरबूर सुरू झाली. त्याला न जुमानता अभ्यास सुरू होता.
फायनलची लेखी परिक्षा वेळापत्रकाप्रमाणे पार पडली. आता अभ्यासाचे टेन्शन संपले. उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या . रिकामा वेळ कसा कारणी लावायचा ? बाबुजी देशमुख वाचनालयात सकाळ सं ध्याकाळ वर्तमानपत्रे वाचनाचा मार्ग सुचला.नवनवीन मित्र मिळाले. ” EARN WHILE YOU LEARN ” संबंधीचा लेख वाचनात आला. ति. मोेठे मामांची परवानगी घेतली. प्रयत्न सुरू केले.

अकोला रेल्वे स्टेशन जवळच्या जठार पेठेतील Berar Oil Industry ला भारतीय लष्कराच्या Ordinance Factory कडून दारूगोळयांचे डब्ब े बनवून पुरविण्याचे मोठे कंत्राट मिळाल्याची बातमी वाचली. त्यासाठी २ रूपये ५० पैसै प्रती दिवसाप्रमाणे मेहनताना मिळणार होता. त्यातील ३० पैसे वैद्यकीय उपचाराचे वजा जाता दर ८ दिवसानंतर १७ रूपये ६० पैसे हातात मिळणार होते. ति. मेाठेमामांची परवानगी घेतली. काम सुरू केले, माझ्या प्रमाणे जवळजवळ १५० व्यक्ति कामाला लागले. ४५ दिवसानंतर सदर कंत्राटाचे काम संपले .
दरम्यानच्या काळात मला माझ्या शाळेतील मित्र कावळे भेटला. त्याने पाण्याच्या टाकी जवळच्या M.S .E B. कार्यालयात स्टोअर्स विभागात Clerk ची नोकरी मिळाल्याचे सांगितले. मीही प्रयत्न करायचे ठरविले. सोमवारी कार्यकारी अभियंत्यांना भेटायला गेलो. चाैकशी करता श्री.काघलकर , कार्यकारी अभियंता, फार कडक स्वभावाची व्यक्ति आहे. त्यांचा हवालदार होता विठ्ठल राव ,त्यांनी मला धीर दिला.मी श्री. काघलकर साहेबांची परवानगी घेवून आत गेलो. त्यांनी मला बसायला सांगून टाईम्स ऑफ इंडीया वाचायला दिला, नी स्वतः कामात मग्न झाले. १५ मिनिटानंतर श्री. काघलकर,साहेबांनी मला पेपरात वाचलेल्या बातम्यातील सर्वात महत्वाची बातमी विचारली . “रशियाचे पंतप्रधान माननीय श्री.ख्रृश्चेव्हांचा, युनोत उगारलेल्या जोड्यासह फोटो” आणि त्याची सविस्तर बातमी त्यांना सांगितली. त्यांनी स्टेाअर्स इन्चार्ज श्री. झोपाटेंना ताबडतेाब बोलावले. श्री.झोपाटेसाहेब घाबरेघुबरे होऊन आले. श्री. काघलकर साहेबांनी ” ‘लोणकरांना कामावर रूजू करून घेऊन ४ दिवसांचा कामाचा अहवाल द्या, समाधानकारक अहवाल असेल तर त्यांना कामावर सुरू ठेवून पगार देवू .नाहीतर पगार न देता घरी पाठवा.”असे सांगितले.येथे ३ रूपये प्रति दिन प्रमाणे रोजंदारी मिळेल असे सांगितले. एकंदर ४५ दिवस उन्हाळ्यात काम केले.
काॅलेज विश्व नागपूर विद्यापीठ
H.S.S.C. 1961 March चा बोर्ड परिक्षेचा निकाल आला . मी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेा. काॅलेज – प्रवेशाचे सर्वांना वेध लागले.

मामा घरी – मुक्काम अकोला

अकोला येथेच नाही तर संपुर्ण सोनार समाजात सर्वश्री.हिंगणेकर, ठोसर आणि उज्जैनकर ह्या त्रिमुर्तीच्या शब्दाला खुप मान होता. कोण्त्याही प्रसंगात त्याचा सल्ला मोलाचा मानला जात असे.पश्चिम वर्हाड विभागाच्या शिक्षण खात्यात श्री. हिंगणेकरमामा स्विय सहाय्यक पदावर होते.डॉक्टर ठोसर, अकोला सिटी सिव्हील कोर्टात स्विय सहाय्यक होते. श्री.उज्जैनकर अकोल्याला पंजाब नशनल बँकेत होते.डॉक्टर ठोसर,श्री.उज्जैनकर हे श्री.हिंगणेकरमामांचे नात्याने मामा होते पण ते जीवलग मित्रांसारखे वागत.

अकोल्याला आल्यावर मामांनी माझी पहिल्या वर्गाची तयारी करुन घेतली. घराजवळील दाबकी रोड म्युनिसिपल प्राथमिक शाळा क्रमांक( ८),मध्ये, मुख्याध्यापक, श्री.विद्यावाचस्पतीजींनी परीक्षा घेउन मला सरळ दु‌‌सर्‍या वर्गात प्रवेश दिला.माझे प्राथमिक शिक्षण चवथ्या वर्गापर्यंत ह्याच शाळेत झाले.तेथे मला अरुण उपश्याम आणी बाळु डिडोळकर हे दोन मित्र मिळाले.आम्ही वर्गात तिघेही एकामागे एक असे बसत होतो. मोठया हिंगणेकरमामांना मुलबाळ नव्ह्ते. लहान मामांचे लग्न झाले नव्ह्ते. आजी, मामी दोन्ही मामांचा मी फार लाडका होतो. सगळ्यांच्या मताने माझे ‘महादेव’ हे नाव बदलून “विनोद” असे ठेवण्यात आले. आमच्या शेजारी पातुर्ड्याचे सप्रे कुटुंबीय राह्त होते. त्यांची मुलगी “शशी” राहत होती. ती माझ्या आईची लहानपणापासून मैत्री होती. ह्या शशी मावशीचा मी फार लाड्का होतो. मला कडेवर घेवुन शाळेत नेणे आणणे हे काम तिने घेतले होते. ती कधी कधी मला चिमटे घेत असे,धप्पाटे घालत असे शाळेत नेतांना,पण प्रेमाने नी जबाबदारीने!

शाळेत माझे वर्गशिक्षक श्री.करकडे होते , ते फार कडक होते.त्यांची करडी नजर सगळ्यांवर असायची.त्यांच्या उभ्या छडीचा हातावरचा मार अजुनही लक्षात आहे. त्यामुळे आम्हाला लहानपणीच एक शिस्त लागली, नियमितता आली. चवथीपर्यंत माझा पहीला नंबर कायमच होता.चवथीची परीक्षा झाली.निरोप समारंभाला श्री.मत्तलवार, उपशिक्षणाधिकरी, आले होते. बक्षिस-समारंभानंतर त्यांनी पाचव्या वर्गापासुनच्या नवीनच शिकायच्या ईंग्रजीतल्या गंमती सांगितल्या.मराठीतला’ काऊ’ म्ह्णजे कावळा, ईंग्रजीतला ‘ काउ ‘म्हणजे ( मराठीत) “गाय” होईल…ई.नवीन नवीन गंमती जमती ईंग्रजी भाषेत शिकायच्या आहेत, असा संदेश दिला.

त्यानंतर ऊन्हाळ्याची सुटी लागली.आता शाळेतील सवंगडी रोज भेटणार नाहीत.नवीन शाळेत,नवीन गणवेष घालुन जायला मिळणार आहे.नवीन सवंगडी भेटणार आहेत.ह्या शाळेत आल्यावर सुरवातीची प्रार्थना”नमितो तुज शारदे…..”.किती सुंदर विद्यादेवीला केलेले वंदनच असायचे.पहिलीतील मुलांना अगदी सहज गुण गुणायला लावणारी कविता-गाणे” यू यू यू पपी,पपी,! आपण खेळू लपाछपी….,!” आणि “अमुचा हा मध्यप्रांत ,गहु/बाजरी/कापुस हा पिकवी……!.”सगळे फक्त आठवत राहायचे.

मध्यप्रांताचा वर्हाड (आत्ताचा विदरभ) म्ह्णजे अकोला ,बुलढाणा,अमरावती,वर्धा ,नागपूर,गोंदीया,चांदा(चंद्रपूर),आणि यवतमाळ हे आठ जिल्हे मिळुन होणारा भूभाग होता.मोठे हिंगणेकर मामा ह्या विभागाच्या शिक्षण-अधिक्षकांचे स्विय-सहाय्यक होते.त्यांचे सोबत नेहमी शाळा तपासणीसाठी जात असत.त्यांतील सर्वश्री.आपटे व्ही. ए.,बक्षी,दाणी,आपटे टि.ए.,तनखिवाले,….ई.नावे मला अजुनही लक्षात आहेत,कारण ह्या सगळयासोबत मोठेमामांचे खुप चांगले संबंध होते.

प्राथमिक शिक्षण पुर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी माझे नाव अकोल्यातील सगळ्यात मोठया आणी सर्वोत्तम अशा शासकीय बहुऊदयेशीय माध्यमिक शाळेत घातले.दाबकी-रोड वरील घर ते स्टेशन जवळील शाळा ही जवळ-जवळ चार मैल अंतरावर होती.मी ह्या शाळेत पायी चालत यायचो.माझे वर्ग-शिक्षक श्री.अरगडेगुरुजी होते.नवीन सवंगडी मिळाले.ही शाळा खुप मोठी होती.शंभर वर्ग-खोल्या होत्या.पाचवी त अकरावी प्रत्येकी तीन-तुकडया मिळुन पंधराशे विद्यार्थी होते.अकोल्यातील प्रतिष्ठीत नागरीकांचीच,वकील,डौक्टर,अधिकारी,उदयोगपती,…..ईत्यादिंच्याच मुला-मुलींनाच ह्या शाळेत प्रवेश दिला जाई.पण नोहेंबर महिन्यात कांजण्याने मी आजारी पडलो,महिन्यानंतर शाळेत जाऊ लागलो.पण अश्क्ततेमुळे मला त्रास होत होता.ही बाब मोठे मामांच्या लक्ष्यात आली.त्यांनी विचार करुन माझी शाळाच बदलली.घराजवळच्याच सितामाता मंदिराजवळच्या युनियन हायस्कुलमध्ये मी जाऊ लागलो मला ह्या. शाळेत मागे झालेला सगळा अभ्यास भरुन काढायचा होता.येणार्या परीक्षेत वरच्या क्रमांकाने ऊत्तीर्ण व्हायचे होते.मुख्याध्यापक श्री. कुळकर्णीं गुरुजींनी मला प्रोत्साहनच दिले.सहामाही परिक्षेत माझा पहीला नंबर आला.वार्षिक परिक्षेतही तो कायम राहीला.घरी मामा,मामी,आजी…सर्वांची मने आनंदून गेली.

उन्हाळ्याच्या सुटीनंतर युनियन हायस्कुल,शहर शाखा स्टेशवनजवळच्या न्यु ईंग्लिश हायस्कुल, मुख्य शाखेत विलीन करण्यात आली.त्यामुळे मी पुन्हा स्टेशनजवळ न्यु ईंग्लिश हायस्कुलमध्ये जायला लागलो, सहाव्या वर्गात ! येथे वर्गशिक्षक श्री.निपाणकर गुरुजी, जतकर गुरुजी, कांतगुरुजी,बक्षी गुरुजी, …ई.होते.प्रत्येक विषय शिकवायला वेगवेगळे शिक्षक होते खेळायल मोठ्ठे मैदान होते.मी आठव्या वर्गापर्यंत ह्याच शाळेत होतो.न्यु ईंग्लिश हायस्कूलच्या दोन आठ्वणी आहेत.

(१) आमच्या शाळेची सहल पारस-नागझरी-शेगांवला गेली होती.पारस हे कोळ्शावर चालणारे विदयुत केंद्र आहे.जवळच नदी आहे त्यावेळी हे केंद्र पुर्णपणे तयार झाले नव्हते.ते बघितल्यावर आम्ही नदी काठाकाठाने चालत चालत गाणी म्ह्णत नागझरीला पोहोचलो.दुपारची वेळ झाली होती. नागझरीला गोमाजी महाराजांची समाधी आहे.गोमुखातून गंगेचे पाणी पडते म्ह्णतात.ह्या धारेखाली सर्वांनी आंघोळी केल्या. सोबत आणलेले डब्बे काढून अंगत-पंगत करीत जेवणे झाली.गोमाजी महराजांनी त्यांच्या हाताच्या ढोपराने खणलेल्या सुमारे ५०० फुट लांब गुहेतील समाधीचे १०-१० च्या गटाने जाऊन दर्शन घेतले. श्री.जतकर गुरुजींनी दोन गाणी म्हट्ली, (१)”रे हिंद बांधवा,थांब ह्या स्थळी,अश्रु दोन ढाळी! ईथेच विसावली ती राणी झांशीवाली.तसेच हिंदीतू (२)हमने तो, कलीयाऍ मांगी,काटोंका हार मिला !

सर्वजण गहिवरले, जवळ्च्याच, कड्क ऊन्हाळ्यातही न आटणार्या प्रसिध्ध झर्याच्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन ताजेतवाने झालो.ऊन्हे ऊतरली, नी सर्वजण शेगांवच्या मार्गाला लागलो.सायंकाळी शेगांवला पोहोचलो.

दुसरी आठवणः-आठव्या वर्गात आसतांना गांधी-जयंतीला भाषणाची स्पर्धा होती. मराठी, हिंदी, संस्कॄत, ईंग्रजी….ईत्यादितून बोलायचे होते. श्री.निपाणकर गुरुजींनी माझी ईंग्रजीतुन भाषणाची तयारी करून घेतली.भाषण स्पर्धेत पहिला नंबर गांधीजीं विषयी संस्कॄत- भाषणाला, ईंग्रजी-भाषणाला दुसरा, तर हिंदी-भाषणाला तिसरा क्रमांक देण्यात आला. मला त्यावेळी ‘नदी शेवटी सागरालाच मिळेल…आणि ‘फुलाची- गोष्ट’ मिळुन एक पुस्तक मिळाले. हे पुस्तक मी अजुनही जपून ठेवलेले आहे
माध्यमिक शिक्षण:-

त्यावेळी १० वी लोअर मॅट्रीक दोन वर्ष तर ११वी हाय्यर मॅट्रीक तीन वर्षाचा असे दोन अभ्यासक्रम शासनाने जाहीर केले.मी ११ वी हाय्यर मॅट्रीकला शासकीय बहुऊद्देशीय उच्च माध्यमिक शाळा, अकोला रेल्वे स्टेशन जवळच्या शाळेत प्रवेश घेतला. तेथे ९ व्या वर्गात प्रवेशासाठी तेथील श्री.पाटील गुरुजींनी बुध्धिमापन- निवड-परीक्षा घेतली. त्यानुसार कला,विज्ञान,व्होकेशनल-टेक्निकल,वाणिज्य ह्यापैकी ‘विज्ञान’ शाखेत मला प्रवेश मिळाला. आठव्या वर्गात माझा चारही सेक्शन मिळून दुसरा क्रमांक आला होता.नवीन शाळेत प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक होते. इंग्रजी,मराठी-संस्कृत,गणित, विज्ञान,सुतारकाम यासाठी अनुक्रमे श्री.जोग गुरूजी,श्री.माटे गुरूजी, श्री.काळे गुरूजी, श्री.देशपांडे गुरूजी,श्री.शहाणे गुरूजी होते.येथे स्वयंअध्यापन कसे करावे हेही शिकावयास मिळाले.ह्याशिवाय जवळच्या बी. एड.कॅालेजमधून श्री.फेगडे गुरूजी,श्रीमती कुळकर्णी,श्री.अरगडे गुरूजी अनुक्रमे गणित, मराठी, इतिहास-नागरीकत्व शिकवायला यायचे. श्री.अंजनकर गुरूजी एन.सी. सी. ला होते.श्री.जोग गुरूजींनी इंग्रजीचा अभ्यास करतांना स्वयंअध्ययन पध्दतीने करायला शिकवीले़. विषयातील कठीण भाग, कठीण शब्द शोधायला, डिक्शनरी कशी वापरायची हे शिकविले. इतर विषयासाठीसुध्दा ह्या पध्दतिचा वापर करता येतो हेही सांगीतले . भविष्यात ह्याचा उपयोग करण्याचा हेही सांगितले.श्री. माटे गुरूजींनी वर्गातील सर्व विद्यार्थांना संस्कृत आणि हिंदी परीक्षांना बसविले. श्रीमती कुळकर्णीबाईंनी शिकविलेली भावस्पर्शी अशी श्री. साने गुरूजींची “आई” ही कविता आम्ही कधीही विसरणे शक्य नाही.

नवीन शाळा खूपच मोठी होती.एकुण शंभरहून जास्त वर्ग खोल्या, फिजिक्स, केमिस्ट्री, जीवशास्त्र, टॅक्निकल, सुतारकाम, लोहारकामासाठी वेगवेगळ्या खोल्या होत्या. खेळायला मोठे मैदान, सगळे खेळ खेळण्याचे साहित्य, जिल्हा-ऑलिम्पीक मैदान होते.येथे ९ वी,१० वी तसेच ११ वीचे प्रत्येकी ४-४ सेक्शन होते.माझ्या वर्गात लोथे, पुराणिक, नाकाडे , चौधरी, ही खुप श्रीमंतांची मुले होती. त्यांना सुरवातीपासूनच शिकवणी होती.माझी स्पर्धा ह्याच मुलांशी होती.मला शिकवणी तर खुप दुर पुस्तकाचे गाईड शब्दही माहिती नव्हता दाबकी-रोड ते शाळा हे ४ मैलाचे अंतर कधी कधी मामांच्या सायकलवर तर कधी पायीच चालत यावे लागायचे. शाळेत एन.सी.सी./ए.सी.सी.ची प्रशिक्षणाची सोयही होती.शनिवार/रविवार सकाळी त्याचे ट्रेनिंगचे वर्ग असायचे.त्यावेळी मी लहान दिसत होतो. मला एन.सी.सी.त घेतले नाही.मला खुप वाईट वाटले.तसेच मला अजिंठा-वेरूळ सहलिला जाता आले नाही. वयाने लहान असल्याने क्रिकेट,हाॅकी….. ई. खेळातही भाग घेता आला नाही.

माझे नवीन मित्र लोथे, पुराणीक,चैाधरी, नाकाडे, मोहरील सर्वजण ह्याच शाळेत पाचव्या वर्गापासून शिकत होते.ह्या सगळ्या खूप हुषार मुलांशी माझी स्पर्धा होती. आता पर्यंत शाळेत शिक्षक जातीने लक्ष देत , अभ्यास करवून घेत ,वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीकडे त्यांचे बारीक लक्ष असायचे . ह्या शाळेत प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक होते. वेळापत्रका प्रमाणे त्या त्या विषयाचे शिक्षक येवून शिकवून जात़. होमवर्क देवून जात. दुसर्या दिवशी ते तपासून परत मिळायचे. सर्व गुरूजनांचे माझ्या प्रगतीवर प्रत्येक तिमाही परीक्षेनंतर बारकाईने लक्ष ठेवून असायचे. ति.हिंगणेकरमामा मधूनमधून कामानिमीत्य दैार्यावर जात असत. त्यांचेही माझ्या प्रगतीवर बारकाईने लक्ष असायचेच. श्री.जाेगगुरूजी आणि श्री.देशपांडेगुरूजींच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विषयाचा सेल्फ स्टडी कसा करायचा हेही शिकत होतो.

वार्षीक परिक्षा झाली.नववीत ऊत्तीर्ण होऊन दहावीत गेलो. पण पहिल्या दहा मध्येही माझा नंबर आला नाही. त्यावेळीच सर्वदूर फ्लुुची साथ आली होती. फ्लुवर कोणतेही परीणामकारक औषध आधुनिक वैद्यकशात्रात उपलब्ध नव्हते. अशावेळी औषधोपरासाठी अायुर्वेदकशात्र,होमिओपॅथीचे धर्मार्थ दवाखाने जागोजागी उघडण्यात आले. प्रत्येक घरातील व्यक्ती एकामागेामाग आजारी पडायला लागले. मोठेमामांकडेही एकापाठोपाठ एक आजारी पडले. त्यावेळी फक्त मोठेमामांनी घरातील प्रत्येकाला औषधे , चहा- पाणी-बिस्कीटे….ई. जागेवरच नेऊन दिली. आलेले पाहुणेही आजारी झाले.

दहावीत असतांना आमच्या शाळेच्या स्न्हसंमेलनाच्या निमित्ताने दिव्याचा इतिहास,तसेच आधुनिक दिवे कसेआले ह्याचे प्रदर्शन करायचे आम्ही ठरविले . अति प्राचीन काळी मानव जंगलातच राहायचा. प्राण्यांना मारून त्यांचे कच्चेच मांस खायचा. कंद – मुळे , जंगलातील मिळतील ती फळे खायचा . शिजविण्याचा प्रकार माहितीच नव्हता . त्याकाळी जंगलात वणवा पेटला . त्यांत प्राणी , पशुपक्षी भाजल्याने मृत्यू पावले . मानवाने दुसरे काही खायला नसल्याने ते तसेच खाल्ले . त्याला त्याची चव रूचकर लागली . नंतरच्या काळात वणवा कसा लागतो याचा त्याने कसून शोध घेतला . त्याला कळले की , दोन झाडे वादळात एकमेकावर जबरदस्त घासल्याने ठिणगी पडून अग्नि तयार झाला .जंगलाला आग लागली . अशा तर्हेने अग्निचा शोध लागला . नंतर नदीकाठी भटकतांना देोन गारगोट्या एकमेकावर घासल्यानेही अग्निची ठिणगी तयार होते , हेही कळले .

प्राणी , मासे ह्यांच्यी चरबीतून तेलासारखा पदार्थ मिळतो , त्यापासून दिव्याचा शोध लागला . हळूहळू मशाल , लँप , कंदीलाचा शोध लागला . त्यानंतर पेट्रोमँक्स गँसबत्ती , गँस वेल्डींग आल्यावर , वेल्डींग करतांना आवश्यक अशा ऑक्सीअँसिटिलीन गँसवर आधारित दिवे आले . नंतर वीजेवर चालणारे दिवे आले नी फार मोठी क्रांती झाली . ट्युब लाइटचेही कित्येक आकारीतील दिवे आले . महागड्या कंपन्यांच्या जाहिरातीसाठी न्यऑन साईंन्सचा उपयोग होऊ लागला . क्ष-किरण , गँमा , बीटा किरणांचा , आणी आता लेसर किरण क्रांती घडवीत आहेतच . माझ्या गटाकडे ऑक्सी अँसिटिलीन लँपचे प्रोजेक्ट मिळाले . त्याकाळी सायंकाळनंतर आईस्क्रीम , कुलफी विकणारे ,फेरीवाले , हा लँप त्यांच्या टोपलीवर पक्का बांधायचे . हा लँप सोसाट्याच्या वारा लागला तरी विझत नसे . आमच्या गटाने ह्या फेरिवाल्यांच्या सहकार्याने तसा ऑक्सीअँसीटिलीन लँप प्रदर्शनासाठी बनऊन घेतला .
आमचे हे दिव्याचे प्रदर्शन पाहण्यासाठी अकोला शहरातूनच नव्हे तर पंचक्रोशीतून लोक आले होते . सर्वांना हे प्रदर्शन खूपखूप आवडले .

नववी, दहावी पास झाल्यावर अकरावीत प्रवेश घेतला. अकरावी म्ह्णजे नागपूर बोर्डाची,हाय्यर सेकंडरी सर्टिफीकेट परीक्षा होती. परीक्षेची कसून तयारी करायची होती. किमान लायब्ररी लावणे फार आवश्यक होते..त्यासाठी वर्गणीसह पंधरा रुपये हवे होते. ऊन्हाळ्यात गावी भोनला गेलो होतो. तेथे नरहरी आजोबा, रामचंद्रकाका, सदशिवकाका कोणीही पंधरा रुपयाची आर्थीक मदत केली नाही. पण लेाणकर घराण्यातील किमान एकजण तरी घराबाहेर-शहरात शिकून पुढे जायला पािहजे अशी केारडी सहानुभूतीमात्र व्यक्त केली.नाइलाजाने रिक्तहस्ते परत आलेा.शेवटी क्रमीक पुस्तक, होमवर्क नोटस, विषय शिक्षकांचे मार्गदर्शन, वर्गमित्रांची मदत घेतली. रात्रंदिवस मेहनत करायला लागलो. फक्त २-३ तास झोपायचे. शाळेच्या prilimanary परीक्षेत पहिल्या सातमध्ये आलो.

वेडगळ- साहस:-
H.S. S.C.बोर्डाच्या परीक्षेचा फॅार्म भरायचा होता. मोठेमामा दैार्यावर जबलपूरला गेले होते.८-१० दिवसांनी येणार होते. घरी आजी/मोठ्यामामी कोणाजवळही ३० रूपये परिक्षा -फीचे पैसे नव्हते. परिक्षा फी ४ दिवसात भरणे आवश्यक होते. कोणालाही पैसे मागणे शक्य नव्हते.काय करावे?? जवळ पैसे नव्हते .
त्यावेळी एकच मार्ग सुचला! सैा. आई आणी बाबा भोन हे गांव सोडून नैाकरी निमित्ताने अकोल्यापासून ३० मैलावर मेडशी ता. वाशीम येथे शाळेत लागले होते. गावापेक्षा परिस्थिती बरी होती. त्यांच्याकडे जाऊन पैसे आणावे असा विचार केला. पण घरी आजी- मामीला कसे सांगायचे? अकोल्यापासून ८-१० मैलावर शिंदखेडला महाशिवरात्रीला महा देवाची यात्रा होती. घरी सायकल होतीच. १-२ मित्रांना डबलशीट-डबलपायडल करीत जायचेसाठी विचारले. पण कोणीही तयार झाले नाही.शेवटी शनिवारी सकाळीच एकट्याने च मेडशीला ३० मैैल सायकलने जायचे ठरविले. त्यावेळी खाजगी मोटार-सर्ह्विस भुरमल, नटवरच्याा गाड्या होत्या, मोटारभाडे एकेरी ३ रू. होते. पण जवळ त्याचीही सोय नव्हती.
शेवटी एकट्यानेच सायकलने निघालो. प्रत्येक १० मैलावर विहीरीवर पाणी तर पिता येईल. मेाटारने १-२ तासात मेडशीला पोहोचता येते . सायकलने जातांना पातूरनंतर २ मैलाची घाट-चढण विचारात घेता ४-५ तासात मेडशीला पोहोचता येईल असा विचार केला. सकााळीच ९ वाजता अकोल्याहून निघालो. १०-१० मैलावर पाणी पिऊन विश्रांती घेत-घेत दुपारी ४ वाजता घाट-चढणीला सुरवात केली. मेडशीच्या अगोदर २ मैलावर तलाव-वाडीच्या लहान घाटात एक आठवडाअगोदरच एका व्यक्तिचा खून झाल्याचे पेपरमध्ये वाचले होते. ह्या घाटा अगोदरच मेडशीच्या श्री. नारायण मंत्री (मारवाडी) यांचे शेत होते .